Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • राजस्थानची रोजनिशी : २ : सिटी पॅलेस, जंतर मंतर, हवा महल
  • दरम्यान
  • दोसतारः शाळेत लग्न लागते २
  • संध्येच्या व्याकूळ छाया.
  • राजस्थानची रोजनिशी : १ : गलताजी मंदिर आणि चोखी धानी
  • मुर्डेश्वर भेट, उत्तर कर्नाटक
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ५: मुन्सियारीतून केलेलं आकाश दर्शन
  • ‘नेक्सस’ युवाल नोव्हा हरारी(ऐसी अक्ष्ररे-४०)
  • खाडीवरचे दिवस!!
  • गोकर्ण भेट, उत्तर कर्नाटक
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
काथ्याकूट

इजराईल इराण युद्ध : स्वतंत्र धागा

व
विवेकपटाईत
Tue, 03/03/2026 - 07:17
🗣 162 प्रतिसाद

इजराईल आणि इराण यांच्यातील युद्ध दीर्घकाळ चालणार आहे. युद्ध आणि त्याचे परिणाम याबाबत सर्व प्रतिक्रिया एकाच ठिकाणी याव्यात म्हणून हा स्वतंत्र धागा.

इराण हा कट्टर इस्लामी देश आहे. इस्लामी जगाचे नेतृत्व मिळवण्यासाठी इजराईलचा संपूर्ण नाश करण्याची त्याची मंशा आहे. काश्मीर प्रश्नावर इराणने नेहमी पाकिस्तानचे समर्थन केले असले तरी व्यापक आर्थिक हितासाठी भारताशी संबंध दृढ केले आहेत. भारताचा मध्य आशियाशी होणारा व्यापार प्रामुख्याने इराणमार्गे होतो.

इजराईलने नेहमीच भारताला मदत केली आहे. कारगिल युद्ध जिंकण्यात इजराईलची मदत झाली होती. विविध क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, युद्धास्त्रे इत्यादी भारताला इजराईलकडून मिळतात. नुकतेच इजराईलने पंतप्रधान मोदींना आपल्या देशाचा सर्वोच्च सन्मानही दिला आहे.

या युद्धाचा फटका भारतासह संपूर्ण जगाला बसणार आहे. पेट्रोलच्या किंमती वाढल्याने जगभरात महागाई वाढेल. इराणमध्ये सत्ता परिवर्तन न होता युद्ध थांबले तर खाडी देशांत अमेरिकेची प्रतिष्ठा कमी होईल. सुरक्षेसाठी खाडी देश चीन किंवा रशियाकडे पाहू शकतात. इराण अणुबॉम्ब निश्चितपणे तयार करेल आणि त्याचा उपयोगही करेल. पुढील २० वर्षांत इजराईलचे अस्तित्व नामशेष होऊ शकते. त्यामुळे हे युद्ध अमेरिकेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनले आहे.


  • Log in or register to post comments
  • 9360 views


वाचनखूण लावा
| 9360 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

🗣 चर्चा (162)
ख
खटपट्या Wed, 03/11/2026 - 16:28 नवीन
रोचक चर्चा मजा येतेय
  • Log in or register to post comments
क
कांदा लिंबू Wed, 03/11/2026 - 17:19 नवीन
रोचक चर्चा मजा येतेय
युद्धस्य तु कथा रम्या: --- तथापि, दूरस्था: पर्वता: रम्या:, वेश्या च मुखमण्डने। युद्धस्य तु कथा रम्या:, त्रीणि रम्याणि दूरतः ॥
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 03/11/2026 - 16:38 नवीन
१. ओमानच्या सलाला बंदरामधील तेल साठवायच्या टाक्यांवर इराणी ड्रोनने हल्ला केला आहे. २. बाहरेन सरकारची विमान कंपनी गल्फ एअरने आपली विमाने बाहरेनबाहेर हलवली आहेत आणि आपली सेवा स्थगित केली आहे. बाहरेन सिंगापूरसारखाच छोटा देश आहे त्यामुळे त्या देशात एकच विमानतळ आहे. तिकडच्या भारतीयांना बाहेर पडायचे असेल तर सौदीतील अल खोबारमार्गेच यावे लागेल. https://gulfnews.com/business/aviation/gulf-air-all-inbound-outbound-and-overflight-operations-are-suspended-indefinitely-1.500470734 एकंदरीतच या युध्दाची मोठी किंमत बाहरेन आणि कतारला मोजावी लागत आहे असे दिसते.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/11/2026 - 16:50 नवीन
विनाकारण संपूर्ण जगाला युद्धाच्या खाईत लोटून प्रचंड वित्तहानी, जीवितहानी होण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या ट्रंप, नेतनयाहू, इस्राएल व अमेरिकेला मोठा तडाखा बसून ते युद्धात पराभूत व्हावे अशी इच्छा आहे.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 03/11/2026 - 17:29 नवीन
तात्याने जी-सात देशांबरोबर कॉलमध्ये सांगितले आहे की आमच्या हल्लाचा जोरदार प्रभाव (tremendous impact) दिसत आहे. व्हिएटनाम युध्दात सुरवातीला जॉन्सनची भाषा आणि इराक युध्दात सुरवातीला धाकल्या बुशची भाषाही अगदी अशीच होती :(
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 03/11/2026 - 18:31 नवीन
अमेरिकेला आपल्या भूमीवर थारा देणाऱ्या इराणच्या आजूबाजूच्या गल्फ देशांना इराणने आजीबात सोडू नये, त्यांचे कंबरडे मोडावे! इस्राईल विरुद्ध बोंबलणारे मिडल इस्टचे दुटप्पी देश इराणने इघडे पाडावेत!
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Wed, 03/11/2026 - 19:29 नवीन
ट्रम्प म्हणतोय इराणवर हल्ला करण्यासाठी काही उरलेच नाही. ह्याचा अर्थ इराणची सगळी अण्वस्त्रे नष्ट केली असावीत. खाडी देशातील अमेरिकाधार्जिणे देशांची भविष्यात परिस्थिती खूपच खराब होणार. ह्या देशांनी अमेरिकन कंपन्या आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची युद्धादरम्यान जितकी काळजी घेतली तितकी पूर्वेकडील देशातून आलेल्या कर्मचाऱ्यांची घेतली नाही. सध्या त्यांना कामावर रुजू होण्यासाठी दबाव आणला जातोय.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 03/12/2026 - 18:02 नवीन
इराणने स्ट्रेट ऑफ होरमुझमधील तेल प्रवाह आवळून झोप उडवली आहे. एक प्रश्न पडला की स्ट्रेट ऑफ होरमुझला बायपास करून तेल येऊ शकणार नाही का? तर त्याचे उत्तर नाही असे आहे. Image removed. नकाशात दुबई आणि इराणच्या मध्ये ते स्ट्रेट ऑफ होरमुझ आहे. सौदी अरेबियाला पूर्वेकडे पर्शिआचे आखात आहे तसे पश्चिमेला लाल समुद्र आहे. मला प्रश्न पडला की तेल यायचेच असेल तर ते पूर्वेकडील पर्शिआच्या आखातूनच का यायला हवे? सौदीमध्ये पश्चिमेकडे (जेद्दा, मक्का-मदिना वगैरे भागात) पण तेल विहिरी असतीलच. याविषयी चॅटजीपीटीला विचारले. तिने सांगितले की सौदीतील तेल आणि वायूचा बराचसा वाटा पूर्वेकडून येतो. नकाशात कतारच्या बाजूला बाहरेन आहे पण ते बेट खूप लहान असल्याने या नकाशात दिसत नाही- त्या बेटावर नावच आले आहे. पण बाहरेनच्या जवळ सौदीमध्ये अल खोबार, दम्मम आणि दाहरान हे भाग आहेत आणि तिथे बरेचसे तेल मिळते. त्या तेलाला पर्शिआचे आखात आणि स्ट्रेट ऑफ होरमुझ हाच मार्ग आहे. बरं मग ते तेल पश्चिमेला पाठवून जेद्दावरून लाल समुद्र आणि तिथून एडनच्या आखातातून अरबी समुद्रामार्गे भारतात नाही का येऊ शकणार? तर त्याचेही उत्तर नाही असे आहे. कारण ते तेल दाहरान पासून जेद्दाला पाठवायला तेलाच्या पाईपलाईन लागतील. आता तशा पाईपलाईन नाहीत असे नाही. पण पूर्वेला जेवढे तेल मिळते त्याच्या फार तर २०% तेल त्या पाईपलाईनमधून पश्चिमेला पाठविले जाते. आणि नव्याने पाईपलाईन बांधायची झाली तर त्याला किमान ५ वर्षे लागतील. इतकी वर्षे सौदी अरेबिया अमेरिकेच्या कच्छपी लागलेला देश होता (की सौदीतील तेलामुळे अमेरिका सौदीच्या कच्छपी लागला होता) आणि इराणशी अमेरिकेचे इतके वाकडे होते तर भविष्यात कधी इराण स्ट्रेट ऑफ होरमुझ आवळू शकेल ही शक्यताही कोणी ध्यानात घेतली नाही?निदान त्या दृष्टीने आधीपासून पावले उचलता आली असती. आता काही करायला गेले तर ते तहान लागल्यावर विहिर खणणे ऐवजी पाईपलाईन बांधणे असे होईल. अमेरिकन नौदल इराणच्या नौदलापेक्षा कितीतरी जास्त शक्तीशाली आहे. तेव्हा आवळलेले स्ट्रेट ऑफ होरमुझ अमेरिकन नौदल का सोअडवत नाही? तर त्याचे कारण इराणकडे अमेरिकन जहाजांना लक्ष्य बनवायचे अनेक मार्ग आहेत. समुद्रात माईन्स (जलसुरूंग?) लावणे, समुद्रकिनार्‍यापासून दूरच्या प्रदेशातून ड्रोन/क्षेपणास्त्रे सोडणे किंवा छोट्या कामिकाझे बोटी सुध्दा. आता अपेक्षा एकच आहे की चीनचे इराणशी संबंध लक्षात घेता चीनच इराणवर दबाव टाकून आवळलेले स्ट्रेट ऑफ होरमुझ सोडवेल. त्याचे कारण स्ट्रेट ऑफ होरमुझमधून ७०-७५% तेल आशिया खंडात जाते आणि अर्थातच चीन त्या तेलाचा सगळ्यात मोठा ग्राहक आहे. पण तसे झाले नाही तर मात्र कठीण आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 03/12/2026 - 18:29 नवीन
मोज्तबा खामेनी म्हणतोय. मध्यपूर्वेतील सर्व अमेरिकन लष्करी तळ ताबडतोब बंद करावेत, अन्यथा हल्ले सुरूच राहतील. इराणला त्याच्या शेजारील देशांशी चांगले संबंध हवे आहेत. या देशांच्या भूमीवरील अमेरिकन लष्करी तळ लक्ष्य आहेत. शत्रूंवर दबाव आणण्यासाठी होर्मुझची सामुद्रधुनी सध्या बंद राहील. इराण आपल्या सर्व शहीदांच्या रक्ताचा बदला घेण्यासाठी आपला लढा सुरू ठेवेल, मग ते माजी सर्वोच्च नेते असोत किंवा हल्ल्यात मारले गेलेली मुले असोत. इराणी सैन्याचे आभार, ज्यांच्या बलिदानामुळे देश बाह्य शक्तींकडून ताब्यात येण्यापासून किंवा विभाजित होण्यापासून वाचला आहे. युद्धामुळे प्रभावित झालेल्यांना आर्थिक आणि इतर मदत देण्यासाठी योजना आखल्या जात आहेत. सारांश, इराणकडून हे युद्ध संपलेले नाही. अमेरिकेची खोड मोडली पाहिजे. एवढे मात्र नक्की वाटत आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 03/12/2026 - 18:50 नवीन
तात्यांनी हे युध्द सुरू करायच्या आधी आपली नक्की उद्दिष्टे काय, कोणत्या परिस्थितीत काय करायचे, कुठपर्यंत ताणायचे, कधी थांबायचे, शत्रूच्या हातात किती लिव्हरेज आहे आणि ते वापरून तो नक्की काय करू शकेल वगैरे गोष्टींचा विचार तरी केला होता की नाही असेच वाटायला लागले आहे. युध्द करून टाकले सुरू पण ते युध्द आता अमेरिकेच्या आणि त्याहीपेक्षा अमेरिकेच्या गल्फमधील मित्रदेशांच्या गळ्यातील हाडूक बनले आहे. इराण स्ट्रेट ऑफ होरमुझ आवळू शकेल किंवा इराण गल्फमधील आपल्या मित्रदेशांवरही हल्ले करू शकेल ही शक्यताही ध्यानात घेतली होती की नाही कोणास ठाऊक. या दोन गोष्टींमुळे इराणची बाजू वरचढ झाली आहे. इराणला जिंकायचे नाहीच आहे आणि आपण अमेरिका-इस्राएलविरोधात जिंकू अशी अपेक्षाही इराण करत नसेल. इराणला टिकून राहिले तरी ते खूप झाले. पण अमेरिकेला मात्र जिंकणे भाग आहे- निदान पळून गेले तरी जाताना 'आम्हीच जिंकलो' असा दावा करणे तरी भाग आहे. अमेरिका जितं मयाचा लाख दावा करेल पण आता इराण युध्द थांबवायच्या मनस्थितीत दिसत नाही. कारण त्यांच्यासाठी हे युध्द त्यामानाने लो कॉस्ट अफेअर आहे. समुद्रात माईन्स टाकल्यास स्ट्रेट ऑफ होरमुझ आवळायला मोठी मदत होईल. तसेच बाहरेन, कतार किंवा सौदीमधील तेलविहिरींवर ड्रोन हल्ले केले किंवा ओमानमधील सलाला बंदरातील तेल डेपो उडवला तसे केले तर त्यासाठी त्यांना फार खर्च येत नसावा. पण त्यातून तेलाचे उत्पादन आणि वितरण प्रभावित होते. इराणला तेलाचे दर २०० डॉलर प्रति बॅरल पर्यंत चढवायचे आहेत. तसे झाल्यास सर्व जगाची अर्थव्यवस्था झोपेल. अमेरिकन ग्राहक तर गॅसोलिनसाठी पंपावर किती पैसे भरावे लागतात याविषयी खूपच संवेदनाशील असतो. समजा अमेरिकेत गॅसचे दर ७-८ डॉलर प्रतिगॅलन पर्यंत चढले तर अमेरिकेतही त्याचे परिणाम जाणवतील. इराणला तेच हवे आहे. आमच्यावर हल्ला करता काय? बघतोच मग एकेकाला असेच त्यांचे म्हणणे दिसते. तसे झाले तर मग अमेरिकेला नाक घासत युध्द थांबवा हो अशी विनंती करत येणे भाग पडेल. समजा अमेरिका युध्द अर्धवट टाकून पळून गेली तरी मग इराण गल्फमधील अमेरिकेच्या मित्रदेशांना चावणार. तसेच तेलाचे दर वाढवायचे असतील आणि सगळी जागतिक अर्थव्यवस्था झोपवायची असेल तर तसेही हल्ले अमेरिकेच्या मित्रदेशांवरच करायला लागतील. इतकी वर्षे अमेरिकेवर अवलंबून असल्याने त्या मित्रदेशांकडे स्वतःचे संरक्षणदल किती आहे कोणास ठाऊक. आपल्याकडे ही गुरूकिल्ली आहे हे इराणला माहित आहे. त्यामुळे आता ते युध्द थांबवायला अटी घालत आहेत. त्यात यापुढे कधीही हल्ला होणार नाही हे लिखित आश्वासन आणि आताच्या युध्दात झालेल्या नुकसानीबद्दल भरपाई अशा अटी आहेत. इराणला भरपाई किती हवी आहे याविषयी कुठे वाचायला मिळाले नाही पण ते अवाच्या सवा पैसे मागणार ही पण शक्यता आहे. एकूणच हा वेडाचार करून तात्या चांगलाच फसला आहे. इराणविषयी अजिबात सहानुभूती नसली तरी ज्या पध्दतीने इराणने अमेरिकेचा डाव त्यांच्यावर उलटवला आहे हे पाहता त्यांना मानलेच. वेल डन इराण. आणि अमेरिकेच्या ताकदीच्या मर्यादाही जगजाहीर होत आहेत. इतकी वर्षे ती झाकली मूठ होती. त्यांच्याकडे अगदी आधुनिक इंटरसेप्टर सिस्टीम असेल पण साधे ड्रोन सोडून ती सिस्टीम टेकीला येत असेल- म्हणजे १०-२० हजार डॉलरचे ड्रोन पाडायला एखाद मिलिअन डॉलरचा शस्त्रसाठा रिकामा होत असेल तर त्याला काय अर्थ राहिला? दक्षिण कोरिआतून पॅट्रिअट इंटरसेप्टर सिस्टीम गल्फमध्ये आणावी लागली यातच सगळे काही आले. THAAD रडार प्रणालीचे नुकसान वेगळेच. ती प्रणालीच कित्येक मिलिअन डॉलर्सची आहे. समजा खामेनीची धर्मांध राजवट उलथवली तरी पुढे काय याविषयीही कसलाही विचार केला गेला होता असे वाटत नाही. कारण नवीन सरकार जे कोणते येईल ते अमेरिकेच्याच आशीर्वादाने आणावे लागेल आणि त्या सरकारला लोकांचे सहकार्य मिळणार नाही हे उघडच. चीन-रशियाला उसकावायला एकदम अनुकूल परिस्थिती असेल ती. झाले ते एका अर्थी बरेच झाले. जिथेतिथे नाक खुपसायला जायचे आणि घाण घालायची ही अमेरिकेची गेल्या ७५ वर्षातील फार घाणेरडी सवय आहे. अशी सणसणीत चपराक बसायलाच हवी होती.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/12/2026 - 19:17 नवीन
सहमत. इराण हा इस्राएल व अमेरिकेच्या घशात अडकलेले हाड बनले आहे, जे गिळता येत नाही आणि बाहेर काढता येत नाही. अमेरिका-इस्राएलची कारवाई हवाई युद्ध व नौदल युद्धापुरती मर्यादित आहे. भूदळ युद्धात अमेरिका दुर्बल आहे हे व्हिएतनाम पासून इराक, अफगाणिस्तान अश्या अनेक देशांत दिसले आहे. इराण म्हणजे व्हेनेझुएला नाही. तेथे जमिनी युद्ध झाल्यास अमेरिका सपाटून मार खाईल.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० गुरुवार, 03/12/2026 - 19:03 नवीन
इराण म्हणजे गाझा नव्हे हे नेत्यानाहुला इराणने दाखवून दिले. खिशातील पेजर फोडून आम्ही कसे वेगळ्या पद्धतीने युद्ध करू शकतो ह्याचा माज इराणच्या ड्रोनने उतरवला. आता तोंड लपवायला जागा उरली नाही. अमेरिकेच्या पदराआडून युद्ध थांबविण्याचे प्रयत्न चालू आहे. इराणच्या ड्रोनवर उपाय शोधण्यासाठी " टाईम प्लीज " आहे हे इराणला ठाऊक असल्याने अजून १० वर्ष युद्ध चालू ठेऊ शकतो असे इराणच्या नेतृत्वाने सांगितल्यावर नेत्यानाहू लपून बसला आहे. फेकून द्या ह्यांचे पेग्यासस. भारतातील विरोधी पक्षाचे फोनवरील संवाद ऐकण्यापलीकडे दुसरा काहीही उपयोग नाही. पहलगामचे दहशदवादी आले आणि गेले तरी पेग्याससला कळले नाही. टेक्नॉलॉजी आपण विकसित करू शकतो.त्यासाठी इस्राईलवर विसंबून रहाणे धोक्याचे आहे. चीन, रशिया आणि इराण युद्ध धोरणात फार पुढे गेले आहेत. आपल्याला तेलासाठी इराण आणि रशियाची कायम गरज भासणार आहे त्यामुळे त्यांना दुखावून चालणार नाही.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    16 hours 17 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    16 hours 19 minutes ago
  • सुंदर !!
    16 hours 21 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    16 hours 25 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: भालचंद्र लिमये
    नोंदणी: Fri, 08/04/2023 - 18:58
  • सदस्य: निमी
    नोंदणी: Fri, 08/04/2023 - 13:17
  • सदस्य: महिरावण
    नोंदणी: Fri, 06/23/2023 - 10:47
  • सदस्य: पंचक
    नोंदणी: Mon, 06/19/2023 - 19:37
  • सदस्य: पाव्हणं
    नोंदणी: Sun, 06/04/2023 - 15:06
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा