Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

ताज्या घडामोडी- जानेवारी २०२२

व
वामन देशमुख
Sat, 01/01/2022 - 08:49
🗣 213 प्रतिसाद
सर्व मिपाकरांचे २०२२ मध्ये नववर्षाभिनंदन! या वर्षात उत्तरप्रदेशासहित इतर राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. उत्तरप्रदेशात पुन्हा एकदा भाजप सरकार बनवेल असा निष्कर्ष काढणारी एक कल चाचणी प्रसिद्ध झाली आहे. अर्थात, अशा कल चाचण्यांची विश्वासार्हता हा चर्चेचा विषय असतो.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 55244 views

🗣 चर्चा (213)
च
चौकस२१२ Sun, 01/09/2022 - 23:21 नवीन
आग्या१९९० शेतकरी कुठेही फायदा होण्यासाठी speculation trअding करून धोका पत्करत नाही. आणि पिकाच्या / उत्पनाचाय रक्षणासाठी विमा म्हणून ऑप्शन किंवा फ्युचर वापरतो हे माहिती आहे ( मिपावर ज्यांना ऑप्शन बद्दल माहिती आहे त्यांना ) पण तुम्ही हे सारख "शहरी अर्थरेक्यांचा" काय लावलाय - मान्य आहे कि यात तुम्हाला माहिती आहे पण दुसऱ्यानला कशाला मुरख ठरवताय ? - बर तुम्ही म्हणालात कि अश्या "विम्याची" किंमत नगण्य असते.... पण किती ते नाही सांगितलंत ! एक तरी उदाहरण द्या विक्रीची किंमत - मालाची उत्पादन किंमत = कच्चा फायदा पक्का फायदा = कच्चा फायद - ऑप्शन ची किंमत खर सांगायचं तर हेजिंग ऑप्शन ने करणे किंवा शॉर्ट फ्युचर ने करणे यात फरक आहे ,, तुम्ही फ्युचर चे पण उद्धरण द्या - एकूण तुमचा राग स्पेक्युलेटर वर दिसतोय मी आधी स्पेक्युलेट असण्याचा फायदा शेतकऱ्याला कसा होतो ते सांगतले आहे पण त्यावर तुम्ही गप्प - एक मुद्याशी सहमत कि एकदम असे काय झाले कि फक्त हाच वायदा बंद करण्यात आला ! त्यावरील ऑप्शन पण बंद केले आहेत का ? आता त्याचाच अर्थ सरकार शेतकऱ्याचं विरुद्ध आहे असा निष्कर्ष असेल तर फक्त सोया का गहू, साखर यासारखे वायदे का नाही बंद केले ? त्यामुळे सरसकट आरोप करण्याआधी जरा माहिती काढा नाहीतर हे "शहरी अर्थरेक्यांचा आणि केंद्र शेतकरी हा नुसता वाटतो ! प्रूव्ह मी रॉंग प्लीज !
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Mon, 01/10/2022 - 16:21 नवीन
केंद्र सरकार शेतकरी विरोधी आहे हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. १) कांदा जीवनावश्यक वस्तू कायद्यातून वगळायचा आणि महिन्याभरात कांद्याचे भाव वाढले की कांदा निर्यात बंद करून भाव पाडायचे असले उद्योग ह्या सरकारने केले आहे. म्हणे आम्ही शेतकऱ्यांचे हित जपत असतो. २) कृषी कायदे करून APMC मधील व्यापारी आणि खाजगी व्यापारी असमान स्पर्धा ठेवून खाजगी व्यापाऱ्यांना झुकते माप दिले ( मार्केट व्यापाऱ्यांना मार्केट फी ,खाजगी व्यापाऱ्यांना कोणतीही फी आणि लायसेन्सची गरज नाही.) त्यामुळे काही दिवसांनी मार्केट बंद पडले की खाजगी व्यापाऱ्यांची मोनोपोली सुरू होणार. दुसरे म्हणजे APMC बंद झाल्यावर ज्याच्या आधारे कृषि मालाची आधारभूत किंमत ठरवली जायची ती आपोआप बंद होणार आणि सरकारच्या गळ्यातील MSP चे लोढणे गळून पडणार. शुद्ध फसवणूक आहे शेतकऱ्यांची. ३) सरकारकडून झीरो बजेट शेतीचा प्रचार . मुळात झीरो बजेट शेती असा प्रकार अस्तित्वात नाही. ह्यात शेतकऱ्याच्या श्रमाचे मोल धरले जात नाही. सरकारच्या मते झीरो बजेट म्हणजे उत्पादन खर्च शून्य! कृषी मालाला जो भाव मिळेल तो त्याचा पूर्ण नफा. मग त्याचे उत्पन्न दुप्पटच काय कितीही पट केल्याचा दावा हेच सरकार करणार. कावेबाज केंद्र सरकार. ४) एकीकडे तेलबिया लावायला सांगायचे आणि तेलबियांचे दर वाढून खाद्यतेलाचे भाव वाढले की पाम तेलावरील आयात शुल्क कमी करायचे. लगेच पाम तेल निर्यातदार देश निर्यात शुल्क वाढवून नफा कमावतात. कुठून अर्थशास्त्र शिकले आपले अर्थमंत्री कोणास ठावूक? आपले परकीय चलन बाहेर गेलेले चालेल परंतु इथल्या शेतकऱ्याला चार पैसे जादा मिळून देणार नाही. ५) सोयाबीन वायदे व्यवहार बंद करून त्याचे दर नियंत्रीत करायचे काम केंद्र सरकारने केले. वाढीव दराचा फायदा शेतकऱ्याला मिळूच नये हाच एकमेव अजेंडा आहे केंद्र सरकारचा.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 01/11/2022 - 05:02 नवीन
कांदा निर्यात बंद करून भाव पाडायचे असले उद्योग ह्या सरकारने केले आहे. म्हणे आम्ही शेतकऱ्यांचे हित जपत असतो. उत्पादनाची कमतरता झाली कि अनेक सरकारे निर्याती वर बंदी आणतात ! मागे बासमती तांदुळावर आ ली होती , भारतात असावं म्हणून निर्यात तात्पुरती बंद सरकारकडून झीरो बजेट शेतीचा प्रचार सविस्तर सांगा आधी हे झिरो बजेट म्हणजे काय ते ? एकीकडे तेलबिया लावायला सांगायचे आणि तेलबियांचे दर वाढून जास्त लागवडी मुळे उत्पादन वाढलं तर तेलाचे भाव खाली येतात वर कसे जातील ? मुबलक पुरवठा असेल तर भाव खाली जातील पाम तेलावरील आयात कमी केली याच "टाईमिंग चुकलं असले कदाचित " पुरेशी माहिति नसल्या मुळे सांगता येत नाही ५) सोयाबीन वायदे व्यवहार बंद करून त्याचे दर नियंत्रीत करायचे काम केंद्र सरकारने केले. वाढीव दराचा फायदा शेतकऱ्याला मिळूच नये हाच एकमेव अजेंडा आहे केंद्र सरकारचा. बर हे कारण आहे का वायदे बंद करण्यामागे ! पण मग हे सांगा कि "नियंत्रित" म्हणजे कमीत कमी हमी दर ना ? दराची खात्री मिळणार ना शेतकऱ्याला का नाही? म्हणजे सरकारने उलट समाजवादी पद्धतीकडे वाट चाल केली कि हो, सोया चे वायदे बंद करून भांडवलशाही स्पेक्युलेट करणाऱ्याना मुक्त बाजार बंद केला ! मग हेच तर शेतकऱ्यांना पाहिजे होते ना ? मग का आरडाओरड ? दुसरे ते हेजिंग बद्दल ,,, त्यावर काय ?
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Tue, 01/11/2022 - 06:07 नवीन
ऑक्टोबरपासून पोल्ट्री ब्रिडर्स असोसिएशन सोयाबीनच्या वाढत्या दरावरून कुरकुर करत होते. लॉबीच्या दबावाखाली येऊन सरकारने बंदी आणली असेल. माझ्या शंकेला पुष्टी देणारा कालच्या लोकसत्तातील लेख. https://www.google.com/amp/s/www.loksatta.com/arthvrutant/commodity-market-transactions-of-commodity-exchange-zws-70-2754340/lite/
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 01/07/2022 - 09:00 नवीन
पुट ऑप्शन चा प्रीमियम हि "कॉस्ट" त्याला दव्यावीच लागणार , ती विसरू नका त्यामुळे "नुकसान शून्य" असे नाही म्हणू शकत , अर्थात पुट घेणारा कोण त्यावर त्याचा फायदा तोटा ठरेल १) उत्पादक ( शेतकरी ) घेत असेल तर ही तर सरतेशेवटी गणित असे कि पीक विकून होणारा फायदा = पूट ऑप्शन चा प्रीमियम २) नुसता ट्रेडर / बाजार खेळणारा असले तर सरतेशेवटी गणित असे = जास्तीत जास्त तोटा = पूट ऑप्शन चा प्रीमियम
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Fri, 01/07/2022 - 09:26 नवीन
अर्थात पुट घेणारा कोण त्यावर त्याचा फायदा तोटा ठरेल मी शेतकऱ्याबद्दल बोलत आहे. Absolute zero नसले तरी नगण्य नुकसान होते.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 01/07/2022 - 12:53 नवीन
हा मग ठीक आहे कारण शेतकऱ्याचा नफा जर २०% असले आणि पुट ची किंमत जर ०.५% सेल तर मला भारतीय माहित नाही तुम्हाला माहिती असेल तर एखाद्य इन्स्ट्रुमेंट (लॉन्ग फ्यु च र + लॉन्ग पूट ) याची किंमत दाखवा पण "नगण्य " कसे? कारण ऑप्शन प्रीमियम कधी कधी खूप असतो ! वेळ आणि वोलॅटिलिटी यावर अवलंबून
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Fri, 01/07/2022 - 07:54 नवीन
२०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणाऱ्या सरकारने
ते उत्पन्न दुप्पट करण्यासाठीच फार्म कायदे आणले होते ज्याला शेतकऱ्यांनी प्राणपणाने विरोध केला. आता बोंबलायच नाही. चित भी मेरी, पट भी मेरा असं कसं चालेल? आता चुपचाप पूर्वीप्रमाणे APMC मध्ये माल ओता आणि तिथले दलाल देतील तेवढे पैसे घेऊन फुटा.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 01/07/2022 - 13:20 नवीन
दलाल देतील तेवढे पैसे घेऊन फुटा. १००% फूटा आणि परत येऊ नका ..
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Fri, 01/07/2022 - 14:27 नवीन
शेतकरी आपले कृषि उत्पादन व्यवहार कुठेही करो केंद्र सरकारने त्यात खोडा घालण्याचा उद्योग करू नये. कोण कोणाचे दलाल आहे हे शेतकरी जाणून आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 01/07/2022 - 14:56 नवीन
शेतकरी आपले कृषि उत्पादन व्यवहार कुठेही करो हो ना मग ह्या कायद्यामुळे "कुठेहि" विकण्याची मुभा मिळणार होती ना ?
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Fri, 01/07/2022 - 15:03 नवीन
त्याचा आणि सोयाबीन वायदे व्यवहार बंदीचा काय संबंध?
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 01/07/2022 - 15:23 नवीन
त्याचा आणि सोयाबीन वायदे व्यवहार बंदीचा काय संबंध?" नाही, पण आपण "केंद्र सरकारने त्यात खोडा घालण्याचा उद्योग करू नये" हे लिहिलेत म्हणून माझ्य प्रतिसादात ते आले
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Fri, 01/07/2022 - 15:34 नवीन
केंद्र सरकारने सोयाबीन वायदे बंदी मागे घ्यावी असे इथे कोणाला का वाटत नाही?
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 01/07/2022 - 15:40 नवीन
वरकरणी तरी हि बंदी का हे कोडे आहे ? कारण सांगितले आहे का ? कदाचित कारण हे असले कि उत्पादक पेक्षा यात "खेळणारे" जास्त असतील ! लिव्हरेज जास्त असेल ? वेळोवेळी सरकार असे निर्णय घेते उदाहरण देतो ऑस्ट्रेलयं सरकार ने बायनरी ऑप्शन वर बंदी आणली त्यामुळे सारखया अमेरिकेतील www.nadex.com नावाजलेलया मार्केट ला येथून हाकलले
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Fri, 01/07/2022 - 16:46 नवीन
वरकरणी तरी हि बंदी का हे कोडे आहे ? कारण सांगितले आहे का ? केंद्र सरकार कारण सांगत बसत नाही, डायरेक्ट बंदी लादते. ऑक्टोबरपासून पोल्ट्री ब्रिडर्स असोसिएशन सोयाबीनच्या वाढत्या दरावरून कुरकुर करत होते. लॉबीच्या दबावाखाली येऊन सरकारने बंदी आणली असेल. दुसरे काही कारण दिसत नाही. केंद्र सरकार शेतकरी विरोधी आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 01/07/2022 - 14:59 नवीन
मोदी यांनी, शेतकरी वर्गासाठी, योग्य तेच कायदे आणले होते... दलाल कसे लुबाडतात, हे कोकणी शेतकरी वर्गाला चांगलेच ठाऊक आहे. सध्या तरी, कोकणातील काही शेतकरी, स्वतः बाजारपेठ निर्माण करत आहेत.... म्हणून तर, ह्या आंदोलनात, कोकणातील शेतकरी वर्गाने, भरपूर संख्येने भाग घेतला नाही...
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 01/07/2022 - 15:31 नवीन
म्हणून तर, ह्या आंदोलनात, कोकणातील शेतकरी वर्गाने, भरपूर संख्येने भाग घेतला नाही... आहों आहात कुठे ? - भरततिल "सपूर्ण बळीराजा" यात सहभगि , अगदि सर्व राज्यात सगळी शहरे बंद नाही का झाली? फक्त दिली आणि हरियाणा नाही - त्यात शिवाय अनिवासी शिखांनी तर धर्मयुद्ध पुकारले कमाल केली , शीख शेतकरी विरुद्ध हिंदू हुकूम शहा मोदी! - आणि हो त्याशिवाय मिया खलिफा सारखया त्यात होत्याच कि आणि चिमुकली ती थुम्बर्ग कि कोण - अहो जग प्रसिद्ध आहे हा " देशव्यापी शेतकरी आंदोलन इथे तर शिखांनी " भारतीय शेतकरी आणि ऑस्ट्रेल्या शेतकरी " यांचाच बादरायण संबंध जोडला , सर्व ऑस्ट्रेल्या पण बंद होते हो आहात कुठे ?
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Tue, 01/11/2022 - 09:23 नवीन
आता त्याचाच अर्थ सरकार शेतकऱ्याचं विरुद्ध आहे असा निष्कर्ष असेल तर फक्त सोया का गहू, साखर यासारखे वायदे का नाही बंद केले ? फक्त सोयाबीनच नव्हे तर तुम्ही म्हणता त्या गहू ,भात (बासमती सोडून),चना,मोहरी,यांचेही वायदे बंद केले सरकारने. आता सांगा सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे की नाही?
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 01/11/2022 - 10:56 नवीन
मोठा निर्णय आहे , काहीतरी कारण असणारच कि आणि ते कारण काय आणि ते कसे चुकीचे आहे ते सांगा ना? नुसते सरकार शेती विरोधी विरोधी काय कळणार कोणाला हा हे मान्य करतो कि जर फ्युचर नसतील तर हेजिंग कसे करणार याशिवाय हेजिंग वर जे काहीही बोललात त्याबद्दल पुढे विचारला तर गप्पं ? आणि हे खालील शेतीचे वायदे चालू आहेत कि / सोया आणि ते ३-४च का बंद केले केले https://www.mcxindia.com/products/agro-commodities https://ncdex.com/
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Fri, 01/07/2022 - 09:05 नवीन
शेतकर्यांचे फार फार तर नुष्कान होणार नाही. नशीब हे मान्य केले. तो ऑपशन किती ला घ्यावा कुणाकडून घ्यावा (दुष्ट अदानी की दुष्ट अंबानी इत्यादी) याबाबत फेट्या खालचं डोकं चालेल असं वाटत नाही. गैरसमज आहे तुमचा. व्यापारी आणि शेतकरी खुबीने वापर करतात ऑप्शनचा. कृषि कायदे हे अवघड जागेचे दुखणे झाले आहे भक्तांसाठी आणि केंद्र सरकारसाठी, त्यामुळे सोयाबीन वायद्यांवर बंदी आणून सरकार शेतकऱ्यांवर सूड उगवत आहे. शेतकरी अर्थसाक्षर झालेले बघवत नाही केंद्र सरकारला आणि "शहरी अर्थरेक्यांना".
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Fri, 01/07/2022 - 18:26 नवीन
व्यापारी आणि शेतकरी खुबीने वापर करतात ऑप्शनचा
"व्यापारी आणि"? व्यापारी तर दुष्ट लोकांमध्ये धरायचे होते ना बडे भाई? बाकी शेतकरी ऑपशन्स चा खुबीने वापर करतात हे ऐकून डोळे भरून आले. रुमाल आहे का? आमच्यावेळी असं नव्हतं !!
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Sat, 01/08/2022 - 08:03 नवीन
बाकी शेतकरी ऑपशन्स चा खुबीने वापर करतात हे ऐकून डोळे भरून आले. रुमाल आहे का?
कोणी शेतकरी ऑप्शन्सवर क्लास घेतात का? आमच्या साठेसाहेबांपेक्षा चांगले शिकवत असतील तर त्यांच्याकडून ट्रेनिंग घेईन म्हणतो :) :) बाकी पुट ऑप्शन विकत घेतले म्हणजे तोटा होत नाही हे वाचून अतीव मौज वाटली. म्हणजे ऑप्शन विकणार्‍यांनी अमर्याद तोटा होणार ही शक्यता असूनही दुसर्‍या पार्टीचा फायदा होईल अशाप्रकारच्या स्ट्राईक प्राईसला आणि ते पण स्वस्तात ऑप्शन विकावेत अशी अपेक्षा वाटते. अपेक्षा कोणी कसल्याही ठेऊ शकतो. त्याला कसलीच ना नाही. पण त्या पूर्ण होतील ही अपेक्षा ठेवणे म्हणजे मूर्खपणाच.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Sat, 01/08/2022 - 09:15 नवीन
Agri commodity शिकवायला ब्रम्हदेव जरी आला तरी शिकवू शकणार नाही. एक तर हेजिंग कशाशी खातात ते माहीत नाही, त्यात स्वतः agri producer किंवा व्यापारीही नाहीत. Speculation treding करायची आहे तर equity , commodity , currency derivatives ई. आहेत त्यात हात मारा.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 01/08/2022 - 13:34 नवीन
स्वतः agri producer किंवा व्यापारीही नाहीत आपण स्त्री नसला तर स्त्रीरोग तज्ज्ञ होताच येणार नाही म्हणताय का? बाकी चालू द्या तुमचं
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Sat, 01/08/2022 - 13:53 नवीन
"शहरी अर्थरेक्यांना" प्रतिसादही नीट वाचता येत नाही.पण पचकता छान येते. करूनच दाखवा without agri stock हेजिंग.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Sun, 01/09/2022 - 01:57 नवीन
करूनच दाखवा without agri stock हेजिंग. तुमच्या वरील विधानाचा अर्थ काय? सविस्तर सांगा नाही तर सोडून द्या स्टॊक म्हणजे ज्यावर वायदा आहे ते पीक ? कि शेअर ? हेजिंग दोन्हीचे करता येते . वायदा द्वारे किंवा ऑप्शन असतील तर .. त्यात एवढे गूढ काय आहे ? ज्याला यात रस आणि जरुरी आहे तो अभ्यास करून हे वपरतो १) उत्पाद ( तेल ) = नैसर्गिक रित्या "तेजी " वॉल त्यामुळे भाव पडल्यास हेजिंग - २) विकत घेणारा ( विमान कंपनी ) पुढे दर वाढले तर ? म्हणून हेजिंग ३) फक्त व वायदा "उलाढाल" करणारा
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Sun, 01/09/2022 - 02:09 नवीन
एक तर हेजिंग कशाशी खातात ते माहीत नाही? येथे एक दोघांनी जे सविस्तर प्रतिसाद दिले आहेत तुम्हाला त्यावरून कोणी असे म्हणले असे वाटतं नाही तुम्ही "फक्त शेतकरी हे करू शकतो आणि समजतो" हा धोशा उगाच लावलाय ज्याला त्यात भाग घ्याचा तो अभयास करतो दुसरे: आपण शेतकरी किंवा व्यापारी असाल तर हेजिंग चे एक उद्धरण देऊन सांगा ना म्हणजे आमचं सारखया अडाण्यांना कळेल तरी Speculation treding करायची आहे तर equity , commodity , currency derivatives ई. आहेत त्यात हात मारा. आता खरा हेतू स्पष्ट झाला अग्याभाऊ म्हणजे तुम्हाला म्हणायचं कि स्पेक्युलेटर नि शेती वायदे किंवा ऑप्शन मध्ये भाग घेऊ नये? का? हे दोन बाजार सगळ्यानं खुले आहेत आणि अतिशय महत्वाचाच मुद्दा - जर शेती माल वायदे फक्त उत्पादकाला उघडे ठेवले तर ते एकमेकात खेळत बसतील कारण फ्युचर मध्ये "झिरो सम गेम "असते ! त्यामुळे एका तरी शेतकऱ्याचे नुकसान होईल त्यापेक्सह स्पेक्युलेटर चे नुकसान शक्यता असेल तर शेतकऱ्यांना बरेच नाही का? शेत्करि विन विन ! काय समजला का हा तर्क? - याउलट स्पेक्युलेटर मुले -लीक्विडिटी वाढते हे विसरू नका असो कळात नाहुये तुम्ही नक्की काय वाद घालताय ते ! का केवळ " मोदी शेतकरी विरुद्ध " या एका समजुती मुले हा विचित्र अजेंडा राबवताय !
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Sun, 01/09/2022 - 11:02 नवीन
माझा अजेंडा मोदी हे शेतकरी विरोधी आहे हे मी लपवलेले नाही. पहा माझी पोस्ट. https://www.misalpav.com/comment/1130170#comment-1130170 ह्याला उत्तर देण्याची एकाचीही कुवत नाही. जे मी लिहिले नाही त्यावर चर्चा करत बसले. ( शेतकऱ्यांना वायदे व्यवहारात फक्त फायदाच होईल असे मी कुठेच दावा केला नसताना) तुम्हीही तांत्रिक बाबी विचारल्या ज्यात तुम्हाला रस आहे असे म्हणाला म्हणून मी मला जमेल तसे उत्तर दिले. अचानक तुम्ही राजकीय प्रश्न तुम्ही विचारला ( सोयाबीन वायदे बंदी मागे काही कारण?) त्यालाही मी उत्तर दिले. त्यावर तुम्ही काहीही भाष्य केले नाही. सिलेक्टिव वाचन सोडा माझ्या सगळ्या पोस्ट नीट वाचा उत्तर मिळेल. उगाच वकीली करायच्या फंदात पडू नका.
  • Log in or register to post comments
T
Trump Sun, 01/09/2022 - 11:05 नवीन
माझा अजेंडा मोदी हे शेतकरी विरोधी आहे हे मी लपवलेले नाही.
कोणतेही सरकार किंवा व्यक्ती शेतकरीविरोधी आहे हे कसे ठरवता ?
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Sun, 01/09/2022 - 11:08 नवीन
........ रामाची सीता कोण?
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 01/11/2022 - 05:18 नवीन
कोणाची वकिली करीत नाहीये , प्रश्न समजवून घेतोय आणि वायदे आणि ऑप्शन बद्दल माहिती असल्यम्मुले पुढे प्रश्न विचारत होतो आत्ताच आदींचं पोस्ट ला उत्तर दिली आहे ५ मुद्दे अचानक तुम्ही राजकीय प्रश्न तुम्ही विचारला ( सोयाबीन वायदे बंदी मागे काही कारण?) तो प्रश्न राजकीय नवहता कारण अशी एखाद्याच वायद्यवर बंदी हे आस्चर्य आहे , म्हणून विचारले एकतर स्पेक्युलेशन वाढल्याने असावी , म्हणजे स्पेक्युलेटर कि शेतकरी तर स्पेक्युलेट नाही तुमचहय मते मग का विरोध? तुम्ही सरळ सरकार विरोधी अजेंडा आहे हे मेनी करता दुसऱ्यांना ""शहरी अर्थरेक्यांना"" असली बिरुदे लावता मग ते राजकीय नाही का ? शेतकऱ्यांना वायदे व्यवहारात फक्त फायदाच होईल असे मी कुठेच दावा केला नसताना) तो दावा दुसर्याने केला त्याला उत्तर देत होतो पण तुमचे हे जे कि "हेजिंग कशाशी खातात हे माहित नाही" त्यावर बोला ? त्याची उदाहर्ने मी दिली आहेत त्याला १-२ जणांनी उत्तर दिले आहे ... ( सर्वसामान्यांना माहिती नसेल पण जो यात खेळतो ( शेतकरी पण किंवा त्याचा सल्लागार ) त्यांना असते ! " शहरि अर्थरेकी " असे तुच्चतेने म्हणून काय होतंय? एकदा तुम्ही हेजिंग चा खर्च नगण्य म्हणून म्हणालात तर उदाहरण द्या % काय ते ? तेवहा गप्प
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 01/11/2022 - 05:53 नवीन
एक मूलभूत प्रश्न- सोयाबीनचे ऑप्शन्स नक्की कोणत्या एक्स्चेंजवर ट्रेड व्हायचे? भारतात कोमोडिटी ट्रेडिंगसाठीचे मुख्य एक्स्चेंज आहे एम.सी.एक्स. तिकडच्या मार्च २०२१ च्या (म्हणजे सोयाबीनच्या वायदे व्यवहारांवर बंदी घातली जायच्या आधीची गोष्ट) भावकॉपीमध्ये थोडीफार लिक्विडिटी केवळ क्रूड ऑईलच्या ऑप्शन्समध्ये दिसली. दुसरे एक्स्चेंज आहे National Commodity and Derivatives Index. तिथे नावाला सोयाबीनचे ऑप्शन दिसले पण सगळ्या स्ट्राईक्सना ओपन इंटरेस्ट आणि व्हॉल्युम दोन्ही शून्य दिसले. याचा अर्थ कोणी इंट्राडेमध्येही ते ऑप्शन ट्रेड करत नाही. तेव्हा सोयाबीन ऑप्शन ट्रेड व्हायचे त्याकाळातील ऑप्शन चेन कोणी पोस्ट करू शकेल का? म्हणजे नक्की किती शेतकरी हे पुट ऑप्शन घ्यायचे हे तरी बघता येईल. त्यातून सगळी उत्तरे मिळतील. आणि हे ऑप्शन एक्स्चेंज सोडून इतर ठिकाणी ट्रेड होत असतील तर मग परत 'शेतकर्‍यांना फसवलं' हे रडगाणं असेल तर त्याला सरळ फाट्यावर मारावे. बाकी शहरी अर्थरेकी, हेजिंग कशाशी खातात हे माहित नाही वगैरे असे उद्दाम आणि निरर्थक प्रतिसाद पाहता हे महाशय एकतर संक्षींचे किंवा अभ्याचे शिष्य असावेत असा दाट संशय येतो. असले काही लिहिले की मग त्या आय.डीशी चर्चा करण्यात अर्थ नसतो हे समजतेच. हे मी इतरांच्या माहितीसाठी लिहित आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 01/11/2022 - 11:09 नवीन
सले काही लिहिले की मग त्या आय.डीशी चर्चा करण्यात अर्थ नसतो हे समजतेच. हे मी इतरांच्या माहितीसाठी लिहित आहे. धन्यवाद चं सु का अगदी मुद्य्यांचा बोललात धन्यवाद चं सु का अगदी मुद्य्यांचा बोललात त्यांचा जाऊदे त्यांचा अजेंडा एकखांबी तंबू प्रकारचा विरोध दिसतोय, राग दितोय सरकार आणी स्पेकुलेटर ( जे जरुरि असतात लि॑क्विडिटि साठि) वर! आपण बोलू (त्यन्चि फक्त एकच गोष्ट तर्कशुद्ध वाटली ती म्हणजे = हे ऑप्शन आणि फ्युचर बंद केल्यावर शेतकरी हेज करणार कसे ! ) असो माझे तांत्रिक मत असे आहे ( चुकीचे असू शकते ) कि - शेतकरी म्हजे उत्पादक तेव्हा त्याला जर तो लॉन्ग असतो हेज करायांचे असेल तर तो ऑप्शन पेक्षा फ्युचर मध्ये शॉर्ट करेल ! ऑप्शन प्रिनियम देण्यापेक्षा ! बरोबर आहे का ?
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 01/11/2022 - 11:37 नवीन
शेतकरी म्हजे उत्पादक तेव्हा त्याला जर तो लॉन्ग असतो हेज करायांचे असेल तर तो ऑप्शन पेक्षा फ्युचर मध्ये शॉर्ट करेल ! ऑप्शन प्रिनियम देण्यापेक्षा !
पण त्यासाठी तेवढे मार्जिनही द्यावे लागेल. फ्युचर्समधील व्यवहारांसाठीचे मार्जिन ऑप्शन प्रिमिअमपेक्षा बरेच जास्त असते. शेतकरी 'नॅचरली लाँग' असल्याने त्याला फ्युचर्समध्ये शॉर्ट करायला मार्जिन द्यावे लागणार नाही असे निदान माझ्या माहितीतल्या कोणत्याही एक्सचेंजमध्ये करत नाहीत. या महाशयांना दुसरे कोणते एक्सचेंज माहित असले तर कल्पना नाही. दुसरे म्हणजे अ‍ॅग्रीकल्चरल कमोडिटींच्या कॉन्ट्रॅक्ट्सची किंमत कशी चालते हे शेतकरी नसलेल्याला जन्मात कळणार नाही वगैरे शुध्द भूलथापा आहेत. मोठ्या वित्तीय संस्थांमध्ये अ‍ॅग्रीकमोडिटींचेही ट्रेडिंग डेस्क असतात. तिथे ट्रेड करणारे लोक शेतकरी असतात का? बाकी खाली अमेरिकेतील सोयाबीन फ्युचर्सचा चार्ट पेस्ट करत आहे. Image removed. यापेक्षा तर भारतातील बँकनिफ्टी समजणे आणि ट्रेड करणे अधिक कठिण जाईल. त्यात जास्त रॅन्डम मूव्हमेंट्स असतात.
हे ऑप्शन आणि फ्युचर बंद केल्यावर शेतकरी हेज करणार कसे !
हे तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे. पण त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होईल का हा दावा योग्य आहे की अयोग्य हे ठरवायला ओपन इंटरेस्टचा विदा मला पाहिजे आहे. ऑप्शन-फ्युचर्स बंद केल्यावर हेजिंग करता येणार नाही हे मान्य. पण आता नक्की किती शेतकरी असे हेजिंग करत होते? तो आकडा खूप मोठा असेल तर मग हे कॉन्ट्रॅक्ट्स बंद केल्याने शेतकर्‍यांचे नुकसान होईल यावर विश्वास ठेवता येईल. पण मुळात ओपन इंटरेस्टच जास्त नसेल तर त्याचा अर्थ जास्त शेतकरी ते वापरतच नव्हते असा होईल. मग ते ऑप्शन-फ्युचर्स बंद केल्याने शेतकर्‍यांचे नुकसान होईल असे कसे म्हणता येईल? बाकी मुद्द्यावर आधारीत चर्चेत रस नसला, तशी चर्चा करता येत नसली की मग शहरी अर्थरेकी आणि हेजिंग कशाशी खातात, अमुक कशाशी खातात, तमुक कशाशी खातात हे माहित नाही अशी भाषा पुढे येते. असो.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 01/11/2022 - 12:29 नवीन
पण त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होईल का हा दावा योग्य आहे की अयोग्य हे ठरवायला ओपन इंटरेस्टचा विदा मला पाहिजे आहे बरोबर अणि बन्दि येन्य्पुर्वि ऑप्शन प्रिमिअम किति % होत कोणाला महिति आहे ?
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 01/11/2022 - 12:32 नवीन
पण त्यासाठी तेवढे मार्जिनही द्यावे लागेल. फ्युचर्समधील व्यवहारांसाठीचे मार्जिन ऑप्शन प्रिमिअमपेक्षा बरेच जास्त असते. बरोबर पण मार्जिन वयवहार सेटल झाल्यावर परत मिळते पण प्रीमियम गेला कि गेला असो , तो सविस्तर अभ्यासाचा विषय असणार
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 01/11/2022 - 12:57 नवीन
पण मार्जिन वयवहार सेटल झाल्यावर परत मिळते पण प्रीमियम गेला कि गेला
हो. पण मुळात तेवढे पैसेच नसतील तर फ्युचर्समध्ये पोझिशन घेणार कशी? समजा एखाद्याकडे लाख-सव्वा लाख यासाठी नसतील तर ते नंतर परत जरी मिळणार असले तरी पोझिशन घेणार कशी? त्यापेक्षा सहासात हजार भरून ऑप्शन विकत घेणे सोपे होईल ना? आणि फ्युचर्समध्ये जर आपल्याला अपेक्षित असलेल्या दिशेविरोधात किंमत गेली तर मग मार्जिन कॉलही येतो तो ऑप्शन विकत घेतल्यास येत नाही. अर्थात असे अंदाधुंदपणे ऑप्शन नक्की घेऊ नयेत पण फ्युचर्स आणि ऑप्शनमध्ये हा फरक आहे.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा गुरुवार, 01/13/2022 - 04:43 नवीन
समजा आज सोयाबीन 2700 ला आहे, आणि मी सोयाबीन लावतोय, तर मग माझे गृहीतक असेल की सोयाबीन ला किमान 2700चा भाव मिळाला पाहिजे. 100रु इकडे तिकडे. अश्या स्थितीत मी 4 महिन्यांतरचा 2700 किंवा 2800 चा पुट विकत घेईन. जर भाव वाढले, तर मला 100रु चा तोटा आहे. पण वाढलेल्या भावाचा सगळा फायदा मलाच होणार आहे. जर भाव पडले, तर मला किमान 2700 ने दर नक्कीच मिळेल. हे लॉजिक आहे ऑप्शन विकत घेऊन हेजिंग चे. जर मला दराच्या वाढीचा फायदा नको असेल, तर मी फ्युचर विकून मोकळा होईन, मग उद्या सोयाबीन 4000 ला जरी गेले तरी मला ते 2700 नेच द्यावे लागेल. त्यामुळे सामान्यपणे मोठे शेतकरी काही भाग फ्युचर आणि काही भाग ऑप्शन असे करत असावेत. छोटे लोक नुसते ऑप्शनवरच करत असावेत. आणि ट्रेडर्स मोस्टली स्प्रेड्स वरती खेळत असावेत, फ्युचर घेऊन ऑप्शन विकणे वगैरे.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 01/13/2022 - 09:48 नवीन
उत्पादकाकडे तीन उपाय आहेत असे वाटते १) पूर्ण फ्युचर मध्ये शॉर्ट करणे > फायदा = प्रीमियम नाही/ तोटा = पण मार्जिन उभे करावे लागणार + मार्जिन कॉल आला तर तशी रक्कम हाती पाहिजे २) पुट विकत घेऊन > फायदा = जास्तीत जास्त तोटा = प्रीमियम (प्रीमियम गेला तर गेलं , तो एकूण उत्पादनातून होणाऱ्या नफ्याच्या % मध्ये किती आहे यावर हा उपाय अवलंबून असणार , तो किती असतो साधारण महिन्याची मुदत असेल तर ? काही कल्पना ? आग्या यांनी तो नगण्य म्हणले होते ! तोटा = प्रीमियम गेला कि गेला ३) अर्धे अर्धे !
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा गुरुवार, 01/13/2022 - 13:28 नवीन
पुट चा प्रीमियम साधारण 4/5 टक्के असतो असे दिसतेय. तेव्हढा लॉस म्हणून द्यायला काहीच हरकत नाही. 2700ला सोयाबीन लॉक करायला 130रु गेले म्हणून फारसे काही बिघडत नाही, जर सोयाबीन ही रेंज 2000 ते 4000 असेल तर, जे ऍग्री मध्ये असतेच असते. ऑप्शन विकणारा साधारणपणे अश्या ठिकाणी असतो जिथून तो दार नियंत्रित करू शकेल.. अश्या स्थितीत जर लोकांनी मोठ्या प्रमाणावर पुट विकत घेतले तर त्यांना भाव पाडणे खूप कठीण जाऊ शकते. तसे म्हटले तर ते खूप गुंतागुंतीचे आहे, पण बरेच stake holders येत असल्यामुळे तितकेच सुरक्षित पण असेल.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 01/13/2022 - 14:00 नवीन
पुट चा प्रीमियम साधारण 4/5 टक्के असतो असे दिसतेय. किती काळासाठी ४-५%? १ महिना / ३ महिने? आणि जर ५% सहज विमा म्हणून देता येत असेल तर उत्पादकांचा नफा किती % असतो नफा जर २०% गृहीत धरले तर ५% विम्या यासाठी म्हणजे जवळ जवळ २५% नफा देऊन टाकणे ? तुम्ही प्रत्यक्ष बाजारातील किमतीं देऊ शकाल का?
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 01/13/2022 - 16:13 नवीन
2700ला सोयाबीन लॉक करायला 130रु गेले म्हणून फारसे काही बिघडत नाही, जर सोयाबीन ही रेंज 2000 ते 4000 असेल तर, जे ऍग्री मध्ये असतेच असते.
५% प्रिमिअम ही माहिती नक्की कुठून मिळाली? कारण मी ती भारतातील ऑप्शन चेन शोधायचा खूप प्रयत्न करत आहे. ती लिंक देता का? दुवा द्या दुवा घ्या :) दुसरे म्हणजे ही ५% प्रिमिअमची किंमत नक्की किती कालावधीसाठी असते? आताच बघितले की निफ्टी या भरपूर लिक्विड ऑप्शनमध्ये आजपासून १४ दिवसांच्या मंथली एक्सपायरीच्या इन द मनी ऑप्शनची किंमत साधारण स्ट्राईक प्राईसच्या १ ते १.५% आहे. समजा पुढील महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट्समध्येही तितकीच लिक्विडिटी असती (जी नसते) तर अशी ४-४.५% किंमत आली असती. आणि जर कमोडिटी ऑप्शनमध्ये लिक्विडिटी तितक्या प्रमाणावर नसेल तर ते ऑप्शन जास्त महाग असायला हवेत. तेव्हा ५% प्रिमिअमवाले ऑप्शन कदाचित लांबचे असतील. म्हणजे आज किंमत समजा २९००/३००० चालू असेल तर २७०० स्ट्राईकचे ऑप्शन ५% वगैरे. तेव्हा गोम अशी की जर किंमत २९००/३००० पासून २७०० पर्यंत म्हणजे जवळपास १०% पडली नाही तर ऑप्शन विकणारा सगळा प्रिमिअम खिशात टाकून घरी जाईल. त्यामुळे ऑप्शन विकणारे अशाच स्ट्राईकचा आणि अशा किंमतीला ऑप्शन विकतात की त्या किंमतीला ऑप्शन विकला तर त्यांना तोटा व्हायची शक्यता बरीच कमी असते. बाकी २००० ते ४००० म्हणजे १००% किंमतीची रेंज? ही किती कालावधीतली असते? कारण मी वर जो चार्ट दिला आहे त्याप्रमाणे तर इतकी व्होलाटिलीटी दिसत नाही. आणि कमोडिटीच्या किंमती तितक्या प्रमाणावर व्होलाटाईल नसतातही. समजा इतकी व्होलाटाईल किंमत असेल तर ऑप्शनही अजून महाग असतील.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Fri, 01/14/2022 - 04:25 नवीन
मी जनरल स्टेटमेंट केले आहे. भारतात मलाही एक पण ऍग्री ऑप्शन मिळाला नाही. मी जे बोललो ते बहुतांशी NSE ऑप्शनअरुण बोललो. फक्त फिलॉसॉफी. एक उदाहरण देतो. 2012 साली हळदीचे उत्पादन इतके कमी झाले की क्विंटल चा दार 6000च्या पुढे गेला, आणि शेतकऱ्यांनी आणि ट्रेडर्सनि पण भरपूर कमावले. वर्षभर रेट तसेच राहिले. पुढच्या वर्षी लोकांनी इतकी हळद लावली की हळदीचे दर थेट 2000च्या घरात आले. आणि हा नियम सगळ्याच प्रॉडक्ट ना लागू होतो. माझी आंब्याची बाग आहे. जर रेट ची हमी असेल तर 10टक्के प्रीमियम द्यायला शेतकऱ्याची काहीच हरकत नसते, इतका तो volatile मामला असतो. अचानक काहीतरी होऊन निम्म्यावर दर येण्यापेक्षा काय तो प्रीमिजम जाऊदे, पण ज्या दराकडे बघून आपण पीक घेतोय तितका तरी दर मिळुदे अशी अपेक्षा असते.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Fri, 01/14/2022 - 04:26 नवीन
यासाठी एक वेगळा धागा काढुया. कसे वाटते?
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Fri, 01/14/2022 - 05:31 नवीन
हो जरूर. मला शेतीच्या कमोडिटीच्या दरांमध्ये कसे चढउतार होतात हे अजिबात कळत नसले तरी ऑप्शन्स थोडेफार कळतात. त्यावरून भावातील चढउतार, लिक्विडिटी वगैरे कारणांमुळे ऑप्शनचे नक्की काय होऊ शकते/शकेल याविषयी लिहिता येईल. शेवटी ऑप्शन कशावर आहेत याला महत्व नसते. महत्व असते भाव किती व्होलाटाईल आहेत, किती कालावधीसाठी ऑप्शन आहेत आणि लिक्विडिटी किती वगैरे गोष्टींना.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Fri, 01/14/2022 - 16:18 नवीन
शेतकरी उत्पादक कंपनीला NCDEX वरील नोंदणीकृत ब्रोकरकडे नोंदणी करून ट्रेडिंग आणि एनसीडिईएक्स’ नॅशनल ई-रिपोजिटरी लिमिटेड अकाउंट खोलावे लागते. NCDEX वर दर महिन्याचे व्यवहार चालतात. शेतकऱ्याच्या कृषि उत्पादनाचे पुट ऑप्शन प्रिमियम पूर्णपणे NCDEX भरते. ब्रोकरेज फी आणि वायदा पूर्ण केल्यास गोदामापर्यंतचा वाहतूक खर्च प्रत्येकी ५०% NCDEX भरते. त्यामुळे शेतकऱ्याचे वायदा व्यवहारात नुकसान नगण्य असते. हे कृषि उत्पादनाचे विमाकवच फक्त शेतकऱ्यांसाठी NCDEX ने उपलब्ध केले आहे.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Tue, 01/11/2022 - 11:52 नवीन
माझा सरकारवर राग असण्याचे कारण म्हणजे सरकार कुठलेही कारण न देता अचानक शेतकऱ्यांच्या विरोधी निर्णय घेते ह्यावर आहे. सप्टेंबर २०२० मध्ये सरकारने जीवनावश्यक वस्तू कायद्यातून अन्नधान्य, डाळी,कांदा,बटाटा,तेल काढून टाकले. ह्या बिलामुळेत सरकार त्यांच्या साठ्यावर, किमतीवर कोणतेही बंधन आणू शकत नाही. फक्त राष्ट्रीय आपत्ती आणि दुष्काळामुळे ह्या वस्तूंच्या किमती प्रमाणाबाहेर वाढल्या तरच सरकार हस्तक्षेप करू शकेल. सध्या तरी देशात अशी कोणतीही परिस्थिती उद्भवल्याचे दिसत नाही. एकतर शेतकऱ्यांना अर्थसाक्षर करणे कठीण काम त्यात सरकारने असे निर्णय घेऊन त्यांच्यात गोंधळ निर्माण केल्यास ते पुन्हा ह्या वाटेला जाणारही नाहीत.
  • Log in or register to post comments
T
Trump Tue, 01/11/2022 - 12:17 नवीन
हि बंधने आधीच्या सरकारच्या काळात पण होती.
सप्टेंबर २०२० मध्ये सरकारने जीवनावश्यक वस्तू कायद्यातून अन्नधान्य, डाळी,कांदा,बटाटा,तेल काढून टाकले. ह्या बिलामुळेत सरकार त्यांच्या साठ्यावर, किमतीवर कोणतेही बंधन आणू शकत नाही.
फक्त ह्या सरकारवर आगपाखड करण्याची कारणे समजली नाहीत.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 01/11/2022 - 12:26 नवीन
शहरी अर्थरेकी आणि हेजिंग कशाशी खातात, आग्या असली विधाने कशाला केलीत ? फक्त बंदी मुळे शेतकरी हेजिंग करू शकत नाहीत एवढे म्हणले असते तर पुरले असते स्वतःला शहाणा समजून दुसऱ्या कोणाला काही माहित नाही असे धरून वाटेल ते बोलू नये ! मला म्हणता मी सरकार ची वकिली करतो .. उलट मी तुमच्या बरोबर सहमत झालो कि शेतकरी हेजिंग ना करू शकल्यामुळे अडचणीत येउ शकतो ( अंध भक्त असतो तर असे म्हणले असते का? ) च सु का म्हणले तसे - किती शेतकरी खरंच हेजिंग करतात? छोटा शेतकरी करू शकतो ? डिलिव्हरी बेस असेल तर एकसारखे पीक ( कमोडिटी म्हणतात त्याला ) काढतो का? स्थानिक पिकवून स्थानिकच कीतितरी विकले जात असेल ! असो आटा कंटाळा आला .. तुम्ची आगपाखड चालू द्या
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 35 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 47 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 51 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा