त्यांनी हिंदीत का बोलावं?
तीन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एक विनंती केली की वेगवेगळ्या राज्यांमधल्या असमान मातृभाषा असणार्या लोकांनी एकमेकांशी संवाद साधताना इंग्रजीऐवजी हिंदी भाषा वापरावी.
https://www.google.com/amp/s/indianexpress.com/article/india/people-different-states-should-speak-hindi-not-english-shah-7858861/lite/
या अनावश्यक विनंतीला अहिंदी राज्यांमधे साहजिकच विरोध होतो आहे. विशेषत: दक्षिणेकडच्या राज्यांमधे.
आता ज्या लोकांची मातृभाषा हिंदीच आहे त्यांना या विनंतीबद्दल काहीच आक्षेप नसणारेय.उलट त्यांचा आयता फायदाच होईल.
आता प्रश्न असे आहेत.
१. दोन राज्यांमधील असमान भाषिकांनी कोणत्या भाषेत एकमेकांशी बोलावं अशी विनंती गृहमंत्री का करत आहेत? लोकांनी कोणत्या भाषेत बोललं पाहिजे हे गृहखात्याच्या अखत्यारीत येतं का?
२. या विनंतीला दक्षिणेकडच्या राज्यातले लोक सकारात्मक प्रतिसाद देतील असा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा? की ही विनंती हिंदीतून बोलू शकणार्या अहिंदी राज्यांतल्या लोकांसाठीच आहे? अशी विनंती केल्यावर ज्यांना हिंदी येत नाही ते लगेच हिंदी शिकून घेतील हा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा?
३. या विनंतीमागे कारण काय असावं? हिंदी पट्ट्यातल्या लोकांची सोय व्हावी? कारण हिंदी पट्ट्यातले लोक "हम तो पापी पेट के लिए आए हैं भाई" हे रडव्या चेहर्यानं सांगून अहिंदी भाषिकांना 'आमची सोय बघा' असंच सांगू पाहतात. हिंदीभाषिक अहिंदी राज्यातल्या भाषा शिकायला राजी नसतात. पण अहिंदी भाषिकांनी मात्र हिंदी शिकावी ही अपेक्षा बाळगतात. हे हिंदी पट्ट्यातले लोक हिंदीतर भाषा शिकणार कधी?
४. समजा दक्षिणभारतीय राज्यांनी किंवा ईशान्येकडच्या राज्यांनी एकत्र येऊन त्यांची एकच सामायिक बोलीभाषा निर्माण करुन हिंदीला कडवे आव्हान निर्माण केले तर? मग काय करतील अमित शहा?
५. इंग्रजीला अमित शाह यांचा विरोध का? इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. कमालीची ताकदवान भाषा आहे.आंतरराष्ट्रीय भाषा आहे. उपयोगाची भाषा आहे. असं असताना ती न वापरता हिंदी का वापरायची?
- कृपया, तुम्ही ही सवलत किंवा प्राथमिकता उत्तर भारतीयांना का मिळावी ते सांगा?
- आणि इतरांनी त्याच पातळीला जायला अतिरीक्त प्रयत्न करुन आपला वेळ आणि श्रम का घालवावेत? यामुळे घटनेने (कलम १४) दिलेल्या समानतेच्या तत्वांचा भंग होत नाही का?
- जे अहिंदी भाषिकांना level playing field (मराठी प्रतिशब्द काय?) कसे मिळणार? उदा. केंद्रीय लोकसेवा आयोग level playing field सर्व उमेदवारांना मिळावी म्हणुन प्रयत्न करते.
- जर त्यांनी आपली भाषा सोडुन इतर भाषा शिकणे म्हणजे एकप्रकारे सांस्कृतिक नरसंहार नाही का?
- भारतीय इतिहासात 'तु मुसलमान बन, तु हे मिळेल' असली उदाहरणे बरीच आहेत, आता फक्त तु हिंदी भाषिक बन, तुला हे फायदे आहेत असे असेल तर मुसलमान राज्यकर्ते आणि आताचे राज्यकर्ते यात फरक काय?
----- आता इंग्रजीचा मुद्दा, इंग्रजी ही परदेशी भाषा असल्याने भारतात कोणालाच येत नाही. प्रत्येकाने ती स्वतः शिकणे आवश्यक आहे. त्यामुळे जो शिकण्याचे स्वतः प्रयत्न करेल. दक्षिण भारतीय किंवा उत्तर भारतीय हा मुद्दा गैरलागु होतो. इंग्रजी भाषेसमोर सगळी समानता आहे. ------परंतु भारतात दोन असमान भाषिकांनी हिंदी या भारतीय भाषे ऐवजी इंग्रजी या परकीय भाषेत संवाद साधावा भारताच्या भारतीयत्वाला शोभणारे नाही.हे कोणी ठरविले? जर हिंदी भारतीय भाषा असेल तर मराठी सुद्धा भारतीय भाषा आहे. मग मराठीत का संवाद साधू नये? मला हिंदी येत नाही. त्यामुळे महाराष्ट्राबाहेरील अमराठी राज्यात मी फक्त इंग्लिश मध्येच संवाद साधू शकतो. अवांतर - भारतातील अधिकृत १५ भाषांमध्ये इंग्लिश व गोरखा या भाषांचा सुद्धा समावेश आहे. नागालँड या राज्याची अधिकृत राजभाषा इंग्लिश आहे. त्यामुळे ही भाषा सुद्धा आता घटनात्मकदृष्ट्या भारतीय भाषा आहे.परंतु भारतात दोन असमान भाषिकांनी हिंदी या भारतीय भाषे ऐवजी इंग्रजी या परकीय भाषेत संवाद साधावा भारताच्या भारतीयत्वाला शोभणारे नाही.आत्ता तुम्ही लिहिताय त्या मराठीत ,ज्याची बाजू लावूनधरताय त्या हिंदीत आणि तुमची मातृभाषा असलेल्या मारवाडीत अक्षरश: हजारो शब्द हे अरबी , फार्सी मूळ असलेले आहेत. ते शब्द परकीय आक्रमकांच्यामुळे भारतीय भाषांमधे शिरलेत. ते शब्द वापरणं हे भारतीयत्वाला शोभणारं आहे का? नसेल तर अरबी , फार्सीमुक्त मराठीत बोलणार का आजपासून?'मराठी (भाषिक) म्हणजे काय?मातृभाषा मराठी असणे , घरच्या सदस्यांसोबत मराठीतून बोलले जाणे म्हणजे मराठीभाषिक असणे.