त्यांनी हिंदीत का बोलावं?
तीन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एक विनंती केली की वेगवेगळ्या राज्यांमधल्या असमान मातृभाषा असणार्या लोकांनी एकमेकांशी संवाद साधताना इंग्रजीऐवजी हिंदी भाषा वापरावी.
https://www.google.com/amp/s/indianexpress.com/article/india/people-different-states-should-speak-hindi-not-english-shah-7858861/lite/
या अनावश्यक विनंतीला अहिंदी राज्यांमधे साहजिकच विरोध होतो आहे. विशेषत: दक्षिणेकडच्या राज्यांमधे.
आता ज्या लोकांची मातृभाषा हिंदीच आहे त्यांना या विनंतीबद्दल काहीच आक्षेप नसणारेय.उलट त्यांचा आयता फायदाच होईल.
आता प्रश्न असे आहेत.
१. दोन राज्यांमधील असमान भाषिकांनी कोणत्या भाषेत एकमेकांशी बोलावं अशी विनंती गृहमंत्री का करत आहेत? लोकांनी कोणत्या भाषेत बोललं पाहिजे हे गृहखात्याच्या अखत्यारीत येतं का?
२. या विनंतीला दक्षिणेकडच्या राज्यातले लोक सकारात्मक प्रतिसाद देतील असा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा? की ही विनंती हिंदीतून बोलू शकणार्या अहिंदी राज्यांतल्या लोकांसाठीच आहे? अशी विनंती केल्यावर ज्यांना हिंदी येत नाही ते लगेच हिंदी शिकून घेतील हा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा?
३. या विनंतीमागे कारण काय असावं? हिंदी पट्ट्यातल्या लोकांची सोय व्हावी? कारण हिंदी पट्ट्यातले लोक "हम तो पापी पेट के लिए आए हैं भाई" हे रडव्या चेहर्यानं सांगून अहिंदी भाषिकांना 'आमची सोय बघा' असंच सांगू पाहतात. हिंदीभाषिक अहिंदी राज्यातल्या भाषा शिकायला राजी नसतात. पण अहिंदी भाषिकांनी मात्र हिंदी शिकावी ही अपेक्षा बाळगतात. हे हिंदी पट्ट्यातले लोक हिंदीतर भाषा शिकणार कधी?
४. समजा दक्षिणभारतीय राज्यांनी किंवा ईशान्येकडच्या राज्यांनी एकत्र येऊन त्यांची एकच सामायिक बोलीभाषा निर्माण करुन हिंदीला कडवे आव्हान निर्माण केले तर? मग काय करतील अमित शहा?
५. इंग्रजीला अमित शाह यांचा विरोध का? इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. कमालीची ताकदवान भाषा आहे.आंतरराष्ट्रीय भाषा आहे. उपयोगाची भाषा आहे. असं असताना ती न वापरता हिंदी का वापरायची?
हिंदी येत असली तरी मुद्दामच बोलत नाहीत. समोरच्याची अडचण करणे हाच मुख्य उद्देश असतो.त्यांच्याशी उत्तरभारतीय हिंदीत का बोलतात? मोडक्यातोडक्या इंग्रजीत का असेना ते मदतीला तयार असतात. मग समोरच्याची अडचण करणे हा उद्देश कसा काय बुवा? किती मराठी लोकांना शेजारच्या कर्नाटकाची कन्नड किंवा तेलंगणाची तेलुगू येते?मराठी मजुर मिळायला अवघड जाते, मिळाले तरी परवडत नाही.कमी मजूरी देऊन मजूराला पिळून काढायचे नी बक्कळ नफा कमवायचा,वरून मजूर मिळत नाही म्हणून बोंबलायचे. असली कामे मराठी माणूस करत नाही कारण त्यालाईतरत्र कमी श्रमात चांगला मोबदला मिळतो. ह्या ऊलट कुत्र-डूकरांसारखी मानवी पैदास करून त्याना खाऊ घालणे जमत नाही म्हणून महाराष्ट्रात मजूरी करायला नी हिंदी लादायला पाठवायचे. आता ह्यात चुक कोणाची मराठी माणसाचीच का?याचा अर्थ तिची अर्थात संपर्क भाषा म्हणजेच युनिव्हर्सल भाषा होण्याकडे वाटचाल चालू आहे ! म्हणजेच इंग्रजी प्रमाणे.पूर्वी फक्त दक्षिणेत व काही प्रमाणात बंगालमध्ये हिंदीला विरोध होता. आता महाराष्ट्रात सुद्धा हिंदीविरोध वाढत आहे. अनेक पूर्वोत्तर राज्यांनी अमित शहांच्या हिंदी वापरण्याच्या प्रस्तावाला विरोध केला आहे. अनेक मराठी वाहिन्यांवर बऱ्याच उत्पादनांच्या जाहिराती आता मराठीत भाषांतर करून दाखवितात ज्या पूर्वी बहुतांशी हिंदीत असायच्या. Google, Facebook, WhatsApp अशी समाजमाध्यमे व Tata Sky, Amazon सारख्या कंपन्यांनी मराठी भाषेचा पर्याय दिला आहे. एकंदरीत हिंदी, इंग्लिश प्रमाणे, संपर्कभाषा होण्याची शक्यता दिसत नाही. अजून काही दशकांनी स्थानिक भाषा व इंग्लिश या दोनच संपर्कभाषा असतील.