Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

त्यांनी हिंदीत का बोलावं?

उ
उपयोजक
Mon, 04/11/2022 - 15:22
🗣 510 प्रतिसाद
तीन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एक विनंती केली की वेगवेगळ्या राज्यांमधल्या असमान मातृभाषा असणार्‍या लोकांनी एकमेकांशी संवाद साधताना इंग्रजीऐवजी हिंदी भाषा वापरावी. https://www.google.com/amp/s/indianexpress.com/article/india/people-different-states-should-speak-hindi-not-english-shah-7858861/lite/ या अनावश्यक विनंतीला अहिंदी राज्यांमधे साहजिकच विरोध होतो आहे. विशेषत: दक्षिणेकडच्या राज्यांमधे. आता ज्या लोकांची मातृभाषा हिंदीच आहे त्यांना या विनंतीबद्दल काहीच आक्षेप नसणारेय.उलट त्यांचा आयता फायदाच होईल. आता प्रश्न असे आहेत. १. दोन राज्यांमधील असमान भाषिकांनी कोणत्या भाषेत एकमेकांशी बोलावं अशी विनंती गृहमंत्री का करत आहेत? लोकांनी कोणत्या भाषेत बोललं पाहिजे हे गृहखात्याच्या अखत्यारीत येतं का? २. या विनंतीला दक्षिणेकडच्या राज्यातले लोक सकारात्मक प्रतिसाद देतील असा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा? की ही विनंती हिंदीतून बोलू शकणार्‍या अहिंदी राज्यांतल्या लोकांसाठीच आहे? अशी विनंती केल्यावर ज्यांना हिंदी येत नाही ते लगेच हिंदी शिकून घेतील हा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा? ३. या विनंतीमागे कारण काय असावं? हिंदी पट्ट्यातल्या लोकांची सोय व्हावी? कारण हिंदी पट्ट्यातले लोक "हम तो पापी पेट के लिए आए हैं भाई" हे रडव्या चेहर्‍यानं सांगून अहिंदी भाषिकांना 'आमची सोय बघा' असंच सांगू पाहतात. हिंदीभाषिक अहिंदी राज्यातल्या भाषा शिकायला राजी नसतात. पण अहिंदी भाषिकांनी मात्र हिंदी शिकावी ही अपेक्षा बाळगतात. हे हिंदी पट्ट्यातले लोक हिंदीतर भाषा शिकणार कधी? ४. समजा दक्षिणभारतीय राज्यांनी किंवा ईशान्येकडच्या राज्यांनी एकत्र येऊन त्यांची एकच सामायिक बोलीभाषा निर्माण करुन हिंदीला कडवे आव्हान निर्माण केले तर? मग काय करतील अमित शहा? ५. इंग्रजीला अमित शाह यांचा विरोध का? इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. कमालीची ताकदवान भाषा आहे.आंतरराष्ट्रीय भाषा आहे. उपयोगाची भाषा आहे. असं असताना ती न वापरता हिंदी का वापरायची?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 105991 views

🗣 चर्चा (510)
श
श्रीगुरुजी Mon, 04/11/2022 - 15:35 नवीन
महाराष्ट्रात काहीच समस्या नाही. येथे मराठी भाषिक सुद्धा हिंदीत बोलून आपली राष्ट्रीय पातळी सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. हिंदी ही राष्ट्रभाषा (!) आहे हे मराठी भाषिकच उच्चरवाने सांगतात. महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमात हिंदी शिकणे सक्तीचे असून मराठी शिकणे ऐच्छिक आहे. येथे ५० वर्षांहून अधिक काळ वास्तव्य केलेले सुद्धा मराठी शिकत नाहीत व त्यांचे काहीही अडत नाही. तस्मात अमित शहांच्या सूचनेचे महाराष्ट्रात जोरदार स्वागत होईल.
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Sun, 04/17/2022 - 15:37 नवीन
महाराष्ट्रात काहीच समस्या नाही. येथे मराठी भाषिक सुद्धा हिंदीत बोलून आपली राष्ट्रीय पातळी सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. हिंदी ही राष्ट्रभाषा (!) आहे हे मराठी भाषिकच उच्चरवाने सांगतात.
ह्या विधानानुसार महाराष्ट्रात यासूचनेची गरजच नाहीये.
अमित शहांच्या सूचनेचे महाराष्ट्रात जोरदार स्वागत होईल.
अनेक मराठी जण नोकरीनिमित्त चैन्नई आणि इतर दक्षिण भारतीय शहरांत वास्तव्य करुन आहेत. तिथे त्यांची स्थानिक पातळीवर जी कुचंबणा होते ती टळेल व त्याकरिताच दक्षिण भारतात अंमलबजावणी व्हावी म्हणून मराठी माणसे या सूचनेचे स्वागत करतील.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Mon, 04/11/2022 - 15:44 नवीन
अमित शाह यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. भारतासारख्या भूभागाने आणि लोकसंख्येने मोठ्या असलेल्या देशाला एकाच भाषा असावी ही अपेक्षा तार्किक नाही. मुळात उत्तर प्रदेशातील काही भागात बोलल्या जाणाऱ्या एका भाषेचा केंद्र सरकारने असा पुरस्कार करू नये. त्यामुळे इतर भाषकांवर अन्याय होतो. याशिवाय, केंद्र शासनाचा नागरिकांशी होणारा संवाद, केंद्रीय स्पर्धा परीक्षा, वेगवेगळे अर्ज इ. भारतभर हिंदीत असू नयेत. त्या त्या राज्याच्या भाषेत आणि इंग्लिशमध्ये असावेत. हिंदीच्या पुरस्कारामुळे इतर भाषकांचे / स्पर्धकांचे / अर्जदारांचे नुकसान होते. वरील बाबींसाठी राज्य भाषांना पर्याय हवा असेल तर तो इंग्लिश असणे हे तार्कीक आहे. वरील बाबींमध्ये हिंदी भाषा वापरावी लागणे हा अन्याय असेल तो केवळ हिंदी-वेतर लोकांवर होतो, ती जर सुविधा असेल ती केवळ हिंदी लोकांनाच उपलब्ध होते. वरील बाबींमध्ये इंग्लिश भाषा वापरावी लागणे हा अन्याय असेल तो सर्वांवरच होईल, ती जर सुविधा असेल ती सर्वांनाच सारखी उपलब्ध होईल. --- महत्वाचे: हिंदी ही भारत देशाची राजभाषा नाही. भारत या देशाला कोणतीही राजभाषा नाही. ---
  • Log in or register to post comments
व
वेडा बेडूक Wed, 06/28/2023 - 11:41 नवीन
नाही, शहरी लोकांना सोय होईल.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Mon, 04/11/2022 - 16:57 नवीन
इतर प्रादेशिक भाषांचे हळूहळू खच्चीकरण करणाचा डाव दिसतो. काही काळात "वन नेशन - वन लँग्वेज" वगैरे घोषवाक्य ऐकायला / वाचायला मिळाल्यास आश्चर्य वाटू नये. महाराष्ट्रात मराठीचे बहुतांशी खच्चीकरण आधीच झालेले आहे - राज्य सरकार शाळांतून मराठी सक्तीचे असा कायदा असल्याचे उच्चरवाने सांगते पण प्रत्यक्षात सीबीएसई / आयसीएसई शाळांत मराठी विषय टाळला जातो. याबद्दल ना पालक काही भूमिका घेतात ना सरकार. महाराष्ट्रात नोकरीनिमित्त आलेले हिंदी भाषक तर सर्रास म्हणतात "अरे क्यो सीखनी है मराठी हमे ?" तेव्हा राग येतो पण काही करता येत नाही कारण आपलेच इतर मराठी बांधव या हिंदी भाषकांच्या सोयीकरिता मराठी ऐवजी हिंदीत बोलू लागतात. चार-सहा जणांच्या घोळक्यात एखादा हिंदी भाषिक व बाकी सगळे मराठी असले तरी गप्पा हिंदीतून चालतात.. चुकून मराठीतून चालू झाल्यास तो हिंदी भाषिक लगेच म्हणणार "अरे यार हिंदी मे बात करो ना .. कुछ समझ नही आ रहा" मग मराठी बांधव त्याला "तो सीख लो ना मराठी - किसने रोका है" असं त्याला खडसावण्याऐवजी उलट स्वतःच "सॉरी यार .. कभी कभी भुल जाते है" म्हणत दिलगिरी व्यक्त करतात.. असो... पण दक्षिणेकडील राज्यात हिंदीची ही डाळ शिजेल असे वाटत नाही. भाषाभिमान शिकावा तो दक्षिणेतील लोकांकडून ...
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Mon, 04/11/2022 - 17:15 नवीन
चांगले निरीक्षण!
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Sat, 04/16/2022 - 15:27 नवीन
पण दक्षिणेकडील राज्यात हिंदीची ही डाळ शिजेल असे वाटत नाही. भाषाभिमान शिकावा तो दक्षिणेतील लोकांकडून ...
हा एक नवीनच गैरसमज. मी शाळेत असताना त्या काळी सरसकट सर्व दक्षिण भारतीयांचा आपल्याकडे मद्रासी असा उल्लेख व्हायचा. तर तेव्हा मी एकदा वर्तमानपत्रात बातमी वाचली - पी टी उषा या खेळाडूने अश्विनी नचप्पा या आणि इतर दोन खेळाडूंबद्दल तक्रार केली होती की त्या तिघी कन्नडमध्ये बोलतात, उषाला कन्नड येत नाही म्हणून त्या मुद्दामच तसे करतात आणि कन्नड मध्ये त्या तिघी उषाची खिल्ली उडवितात, चेष्टा करतात, अपमान करतात अशी काहीशी ही तक्रार होती. तर सांगायचा उद्देश हा की त्या चार राज्यांमध्येही प्रत्येकाला स्वतःच्या राज्याच्या भाषेचा दुराभिमान आणि इतर राज्याच्या भाषेविषयी पराकोटीचा द्वेष आहे. कावेरी पाणी प्रश्न किंवा इतर सीमाविषयक प्रश्नांनादेखील भाषिक वादाची किनार आहे. काही असे दक्षिण भारतीय नागरिक आहेत की ज्यांना एकापेक्षा अधिक दक्षिणी भाषा येतात पण सर्वच तसे नाहीत मग संवाद साधताना अडचण येते, भांडणे होतात. इंग्रजी अस्खलित येण्याइतकेही हे विद्वान नसतात पण हिंदीला विरोध करावा म्हणून आपापसात मोडक्या तोडक्या इंग्रजीत संवाद साधतात आणि पुन्हा गैरसमज भांडणे होतातच. ८० च्या दशकांत हे जास्त होते. आताशा इंग्रजी ज्ञान वाढले असल्याने इतके गैरसमज होत नाहीत पण हिंदीला विरोध म्हणून चार राज्यां नी आपसातील संवादाची भाषा इंग्रजी ठेवली आहे. महाराष्ट्र किंवा इतर राज्यातला कोणी यांच्याकडे संवाद साधू लागला की इंग्रजी किंवा त्यांच्या स्थानिक दक्षिणी भाषेचा आग्रह धरतात. हिंदी येत असली तरी मुद्दामच बोलत नाहीत. समोरच्याची अडचण करणे हाच मुख्य उद्देश असतो. स्वतःचं भाषाप्रेम इतकंच खरं असेल तर इंग्रजीचा देखील आग्रह धरु नये.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 04/16/2022 - 15:36 नवीन
दक्षीण भारतीय आपल्या भाषेचा आग्रह न धरता हिंदी लादून घ्यायला महाराष्ट्रा ईतके मुर्ख नक्कीच नाहीत.
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Sat, 04/16/2022 - 15:51 नवीन
स्थानिक भाषेसोबत दुसरी भाषा इंग्रजी ऐवजी हिंदी करणे यात मूर्खपणा काय आहे? प्रत्येकाला इंग्रजी शिकणे अवघड आहे त्यापेक्षा हिंदी सोपी आहे. आणि इतकंच आहे तर दक्षिणी भाषेतील चित्रपट मूळ भाषेसोबत फक्त इंग्रजीतच डब करावेत पण नाही ते तर हिंदी प्रमाणेच आता तर थेट भोजपूरीत देखील डब होतात. कारण काय तर ह्या उत्तर भारतीयांच्या खिशातून पैसे हवे आहेत तर मग त्यांच्यापर्यंत पोचायला त्यांच्या भाषेत संवाद साधायला मग या दाक्षिणात्यांचा भाषाभिमान आड येत नाही का? बाहूबली तुमचा सिनेमा जर फक्त स्थानिक + इंग्रजी भाषेत आणला असता तर इतका प्रचंड व्यवसाय करु शकला असता का? हिंदीत असल्यामुळेच उत्तर भारतातही तो पाहिला गेला. त्यांना जर दाक्षिणात्यांचा द्वेष असता तर त्यांनी सरसकट सर्वच दक्षिण भारतीय चित्रपटांवर ते हिंदीत डब असले तरीही बहिष्कार टाकला असता. उत्तर भारतीयांना दक्षिणी भाषांचा द्वेष नाहीये. त्यांना या भाषा शिकणे अवघड जातेय कारण त्यात विरामचिह्नांचा वापरच केला जात नाही. शिवाय गरीब उत्तर भारतीयांना इंग्रजी शिकणे देखील सुलभ आणि परवडणारे नाही त्यामुळेच त्यांची अपेक्षा इतकीच आहे की स्थानिक भाषेबरोबरच त्यांना हिंदीचाही पर्याय द्यावा (आधीच सांगितल्याप्रमाणे ते हिंदीचा आग्रह धरताहेत म्हणजे स्वतःच्या मातृभाषेचा आग्रह धरताहेत हा समज चूकीचा आहे. त्यांची मातृभाषा मैथिली / भोजपुरी किंवा इतर काही वेगळी असते. ते आपसात त्या भाषेत बोलता आणि इतरांकरिता हिंदीत बोलतात)
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 04/16/2022 - 15:54 नवीन
ऊत्तरभारतीय म्हणजे देश नाही, ऊत्तरभारतीयांच्या सोयी साठी ऊर्वरीत देशावर हिंदी लादणे मुर्खपणाचे आहे.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sun, 04/17/2022 - 18:15 नवीन
संपूर्णपणे सहमत
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Sun, 04/17/2022 - 18:27 नवीन
दक्षिण भारतीयांच्या सोयीकरिता इंग्रजी देशावर लादणे हा आत्मघात ठरेल.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sun, 04/17/2022 - 18:38 नवीन
भारतीयांच्या सोयीकरिता इंग्रजी देशावर लादणे हा देशहिताचा निर्णय ठरेल.
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Sun, 04/17/2022 - 20:00 नवीन
कदापी अमान्य.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 04/17/2022 - 19:01 नवीन
आमचा फक्त हिंदी लादण्यास विरोध आहे. ज्यांना स्वेच्छेने हिंदी शिकाविशी वाटते त्यांनी शिकावी. पण हिंदी शिकणे आमच्यावर लादू नका. दोन वेगवेगळ्या भाषिकांनी फक्त इंग्लिशमध्येच बोलावे असा आमचा आग्रह नाही. आमच्या राज्यात आम्ही व्यवहारात फक्त मराठीच बोलणार.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sun, 04/17/2022 - 20:27 नवीन
+१
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Sat, 04/16/2022 - 16:40 नवीन
उत्तर भारतीयांना दक्षिणी भाषांचा द्वेष नाहीये. त्यांना या भाषा शिकणे अवघड जातेय कारण त्यात विरामचिह्नांचा वापरच केला जात नाही. शिवाय गरीब उत्तर भारतीयांना इंग्रजी शिकणे देखील सुलभ आणि परवडणारे नाही त्यामुळेच त्यांची अपेक्षा इतकीच आहे की स्थानिक भाषेबरोबरच त्यांना हिंदीचाही पर्याय द्यावा
अमिताभ बच्चन वा ईतर अनेक गरीब उत्तर भारतीयांना मराठीपण शिकणे अवघड जाते का ? मराठीतर विरामचिह्ने आहेत ना ? आणि अनेक दाक्षिणात्य, गुजराथी आणि पंजाबी लोकसुद्धा मराठी शिकतात, त्यांच्या पुढच्या पिढ्या तर छान मराठीत बोलतात.. मग उत्तर भारतीयांनाच ते का जमू नये ? चला अमिताभला नाही जमलं गरीबीमुळे.. सोडून देऊ.. अभिषेक बच्चनचे तरी मराठीतील संभाषणाचे व्हिडिओ मिळतात का ? जसे पंजाबी अक्षय कुमारला , कन्नड असलेल्या गिरिष कर्नाडला , तमिळ शंकर महादेवनला चांगलं मराठी बोलता येतं मग हिंदी भाषिक उत्तर भारतीयांनाच का नाही येत ?
  • Log in or register to post comments
T
Trump Sun, 04/17/2022 - 19:29 नवीन
श्री गुगळे, तुमचे काही मुद्दे चुकीचे आहेत. -- जेव्हा तुम्ही हिंदीचा आग्रह धरता तेव्हा उत्तर भारतीयांना (त्यात थोडेफार महाराष्टातील लोकही येतात) त्यांच्या मुळ भाषेच्या साधर्म्यामुळे एक फायदा मिळतो. त्यात पातळीला पोचायला दक्षिण भारतीयांना जास्त अभ्यास करावा लागतो, त्याला वेळ आणि श्रम लागतात. त्यामुळे समानतेच्या प्रश्नावर प्रश्नचिन्ह येते आणि उत्तर भारतीयांना एकप्रकारे सवलत मिळून प्राथमिकता मिळाल्यासारखे वाटते. श्री गुगळे आणि इतर हिंदी समर्थक यांना प्रश्न.
  • कृपया, तुम्ही ही सवलत किंवा प्राथमिकता उत्तर भारतीयांना का मिळावी ते सांगा?
  • आणि इतरांनी त्याच पातळीला जायला अतिरीक्त प्रयत्न करुन आपला वेळ आणि श्रम का घालवावेत? यामुळे घटनेने (कलम १४) दिलेल्या समानतेच्या तत्वांचा भंग होत नाही का?
  • जे अहिंदी भाषिकांना level playing field (मराठी प्रतिशब्द काय?) कसे मिळणार? उदा. केंद्रीय लोकसेवा आयोग level playing field सर्व उमेदवारांना मिळावी म्हणुन प्रयत्न करते.
  • जर त्यांनी आपली भाषा सोडुन इतर भाषा शिकणे म्हणजे एकप्रकारे सांस्कृतिक नरसंहार नाही का?
  • भारतीय इतिहासात 'तु मुसलमान बन, तु हे मिळेल' असली उदाहरणे बरीच आहेत, आता फक्त तु हिंदी भाषिक बन, तुला हे फायदे आहेत असे असेल तर मुसलमान राज्यकर्ते आणि आताचे राज्यकर्ते यात फरक काय?
----- आता इंग्रजीचा मुद्दा, इंग्रजी ही परदेशी भाषा असल्याने भारतात कोणालाच येत नाही. प्रत्येकाने ती स्वतः शिकणे आवश्यक आहे. त्यामुळे जो शिकण्याचे स्वतः प्रयत्न करेल. दक्षिण भारतीय किंवा उत्तर भारतीय हा मुद्दा गैरलागु होतो. इंग्रजी भाषेसमोर सगळी समानता आहे. ------
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Sun, 04/17/2022 - 20:52 नवीन
जेव्हा तुम्ही हिंदीचा आग्रह धरता तेव्हा उत्तर भारतीयांना (त्यात थोडेफार महाराष्टातील लोकही येतात) त्यांच्या मुळ भाषेच्या साधर्म्यामुळे एक फायदा मिळतो. त्यात पातळीला पोचायला दक्षिण भारतीयांना जास्त अभ्यास करावा लागतो, त्याला वेळ आणि श्रम लागतात.
हा एकच काय तो कामाचा मुद्दा आतापर्यंत हिंदी विरोधक / इंग्रजी समर्थकांकडून आला आहे.
उत्तर भारतीयांना (त्यात थोडेफार महाराष्टातील लोकही येतात) त्यांच्या मुळ भाषेच्या साधर्म्यामुळे एक फायदा मिळतो.
यात माझ्या माहितीप्रमाणे भोजपुरी मैथिली सारख्या भाषांसोबतच पंजाबी, हरियाणवी, राजस्थानी, गुजराती आणि काही प्रमाणात मराठी देखील धरावी लागेल. म्हणजे किमान दहा वेगवेगळ्या भाषिक मंडळींना हिंदी शिकायला कमी श्रम पडतील असा अंदाज आहे. आता तुम्ही अशी दुसरी कोणतीही भारतातील भाषा सूचवा जी शिकायला इतर दहा भाषिकांना (ज्यात दक्षिण भारतातील चार भाषा आल्या) कमी श्रम पडतील. आपण त्या भारतीय भाषेचा विचार करु.
आता इंग्रजीचा मुद्दा, इंग्रजी ही परदेशी भाषा असल्याने भारतात कोणालाच येत नाही. प्रत्येकाने ती स्वतः शिकणे आवश्यक आहे. त्यामुळे जो शिकण्याचे स्वतः प्रयत्न करेल.
म्हणजे भारतीय असलेल्या हिंदी भाषेला द्वितीया भाषा म्हणून प्राधान्य दिले तर भारतातले विशिष्ट दहा भाषिक पुढे जातील या कारणास्तव परकीय भाषेला हा दर्जा द्यायचा? त्यापेक्षा ज्यांना एकापेक्षा अधिक भारतीय भाषा बोलता / लिहिता / वाचता येतात त्यांना अनुवादक किंवा इतर अशा स्वरुपाच्या नोकर्‍यांमध्ये फायदा द्यावा. हिंदी भाषिकांना दुसरी कोणतीच भाषा चांगली येत नाही या त्यांच्या कमतरतेमुळे भारतीय भाषातील अनुवादकासारख्या नोकर्‍यांमध्ये त्यांना स्थान नसणे हा एक नैसर्गिक तोटा त्यांना होईलच (नैसर्गिक फायदा तुम्ही मांडला आहेच. तोटा मी मांडला. कॉम्पेन्सेट झाले.)
  • Log in or register to post comments
T
Trump Sun, 04/17/2022 - 20:56 नवीन
हा एकच काय तो कामाचा मुद्दा आतापर्यंत हिंदी विरोधक / इंग्रजी समर्थकांकडून आला आहे.
धन्यवाद. कृपया इतर प्रश्नांचीही उत्तरे द्यावीत. ----
म्हणजे भारतीय असलेल्या हिंदी भाषेला द्वितीया भाषा म्हणून प्राधान्य दिले तर भारतातले विशिष्ट दहा भाषिक पुढे जातील या कारणास्तव परकीय भाषेला हा दर्जा द्यायचा?
इतर उत्तरे आली की मी याचे उत्तर देईन.
  • Log in or register to post comments
T
Trump Tue, 04/19/2022 - 10:57 नवीन
श्री गुगळे आणि इतर हिंदी समर्थक यांना प्रश्न. https://www.misalpav.com/comment/1138349#comment-1138349 -- तुमच्याकडे मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे नाहीत असे मी समजावे का? तसे असेल तर तुमच्या इतर प्रतिवादाला काहीच अर्थ राहत नाही.
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Tue, 04/19/2022 - 17:44 नवीन
तुमचे पाच प्रश्न हे एकाच एकाच मुख्य प्रश्नाचे उपप्रश्न आहेत. त्या सर्वांना मिळून https://www.misalpav.com/comment/1138365#comment-1138365 यापेक्षा वेगळं उत्तर माझ्यापाशी नाहीये. निदान सध्यातरी ... इंग्रजी ऐवजी हिंदी का हवी? या प्रश्नाच्या उत्तराकरिता मात्र माझ्याकडे बरेच मुद्दे आहेत, पण ते इथे मांडण्यात फारसे स्वारस्य नाही. मी टंकन श्रम घेत मराठी भाषेत इतकं लेखन करुनदेखील केवळ मी मराठी वंशाचा नाही म्हणून मला मराठी भाषेबद्दल आत्मीयता नाही असा निष्कर्ष काढला गेला व माझ्या हेतूंबाबतच शंका घेतली गेली असल्याने (हे आपल्याबद्दल नाही) इथे आता काही मांडत नाही. स्वतंत्र रीत्या आपणांस ते जाणून घ्यायचे असल्यास मला दूरध्वनीवर संपर्क करु शकता.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Tue, 04/19/2022 - 18:36 नवीन
तुम्ही मूळ मराठी नाही आहात.हा विषय च नाही. आम्ही इथे जे व्यक्त होत आहोत ते आम्ही बिगर हिंदी भाषिक आहोत म्हणून नाही. तर देशाची भाषिक विविधता बघून देशाला काय धोकादायक आहे ते मांडत आहोत. भारत बहु भाषिक आहे है सत्य कधीच नाकारू नका. एक देश एक भाषा हे सूत्र भारताला लागू होणार नाही. हे पण सत्य मान्य करा. भाषिक राज्य झाली नसती तर देश आज जसा दिसतो तसा नसता हे पण मान्य करा. दिग्गज नेते होते जेव्हा एक भाषा एक राज्य हे सूत्र स्वीकारले गेले. ते खूप विचार करून स्वीकारले गेले. तेव्हा हिंदी ही राष्ट्र भाषा म्हणून जाहीर केली असती आणि सरकारी सर्व व्यवहार हिंदी मधून झाला असता तर अर्ध्या भारताला हे आपला देश आहे असे वाटलेच नसते. त्यांनी भारत स्वीकारला नसता.. एक राज्य एक भाषा हे सूत्र आणि त्रि भाषिक पद्धत स्वीकारल्या मुळे सरकारी कारभार मातृभाषेत झाला आणि त्या मुळेच लोकांस हा माझा देश आहे असे वाटायला लागले. .तुम्ही हिंदी भाषिक असला तर तुम्हाला देशाची भाषिक,सांस्कृतिक,रचना माहीत असती तर अमित शाह ह्यांचे राजकीय विधान तुम्ही उचलून धरले नसते. हिंदी cha हट्ट धरला तर इंग्लिश हीच राहिलेल्या भारताची भाषा असेल. आणि हट्ट नी बिगर हिंदी राज्य तसेच वागतील.
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Tue, 04/19/2022 - 20:25 नवीन
आणि सरकारी सर्व व्यवहार हिंदी मधून झाला असता तर अर्ध्या भारताला हे आपला देश आहे असे वाटलेच नसते.
ईग्रजीतून झाल्याने जास्त आत्मीयता वाटते? किती टक्के जनतेला? उत्स्फूर्त संवाद साधायचा म्हंटला तर या देशातील ९९ टक्के जनतेला इंग्रजीतून हे जमणार नाही. हिंदी निदान ५० टक्के जनतेला तरी नक्की जमेल.
तुम्ही मूळ मराठी नाही आहात.हा विषय च नाही.
http://www.misalpav.com/comment/1138270#comment-1138270 http://www.misalpav.com/comment/1138277#comment-1138277 http://www.misalpav.com/comment/1138298#comment-1138298 http://www.misalpav.com/comment/1138304#comment-1138304 http://www.misalpav.com/comment/1138374#comment-1138374 ह्या सर्व प्रतिसादांमध्ये माझ्या मारवाडी असण्याबद्दलचा राग दिसून येत आहे स्पष्टपणे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 04/19/2022 - 18:58 नवीन
आपल्या मराठी भाषेच्या कौशल्याविषयी व हेतूंविषयी माझ्या मनात अजिबात शंका नाही. पुण्यातील अनेक जैन-मारवाडी माझे परिचित आहेत व ते सर्वजण येथे पूर्ण समरस झाले असून उत्तम मराठी बोलतात. परंतु महाराष्ट्रात दोन असमान भाषिकांनी इंग्लिश ऐवजी हिंदीत संवाद साधावा हे मला मान्य नाही.
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Tue, 04/19/2022 - 19:45 नवीन
परंतु महाराष्ट्रात दोन असमान भाषिकांनी इंग्लिश ऐवजी हिंदीत संवाद साधावा हे मला मान्य नाही.
परंतु भारतात दोन असमान भाषिकांनी हिंदी या भारतीय भाषे ऐवजी इंग्रजी या परकीय भाषेत संवाद साधावा भारताच्या भारतीयत्वाला शोभणारे नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 04/19/2022 - 20:20 नवीन
परंतु भारतात दोन असमान भाषिकांनी हिंदी या भारतीय भाषे ऐवजी इंग्रजी या परकीय भाषेत संवाद साधावा भारताच्या भारतीयत्वाला शोभणारे नाही. हे कोणी ठरविले? जर हिंदी भारतीय भाषा असेल तर मराठी सुद्धा भारतीय भाषा आहे. मग मराठीत का संवाद साधू नये? मला हिंदी येत नाही. त्यामुळे महाराष्ट्राबाहेरील अमराठी राज्यात मी फक्त इंग्लिश मध्येच संवाद साधू शकतो. अवांतर - भारतातील अधिकृत १५ भाषांमध्ये इंग्लिश व गोरखा या भाषांचा सुद्धा समावेश आहे. नागालँड या राज्याची अधिकृत राजभाषा इंग्लिश आहे. त्यामुळे ही भाषा सुद्धा आता घटनात्मकदृष्ट्या भारतीय भाषा आहे.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Wed, 04/20/2022 - 04:15 नवीन
परंतु भारतात दोन असमान भाषिकांनी हिंदी या भारतीय भाषे ऐवजी इंग्रजी या परकीय भाषेत संवाद साधावा भारताच्या भारतीयत्वाला शोभणारे नाही. आत्ता तुम्ही लिहिताय त्या मराठीत ,ज्याची बाजू लावूनधरताय त्या हिंदीत आणि तुमची मातृभाषा असलेल्या मारवाडीत अक्षरश: हजारो शब्द हे अरबी , फार्सी मूळ असलेले आहेत. ते शब्द परकीय आक्रमकांच्यामुळे भारतीय भाषांमधे शिरलेत. ते शब्द वापरणं हे भारतीयत्वाला शोभणारं आहे का? नसेल तर अरबी , फार्सीमुक्त मराठीत बोलणार का आजपासून?
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Wed, 04/20/2022 - 06:43 नवीन
शब्द दत्तक घेणं आणि संपूर्ण वेगळी भाषा घेणं या दोन भिन्न बाबी आहेत. त्याशिवाय इंग्रजीत नुसतेच शब्द नाही तर व्याकरण, वाक्य रचना सारंच भिन्न आहे.
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Tue, 04/19/2022 - 19:51 नवीन
आपल्या मराठी भाषेच्या कौशल्याविषयी व हेतूंविषयी माझ्या मनात अजिबात शंका नाही.
धन्यवाद.
पुण्यातील अनेक जैन-मारवाडी माझे परिचित आहेत व ते सर्वजण येथे पूर्ण समरस झाले असून उत्तम मराठी बोलतात.
हे का घडू शकले? कारण त्यांनी मराठी माध्यमातून १० वी पर्यंतचे शिक्षण घेतले. अर्थात याचा परिणाम म्हणून त्यांचे मराठी उत्तम झाले तरी इंग्रजी बोलणे तितकेसे अस्खलित नाही. त्यामुळे त्यांना एखाद्या अमराठी व्यक्तिसोबत इंग्रजीत संवाद साधण्यापेक्षा हिंदी सुलभ जाईल. इथे तुम्ही इंग्रजीचा आग्रह धराल तर मग ह्याच लोकांना इंग्रजी माध्यमातून १० वी पर्यंतचे शिक्षण घ्यावे लागेल परिणामस्वरुप ते इतर भाषिकांसोबत इंग्रजीतून सहज संवाद साधतील पण त्यांचे मराठी भाषा ज्ञान शून्य राहील. हिंदी ऐवजी इंग्रजीचा आग्रह दूरगामी (लॉग टर्म) विचार करता मराठीला संपविणारा ठरेल.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 04/20/2022 - 11:26 नवीन
हिंदी ऐवजी इंग्रजीचा आग्रह दूरगामी (लॉग टर्म) विचार करता मराठीला संपविणारा ठरेल.
सहमत.
  • Log in or register to post comments
T
Trump गुरुवार, 04/21/2022 - 11:55 नवीन
यापेक्षा वेगळं उत्तर माझ्यापाशी नाहीये. निदान सध्यातरी ...
धन्यवाद हे मान्य केल्याबद्दल. जरी सगळे प्रश्न एकच वाटत असले तरी ते वेगवेगळे आहेत. तुम्ही आधी दिलेले उत्तर हे मुळ प्रश्नांना बगल देऊन दिले आहे. त्यामुळे ते मी स्वीकारणार नाही. पण जर तुम्हाला मुळ मुद्द्याला उत्तर देता येत नाहीत तर बाकीच्या प्रतिवादांना अर्थ राहत नाही. --
मी टंकन श्रम घेत मराठी भाषेत इतकं लेखन करुनदेखील केवळ मी मराठी वंशाचा नाही म्हणून मला मराठी भाषेबद्दल आत्मीयता नाही असा निष्कर्ष काढला गेला व माझ्या हेतूंबाबतच शंका घेतली गेली असल्याने (हे आपल्याबद्दल नाही) इथे आता काही मांडत नाही.
तुम्हाला झालेले दु:ख मला समजु शकते. जर तुम्ही स्वतःला मराठी समजत असाल तर तुम्ही नक्कीच मराठी आहात. जे तुम्हाला मराठी समजत नाही त्यांना तुम्ही 'मराठी (भाषिक) म्हणजे काय? ' असा प्रतिशश्न विचारायला हवा. --
स्वतंत्र रीत्या आपणांस ते जाणून घ्यायचे असल्यास मला दूरध्वनीवर संपर्क करु शकता.
सध्या तरी त्याची आवश्यकता वाटत नाही. बघुन नंतर. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Tue, 04/26/2022 - 04:02 नवीन
'मराठी (भाषिक) म्हणजे काय? मातृभाषा मराठी असणे , घरच्या सदस्यांसोबत मराठीतून बोलले जाणे म्हणजे मराठीभाषिक असणे.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Tue, 04/26/2022 - 10:06 नवीन
मातृभाषा मराठी असणे , घरच्या सदस्यांसोबत मराठीतून बोलले जाणे म्हणजे मराठीभाषिक असणे.
घरात कोणती भाषा बोलली जाते - खास करुन आई वडीला व भावंडांशी ते एखाद्या व्यक्तीच्या हातात नसते. मातृभाषा याचा शब्दशः अर्थ म्हणजे आईशी वा घरात बोलली जाणारी भाषा असा घेतला जावू नये. तर प्रथम भाषा असा अर्थ घ्यायला हवा.... ज्या भाषेत तुम्ही नेहमीच विचार करता, ज्या भाषेत सहजपणे आणि उत्स्फुर्तपणे आपल्या भावना व्यक्त करता ती भाषा तुमची भाषा आहे.. जरी ती घरच्या सदस्यांसोबत बोलली जात नसेल तरीही.. मला ट्रम्प यांनी केलेली व्याख्या अधिक पटली
जर तुम्ही स्वतःला मराठी समजत असाल तर तुम्ही नक्कीच मराठी आहात
घरात मराठी बोलत नसूनही अनेकजण मनाने मराठी असू शकतात.. त्यांच्या मराठी असण्यावर शंका घेतली जावू नये. जो अभिमानाने स्वतःला "मी मराठी" म्हणवतो (म्हणजे सच्चेपणाने , मनापासून - समोरची पार्टी बघून नाही) तो मराठीच. त्याउलट घरात मराठी बोलली जात असूनही बाहेर सगळीकडे हिंदी वा इंग्लिश बोलण्यातच धन्यता वा कूलनेस मानणार्‍यांना मी तरी मराठी समजणार नाही (अर्थात त्यांनाही स्वतःला मराठी म्हणवण्यात फारसा रस नसतोच ही गोष्ट वेगळी)
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 04/26/2022 - 10:07 नवीन
कै च्या कै
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 04/26/2022 - 10:13 नवीन
कै च्या कै
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 04/26/2022 - 10:14 नवीन
घरात मराठी बोलत नाही तरी पण मराठी म्हणे.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी गुरुवार, 04/28/2022 - 19:10 नवीन
घरात मराठी बोलत नाही तरी पण मराठी म्हणे.
ह्या मानसिकतेमुळे तुम्ही घरात मराठी बोलले जात नाही इतक्या कारणाकरिता मराठीबद्दल मनापासून आत्मियता असणार्‍यांना दूर लोटताय. तसेही घरात (आधीच्या पिढीशी) मराठी बोलली जात असूनही पुढच्या पिढीशी (म्हणजे मुलांशी) आवर्जुन इंग्लिश बोलणारे किंवा घराबाहेर आवर्जुन हिंदीच बोलणारे (खास करुन मुंबई/ नागपूर यासारख्या ठिकाणी) तथाकथित मराठी असूनही मराठीपासून मनाने दूर गेलेले आहेतच. तेव्हा घरात मराठी न बोलणारे पण मराठीबद्दल आत्मियता असणार्‍यांबद्दल काय दृष्टीकोन ठेवावा हे तुमचे तुम्ही ठरवा. ह्याबाबत मी अधिक चर्चा करुन इच्छित नाही. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 04/29/2022 - 07:38 नवीन
मला मॅंडरीन बद्दल आत्मयता आहे. मग मी आजपासून चिनी का?
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Fri, 04/29/2022 - 12:55 नवीन
मला मॅंडरीन बद्दल आत्मयता आहे. मग मी आजपासून चिनी का?
माझ्या आधीच्या प्रतिसादात त्याचं उत्तर होतं .. पण तुमच्या हटवादीपणाला सलाम .. यापुढे या विषयावर मला वाद करायचा नाही... तुमची मनोवृत्ती तुम्हाला लखलाभ... "ज्या भाषेत तुम्ही नेहमीच विचार करता, ज्या भाषेत सहजपणे आणि उत्स्फुर्तपणे आपल्या भावना व्यक्त करता ती भाषा तुमची भाषा आहे."
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 04/29/2022 - 15:54 नवीन
काहीबाही प्रतिसाद लिहीयचा नी मग तर्क लावला तर मला वाद घालायचा नाही म्हणून पळ काढायचा. आय डी काय तर म्हणे तर्कवादी. नाव सोनूबाई…..
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Fri, 04/29/2022 - 16:39 नवीन
काहीबाही प्रतिसाद लिहीयचा नी मग तर्क लावला तर मला वाद घालायचा नाही म्हणून पळ काढायचा. आय डी काय तर म्हणे तर्कवादी. नाव सोनूबाई…..
मि. बाहूबली... शब्द जपून वापरा.. मला पण व्यक्तिगत चिखलफेक करता येईल.. .. नाव बाहुबली घेतल्याने तुम्ही सर्व शक्तीमान होत नाहीत.. आणि तर्क कशाशी खातात हे तुम्हाला कळत का ? म्हणे "मी तर्क लावला" ... तर्काने प्रतिसाद देण्याची तुमची कुवत नाही ..तेव्हा उगाच नाद करायचा नाही ...
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 04/30/2022 - 07:53 नवीन
साहेब ईतका तर्क लावता येतो तर ह्याच घयधाग्याच श्रिगुरूजी्नी स्वित्झक्समंड जेशाचं ऊदाहरण दिलंय की तिथे फ्रेंच किंवा जर्मन घरात सुध्दा बोलणं सक्तिचं आहे. चार चारशे वर्षे हे लोक नहाराषट्रात राहतात तरी ह्यांची मातृभाषा मराठी होत नाही, पैश्यासाठी फक्त ह्याना नराठी लागतेऱ मग बोललो नैही म्हणून काय झालं मनानी मराठी वगैरे ह्या फूकाच्या गप्पा आहेत.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 04/30/2022 - 07:54 नवीन
साहेब ईतका तर्क लावता येतो तर ह्याच घयधाग्याच श्रिगुरूजी्नी स्वित्झर्लंड जेशाचं ऊदाहरण दिलंय की तिथे फ्रेंच किंवा जर्मन घरात सुध्दा बोलणं सक्तिचं आहे. चार चारशे वर्षे हे लोक महाराष्ट्रात राहतात तरी ह्यांची मातृभाषा मराठी होत नाही, पैश्यासाठी फक्त ह्याना मराठी लागते तर मग बोललो नाही म्हणून काय झालं मनानी मराठी वगैरे ह्या फूकाच्या गप्पा आहेत.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 04/30/2022 - 07:59 नवीन
तुमच्या सर्टिफिकेटची गरज कुणाला आहे इथे बाहुबली राव ?
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 04/30/2022 - 08:36 नवीन
मी का देऊ सर्टिफीकेट?? पण युपी बिहारी मजूरांच्या सोयीसाठी देशाने हिंदी लादून घ्यावी असं मत असनार्या तुमच्यासारख्या लोकांना ही गोष्ट कळायला हवी.
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Fri, 04/29/2022 - 16:54 नवीन
घरात मराठी बोलत नाही तरी पण मराठी म्हणे.
असे असु शकते आणि माझा एक गमतीशीर अनुभव आहे. मी काम करत असलेल्या बेंगलोर स्थित कंपनीत काही फ्रेशर्स जॉईन झाले होते. त्यात मराठी मुलामुलींचाही एक ग्रुप होता. मी ही मराठी असल्याने कँटीन मध्ये ओळखपाळख झाली .एकदा त्यांच्या सोबत बसलो असताना एका दणकट तरुणाकडे बोट दाखवुन एक मुलगी म्हणाली कि सर हा पंजाबी आहे आणि मराठी मध्येच बोलतो. बोल रे मराठी असे म्हणाली आणि सगळे हसु लागले. त्या तरुणालाही कदाचित सवय असावी व ह्यावरुन अनेक विनोद ही झाले असावेत म्हणुन तो ही हसु लागला. मला म्हणाला कि मी कल्याणमध्ये लहानाचा मोठा झालोय आणि चांगले मराठी बोलतो. मी त्याला म्हणालो भारतातल्या दोन अगदी शक्तीशाली गर्जना तू अभिमानाने म्हणु शकतोस "हर हर महादेव" आणि "जो बोले सो निहाल सत श्री अकाल" ह्यावर तो फारच खुश झाला आणि म्हणाला अशी प्रतिक्रिया आता पर्यंत कोणी दिली नव्हती. तेव्हा कोणी घरी जरी मराठी बोलत नसले तरी तो अस्सल महाराष्ट्रीयन असु शकतो.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Fri, 04/29/2022 - 17:02 नवीन
तेव्हा कोणी घरी जरी मराठी बोलत नसले तरी तो अस्सल महाराष्ट्रीयन असु शकतो.
अगदी बरोबर.. फार छान किस्सा.. आणि असे अनेक किस्से असू शकतात. फार काय अनेक मुस्लिम लोक घरात भले हिंदी बोलतात पण त्यांचं मराठी बोलणंही खूप छान असतं. मला आठवतंय माझा एक जुना सहकारी होता शोएब नावाचा. सोलापूरचा होता पण त्याचे मराठी उच्चार अगदी पुणेरी वळणाचे होते. .."मला मराठी येतं" असं त्याला वेगळं सांगावंही लागत नसे तो नेहमी मराठीच बोलायचा.. आता अशा माणसाला केवळ त्याच्या घरात हिंदी बोलली जाते म्हणून अमराठी म्हणायचे का ?
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 04/29/2022 - 19:29 नवीन
फार काय अनेक मुस्लिम लोक घरात भले हिंदी बोलतात
आपली राज्य /प्रदेश आणि भाषा अशी चर्चा सुरु आहे ना ? मग हे धर्माचं कुठून आलं मध्येच ?
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Fri, 04/29/2022 - 20:50 नवीन
मग हे धर्माचं कुठून आलं मध्येच ?
धर्माचं आलं नाही. फक्त घरात हिंदी बोलतात हे नमूद केलंय.. आणि घरात हिंदी बोलण्याचं कारण कदाचित (कदाचितच हं.. मी काही खात्रीशीर दावा करत नाही) त्यांचं मुस्लिम धर्मीय असणं हे असू शकेल. तरी धर्माच्या उल्लेखाकडे दुर्लक्ष केला तरी चालेल,.. हवं तर ते वाक्य असं वाचा " फार काय अनेक मुस्लिम लोक घरात भले हिंदी बोलतात" .. आणि मग फक्त हे अनेक लोक कोणते आणि ते घरात हिंदी का बोलतात ते मात्र मला विचारु नका :)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 7 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 8 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 8 hours ago
  • सुंदर !!
    1 day 8 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 8 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा