इजराईल इराण युद्ध : स्वतंत्र धागा
इजराईल आणि इराण यांच्यातील युद्ध दीर्घकाळ चालणार आहे. युद्ध आणि त्याचे परिणाम याबाबत सर्व प्रतिक्रिया एकाच ठिकाणी याव्यात म्हणून हा स्वतंत्र धागा.
इराण हा कट्टर इस्लामी देश आहे. इस्लामी जगाचे नेतृत्व मिळवण्यासाठी इजराईलचा संपूर्ण नाश करण्याची त्याची मंशा आहे. काश्मीर प्रश्नावर इराणने नेहमी पाकिस्तानचे समर्थन केले असले तरी व्यापक आर्थिक हितासाठी भारताशी संबंध दृढ केले आहेत. भारताचा मध्य आशियाशी होणारा व्यापार प्रामुख्याने इराणमार्गे होतो.
इजराईलने नेहमीच भारताला मदत केली आहे. कारगिल युद्ध जिंकण्यात इजराईलची मदत झाली होती. विविध क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, युद्धास्त्रे इत्यादी भारताला इजराईलकडून मिळतात. नुकतेच इजराईलने पंतप्रधान मोदींना आपल्या देशाचा सर्वोच्च सन्मानही दिला आहे.
या युद्धाचा फटका भारतासह संपूर्ण जगाला बसणार आहे. पेट्रोलच्या किंमती वाढल्याने जगभरात महागाई वाढेल. इराणमध्ये सत्ता परिवर्तन न होता युद्ध थांबले तर खाडी देशांत अमेरिकेची प्रतिष्ठा कमी होईल. सुरक्षेसाठी खाडी देश चीन किंवा रशियाकडे पाहू शकतात. इराण अणुबॉम्ब निश्चितपणे तयार करेल आणि त्याचा उपयोगही करेल. पुढील २० वर्षांत इजराईलचे अस्तित्व नामशेष होऊ शकते. त्यामुळे हे युद्ध अमेरिकेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनले आहे.
जण परतीच्या तिकिटासाठी स्वतःच प्रयत्न करीत आहे.सर्व जण सुखरूप लवकरात लवकर भारतभूमीवर येवोत.मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : Major Lazer & DJ Snake Lean On feat MØ Official Music Video- भारताने रशियाकडून तेल घेणे थांबविले होते का?
- भारताने, "भारताने रशियाकडून तेल घेणे थांबविले" असे म्हटले होते का?
- रशियाने भारताला तेल देणे थांबविले होते का?
- रशियाने, "रशियाने भारताला तेल देणे थांबविले" असे म्हटले होते का?
यापैकी कोणत्याही एकाही प्रश्नाचे उत्तर "हो" असे नाही. मग अमेरिकेच्या "तीस दिवस तेल घेऊ देऊ" या किंवा आधीच्या "तेल घेऊ देणार नाही" या वक्तव्यांना काही अर्थ आहे का?मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : Nache Nache - 8K Video | The RajaSaab | Prabhas, Malavika Mohan, Nidhhi Agerwal, Riddhi | Thaman S