त्यांनी हिंदीत का बोलावं?
तीन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एक विनंती केली की वेगवेगळ्या राज्यांमधल्या असमान मातृभाषा असणार्या लोकांनी एकमेकांशी संवाद साधताना इंग्रजीऐवजी हिंदी भाषा वापरावी.
https://www.google.com/amp/s/indianexpress.com/article/india/people-different-states-should-speak-hindi-not-english-shah-7858861/lite/
या अनावश्यक विनंतीला अहिंदी राज्यांमधे साहजिकच विरोध होतो आहे. विशेषत: दक्षिणेकडच्या राज्यांमधे.
आता ज्या लोकांची मातृभाषा हिंदीच आहे त्यांना या विनंतीबद्दल काहीच आक्षेप नसणारेय.उलट त्यांचा आयता फायदाच होईल.
आता प्रश्न असे आहेत.
१. दोन राज्यांमधील असमान भाषिकांनी कोणत्या भाषेत एकमेकांशी बोलावं अशी विनंती गृहमंत्री का करत आहेत? लोकांनी कोणत्या भाषेत बोललं पाहिजे हे गृहखात्याच्या अखत्यारीत येतं का?
२. या विनंतीला दक्षिणेकडच्या राज्यातले लोक सकारात्मक प्रतिसाद देतील असा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा? की ही विनंती हिंदीतून बोलू शकणार्या अहिंदी राज्यांतल्या लोकांसाठीच आहे? अशी विनंती केल्यावर ज्यांना हिंदी येत नाही ते लगेच हिंदी शिकून घेतील हा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा?
३. या विनंतीमागे कारण काय असावं? हिंदी पट्ट्यातल्या लोकांची सोय व्हावी? कारण हिंदी पट्ट्यातले लोक "हम तो पापी पेट के लिए आए हैं भाई" हे रडव्या चेहर्यानं सांगून अहिंदी भाषिकांना 'आमची सोय बघा' असंच सांगू पाहतात. हिंदीभाषिक अहिंदी राज्यातल्या भाषा शिकायला राजी नसतात. पण अहिंदी भाषिकांनी मात्र हिंदी शिकावी ही अपेक्षा बाळगतात. हे हिंदी पट्ट्यातले लोक हिंदीतर भाषा शिकणार कधी?
४. समजा दक्षिणभारतीय राज्यांनी किंवा ईशान्येकडच्या राज्यांनी एकत्र येऊन त्यांची एकच सामायिक बोलीभाषा निर्माण करुन हिंदीला कडवे आव्हान निर्माण केले तर? मग काय करतील अमित शहा?
५. इंग्रजीला अमित शाह यांचा विरोध का? इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. कमालीची ताकदवान भाषा आहे.आंतरराष्ट्रीय भाषा आहे. उपयोगाची भाषा आहे. असं असताना ती न वापरता हिंदी का वापरायची?
दाक्षिणात्यांच्या हिंदी विरोधा अंध पाठिंबा देणे म्हणजे देशाच्या विभाजनवादी वृत्तीस खतपाणी घालणे ठरेल.तुमच्या अर्धवट ज्ञानाची आणि दक्षिण भारतीयांबद्दलच्या तिरस्काराची व्याप्ती वाढत चालली आहे. दक्षिण भारतीयांचा खास करुन तमिळ लोकांचा हिंदीच्या सक्तीला विरोध आहे. हिंदी शिकण्याला नाही. खाली दक्षिण भारत हिंदी प्रचार सभेचं संकेतस्थळ दिलं आहे. ते जरा बघून घ्या. या संस्थेतर्फे हिंदीच्या विविध स्तरांवरच्या परीक्षा घेतल्या जातात. या संस्थेची कार्यालये आणि कार्यविस्तार तमिळनाडू ज्याच्याबद्दल तुमच्या मनात तीव्र आकस आहे त्या राज्यातही आहे बरं का! https://www.dbhpscentral.org/ केरळ,कर्नाटक,तेलंगण आणि आंध्र या चार दक्षिण भारतीय राज्यांमधे शाळेत हिंदी शिकवली जाते बरं का! मी स्वत: कितीतरी दक्षिण भारतीयांना हिंदी शिकवतो. तरीही माझा हिंदीच्या सक्तीला कडाडून विरोध आहे. मी दक्षिण भारतीय नाही. आता मला काय म्हणणार? विभाजनवादी की अजून काही? तुमची आणि तुमच्यासारख्या दक्षिण भारतीय भाषा शिकण्याची कटकट नको असणार्या उत्तरभारतीयांची सोय व्हावी म्हणून दक्षिण भारतीयांनी हिंदी शिकायचंय का? आणि दक्षिण भारतीयांनी हिंदी शिकायला अजून विरोध केला तर तुम्ही काय करणार? काय ताकद आहे तुमची? काय बिघडवणार तुम्ही दक्षिण भारतीयांचं?त्या कारागीराची तक्रार करण्याकरिता मी लोकल रामूला ईमेल केला तर काहीच उत्तर नाही. मग मी त्यांच्या संपर्क क्रमांकावर संपर्क केला तर त्यांच्याकडे संपर्क भाषा म्हणून दक्षिण भारतीय आणि इंग्रजी इतकेच पर्याय उपलब्ध. हिंदी नाही आणि मराठी देखील नाही. तरी मी इंग्रजीत त्यांचेसोबत संभाषण केले.महाराष्ट्रात मी कोणालाही संपर्क केला किंवा माझ्याशी कोणी संपर्क केला तर मी फक्त मराठीतच बोलतो. समोरचा इतर भाषेत बोलत असेल तर तिला/त्याला शुद्ध मराठीत मराठीतच बोलण्यास सांगतो. बहुतेक वेळा ते मराठीत बोलतात किंवा मराठी बोलणाऱ्याकडे संभाषणाची सूत्रे सोपावतात. मराठी बोलण्यास नकार दिला तर मी संभाषण थांबवितो.श्री बच्चन मराठी बोलु शकतात. विनाकारण सरसकट द्वेष थांबवा.साहित्य संमेलनातलं त्यांचं भाषण आहे. त्यात ते म्हणाले "लाभले भाग्य अभ्यास बोलतो मराठी" लिहून दिलेलं असूनही ही अवस्था यांची