Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
काथ्याकूट

ताज्या घडामोडी- जानेवारी २०२२

व
वामन देशमुख
Sat, 01/01/2022 - 08:49
🗣 213 प्रतिसाद

सर्व मिपाकरांचे २०२२ मध्ये नववर्षाभिनंदन!

या वर्षात उत्तरप्रदेशासहित इतर राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत.

उत्तरप्रदेशात पुन्हा एकदा भाजप सरकार बनवेल असा निष्कर्ष काढणारी एक कल चाचणी प्रसिद्ध झाली आहे.

अर्थात, अशा कल चाचण्यांची विश्वासार्हता हा चर्चेचा विषय असतो.


  • Log in or register to post comments
  • 55244 views


वाचनखूण लावा
| 55244 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

🗣 चर्चा (213)
च
चंद्रसूर्यकुमार Sat, 01/01/2022 - 08:58 नवीन
ओपइंडिया हे उजव्या गटाचे पोर्टल आहे. (जसे वायर किंवा स्क्रोल डाव्या गटाची पोर्टल आहेत त्याप्रमाणे). त्यामुळे त्यांच्या जनमत चाचणीला तितका अर्थ नाही. २०१७ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये वेगवेगळे ओपिनिअन पोल्स पुढीलप्रमाणे आले होते ते https://en.wikipedia.org/wiki/2017_Uttar_Pradesh_Legislative_Assembly_election#Opinion_polls वर बघायला मिळतील. बहुतेक वेळा ओपिनिअन पोल फसले तरी एक्झिट पोल त्यामानाने अधिक विश्वासार्ह असतात. पण २०१७ मध्ये उत्तर प्रदेशात एक्झिट पोल्सचीही कशी ऐशीकीतैशी झाली होती हे पुढील चित्रात बघायला मिळेल. Image removed. त्यातल्या त्यात इंडिया टुडे-अ‍ॅक्सिसचा एक्झिट पोल विश्वासार्ह मानता येईल. बाकी सगळे एक्झिट पोल अगदीच गंडले होते.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 01/02/2022 - 15:20 नवीन
यापुढे आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी करू नये”, संजय राऊतांचा पंतप्रधानांवर निशाणा! https://www.loksatta.com/maharashtra/sanjay-raut-shivsena-mocks-pm-narendra-modi-on-12-crore-bulletproof-car-pmw-88-2743649/ गाडी, पंतप्रधानांसाठी आहे... उद्या जर परमपूज्य राहुल गांधी, पंतप्रधान झाले तर, त्यांना पण विमाना बरोबर, गाडी पण मिळेल ...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 01/02/2022 - 15:24 नवीन
“शिव्या देती, बघून घेतो म्हणती, हे भविष्य आमच्या हाती, मी राष्ट्रवादी”, व्हिडीओ ट्वीट करत भाजपा नेत्याचा गंभीर आरोप https://www.loksatta.com/mumbai/bjp-leader-keshav-upadhye-allegations-on-ncp-mla-tweet-a-video-pbs-91-2743390/ कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, जनतेच्या भल्यासाठी विचार करत नाहीत, हे माझे वैयक्तिक मत आहे....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 01/02/2022 - 15:30 नवीन
https://maharashtratimes.com/international/international-news/india-china-china-announces-standardized-official-chinese-names-for-15-more-places-in-arunachal-pradesh/articleshow/88612455.cms परमपूज्य जवाहरलाल नेहरू यांच्या चुकीची फळे निस्तरायला अजून किती तरी वर्षे लागतील... भाजप, ही माझी शेवटची आशा आहे...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 01/03/2022 - 06:49 नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh/indias-national-covid-19-vaccination-programme-is-one-of-the-most-successful-and-largest-vaccination-programmes-in-world-hrc-97-2744541/ परमपूज्य राहुल गांधी, यावर काय भाष्य करतात? हे बघणे रोचक ठरेल ...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 01/03/2022 - 06:57 नवीन
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/corona-omicron-in-maharashtra-covid-19-cases-rise-in-mumbai-most-of-the-youth-infected/amp_articleshow/88658819.cms आता ही पण चुकी केंद्राचीच बरं का, असेही कुणीतरी सांगण्याची शक्यता आहे....
  • Log in or register to post comments
य
योगेश कोलेश्वर Mon, 01/03/2022 - 11:59 नवीन
१५ ते १८ वयो गटातील मुलांना covacin देणार आहेत म्हणे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 01/03/2022 - 12:56 नवीन
https://maharashtratimes.com/career/career-news/schools-in-mumbai-remain-shut-till-january-31st-announced-by-bmc-commissioner-chahal/articleshow/88665840.cms बियर बार मध्ये करोना घुसत नाही, असे वाटते... कदाचित, बियर बार मधले भाव "करोनाला" परवडत नसावेत.. ज्ञानालये बंद, मदिरालये चालू... आनंद आहे...
  • Log in or register to post comments
स
सुक्या Tue, 01/04/2022 - 02:12 नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh/pm-narendra-modi-was-arrogant-on-farmers-issues-meghalaya-governor-malik-s-allegation-zws-70-2745778/ सधारणपणे राज्यापाल हे राष्ट्रपतींचा प्रतीनिधी म्हणुन काम करत असतात. ते पद हे राजकीय बाबतीत तटस्थ असावे असा साधारण संकेत आहे. मेघालय चे राज्यपाल सत्यपाल मलिक हे सतत मोदी विरोधी वक्तव्य करीत असतात. साधारण त्यांचा सुर हा भाजप विरोधी असतो. हे कितपत उचित आहे. राज्यापाल अशी राजकीय भुमीका घेउ शकतात का?
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 01/04/2022 - 03:44 नवीन
सत्यपाल मलिक अशी वक्तव्ये करून भाजपला अडचणीत आणत आहेत हे बघून मला असुरी का काय म्हणतात तो आनंद होत आहे. उगीच बाहेरच्या पक्षातील घाण घरी घेऊन असल्या लोकांना महत्वाची पदे द्यायची अनावर हौस भाजपच्या लोकांना असते. बाहेरची घाण घरात घेतली की मग कधीतरी वास यायला लागणारच तसे आता होत आहे. सत्यपाल मलिक हे गृहस्थ मुळचे समाजवादी. १९७४ मध्ये चौधरी चरणसिंगांच्या भारतीय क्रांतीदल पक्षाकडून सगळ्यात पहिल्यांदा ते उत्तर प्रदेश विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले. मग काँग्रेस, जनता दल, समाजवादी पक्ष असा प्रवास त्यांनी केला आहे. १९८९ मध्ये जनता दलाचे उमेदवार म्हणून ते लोकसभेवर पण निवडून गेले होते. मुळचे समाजवादी नेते आपापसातच किती वेळा भांडले आहेत, कितीवेळा एकत्र आले आहेत आणि कितीवेळा फुटले आहेत याची गणती ठेवणे कोणत्याही मर्त्य मानवाला शक्य असेल असे वाटत नाही. अशा माणसाला पक्षात घेतल्यावर तो सौजन्याने वागेल ही अपेक्षा करणेच चुकीचे आहे. आपल्या मुळच्या स्वभावाला अनुसरून कधीतरी आपल्याच पक्षाविरोधात तो उलटणारच. त्यांना राजकारणात आणणार्‍या चौधरी चरणसिंगांनी तरी वेगळे काय केले होते? दुसरे म्हणजे याच सत्यपाल मलिकांना मोदी सरकारने काश्मीरचे राज्यपाल या महत्वाच्या पदावर नेमले होते. काश्मीरच्या राज्यपालांची यापूर्वीची यादी बघितली तर त्यात बी.के.नेहरू किंवा जगमोहन यांच्यासारखे कुशल प्रशासक किंवा के.व्ही.कृष्णराव, एस.के.सिन्हा असे निवृत्त सेनाधिकारी किंवा गिरीशचंद्र सक्सेना यांच्यासारखे निवृत्त रॉचे संचालक अशी मोठी नावे दिसतील. त्या तुलनेत सत्यपाल मलिक हे नाव अगदीच किरकोळ दिसते. ना प्रशासन हाताळायचा ट्रॅक रेकॉर्ड ना लष्करातील अनुभव ना दहशतवादविरोधी मोहिम चालवायचा अनुभव तरीही एकदम काश्मीरचे राज्यपाल या महत्वाच्या पदावर का नेमले हे समजले नाही. की कठपुतली म्हणून कोणाला तरी ठेऊन केंद्र सरकारच कारभार बघणार अशी व्यवस्था होती काय माहित. अशी बाहेरील घाण पक्षात घेतली आणि त्या लोकांनी पक्षाला अडचणीत आणणारी विधाने केली की मला फार म्हणजे फार आनंद होतो. असेच व्हायला हवे. निदान त्यातून तरी बाहेरून पक्षात घ्यायचे तर सरबानंद सोनोवालांसारखे चांगले लोक घ्यावेत, मधुकरराव पिचड किंवा पदमसिंग पाटील किंवा हे सत्यपाल मलिक यासारखी घाण नको हे पक्षाला समजेल ही अपेक्षा. मोदींच्या कार्यपध्दतीला अनुसरून ते या सत्यपाल मलिकांची दखलही घेणार नाहीत आणि त्यांचा दुसरा यशवंत किंवा शत्रुघ्न सिन्हा करणार हे उघड आहे.
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Tue, 01/04/2022 - 04:34 नवीन
चं सु कु, तुमचा राजकिय व्यासंग पाहुन अचंबित व्हायला होते. पुढे मागे प्रशांत किशोरांसाठी पर्याय म्हणुन तुमचे नाव दिसले तर आश्चर्य वाटणार नाही.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 01/04/2022 - 04:39 नवीन
गुगल आणि विकीपीडीया हाताशी असले की काही प्रश्न नसतो :)
  • Log in or register to post comments
स
सुक्या Tue, 01/04/2022 - 08:24 नवीन
धन्यवाद चंद्रसूर्यकुमार. सध्या तरी भाजपा / मोदी / शहा वगेरे त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. परंतु अशा लोकांमुळे पदाची तमा राहत नाही. तसेही एखाद्याला राज्यपाल करणे हे त्याला राजकीय कारकर्दी पासुन दुर करणे असेच आहे. बाकी तुमचा प्रतीसाद नेहेमीप्रमाणे माहीतीपुर्ण आहे हे वेगळे सांगणे नको.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 01/04/2022 - 09:29 नवीन
हो बरोबर. राज्यपाल या पदावर असताना अशी केंद्र सरकारवर टीका करणे अयोग्य आहे. जानेवारी १९९३ मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल सी.सुब्रमण्यम यांनी गोव्यात इंडिअन सायन्स काँग्रेसच्या अधिवेशनात भाषण केले होते. बाबरी पाडल्यानंतरच्या परिस्थितीत ही परिषद झाली होती. भाषणानंतर चहापानाचा कार्यक्रम होता त्यावेळी अनौपचारीक गप्पांमध्ये सी.सुब्रमण्यम म्हणाले-- "अयोध्येत काहीच झाले नाही असे आपण का समजत आहोत? आपल्या देशापुढे संकट आले आहे याकडे आपण का दुर्लक्ष करत आहोत? तसेच पंतप्रधान सगळे निर्णय घ्यायची जबाबदारी आपल्या अंगावर का घेत आहेत? त्यांनी आपल्या सहकार्‍यांना निर्णय घ्यायची मोकळीक दिली पाहिजे." त्या गप्पांच्या वेळी पत्रकारही उपस्थित होते. लगोलग बातमी झळकली- राज्यपाल सी.सुब्रमण्यम यांनी पंतप्रधान नरसिंह रावांवर टीका केली. वास्तविकपणे पंतप्रधानांवर टीका करायचा राज्यपालांचा उद्देश नव्हता पण व्हायचे ते नुकसान झाले. त्यावेळी सी.सुब्रमण्यम यांनी अचानक राज्यपालपदाचा राजीनामा दिला त्यामागे हे कारण होते. म्हणजे पंतप्रधानांवर थेट टीका न करताही, तसा उद्देश नसतानाही तशी बातमी आली हे राज्यपालपदाच्या गरीमेला योग्य नाही म्हणून राजीनामा त्यांनी दिला होता. आणि इथे हे राज्यपाल असल्या कसल्याही गोष्टींचा विचार न करता थेट टीका करत सुटलेत. राजकारणामुळे मोदी मलिकांची दखलही घेणार नाहीत ही गोष्ट वेगळी. तरीही राज्यपालांनी असे करणे अयोग्य आहे.
  • Log in or register to post comments
न
निनाद Tue, 01/04/2022 - 03:32 नवीन
पाकिस्तानने २५ चीनी बहु-भूमिका J-10C लढाऊ विमानांचा एक पूर्ण स्क्वॉड्रन खरेदी केला आहे. विशेष म्हणजे भारताने घेतलेल्या राफेल विमानांचा मुकाबला करण्यासाठी पाकिस्तानने ही चिनी लढाऊ विमाने खरेदी केली आहेत. J-10, चेंगडू एअरक्राफ्ट इंडस्ट्रीने चीनमध्ये विकसित केलेले सिंगल-इंजिन, हलके मल्टीरोल फायटर आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 01/04/2022 - 05:43 नवीन
राफेल सोडाच तेजस बरोबर सामना करण्या पुरते J १० ठीक आहेत. https://eurasiantimes.com/china-aggressively-upgrading-its-j-10-fighter-jets-why-indias-hal-tejas-lags-behind-the-plaaf-aircraft/ मुळात त्याचे चिनी इंजिन आणि चिनी क्षेपणास्त्रे कितपत भरवशाची आहेत याबद्दल चिनी लोकांनाच खात्री नाही. पाकिस्तानची आर्थिक शक्ती आणि एकंदर स्थिती पाहता ज १० हि खोगीरभरतीच ठरेल यात शंका नाही
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 01/04/2022 - 11:27 नवीन
ह्यात मुलतः काही फरक नाही .... आर्थिक दृष्टीने, पाकिस्तान हळूहळू, चीनचा अंकित होत आहे, असेच वाटते आणि असे कर्जबाजारी देश, इतर शेजारी देशांना घातक ठरण्याची शक्यता जास्तच ...
  • Log in or register to post comments
न
निनाद Tue, 01/04/2022 - 03:39 नवीन
भारतीय इतिहासात प्रथमच, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या व्हीव्हीआयपी सुरक्षेच्या पथकात ३२ महिला लढवय्यांचा समावेश असलेली महिला कमांडोची पहिली तुकडी तैनात करेल . नव्याने घेतलेल्या निर्णयानुसार, जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत महिलांना व्हीआयपींसोबत तैनात केले जाईल. महिला कमांडोंनी अलीकडेच व्हीआयपी सुरक्षा कर्तव्ये, नि:शस्त्र लढणे, आणि विशेष शस्त्रे गोळीबार करण्याचे त्यांचे १० आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. समाजातील महिलांचा दर्जा मजबूत करण्यासाठी आणखी एक पाऊल म्हणून पाहिले जाऊ शकते.
  • Log in or register to post comments
न
निनाद Tue, 01/04/2022 - 03:44 नवीन
१५ वर्षांपूर्वी उमेश रायने हिंदू धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारला होता. त्यांनी स्वतःचे नाव अब्दुल्ला असे ठेवले. तो आता आपल्या मूळ हिंदू धर्मात परत आला आहे. गावातील काली मंदिरात ग्रामस्थांनी घर वापसी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शिया वक्फ बोर्ड माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनीही गाझियाबाद येथे देवी मंदिरात अलीकडेच हिंदू स्विकारला आहे. रिझवी यांचे नाव जितेंद्र नारायण स्वामी ठेवण्यात आले. यावेळी बोलतांना ते म्हणाले होते की भारतीय मुस्लिम एकेकाळी हिंदू होते. शतकानुशतके इस्लामिक आक्रमण आणि मुघल राजवटीत त्यापैकी बहुतेकांचे जबरदस्तीने इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आले होते.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 01/04/2022 - 10:00 नवीन
गोव्यात महाराष्ट्राप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी महाविकास आघाडी करणार असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. त्यांनी माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची भेट घेतली आणि गोव्यात विधानसभेच्या ४० पैकी ७ जागा शिवसेनेला लढायला द्यायची मागणी केली. तर गोव्यात शिवसेना भाजपला 'बीच' दाखविणार असा दावाही त्यांनी केला आहे. https://maharashtratimes.com/india-news/will-replicate-mahas-mva-alliance-formula-in-goa-polls-too-says-shiv-sena-leader-sanjay-raut/articleshow/88680103.cms एक गोष्ट कळत नाही. शिवसेनेची गोव्यात ताकद ७ जागा देण्याइतकी आहे का? आताच २०१७ ची मतांची आकडेवारी बघितली त्यात कळले की शिवसेनेने २०१७ मध्ये ३ जागा लढवल्या होत्या आणि पक्षाला तब्बल ७९२ मते मिळाली होती. https://www.indiavotes.com/ac/party/detail/51/253 तर काँग्रेसला जवळपास २ लाख ६० हजार मते मिळाली होती. म्हणजे शिवसेनेपेक्षा काँग्रेसची ताकद कित्येक पटींनी आहे. नाव घेण्याजोगा एकही नेता शिवसेनेकडे गोव्यात नाही. आतापर्यंत एकही विधानसभेची जागा कधी शिवसेनेने गोव्यात जिंकलेली नाही. तसे असेल तर मग ४० पैकी ७ जागांची अपेक्षा आणि मागणी कोणत्या आधारावर करतात हे कळत नाही. महाराष्ट्रातील कोकण हा शिवसेनेचा तथाकथित बालेकिल्ला आहे. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागूनच गोव्यातील पेडणे आणि मांदे हे विधानसभा मतदारसंघ आहेत. तिथे शिवसेनेची कामगिरी कशी होती? तिथून कधी उमेदवार तरी शिवसेनेने उभे केले होते की नाही काय माहित. दुसरे म्हणजे काँग्रेसकडून गोव्यात ४० पैकी ७ म्हणजे जवळपास २०% जागा शिवसेनेला हव्या असतील तर मग मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसला ४०-४५ जागा त्याच न्यायाने हे देणार का?
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Tue, 01/04/2022 - 13:54 नवीन
शिवसेनेची गोव्यात ताकद ७ जागा देण्याइतकी आहे का?
शिवसेनेची ताकत महाराष्ट्रात तरी कुठे आहे? जे निवडून आले आहेत ते मोदींच्या नावावर मते मागून तर आले आहेत. आता येत्या निवडणुकीत पाहूच की. वाटच पहातोय आम्ही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 01/04/2022 - 13:58 नवीन
शिवसेनेच्या जागा घटतील पण, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस, यांच्या मुळे सत्तेत राहतील अर्थात, आता शिवसेना जगेल ती सोनिया गांधी यांच्या हाताखाली पुढच्या मंत्रीमंडळात, शिवसेनेचा मुख्यमंत्री नसेल
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 01/04/2022 - 15:55 नवीन
+१ २०१४ ला मोदींच्या ऊमेदवारांवीरोधात सेनेचे ६३ आमदार मोदींमुळेच निवडून आले… बोला हर हर….. गुजरातेत पकडलेला “माल” रावसाहेबांपर्यंत यशस्वीपणे पोहोचला ह्याची ही पोहोचपावती. :)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 01/04/2022 - 17:03 नवीन
यांना, घराणेशाहीचा उदोउदो करणार्या जनतेची कमतरता नाही ... आमच्या आधीच्या पिढीने हीच चुक केली होती . त्याचे परिणाम म्हणजे, चीनला बळकटी आणि काश्मिरी पंडितांच्या हातात आणि दलाई लामा यांच्या हातात, वळकटी असो, सुशिक्षित माणसांना हे समजेलच असे नाही ...
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 01/05/2022 - 08:20 नवीन
शिवसेनेची ताकत महाराष्ट्रात तरी कुठे आहे?
सहमत. शिवसेना म्हणजे स्वतःला बैल समजणारी बेडकी आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 01/04/2022 - 15:55 नवीन
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे काय झाले? तो संपला हे खरे आहे का? आणि का ?
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 01/05/2022 - 08:25 नवीन
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे काय झाले? तो संपला हे खरे आहे का? आणि का ?
नाही. मगोप तृणमूल बरोबर युती करून विधानसभा निवडणुक लढविणार आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 01/04/2022 - 11:23 नवीन
चीनला भारताचे सडेतोड प्रत्युत्तर; गलवानमध्ये भारतीय लष्कराने फडकावला तिरंगा https://www.loksatta.com/desh-videsh/indian-army-unfurls-tricolour-in-galwan-valley-slammed-china-vsk-98-2746545/ ह्यासाठीच भाजपला पर्याय नाही, हे माझे वैयक्तिक मत आहे. परमपूज्य राहूल गांधी आणि त्यांचे चेले, आता पुरावे मागत फिरतील... उरीच्या वेळी देखील पुरावे मागत फिरत होते आणि पाकिस्ताननेच, उरीची घटना नंतर मान्य केली..
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 01/04/2022 - 12:14 नवीन
“पंतप्रधान मोदी असे हुकुमशहा आहेत, ज्याला फक्त…”, असदुद्दीन ओवैसींचा निशाणा! https://m.youtube.com/watch?v=dMbXeF0CYi0 मग ह्या वरील व्हिडियोला काय म्हणायचे?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 01/04/2022 - 14:22 नवीन
“केंद्राने काय दिलं नाही हे राज्याच्या मंत्र्यांनी लेखी द्यावं, मी राज्याची हक्काची मुलगी…”, भारती पवार यांचा हल्लाबोल https://www.loksatta.com/maharashtra/minister-dr-bharati-pawar-allegations-on-maharashtra-state-government-over-corona-infection-pbs-91-2746823/ योग्य मागणी
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 01/04/2022 - 15:50 नवीन
ST कर्मचारी तणावात,मुख्यमंत्र्यांकडे मागितली स्वेच्छा मरणाची परवानगी https://www.esakal.com/marathwada/aurangabad/st-workers-demand-euthanasia-to-chief-minister-uddhav-thackeray-glp88 ही लोक हितवादी राजवट, आता काय निर्णय घेते? हे बघणे रोचक ठरेल ...
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 01/04/2022 - 15:52 नवीन
राज्यातला हा महानॉटी मंत्री उघडपणे समाजात विष कालवता दिसत आहे, ब्राह्मण समाजावर हा मंत्री सातत्याने द्वेषपूर्ण आसुड ओढुन राज्यात ब्राह्मण समाजा विषयी विद्वेष पेटवत असतो. आज या राज्य आणि समाज द्रोही मंत्र्याने ओबीसी समाजा विषयी नीच विधान केले.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- शायरों की बस्ती में कदम रखा तो जाना...गमों की महफिल भी कितने खुशी जमती है.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 01/04/2022 - 16:59 नवीन
कॉंग्रेस जनतेच्या भल्यासाठी विचार करत नाही ... हे माझे वैयक्तिक मत आहे ...
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 01/04/2022 - 17:54 नवीन
कॉंग्रेसचा आमदार आहे आमदार चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपा नेते आहेत. ====================================== मंत्री साहेब कमालीचे मग्रुरीत वावरतात असे दिसते. ओबीसी समाजाची माफी मागायची सोडुन उलट आपल्यालाच खरा इतिहास [ त्यांना तर खरच काही माहित नाही आणि येतही नाही. ] माहित असल्याचा फुकाचा दावा ते करतात. मंत्री साहेंबाचा खोटारडेपणा उघड केला गेला :- मंत्री साहेब हे फक्त फुशारकी मारण्यात मग्न असतात आणि त्यांना काहीच येत नसल्याने ही त्यांची फुकाची फुशारकी वेळोवेळी सगळ्यां समोर उघडी-नागडी पडते, कसं तर ते असं :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- शायरों की बस्ती में कदम रखा तो जाना...गमों की महफिल भी कितने खुशी जमती है.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 01/04/2022 - 15:57 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- शायरों की बस्ती में कदम रखा तो जाना...गमों की महफिल भी कितने खुशी जमती है.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 01/04/2022 - 16:40 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- शायरों की बस्ती में कदम रखा तो जाना...गमों की महफिल भी कितने खुशी जमती है.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 01/04/2022 - 16:57 नवीन
रश्मी ठाकरे पडद्यामागून राजकारणाची सूत्र सांभाळतात : अब्दुल सत्तार https://www.tv9marathi.com/videos/rashmi-thackeray-can-handle-chief-minister-post-very-well-abdul-sattar-609183.html/amp अरेच्चा, आम्हाला तर वाटत होते की, माननीय शरद पवार आणि सोनिया गांधी, हेच राज्य चालवतात...
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 01/04/2022 - 18:23 नवीन
अत्यंत दु:ख दायक बातमी... अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे निधन झाले. त्यांचे मला भावलेले भाषण...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 01/04/2022 - 22:36 नवीन
आदरांजली
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 01/05/2022 - 11:00 नवीन
https://www.loksatta.com/maharashtra/devendra-fadnavis-criticizes-the-government-over-the-new-university-law-abn-97-2748109/lite/ ------ विद्यापीठांना पैसे आणि पायाभूत सुविधा देण्याचे काम सरकारचे आहे. त्यांच्या रोजच्या कारभारामध्ये पडण्याचा अधिकार सरकारला नाही. विद्यापीठांच्या सीनेटमध्ये जाऊन बसण्याचा वेळ आता मंत्र्यांकडे आहे. कुलगुरूंना बाबू बनवण्याचे काम या कायद्याने केले आहे. त्याच्यापलीकडे कुलगुरुंकडे आता कोणतेही अधिकार नसणार आहेत. कुलगुरुंचे सगळे अधिकार राज्य सरकारने आपल्याकडे घेतले आहेत. -------- मदिरा स्वस्त आणि ज्ञानगंगा महाग, असेच होण्याची शक्यता आहे.... ------- कोणे एके काळी, राजाचा विद्यापीठात हस्तक्षेप वाढायला लागला आणि काळाची पावले वेळीच ओळखून, चाणक्यने विद्यापीठ सोडले...(बहुतेक तरी, तक्षशिला विद्यालय असावे ... पुढे चंद्रगुप्त मौर्य राजा झाल्यावर, विद्यापीठांना स्वायत्तता मिळाली... मौर्य काळात, राजा फक्त आर्थिक मदत करत होता...) ---- तालीबानने जशी विद्यापीठे ताब्यात घेतली, तशीच गत, ह्या राजवटीत होत आहे का? अशी शंका मनांत येत आहे ...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 01/05/2022 - 16:25 नवीन
मुंबई-पुण्‍यातील विद्यापीठांचे जेएनयू करायचे आहे काय?’ आशिष शेलार यांचा ठाकरे सरकारला सवाल https://www.tv9marathi.com/politics/ashish-shelar-criticizes-mahavikas-aghadi-government-over-new-university-law-in-bjp-yuva-morcha-executive-609950.html शेलार यांनी भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी ही बाब समाजातील विद्यार्थी, पत्रकार, बुध्दीवान, विचारवंत, पालक यांच्यापर्यंत घेऊन गेले पाहिजे याचीही मुद्देसुद मांडणी केली. या कायद्याचे भविष्यात विद्यापीठांवर होणारे परिणाम किती दाहक असतील या विषयावर बोलताना शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्‍ला चढवला.. ------- विद्यापीठात, "राज्यशास्त्र" हा विषय जरूर हवा पण, "राजकारण" नको
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 01/05/2022 - 11:32 नवीन
उस्मानाबादेत शिवसेनेची पहिली शाखा उघडणारे शिवसैनिक दत्तात्रय वऱ्हाडेंनी केली आत्महत्या. आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या केल्याची माहिती ------ https://marathi.abplive.com/videos/news/the-shiv-sainik-who-opened-the-first-branch-of-shiv-sena-commits-suicide-1023093/amp ------- मद्य स्वस्त आणि कार्यकर्ते, कर्मचारी वर्ग आत्महत्या करायला लागले..... ह्या राजवटीत अजून काय काय बघायला लागेल? ते काही सांगता येत नाही ....
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Wed, 01/05/2022 - 13:16 नवीन
ही बातमी
दिसते त्यापेक्षा फारच गंभीर प्रकरण असावे. राजकारण एका बाजूला पण सुरक्षेतील ढिसाळपणा जरा जास्तच झाला.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 01/05/2022 - 13:48 नवीन
हेच परत एकदा अधोरेखीत झाले
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 01/05/2022 - 14:52 नवीन
तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, मी किमान जिवंत तरी…”, पंजाबमधील सुरक्षेतील त्रुटीनंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया https://www.loksatta.com/desh-videsh/pm-narendra-modi-told-officials-at-bhatinda-airport-to-thank-punjab-cm-for-returning-alive-sgy-87-2748373/ गृह मंत्रालयाने सांगितले की, पंतप्रधानांचे वेळापत्रक आणि प्रवासाची योजना पंजाब सरकारला आधीच कळवण्यात आली होती. प्रक्रियेनुसार, त्यांची सुरक्षा तसेच आकस्मिक योजना तयार ठेवण्यासाठी आवश्यक व्यवस्था पंजाब सरकारला करावी लागणार होती. त्यामुळे पंजाब सरकारला रस्त्याने पंतप्रधानांचा दौरा सुरक्षित करण्यासाठी आणि वाहतूक रोखण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करायला हवी होती. मात्र, तसेच घडले नाही. ------- जी कॉंग्रेस, देशाच्या पंतप्रधानाला संरक्षण देऊ शकत नाही, ती सामान्य माणसाला काय संरक्षण देणार? सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण, निवृत्त नौसैनिकाला मारहाण, ह्या गोष्टी तर, ह्याच महाराष्ट्र राज्यात घडल्या साधू हत्याकांड पण, ह्याच महाराष्ट्र राज्यात झाले आणि ते पण पोलीसांच्या समोर ... एकीकडे, "साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा," असे म्हणायचे आणि, मग, साधू हत्याकांडा वरून राजकारण करायचे ... ------ पंतप्रधान यांच्या संरक्षणा बाबतीत झालेली त्रुटी न स्वीकारता, ह्यात पण, कॉंग्रेस राजकारण करत आहेच ... सुरक्षेमधील चूक नाही तर रिकाम्या खुर्च्यांमुळे सभा न घेताच परतले मोदी; Video शेअर करत नेत्याची टीका.... (https://www.loksatta.com/desh-videsh/narendra-modi-punjab-security-lapse-congress-leader-says-pm-cancelled-rally-because-of-empty-chairs-posted-a-video-scsg-91-2748403/) ------- एक परस्पर विरोधी वाक्य पण आहेच .... "दुसरीकडे मोदींच्या सभेच्या ठिकाणी पाऊस पडू लागल्याने अनेकांनी खुर्चा, बॅनर्स आणि इतर प्रचार साहित्य डोक्यावर धरुन पावसापासून आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी सभेला हजारो लोक उपस्थित राहतील अशापद्धतीने आयोजन करण्यात आलं होतं. हजारो खुर्चा या ठिकाणी लोकांना बसण्यासाठी ठेवण्यात आलेल्या. या खुर्चांचा वापर अनेकांनी पाऊस पडाला लागल्यानंतर आसरा घेण्यासाठी केला..." (हे एक) ---- श्रीनिवास यांनी, “कथित सुरक्षेमधील चूक” या कॅप्शनसहीत हा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये सभेच्या ठिकाणी पाऊस पडत असल्याचं दिसत आहे. मात्र त्याचबरोबर सभेसाठी मंचासमोर मांडण्यात आलेल्या खुर्च्या रिकाम्याच दिसताय. सभेच्या ठिकाणी रिकाम्या खुर्च्यांच्या रांगांमध्ये उभं राहून हा व्हिडीओ शूट करण्यात आल्याचं दिसतेय. हा व्हिडीओ आधी मैदानाच्या मागील बाजूस आणि नंतर मंचाकडे पॅन होऊन सभेसाठी मैदानामध्ये गर्दी नसल्याचं दर्शवत आहे. या व्हिडीओमधून श्रीनिवास यांना सुरक्षेत चूक झाली म्हणून नाही तर रिकाम्या खुर्चांमुळे पंतप्रधानांनी सभा रद्द केली, असं सूचित करण्याचा प्रयत्न केलाय. (हे दुसरे) ------ असो, कॉंग्रेसच्या ह्या खेळ्या आता, साध्या अशिक्षित लोकांना पण ओळखता येतात ..
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 01/05/2022 - 15:01 नवीन
जी कॉंग्रेस, देशाच्या पंतप्रधानाला संरक्षण देऊ शकत नाही, ती सामान्य माणसाला काय संरक्षण देणार? आजच्या काळात कॉग्रेसी आणि देशद्रोही जणु काही समान अर्थी शब्द झालेत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Maai Bappa Vithala
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 01/05/2022 - 14:59 नवीन
महाराष्ट्राचा बेरोजगारी दर २२% पर्यंत गेला आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Maai Bappa Vithala
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 01/05/2022 - 15:22 नवीन
असेही काही सुशिक्षित लोक म्हणू शकतात ...
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Wed, 01/05/2022 - 15:43 नवीन
https://economictimes.indiatimes.com/industry/services/property-/-cstruction/emaar-group-to-develop-shopping-mall-in-srinagar/articleshow/88661414.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Wed, 01/05/2022 - 15:46 नवीन
दुबई हे जम्मू आणि काश्मीरमध्ये गुंतवणूक शोधण्यासाठी नवीन गंतव्यस्थान आहे का? https://www.outlookindia.com/website/story/india-news-dubai-is-new-destination-for-seeking-investment-in-jk/408303
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 22 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 34 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 36 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 38 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 42 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा