त्यांनी हिंदीत का बोलावं?
तीन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एक विनंती केली की वेगवेगळ्या राज्यांमधल्या असमान मातृभाषा असणार्या लोकांनी एकमेकांशी संवाद साधताना इंग्रजीऐवजी हिंदी भाषा वापरावी.
https://www.google.com/amp/s/indianexpress.com/article/india/people-different-states-should-speak-hindi-not-english-shah-7858861/lite/
या अनावश्यक विनंतीला अहिंदी राज्यांमधे साहजिकच विरोध होतो आहे. विशेषत: दक्षिणेकडच्या राज्यांमधे.
आता ज्या लोकांची मातृभाषा हिंदीच आहे त्यांना या विनंतीबद्दल काहीच आक्षेप नसणारेय.उलट त्यांचा आयता फायदाच होईल.
आता प्रश्न असे आहेत.
१. दोन राज्यांमधील असमान भाषिकांनी कोणत्या भाषेत एकमेकांशी बोलावं अशी विनंती गृहमंत्री का करत आहेत? लोकांनी कोणत्या भाषेत बोललं पाहिजे हे गृहखात्याच्या अखत्यारीत येतं का?
२. या विनंतीला दक्षिणेकडच्या राज्यातले लोक सकारात्मक प्रतिसाद देतील असा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा? की ही विनंती हिंदीतून बोलू शकणार्या अहिंदी राज्यांतल्या लोकांसाठीच आहे? अशी विनंती केल्यावर ज्यांना हिंदी येत नाही ते लगेच हिंदी शिकून घेतील हा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा?
३. या विनंतीमागे कारण काय असावं? हिंदी पट्ट्यातल्या लोकांची सोय व्हावी? कारण हिंदी पट्ट्यातले लोक "हम तो पापी पेट के लिए आए हैं भाई" हे रडव्या चेहर्यानं सांगून अहिंदी भाषिकांना 'आमची सोय बघा' असंच सांगू पाहतात. हिंदीभाषिक अहिंदी राज्यातल्या भाषा शिकायला राजी नसतात. पण अहिंदी भाषिकांनी मात्र हिंदी शिकावी ही अपेक्षा बाळगतात. हे हिंदी पट्ट्यातले लोक हिंदीतर भाषा शिकणार कधी?
४. समजा दक्षिणभारतीय राज्यांनी किंवा ईशान्येकडच्या राज्यांनी एकत्र येऊन त्यांची एकच सामायिक बोलीभाषा निर्माण करुन हिंदीला कडवे आव्हान निर्माण केले तर? मग काय करतील अमित शहा?
५. इंग्रजीला अमित शाह यांचा विरोध का? इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. कमालीची ताकदवान भाषा आहे.आंतरराष्ट्रीय भाषा आहे. उपयोगाची भाषा आहे. असं असताना ती न वापरता हिंदी का वापरायची?
तीन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एक विनंती केली की वेगवेगळ्या राज्यांमधल्या असमान मातृभाषा असणार्या लोकांनी एकमेकांशी संवाद साधताना इंग्रजीऐवजी हिंदी भाषा वापरावी.असे धागाकर्त्याने लिहिले आहे ते वाचायची तसदी घेतली की नाही भौ? घेतली असती तर इतका फालतू प्रतिसाद लिहिला च नसता तुम्हीत्यांना खरेच हिंदू विषयी इतके प्रेम आहे. त्यांनी गुजरात ची गुजराती ही राज्य भाषा बदलून ती हिंदी करून दाखवावी. गुजराती लोक कसे react होतील त्याचा नमुना बघायला मिळेल.हिंदीला विरोध असल्यामुळेच दक्षिण भारतीय नेते देशपातळीवर पोचू शकत नाहीत. नरसिंह राव (पाच वर्षे) आणि देवेगौडा (दीड वर्षे) हे अपवाद वगळता पंतप्रधान पद दक्षिण भारतीय नेत्यांना मिळाले नाही.हिंदी विरोधाचा अजिबात संबंध नाही. नरसिंहराव व देवेगौडा हे राष्ट्रीय पक्षात असल्याने पंतप्रधान होऊ शकले. इतर वजनदार दक्षिण भारतीय नेते स्थानिक प्रादेशिक पक्षात असल्याने ते पंतप्रधान होऊ शकले नाही. देवेगौडांना हिंदी येत नसूनही ते पंतप्रधान झाले होते आणि त्यांनी बाळ ठाकरे व पवारांसोबत साटंलोटं करण्याचा प्रयत्न केल्यामुळेच सीताराम केसरींनी त्यांना जायला लावले. ते जाण्यामागे हिंदीविरोध किंवा हिंदी न येणे हे कारण नव्हते.म्हणजे हिंदी विरोध = स्वतःचेच नुकसान असे हे समीकरण आहे.भ्रम आहे.महाराष्ट्रातील शरद पवार, देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे ह्या तीन पक्षांच्या नेत्यांना पंतप्रधानपदाची आस असल्याने या पक्षांचा कोणताही मोठा नेता हिंदीविरोधात दिसत नाही.आपण कधीही पंतप्रधान होऊ शकणार नाही हे पवार व ठाकरे ओळखून आहेत. महाराष्ट्रातील हिंदीभाषिक मतांसाठी हे हिंदीला विरोध करीत नाहीत.सोनियाजी इथे येऊन हिंदीत भाषणे करतात त्याऐवजी त्यांनी ती इंग्रजीत केली तर काँग्रेसच्या निवडून येणार्या लोकप्रतिनिधींची संख्या अजुनच झपाट्याने कमी होईल.असं काही होणार नाही. हिंदी भाषण वाचून दाखविण्याऐवजी त्यांनी मराठीतले भाषण वाचले तर थोडीफार मते वाढू शकतील.आठवले देखील केंद्रीय मंत्री असल्याने हिंदीत मुलाखती देत असतात, कविता देखील करतात. त्यांच्या इंग्रजी कविता मी कधी ऐकल्या नाहीतआठवलेंना इंग्लिश येत नसणार. ते कविता वगैरे करीत नाहीत. ट ला ट, फ ला फ जोडून काहीतरी आचरटपणा करतात.एकमेव पक्ष मनसे हाच महाराष्ट्रात हिंदी विरोध करण्याची शक्यता होती. राज ठाकरेंच्या हनुमान चालिसा पठण घोषणेमुळे तीदेखील विरुन गेलीययात काहीच आश्चर्य नाही. मनसे मराठीवादी पक्ष होता/आहे यावर मी कधीही विश्वास ठेवला नव्हता. सातत्याने भूमिका बदलून व कोलांट्या उड्या मारून राज ठाकरेंनी आपली विश्वासार्हता शून्य करून ठेवली आहे. भाऊ तोरसेकरांना मनसेविषयी कितीही साक्षात्कार होत असले व या पक्षाविषयी कितीही आशा वाटत असली तरी हा पक्ष संपलेला आहे सर्वांना माहिती आहे.भाऊ तोरसेकरांना मनसेविषयी कितीही साक्षात्कार होत असले व या पक्षाविषयी कितीही आशा वाटत असली तरी हा पक्ष संपलेला आहे सर्वांना माहिती आहे.भाऊ तोसरेकर हे नाव दिसले की मन हळवे होते, म्हणजे अनेक स्तंभ, तुनळी विडीओ बनवूनही पद्मश्री कुणाला दिला भाजपने तर कंगनाला. प्रामाणीक कार्यकरनार्यांवर भाजप पक्ष नेहमी अन्याय करत आलाय. भाजपसाठी फक्त एक स्टेटमेंट देऊनही कंगना पद्मश्री पटकावते ना कितीतरू तुनळी चित्रफीता तयार करूनही भाऊंना काहीच नाही. अधून मधून देश, देशातूल नागरीकानाही भाजप पक्ष पद्मश्री देतो ह्याबदल्यात देशाने त्यांचे नी माननीय नकेंद्र मोदीजींचे ऊपकार मानायला हवेत.सैफ अली खान सारख्यांना पद्मश्री मिळते तर चार वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळविणार्या कंगनाला पद्मश्री मिळण्यात आश्चर्य ते काय?पण भाजपसाठी राहलं कोण जास्त? कंगना की भाऊ?? बाकी कोरोनात अणेक लोकानी जनतेची सेवा केली पण भाजपपक्षाची केली नाही म्हणून पद्मश्रीस मुकले.हिंदीला विरोध असल्यामुळेच दक्षिण भारतीय नेते देशपातळीवर पोचू शकत नाहीत.मग दक्षिण भारतीय भाषांना विरोध असल्यानेच काँग्रेस आणि भाजप तमिळनाडूत स्वबळावर येऊ शकले नाहीत असे म्हणता येईल की.भारतीय एकात्मतेच्या दिशेने हिंदीचे हे योगदान नाकारणे हा अगदीच कृतघ्नपणा ठरेल.किती दक्षीणेतील भागातूल लोकानी हिंदीतील ब्योमकेश बक्षी पाहीली?? भारतीय एकात्मतेसाठी हिंदीची आजिबात आवश्यकता नाही. भारतीय एकातिमतेच्या नावाखाली हिंदी लादायचा डाव आजिबात साध्य होनार नाही. हिंदीचा जन्म १५० वर्षा आधीचा त्या आधीही भारत होता बरका.इंग्लिश भाषा चालते हे कसे ?ईंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. ती शिकून जगाची द्वारं ऊघडतात. हिंदीभाषीत युपीब्हारीनी हिंदीला ज्ञानभाषा बनवलेले नाही. आपला परका हा संबंधच नाही. हिंदी भाषा शिकून कुणीही ज्ञानसंपन्नझालेले नाही. हिंदी ही भाषआ अभ्यासक्रमात घालून पाचवीच्या कोवळ्या मुलांच्या डोकियाला नकारन ताण देऊन ठेवलाय ती भाषा न त्या मुलांची मातृभाषा ना ज्ञानभाषा, फक्त बिहारी युपी पाणीपुरी वाले, मजूर, नी ईतर हलके काम करनार्यांची सोय व्हावी म्हणूव पाचवीच्या लहानग्यांच्या माथी हिंदी का मारावी? हाप्रश्न कोणत्याही सुज्ञ पालकाने स्वतला विचारून पहावा.पण मग उद्या ते आपल्याशी इंग्रजी भाषेत बोलायला लागले तर आपली भुमिका काय असावी ?इंग्रजी ही पूर्ण देशाची संपर्कभाषा व्हायला काहीच हरकत नाही.इंग्रजी ही पूर्ण देशाची संपर्कभाषा बनल्यास 'आम्हीच या भाषेचे मूळ मालक' असा अभिनिवेश किंवा 'कसं वाकवलं? तुमच्याच राज्यात तुमची भाषा न शिकता आमच्या भाषेत लावलं किनई बोलायला?' असा कुत्सितपणा ,मग्रुरी भारतातील कोणत्याच राज्याला करता येणार नाही.