Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

ताज्या घडामोडी- जानेवारी २०२२

व
वामन देशमुख
Sat, 01/01/2022 - 08:49
🗣 213 प्रतिसाद
सर्व मिपाकरांचे २०२२ मध्ये नववर्षाभिनंदन! या वर्षात उत्तरप्रदेशासहित इतर राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. उत्तरप्रदेशात पुन्हा एकदा भाजप सरकार बनवेल असा निष्कर्ष काढणारी एक कल चाचणी प्रसिद्ध झाली आहे. अर्थात, अशा कल चाचण्यांची विश्वासार्हता हा चर्चेचा विषय असतो.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 55244 views

🗣 चर्चा (213)
र
रावसाहेब चिंगभूतकर Wed, 01/05/2022 - 17:11 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
न
निनाद गुरुवार, 01/06/2022 - 03:07 नवीन
छत्तीसगड काँग्रेस सरकारने पाकिस्तानी दावत-ए इस्लामी नावाच्या संघटनेला रायपूरमध्ये १० हेक्टर जमीन देत आहे. यासाठी संघटनेने २८ डिसेंबरला अर्ज दिला होता. तो त्याच दिवशी मंजूर झाला होता!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 01/06/2022 - 09:34 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
न
निनाद गुरुवार, 01/06/2022 - 03:16 नवीन
पाकिस्तानातील सिंध प्रांतातील अनाज मंडी येथे अज्ञात हल्लेखोरांनी सुनील कुमार या ४४ वर्षीय हिंदू व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या केली आहे. पाकिस्तानमध्ये अलिकडच्या वर्षांत हिंदू अल्पसंख्याक आणि त्यांच्या मंदिरांवरील हिंसाचार वाढला आहे. हिंदूंच्या घरांची तोडफोड ते बलात्कार आणि स्त्रियांचे अपहरण, विशेषत: अल्पसंख्याक हिंदू, शीख समुदायातील लोकांच्या मंदिराची विटंबना करण्यापर्यंतच्या विविध घटना पाकिस्तान या इस्लामिक देशातून नियमितपणे नोंदवल्या जात आहेत. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील सियालकोट शहरात ईशनिंदा केल्याच्या आरोपाखाली श्रीलंकन ​​फॅक्टरी मॅनेजरची निर्घृण हत्या केली गेली आहे. या विरुद्ध कोणतेही हिंदू संघटीत आवाज उठवत नाहीत ही एक शोकांतिका आहे. प्रत्येक देशातल्या पाकिस्तानी दुतावासाला याचा जाब विचारला गेला पाहिजे. यु एन च्या मानवाधिकार संघटनेकडे याची तक्रार गेली पाहिजे. United Nations High Commissioner for Human Rights (OHCHR) General Inquiries: Telephone: +41 22 917 9220 E-mail: InfoDesk@ohchr.org Field Operations and Technical Cooperation Division (FOTCD) Contact in Geneva, Switzerland. Asia Pacific Section Tel. +41 22 928 9650
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 01/06/2022 - 09:31 नवीन
रायगडावरील ‘मदार मोर्चा’वर चादर घालून प्रार्थनास्थळ करण्याचा प्रयत्न; संभाजीराजे संतापले, पत्र लिहून केली ‘ही’ मागणी https://www.loksatta.com/maharashtra/bjp-mp-sambhajiraje-chhatrapati-demanded-to-demolish-illegal-construction-on-raigad-fort-scsg-91-2749412/ --------- ....आता हिंदूत्ववादी शिवसेना, काय निर्णय घेते? हे बघणे रोचक ठरेल...
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 01/06/2022 - 11:02 नवीन
रायगड हा केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या अंतर्गत येतो. ऊठ सूट सेनेचा धोशा लावण्यापेक्षा अभ्यास वाढवा
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 01/06/2022 - 12:53 नवीन
मराठी आणि हिंदूत्व, यांच्याच मुद्यावर शिवसेना निवडून येत होती... आणि तसेही जरा काही खूट्ट झाले की केंद्रावर ढकलायची, ह्या सरकारला खोड आहेच ... असो,
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 01/06/2022 - 14:41 नवीन
मुद्दा फक्त रायगड आणि चादरी पुरता बाहे, तेवढ्यावरच बोला.
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 01/07/2022 - 07:00 नवीन
त्याचं काय आहे की शिवसेना पूर्वी [बाळासाहेबांच्या काळात] विषय कोणाच्या अखत्यारीत येतो हे कधीच बघायची नाही. सरळ अ‍ॅक्शन असायची आणि तेच लोकांना आवडायचे. उदा: भारत-पाकिस्तानची मॅच होऊ देणार नाही म्हणत खेळपट्टी खणून ठेवणे. त्याअनुषंगानं आता शिवसेना काय करते ते पाहणे उत्सुकतेचे ठरेल, असे मुविंना म्हणायचे असावे. काय हो मुवि? बरोबर ना??
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 01/07/2022 - 13:27 नवीन
मलंग गडावर, नेलेला मोर्चा किंवा, महाआरत्या... ही आठवलेली उदाहरणे ... ह्या बाबतीत देखील, शिवसेनेने, कायदेशीर मार्गाने, कठोर भुमिका घ्यायला हवी होती.. बाय द वे, खेळपट्टी खणणे, हा भाग मला आवडला न्हवता ... जे काही करायचे आहे, ते कायदेशीर मार्गाने, करू शकतो. जसे आत्ता, शिवेंद्रराजे यांनी केले. खेद इतकाच की, हे काम शिवसेनेने करायला हवे होते ...
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 01/11/2022 - 20:43 नवीन
इतर छुप्या हिंदुत्ववादी पक्षांनी केले तर उत्तम आहे की !
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 01/12/2022 - 05:56 नवीन
छुप्या हिंदुत्ववादी कोणता पक्ष हो? "आप" कि काय? नाही म्हणजे ते युगपुरुष आजकाल बऱ्याच मंदिरांत दर्शन घ्यायला जाताना दिसतात I visit Ram temple because I am a Hindu’: Arvind Kejriwal on allegations of peddling ‘soft Hindutva’ हे महाशय तर सरड्याला सुद्धा लाज आणतात रंग बदलण्याच्या स्पर्धेत.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 01/06/2022 - 10:05 नवीन
ही बातमी
न्यायालयाचं कदाचित बरोबर आहे पण न्यायालय स्वतः अनेक दिवसाच्या सुट्टीवर असतात त्याबाबत कोणी बोलताना दिसत नाही. अनेक न्यायप्रविष्ट मुद्दे वर्षानुवर्षे न्यायालयात पडून असतात. कोणत्याही सरकारला / संस्थांना ही प्रक्रिया वेगवान करावीशी वाटत नाही काय ? सामान्य नागरीकांनी एकत्र येऊन यासाठी काही करता येऊ शकते काय ?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 01/06/2022 - 10:30 नवीन
अशा अर्थाचे, एक वाक्य वाचनांत आले होते ... "सामान्य नागरीकांनी एकत्र येऊन यासाठी काही करता येऊ शकते काय ?" ----- काहीही करता येणार नाही ...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 01/06/2022 - 10:35 नवीन
थोड्याच दिवसात होणाऱ्या वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा https://www.loksatta.com/krida/india-womens-squad-for-icc-womens-world-cup-2022-and-new-zealand-series-announced-adn-96-2749564/ ------- गेली 2-3 वर्षे, मिताली राज, जागा अडवून बसली आहे. सुदैवाने, 20-20 मधून, मिताली राजला, बाहेर काढले, हे उत्तम ...
  • Log in or register to post comments
ब
बेकार तरुण गुरुवार, 01/06/2022 - 11:00 नवीन
कर्णधार आहे ना मिताली राज ह्याच संघाची? का माझी वाचण्यात काही चूक होत आहे?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 01/06/2022 - 11:17 नवीन
शेफाली वर्मा, जेनिमा राॅड्रिग्ज, स्मृती मंदाना, अशा अनेक चांगल्या तरूण मुली, उत्तम क्रिकेट खेळत आहेत मिताली राज ना धालफलक हलता ठेवते ना नेहमीच धावांचे योगदान देते. पुजा वस्त्रकार, मानसी जोशी, झुलन गोस्वामी (अद्याप तरी 50-50 साठी, ही हवीच, योग्य वेळी अनुभव पणाला लावते) राजेश्र्वरी गायकवाड, दिप्ती शर्मा, पुनम यादव... गोलंदाजी परिपूर्ण आहे... पण, मिताली राज मुळे, एक बॅटर कमी पडतो आणि आपण हरतो... हरमन प्रीत कौर पण, WBBL मध्ये चांगली खेळली पण, मिताली राज आता फक्त पुर्व पुण्याई मुळे, जागा अडवून बसली आहे... अर्थात, हा विश्र्वचषक जिंकण्याचे चान्सेस, ऑस्ट्रेलियाला जास्त आहेत. आणि दुसरा क्रमांक, इंग्लंडचा
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 01/06/2022 - 11:05 नवीन
पोलिसांची पगार खाती Axis Bank मध्ये वळवली, फडणवीस-SBI ला कोर्टाची नव्याने नोटीस ----- https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/hc-notice-to-devendra-fadnavis-axis-bank-sbi-over-transfer-of-police-salary-610356.html ------- ह्या बाबतीत, फडणवीस आणि अमृता फडणवीस, यांनी आधी पण स्पष्टीकरण दिले आहे... https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/hc-notice-to-devendra-fadnavis-axis-bank-sbi-over-transfer-of-police-salary-610356.html ------- न्यायालयात, योग्य काय? ते समजेलच ....
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 01/06/2022 - 14:37 नवीन
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील एस.टी डेपोमधील कर्मचार्‍यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. आत्महत्या करणे गुन्हा आहे आणि बराच काळ चालू असलेल्या एस.टी कर्मचार्‍यांच्या संपावर काहीही तोडगा निघत नाही तेव्हा आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्या अशी मागणी त्या कर्मचार्‍यांनी केली आहे. हे वाचून वाईट वाटले. एस.टी हे सरकारी महामंडळ असूनही त्या कर्मचार्‍यांना जो काही तुटपुंजा पगार आहे तो पण वेळेत मिळत नव्हता हे धक्कादायक आहे. कोरोनाकाळात मुंबईत बेस्टच्या कर्मचार्‍यांची कमतरता भासू लागल्यावर परभणी, यवतमाळ आणि अजून कुठून कुठून एस.टी कर्मचारी मुंबईत आणून त्यांच्याकडून बेस्टच्या बस चालवून घेतल्या. परभणीत बस चालविणे आणि मुंबईत बस चालविणे यात अगदी जमीनअस्मानाचा फरक असेल हे समजू शकतो. तेव्हा त्यांना मुंबईत येऊन बस चालविल्याबद्दल विशेष भत्ता तरी महाविकास आघाडी सरकारने दिला होता की नाही काय माहिती? विशेष भत्ता दूरच राहिला मुळातला पगारही मिळायला महिनेमहिने उशीर होत होता. त्यामुळे कर्मचार्‍यांच्या संसाराची दैना उडाली. अनेकांनी आत्महत्या केली. गेले दोनेक महिने चालू असलेल्या संपावर काही तोडगा निघत नाही. काय चालू काय आहे? एस.टी म्हणजे ग्रामीण भागाची जीवनवाहिनी आहे. ग्रामीण भागातील लोक कसे प्रवास करत असतील? सगळा प्रकार खरोखरच संतापजनक आहे.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 01/06/2022 - 19:04 नवीन
एअर इंडियाच्या खाजगीकरणाविरोधात सुब्रमण्यम स्वामींनी दाखल केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. https://www.livelaw.in/top-stories/air-india-disinvestment-delhi-high-court-subramanian-swamy-plea-dismissed-tata-group-188883 सुब्रमण्यम स्वामी हे एखाद्या भरकटलेल्या क्षेपणास्त्राप्रमाणे आहेत. कधी कोणावर आदळतील हे सांगता येत नाही. जयललितांना तुरूंगात धाडण्यात त्यांची भूमिका मोठी होती पण काही महिन्यातच त्यांनी त्याच जयललितांबरोबर युती केली होती. अटलबिहारी वाजपेयींना कायम पाण्यात पाहिले पण त्याच वाजपेयींचे सरकार स्थापन होताना त्यांना पाठिंबा दिला आणि परत तीन महिन्यात तो पाठिंबा काढूनही घेतला. त्यानंतरही जवळपास १४-१५ वर्षे भाजपला विरोध केला पण २०१३ मध्ये आपला पक्ष भाजपमध्येच विलीन केला. आता परत मोदींवर उलटले आहेत. असल्या माणसाला पक्षात का घेतले हे तेव्हाही समजले नव्हते आणि अजूनही समजलेले नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 01/07/2022 - 05:45 नवीन
>>>असल्या माणसाला पक्षात का घेतले हे तेव्हाही समजले नव्हते आणि अजूनही समजलेले नाही. सत्तेच्या फायदा आणि संरक्षण मिळत असल्यामुळे भाजपा सध्या आयाराम गयारामाचा पक्ष बनलेला आहे, गच्छंतीं होईल, भविष्यात केवळ सतरंज्या उचलाव्या लागतील म्हणून कोणी विरोध करीत नाही. पण एकदा की धाक उरणार नाही तेव्हा कोणा-कोणाला आवरायचे असा प्रश्न भाजपला पडल्याशिवाय राहणार नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 01/07/2022 - 09:18 नवीन
सुब्रमण्यम स्वामी हे एखाद्या भरकटलेल्या क्षेपणास्त्राप्रमाणे आहेत. अगदी अगदि बरोबर ... ते सडेतोड बोलतात पण भरकटलेल्या क्षेपणास्त्राप्रमाणे आहेत.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 01/07/2022 - 05:31 नवीन
सत्तरहजार खुर्च्या आणि आले सातशे लोक सध्या सोशियल मिडियावर पंतप्रधा़न यांच्या प्रचार दौ-याचा जो फज्ज़ा उडाला त्या बद्दल लोक जी टिंगल करीत आहेत ती बघुन वाईट वाटते. बाकी,पंतप्रधानांच्या सभेला गर्दी जमली नाही त्याला पंजाब सरकारही काय करणार, दौरा अर्धवट सोडून परत यावे लागले. फार वाईट वाटले. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 01/07/2022 - 06:09 नवीन
अरेरे...! बिरुटे सर तुमच्यासारखा अति उच्च शिक्षित माणूस सुद्धा असल्या टिनपाट प्रचाराला बळी पडतो हे पाहून वाईट वाटलं. द्वेषाने माणूस किती अंध होतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. बाकी पंतप्रधानांच्या सुरक्षेबद्दल तुमचे काहीच मत नाही हे ओघानेच आलं. सातशे लोक तर भोरास बुद्रुक सारख्या ठिकाणी सुद्धा कोणत्याही पक्षाला जमवता येतील. अनेक ठिकाणी आलंय कि सभास्थानाच्या ठिकाणी जाणाऱ्या सर्व बसेस ना अडवून ठेवले आणि लोकांना सभेला जाऊ दिले नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 01/07/2022 - 06:19 नवीन
पंतप्रधान आणि पक्षीय समर्थकांना झालेल्या गोष्टीचं वाईट वाटू शकतं हे मी समजू शकतो. पण... पंजाबमधे जाऊन आत्ताच अग्निपरीक्षा घ्यायची गरज नव्हती असे मला तुमचा जालमित्र म्हणून म्हणावे वाटते . उगाच आपल्या पाठीमागे खुप लोक आहेत. आपण कृषि कायदे परत घेतले, आता लोक आपल्याला डोक्यावर घेऊन नाचतील असं नसतं डॉक्टर साहेब. पंजाबी लोकांच्या एखादी गोष्ट डोक्यात बसली ना, मग ते लोक ऐकत नाही, त्यांनी कृषिकायद्या संदर्भात सरकार ज्या पद्धतीने वागले, जी जी मतं तेव्हा व्यक्त होती त्याचे पडसाद असे उमटणारच होते असे मला वाटते. तुम्हाला हे पटणार नाही. पण सत्य फार कडवट असतं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 01/07/2022 - 06:45 नवीन
पंजाबमधे जाऊन आत्ताच अग्निपरीक्षा घ्यायची गरज नव्हती. अग्निपरीक्षा द्यायला हुसैनीवाला येथील राष्ट्रीय हुतात्मा स्मारकाला जायची मोदींना गरज पडणार नाही हे तुम्हाला समजणारच नाही. https://www.google.com/maps/place/The+National+Martyrs+Memorial/@30.9586366,74.4535581,11.25z/data=!4m5!3m4!1s0x3919c1a8109349cf:0xe7217c75aab3c4ba!8m2!3d30.9976599!4d74.5471501 आपल्या भेटायला आपला पंतप्रधान सीमेपासून केवळ १ किमी च्या अंतरात येतो याचे महत्त्व तेथील सैनिकांना काय आहे हे वातानुकूलित खोलीत आराम खुर्चीत बसून टंकणाऱ्या विचारवंतांना समजणारच नाही. PM Modi was slated to go to the National Martyrs Memorial at Hussainiwala by helicopter. But due to rain and poor visibility, it was decided that he would travel by road, which would take more than 2 hours. "He proceeded to travel by road after necessary confirmation of security arrangements were made by the DGP Punjab Police," the MHA said. https://www.indiatoday.in/elections/punjab-assembly-polls-2022/story/punjab-polls-rally-pm-modi-stuck-on-flyover-mha-seeks-report-from-punjab-on-security-lapse-1896284-2022-01-05 बाकी सातशे लोक सुद्धा नव्हते वगैरे तुमचं चालू द्या. वैचारिक बद्धकोष्ठावर इलाज नसतो.
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Fri, 01/07/2022 - 07:56 नवीन
वैचारिक बद्धकोष्ठावर इलाज नसतो
एनिमा देता येतो. देईलच तो आता केंद्र सरकार. मग दुसऱ्या बाजूने बोलायला वैचारिक बद्धकोष्ठ वाले तयार!
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 01/07/2022 - 09:03 नवीन
वाईट वाटते तुम्हाला! या बाबत ! आनंदाच्या उकळ्या उकळ्या पाहिजेत नाही का
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Fri, 01/07/2022 - 05:57 नवीन
पंतप्रधानासारख्या महत्वाच्या पदावरील माणसाच्या सुरक्षेत कमतरता नाही राहिली पाहिजे, मग तो कोणत्याही पक्षाचा का असेना. जवळच्या व्यक्तीला करोना झाला म्हणून पंतप्रधानांना receive करायला गेलो नाही असे म्हणणारे पंजाबचे मुख्यमंत्री दुसऱ्याचं दिवशी आंदोलकांना भेटायला स्वतः गेले होते, तेही मास्क न घालता. बर एकदा मोदींचा दौरा रद्द झाला तर आंदोलक तरी तिथे कोनाविरुद्ध आंदोलन करत आहेत. अचानक झालेल्या बदलांमुळे पंतप्रधानांच्या मार्गाची माहिती नव्हती अशी थाप ही मुखमंत्र्यानी मारली.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Fri, 01/07/2022 - 07:24 नवीन
२०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणाऱ्या सरकारने डिसेंबरच्या मध्यावर सोयाबीनच्या वायदे व्यवहारांवर बंदी आणली हे "शहरी अर्थरेक्यांना" दिसले नसेलच. केंद्र सरकार कोणाच्या इशाऱ्यावर चालते हे दिसत आहे. सोयाबीन वायदे व्यवहारामुळे सरकारच्या तिजोरीतून काय जाणार होते? वायदे व्यवहारांमुळे चार पैसे शेतकऱ्यांना जास्त मिळून भविष्यातील दर नुकसान टाळता येत होते म्हणून शेतकरी तिथे वळला. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नाही हे सिद्धच झाले. शेतकरी एकवेळ आत्महत्या करेल पण कोणाचा जीव घेणार नाही.
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Fri, 01/07/2022 - 07:50 नवीन
वायदे बाजार? छे! खाजगी विक्रीलाच तर विरोध होता ना शेतकऱ्यांचा? शेतकऱ्यांनी धान्य फक्त आणि फक्त APMC मध्येच विकायचं! बाकी वायदेबाजारात धान्य विकून फक्त फायदाच होतो हे ऐकून गंमत वाटली. शेअर मार्केट मध्ये शेअर्स फक्त वरच जातात असं म्हटल्यासारखं आहे ते.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Fri, 01/07/2022 - 08:07 नवीन
बाकी वायदेबाजारात धान्य विकून फक्त फायदाच होतो हे ऐकून गंमत वाटली. बाजारातील सोयाबीन दरातील चढ उतारांपासून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान वायदे व्यवहारामुळे टाळता येते. शेतकरी पुट ऑप्शन घेतात त्यामुळे नुकसान शून्य. ह्यात सरकारचे काय नुकसान होणार होते? नसेल कळत तर सोडून द्या आणि "शहरी अर्थरेक्यांत" सामील व्हा. तेच तुमच्या हिताचे आहे.
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Fri, 01/07/2022 - 08:41 नवीन
डियरेस्ट नॉटि औगी, पुट ऑपशन घ्यायचा तर त्यासाठी प्रीमियम द्यावा लागतो. तो भरपूर गोष्टींवर अवलंबून असतो. Volatility, रिस्क, maturity date वगैरे वगैरे. तो भरपूर मोठा असावा हे ओघानेच आले (कारण जेव्हा दुष्ट अंबानी पुट ऑपशन विकेल तेव्हा पेक्षा आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन चे दर कोसळले तर फुकटच तो मोठ्या किमतीला विकत घ्यावा लागेल). आणि दर वर गेले तर प्रीमियम गेलाच. तेव्हा पुट ऑप्शन विकणारा (अनुभवी ट्रेडर्स मुळे) कायम फायद्यात असतो. शेतकर्यांचे फार फार तर नुष्कान होणार नाही. तो ऑपशन किती ला घ्यावा कुणाकडून घ्यावा (दुष्ट अदानी की दुष्ट अंबानी इत्यादी) याबाबत फेट्या खालचं डोकं चालेल असं वाटत नाही. ज्यांना फार्म laws आपल्या फायद्याचे आहेत हे कळलं नाही त्यांना ऑपशन्स थोडेच कळणार आहेत? पण प्रश्न तोही नाही. प्रश्न असा आहे, की वायदेबाजार प्रायव्हेट बाजार आहे. आणि शेतकऱ्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे की कुणीच APMC सोडून कुठेच विकायचंच नाहींच. तेव्हा आता वायदेबाजारात कशासाठी जायचंय?
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 01/07/2022 - 09:13 नवीन
तेव्हा पुट ऑप्शन विकणारा (अनुभवी ट्रेडर्स मुळे) कायम फायद्यात असतो अस कस? दर जर खलि गेले तर ? अस कस? दर जर खाली गेले तर ? पुट ऑप्शन विकनाऱ्याचा जास्तीत जास्त तोटा = (स्ट्राईक - शून्य) + मिळालेला प्रीमियम एस आणि पी इंडेक्स वरील फुचुर वरील ऑप्शन चे उदाहरण समजा हे फुचर सध्या ४००० ला आहेत आणि एखाद्याने ४००० स्ट्राईक पुट विकला आणि त्यास समजा आठवड्याचे २० पॉईंट मिळाले आणि समजा हे फुचर १० टक्के घसरले = ३६०० तर ज्याने पुट विकत घेतलं आहे तो पुट अमलात आणेल ( एक्सरसाईझ) तर विकनाऱ्याचा तोटा = ४०० -२० = ३८० गुणिले यु एस $ ५० = ३८०-१९,००० $
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Fri, 01/07/2022 - 09:47 नवीन
ऑप्शन मार्केटमध्ये अगदी १००% वेळा नाही तरी ९५% वेळा ऑप्शन विकणाराच फायदा करतो. त्याचे कारण म्हणजे ऑप्शन विकणारे बहुसंख्य कसलेले खेळाडू असतात. ऑप्शन विकणे हे त्या प्रकारातील माहिती असलेल्यालाच जमणार्‍यातला खेळ आहे. आणि किंमत वर जाईल असा व्ह्यू असेल तर हे कसलेले खेळाडू पुट विकतात आणि तो सुध्दा आऊट ऑफ द मनी. त्याप्रमाणेच किंमत खाली जाईल असा व्ह्यू असेल तर ते आऊट ऑफ द मनी कॉल विकतात. जर किंमतीत तितक्या प्रमाणावर चढ/उतार होतील असा व्ह्यू असेल तर ते इन द मनी पुट/कॉल सुध्दा विकू शकतात. इन द मनी ऑप्शन विकायला जबरदस्त गट्स लागतात. ते येरागबाळ्याचे काम नाही. तेव्हा ऑप्शन विकत घेणारे आपला जास्तीतजास्त तोटा फक्त प्रिमिअम भरला तेवढा असे म्हणत ऑप्शन विकत घेतात आणि त्यात सगळा प्रिमिअम गमावून अडकतात. तेव्हा ऑप्शन विकत घेतला की झाले असे म्हणणारे अनेक ट्रेडर्स असतात. त्याच मायाजालात शेतकरी फसले आणि त्यांचे नुकसान झाले तर त्यात नवल काय? असो. पण काही लोकांना हे समजत नाही. गर्व से कहो हम शहरी अर्थरेकी है.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Fri, 01/07/2022 - 10:34 नवीन
"शहरी अर्थरेक्यांना" वायदे हे हेजींगचे साधन आहे हे एक तर माहीत नसते किंवा ते वापरायची कुवत नसते, कारण ते येऱ्यागबळ्याचे काम नाही. शेअर बाजारात सामान्य गुंतवणूकदार ऑप्शन व्यवहार करतो ते निव्वळ ट्रेडिंग असते त्यात हेजींग फार कमी जण करतात कारण त्यांचा portfolio तितका मोठा नसतो,त्यामुळे नुकसान होऊ शकते. ह्याउलट शेतकऱ्याकडे त्याचे उत्पादन असते.त्या उत्पादनाला बाजारातील दरातील चढउतारापासून रक्षण करण्यासाठी तो agri commodity बाजारात पुट ऑप्शन वापरून नुकसान कमी करू शकतो. शेअर मार्केटमध्ये सामान्य गुंतवणूकदार आणि agri commodity मध्ये व्यवहार करणारे शेतकरी (उत्पादक) ह्यामध्ये हा मूलभूत फरक आहे हे "शहरी अर्थरेक्यांना" समजणे कठीण आहे. परंतु ह्या निमित्ताने "शहरी अर्थरेकी" बिळातून बाहेर आले. हमें फक्र हैं l
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 01/07/2022 - 15:00 नवीन
"शहरी अर्थरेक्यांना" वायदे हे हेजींगचे साधन आहे हे एक तर माहीत नसते किंवा ते वापरायची कुवत नसते, " वायदे हे हेजींगचे साधन आहे" हो बरोबर पण ""शहरी अर्थरेक्यांना"" याचा नककी अर्थ सांगाल का?
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Fri, 01/07/2022 - 15:06 नवीन
ज्यांना कळाले ते गर्वाने बिळात गेले.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 01/07/2022 - 15:35 नवीन
"ज्यांना कळाले " सरल उत्तर द्या ना असो मझ अजेन्द ओप्शन किव त्यसम्बन्धि चि महिति देवन घेवन येव्धच आहे तुम्चह वेगळा दिस्तोय
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 01/07/2022 - 15:08 नवीन
ते वापरायची कुवत नसते, हे सरसकट बरोबर नई "कारण त्यांचा portfolio तितका मोठा नसतो" हे तितकेसे तितकेसे खरे नाही १ ऑप्शन ( अमेरिकेतील ) १०० शेअर वर असतो म्हणजे जर एखाद्यकडे १०० शेअर असतील तर १ पुटऑप्शन घेऊन तो हेजिंग करू शकतो आणि त्यासाठी करोडो लागत नाहीत काही शेअर ( त्यावर ऑप्शन असलेलं ) कमी किमतीचे असतात . "शेअर मार्केटमध्ये सामान्य गुंतवणूकदार आणि agri commodity मध्ये व्यवहार करणारे शेतकरी (उत्पादक) ह्यामध्ये हा मूलभूत फरक आहे " हे मान्य कमोडिटी वायदे हे मुळात उत्पादकांचा मागणी मुळे निर्माण झाले हे खरे आहे , ट्रेडर / स्पेक्युलेटर आले
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Fri, 01/07/2022 - 15:30 नवीन
इकडे प्रत्येक कंपनीचा लॉट साइज वेगळा असतो. Reliance चा २५० आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 01/07/2022 - 15:33 नवीन
"... लॉट साइज वेगळा असतो." हो असले पण कमी किमतीचे शेर पण असतील कि आणि इकडे तिकडे मी सर्वसाधारण जिथे ऑप्शन मार्केट आहे त्या बाजारबद्दल बोलतोय हेज करणे फक्त उत्पादकाला जमते हे काही खरे नाही ( कमोडिटी म्हणून उत्पादक )
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Fri, 01/07/2022 - 15:41 नवीन
स्वस्तातला NTPC लॉट साईज ५७०० आहे. १३० चा शेअर.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 01/07/2022 - 15:49 नवीन
बर मह्न्जे ७ लाख एकेचलिस हजार बरोबर अनि त्य्वरिल प्रोटेक्टिव्ह पूट ची किंमत ? ७ लाख एकेचलिस हजार येवधा पोर्टफफोलियो भारतात अनेक जणांचा सहज असेल मग फारसे अशक्य वाटत नाही
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 01/07/2022 - 15:18 नवीन
आपण लिहिलेली स्ट्रॅटेजी बरोबर आहे मान्य पण त्यात शेतकरी राजकारण कशाला? "ऑप्शन मार्केटमध्ये अगदी १००% वेळा नाही तरी ९५% वेळा ऑप्शन विकणाराच फायदा करतो." मी ८०% असे ऐकले आहे .. काहीका असेना , ऑप्शन विकणे ते सुद्धा नेकेड हे अर्हताःतच जोखमीचे आहे कॉल विकलं नेकेड तर अमर्याद तोटा होव शकतो. त्यामुळे काही जण " कव्हर्ड कॉल विकतात , आणि चांगलं फायदा होऊ शकतो परंतु त्यात सुद्धा एक महान प्रिसद्ध आहे coverd call writings ( sellars) may eat like a king everytime the soled opshan expires wortless but ONE day they may shit like an Emperor " https://www.investopedia.com/trading/cut-down-option-risk-with-covered-calls/
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Fri, 01/07/2022 - 17:14 नवीन
ऑप्शन विकणे ते सुद्धा नेकेड हे अर्हताःतच जोखमीचे आहे कॉल विकलं नेकेड तर अमर्याद तोटा होव शकतो.
नक्कीच. म्हणून ऑप्शन विकणे हे कसलेल्या खेळाडूंचेच काम आहे कोणा येरागबाळ्याचे नाही. तरीही ऑप्शन विकणे हे फ्युचर्समध्ये पोझिशन घेण्यापेक्षा कमी धोक्याचे असते. अनेकांना हे माहितच नसते. तसेच ऑप्शन विकण्यात अमर्याद तोट्याचा धोका आणि ऑप्शन विकत घेतला तर गेला तर जास्तीत जास्त प्रिमिअम जाणार त्यापेक्षा जास्त नुकसान होणार नाही यामुळे अनेक लोक ऑप्शन विकत घेण्यात फसतात. जर डीप आऊट ऑफ द मनी ऑप्शन घेतला तर सगळाच प्रिमिअम जायची म्हणजे १००% तोटा व्हायची शक्यता जास्त असते. साधी गोष्ट आहे- जर ऑप्शन विकण्यात अमर्याद तोटा आणि विकत घेण्यात मर्यादित तोटा असेल तर मग जिंकायची शक्यता खूप जास्त असेल तरच ऑप्शन विकणारे ऑप्शन विकतील अन्यथा नाही. तरी पुट ऑप्शनचा विषय सगळ्यात पहिल्यांदा काढणार्‍या महाभागांच्या मते ऑप्शन विकत घेणार्‍या शेतकर्‍यांना दरवेळेस फायदाच व्हायला हवा अशी अपेक्षा दिसते. असे कसे होणार? चित भी मेरी पट भी मेरा असे चालणार नाही ना? पण शेतकरी म्हटले की त्यांच्याविरोधात काहीही बोलणे हे महापातकच असते.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 01/08/2022 - 04:47 नवीन
असं कसं? असं कसं? बळीराजा अन्नदाता इ इ म्हणलं कि त्यांना सर्व गोष्टी कशा ताटात वाढूनच मिळायला हव्यात कि नाही? त्यांच्या जीवावर तुम्ही जगताय ना?
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Sat, 01/08/2022 - 05:09 नवीन
येथील "शहरी अर्थरेक्यांचा" अभ्यास किती कच्चा आहे ते दिसतेच आहे. शेतकरी (उत्पादक) आपले नुकसान कमीत कमी कसे होईल ह्यासाठी सोयाबीन "पुट" ऑप्शनचा हेजिंग, हो हेजिंग, हेजिंग आणि फक्त हेजिंगसाठी वापर करत आहे. कुठेही फायदा होण्यासाठी speculation treding करून धोका पत्करत नाही. तो कोणतेही ऑप्शन राईट करत नाही. ऑप्शन तो सोयाबीन दरासाठी "विमाकवच" सारखा वापरत आहे. सरकारला ह्यात काय अडचण वाटली आणि त्याने सोयाबीन वायद्यावर बंदी आणली? ह्या बंदीमुळे शेतकऱ्यांचा काय फायदा होणार हे कोणी सांगू शकेल काय?
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sun, 01/09/2022 - 05:06 नवीन
पण मला एक गोष्ट सांगा, जर वायदेबाजारात माल विकायचा नसेल, आणि मलाच दार जर सरकारं MSP करून, किंवा दलाल रुमलाखाली ठरवणार असतील, तर हेजिंग चा काय उपयोग? याबद्दल पण माझ्यासारख्या अर्थरेक्यांना थोडं मार्गदर्शन करावे.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Sun, 01/09/2022 - 11:17 नवीन
पहिले समोरच्याला समजेल अशा भाषेत लिहायला शिका.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 26 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 30 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 33 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा