Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

त्यांनी हिंदीत का बोलावं?

उ
उपयोजक
Mon, 04/11/2022 - 15:22
🗣 510 प्रतिसाद
तीन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एक विनंती केली की वेगवेगळ्या राज्यांमधल्या असमान मातृभाषा असणार्‍या लोकांनी एकमेकांशी संवाद साधताना इंग्रजीऐवजी हिंदी भाषा वापरावी. https://www.google.com/amp/s/indianexpress.com/article/india/people-different-states-should-speak-hindi-not-english-shah-7858861/lite/ या अनावश्यक विनंतीला अहिंदी राज्यांमधे साहजिकच विरोध होतो आहे. विशेषत: दक्षिणेकडच्या राज्यांमधे. आता ज्या लोकांची मातृभाषा हिंदीच आहे त्यांना या विनंतीबद्दल काहीच आक्षेप नसणारेय.उलट त्यांचा आयता फायदाच होईल. आता प्रश्न असे आहेत. १. दोन राज्यांमधील असमान भाषिकांनी कोणत्या भाषेत एकमेकांशी बोलावं अशी विनंती गृहमंत्री का करत आहेत? लोकांनी कोणत्या भाषेत बोललं पाहिजे हे गृहखात्याच्या अखत्यारीत येतं का? २. या विनंतीला दक्षिणेकडच्या राज्यातले लोक सकारात्मक प्रतिसाद देतील असा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा? की ही विनंती हिंदीतून बोलू शकणार्‍या अहिंदी राज्यांतल्या लोकांसाठीच आहे? अशी विनंती केल्यावर ज्यांना हिंदी येत नाही ते लगेच हिंदी शिकून घेतील हा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा? ३. या विनंतीमागे कारण काय असावं? हिंदी पट्ट्यातल्या लोकांची सोय व्हावी? कारण हिंदी पट्ट्यातले लोक "हम तो पापी पेट के लिए आए हैं भाई" हे रडव्या चेहर्‍यानं सांगून अहिंदी भाषिकांना 'आमची सोय बघा' असंच सांगू पाहतात. हिंदीभाषिक अहिंदी राज्यातल्या भाषा शिकायला राजी नसतात. पण अहिंदी भाषिकांनी मात्र हिंदी शिकावी ही अपेक्षा बाळगतात. हे हिंदी पट्ट्यातले लोक हिंदीतर भाषा शिकणार कधी? ४. समजा दक्षिणभारतीय राज्यांनी किंवा ईशान्येकडच्या राज्यांनी एकत्र येऊन त्यांची एकच सामायिक बोलीभाषा निर्माण करुन हिंदीला कडवे आव्हान निर्माण केले तर? मग काय करतील अमित शहा? ५. इंग्रजीला अमित शाह यांचा विरोध का? इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. कमालीची ताकदवान भाषा आहे.आंतरराष्ट्रीय भाषा आहे. उपयोगाची भाषा आहे. असं असताना ती न वापरता हिंदी का वापरायची?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 105991 views

🗣 चर्चा (510)
त
तर्कवादी Sat, 04/16/2022 - 15:38 नवीन
स्थानिक विरुद्ध हिंदी असा रंग देऊ नये. हिंदी विरुद्ध इंग्रजी असे ते आहे. दोन भिन्नभाषिक लोकांनी परस्पर संवाद साधण्याकरिता इंग्रजी ऐवजी हिंदीला प्राधान्य द्यावे असे हे आवाहन आहे.
ही सुरुवातीची पायरी आहे.. सुरवातीला असे वरवर सामान्य भासणारे, हितद्वेषी न वाटणारे आवाहन करायचे आणि मग सगळे लोक हिंदी शिकलेत की हळूहळू एकेक मुद्दा पुढे रेटायचा असा मोठा कार्यक्रम (अजेंडा) असू शकतो.
यात सक्ती नाही. स्थानिक भाषेची गळचेपी तर अजिबात नाही. दोन मराठी भाषिकांनी मराठीत बोलू नये किंवा दोन तमिळ भाषिकांनी तमिळमध्ये बोलू नये असे सांगत नाहीयेत अमित. फक्त जेव्हा एक मराठी भाषिक एका तमिळ भाषिका सोबत संवाद साधतोय तेव्हा इंग्रजी ऐवजी हिंदीला प्राधान्य द्यावे असे हे साधे आवाहन आहे.
मुळात असे काही आवाहन करायचे कारणच काय ?लोक आपापल्या पद्धतीने मार्ग काढतातच की .. आताही दोन भिन्न राज्यातील एकमेकांची स्थानिक भाषा न जाणणारे लोक - आपापसात हिंदी बोलतच नाहीत , फक्त इंग्लिशच बोलतात असं काही नाहीये .. कधी इंग्लिशमध्ये बोलत, कधी हिंदीत संवाद साधत तर कधीअन्य कोणतीतरी भाषा बोलत किंवा एकमेकांची भाषा शिकून तोडकी-मोडकी बोलत तर क्वचित प्रसंगी एखादा दुभाषा मध्ये घेत मार्ग काढतातच .. आता तर इंटरनेटमुळे गुगल ट्रान्सलेटर सारखे अ‍ॅप वा फोनवरुन हवे ते चित्र दाखवत संभाषण करण्याची सोय उपलब्ध आहे. मला आठवते एकदा चेन्नईजवळ मी अल्पकालीन वास्तव्यास असताना घसा दुखू लागल्याने मला ओवा हवा होता तेव्हा मी ओव्याचे चित्र स्थानिक दुकानदाराला दाखवून ओवा मिळवला होता. जवळपास सर्वच राज्यात इतर राज्यातून स्थलांतर केलेले लोक आहेत... कोणतेही व्यवहार थांबलेले नाहीत. थोड्याफार अडचणी येत असतील पण व्यवहार पुढे सरकतातच. मग आता मुद्दाम आवाहन करायचे कारणच काय ? नीती आयोग वा कुठल्या आयोगाने तर म्हंटले आहे का की सगळ्या राज्यातील लोकांना एक भाषा येत नसल्याने देशाचा जीडीपी खाली घसरला वगैरे.. ? आणि आवाहन करायचेच होते तर लोकांना असेही म्हणा ना की तुम्ही दुसर्‍या राज्यात दीर्घकालीन वास्तव्यास असाल , स्थलांतरित झाला असाल तर तिथली स्थानिक भाषा आवश्य शिकून घ्या, त्या भाषेचाही आदर करा. असं आवाहन का केलं नाही अमित शहांनी लोकांना- त्यातही हिंदी भाषिक लोकांना ? विरोध हिंदी भाषेला नाहीये तर "इतर भाषिकांनी हिंदी आवर्जुन शिकावी आणि हिंदी भाषिकांनी मात्र वर्षानुवर्षे दुसर्‍या राज्यात राहून स्थानिक भाषा शिकण्यात स्वारस्य दाखवू नये, स्थानिक भाषेचा आदर करु नये " या दुटप्पी धोरणाला विरोध आहे.
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Sat, 04/16/2022 - 15:53 नवीन
https://www.misalpav.com/comment/1138188#comment-1138188
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Sat, 04/16/2022 - 16:09 नवीन
सध्या भारतीय प्रशासकीय सेवा मार्फत आयएएस दर्ज्याचे अधिकारी निवडले जातात. कालांतराने हिंदीचे प्राबल्य वाढले की निम्न दर्जाचे कर्मचारी देखील अशाच प्रकारच्या आयोगामार्फत घेण्याचे धोरण आखून राज्य पातळीवरील नोकर भरतीचे अधिकार संपवुन टाकायचे आणि हिंदी भाषिक पट्ट्यातील तरुणांना सरावाची भाषा असल्याने इतरांच्या तुलनेत त्यांना अधिक फायदा मिळेल असे बघायचे. हिंदी भाषिक पट्ट्यात सरकारी नोकरीचे आकर्षण परंपरागत आहे. नोकरीची हमी, कमी श्रम, आता तर पगार पण आकर्षक, काही ठिकाणी वरकड कमाईची संधी आणि लग्नाच्या बाजारात सरकारी नोकरीचे आकर्षण हे असे सर्व घटक आहेत. हा कावेबाजपणा वेळीच ठेचला पाहिजे.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 04/16/2022 - 15:50 नवीन
फक्त जेव्हा एक मराठी भाषिक एका तमिळ भाषिका सोबत संवाद साधतोय तेव्हा इंग्रजी ऐवजी हिंदीला प्राधान्य द्यावे असे हे साधे आवाहन आहे का?? तमीळ भाषकाचा नी मराठी भाषकाचा हिंदीशी संबंध काय? आपली स्थानिक भाषा + एक अजून एक भाषा (ज्यांना आपली स्थानिक भाषा येत नाही त्यांच्यासोबत दैनंदिन व्यवहारात संवाद साधण्याकरिता) अशा दोन भाषा येणे गरजेचे असेल तर ही दुसरी भाषा शिकायला सोपी अशी कोणती आहे? अर्थातच हिंदी हे कोणी ठरवले?? तुम्हीला हिंदी सोपी वाटते म्हणून बंगाली, केरळी ईशान्येकडील राज्यानाही ती सोपी वाटते का?बरं मग सोपीच भाषा घ्यायची असेल तर गुजराती का नको?? किंवा हरयानवी किंवा राजस्थानी??
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Sat, 04/16/2022 - 15:54 नवीन
https://en.wikipedia.org/wiki/List_of_languages_by_number_of_native_speakers
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 04/16/2022 - 16:07 नवीन
खोटे आकडे. हिंदी खुद्द हिंदी भाषीक राज्यातही बोलली जात नाही. मध्य प्रदेशात बुंदेलखंडी, बाघेलखंडी नी माळवी बोलतात, युपीत मैथीली नी भोजपुरी बोलतात, बिहारात ही भोजपुरी बोलली जाते. मग ही आकडेवारू कुठून आणलीय??
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Sat, 04/16/2022 - 16:36 नवीन
हिंदी खुद्द हिंदी भाषीक राज्यातही बोलली जात नाही. मध्य प्रदेशात बुंदेलखंडी, बाघेलखंडी नी माळवी बोलतात, युपीत मैथीली नी भोजपुरी बोलतात, बिहारात ही भोजपुरी बोलली जाते.
हा माझाच मुद्दा तुम्ही पुन्हा अधोरेखित करताय. त्यांची मातृभाषा हिंदी नाहीचे मूळी पण दुसरी भाषा म्हणून ते हिंदी बोलतात. इतकंच काय गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा या भागातही दुसरी भाषा म्हणून हिंदी बोलली जाते.
मग ही आकडेवारू कुठून आणलीय??
अर्थातच दुसरी भाषा असली तरी त्यांना हिंदी येते म्हणून त्यांचादेखील या आकडेवारीत सामावेश केलेला आहे.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 04/16/2022 - 19:39 नवीन
हिंदी द्वितीय स्थानावर असूनही त्याना सरसकट हिंदी भाषाक धरलंय ह्यावरूनच ती आकडेवारी खोटीय.
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Sun, 04/17/2022 - 06:37 नवीन
खर्‍या आकडेवारीची लिंक असेल तर द्या.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sun, 04/17/2022 - 06:05 नवीन
त्यांची मातृभाषा हिंदी नाहीचे मूळी पण दुसरी भाषा म्हणून ते हिंदी बोलतात. मिळतीजुळती असणे आणि बर्‍यापैकी फरक असणे हे जरा समजून घ्याल का? सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बर्‍याच लोकांना मालवणी आणि प्रमाण मराठीत बोलता येणे फार अवघड जाऊ नये. याचा अर्थ मालवणी ही मराठीपासून पूर्णत: वेगळी आहे का? ती जर पूर्णत: वेगळी असेल तर भाषावार प्रांतरचनेदरम्यान सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्रात का सामील केला असेल?
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Sun, 04/17/2022 - 06:41 नवीन
मिळतीजुळती असणे आणि बर्‍यापैकी फरक असणे हे जरा समजून घ्याल का?
याचा अर्थ मालवणी ही मराठीपासून पूर्णत: वेगळी आहे का?
मिळतीजुळती, बर्‍यापैकी फरक, बर्‍यापैकी फरक हेच तीन निकष लावून तर इंग्रजी ऐवजी द्वितीय भाषा म्हणून हिंदीचा आग्रह धरला जातोय. इंग्रजी ही स्थानिय भाषांना पूर्णतः परकी आहे तर हिंदी बर्‍यापैकी जवळची. मराठीला तर खूपच जवळची.
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Sat, 04/16/2022 - 16:47 नवीन
तमीळ भाषकाचा नी मराठी भाषकाचा हिंदीशी संबंध काय?
इंग्रजीशी तरी काय संबंध? जे कॉलेजला गेलेत, इंजिनिअरींग मेडिकल सायन्स कॉमर्स वगैरे शिकलेत त्यांच्यातले सर्वच्या सर्व देखील अस्खलित इंग्रजी बोलू शकत नाहीत. इतर मंडळी जसे की शेतकरी, किराणा दुकानदार, भाजी विक्रेते, ड्रायव्हर, हमाल वगैरेंना तर इंग्रजी किती अवघड जाईल. हिंदी तूलनेने सोपीच की इंग्रजीपेक्षा.
हे कोणी ठरवले?? तुम्हीला हिंदी सोपी वाटते म्हणून बंगाली, केरळी ईशान्येकडील राज्यानाही ती सोपी वाटते का?बरं मग सोपीच भाषा घ्यायची असेल तर गुजराती का नको?? किंवा हरयानवी किंवा राजस्थानी??
लिपी आणि उच्चारण यात सुलभता आहे. हरियाणवी / राजस्थानी मध्ये बाणातला ण, मराठी आणि दक्षिणी भाषांमध्ये असलेलं ळ असली उच्चारायला अवघड अक्षरं हिंदीत नाहीत म्हणून. मी मारवाडी भाषिक जैन असून अनेकदा मला गुजराती लोकांच्या सोबत संपर्क करावा लागतो. गेली किमान पस्तीस वर्षे अधूनमधून गुजराती कानावर पडते आहे. काही शब्द समजले तरी पूर्ण वाक्य समजत नाही, स्वतः जुळवून बोलणे तर कधीच शक्य नाही. त्यामुळे गुजराती कधीच सोपी वाटली नाही. बेळगाव मध्ये तीन महिने राहिलो पण अनेकदा ऐकूनही एकही कन्नड शब्द समजला नाही. धुळ्यात दोन वर्षे राहूनही अहिराणीतले काही शब्द समजले. पूर्ण वाक्य समजणे बोलणे हे काही जमले नाही. हिंदी मात्र शेजारी आणि दूरचित्रवाणी + आकाशवाणी + चित्रपट यांच्यामुळे फारच लवकर आत्मसात केली.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sun, 04/17/2022 - 05:58 नवीन
फक्त जेव्हा एक मराठी भाषिक एका तमिळ भाषिका सोबत संवाद साधतोय तेव्हा इंग्रजी ऐवजी हिंदीला प्राधान्य द्यावे असे हे साधे आवाहन आहे. हिंदीच का?
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Sat, 04/16/2022 - 02:01 नवीन
Official Language = राष्ट्रभाषा असे नाही तर. https://knowindia.india.gov.in/national-identity-elements/ या लायनीत राष्ट्रभाषा हिन्दी असे शिकल्याचे आठवते. आणि शालेय स्तरावर हिन्दी च्या नव्हे राष्ट्रभाषा हिन्दी च्या परिक्शा असायच्या. अजुन चालु आहेत का? सध्या Olympiad चा जमाना आहे. महात्मा गान्धी यानी दक्शिण भारतात हिन्दी प्रसार करायला विशेष प्रयत्न केले होते. https://en.wikipedia.org/wiki/Dakshina_Bharat_Hindi_Prachar_Sabha अमित शहा आता गान्धीजीन्च्या मार्गाने जात आहेत बाकी विचारान्चा विरोध असला तरी.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 04/16/2022 - 03:44 नवीन
घटनेनुसार हिंदी किंवा इतर कोणतीही भाषा ही राष्ट्रभाषा नाही. परंतु मुद्दाम हिंदीचा उल्लेख खोडसाळपणे राष्ट्रभाषा असा काही जण करतात. हिंदीच्या परीक्षा घेणाऱ्या संस्थेचे नाव खोडसाळपणे राष्ट्रभाषा प्रचार समिती असे ठेवले आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा नसली तरी हिंदी हीच राष्ट्रभाषा आहे असे जनतेच्या मनावर ठसविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विशेषतः सुरूवातीच्या काळात हे प्रयत्न जोरदार सुरू होते. परंतु हिंदीला सुरूवातीपासूनच तामिळनाडूचा विरोध. होता. सुदैवाने आता सर्व दक्षिण भारतात, बंगालमध्ये व महाराष्ट्रातही हिंदीला विरोध होत आहे. त्यामुळेच जाहिराती, समाजमाध्यमे, आंतरजाल, कंपन्यांची मदत केंद्रे आता मराठीतूनही सेवा देतात. समोरच्याने हिंदीत सुरूवात केली तरी मी मराठीचा आग्रह धरतो व बहुतेक वेळा तो मान्य होतो. तो मान्य नाही झाला तर संभाषण बंद करतो.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Sat, 04/16/2022 - 06:25 नवीन
आज काल कोणत्या ही भाषेचे कोणत्या ही भाषेत रुपांतर करण्याची सुविधा .पोर्टेबल उपकरण बनवणे काही अवघड नाही. हिंदी ही भाषा आहे.पण जे हिंदी ची तळी उचलत आहेत .केंद्रीय सरकार हे असले उद्योग नेहमीच करते. मग कोणत्या ही पक्षाचे असावे. त्या आडून ह्यांचा स्वार्थ असतो,मागास हिंदी भाषिक लोकांना हिंदी मान्य झाली की देश भर घाम करायला मोकळे रान मिळते. हिंदी भाषिक लोकांनी त्यांची राज्य ना राहण्याच्या लायकीची ठेवली आहेत ना रोजगार,शिक्षणाचा. ना ह्या राज्यात कायदा सू व्यवस्था चांगली. बेशिस्त राज्य आहेत सर्व हिंदी भाषिक. हिंदी सर्वांनी मान्य केली की हे सर्व पूर्ण देशाचा म्हशी चा गोठा बनवणार. विरोध त्याला आहे.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sat, 04/16/2022 - 16:06 नवीन
समजा हिंदी ला विरोध केला तर पूर्ण देशाचा म्हशी चा गोठा बनण्यापासून वाचेल काय ?
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Sun, 04/17/2022 - 06:36 नवीन
इंग्रजी जेव्हा कामकाजाची भाषा बनली तेव्हा मुंबईत कामचलाऊ इंग्रजी ज्ञानाच्या जोरावर मद्राशांनी (त्या काळी सरसकट सर्व दक्षिण भारतीयांना महाराष्ट्रात असेच संबोधले जाई) स्टेनो टायपिस्ट पी ए अशा नोकर्‍या पटकावल्या. शिवसेनेला मग हटाव लूंगी बजाव पूंगी अशी मोहीम राबवायची संधी मिळाली. या संधीतूनच बस्तान बांधलेली शिवसेना आता हिंदीविरोध आणि दाक्षिणात्यांबाबत पुळका दाखविते आहे.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sat, 04/16/2022 - 16:04 नवीन
चर्चेतून मराठी भाषिकांचा हिंदी नको हा आग्रह पोहोचला. हिंदी / इंग्रजी ला पर्याय म्हणून इतर कोणती भारतीय भाषा देता येईल काय ?
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 04/16/2022 - 16:08 नवीन
हिंदी / इंग्रजी ला पर्याय म्हणून इतर कोणती भारतीय भाषा देता येईल काय ? नकोच आहे पर्याय. पर्याय का हवा?
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sat, 04/16/2022 - 16:11 नवीन
पर्याय का हवा?
समजले नाही. म्हणजे पर्याय का नको ?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 04/16/2022 - 17:20 नवीन
मराठी आणि इंग्लिश या दोन भाषा माझ्यासाठी पुरेश्या आहेत. हिंदीची अजिबात गरज नाही.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 04/16/2022 - 19:41 नवीन
माझ्यासाठी देखील. भत्तर भारतीय मजूरांच्या सोयीसाठी अहिंदी भाषकांना हिंदी शिकावी हे सांगनार्यांची किव येते.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 04/21/2022 - 14:24 नवीन
आणि दक्षिणीलोक, इतर साहेब लोक यांच्याशी बोलताना इंग्रजी बोलताना खुप सोयीचे पडते या बद्दल विशेष कौतुक करायला पाहिजे. कितीही केले तरी शेवटी कष्टकरी लोक क्षुल्लकच ना !
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे गुरुवार, 04/21/2022 - 14:29 नवीन
साहेबाची चमचेगिरी करायला इंग्रजी बरी पडते यांना. म्हणजे कामचूकारपणा करुनही पगारवाढ / बढती मिळतेच. गरीब मजूराकडून काय मिळणार? फक्त प्रेमाचे दोन शब्द?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/21/2022 - 16:38 नवीन
साहेबाची चमचेगिरी करायला इंग्रजी बरी पडते यांना. म्हणजे कामचूकारपणा करुनही पगारवाढ / बढती मिळतेच. भ्रम आहे. इंग्लिशमध्ये बोलून साहेबाची चमचेगिरी करण्याचे दिवस साहेबाबरोबरच गेले. आता बढतीसाठी वेगळी कौशल्ये लागतात. गरीब मजुराकडून प्रेमाचे शब्द मिळतात हासुद्धा अजून एक भ्रम.
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 04/21/2022 - 14:57 नवीन
आपल्या देशातल्या जास्तीत जास्त लोकांना येणाऱ्या भाषेच्या दुस्वासासाठी खूप कमी भारतीयांना येणारी भाषा कवटाळायला बघणे म्हणजे फार मूर्खपणाचे वाटते. भाषा एक टूल आहे. तिचा सर्वांना उपयोग व्हायला पाहिजे, निस्ती अस्मिता धरून बसून उपयोग नाही.
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे गुरुवार, 04/21/2022 - 15:03 नवीन
प्रतिसादातल्या प्रत्येक शब्दाशी सहमत.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 04/21/2022 - 15:44 नवीन
आपल्या देशातल्या जास्तीत जास्त लोकांना येणाऱ्या भाषेच्या दुस्वासासाठी खूप कमी भारतीयांना येणारी भाषा कवटाळायला बघणे म्हणजे फार मूर्खपणाचे वाटते. भाषा एक टूल आहे. तिचा सर्वांना उपयोग व्हायला पाहिजे, निस्ती अस्मिता धरून बसून उपयोग नाही. आक्षेप. आपल्या देशातील जास्तीत जास्त मानवी पैदास केलेल्या राज्यांची भाषा असा शब्द हवा. मग ह्या हिशेबाने
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/21/2022 - 16:40 नवीन
आम्ही इंग्लिशला अजिबात कवटाळत नाही. मी महाराष्ट्रात सर्वत्र फक्त मराठी वापरतो. महाराष्ट्राबाहेरील अमराठी लोकांशी बोलताना इंग्लिश.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure गुरुवार, 04/21/2022 - 16:50 नवीन
Tool म्हणून योग्य भाषा वापरली जात आहे.ती हिंदी च असावी असा हट्ट का? गृहमंत्री देशातील अनेक भाषा कडे दुर्लक्ष करून हिंदी वापरा असे कसे काय सांगू शकतात? हिंदी भाषा एजेंडा हाच मुळी राजकीय आहे. एकच देश,आपल्याच देशातील. हे शब्द वापरूच नका. बाकी ज्या असंख्य भाषा आहेत त्या देशातील च भाषा आहेत ह्याची जाणीव का हीत नाही. एकमेव हिंदी हीच भाषा देशात नाही. 50% लोक हिंदी समजत नाहीत.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 04/22/2022 - 05:19 नवीन
गृहमंत्री देशातील अनेक भाषा कडे दुर्लक्ष करून हिंदी वापरा असे कसे काय सांगू शकतात?
गृहमंत्र्यांनी स्थानिक भाषेसोबत कोणती भाषा वापरावी यावर उपदेश दिलेला. स्थानिक भाषेऐवजी नाही. मग हिंदीच का ह्याचे साधे सरळ उत्तर आहे भारतात सगळ्यात जास्त लोकांना बोलता येणारी भाषा म्हणजे हिंदी.
हिंदी भाषा एजेंडा हाच मुळी राजकीय आहे.
लोकांची सोय होत असेल तर अजेंडा असला तरी काही फरक पडत नाही. अजेंडा फोल पडायला फार कुणाला न येणारी भाषा लादली जाऊ नये. सामान्य लोकांची सोय बघावी.
एकच देश,आपल्याच देशातील. हे शब्द वापरूच नका.
हे शब्द कोणीही वापरले नाहीयेत. अमित शहांच्या सल्ल्यामध्ये सुद्धा स्थानिक भाषा प्रथम स्थानिच होत्या.
50% लोक हिंदी समजत नाहीत.
करेक्ट. भाषांची यादी आणि किती टक्के भारतीयांना ती भाषा बोलता येते हे पाहिले तर समजेल हिंदीचा सर्वात जास्त आहे. मराठी केवळ १०% लोकांना येते. इंग्लिश सुद्धा १०%.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 04/22/2022 - 06:44 नवीन
भारतात सगळ्यात जास्त लोकांना बोलता येणारी भाषा म्हणजे हिंदी. हे कोणी ठरवलं? भारतात हिंदी न समजनारे लोक जास्त आहेत. लोकांची सोय होत असेल तर अजेंडा असला तरी काही फरक पडत नाही. अजेंडा फोल पडायला फार कुणाला न येणारी भाषा लादली जाऊ नये. सामान्य लोकांची सोय बघावी. लोकांची सोय होतेय? ऊत्तर भारतीय मजूर म्हणजे लोक का? त्यांच्या सोयी साठी हिंदी का लादून घ्यावी? करेक्ट. भाषांची यादी आणि किती टक्के भारतीयांना ती भाषा बोलता येते हे पाहिले तर समजेल हिंदीचा सर्वात जास्त आहे. मराठी केवळ १०% लोकांना येते. इंग्लिश सुद्धा १०%. नीट पहा. किती लोकांना हिंदी येते ते.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 04/22/2022 - 07:16 नवीन
भारतात हिंदी न समजनारे लोक जास्त आहेत.
१. भारतात सर्व भाषांमध्ये हिंदी सगळ्यात जास्त लोकांना बोलता येते. २. भारतात हिंदी बोलता येणाऱ्या लोकांपेक्षा हिंदी न बोलता येणारी लोकं जास्त आहेत. वरकरणी विरोधाभास वाटला तरी दोन्ही वाक्यांमध्ये विरोधाभास नाहीये. दोन्ही खरी वाक्ये आहेत. भारतात हिंदी समजणार्या लोकांची संख्या- ४३.६३% आहे. अशी दुसरी कोणतीही भाषा भारतात नाही जी ४३.६३% किंवा जास्त भारतीय नागरिकांना बोलता येते. याचा अर्थ ती "सगळ्यात जास्त लोकांना बोलता येणारी भाषा आहे".
हे कोणी ठरवलं
जनगणनेमधून आलेली आकडेवारी आहे. इथे बघा. विकिपीडिया वर विश्वास नसल्यास सेन्सस वेबसाईट वरून एक्सेल फाईल डाउनलोड करा, आणि तपासा.
नीट पहा. किती लोकांना हिंदी येते ते.
आणखी काय नीट पाहायचे ?
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 04/22/2022 - 07:27 नवीन
भारतात हिंदी समजणार्या लोकांची संख्या- ४३.६३% आहे. ही आकडेवारी खोटी आहे. हिंदी ईतर राज्यांवर लादण्यासाठी अशी खोटी माहीती खुद्द सरकारच पसरवते. हिंदी भाषीक राज्ये न्हणून जी काज्ये गणली जातात ची देखील हिंदी बोलत नाहीत. ईतर भारताचा प्रश्नच नाही.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 04/22/2022 - 07:34 नवीन
कशावरून खोटी ? तुमच्या नाजूक भावनांना धक्का बसतो म्हणून आकडेवारी खोटी होत नसते. भारत सरकारच्या अकडेवारीला खोटे म्हणायला भरपूर पुरावे लागतात. उगाच उठले आणि खोटे म्हणले असे सांगता येत नाही. काही ठळक पुरावे असतील आकडे खोटे असण्यासाजे तर द्या. बर, आकडे खोटे आहेत तर खरे आकडे द्या म्हणल्यावर तुम्ही गप्प होता.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 04/22/2022 - 07:21 नवीन
लोकांची सोय होतेय? ऊत्तर भारतीय मजूर म्हणजे लोक का? त्यांच्या सोयी साठी हिंदी का लादून घ्यावी?
स्थानिक भाषेनंतर, ज्यांना स्थानिक भाषा येत नाही, त्यांसाठी दुसरी भाषा कुठली असावी हे ठरवण्यासाठी ज्यांना स्थानिक भाषा येत नाही त्यांना काय बोलता येते हेच पहावे लागेल. मग जर उत्तर भारतीय लोकं जास्त प्रमाणात आहेत हे तर हिंदी वापरण्यासाठीचे आणखी एक सबळ कारण झाले. दुसरी भाषा म्हणून इंग्लिश घेतली तर ती सुद्धा १० मधल्या एका व्यक्तीलाच येण्याची शक्यता आहे. त्याउलट हिंदी १० मधल्या ४ ते ५ जणांना येण्याची शक्यता आहे. हिंदी लादून कुठे घेत आहात, व्यवहार स्थानिक भाषेतच होणार आहेत. आणि हो, ती लोकं आहेत.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 04/22/2022 - 07:30 नवीन
इंग्लिश घेतली तर ती सुद्धा १० मधल्या एका व्यक्तीलाच येण्याची शक्यता आहे. त्याउलट हिंदी १० मधल्या ४ ते ५ जणांना येण्याची शक्यता आहे. चुकीची माहीती. कुत्र डुकरासारखी मानवी पैदास तेली म्हणून युपी बिहारची भाषा देशावर लादून घ्या हे सांगणे मुर्खपणाचे आहे. हिंदी दहा मधल्या चार ते पाच जणांना यायची शक्यता आहे ही देखील चुकीची माहीती.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Fri, 04/22/2022 - 08:26 नवीन
सहज विचार केला तरी लक्षात येईल मराठी मुस्लिम पण जेव्हा कागद मातृभाषा कोणती ह्या पर्याय पुढे हिंदी किंवा उर्दू लिहतात. पण त्यांची मातृभाषा खूप वर्ष महाराष्ट्रात राहतं असल्या मुळे खरे तर मराठी असते. पण मुस्लिम धर्म बरोबर हिंदी,उर्दू भाषा असे समीकरण त्यांच्या डोक्यात असते. त्या मुळे अशा पाहणीचे अंदाज चुकीचे असतात. तेच इतर भाषिक गट विषयी पण होते. पिढ्यान् पिढ्या गुजराती भाषा असणारे दुसऱ्या राहतं राहतं असले आणि एका पॉइंट वर त्यांना गुजराती येत पण नसेल तरी ते मातृभाषा ह्या coloum समोर गुजराती च लीहणार. हे सर्व भाषिक लोकांना लागू आहे. ह्या मुळे आकडेवारी चुकीची असू शकते.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी गुरुवार, 04/21/2022 - 16:56 नवीन
भाषेचा दुस्वास करु नये हे मान्यच.. मग हे अहिंदी भाषांनाही लागू व्हावं .. हिंदी भाषिकांनी मराठी वा इतर अहिंदी भाषांना कमी लेखून त्यांचा दुस्वास करु नये.. ज्या राज्यात आपण दीर्घकाळ राहतो तेथली भाषा आपुलकीने शिकण्याचा प्रयत्न करावा. .. हिंदी भाषिक राज्यांत जावून सहसा कुणी म्हणत नाहीच की मी हिंदी बोलणार नाही वा शिकणार नाही.. पण हिंदी भाषिक इतर राज्यात -निदान महाराष्ट्रात तरी वर्षानुवर्षे राहून "क्यो सीखनी है हमे मराठी" अशी जी मग्रुरी दाखवतात त्याबद्दल आपण काय म्हणाल ?
  • Log in or register to post comments
S
sunil kachure गुरुवार, 04/21/2022 - 17:12 नवीन
आज देशात अशी अवस्था आहे .जी राज्य परिपक्व विचार करून राज्याची प्रगती होण्यासाठी झटत आहेत ते शिक्षा भोगत आहेत. परिपक्व वागणे म्हणजे गुन्हा करणे आणि त्या बध्दल शिक्षा पण मिळणे अशी अवस्था आहे. 1) महाराष्ट्र सहित दक्षिण भारताने लोकसंख्या वाढ कमी करण्यासाठी योग्य दिशेने पावलं टाकली.आणि ह्या राज्यातील सुजाण नागरिक नी सहकार्य पण केले. परिणाम काय . बेशिस्त ,कायदे बिलकुल न पाळणाऱ्या राज्यातील लोकसंख्या प्रचंड वाढली आणि ह्याचे त्यांना बक्षीस म्हणून लोकसभेत जास्त प्रतिनिधित्व पण मिळेल तयारी चालू च आहे. परत ही बेशिस्त वागणाऱ्या राज्यातील वाढलेली लोकसंख्या पोसण्याची जबाबदारी पण ह्याच शिस्त पाळणाऱ्या राज्यावर च पडली. २) देशात हिंदी जास्त बोलली जाते म्हणून शिस्तीत राहणाऱ्या राज्यांवर त्यांची भाषा पण लादयाला हे तयार च आहेत. ३) ज्या राज्यांनी योजनाबध्द रीती नी राज्य इण्डस्ट्री मध्ये प्रगत व्हावीत म्हणून योजना राबवल्या ,लोकांच्या जमिनी ताब्यात घेवुन नवी मुंबई सारखी शहर वसवली. बंगलोर ,हैद्राबाद नी उद्योग धंदे वाढतील असे प्रयत्न केले. परिणाम काय. बेशिस्त राहणाऱ्या,जातीयवादी राजकारण च फक्त करणाऱ्या ,कोणत्याच शासकीय योजना पूर्ण म करणाऱ्या राज्यातील लोंढे च लोंढे ह्या राज्यात आले. चांगल्या कामाचे बक्षीस मिळते पण आपल्या देशात चांगले काम करेल त्याला शिक्षा मिळते अशी अवस्था आहे.
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब गुरुवार, 04/21/2022 - 17:29 नवीन
पण हिंदी भाषिक इतर राज्यात -निदान महाराष्ट्रात तरी वर्षानुवर्षे राहून "क्यो सीखनी है हमे मराठी" अशी जी मग्रुरी दाखवतात त्याबद्दल आपण काय म्हणाल ? प्रचंड सहमत. आमच्याकडे मारवाडी भाडेकरू आहेत. ३ वर्षे होतील. अजूनही हिंदी बोलतात. मराठी शिकण्याचा प्रयत्न शून्य. कारण काही अडतच नाही... एकदा मुलाच्या एडमिशन बाबत बोलणं चालू असताना बोलले की हम तो बच्चे के लिये इंग्लिश मिडयम school देख रहे है. मराठी की हमे कोई जरुरत नही है. त्यांनी मुलाला कोणत्याही मिडीयम मध्ये शिकवावे पण शेवटचे वाक्य खटकले. इथे येऊन पैसा कमवा. रिसोरसेस वापरा.. पण इथली भाषा शिकू नका. हाच न्याय इतर राज्यात चालेल का. ??? लोकांनी इथे येऊ नये असे नाही. या रहा .. पण इथल्या भाषेचा आदर ठेवून बोला. शिका. भले वेळ लागेल.. परंतु २-२ पिढ्या जातात पण तरीही ते भाषा शिकण्यास उत्सुक नसतात. उलट आपणच त्यांच्याशी हिंदीत बोलावे अशी अपेक्षा....
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/21/2022 - 17:33 नवीन
अमराठींना भाड्याने जागा देऊ नये.
  • Log in or register to post comments
स
सुरिया गुरुवार, 04/21/2022 - 18:43 नवीन
त्यासाठी घरमालक ही तितकाच तत्वनिष्ठ लागतो. ५०० रुपये दरमहा जास्त मिळाले तर मी मराठी हे तत्त्व मेरा भारत महान ते वसुधैव कुटुंबकम असे उन्नत होते.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure गुरुवार, 04/21/2022 - 19:08 नवीन
आर्थिक फायदा दिसला की सर्व तत्व गळून पडतात. भाषा अभिमान,संस्कृती अभिमान,राज्य प्रेम . सर्व बाजूला ठेवले जाते. आणि हा गुण सर्व भाषिक लोकात आहे मराठी लोकात जरा जास्त आहे. मारवाडी, जैन मंडळी . नॉनव्हेज च्या नावाने बोट मोडत असतात. नॉनव्हेज पदार्थ आणि ते खाणारी लोक ह्यांचा द्वेष करतात. पण कित्येक लोकांची दुकान,धंद्याची जागा . अशा ठिकाणी आहेत तिथे नॉनव्हेज खाणारे आणि विकणारे पण असतात. त्यांना तिथे बिलकुल त्रास होत नाही. कारण आर्थिक लाभ तिथेच होत असतो. पण त्यांच्या सोसायटी मध्ये किंवा त्यांची लोकसंख्या ज्या भागात जास्त आहे तिथे मात्र त्यांचे नियम लागू. Ladies बार जेव्हा मुंबई मध्ये चालू होते तेव्हा त्या मुलींना खोली भाड्याने देण्यात मराठी लोक च पुढे होते. कारण थोडे जास्त भाडे मिळत होते.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure गुरुवार, 04/21/2022 - 17:50 नवीन
मराठी लोकात extraordinary देश प्रेम असते .आणि खूपच हिंदी प्रेम असते. हिंदी बोलणे म्हणजे काहीतरी भूषण आहे असे काही मराठी लोकांना वाटत. त्या मुळे ह्या अमराठी लोकांस मराठी शिकण्याची गरज वाटत नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/21/2022 - 18:45 नवीन
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आंदोलन सुरू असताना नेहरूंनी मुंबई महाराष्ट्रात असण्यास विरोध केला होता व मुंबई स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्याचा निर्णय जाहीर केला होता. तेव्हा नेहरूंना विरोध करण्याऐवजी महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे असे महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री म्हटले होते.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 04/22/2022 - 05:31 नवीन
एखादी भाषा न शिकणे ह्याचा अर्थ दुस्वास होत नाही. एखादी भाषा बहुतांश भारतीयांना येते (हिंदी), आणि दुसरी भाषा बहुतांश भारतीयांना येत नाही (इंग्लिश) अश्यामध्ये केवळ भावनिक कारणांसाठी पहिल्या भाषेला विरोध करणे हे चुकीचेच आहे. माझे बरेच मारवाडी आणि गुजराती मित्र आहेत. ते उत्तम मराठी बोलतात. त्यामुळे anecdotes वर विश्वास ठेवू शकत नाही. किती लोकांना वर्षानुवर्षे महाराष्ट्रात राहून मराठी बोलता येत नाही मला सांगता येणार नाही. अमिताभ बच्चन अतिशय एक टोक आहे. त्याला मराठी बोलायचे दूर, घरातून बाहेर सुद्धा पडावे लागत नाही. त्याला बाजारातून योग्य दरात भाजी आणणे सुद्धा बहुतेक जमणार नाही.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Fri, 04/22/2022 - 07:29 नवीन
माझे बरेच मारवाडी आणि गुजराती मित्र आहेत. ते उत्तम मराठी बोलतात.
माझा मुद्दा गुजराथींबद्दल नव्हताच. गुजराथी, दाक्षिणात्य लोक मराठी शिकतात आणि आवर्जुन बोलायचा प्रयत्नही करतात हे मी पाहिले आहे. मुद्दा म.प्र, उ.प्र, बिहार येथील हिंदी भाषिकांबद्दल होता. ते मराठीचा तिरस्कार करतात हे मी स्वतः अनुभवले आहे. अगदी पुण्यातले अनुभव आहेत हे. एखाद्या ५-६ जणांच्या घोळक्यात एखाद-दुसराच हिंदी भाषिक असेल आणि बाकीचे मराठी भाषिक मराठीतून अनौपचारिक गप्पा मारत असतील तरी हे हिंदी भाषिक लगेच रडका सूर लावणार "अरे आप हिंदी मे बात करो ना" जसं काही मराठी कानावर पडल्याने ह्यांच्या कानाची जळजळ होते.
अमिताभ बच्चन अतिशय एक टोक आहे
पंजाबी राजीव भाटिया (अक्षय कुमार ) हा छान मराठी बोलू शकतो.
पहिल्या भाषेला विरोध करणे हे चुकीचेच आहे.
भाषेला विरोध नाहीये... सक्तीला विरोध आहे. आणि हिंदी भाषिकांच्या मग्रुरीला विरोध आहे. भाषेला विरोध नाहीये तर आपली मराठी भाषेची अस्मिता गमावण्याला विरोध आहे.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 04/22/2022 - 07:46 नवीन
सक्ती म्हणजे नक्की काय म्हणताय ? प्रायमरी लँग्वेज म्हणून हिंदी वापरा अशी सक्ती सोडा,साधा सुझाव सुद्धा अमित शाह यांनी केला नाहीये.
Hindi should be accepted as alternative to English, and not to regional languages
ही शहांची थेट क्वोट आहे. ह्यातले दुसरे वाक्य हि पूर्ण चर्चा थांबवायला खरं तर पुरेसे आहे असे मला वाटते. अक्षय कुमार बोलतो तर छानच आहे. आणि मराठी शिकायची नसल्यास त्यात काही वावगे नाही हे माझे वैयक्तिक मत आहे. पण ही चर्चा त्यावर नाही असे मला वाटते. हि चर्चा सेकंडरी भाषा कोणती वापरावी ह्यावर आहे. बाकी मराठी बोलणाऱ्या लोकांवर दमदाटी होत असल्यास तेही चुकीचेच आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 9 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 9 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 9 hours ago
  • सुंदर !!
    1 day 9 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 9 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा