Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

त्यांनी हिंदीत का बोलावं?

उ
उपयोजक
Mon, 04/11/2022 - 15:22
🗣 510 प्रतिसाद
तीन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एक विनंती केली की वेगवेगळ्या राज्यांमधल्या असमान मातृभाषा असणार्‍या लोकांनी एकमेकांशी संवाद साधताना इंग्रजीऐवजी हिंदी भाषा वापरावी. https://www.google.com/amp/s/indianexpress.com/article/india/people-different-states-should-speak-hindi-not-english-shah-7858861/lite/ या अनावश्यक विनंतीला अहिंदी राज्यांमधे साहजिकच विरोध होतो आहे. विशेषत: दक्षिणेकडच्या राज्यांमधे. आता ज्या लोकांची मातृभाषा हिंदीच आहे त्यांना या विनंतीबद्दल काहीच आक्षेप नसणारेय.उलट त्यांचा आयता फायदाच होईल. आता प्रश्न असे आहेत. १. दोन राज्यांमधील असमान भाषिकांनी कोणत्या भाषेत एकमेकांशी बोलावं अशी विनंती गृहमंत्री का करत आहेत? लोकांनी कोणत्या भाषेत बोललं पाहिजे हे गृहखात्याच्या अखत्यारीत येतं का? २. या विनंतीला दक्षिणेकडच्या राज्यातले लोक सकारात्मक प्रतिसाद देतील असा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा? की ही विनंती हिंदीतून बोलू शकणार्‍या अहिंदी राज्यांतल्या लोकांसाठीच आहे? अशी विनंती केल्यावर ज्यांना हिंदी येत नाही ते लगेच हिंदी शिकून घेतील हा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा? ३. या विनंतीमागे कारण काय असावं? हिंदी पट्ट्यातल्या लोकांची सोय व्हावी? कारण हिंदी पट्ट्यातले लोक "हम तो पापी पेट के लिए आए हैं भाई" हे रडव्या चेहर्‍यानं सांगून अहिंदी भाषिकांना 'आमची सोय बघा' असंच सांगू पाहतात. हिंदीभाषिक अहिंदी राज्यातल्या भाषा शिकायला राजी नसतात. पण अहिंदी भाषिकांनी मात्र हिंदी शिकावी ही अपेक्षा बाळगतात. हे हिंदी पट्ट्यातले लोक हिंदीतर भाषा शिकणार कधी? ४. समजा दक्षिणभारतीय राज्यांनी किंवा ईशान्येकडच्या राज्यांनी एकत्र येऊन त्यांची एकच सामायिक बोलीभाषा निर्माण करुन हिंदीला कडवे आव्हान निर्माण केले तर? मग काय करतील अमित शहा? ५. इंग्रजीला अमित शाह यांचा विरोध का? इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. कमालीची ताकदवान भाषा आहे.आंतरराष्ट्रीय भाषा आहे. उपयोगाची भाषा आहे. असं असताना ती न वापरता हिंदी का वापरायची?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 105991 views

🗣 चर्चा (510)
ध
धर्मराजमुटके Sun, 04/17/2022 - 07:36 नवीन
धागा काथ्याकूट सदरात असला तरीही चर्चेकरिता काढलेला दिसत नाहीये तर निष्कर्ष आधीच ठरवलेला दिसतोय.
सहमत आहे. तसेही प्रत्येकाची मते ठरलेली असतात. कोणी चर्चेमुळे आपले मत बदलत नाही. त्यामुळे कोणत्याही ठराविक आय डीं ना दोष देता येत नाही. धागा कोणत्याही सदराखाली काढला तरी त्याकडे केवळ मौजमजा म्हणून पहावे. असेही जालावर लिहिणारे बहुसंख्यांचे पोटापाण्याचे प्रश्न तीव्र नसणारे असतात आणि ज्यांना त्याची भ्रांत आहे त्यांच्याकडे चर्चा करण्याइतका वेळ, वकूब आणि उत्साह नसतो. पुर्वी मलाही अशा चर्चा वाचून आपणही काहितरी लिहावे असा हुरुप येत असे पण आता हे सगळे नको वाटते. लिहिणार्‍यांचा हुरुप वाढावा म्हणून अधून मधून प्रोत्साहन पर दोन शब्द लिहिणे किंवा केवळ वाचनमात्र राहणे ही त्यातल्या त्यात सुखासिन पर्याय आहेत.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sun, 04/17/2022 - 11:06 नवीन
लिहिणार्‍यांचा हुरुप वाढावा म्हणून अधून मधून प्रोत्साहन पर दोन शब्द लिहिणे म्हणजे आधी लिहावं म्हणून प्रोत्साहन द्यायचं नंतर त्यांनाच रिकामटेकडे म्हणायचं. चांगलंय. चालू द्या. :(
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sun, 04/17/2022 - 12:34 नवीन
माफ करा. पण मी कुणाला रिकामटेकडा म्हटलेल नाहिये. _/\_.
  • Log in or register to post comments
ध
धनावडे Sun, 04/17/2022 - 07:45 नवीन
इथले किती लोक IPL च समालोचन मराठीतून ऐकतात??
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sun, 04/17/2022 - 07:55 नवीन
इथले किती लोक IPL च समालोचन मराठीतून ऐकतात??
का बरे ऐकावे ? समालोचन इंग्रजी मधे उपलब्ध आहे ना ? हिंदी मधून ऐकायचे नाही एवढाच तर विषय आहे ना ?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 04/17/2022 - 12:16 नवीन
कोणत्या वाहिनीवर आहे? स्टार प्रवाह (मराठी) आयपीएल दाखवित नाही.
  • Log in or register to post comments
ध
धनावडे Mon, 04/18/2022 - 04:10 नवीन
हिट star वर Star sport १ वर मराठी भाषेचा पर्याय आहे. काल संदीप पाटील होते समालोचन करायला.
  • Log in or register to post comments
ध
धनावडे Mon, 04/18/2022 - 04:10 नवीन
Hot star *
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Sun, 04/17/2022 - 07:54 नवीन
स्थानिक भाषा, हिंदी,इंग्लिश ह्या तीन भाषा शिकण्याची काय गरज आहे.उगाच टाईम वाया जातो. त्या पेक्षा स्थानिक भाषा आणि इंग्लिश ह्या दोनच भाषा आल्या खूप झाल्या . हिंदी च गरज नाही. इंग्लिश अशी पण जागतिक भाषा आहे आणि भारताची संपर्क भाषा पण होईल. इंग्लिश बोलणाऱ्या लोकांची संख्या आता कमी असेल पण वाढेल दहा वर्षात. हिंदी भाषा नकोच. कशाला हवी.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sun, 04/17/2022 - 08:01 नवीन
स्थानिक भाषा, हिंदी,इंग्लिश ह्या तीन भाषा शिकण्याची काय गरज आहे.उगाच टाईम वाया जातो.
बरोबर आहे. शिवाय स्थानिक भाषा (उदा. मराठी) पण व्याकरणासहित शिकण्याची आवश्यकता नाही. पुर्ण वाक्यात एखाद दुसरा मराठी शब्द असला आणि बाकी इंग्रजी शब्द असले तरी चालून जाण्यासारखे आहे. उदा.उगाच टाईम (वेळ) वाया जातो. शिवाय विरामचिन्हे खाल्ली तरी चालतात. उदा. कशाला हवी. (?)
इंग्लिश बोलणाऱ्या लोकांची संख्या आता कमी असेल पण वाढेल दहा वर्षात.
ह्याबद्द्ल प्रचंड सहमत. आताही इंग्रजी शाळेत जाणारी मराठी मुले आणि त्यांचे पालक आपापसात हिंदी किंवा इंग्रजी बोलतात. त्यामुळे इंग्रजी (सॉरी इंग्लिश) बोलणाऱ्या लोकांची संख्या वाढत जाणार ह्याबद्द्ल सहमत आहे.
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Sun, 04/17/2022 - 08:06 नवीन
हिंदी एक भारतीय भाषा आणि त्यातही मोठ्या लोकसंख्ये कडून बोलली जाणारी भाषा असली तरी तिला राष्ट्रीय भाषा मानण्यास नकार देतात तेच मूठभर इंग्रजांच्या भाषेला निमूटपणे आंतरराष्ट्रीय भाषा का मानतात?
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sun, 04/17/2022 - 08:12 नवीन
तुमचे प्रतिसाद आवडले.
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Sun, 04/17/2022 - 08:14 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sun, 04/17/2022 - 08:58 नवीन
हिंदी बहुभाषिक पट्ट्यातील भारतीय जेव्हा परदेशात जातात तेव्हा ते हिंदीत बोलतात की स्थानिक भाषेत बोलतात की मूठभर इंग्रजांची भाषा असलेल्या इंग्रजीत बोलतात?
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Sun, 04/17/2022 - 09:33 नवीन
परदेश म्हणजे कोणता देश? अमेरिका ब्रिटन जपान रशिया चीन तैवान जर्मनी फ्रान्स इटली वरील सर्व आणि इतरही अनेक (फार मोठी यादी होईल) देशांत भारतीय जातात /आहेत. या फार मोठ्या यादीतील मूठभर देशांत मूठभर इंग्रजांची भाषा असलेल्या इंग्रजीत बोलतात.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sun, 04/17/2022 - 10:28 नवीन
तुम्ही माझ्या प्रतिसादातील स्थानिक शब्दाला बगल दिलीत म्हणून मूठभर शब्द पुन्हा वापरता आला. माझा प्रतिसाद पुन्हा एकदा वाचा बरं :)
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Sun, 04/17/2022 - 10:45 नवीन
विशेषतः ठळक शब्द काय आहेत ते पाहूनच उत्तर दिलं.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sun, 04/17/2022 - 12:56 नवीन
तुम्ही प्रश्नाला सोयीस्कर बगल देत आहात म्हणून पुन्हा विचारतो: हिंदी भाषिक भारतीय इंग्रजी न बोलणाऱ्या देशात जेव्हा जातो तेव्हा तो इतरांकडून त्याच्याशी हिंदीत बोलावी अपेक्षा ठेवतो की तो इतरांशी इंग्रजीत/त्या देशाच्या भाषेत बोलतो?
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Sun, 04/17/2022 - 14:25 नवीन
या प्रश्नाचं तुमचं उत्तर काय आहे? तुमच्या उत्तरानंतर मी माझं उत्तर नक्कीच देईन.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Sun, 04/17/2022 - 09:08 नवीन
संपर्क भाषा म्हणून भारतात बऱ्या पैकी जास्त बोलणारी भाषा म्हणून हिंदी स्वीकारावी. फक्त भारतातील लोकांस एकमेकाशी संपर्क साधण्यास काही अडचण येवू नये. हा साफ हेतू असता तर लोक विरोध करणार नाहीत. का करतील पण हिंदी भाषा ही देशाची भाषा असावी असे संसदेत,मीडिया मध्ये बोलणे ह्या मागे राजकारण आहे.राजकीय हेतू आहेत.बाकी भारतीय भाषा चा कायदेशीर मार्गनी खून करण्याचा डाव आहे. मराठी करा देशाची भाषा सर्वांस मराठी शिकवा. असे पण हिंदी आणि मराठी मध्ये जास्त फरक नाही हिंदी वाले मान्य करतील का बघा.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sun, 04/17/2022 - 11:03 नवीन
+१
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sun, 04/17/2022 - 10:12 नवीन
मराठी करा देशाची भाषा सर्वांस मराठी शिकवा.
नक्की. इथे एक मराठी भाषक हिंदी ऐवजी तेलुगू भाषा सगळ्या भारतभर संपर्क भाषा म्हणून चालेल असे लिहितात.
असे पण हिंदी आणि मराठी मध्ये जास्त फरक नाही.
आहे ना. खुप फरक आहे. मराठी वाले मराठी सोडून हिंदी, इंग्रजी भाषा बोलण्यास जास्त उत्सुक असतात हा मोठा फरक आहे.
हिंदी वाले मान्य करतील का बघा.
हिंदी वाले मान्य करतील काय ते पण बघा आणि तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळी पण मराठीला राष्ट्रभाषा म्हणून मान्य करतील काय ते पण विचारा.
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Sun, 04/17/2022 - 10:53 नवीन
अमितजींच्या मूळ आवाहनाला जोरदार विरोध केला आहे तो तमिळ भाषिकांनी. याच तमिळ भाषिकांनी त्यांच्या भाषिक संघर्षावरुन शेजारील देशात मोठा रक्तपात व संघर्ष घडविला होता आणि ज्याची परिणती त्या देशाशी भारताचे संबंध बिघडण्यात व आपले एक माजी पंतप्रधान जीवानिशी गमावण्यात झाली. एका दहशतवादी संघटनेच्या नावातच यांच्या भाषेच्या नावाचा शब्द आहे आणि त्या संघटनेचे सदस्य जे आपल्या माजी पंतप्रधानांचे मारेकरी आहेत त्यांना फाशी द्यायचा विषय काढला तरी हे रस्त्यावर उतरुन हिंसक कारवाया करतात त्यांच्याकडून अजून काय अपेक्षित आहे? यांचा नेता मेला / तुरुंगात गेला तरी हे सामूहिक आत्महत्या वगैरे करतात. यांना फार मोठ्या समुपदेशनाची व मानसिक उपचारांची गरज आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 04/17/2022 - 11:10 नवीन
याच तमिळ भाषिकांनी त्यांच्या भाषिक संघर्षावरुन शेजारील देशात मोठा रक्तपात व संघर्ष घडविला होता आणि ज्याची परिणती त्या देशाशी भारताचे संबंध बिघडण्यात व आपले एक माजी पंतप्रधान जीवानिशी गमावण्यात झाली. अत्यंत चुकीची माहिती आहे. श्रीलंकेतील लिट्टे, तुल्फ व इतर तामिळ संघटनांनी सुरू केलेला सशस्त्र लढा हा फक्त भाषेशी निगडीत नव्हता. किंबहुना भाषा हे त्यामागील एक अत्यंत दुय्यम कारण आहे. वंशभेद, तामिळांवरील अत्याचार व अन्याय, वारंवार झालेली तामिळ नागरिकांची हत्याकांडे यामुळे हा सशस्त्र संघर्ष सुरू झाला होता.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sun, 04/17/2022 - 11:09 नवीन
हिंदी ही राष्ट्रभाषा नाही हे एखादा हिंदी भाषीक सहज मान्य करतो पण मराठी माणूस आजीबात मान्य करत नाही. असा नेभळटपणा मराठी माणसांत का असतो?
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sun, 04/17/2022 - 11:10 नवीन
याच तमिळ भाषिकांनी त्यांच्या भाषिक संघर्षावरुन शेजारील देशात मोठा रक्तपात व संघर्ष घडविला होता अर्धवट माहिती आहे तुम्हाला.
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Sun, 04/17/2022 - 12:02 नवीन
तुम्हाला पूर्ण माहिती असेल तर द्या की असली एकवाक्याची पिंक टाकू नका. आणि कृपया मला चेगु हे संबोधन वापरु नका. मला आवडत नाही. तुम्ही हवे असल्यास माझे नाव / नाव + आडनाव / नुसतेच आडनाव किंवा तिन्ही एकत्र असे संबोधा. टाईप करायला जड जात असल्यास कॉपी पेस्ट करा पण नावा आडनावातील एकएक अक्षरे घेऊन संबोधन नकोय.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sun, 04/17/2022 - 14:20 नवीन
https://en.m.wikipedia.org/wiki/Burning_of_Jaffna_Public_Library हे वाचा. मग कळेल दुष्ट कोण ते. श्रीलंकेतले तमिळभाषिक की सिंहलीभाषिक श्रीलंकन सरकार?
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Sun, 04/17/2022 - 15:28 नवीन
https://en.wikipedia.org/wiki/Liberation_Tigers_of_Tamil_Eelam The LTTE has been designated as a terrorist organisation by 33 countries, including the European Union, Canada, the United States, and India.[15] सिंहली तमिळ या भाषिक संघर्षात त्यांनी त्यांच्या स्वतःच्या देशात आणि इतरत्रदेखील अतिरिकी कारवाया रक्तपात हिंसाचार केला. भारतीया माजी पंतप्रधानांची हत्या केली याचे समर्थन कोणत्याही परिस्थितीत करता येणारच नाही. आणि अशा अतिरेकी संघटनेची बाजू घ्यायचे व त्यांच्यातील मारेकर्‍यांच्या फाशीला विरोध भारतीय तमिळींना काय कारण? तमिळ लोक स्वतःला आधी तमिळ आणि मग भारतीय (?) समजतात. हा विभाजनवादी प्रवृत्ती आहे.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Tue, 04/19/2022 - 17:01 नवीन
अशा अतिरेकी संघटनेची बाजू घ्यायचे व त्यांच्यातील मारेकर्‍यांच्या फाशीला विरोध भारतीय तमिळींना काय कारण लिट्टे ज्यामुळे स्थापन झाली त्या श्रीलंकन सरकारच्या अत्याचारांबद्दल आणि भारताने या वादात तमिळ लोकांना काहीही मदत केली नाही याबद्दल तुम्ही चकार शब्द काढत नाहीये. श्रीलंकन तमिळांवर अत्याचार झाले आणि भारत सरकार मदत करत नव्हते म्हणून लिट्टे स्थापन झाली हे विसरु नका.
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Tue, 04/19/2022 - 20:01 नवीन
श्रीलंकन तमिळांवर अत्याचार झाले आणि भारत सरकार मदत करत नव्हते म्हणून लिट्टे स्थापन झाली हे विसरु नका.
दुसर्‍या देशाच्या अंतर्गत व्यवहारात का ढवळाढवळ करावी? भारतातील मुस्लिमांनी पाकिस्तानची मदत मागावी का? पाकिस्तानने केली तर आपण शांत बसू का? तरीही आधी भारताने तशी मदत केली, मग अंगाशी आल्यावर श्रीलंकन सरकारची नाराजी घालविण्याकरिता शांति सेना पाठविली आणि मग लिट्टेची नाराजी ओढवून घेतली जिचा परिणाम श्री. राजीव गांधींच्या हत्येत झाला.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 04/17/2022 - 11:14 नवीन
भारतातील कोणत्याही दोन व्यक्तींना ज्या भाषेत एकमेकांशी संवाद करायचा आहे त्यात अमित शहा किंवा इतरांनी पडू नये. त्यांनी हिंदीतच संवाद करावा ही साधी सूचना सुद्धा अत्यंत संतापजनक आहे. त्यांना ज्या भाषेत संवाद करावासा वाटेल ती भाषा त्यांनी वापरावी. इतरांनी त्यात नाक खुपसू नये.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Sun, 04/17/2022 - 13:57 नवीन
भारतातील कोणत्याही दोन व्यक्तींना ज्या भाषेत एकमेकांशी संवाद करायचा आहे त्यात अमित शहा किंवा इतरांनी पडू नये. त्यांनी हिंदीतच संवाद करावा ही साधी सूचना सुद्धा अत्यंत संतापजनक आहे.
सहमत. वर एका प्रतिसादात मी म्हंटल्याप्रमाणे दोन व्यक्तींना एकमेकांना सहकार्य करायचं असल्यास त्या वाटेल त्या प्रकारे मार्ग काढतीलच - मग इंग्लिश, हिंदी , स्थानिक भाषा, मोबाईलवरचे अ‍ॅप, इंटरनेटवरुन फोटोज, दुभाषा मित्रांची मदत (आता फोनवर इंटरनेट, व्हॉट्स अ‍ॅप - व्हॉईस मेसेज यामुळे यासगळ्या गोष्टी कितीतरी सोप्या झाल्या आहेतच) अमित शहांनी उगाच चिंता करण्याचं कारण नाही .. अणि साधी सूचना वगैरे काही नसतंच. निकड/ आवड असल्यावर माणूस कसाही मार्ग काढतोच.. माझे वडील फारसे शिकलेले नाहीत, त्यांचं इंग्लिश फार चांगलं आहे अशातला भाग नाही पण त्यांनी आतापर्यंत इंग्लिश चित्रपट पैसे खर्चुन थिएटरला जावून बघितलेत. या उलट मी मात्र उच्चार नीट कळत नाही म्हणून इंग्लिश चित्रपट बघायचे टाळतो.. किमान इंग्लिश सबटायटल्स तरी असलेले चित्रपटच घरी बघतो , थिएटरला तर स्वतःहून फक्त टायटॅनिक हा एकच इंग्लिश चित्रपट मी आतापर्यंत बघितला आहे. उद्या अमित शहा म्हणतील इंग्लिश चित्रपटही बघू नका, त्याऐवजी हिंदीच बघा.. जाता जाता : The Terminal ह्या इंग्लिश चित्रपटाबद्दल सांगायला आवडेल - काही राजकीय व तांत्रिक कारणामुळे अमेरिकेतल्या एका विमानतळावर अडकलेल्या नायकाची ही कथा आहे. इंग्लिश येत नसलेला हा नायक प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत अनेक दिवस विमानतळावरच रहातो त्याची ही कथा आहे.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Sun, 04/17/2022 - 11:15 नवीन
देशात मराठी लोकांचा द्वेष केला जातो कारण महाराष्ट्र हे सर्वात जास्त प्रगत राज्य आहे. महाराष्ट्र शिवाय देशाचा गाडा चालणार नाही. देशातील कोणताच बिगर हिंदी भाषा असणारा व्यक्ती अमित शाह ह्यांच्या हिंदी विषयी मतचा विरोध च करेल. फक्त मराठी लोक हे जरा विचित्र च आहेत. ह्यांना देश पातळीवर नेहमीच द्वेष नी बघितले जाते तरी हे हिंदी चे समर्थन करतात. आपसात स्वतःची भाषा सोडून हिंदी मध्ये बोलतात. हिंदी ही राष्ट्भाषा आहे हे देशात फक्त मराठी लोक च समजतात. बाकी कोणताच हिंदी भाषा नसणार व्यक्ती हिंदी लं राष्ट्र भाषा समजत नाही. आणि हिंदी थोपवून घेण्यास तयार पण होणार नाही.
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Sun, 04/17/2022 - 12:17 नवीन
सत्य आणि असत्य बेमालूमपणे मिसळलं आहे यात.
देशात मराठी लोकांचा द्वेष केला जातो
जनरलाईज्ड स्टेटमेंट. त्यामुळे या वाक्याला तसा काहीच आधार नाही. देशात प्रत्येक राज्यातील लोकांचा कोणी ना कोणी द्वेष करतोच. आता पंजाब निवडणूकीच्या प्रचारात एका नेत्याने एक बिहारी सौ बिमारी असे विधान केले होते.
महाराष्ट्र हे सर्वात जास्त प्रगत राज्य आहे.
हे विधान खरं आहे. पण यामागचं कारण मुंबई महाराष्ट्रात आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात उद्योगांची मुख्य कार्यालये आहेत आणि येथून महसूल मिळतो. मुंबईत जेमतेम ३५ टक्के नागरिक मराठी भाषिक आहेत. मुंबईची प्रगती मराठी + इंग्रजी + हिंदी + गुजराती या मिश्रणाच्या जोरावर झाली हे सत्य आहे. या मिश्रणातून हिंदी जरी वगळली तरी प्रगतीचा आलेख बराच खाली येईल.
महाराष्ट्र शिवाय देशाचा गाडा चालणार नाही.
हे संदिग्ध वाक्य आहे. हे असेच अनेक राज्यांबद्दल सांगता येईल. पण तूर्तास महाराष्ट्राचा गाडा मुंबईच्या जोरावर चालतो हे म्हणता येईल. मुंबईचा गाडा चोवीस तास अखंड विजेच्या जोरावर चालतो असेही म्हणता येईल. विजेचा गाडा प्रचंड प्रमाणात विज निर्मिती करणार्‍या विदर्भाच्या जोरावर चालतो असे म्हणता येईल. विदर्भाचं हिंदी आणि मराठी यापैकी कोणत्या भाषेवर जास्त प्रेम आहे? विदर्भाला महाराष्ट्रात राहण्यात किती रस आहे? महाराष्ट्रापासून वेगळं निघायचा विचार विदर्भाने किती वेळा व्यक्त केलाय?
देशातील कोणताच बिगर हिंदी भाषा असणारा व्यक्ती अमित शाह ह्यांच्या हिंदी विषयी मतचा विरोध च करेल.
हे विधान खात्रीशीर पणे सत्य मानता येईल काय? गुजराथी, राजस्थानी आणि इतरही असे अनेक बिगर हिंदी भाषिक आहेत ज्यांना इंग्रजीपेक्षा हिंदीत संवाद साधणे सुलभ वाटते.
फक्त मराठी लोक हे जरा विचित्र च आहेत. ह्यांना देश पातळीवर नेहमीच द्वेष नी बघितले जाते तरी हे हिंदी चे समर्थन करतात.
इथे भाषेच्या द्वेषाबद्दल बोलणं चालू आहे की व्यक्तिच्या द्वेषाबद्दल? हे जे कन्फ्यूजन (मानसिक गोंधळ हा मराठी शब्द आहे पण त्यातून अर्थ तितका थेटपणे पोचत नाही) आहे ते खाली एका स्वतंत्र प्रतिसादात दूर करायचा प्रयत्न करतो.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Sun, 04/17/2022 - 12:47 नवीन
मुंबई मुळे महाराष्ट्र प्रगत आहे असा सर्रास युक्तिवाद केला जातो. हेतू एकच महाराष्ट्र चे मोठेपण नाकारणे. 1) मुंबई मध्ये मराठी लोकांची संख्या कमी आहे. देशात कोणी ही नागरिक कोणत्या ही राज्यात जावून राहू शकतो,उद्योग करू शकतो, जागा खरेदी करू शकतो असा नियम आहे. त्यांना महाराष्ट्रात येण्या पासून रोखण्याचा अधिकार राज्य सरकार लं असता . तर मुंबई मध्ये मराठी लोकांची संख्या कमी आहे हा युक्तिवाद करता आला असता. २) मुंबई च्या विकासात गुजराती,मारवाडी,हिंदी भाषा लोकांचा सहभाग आहे. मुंबई चा विकास चे श्रेय कोणाला प्रथम द्यायचे असेल तर ते ब्रिटिश लोकांना दिले जाईल. मुंबई मध्ये रेल्वे त्यांनी चालू केली. समुद्र मार्गे व्यापार त्यांनी चालू केला. बंदर त्यांनी बांधली. नाही योजना बद्ध बिल्डिंग,बाकी infrastructure त्यानी निर्माण केले. मुंबई चा विकास व्हावा म्हणून त्यांनी हे केले. गुजराती,मारवाडी,हिंदी भाषिक मुंबई च्या विकासात हातभार लावावा म्हणून इथे आले नाहीत. मुंबई मधील विकासात आपल्याला पण वाटा मिळावा म्हणून आले. त्या मुळे तुमचा तो पॉइंट पण चुकीचा आहे. ३) २४ तास वीज,प्रतेक घरात पाणी,शांतता. ह्या तीन गोष्टी असतील तर च कोणत्या ही शहराचा विकास होतो. आणि ह्या तिन्ही गोष्टी मुंबई मध्ये उपलब्ध करण्याचे श्रेय फक्त महाराष्ट्र चे आहे. बाकी ह्या मध्ये कोणी भागीदार नाही. ४) मुंबई मुळे महाराष्ट्र श्रीमंत. मुंबई मधून मिळणारा टॅक्स रुपी फायदा सर्वात जास्त केंद्राला जातो. आणि तो पैसा केंद्र. राजस्थान,बिहार,यूपी अशा अनेक गरीब राज्यासाठी खर्च करत असते. फक्त महाराष्ट्र लाच पैसा मिळतो हे पूर्ण चूक. ५)मुंबई व्यतिरिक्त. पुणे,नागपूर,नवी मुंबई,ठाणे,औरंगाबाद,नाशिक अशी अनेक शहर महाराष्ट्रात आहेत दुसऱ्या कोणत्याच राज्यात इतकी प्रगत अनेक शहर असण्याची शक्यता पण नाही.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sun, 04/17/2022 - 14:24 नवीन
विदर्भाचं हिंदी आणि मराठी यापैकी कोणत्या भाषेवर जास्त प्रेम आहे? विदर्भाला महाराष्ट्रात राहण्यात किती रस आहे? महाराष्ट्रापासून वेगळं निघायचा विचार विदर्भाने किती वेळा व्यक्त केलाय? मग भाषावार प्रांतरचना केली त्यावेळी सांगायचं होतं वैदर्भ्यांनी 'हिंदी मातृभाषा आहे म्हणून. त्यावेळी काय ते झोपले होते का?"
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Sun, 04/17/2022 - 15:30 नवीन
ते मध्यप्रदेशातच चालले होते. त्यांची मनधरणी करुन त्यांना महाराष्ट्रात ठेवले. आधी जो दर्जा पुण्याला देणार होते तो उपराजधानीचा दर्जा आणि वर्षातून एक अधिवेशन असं गाजर दाखवून त्यांना राज्यात घेतलं त्यांचे ऊर्जा स्त्रोत वापरले पण त्यांना विकासापासून वंचित ठेवलं.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sun, 04/17/2022 - 11:27 नवीन
लगेच हिंदीद्वेषी असा काहीजण शिक्का मारायला का पाहतात कोण जाणे. मी स्वत: कितीतरी द.भा लोकांना हिंदी शिकायला जमेल तशी मदत केली आहे.करतो आहे.पण त्यामागे अन्य भाषांप्रमाणे एक भाषा हिंदी असा दृष्टीकोन आहे. विशेष ममत्व वगैरे नाही हिंदीबद्दल. शिवाय माझा हिंदीच्या सक्तीला विरोध आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात अनेक वर्षे राहणार्‍या कोणाही परप्रांतीयाला तो हिंदीत बोलून मदत मागायला आल्यास त्याला हिंदीतून प्रतिसाद न देऊन मी माझ्यापुरता मराठी बाणा जपतो आहे. जपत राहीन. मग कोणी हिंदीद्वेषी म्हटले तरी पर्वा नाही.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sun, 04/17/2022 - 11:42 नवीन
हिंदीच्या पसरण्याला मर्यादा येणार?? :) https://youtu.be/vlzAH84DefA
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Sun, 04/17/2022 - 17:00 नवीन
Bollywood is finished? | How films like KGF, RRR are destroying bollywood's monopoly | Abhi and Niyu हिंदीचा आधार घेऊनच ना?
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Sun, 04/17/2022 - 12:25 नवीन
इथे अनेकांनी भाषा आणि व्यक्तिद्वेष यांची गल्लत केली आहे. काही कॉम्बिनेशन्स पाहूयात. हिंदी व्यक्ति आणि मराठी भाषिकांचा द्वेष हिंदी व्यक्ति आणि मराठी भाषेचा द्वेष अहिंदी व्यक्ति आणि हिंदी भाषिकांचा द्वेष अहिंदी व्यक्ति आणि हिंदी भाषेचा द्वेष आता यात आपण कुठल्या कॅटेगरीत येतो? आपल्यापैकी बहुतेकांची ऑनलाईन फसवणूक कधी ना कधी झाली असेल किंवा आपल्यासोबत निदान फसवणूकीचा प्रयत्न तरी झाला असेल. क्रेडीट कार्डचा ओटीपी मागून फसविणे किंवा आता नवीनच प्रकार आहे तो म्हणजे क्यू आर कोडद्वारे फसवणूक करणे. हे फसवणूक करणारे नेहमीच उत्तर प्रदेश किंवा बिहारचे हिंदी भाषिक असतात. अशा लोकांविषयी मलादेखील तिटकारा आहे. त्यांच्यावर कडक कारवाई होऊन हे प्रकार कायमचे बंद व्हायला हवे ही माझी देखील इच्छा आहे पण त्यांच्यावरचा राग हिंदी भाषेवर काढून आपण काय साध्य करणार आहोत?
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Sun, 04/17/2022 - 12:45 नवीन
मी धुळ्यात दोन वर्षे वास्तव्य केले तेव्हा एका चाळिशी ओलांडलेल्या इंदौरच्या हिंदीभाषिक मूळच्या यंत्र अभियांत्रिकी विषयातील अभियंता असलेल्या उत्पादन व्यवस्थापका सोबत काम करताना त्याला व्हिजन, ऑब्टेन आणि अशा इतर अनेक आपल्याला साध्यासुध्या वाटणार्‍या इंग्रजी शब्दांचे ज्ञान नसल्याचे लक्षात आले. अधिक चौकशी केल्यावर असे कळले की त्याने पदविका अभ्यासक्रम देखील हिंदी भाषेतून पूर्ण केला आहे. मग अधिक माहिती घेतली असता हे लक्षात आले की हिंदी भाषिक राज्यांत अनेक ठिकाणी अभियांत्रिकी पदविका व पदवीचे अभ्यासक्रम देखील हिंदीत आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने शिक्षण घेतलेल्यांचे इंग्रजी भाषेचे ज्ञान खूपच जेमतेम असते. त्याचप्रमाणे एका मुंबईस्थित सीएच्या (सनदी लेखापाल) सहाय्यकासोबत अनेकदा संवाद साधताना जाणवले की तो सिर्फ या शब्दाचा उपयोग न करता केवल हा शब्द वापरतो. तसेच त्याच्या बोलण्यात अनेक शुद्ध हिंदी शब्द ऐकू आले. त्याबद्दल अधिक चौकशी केली असता कळले की त्याने राजस्थानातील एका महाविद्यालयातून वाणिज्य (कॉमर्स) शाखेची पदवी हिंदी माध्यमातून घेतली आहे. आपल्याकडे बहुतेकांचे महाविद्यालयीन शिक्षण हे इंग्रजीतून झाल्याने संवाद साधण्यापुरते इंग्रजी तरी पदवीधारकांना येत असेल असे आपण गृहित धरतो.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Sun, 04/17/2022 - 13:52 नवीन
अमित शाह हे सामान्य व्यक्ती नाहीत.देशाचे गृहमंत्री आहेत आणि केंद्रात सर्वात महत्वाचे स्थान असलेल्या एका व्यक्ती आहेत. त्यांना खूप विचार करून बोलणे अपेक्षित आहे. प्रतेक शब्द हजार वेळा विचार करून उच्चारला पाहिजे. वक्तव्य. ते पण संसदेत. हिंदी भाषेचा वापर संपर्क की(संसर्ग)भाषा म्हणून करावा. ह्याचा अर्थ ते सरकारी पातळीवर तसा प्रयत्न करणार. १) त्रि भाषा सूत्र जे देशात आहे ते बंद केले जाईल.हिंदी आणि स्थानिक भाषा असा काही तरी प्रकार. २)केंद्रीय कामकाज पूर्णतः हिंदी मध्ये. ३)सक्ती नी हिंदी शाळेत. लोक स्वतः ठरवतील कोणती भाषा संपर्क भाषा असावी म्हणून. ती संपर्क भाषा प्रत्येकाची वेगळी असेल ती हिंदी च असेल असे नाही. इथपर्यंत ठीक. पण सक्ती झाली. तर मात्र कडवा विरोध होईल. हिंदुस्तान देशाचे नाव आहे म्हणून सर्वांनी हिंदू धर्म च स्वीकारावा अशी सक्ती केली की जितका तीव्र विरोध होईल त्याच त्याच तीव्रतेचा विरोध हिंदी लादली की होईल. हिंदी लं विरोध करण्यासाठी ज्या हिंदू देवदेवतांचे जन्म स्थान हिंदी भागात आहे ती दैवते पण नाकारली जातील. हिंदू म्हणून जो सेतू आहे प्रतेक भाषिक लोकात तोच नाकारला जाईल. असल्या उद्योगात सरकार नी पडू नये. महागाई,भ्रष्ट कारभार,तीव्र गरिबी. हे जे महत्वाचे प्रश्न आहेत देशासमोर ते सोडवावेत.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Sun, 04/17/2022 - 15:37 नवीन
एकंदरीत सर्व प्रतिसाद वरून निष्कर्ष असा काढता येईल. १) भारतीय भाषा म्हणून हिंदी भाषा विविध भाषिक लोकात संपर्क भाषा म्हणून वापरण्यास हरकत नाही. पण हिंदी ची सक्ती नसावी. लोक च परिस्थिती नुसार संपर्क भाषा ठरवतील सरकार नी हस्तक्षेप करू नये. २)सर्व भारतीय प्रादेशिक भाषा ना त्यांचा सन्मान मिळालाच हवा. भारतातील कोणत्याही प्रादेशिक भाषा ह्या देशाच्या अधिकृत भाषा पण असतील त्या सरकारी कामकाज मध्ये वापरण्यास बंदी घालता येणार नाही.शिकवण्यास बंदी घालता येणार नाही.त्या त्या राज्याची भाषा हीच त्या राज्याची अधिकृत भाषा असेल ह्यांची खात्री असावी. असे संरक्षण असेल तर हिंदी ल भाषा .म्हणून विरोध नाही. ३) संपर्क भाषा कोणती ही असू ध्या,भाषा टिकवणे आपल्यावर अवलंबून आहे. चेतन ह्यांच्या प्रतिसाद वरून. ते महाराष्ट्रात ४०० वर्ष पासून राहतात पण त्यांनी त्यांची मारवाडी भाषा टिकवून ठेवली आह
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Sun, 04/17/2022 - 20:03 नवीन
१) भारतीय भाषा म्हणून हिंदी भाषा विविध भाषिक लोकात संपर्क भाषा म्हणून वापरण्यास हरकत नाही. पण हिंदी ची सक्ती नसावी. लोक च परिस्थिती नुसार संपर्क भाषा ठरवतील सरकार नी हस्तक्षेप करू नये.
अगदी सहमत.. हिंदीच्या वापरास हरकत नाहीच.. फक्त सरकारी हस्तक्षेप आणि सक्ती असू नये. हा ज्याचा त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे..
२)सर्व भारतीय प्रादेशिक भाषा ना त्यांचा सन्मान मिळालाच हवा.
अगदी.. आणि हाच सन्मान व्यक्त करण्याकरिता जर अमित शहांनी त्या आवाहनासोबतच "परराज्यात दीर्घकाळासाठी स्थायिक असणारे हिंदी वा इतर भाषिक नागरिक यांनी त्या त्या राज्यातील भाषेचा सन्मान करावा, तिथली भाषा शिकण्याचा प्रयत्न करावा आणि सर्व राज्यातील भाषिक सौहार्द वाढीला लागावे" तर त्यांच्या आवाहनाचे नक्कीच स्वागत झाले असते.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sun, 04/17/2022 - 15:53 नवीन
दक्षिणी लोकांचा हिंदीला का विरोध असतो, त्यांची अस्मिता कशी तयार झाली ? हिंदीला प्रामुख्याने कोणते दक्षिणी राज्य विरोध करते ? या जिज्ञासे पोटी काही वाचन सुरू केले होते. त्या अभ्यासातून मी मिपावर रेव्ह. रॉबर्ट काल्डवेल यांच्यावर लेखमाला लिहिली होती ती वाचल्यास, त्यांच्या भाषिक टोकदारपणाची मुळं कशी रोवली गेली, त्यावेळचे राजकारण समाजकारण यावर लेखमाला प्रकाश टाकते. लेख वाचले नसल्यास नक्की वाचा: १. रेव्ह. रॉबर्ट काल्डवेल : तमिळ अस्मितेचे उद्गाते ? २. रेव्ह. रॉबर्ट काल्डवेल : इडयनगुडीत पोहोचल्यानंतर ३. रेव्ह. रॉबर्ट काल्डवेल : तमिळ भाषाभ्यास व द्रविडी भाषांचे तुलनात्मक व्याकरण ४. रेव्ह. रॉबर्ट काल्डवेल : द्रविड चळवळ, तमिळींची प्रादेशिक आणि राजकीय अस्मिता
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Sun, 04/17/2022 - 16:05 नवीन
या लेखमालेवरुन लक्षात आले की दाक्षिणात्यांमध्ये असलेला हिंदी विरोध ही एका परक्या देशातून आलेल्या धर्मप्रसारकाने टाकलेली ठिणगी आहे. खाली उद्धृत केलेली वाक्ये फारच महत्त्वाची आहेत.
याचा परिणाम म्हणून अण्णा दुराई यांनी द्रविड मुन्नेत्र कळघम् हा नवा राजकिय पक्ष १९४९ साली स्थापन केला. तामिळनाडूमधील ब्राह्मणांच्या वर्चस्वाला विरोध करत द्रविड मुन्नेत्र कळघमने उत्तर भारतीयांच्या कथित वर्चस्वाला आव्हान देण्यास सुरुवात केली. पुढे हाच त्यांचा मुख्य मुद्दा बनत गेला. दक्षिणेकडील चार राज्यांचे एकत्रित वेगळे द्रविडनाडू / द्रविडीस्थान हे स्वतंत्र राष्ट्र करावे अशी देखील आणखी एक द्रमुकची मागणी होती. सुरुवातीला स्वतंत्र द्रविडनाडूची मागणी फक्त तामिळभाषिक प्रदेशापुरतीच होती, नंतर त्यात इतर चार दक्षिणी राज्यांनाही समाविष्ठ करण्यात आले. पण कालांतराने भाषावार प्रांतरचना झाल्याने आणि भारतातून फुटून स्वतंत्र राष्ट्र स्थापन करणे के केंद्रसरकारने अवैध ठरवल्याने ही मागणी द्रमुकला सोडून द्यावी लागली. केंद्र सरकारच्या "त्रैभाषिक" धोरणला अर्थात राष्ट्रभाषेच्या नावाखाली हिंदी लादण्याला) वेळोवेळी नापसंती दर्शवत हिंदी भाषेला कडाडून विरोध केला. आणि याच धोरणाचा पुढचा भाग म्हणून एनईपी-२०२० या राष्ट्रीय शिक्षण धोरणामधील "त्रैभाषिक" सूत्राला (कारण त्यात पुन्हा "त्रैभाषिक" धोरणाच्या नावाखाली हिंदी सक्ती होणार म्हणून) त्यांचा विरोध आहे.
आताच मराठी माणसांनी नीट डोळे उघडून पाह्यला हवे अन्यथा दाक्षिणात्यांच्या हिंदी विरोधा अंध पाठिंबा देणे म्हणजे देशाच्या विभाजनवादी वृत्तीस खतपाणी घालणे ठरेल.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sun, 04/17/2022 - 16:12 नवीन
हिंदी विरोधा अंध पाठिंबा देणे म्हणजे देशाच्या विभाजनवादी वृत्तीस खतपाणी घालणे ठरेल. हिंदीला विरोध म्हणजे देशाच्या विभाजनवादी वृत्तास खतपाणी घालणे?? व्वा. किती ती विद्वत्ता.
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Sun, 04/17/2022 - 16:25 नवीन
आधी ती लेखमाला वाचा मग माझी विद्वत्ता तपासा.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 9 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 9 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 9 hours ago
  • सुंदर !!
    1 day 9 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 9 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा