Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

त्यांनी हिंदीत का बोलावं?

उ
उपयोजक
Mon, 04/11/2022 - 15:22
🗣 510 प्रतिसाद
तीन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एक विनंती केली की वेगवेगळ्या राज्यांमधल्या असमान मातृभाषा असणार्‍या लोकांनी एकमेकांशी संवाद साधताना इंग्रजीऐवजी हिंदी भाषा वापरावी. https://www.google.com/amp/s/indianexpress.com/article/india/people-different-states-should-speak-hindi-not-english-shah-7858861/lite/ या अनावश्यक विनंतीला अहिंदी राज्यांमधे साहजिकच विरोध होतो आहे. विशेषत: दक्षिणेकडच्या राज्यांमधे. आता ज्या लोकांची मातृभाषा हिंदीच आहे त्यांना या विनंतीबद्दल काहीच आक्षेप नसणारेय.उलट त्यांचा आयता फायदाच होईल. आता प्रश्न असे आहेत. १. दोन राज्यांमधील असमान भाषिकांनी कोणत्या भाषेत एकमेकांशी बोलावं अशी विनंती गृहमंत्री का करत आहेत? लोकांनी कोणत्या भाषेत बोललं पाहिजे हे गृहखात्याच्या अखत्यारीत येतं का? २. या विनंतीला दक्षिणेकडच्या राज्यातले लोक सकारात्मक प्रतिसाद देतील असा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा? की ही विनंती हिंदीतून बोलू शकणार्‍या अहिंदी राज्यांतल्या लोकांसाठीच आहे? अशी विनंती केल्यावर ज्यांना हिंदी येत नाही ते लगेच हिंदी शिकून घेतील हा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा? ३. या विनंतीमागे कारण काय असावं? हिंदी पट्ट्यातल्या लोकांची सोय व्हावी? कारण हिंदी पट्ट्यातले लोक "हम तो पापी पेट के लिए आए हैं भाई" हे रडव्या चेहर्‍यानं सांगून अहिंदी भाषिकांना 'आमची सोय बघा' असंच सांगू पाहतात. हिंदीभाषिक अहिंदी राज्यातल्या भाषा शिकायला राजी नसतात. पण अहिंदी भाषिकांनी मात्र हिंदी शिकावी ही अपेक्षा बाळगतात. हे हिंदी पट्ट्यातले लोक हिंदीतर भाषा शिकणार कधी? ४. समजा दक्षिणभारतीय राज्यांनी किंवा ईशान्येकडच्या राज्यांनी एकत्र येऊन त्यांची एकच सामायिक बोलीभाषा निर्माण करुन हिंदीला कडवे आव्हान निर्माण केले तर? मग काय करतील अमित शहा? ५. इंग्रजीला अमित शाह यांचा विरोध का? इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. कमालीची ताकदवान भाषा आहे.आंतरराष्ट्रीय भाषा आहे. उपयोगाची भाषा आहे. असं असताना ती न वापरता हिंदी का वापरायची?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 105991 views

🗣 चर्चा (510)
त
तर्कवादी Fri, 04/22/2022 - 15:13 नवीन
सक्ती म्हणजे नक्की काय म्हणताय ? प्रायमरी लँग्वेज म्हणून हिंदी वापरा अशी सक्ती सोडा,साधा सुझाव सुद्धा अमित शाह यांनी केला नाहीये
ओके.. अप्रत्यक्ष सक्ती (म्हणजे सध्या आवाहनाच्या .. माफ करा सुझावच्या रुपात असली तरी) कशी होवू शकते वा स्थानिक भाषेचे खच्चीकरण कसे होवू शकते ते विस्ताराने सांगतो. समजा अ नावाचा बंगाली व्यक्ती आहे - तो बंगाली प्रथम भाषा असल्याने बंगाली शिकलेला आहेच तसेच डेस्क जॉब करणारा सुशिक्षित असल्याने पोटापाण्याकरिता म्हणून इंग्लिशही शिकला आहे. आता तो तामिळनाडूतल्या अशा शहरात स्थलांतरीत होतो जेथे अनेक विविधभाषी लोक नाहीत (तसे चेन्नईतही तामिळ शिवाय कठीणच- पण असे शहर घेवू ज्यात इतर भाषिक हे चेन्नईपेक्षाही कमी असतील - मदूराई कदाचित ठीक राहील ?) तर तिथे तो ब तामिळ या व्यक्तीला भेटतो - ब ला तामिळ प्रथम भाषा असल्यामुळे येतेच पण तो ही सुशिक्षित असल्याने इंग्लिशदेखील येते. इंग्लिशमध्ये संवाद साधत अ व ब ची मैत्री होते. पण शहरात बाकी अनेकांना इंग्लिश फारशी येत नसल्याने (रिक्षावाले, विविध विक्रेते, इस्टेट एजंट ई ) अ ची अडचण होतेच आहे. मग तो ब ची मदत घेत या अडचणीतून मार्ग काढतो पण त्याचबरोबर आपल्याला इथे दीर्घकाळ वास्तव्य करायचे असल्याने थोडीफारतरी तामिळ शिकल्याशिवाय गत्यंतर नाही हे त्याला समजते आणि तो हळूहळू ( ब च्या मदतीने किंवा इतर मार्ग वापरुन) तामिळ शिकू लागतो. पुढे तो स्वतःच्या मुलाला इंग्लिश शाळेत घालतो (आजकालच्या आसपास दिसणार्‍या प्रथेप्रमाणे तामीळनाडूतही तामिळ भाषेतून शिक्षण कमी झाले असावे असे मानून मी हे लिहिले आहे... )तिथे इंग्लिश सोबत द्वितीय भाषा तांमिळ असते पण यास अ ची हरकत नाही.. कारण त्या शहतात दीर्घकाळ वास्तव्यास रहायचे तर तामिळ यायलाच हवे हे तो जाणून आहे. म्हणूनच आपल्या शाळेत तामिळ शिकावे लागू नये म्हणून तो धडपडत नाही, शाळेवर प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष दबाव आणत नाही की आयसीएसई किंवा दुसर्‍या इंटरनॅशनल शाळांच्या मागे लागत नाही.. थोडक्यात तो हळूहळू तामिळ भाषेला आपलंसं करतो. पण यात तो कुठेही हिंदी शिकत नाही. किंवा त्याच्या सोयीकरिता अनेक स्थानिकांना (ब सारख्यां सुशिक्षितांचा अपवाद वगळता) इंग्लिश शिकावे लागत नाही.. की हिंदीही शिकावे लागत नाही .. ते अनेक स्थानिक वर्षानुवर्षे स्वतःच्या भाषेतूनच बोलतात.. ज्यांना सर्व जगाचे ज्ञान मिळवायचे नाहीये त्यांना इंग्लिशची सक्ती कुणी करत नाहीच. स्मार्टफोनची भाषाही स्थानिक लावता येते पण सगळेच अ‍ॅप स्थानिक भाषेत नसल्याने वा स्थानिक मोबाईल वापरण्यापुरते किरकोळ प्रमाणात थोडेसे इंग्लिश शिकावे लागते तितकेच हेच जर अमित शहांचे आवाहन अगदी गांभीर्याने मानायचे तर अ आणि ब ला ही स्वतःची प्रथम भाषा व इंग्लिश या बरोबरच हिंदीही शिकावी लागेल. मदुराई शहरातल्या अनेक व्यापार्यांना, सेवा देणार्‍या व्यक्तींना कधीतरी कुणी अ येणार ज्याला तामिळ येत नाही त्याच्याशी व्यवहार करण्याकरिता म्हणून हिंदी शिकावे लागेल. याउलट तो अ "मला हिंदी येतंय आणि इथे हिंदी मध्ये काम होतंय तर कशाला शिकू तामिळ" असा विचार करत तामिळ भाषा शिकण्यात रस घेणार नाही. पुढे त्याच्या मुलांना शाळेत घालताना तो इंग्लिश शाळेत घालेल आणि दुसरी भाषा म्हणूनही तामिळ असेल तरी ती टा़ळता येईल का हे बघण्याकडेच त्याचा कल असेल किंवा टाळता आली नाही तरी जेमतेम उत्तीर्ण होण्याकदे कल असेल . हळूहळू असे परभाषिक स्थलांतरित तेथे वाढू लागतील आणि त्यांच्या सोयीकरिता म्हणून अमित शहांच्या सुचनेप्रमाणे स्थानिक लोक हिंदी शिकत राहतील तर मात्र बहुतांशी स्थलांतरित मात्र तामिळ शिकणार नाहीतच. हळूहळू असे होईल की १००० लोकसंख्येपैकी समजा ७०० लोक मूळ स्थानिक असतील तर त्यातले काही विरोधक सोडलेत तरी ६५० लोक आता हिंदी शिकलेले असतील तर उरलेल्या ३०० बिगर तांमिळ स्थलांतरितांपैकी जेमतेम ५० जणांना मोडकं तोडकं तामिळ येत असेल तर २५० लोकांना अजिबात येणार नाही. तर आता ९५० लोकांना हिंदी येत असेल तर तामिळ ७५० लोकांना येत असेल .. तसेच सगळे व्यहवार हिंदी भाषेतून होवू शकत असतील तर मग हिंदी संख्यात्मक प्राबल्यही वाढेल आणि व्यावहारिक महत्वही. हळूहळू हिंदी ही व्यवहाराची मुख्य भाषा होईल व ज्या भाषेशी अर्थकारण जोडलंय त्या भाषेचं महत्व वाढून स्थानिक भाषेचं महत्व कमी होईल. शाळेत, स्थानिक व्यवहारात, सोसायटीच्या मिटींगमध्ये हे हिंदी भाषिक तामिळ पेक्षा हिंदीतच संभाषण व्हायला हवं म्हणून जोर देत राहतील... बाकी यासगळ्यामुळे अर्थकारण कसं बदलत जाईल तो वेगळा विषय.. पण आता भाषेपुरतंच लिहितोय... मुळात आपल्या भागात परराज्यातून १० लोक येणार आणि त्यांना स्थानिक भाषा येत नाही म्हणून १०० लोकांनी एक भाषा का शिकावी ? त्याऐवजी त्या १० लोकांनी स्थानिक भाषा शिकावी हे सयुक्तिक नाही का ?.. [पर्यटन क्षेत्र व पर्यटक म्हणून येणार्‍या लोकांना वगळून इतर स्थलांतरितांबद्दल मी बोलत आहे] दुसरी भाषा हिंदी की इंग्लिश असा वाद असताना .. अनेकांना दुसर्‍या भाषेची गरजच नाही.. इंग्लिशची सुद्धा नाही. आणि इंग्लिशची जी गरज आहे ती सुद्धा जगातले विविध ज्ञान मिळवण्याकरिता.. आपल्या भागात येणार्‍या परभाषिक लोकांशी संवाद साधता यावा म्हणून कुणीच इंग्लिश शिकत नाही (पुन्हा पर्यटन क्षेत्रात सेवा देणारे वगळून) तर इंग्लिशमुळे परभाषिकांशी सहज संवाद होण्याची एक शक्यता निर्माण होणे हा एक सहपरिणाम आहे उद्देश नाही..काही प्रतिसादाकांनी म्हंटले आहेच की दाक्षिणात्य लोकांचे इंग्लिश फार काही चांगले नसते , ते अनेक चुका करतात. खरेच आहे ते .. ते स्वतःची भाषा सोडून दुसर्‍ञा भाषेला विनाकारण जास्त महत्व देत नाहीतच. कोणताही स्थलांतरित असाच उठून स्थलांतर करत नाही.. कुणीतरी त्याला तिथे येण्याकरिता निमंत्रण देते तेव्हाच तो तिथे येतो ना ?मग दुसरी भाषा न येणार्‍या त्या प्रदेशात त्या स्थलांतरिताची सोय कशी करावी , मग त्याला काही काळ तरी गरजेप्रमाणे मदत पुरवावी ही पण त्या निमंत्रकाची जबाबदारी आहे.. उदा: एखाद्या कंपनीने परभाषिकाला नोकरी दिली असल्यास त्याला स्थिरस्थावर होण्यासही मदत करावी, स्थानिक भाषेचे जुजबी ज्ञान त्याला द्यावे, त्याला मदत करण्याकरिता इतर स्थानिक व दुसरी भाषा जाणणार्‍या इतर कर्मचार्‍यांना प्रोत्याहित करावे. जाता जाता: भारतातील एखाद्या राज्यातील बहुतांशी लोकांना इंग्लिश बोलता येतंय आणि तिथे इंग्लिश बोलून व्यवसाय करणं सोपं आहे म्हणून इंग्लंड, अमेरिका किंवा ऑस्ट्रेलियातून भरभरुन लोक त्या राज्यात स्थलांतरित होणार नाहीत.. !! [सकाळपासून थोडा थोडा करत हा प्रतिसाद टंकला आहे, त्यामुळे आलेल्या विस्कळितपणाबद्दल क्षमस्व]
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sat, 04/23/2022 - 09:43 नवीन
मार्मिक! व्यवस्थित मांडलंय गणित!
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Sat, 04/23/2022 - 15:24 नवीन
मार्मिक! व्यवस्थित मांडलंय गणित!
धन्यवाद उपयोजक.. एकूणात मुद्दा हाच आहे की वरवर जरी अमित शहांच्या आवाहनातली मांडणी ही इंग्लिश विरुद्ध हिंदी अशी दिसत असली आणि त्यामुळे सकृतदर्शनी ती जरी स्थानिक भाषेकरिता अपायकारक वाटत नसली तरी अंतिमतः ती स्थानिक भाषा विरुद्ध हिंदी अशीच जाणारी आहे.
  • Log in or register to post comments
स
सुरिया Fri, 04/22/2022 - 08:06 नवीन
एखादी भाषा न शिकणे ह्याचा अर्थ दुस्वास होत नाही. एखादी भाषा बहुतांश भारतीयांना येते (हिंदी), आणि दुसरी भाषा बहुतांश भारतीयांना येत नाही (इंग्लिश) अश्यामध्ये केवळ भावनिक कारणांसाठी पहिल्या भाषेला विरोध करणे हे चुकीचेच आहे.
पूर्वार्ध एकदम खरा आहे, उत्तरार्ध पटतो आहे. मारवाडी गुजराती उत्तम मराठी बोलतात हेही खरे आहे पण एक उदाहरण माझ्या शेजारीच आहे. नवरा गुजरातेतुन शिकलेला पण गेली ५ वर्षे जॉबसाठी पुण्यात आहे, बायको जन्मापासून महाराष्ट्रातील गुजराती आहे. नवरा अगदी सुंंदर मराठी बोलतो, सोसायटीत वगैरे आवर्जून मराठी बोलतो त्याउलट त्याची पत्नी कधीही मराठी बोलत नाही किंबहुन ती सदैव मराठी लोक, मराठी परंपरा, येथिल ट्राफिक वर खडे फोडत असते. तेही हिंदीतून. मला वाटते की एक सिंपल नियम करावा. सर्वच राज्यांसाठी. १ महिन्यापेक्षा जास्त वास्तव्य करायचे असेल, ड्रायव्हिंग लायसन्स इथले हवे असेल, इथली सॅलरी स्लीप हवी असेल, राशन कार्ड, आधार कार्ड, प्रॉपर्टी पेपर्स, व्हिकल आणि अप्लायन्सेस पर्चेस येथे करायचे असेल तर एक कोर्स, परिक्षा आणि सर्तिफिकेट अनिवार्य करावे. हे धोरण सर्वच राज्यांनी कठोरपणे राबवावे. त्यातून रोजगार निर्मीतीही होइल. जर्मनी, फ्रान्स ल जायला ती भास्।आ शिकायला पैसे मोजता तर ज्या राज्यात आपण पैसा कमवायला जातोय तिथली भाषा शिकायला आणि त्यासाठी पैसे खर्चायला हरकत नसावी.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 04/22/2022 - 10:24 नवीन
Switzerland चे नागरिकत्व हवे असेल तर जर्मन किंवा फ्रेंच येणे सक्तीचे आहे. नुसती भाषा येणे पुरेसे नाही तर घरात बोलताना सुद्धा ही भाषा वापरावी लागते. माझ्या एका ओळखीच्या कुटुंबाने नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. मुलांसकट सर्व जण जर्मन शिकले होते. जेव्हा काही अधिकारी घरी चौकशीसाठी आले तेव्हा मुले मराठीत एकमेकांशी बोलताना आढळले. त्यामुळे तुम्ही घरात वेगळ्या भाषेत बोलता हे कारण देऊन त्यांचा अर्ज काही काळासाठी स्थगित ठेवला गेला.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Fri, 04/22/2022 - 10:29 नवीन
तुम्ही घरात वेगळ्या भाषेत बोलता हे कारण देऊन त्यांचा अर्ज काही काळासाठी स्थगित ठेवला गेला.
फारच भयानक. घरात कोणती भाषा बोलायचे याचे पण नियम ? अवघड आहे. उद्या कदाचित घरात भारतीय पदार्थ बनविले म्हणून नागरिकत्व रद्द व्हायचे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 04/22/2022 - 10:46 नवीन
नागरिकत्व मिळविण्यासाठी तुम्ही स्वत:चे वेगळेपण न ठेवता देशाशी समरस होणे सक्तीचे आहे.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Fri, 04/22/2022 - 11:20 नवीन
विषयी मी पण ऐकले आहे जे तिथे जावून आले आहेत त्यांच्या तोंडून तुम्ही गरीब असा किंवा खूप श्रीमंत तिथे तुम्हाला त्यांचे नियम पाळावेच लागणार. तुम्ही खूप श्रीमंत आहात म्हणून तुम्हाला कोणतीच वेगळी नियम भंग करून सुविधा दिली जाणार नाही. पर्यावरण विषयी तो देश खूप जागरूक आहे.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Fri, 04/22/2022 - 04:34 नवीन
खूप कमी भारतीयांना येणारी भाषा
मग संस्कृत ही राष्ट्रभाषा करावी. तिच्या इतकी राष्ट्रीय व्याप्ती अन्य कोणत्याच भारतीय भाषेची नाही.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 04/22/2022 - 05:09 नवीन
कसं काय ? कसली व्याप्ती आलीये संस्कृतला ? Unless, कोणालाच बोलता येत नाही अश्या व्याप्ती बद्दल बोलत असाल तर योग्य आहे.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Fri, 04/22/2022 - 08:08 नवीन
द्रविड कुळातली सर्वात शुद्ध भाषा तमिळ. आजच्या तमिळ भाषेतही काही संस्कृतोद्भव शब्द आहेत. इतकंच काय पण संस्कृतोद्भव शब्द वाचता यावेत म्हणून तमिळमधे फार पूर्वीपासून मूळ तमिळमधे नसलेल्या अक्षरांचा एक संच ज्याला तमिळमधे ग्रंथाक्षरे म्हणतात तो वापरला जातो आहे. आटोकाट प्रयत्न करुनही तमिळभाषिकांना हे संस्कृतोद्भव शब्द तमिळमधून हुसकून लावणे १००% शक्य झालेले नाही. आणि हे जर तमिळबद्दल असेल तर बाकीच्या भारतीय भाषांमधे संस्कृत शब्दांचे प्रमाण किती असेल तर त्याचं गणित करा. संस्कृत ही काहिशी क्लिष्ट आहे हे मी नाकारत नाही.पण संस्कृतला व्याप्ती नाही हे तुमची माहिती तद्दन चुकीची आहे. संस्कृत भाषेत जर अजून सोपेपणा आणला तर तिच्यासारखी देश जोडू शकणारी भाषा दुसरी नाही. पण हे प्रत्यक्षात येणे कठीण आहे. पण म्हणून अरबी,फार्सीने भरलेली उर्दुछाप हिंदी ही देशाची भाषा राष्ट्रभाषा होऊ नये.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 04/22/2022 - 08:32 नवीन
अहो पण कुणालाच बोलता येत नाही की ! मग कसली व्याप्ती असते ? एखाद्या भाषेत संस्कृतचे बरेच शब्द असले म्हणजे संस्कृत या भाषेला व्याप्ती येते काय ? त्या भाषेचे व्याकरण, वापरात नसलेले शब्द- हे लोकांना येत नाही. भाषा म्हणजे फक्त शब्द नसते ना, त्यात व्याकरण आले की. तुम्ही वेगळ्या अर्थाने व्याप्ती शब्द वापरत आहात, त्यामुळे तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात. राष्ट्रभाषा म्हणजे काय हे माहित नसल्याने हिंदीला राष्ट्रभाषा करा असा माझा आग्रह सोडा, इच्छा सुद्धा नाही. सेकंडरी भाषा हिंदी वापरा असे शहा म्हणतात. सेकंडरी भाषा कशासाठी हवीय हेच तुम्ही लक्षात घेत नाही आहात. स्थानिक भाषा ज्यांना येत नाही, त्यांची सोय म्हणून दुसरी एक भाषा कोणती असावी ? तर जी जास्तीत जास्त लोकांना येते ती असावी. संस्कृत तरी कुठे येती त्यांना ! त्यामुळे ज्यांना मराठी येत नाही त्यांना संस्कृत मध्ये कागदपत्रे द्या हे मूर्खपणाचे नाहीये काय ?
पण म्हणून अरबी,फार्सीने भरलेली उर्दुछाप हिंदी ही देशाची भाषा राष्ट्रभाषा होऊ नये.
राष्ट्रभाषा करा असा आजिबात आग्रह नाही. सेकंडरी लँग्वेज म्हणून वापरा. उर्दू अरबीने भरलेली भाषा चालत नाही, पण इंग्लिशने भरलेली इंग्लिशछाप भाषा जी फक्त १० मधल्या १ भारतीयाला येते ती मात्र चालते हे कसे ?
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sun, 04/17/2022 - 06:08 नवीन
तेलुगू
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Sun, 04/17/2022 - 06:30 नवीन
दुसरी भाषा इंग्रजीच हवी आणि हिंदी नको असा धागाकर्ते आणि इतर काही प्रतिसादकांचा आग्रह आहे. धागा काथ्याकूट सदरात असला तरीही चर्चेकरिता काढलेला दिसत नाहीये तर निष्कर्ष आधीच ठरवलेला दिसतोय. तर्कवादी, उपायोजक व अमरेंद्र बाहूबली यांची मते बदलणार नाहीत हे ठाऊक असूनही इतरांकरिता - पोटापाण्याकरिता वेगवेगळ्या राज्यांत येणार्‍या मजूर वर्गातील किती लोकांना इंग्रजी येते. स्थानिक व हिंदी भाषेत जसे मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण मिळते तसे इंग्रजी भाषेत मिळते का? शाळेत न जाता / न गेलेल्यांनाही हिंदी येऊ शकते तशी इंग्रजी येते का? पंक्चर काढणारे केरळी अण्णा महाराष्ट्रात स्थानिक नागरिकांशी मराठी किंवा इंग्रजीत बोलतात की हिंदीत? आपण त्यांना फक्त मराठी किंवा इंग्रजी चा पर्याय दिला आणि यापैकी कुठल्याही भाषेत संवाद साधता आला नाही तर तुमच्याकडे पंक्चर काढणार नाही असा पवित्रा घेतला तर काय होईल? म्हणजे गरीब / ज्यांना इंग्रजी ज्ञान नाही असे मजूर वर्गातले दक्षिण भारतीय लोक देखील स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता हिंदीचा आधार घेतातच. एलिट क्लासचे दक्षिण भारतीय लोक देखील हिंदीच्या आधारावर पैसा कमावतातच. वर मी लिहिलेल्या https://www.misalpav.com/comment/1138188#comment-1138188 या प्रतिसादातील
प्रत्येकाला इंग्रजी शिकणे अवघड आहे त्यापेक्षा हिंदी सोपी आहे. आणि इतकंच आहे तर दक्षिणी भाषेतील चित्रपट मूळ भाषेसोबत फक्त इंग्रजीतच डब करावेत पण नाही ते तर हिंदी प्रमाणेच आता तर थेट भोजपूरीत देखील डब होतात. कारण काय तर ह्या उत्तर भारतीयांच्या खिशातून पैसे हवे आहेत तर मग त्यांच्यापर्यंत पोचायला त्यांच्या भाषेत संवाद साधायला मग या दाक्षिणात्यांचा भाषाभिमान आड येत नाही का? बाहूबली तुमचा सिनेमा जर फक्त स्थानिक + इंग्रजी भाषेत आणला असता तर इतका प्रचंड व्यवसाय करु शकला असता का? हिंदीत असल्यामुळेच उत्तर भारतातही तो पाहिला गेला. त्यांना जर दाक्षिणात्यांचा द्वेष असता तर त्यांनी सरसकट सर्वच दक्षिण भारतीय चित्रपटांवर ते हिंदीत डब असले तरीही बहिष्कार टाकला असता.
या विधानांचा अजूनतरी कोणी प्रतिवाद केलेला नाहीये. यापूर्वी एका प्रतिसादात ए आर रहमान यांचा उल्लेख आला आहे. त्यांनी देखील डब्ड तसेच स्वतंत्र हिंदी चित्रपटांना संगीत दिल्यानेच अधिक यश कमावले. ज्या गीताकरिता ते आंतराष्ट्रीय पुरस्कारापर्यंत पोचले ते गीत देखील हिंदी भाषेत आहे. The soundtrack won the Golden Globe Award for Best Original Score, BAFTA Award for Best Film Music, and two Academy Awards, one for Best Original Music Score and the other for Best Original Song for "Jai Ho". The soundtrack has also won two Grammy Awards, one for the album itself and another for the song "Jai Ho". The latter song would be reworked by Ron Fair and The Pussycat Dolls into an English language adaptation "Jai Ho! (You Are My Destiny)" which would go on to become and international hit for the group. https://en.wikipedia.org/wiki/Slumdog_Millionaire:_Music_from_the_Motion_Picture दक्षिण भारतीयांच्या हिंदी विरोधात प्रामाणिकपणा दिसत नाहीये. आर्थिक फायदा दिसेल तेथे हिंदी विरोध बाजूला इतकेच काय हिंदीच नव्हे तर भोजपुरीला देखील आपलेसे करायचे तयारी दिसतेय. महाराष्ट्र हिंदी विरोधात कधीच नव्हता. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर मात्र राज्य सरकार पुरस्कृत हिंदी विरोध महाराष्ट्रात दिसून येत आहे. दक्षिण भारतीयांच्या नादाला लागून महाराष्ट्राने असा विरोध करु नये. दक्षिण भारतीय महाराष्ट्र आणि मुंबईत राहूनही त्यांच्या भाषेचे दडपण आणून सिनेमाचालकांना इथे त्यांच्या स्थानिक भाषेतील चित्रपट प्रदर्शित करायला लावतात. चैन्नई / कोचीमध्ये मराठी चित्रपट सिनेमाघरांत प्रदर्शित होतात का? इतकेच काय पण डीडी डायरेक्ट प्लस ने सर्व भाषांतील काही मोफत वाहिन्यांचे देशभर प्रसारण केले आहे. जेणेकरुन आपण देशाच्या कोणत्याही भागात असलो तरी आपल्या स्थानिक भाषेचे कार्यक्रम तिथे बसून पाहू शकतो. असे असताना चैन्नईतल्या प्रत्येक लॉजमध्ये असलेल्या टीवीवर मराठी कार्यक्रम दिसतील अशी सोय असते का?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 04/17/2022 - 07:47 नवीन
पंक्चर काढणारे केरळी अण्णा महाराष्ट्रात स्थानिक नागरिकांशी मराठी किंवा इंग्रजीत बोलतात की हिंदीत? मी त्यांच्याशी किंवा अशा सर्वांशी मराठीतच बोलतो व ते त्यांना समजतं. मी कोणाशीही हिंदीत बोलत नाही. महाराष्ट्रात सर्वांशी मराठीत व महाराष्ट्राबाहेर इंग्लिशमध्ये बोलतो.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sun, 04/17/2022 - 10:58 नवीन
पोटापाण्याकरिता वेगवेगळ्या राज्यांत येणार्‍या मजूर वर्गातील किती लोकांना इंग्रजी येते. स्थानिक व हिंदी भाषेत जसे मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण मिळते तसे इंग्रजी भाषेत मिळते का? शाळेत न जाता / न गेलेल्यांनाही हिंदी येऊ शकते तशी इंग्रजी येते का? पंक्चर काढणारे केरळी अण्णा महाराष्ट्रात स्थानिक नागरिकांशी मराठी किंवा इंग्रजीत बोलतात की हिंदीत? आपण त्यांना फक्त मराठी किंवा इंग्रजी चा पर्याय दिला आणि यापैकी कुठल्याही भाषेत संवाद साधता आला नाही तर तुमच्याकडे पंक्चर काढणार नाही असा पवित्रा घेतला तर काय होईल? हेच कटिटर हिंदीभाषाभिमानी तमीळणआडूत जाऊन पोटापाण्यासाठी तमीळ शिकतात कारण त्याना माहीत असते तमीळ शिकलं नाही तर पोट भरनार नाही. पण तेच महाराष्ट्रात “हिंदी मे बोलो“ म्हणून मराठी माणसावर दादागीरी करतात. कारण?? तुमच्या सारखे लोक त्यांच्या सोयीसाठी मायमराठी चा खून करून हिंदीत बोलतात. अर्थआत तुम्हा वर सांगीतल्याप्रमाणे तुम्ही मुळचे मराठी नाहीत त्यामुळे तुम्हाला मराठी भाषेबद्दल तितकी आत्मियता नाही.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sun, 04/17/2022 - 10:58 नवीन
पोटापाण्याकरिता वेगवेगळ्या राज्यांत येणार्‍या मजूर वर्गातील किती लोकांना इंग्रजी येते. स्थानिक व हिंदी भाषेत जसे मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण मिळते तसे इंग्रजी भाषेत मिळते का? शाळेत न जाता / न गेलेल्यांनाही हिंदी येऊ शकते तशी इंग्रजी येते का? पंक्चर काढणारे केरळी अण्णा महाराष्ट्रात स्थानिक नागरिकांशी मराठी किंवा इंग्रजीत बोलतात की हिंदीत? आपण त्यांना फक्त मराठी किंवा इंग्रजी चा पर्याय दिला आणि यापैकी कुठल्याही भाषेत संवाद साधता आला नाही तर तुमच्याकडे पंक्चर काढणार नाही असा पवित्रा घेतला तर काय होईल? हेच कटिटर हिंदीभाषाभिमानी तमीळणआडूत जाऊन पोटापाण्यासाठी तमीळ शिकतात कारण त्याना माहीत असते तमीळ शिकलं नाही तर पोट भरनार नाही. पण तेच महाराष्ट्रात “हिंदी मे बोलो“ म्हणून मराठी माणसावर दादागीरी करतात. कारण?? तुमच्या सारखे लोक त्यांच्या सोयीसाठी मायमराठी चा खून करून हिंदीत बोलतात. अर्थआत तुम्हा वर सांगीतल्याप्रमाणे तुम्ही मुळचे मराठी नाहीत त्यामुळे तुम्हाला मराठी भाषेबद्दल तितकी आत्मियता नाही.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sun, 04/17/2022 - 11:13 नवीन
तुमच्या सारखे लोक त्यांच्या सोयीसाठी मायमराठी चा खून करून हिंदीत बोलतात. अर्थआत तुम्हा वर सांगीतल्याप्रमाणे तुम्ही मुळचे मराठी नाहीत त्यामुळे तुम्हाला मराठी भाषेबद्दल तितकी आत्मियता नाही.
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Sun, 04/17/2022 - 11:55 नवीन
हा फारच वैयक्तिक आणि तद्दन चूकीचा प्रतिसाद आहे. माझा जन्म महाराष्ट्रातला आणि आमचे पूर्वज चारशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रात आले. आम्ही फक्त घरी मारवाडी बोलतो. ती लिहिता देखील येत नाही. दहावीपर्यंत मराठी माध्यमात सर्व विषयांचे शिक्षण घेतल्याने लिहायला वाचायला व बोलायला आणि एकूणातच व्यक्त व्हायला मला सर्वात सोपी मराठीच वाटते. इथे मिसळपाव वरच मी कितीतरी मराठी भाषेत लेख लिहिले आहेत. हिंदीत तर एक सुद्धा नाहीये. पण जर मराठी कुठे चालत नसेल तर मग तोंडी संभाषणास दुसरा पर्याय हिंदी आणि तिसरा पर्याय नाईलाजास्तव इंग्रजी असा प्राधान्यक्रम आहे. भाषिय त्रिसूत्री.
मुळचे मराठी नाहीत त्यामुळे तुम्हाला मराठी भाषेबद्दल तितकी आत्मियता नाही.
या आरोपाबद्दल बोलायचे तर मी इंग्रजी ऐवजी हिंदी ही बाजू लावून धरलीय मराठी ऐवजी हिंदी अशी नाही. तरी ही असा आरोप होत असेल तर मात्र जे हिंदी ऐवजी इंग्रजी अशी बाजू लावून धरत आहेत त्यांच्यावर
तुम्ही मूळचे भारतीय असूच शकत नाही अजुनही इंग्रजी गुलामगिरीच्या मानसिकतेत अडकले असल्याने तुम्हाला इंग्रजी या परक्या भाषेबद्दल जितकी आत्मियता वाटते तितकी हिंदी या भारतीय भाषेबद्दल नाही.
असा आरोप करावा काय? पण असा आरोप मी करणार नाही कदाचित माझ्या पालकांना परवडले असते आणि त्यांनी मला इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले असते तर माझी मराठी भाषा तितकीशी परिणामकारक नसतानाही इंग्रजी मात्र प्रभावी झाली असती आणि इथे इंग्रजी विरुद्ध हिंदी वादात मी इंग्रजी बाजू लावून धरली असती व मग मूळतः व्यवहारात मराठीला मी प्राधान्य न देता सरसकट इंग्रजीचा वापर केला असता तरीही माझ्यावर असला गचाळ आरोप आला नसता.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sun, 04/17/2022 - 13:12 नवीन
आमचे पूर्वज चारशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रात आले. आम्ही फक्त घरी मारवाडी बोलतो. चारशे वर्ष झाले महाराष्ट्रात येऊन तरी देखील तुम्ही घरात मारवाडीच बोलतात. म्हणजे ४०० वर्षांपासून तुम्ही तुमची मुळ भाषआ जपून ठेवलीय. घरात मराठी बोलावीशी वाटत नाही कारण ती तुमची मातृभाषा नाही. त्यामुळेच मा बोललो का तुम्हाला मराठी विषयी आत्मियता नाही. जशी तुम्हाला मारवाडी प्रिय तशी आम्हाला मराठी.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sun, 04/17/2022 - 13:24 नवीन
अतिशय चुकीचा प्रतिसाद ! चेतन गुगळे हे इथे व्यवस्थित व मुद्देसुद प्रतिसाद देत आहेत. त्यांचा मुद्दा चुकीचा की बरोबर तो वेगळा भाग होऊ शकतो. त्यांच्या मराठीप्रेमाबद्द्ल शंका घेण्याचे कारण दिसत नाही. घरात मारवाडी बोलतात त्यात टीका करण्यासारखे काही नाही. प्रत्येकाने आपली मातृभाषा जपलीच पाहिजे. मारवाडी समाज महाराष्ट्रातील अनेक छोट्या छोट्या गावांत फार पुर्वीपासून वास्तव्यास आहे आणि त्यांनी तेथील बोलीभाषा आणि रितीरिवाज आत्मसात केलेले मी स्वतः पाहिलेले आहे. जर ते घरात आपली मातृभाषा जपतात तर तो त्यांचा हक्क आहे. आपले असे तोडून टाकणारे आणि हेटाळणीचे प्रतिसादच तर इतर भाषिकांच्या मनात मराठी माणूस आणि मराठी भाषेविषयी अढी / तिरस्कार उत्पन्न करत नाहित ना याचा विचार करणे गरजेचे आहे. कृपया वैयक्तीक टीका टाळावी ही विनंती.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sun, 04/17/2022 - 13:55 नवीन
पुण्यात मी पाहतोय. पिढ्यानप्ढ्या राहनारे किराणा दुकान चालवनारे मारवाडी लोक दुकानात कामगारांशी मारवाडीतच बोलतात, गिर्हाईक मराठीत बोलत असेल तरी जाणून बूजून हिंदीतच बोलतात. तेयांना महाराष्ट्र नी मराठी ह्याशा काही घेणंदेणं नसतं. ते फक्त “पैसा कमावणासाठी” आलेले असतात. चेसुगू सरांनी वर सांगीतलंच आहे की ते घरात मराठी बोलत नाहीत मारवाडी बोलतात महाराष्ट्रात येऊन ४०० वर्ष झाले तरी. तब्बल चारशे वर्ष जाऊनही त्यांची मातृभाषआ मारवाडीच राहत असेल तर ह्याला काय म्हणावे? मध्यप्रदेशात मा अनेक मराठी आडनावाची लोक पाहीलात ज्याना मराठीचा गंधही नव्हता कारण त्यांची मातृभाषाकधीच बदलली. चेसूगु सरांचा हेका हाच आहे की हिंदी ला राष्ट्रभाषा करावी. काही दिवसानी ते म्हणताल की मराठी तसंही कुणी बोलत नाही आता महाराष्ट्राची भाषआ हिंदी करा.
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Sun, 04/17/2022 - 14:18 नवीन
फारच हीन पातळीवरचा व्यक्तिगत प्रतिसाद. आमचे आडनाव देखील बदलले. गुगलिया हे आडनाव जाऊन इथे जसे सांगळे, जगदाळे असे एकारांत आडनाव आहे त्याप्रमाणे ते गुगळे झाले. पण तरीही घरातील भाषा कशी बदलेल? कित्येक मराठी कुटुंबीय इदौर ला आहेत आणि ते पिढ्यान पिढ्या मराठीच बोलतात हे ठाऊक आहे का तुम्हाला? मराठी विरोधात हिंदी मी कधीच आणलेली नाही पण तुम्ही हिंदी विरोधात इंग्रजी थोपताय म्हणजे अम्रेंद्र बाहुबली हे असे नाव घेण्यावरुनच (मराठी पात्राचे घेणे नाव का सूचले नाही तुम्हाला?) तुम्ही स्वतःच इंग्रजधार्जिणे गुलाम मनोवृत्तीचे दक्षिण भारतीय भाषिक असण्याची मला खात्री पटत चालली आहे.
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Sun, 04/17/2022 - 14:19 नवीन
संतुलित प्रतिसाद आणि वैयक्तिक पाठिंबा दिल्याबद्दल आभार.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sun, 04/17/2022 - 15:20 नवीन
सहमत. व्यक्तिगत घसरणे चुकीचे.
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Sun, 04/17/2022 - 15:52 नवीन
हे आभार मुद्दाम इथे नमूद करतो आहे कारण बरेचदा लोक दोन जणांचा वाद पाहतात पण तरीही बरोबर असणार्‍याची बाजू घेत नाहीत कारण एक तर मला काय त्याचे ही वृत्ती किंवा मग त्या दुसर्‍या आक्रमक व्यक्तिची भीती.
  • Log in or register to post comments
T
Trump Sun, 04/17/2022 - 14:39 नवीन
श्री गुगळे ह्यांच्यावर अशी टिका करण्याचे कोणतीहे कारण नव्हते. श्री गुगळे यांनी बरीच तात्वीक भांडणे केल्याचे मला माहिती आहे, त्यामुळे त्यांच्या मुळ उद्देशावर शंका नक्कीच नाही. आज तर त्यांनी मारवाडी इतिहास सांगितला नसता तर त्यांचे मुळ कोणालाच कळले नसते. ------------ श्री बाहुबली, कदाचित तुम्हाला श्री गुगळे यांचे कडे दोन भाषीक पर्याय (मराठी आणि मारवाडी) उपलब्ध आहेत आणि तुमच्याकडे फक्त एकच मराठी भाषेचा पर्याय आहे. आणि राजस्थानी व गुजराती अगदी स्वतःच्या भाषेपेक्षा हिंदीला प्राधान्य देताना दिसतात. श्री अमित शहा गुजरातचे रहिवासी आहेत. ह्या सर्व गोष्टीमुळे मुळे अशी शंका आली असावी.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Sun, 04/17/2022 - 14:58 नवीन
गुजराती,मारवाडी हिंदी भाषेला प्राधान्य देतात हे चुकीचे असावे. गुजराती,मारवाडी जे दुसऱ्या देशात राहतात,दुसऱ्या राज्यात राहतात तेच गुजराती मारवाडी हिंदी चे सर्मथन करतात ते पण त्यांच्या सोयीसाठी. कारण ते स्वतः दुसऱ्या राज्यात ,देशात असतात. गुजरात मध्येच राहणारे गुजराती,राजस्थान मध्येच राहणारे मारवाडी हिंदी लं प्राधान्य देणार नाहीत.आणि हिंदी चे समर्थन पण करणार नाहीत. अगदी मराठी लोक जितकी हिंदी लं किंमत देतात तितकी पण हे त्यांच्या राज्यात देणार नाही.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Sun, 04/17/2022 - 14:58 नवीन
गुजराती,मारवाडी हिंदी भाषेला प्राधान्य देतात हे चुकीचे असावे. गुजराती,मारवाडी जे दुसऱ्या देशात राहतात,दुसऱ्या राज्यात राहतात तेच गुजराती मारवाडी हिंदी चे सर्मथन करतात ते पण त्यांच्या सोयीसाठी. कारण ते स्वतः दुसऱ्या राज्यात ,देशात असतात. गुजरात मध्येच राहणारे गुजराती,राजस्थान मध्येच राहणारे मारवाडी हिंदी लं प्राधान्य देणार नाहीत.आणि हिंदी चे समर्थन पण करणार नाहीत. अगदी मराठी लोक जितकी हिंदी लं किंमत देतात तितकी पण हे त्यांच्या राज्यात देणार नाही.
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Sun, 04/17/2022 - 15:04 नवीन
गुजरात मध्येच राहणारे गुजराती,राजस्थान मध्येच राहणारे मारवाडी हिंदी लं प्राधान्य देणार नाहीत.आणि हिंदी चे समर्थन पण करणार नाहीत. अगदी मराठी लोक जितकी हिंदी लं किंमत देतात तितकी पण हे त्यांच्या राज्यात देणार नाही.
हा तुमचा अंदाज चूकीचा आहे. गुजरातमध्ये परप्रांतियांसोबत हिंदी बोलली जाते. राजस्थानात तर मूळ राजस्थानी लोकदेखील जेव्हा मोठा सार्वजनिक कार्यक्रम करतात तेव्हा हिंदीला प्राधान्य देतात हे मी एक मारवाडी म्हणून तुम्हाला खात्रीने सांगू शकतो. आमच्या राज्यात आला आहात तर फक्त आमच्या स्थानिक भाषेतच नाहीतर इंग्रजीतच बोला अशी दमदाटी गुजरात राजस्थान पंजाब हरियाणा या राज्यांत होत नाही हे स्वानुभावरुन सांगतो.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sun, 04/17/2022 - 15:36 नवीन
गुजरातमध्ये परप्रांतियांसोबत हिंदी बोलली जाते. राजस्थानात तर मूळ राजस्थानी लोकदेखील जेव्हा मोठा सार्वजनिक कार्यक्रम करतात तेव्हा हिंदीला प्राधान्य देतात हे मी एक मारवाडी म्हणून तुम्हाला खात्रीने सांगू शकतो. गुजरातेते समोरचा हिंदीत बोलला तरी ते गुजरातीतच बोलतात हा अनुभव आहे मला
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sun, 04/17/2022 - 15:37 नवीन
गुजरातमध्ये परप्रांतियांसोबत हिंदी बोलली जाते. राजस्थानात तर मूळ राजस्थानी लोकदेखील जेव्हा मोठा सार्वजनिक कार्यक्रम करतात तेव्हा हिंदीला प्राधान्य देतात हे मी एक मारवाडी म्हणून तुम्हाला खात्रीने सांगू शकतो. गुजरातेते समोरचा हिंदीत बोलला तरी ते गुजरातीतच बोलतात हा अनुभव आहे मला
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 04/18/2022 - 09:24 नवीन
गुजरातेते समोरचा हिंदीत बोलला तर ते ही हिंदीत बोलतात असा माझा अनुभव आहे. येत नसेल तरी मोडक्या तोडक्या हिंदीत बोलायचा प्रयत्न करतात !
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Mon, 04/18/2022 - 09:40 नवीन
काहीच वर्षापूर्वी गुजरात मध्ये उत्तर भारतीय लोकांना हाकलून देण्यासाठी हिंसक आंदोलन झाले हे विसरलात का,?
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 04/18/2022 - 13:53 नवीन
त्याचा पार्श्वभुमी वेगळी होती, संदर्भ वेगळा होता, असे मुद्दे राजकिय पातळीवर नेऊन त्याचे राजकारण करण्याची Background : The 14-months old girl from a Thakor community was allegedly raped by a migrant labourer from Bihar on 28 September 2018.[1][2] He worked at the ceramic factory at Dhundhar village near Himmatnagar, Sabarkantha district in north Gujarat where the incident took place.[1][3] He was arrested by the police next day. It angered the Thakor community which held protests across Gujarat. बलात्काराच्या पार्श्वभुमीवर पीडतांना न्याय देण्यासाठी काँग्रेस नेत्याने उपोषण करून स्थानिक लोकांना रोजगारासाठी प्राधान्य मिळण्यासाठी आंदोलन सुरु केले. त्यात भाषिक वादा पेक्षा "स्थानिकांना रोजगार" हा मुद्दा होता.
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Sun, 04/17/2022 - 15:00 नवीन
माझं मराठी वाचून आणि ऐकून अनोळखी माणसाला मी सांगेपर्यंत कधीच कळत नाही की मारवाडी भाषिक आहे म्हणून .... गुगळे आडनावामुळे मला काय काय अनुभव आले ते कदाचित इथे अस्थानी वाटतील पण तरीही त्यातले काही मांडतो. दहावीला पी जोग क्लास मध्ये शिकत असताना इंग्रजी भाषेच्या शिक्षिकेने माझा टेस्ट पेपर मला देताना कोपर्‍यात दोन बोटांच्या चिमटीत एखादी किळसवाणी वस्तू धरावी तस धरून उचलला वर "गुगळे? ई.. काय बाई लोकांची आडनावं असतात!" असे उद्गार काढले होते. ती मला काय समजली होती ते काही मला कळले नाही. पुढे डोंबिवलीतल्या लॉजवर एका तत्वज्ञानावर वादविवादाची हौस असलेल्या एका गृहस्थाने आस्तिक नास्तिक चर्चेत माझ्याबरोबर वाद घालताना माझं मराठी ऐकून मला "गुगळे म्हणजे तुम्ही नक्की कोण हो?" असे अगदी कुतूहलाने विचारले. मी नेमका कोण हे सुरुवातीला सांगितलेच नाही तरी पुन्हा हट्ट करुन स्वतःच्या एका खांद्यावरुन खाली तिरका हात करत तुम्ही एअरिअल वाले का? असे पुन्हा विचारले. मी ऐरिअल वाला नाही असे सांगितल्यावर मग पुन्हा कोणचा हट्टच धरल्यावर जैन मारवाडी सांगितले तर त्याचा कितीतरी वेळ विश्वासच बसला नाही. तुम्ही सदाशिव पेठीच असणार असं मला वाटलं असं पुन्हा पुन्हा म्हणत होता. मराठीसोबत माझ्यासारख्या मूळ अमराठी माणसाने इतकी आत्मीयता दाखविल्यावरही हे आरोप होणार असतील तर कोण अमराठी भाषिक मराठी कधीतरी शिकेल काय?
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sun, 04/17/2022 - 14:02 नवीन
हिंदी भाषेने मराठीचे बरेच नुकसान केले आहे. शिवाय ही ज्यांची मातृभाषा आहे त्या गायपट्ट्यसतले लोक महाराष्ट्रात सगळीकडे घुसून लोकसंख्या वाढवत आहेत. आज महाराष्ट्रातल्या कितीतरी पे स्केल चांगले असणार्‍या नोकर्‍यांवर हे हिंदीभाषिक आहेत. रस्त्यांवर हातगाड्यांवर व्यवसाय करणारे भय्ये तर भरमसाठ आहेत. विदर्भात आधीच हिंदीला पायघड्या आहेत,मोठ्या शहरांमधे हिंदी ही मराठीला पर्याय म्हणून उभी राहतेय. आधी स्थानिक भाषेचा खून,भेसळ आणि त्यावर रोजगार हिसकावणे हे प्रकार या हिंदीभाषिकांमुळे घडत आहेत. हिंदीला अजून बळ मिळाले तर तिची मराठीसोबत भेसळ अजून होईल. यामुळे मराठी समृद्ध न होता ती धेडगुजरी होईल. या सगळ्यामुळे महाराष्ट्रात आणि दक्षिणी राज्यांमधे हिंदीविरोध वाढता आहे. देशभर हिंदी पसरवण्यापेक्षा ज्या राज्यांची ही अधिकृत भाषा आहे त्यांचा विकास का केला जात नाही? जेणेकरुन असे ज्या राज्यात राहतात तिथली भाषा न शिकणारे भाषिक कृतघ्न महाराष्ट्रात येणे थांबेल.
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Sun, 04/17/2022 - 14:21 नवीन
हिंदी भाषेने मराठीचे बरेच नुकसान केले आहे.
इंग्रजीने जास्त केले आहे.
शिवाय ही ज्यांची मातृभाषा आहे त्या गायपट्ट्यसतले लोक महाराष्ट्रात सगळीकडे घुसून लोकसंख्या वाढवत आहेत. आज महाराष्ट्रातल्या कितीतरी पे स्केल चांगले असणार्‍या नोकर्‍यांवर हे हिंदीभाषिक आहेत.
दक्षिण भारतीयांनीच जास्त नोकर्‍या बळकावल्या आहेत.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Tue, 04/19/2022 - 17:24 नवीन
हे जुने झाले आता दक्षिण भारत खूप प्रगती करत आहे. खूप नोकऱ्या तिकडे निर्माण झाल्या आहेत.. मुंबई मधील शेट्टी लोकांच्या बार मध्ये आता कन्नड waiter नाहीत.. सर्व बिमरू राज्यातील आहेत . पण आजुन पण हिंदी भाषिक राज्य..राजस्थान,यूपी,बिहार mp आहे तिथेच आहेत मागास.... ह्या राज्य मुळे भारत प्रगत देशांच्या यादीत येत नाही.
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Tue, 04/19/2022 - 20:32 नवीन
मुंबई मधील शेट्टी लोकांच्या बार मध्ये आता कन्नड waiter नाहीत..
इतक्या कमी उत्पन्नावर त्यांचं लक्ष नाही. साहेबाचा पीए वगैरेंसारख्या मोठ्या मिळकतीची पदे त्यांनी बळकावली आहेत मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर मोठ्या शहरांत. मराठी भाषेचा आणि मराठी जनांचा हेच जास्त अपमान आणि दु:स्वास करतात उत्तर भारतीयांपेक्षाही.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Tue, 04/19/2022 - 17:11 नवीन
माझ्या पालकांना परवडले असते आणि त्यांनी मला इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले असते तर माझी मराठी भाषा तितकीशी परिणामकारक नसतानाही इंग्रजी मात्र प्रभावी झाली असती आणि इथे इंग्रजी विरुद्ध हिंदी वादात मी इंग्रजी बाजू लावून धरली असती. म्हणजे योग्य काय यावर विचार न करता तुम्ही कोणत्या माध्यमातून शिकलात आणि त्यामुळे तुम्हाला कोणती भाषा सोपी वाटते त्यावरुन तुम्ही ठरवता की सर्व भारतात कोणती भाषा बोलली जावी ते? छान छान!
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Tue, 04/19/2022 - 20:42 नवीन
तुम्ही कोणत्या माध्यमातून शिकलात आणि त्यामुळे तुम्हाला कोणती भाषा सोपी वाटते त्यावरुन तुम्ही ठरवता की सर्व भारतात कोणती भाषा बोलली जावी ते? छान छान!
मुद्दा कळला नाही की कळूनही न कळल्याचा आव आणताय? ठळक केलेले शब्दच महत्त्वाचे आहेत कारण तेच भाषेचे भवितव्य ठरविणार आहेत.
माझ्या पालकांना परवडले असते आणि त्यांनी मला इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले असते तर माझी मराठी भाषा तितकीशी परिणामकारक नसतानाही इंग्रजी मात्र प्रभावी झाली असती आणि इथे इंग्रजी विरुद्ध हिंदी वादात मी इंग्रजी बाजू लावून धरली असती.
या शब्दांमधून मला हे सांगायचे आहे की मराठी माध्यमात शिकल्याने माझे मराठी उत्तम आहे पण परिणामस्वरुप इंग्रजी कच्चे. जिथे मराठीत संभाषण शक्य नाही अशा ठिकाणी अर्थातच इंग्रजीपेक्षा तूलनेने मला हिंदी सोपी. म्हणजे मी हिंदी वि. इंग्रजी वादात जरी हिंदीची बाजू घेत असलो तरी मूळात माझे मराठी चांगले. याउलट हिंदी विरुद्ध इंग्रजी वादात इंग्रजी बाजू लावून धरणारा असेल तो इंग्रजी माध्यमातून शिकलेला असणार म्हणजेच तुलनेत त्याचे मराठी तितकेसे प्रभावी नाही. पण आता हिंदी ऐवजी इंग्रजी सक्ती अशीच होत राहिली तर पालक मुलांना टाकणार इंग्रजी माध्यमात. आता याच्या परिणामी मुलांचे मराठी कच्चे राहणार म्हणजे अंतिमतः इंग्रजी आग्रह मराठीलाच भविष्यात बुडविणार.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/20/2022 - 04:15 नवीन
जिथे मराठीत संभाषण शक्य नाही अशा ठिकाणी अर्थातच इंग्रजीपेक्षा तूलनेने मला हिंदी सोपी. मला हिंदीपेक्षा इंग्लिश खूप सोपी वाटते. म्हणजे मी हिंदी वि. इंग्रजी वादात जरी हिंदीची बाजू घेत असलो तरी मूळात माझे मराठी चांगले. मी जन्मतःच मराठी आहे. याउलट हिंदी विरुद्ध इंग्रजी वादात इंग्रजी बाजू लावून धरणारा असेल तो इंग्रजी माध्यमातून शिकलेला असणार म्हणजेच तुलनेत त्याचे मराठी तितकेसे प्रभावी नाही. चुकीचे गृहीतक आहे. मी बालवाडीपासून १० पर्यंत मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलो व मला मराठी उत्तम येते. परंतु हिंदीच्या तुलनेत इंग्लिश खूपच सोपी वाटते.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sun, 04/17/2022 - 11:15 नवीन
धागा काथ्याकूट सदरात असला तरीही चर्चेकरिता काढलेला दिसत नाहीये तर निष्कर्ष आधीच ठरवलेला दिसतोय. तुम्ही तुमचा हेका सोडत नाही.मग इतरांनी त्यांचा हेका का सोडावा?
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Sun, 04/17/2022 - 11:57 नवीन
उपायोजक धागा तुम्हीच काढलाय ना? मग तुमचे मत तुम्ही धाग्यात मांडलेच आहे. काथ्याकूट करायचा असेल तर विरोधी मत स्वीकारा की. तुमचीच री ओढायची असेल तर मग तुमच्या धाग्यावर मी फक्त तुम्हाला सहमती दर्शवायला येईन चर्चा तेव्हाच होईल जेव्हा मी वेगळे मत मांडेन.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sun, 04/17/2022 - 14:08 नवीन
विरोधी मतांचा आदर असू शकतो ते स्विकारायचं का नाकारायचं ते ती व्यक्ती ठरवेल. मी तुम्ही हिंदीला विरोध केलाच पाहिजे असा कुठे आग्रह धरलाय? मी माझीच मतं मांडतोय. आणि ती हिंदीविरोधी असल्याने तुम्ही चिडलात. कारण ती मते तुमच्या मताच्या विरोधी आहेत म्हणून. म्हणून तर रागारागात लिहिलंत 'आधीच निष्कर्ष काढलाय म्हणून'. तुमचं मत स्विकारलं की मगच मान्य करणार चर्चा होतेय हे?
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Sun, 04/17/2022 - 14:22 नवीन
वैयक्तिक घाणेरडा आरोप करणारे प्रतिसाद वगळता इतर प्रतिसादांना मी संताप व्यक्त केलेला नाहीये.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Sun, 04/17/2022 - 13:17 नवीन
दक्षिण भारतीयांच्या हिंदी विरोधात प्रामाणिकपणा दिसत नाहीये. आर्थिक फायदा दिसेल तेथे हिंदी विरोध बाजूला इतकेच काय हिंदीच नव्हे तर भोजपुरीला देखील आपलेसे करायचे तयारी दिसतेय
माझ्यामते विरोध हिंदीला नाही.. हिंदीच्या सक्तीला आहे. दोन्ही गोष्टीत फरक आहे.
महाराष्ट्र हिंदी विरोधात कधीच नव्हता. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर मात्र राज्य सरकार पुरस्कृत हिंदी विरोध महाराष्ट्रात दिसून येत आहे.
पुन्हा एकदा - हिंदी विरोध आताही नाही आणि नसावा... हिंदीच्या सक्तीला विरोध आहे. उत्तर भारतीयांच्या महाराष्ट्रात येवून वर्षानुवर्षे "क्यो सीखनी है हमे मराठी ?" अशा मग्रुरीला - एखाद्या घोळक्यात एखादाच हिंदी भाषिक असूनही इतर मराठी भाषिक मराठीत गप्पा मारु (मी अनौपचारिक गप्पा म्हणतोय हं.. कार्यालयीन बैठकी नाही) लागल्यावर "अरे यार.. हिंदी मे बात करो ना" म्हणत तक्रारीचा सूर लावण्याला विरोध आहे. म्हणजे हिंदी भाषिकांसमोर मराठी बोलणं म्हणजे गुन्हाच झाला का ? याबद्दल काय म्हणणे आहे ? बाकी आर्थिक फायदा असेल तर मी फ्रेंच भाषेतही एखादा व्हिडिओ वा एखादे लेखन प्रसिद्ध करेन --किंवा माझी व्यक्तिगत आवड म्हणूनही शिकेन ...पण म्हणून कुणी फ्रेंच भाषा सक्तीची केली तर मी कडाडून विरोध करेन.. हा दुटप्पीपणा नसून निवडीचा अधिकार आहे. माझे हिंदी भाषिक मित्र आहेत, मी त्यांच्याशी हिंदीत बोलतो, मी हिंदी चित्रपट, मालिका व गाणी बघतो.. पण ही माझी निवड आहे. .. उद्या कुणी मराठी चित्रपटांवर बंदी घातली तर मी कडाडून विरोध करणारच.
असे असताना चैन्नईतल्या प्रत्येक लॉजमध्ये असलेल्या टीवीवर मराठी कार्यक्रम दिसतील अशी सोय असते का?
माझा चन्नईजवळ महिंद्रासिटीत अल्पकाळ वास्तव्यातला अनुभव आहे.. तिथे एका सर्विस अपार्टमेंटमध्ये माझी राहण्याची सोय माझ्या कंपनीकडून करण्यात आलेली होती. त्यावेळी मला काही मराठी मालिका बघण्याची सवय होती. पण तिथल्या टाटा स्काय वर त्या वाहिन्या दिसत नसल्याने मी त्यांच्या मॅनेजरला फोन केला असता तिने दहा मिनटात मराठी पॅक जोडून माझी सोय केली.
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Sun, 04/17/2022 - 07:36 नवीन
इन्ग्रजी ऐवजी हिन्दी वापरा असे म्हणाले आहेत. याचा अर्थ आम्ही तरी जर दोन भिन्नभाषिकाना एकेमेकान्च्या भाषा येत नसतिल तर इन्ग्रजी मधुन बोलण्याऐवजी हिन्दी वापरावे असा घेतला आहे. यात इतके राजकारण होण्याचे एकच कारण आहे की महाराष्ट्र जर दक्शिणेच्या राज्यान्सारखा भाषाअस्मिता वादी झाला तर ते शिवसेना आणि राष्ट्रवादी च्या फायद्याचे आहे, कायमची निवडुन येण्याची सोय झाली... पुढची पायरी काय असणार आहे ते देखिल दिसते आहे. या पुर्वीच शेन्डी जानव्याचे राजकारण आम्ही करणार नाही असे मामु म्हणाले आहेतच. https://www.newindianexpress.com/nation/2021/oct/18/granddads-soft-hindutva-legacy-works-better-for-maharashtra-cmuddhav-thackeray-2372662.html तेव्हा तामिळनाडु च्या भाषिक अस्मितेबरोबर तिथुन अजुन पाठ घेतले जात आहेत ते दिसते आहे. दक्शिणी भाषान्सारखा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणुन प्रयत्न चालु आहेत. शिवाय मराठी सन्स्क्रुतोद्भव नाही असे म्हणणे माण्डणे चालु आहे. https://indianexpress.com/article/cities/mumbai/marathi-language-has-not-originated-from-sanskrit/ ह्म्म चालायचेच. पण भारताला परवडणार आहे का नस्ती भाषिक भान्डणे? आपण आधीच जातीपाती मध्ये खुप विभागले गेले आहोत त्यात भाषेची भर कशाला?
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sun, 04/17/2022 - 11:01 नवीन
शिवसेना आणि राष्ट्रवादी च्या फायद्याचे आहे, कायमची निवडुन येण्याची सोय झाली... शिवसेनेला विरोध म्हणून अनेक भाजप समर्थक मराठीला विरोध करतात. तेयांचा कडे पाहून रडावे की हसावे ते च कळत नाही. हियाबाबत श्रिगुरूजींकडे भाजपेयींनी पहावे, ते सेना विरोधी असूनही कट्टर मराठीवादी आहेत. मराठी मुंबई म्हटलं का सेना आठवते ह्यातच सेनेचं कर्त्तृत्व दिसतं.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 9 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 9 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 9 hours ago
  • सुंदर !!
    1 day 9 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 9 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा