Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

ताज्या घडामोडी- जानेवारी २०२२

व
वामन देशमुख
Sat, 01/01/2022 - 08:49
🗣 213 प्रतिसाद
सर्व मिपाकरांचे २०२२ मध्ये नववर्षाभिनंदन! या वर्षात उत्तरप्रदेशासहित इतर राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. उत्तरप्रदेशात पुन्हा एकदा भाजप सरकार बनवेल असा निष्कर्ष काढणारी एक कल चाचणी प्रसिद्ध झाली आहे. अर्थात, अशा कल चाचण्यांची विश्वासार्हता हा चर्चेचा विषय असतो.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 55244 views

🗣 चर्चा (213)
आ
आग्या१९९० Tue, 01/11/2022 - 15:02 नवीन
केंद्र सरकार हे शेतकरी विरोधी आहे हे स्पष्ट दिसत आहे. समर्थकांची ते मान्य करायची हिंमत नाही. सोयाबीन वायदे बंदी आहे असे म्हटले की गहू किंवा इतर वायद्यांवर बंदी का नाही ?असे विचारायचे. त्यावरही सरकारने बंदी घातली आहे हे दाखवून दिले की बाकीच्या कृषी उत्पादनाचे वायदे कसे चालू आहे हे विचारायचे. ह्यालाच "शहरी अर्थरेकी" म्हणतात.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 01/11/2022 - 23:43 नवीन
लै हसलो राव. १८८ प्रभुंची आठवण आली ... + संक्षीं प्रभूंची पण आठवण झाली ... प्रश्नांची उत्तरे कोण देताय आणि कोण नाही हे दिसतंय पण तरीही टकळी चालूच ... हा हा पु वा (आपला "शहरी आर्थिक अतिरेकी + ब्याद आस स्पेक्युलेटर + अंध भक्त )
  • Log in or register to post comments
स
सुक्या Wed, 01/12/2022 - 02:17 नवीन
१८८ प्रभुंची आठवण आली म्हणुन सांगतो ... त्यांनी काही हुच्च वचन लिहिले की आपण गप गुमान "असेल असेल तुम्ही म्हणताय तर तसेच असेल." असे बोलुन आपण आपल्या कामाला लागायचो. उगा दगडावर डोके आपटुन काही फायदा नसतो. आपले डोके फुटते, दगड आपल्या जागी ढिम्म असतो. तेव्हा आपल्याला काहीही लेबले लावली तरी "जै म्हाराज" म्हणावे . पुढे चालावे. . हाकानाका . . .
  • Log in or register to post comments
स
सुक्या Fri, 01/07/2022 - 18:35 नवीन
त्यामुळे सोयाबीन वायद्यांवर बंदी आणून सरकार शेतकऱ्यांवर सूड उगवत आहे. शेतकरी अर्थसाक्षर झालेले बघवत नाही केंद्र सरकारला
लै हसलो राव. १८८ प्रभुंची आठवण आली ...
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Fri, 01/07/2022 - 12:53 नवीन
पंतप्रधानांना अडवण्याचा प्रयत्नांमुळे अमरिंदरसिंग व भाजप यांचा पंजाब मधे विजय नक्की झाला असे म्हणायला हरकत नाही. निवडणूक निकाल येईपर्यंत माझी विश्रांती.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 01/07/2022 - 12:58 नवीन
अमरिंदरसिंग व भाजप यांचा पंजाब मधे विजय तसे झाले तर बरे होईल , पण होईल असे वाटत नाही पंजाबात हिंदू बऱ्यापकी असून सुद्धा आणि ज्या लोकांनी तथाकथित देशव्यापी शेतकरी आंदोलनाचे रूपांतर "शीख धर्म युद्धात रूपांतर केलं भासवले " त्यांना चपराक बसेल
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Fri, 01/07/2022 - 13:23 नवीन
विजय होईल की नाही माहित नाही पण अमरिंदर-भाजप युतीला बर्‍यापैकी जागा मिळतील असे वाटते. पंजाबमध्ये गेल्या काही दिवसात झालेल्या घडामोडींमुळे परत खलिस्तानी डोके वर काढतील ही शक्यता लक्षात घेता या युतीमागे जबरदस्त हिंदू कॉन्सॉलिडेशन होईल. २०१७ मध्ये असे हिंदू कॉन्सॉलिडेशन अमरिंदरसिंगांच्या मागे झाले होते आणि काँग्रेसला कोणीही अपेक्षा केली नव्हती इतका मोठा विजय मिळाला होता. अकाली दलाला ग्रामीण भागातील पारंपारीक शीख मते मिळतीलच. त्याबरोबर आप पण शीख मतांसाठी प्रतिस्पर्धी असेल. या सगळ्या भानगडीत काँग्रेसचे वाटोळे होईल असे दिसते. काहीही झाले तरी खलिस्तान समर्थक आम आदमी पार्टी पंजाबमध्ये जिंकायला नको. पंजाबात आपचा विजय झाल्यास मात्र तो देशाच्या इतिहासात एक काळा दिवस असेल हे नक्की.
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Fri, 01/07/2022 - 15:21 नवीन
गोष्टी अतिशय वेगाने घडतायत. माझी सुद्धा आधी अशी समजूत होती की काँग्रेस ने कदाचित मोदींना काळे झेंडे दाखवण्यासाठी फक्त लोक जमा केले असतील, पण ज्या पद्धतीने गोष्टी उघड होतायत, ते पहाता गोष्टी गंभीर असाव्यात हे स्पष्ट होतंय. मोदींची हत्या करण्याचा हा प्लॅन असू शकतो असे वाटतंय.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Fri, 01/07/2022 - 17:38 नवीन
मोदींची हत्या करण्याचा हा प्लॅन असू शकतो असे वाटतंय.
सहमत आहे. थेट काँग्रेस पक्षाचा तसा प्लॅन होता की नाही हे माहित नाही. नसावा. त्यांचे इतके डेअरींग होईल का याविषयी साशंकता वाटते. तरीही अशी घटना व्हायला योग्य ती परिस्थिती निर्माण करायची आणि मग 'शेतकरी कायद्यावरून उसळलेला जनक्षोभ' या नावाखाली नामानिराळे राहायचे हा प्लॅन असू शकेल असे वाटते. एक गोष्ट कळत नाही. शेतकरी कायदे मागे घ्या ही आंदोलकांची मागणी होती. ती पूर्ण झाल्यावर कसले आंदोलन चालू आहे? इतके सगळे होऊनही जर मोदींमागे हिंदू कॉन्सॉलिडेशन झाले नाही तर मग हिंदू लोक मरायच्याच लायकीचे आहेत असे खेदाने म्हणावेसे वाटेल.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Fri, 01/07/2022 - 17:58 नवीन
हिंदू डरपोक नाही. त्यांचे नेतृत्व करणारे डरपोक आहेत. स्वतःच्या जिवाला घाबरतात. देशाचे नेतृत्व करणाऱ्या इंदिरा गांधींनी जीवाची पर्वा केली नाही. देशाचे नेतृत्व करा, ठराविक वर्गाचे नको.
  • Log in or register to post comments
T
Trump Fri, 01/07/2022 - 18:02 नवीन
हिंदुंचे नेतृत्व कोण करते आहे?
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Fri, 01/07/2022 - 18:23 नवीन
ह्या ह्या ह्या. इतकं बी ठाऊक नाय तुमा जंटलमन लोकास्नी? जनेऊधारी, दत्तात्रयगोत्र कुलोत्पन्न, काँग्रेसपक्षाचे आजीवन अध्यक्ष आणि भारताचे कायमचे पुढचे पंतप्रधान !
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 01/08/2022 - 05:13 नवीन
देशाचे नेतृत्व करणाऱ्या इंदिरा गांधींनी जीवाची पर्वा केली नाही कशाला थापा मारताय? त्यांनी मूर्खपणा केला म्हणून जीवाला मुकल्या. त्यांना लषकरी आणि नागरी गुप्तचर खात्याने स्पष्टपणे सांगितलेले होते कि तुमच्या अंगरक्षका मध्ये असलेले शीख जवान यांच्या निष्ठा दुसरीकडे वाहिलेल्या आहेत त्यांना बदला. तरीही माझा त्यांच्यावर विश्वास आहे म्हणून त्यांनी फाजील आत्मविश्वास दाखवला ( राजकीय फायद्यासाठी शीख लोकांबद्दल बेगडी प्रेम दाखवायला गेल्या ) आणि अंगरक्षकानि ए के ४७ चे अक्खे मॅगझीन त्यांच्या छातीत खाली केले. स्वतः गेल्या त्या गेल्याच पण ८ हजार शीखही त्यानंतर उसळलेल्या दंग्यात मारले गेले. https://en.wikipedia.org/wiki/Assassination_of_Indira_Gandhi मरणांती वैराणी म्हणून काही लिहू नये असे वाटत होते पण फालतू वल्गना ऐकवत नाहीत
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 01/08/2022 - 05:16 नवीन
असाच फाजील आत्मविश्वास श्री राजीव गांधी यांनी दाखवला आणि श्रीपेरुम्बदूर येथे जीवास मुकले. उगाच गुप्तचर यंत्रणांवर अविश्वास दाखवून जीव गमावलेल्या माणसाला हुतात्मा म्हणणे हा इतिहासाचा विपर्यास होईल.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/08/2022 - 06:00 नवीन
दोन्ही गोष्टीं बाबत सहमत आहे ... अर्थात, ज्या लोकांना, मोदींनी विमान घेतले, मोदींनी सुरक्षे वरती भरपूर पैसा खर्च केला, हे मोदींनी स्वतः साठी केले, असे पटते, अशा लोकांना समजावण्यात अर्थ नाही पंतप्रधान पद, घराणेशाहीची बटीक नाही, ते एक सार्वभौम पद आहे, हे ज्यांना पटते, त्यांना, पंतप्रधाना साठी, सुरक्षेवर केलेला खर्च योग्यच वाटतो. असो,
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Sat, 01/08/2022 - 05:25 नवीन
तुम्ही त्याला काहीही म्हणा,परंतु त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही हे सिद्धच केले.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/08/2022 - 06:08 नवीन
बेजबाबदारपणा म्हणतात ... "पदा" पेक्षा, स्वतःला, मोठे समजणे, ही घराणेशाहीच्या नेत्यांची, वाईट खोड आहे... मग तो नंदराजा असो किंवा रघुनाथराव पेशवे असोत ...
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Sat, 01/08/2022 - 06:13 नवीन
पदापेक्षा जीवाला महत्त्व देणाऱ्याला *** म्हणतात
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/08/2022 - 06:25 नवीन
आता तो द्विगुणित झाला ...
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Sat, 01/08/2022 - 08:07 नवीन
एक गोष्ट कळत नाही. इंदिरा गांधींनी स्वतःचा राजकीय फायदा होईल या अपेक्षेने भिंद्रनवाले हा भस्मासूर उभा केला. तो त्यांनी मारला पण त्याच्या पिलावळीनेच शेवटी इंदिरांचा जीव घेतला. म्हणजे स्वतः भस्मासूर उभा करायचा आणि मग तो उलटला आणि इंदिरांना मारले तर कसले डोंबलाचे हौतात्म्य? हे म्हणजे भरधाव चाललेल्या रेल्वेला जाऊन धडकायचे आणि मेल्यावर हौतात्म्य क्लेम करण्यासारखे झाले.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sat, 01/08/2022 - 10:40 नवीन
जनरल वैद्य पण यात उगाच गेले हो. त्यांची तर कोणी आठवणही काढत नाही. असो.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Sat, 01/08/2022 - 11:08 नवीन
जनरल वैद्य पण यात उगाच गेले दुर्दैव , इंदिरा गांधींनी केलेले ब्लु स्टार योग्यच होते अजज जर कोणी हिंदू अतिरेक्याने कशी विश्वनाथ मंदिराचा आसरा घेऊन दशेत माजवलं तर त्याचाच "खुन्या मुरलीधर " केलाच पाहिजे ,मग आशय वेळी हिंदू म्हणून मी दुखावलं जाणार नाही आणि कोणते हि सरकार असो माझा पाठिंबाच राहील
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Sat, 01/08/2022 - 13:21 नवीन
दुर्दैव , इंदिरा गांधींनी केलेले ब्लु स्टार योग्यच होते
हो पण ही अर्धीच गोष्ट आहे. १९८४ च्या परिस्थितीत ब्लू स्टार शिवाय पर्याय राहिला नव्हता हे बरोबर आहे. पण त्यापूर्वी इंदिरा गांधीं-झैलसिंगांनी भिंद्रनवालेला हातपाय पसरायला योग्य परिस्थिती निर्माण केली होती त्याचे काय? मुख्यमंत्री दरबारासिंग यांच्यावर कुरघोडी करण्यासाठी गृहमंत्री झैलसिंगांनी अटक केलेल्या भिंद्रनवालेला सोडून दिले आणि त्याला हिरो बनविले त्याचे काय? अरूणकुमार वैद्यांचा मात्र त्यात दुर्दैवाने बळी गेला :(
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 01/11/2022 - 23:45 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Sat, 01/08/2022 - 02:31 नवीन
हिंदू कॉन्सॉलिडेशन झाले नाही तर मग हिंदू लोक मरायच्याच लायकीचे आहेत मरण्यापेक्षा "जास्त वेदना होत जगण्याच्या लायकीचे आहेत" असा शाप आहे माझा
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 01/08/2022 - 04:36 नवीन
.>>> काँग्रेस पक्षाचा तसा प्लॅन होता की नाही हे माहित नाही. नसावा. मोदी सरकार, आपलं अपयश झाकण्यासाठी सतत काँग्रेस आणि इतर पक्षावर आरोप करत आलेले आहे, त्यातही काही नाविन्य उरलेले नाही. कोणत्याही गोष्टीत काँग्रेसकडे बोट करुन पक्षीय द्वेष कदाचित उभा करता येईल पण पुढील पाच पंचवीस वर्ष आपलं सरकार टीकावे म्हणून भाजपालाच असे काही तरी करावे लागेल की ज्यामुळे हिंदुंचा भावनांचा भडका उडेल.. सरकारला तारण्यासाठी काही जनक्षोभ उभा कराव लागेल, कारण सरकारकडे दुसरे काहीच मुद्दे नसल्यामुळे आणि विकास नावाचा काल्पनिक गोष्टीचा केव्हाच मुडदा पडलेला असल्यामुळे राष्ट्रवाद आणि हिंदुत्व याच गोष्टीकडे सरकार आता डोळे लावून बसलेले आहे असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 01/08/2022 - 04:49 नवीन
पुढील पाच पंचवीस वर्ष आपलं सरकार टीकावे हायला बिरुटे सर रागाच्या भरात तुम्ही पटकन सत्य बोलून गेलात कि!!!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 01/08/2022 - 04:58 नवीन
आपलं रागबीग काय नसतं. आणि आपल्यासारखं आदळआपटही नसते. बाकी, भाजपाची सत्तेतली सर्व वर्ष मोजली तर आता जवळपास तितकी वर्ष काही वर्षांनी होतीलच....आता कशी कोणती, एवढा अभ्यास तरी आपला असेल असा समजतो. नाय तर गुगलून या.....! =)) बाकी, काल एक लिहिता लिहिता राहीलो. ''बीना 'फेके' घर लौटने का दर्द तुम क्या जानो डाक्टर बाबू.....'' आता पुन्हा संदर्भ नका विचारु.... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 01/08/2022 - 05:03 नवीन
बिरुटे सर तुमचा मोदी द्वेष उघड आहे तो बाजूला ठेवा पण मोदी नाही तर पंतप्रधान म्हणून तुम्हाला कोण हवाय ते एकदा तरी उघड पणे सांगा पाहू.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 01/08/2022 - 05:11 नवीन
आपल्या प्रश्नाला उत्तर देणं मला टाळावे वाटत नाही. आपण चांगले व्यक्तीमत्व आहात. आणि माणुस म्हटला की एवढे तेवढे गुण दोष चालायचेच. आता आपल्या प्रश्नाचं उत्तर..... उघडपणे सांगतो आमचं हे नाव. आणि आमची बसंती सॉरी पसंती. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
T
Trump Sun, 01/09/2022 - 09:26 नवीन
नमस्कार सर.
आता आपल्या प्रश्नाचं उत्तर..... उघडपणे सांगतो आमचं हे नाव. आणि आमची बसंती सॉरी पसंती. ;)
हेमा मालिनीचे काय कर्तुत्व आणि अनुभव आहे पंतप्रधान होण्यासाठी? मला गोविंदाला मत देणारे लोक आठवतात.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Sun, 01/09/2022 - 09:36 नवीन
हेमा मालिनीचे काय कर्तुत्व आणि अनुभव आहे पंतप्रधान होण्यासाठी?
सिनेमातून काम करणे अन उत्तम नृत्य कलाकार असणे सोडून तसे तर मग श्रीमती हेमा मालिनी ह्यांचे मथुरेच्या आमदार व्हायला तरी काय कर्तृत्व होते सरजी ? का खासदार म्हणजे काहीही अन कसेही चालते, मुख्य म्हणजे कर्तृत्व न पाहता भाजप लोकसभा तिकीट वाटप करते असे आपण सुचवताय ?
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Sun, 01/09/2022 - 09:38 नवीन
आमदार ऐवजी

खासदार

असे वाचावे
नाहीतर यायचे उगाच एखादे लिंकाधिपती परत अक्कल शिकवत
  • Log in or register to post comments
T
Trump Sun, 01/09/2022 - 09:44 नवीन
सिनेमातून काम करणे अन उत्तम नृत्य कलाकार असणे सोडून तसे तर मग श्रीमती हेमा मालिनी ह्यांचे मथुरेच्या आमदार व्हायला तरी काय कर्तृत्व होते सरजी ? का खासदार म्हणजे काहीही अन कसेही चालते, मुख्य म्हणजे कर्तृत्व न पाहता भाजप लोकसभा तिकीट वाटप करते असे आपण सुचवताय ?
मान्य. मी पंतप्रधानपदाविषयी बोलतो आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 01/11/2022 - 06:49 नवीन
आमची बसंती सॉरी पसंती. का हो तुम्ही शेवटी भाजप मधलीच नटी शोधलीत? नटीच शोधायची तर जया बच्चन किंवा तत्सम हुच्चभरू शोधायची. नाही तर तुमचे महापुरुष किंवा जनेयुधारी, पिंकी, भुरी चाची, बहेनजी, ममता आपा, कायम भावी पंतप्रधान यातला कोणी लायक वाटत नाही काय? अ रे रे
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 01/11/2022 - 08:09 नवीन
डॉक्टर साहेब , मस्त पकडलात ,, पण खर सांगतो या महाश्यांनी जेवहा पंतप्रधान पदासाठी "त्यन्चि पसन्ती हेमा मालिनी" असे लिहले तेव्हा ते गंभीर नसावे ... उलट हि एक प्रकारची कुचेष्टा होती ... एवढा शिकलेला माणूस यवेध थिल्लर पणा कसा करू शकतो याचे आश्चर्य वाटते त्यांचा मोदी / भाजप द्वेश सर्वश्रुत आहे दुर्दैव असे कि बरेचदा अवघड प्रष्ण विचारला कि "चालूदाय " म्हणून पलून जायचे ... अर्थात प्रत्येक जण काही भाजपचा समर्थक असणार नाही फक्त अपेक्षा , एवढीच असते कि टीकाकाराने "फेअर " टीका करावी , पण ते होणे नाही जाऊदे
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 01/11/2022 - 08:40 नवीन
काय डाक्टर तुम्ही ....! बारामतीचे काका पन पहिजेत राव यादीत !आणि स्त्रीच पाहिजे तर पिंपरीचं दादांच्या ताई आहेत कि ! नतरी त्या सध्या दिल्ली ला असतात मग कस्स मराठी माणसाला एकदा पि येम खुर्चीवर बूड टेकाय मिळाला म्हणून "बँड्रा" ची "महा "शि" व सेना नाचायाला मोकळी
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 01/11/2022 - 15:51 नवीन
कायम भावी पंतप्रधान काय राव त्यांचं नाव तर है च कि !
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Sun, 01/09/2022 - 09:33 नवीन
आपलं रागबीग काय नसतं. आणि आपल्यासारखं आदळआपटही नसते.
&#129315 &#129315 &#129315 &#129315
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Sat, 01/08/2022 - 11:01 नवीन
- निदान लोकशाही वर आपला विश्वास आहे का ? २वेळा निवडून आले ते पचत नाही दिसतंय ? - चांगली लोकशाही असेल तर सतत एकाच पक्षाची सत्ता नसावी हे आपलया सारखया शिकलेल्या माणसाला कळत असावे ! - मोदींनी आणीबाणी करून सत्ता घेतली नाही! इंदिरा गांधींनी केली होती विसरलात - राष्ट्रवाद ची काँग्रेस आणि त्याचं गुलामांना एवढी घृणा का -हिंदुत्व- कितीतरी भाजप ला मत देणार काही "हिंदुराष्ट्रवादी " नाहीत , सर्वधर्म संमभाव धरून ठेऊन सुद्धा भारतात हिंदूंना मानाने जगता यावे आणि देश पण सुधारावा / लोकशाही बळकट व्हावी म्हणून पाठिंबा देतात एवढे हि समजत नाही ... पण तुम्ही फक्त "भक्त " म्हणून लेबल लावणार आणि पळून जाणार -भारत प्रामुख्यने हिंदू आहे तर अगदी सरकारी वयवस्थेत हिंदूंचं चालीरीतींचा प्रभाव असणार ना? इतर लोकशाही देशात डोकवून बघा जरा म्हणजे कळेल ( अर्हताःत तुम्ही म्हणणार भारताचं बाहेर काय चाललंय याचंही घेणं देना नाही -- आणि आमचयासारखे अनिवासी बोलू शकत नाहीत ! -राष्ट्रवाद आणि हिंदुत्व हे इंदिरा गांधींनी वापरले होते आणि त्यांचं खुनानंतर काँग्रेस ने वापरले होते -कोणत्याही गोष्टीत काँग्रेसकडे बोट करुन पक्षीय द्वेष कदाचित उभा करता येईल! याच वाक्यात कोंग्रेस हा शब्द काढून भाजप घाला भाजप काही १००% धुतलाय तांदळा सारखा स्वच्छ नाही हे जरी खरे असले तरी एवढा द्वेष एका प्राध्यापकांकडून ? येवद्धी मळमळ !
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 01/11/2022 - 08:32 नवीन
बर मग कोन्ग्रेस चा काय प्लान? ते तरि सान्गा मान्य झाल्यास त्यांना करू सपोर्ट ! . हा बोला - काश्मीर चा कायदा परत फिरवणार ? - शेतकऱ्यांना सगळं काही फुकट देणार? - हज ची सुबसिडी परत सुरु करणार ? - आरक्षण ८०% ०करणार ? - समान नागरी कायद्याचा प्रयत्न तरी करणार ? - सी ए ए आणि त्या सलग्न जे फिरवणार - शाळेचं पुस्तकातून "हिंदूतला "ह" सुद्धा येणार नाही या ची खबरदारी घेणार - सरकारी काय खाजगीत पण हिंदू प्रथांवर बंदी आणणार ? - टाटा ला हाकलून परत एअर इंडिया परत घेणार - सगलया खाजगी बँका सरकारी करणार - अडाणी / अंबानी ला तुरुंगात टाकणार ( रशियात पुतीन करतो तसे ) - फक्त हलाल असा फतवा काढणार ? आपल्याला तर पाहिजे "क्रांती" जनेउधारी राजकुमारांकडून तीच अपेक्षा आहे बघा , बाय द वे "हिंदू भावनांचा " भडका" उडाला आहेच त्याला कारणीभूत काँगेस अँड दावे
  • Log in or register to post comments
स
सुक्या Sat, 01/08/2022 - 00:08 नवीन
मुख्यमंत्री -- मिसेस मुख्यमंत्री -- राबडीदेवी -- मिसेस माजी मुख्यमंत्री गेले तीन चार दिवस हा कलगीतुरा पाहतो आहे. इतकी वर्षे झाली तरी शिवसेनेची मानसिकता / वैचारीक जडण घडण अजुनही इतक्या खालच्या दर्जाची आहे हे पाहुन जरा नवल वाटले. म्हणजे आता आपण सत्ताधारी पक्षात आहोत / आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे तर जरा वागण्याबोलण्यात थोडी मॅचुरिटी दिसायला हवी. ती अजुनही दिसत नाही. मुख्यमंत्री आजारी आहेत .. गेले दोन वर्षे ते मंत्रालयात फिरकले नाहीत. आजारीपणात पदाचा कारभार दुसर्‍याकडे देउण राज्यशकट हाकायला हवे. तसे न करता अगदी भाट असल्यासारखे राज्यमंत्री अब्दुल सत्तार रश्मी ठाकरे यांचे नाव पुढे करतात. त्या मुख्यमंत्री झाल्या तर त्या महाराष्ट्राच्या राबडी देवी होतील असे जितेन गजारिया म्हणाले. लगेच सार्‍या महाराष्ट्राचा अपमान झाला असे समजुन पोलीस त्यांच्या मागे लागतात. त्यापुढे जाउन विद्या चव्हाण माजी मुख्यमंत्री यांच्या पत्नी ला या विवादात ओढुन डान्सिंग डॉल म्हणतात. यात हे सारे लोक ई. ३ री ब मधे असलेल्या मुलांसारखे का भांडत आहेत तेच समजत नाही. शासनावर लक्ष देण्याऐवजी असले पाचकळ वाद घालुन काय साध्य करत आहेत? शिवसेनेचा इतीहास बघतात त्यांना "भायेर भेट, दावतोच तुला" याउपर जास्त काही कळत नाही. पण ईतर दोन पक्ष जे या सरकारात सामील आहेत त्यांनी तरी जनाची नाही तर मनाची लाज ठेऊन कारभार करावा असे वाटते. बाकी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा कारभार आदित्य ठाकरे यांच्याकडे दिला तर मला आजीबात आश्चर्य वाटणार नाही. तशीही घराणेशाही ही फक्त ईतर पक्षात आहे. शिवसेनेत ती आजीबात नाही हे मला माहीत आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/08/2022 - 05:18 नवीन
हा पण एक मुद्दा होता ... काळाच्या ओघात, शिवसेनेचे मराठी प्रेम लोप पावले, हिंदूत्व लोप पावले, आता उरली ती फक्त घराणेशाही...
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Sat, 01/08/2022 - 07:04 नवीन
शिवसेनेचे मावळे असतील कदाचित मराठी आणि हिंदुत्वाच्या बाण्याचे (होतेच!) पण त्याचे शीर्ष नेतृत्व कधीच नव्हते. साधारण 70-80 ची मधली फळी मुख्यतः मराठी विचारांवर विश्वास ठेवत असावी. आणि त्यानंतर ची हिंदुत्व विचारांवर, पण शीर्ष नेतृत्वाने आधी लुंगी बदलल्यावर आणि मग टोपी बदलल्यावर त्यांची पंचाईत झाली. आता निदान शिवसेनेचे नेते तरी आपल्या शीर्ष नेतृत्वाला डीफेंड कसे करतात देव जाणे. पुढल्या निवडणुकीत नक्की कुठल्या मतदारांना टार्गेट करणार आहेत हे लोक?
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Sun, 01/09/2022 - 09:40 नवीन
रावसाहेब, सेनेचा उदय, दत्ता सामंत, जॉर्ज फर्नांडिस, मिल कामगार संप, सेनेचा उदय, त्यांना वसंत सेना नाव पडणे इत्यादी इतिहास तसेही जगजाहीर असताना भाजपने त्यांच्याशी युती केलीच का असेल हो ? इन द फर्स्ट प्लेस ?
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 01/08/2022 - 09:10 नवीन
आता आपण सत्ताधारी पक्षात आहोत / आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे तर जरा वागण्याबोलण्यात थोडी मॅचुरिटी दिसायला हवी. ती अजुनही दिसत नाही. तुम्ही भलत्याच अपेक्षा ठेवता असे दिसते, राज्याचे मुखमंत्री भाषणात गोमुत्र्,शेण आणि काय काय बोलतात तेव्हाच स्पष्ट होतो की आपण मुख्यंमंत्री आहोत याचे भान देखील त्या व्यक्तीस नाही. मा.हिंदूहृदय सम्राट यांंचे वरील भाषणात ते म्हणतात :- में मेरी शिवसेना की कॉग्रेस नही होने दूंगा... नही,कभी नही. आज जो मान,सन्मान तुम्हे मिल रहा है वो शिवसेना के नाम पे मिल रहा है. हिंदुत्व के लिए मिल रहा है, भगवा झेंडा के लिए मिल रहा है. इससे गद्दारी करना चाहते है ? याचा अर्थ उघड आहे की जनतेचा जनादेश लाथाडुन केवळ शिवसेनेचा मावळा मुख्यमंत्री होईल असे वचन दिले आहे असे सांगणार्‍यानेच मा.हिंदूहृदय सम्राट यांच्या तत्वांशी, पक्षाशी आणि खर्‍या शिवसैनीकांशीच केवळ सत्त्येच्या परम हव्यासासाठीच गद्दारी केली नाही का ? बर या बिघाडीत तेच लोक आहेत ज्यांनी मा.हिंदूहृदय सम्राट यांना अटक करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. गेले दोन वर्षे ते मंत्रालयात फिरकले नाहीत. असं काय करता ? अहो त्याला वर्क फ्रॉम होम म्हणतात. आजारीपणात पदाचा कारभार दुसर्‍याकडे देउण राज्यशकट हाकायला हवे. मला तर राज्यात किती मुख्यमंत्री आहेत तेच कळेनासे झाले आहे, कारण कोणत्याही खात्याचा कोणतेही मंत्री मुखमंत्री असल्या सारखेच कोणत्याही विषयावर बोलतो. सगळ्या बैठका मा.शरदचंद्रजी पवार घेतात आणि बैठक झाल्यावर सगळे मंत्री-संत्री गण बैठकीतुन बाहेर आल्यावर आम्ही साहेबांचे मार्गदर्शन घेतले असे सांगतात. यावरुन हे सिद्ध होते की मा.शरदचंद्रजी हे एकाच वेळी २ पक्ष चालवत आहेत. :))) उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा कारभार आदित्य ठाकरे यांच्याकडे दिला तर मला आजीबात आश्चर्य वाटणार नाही. मी नाही, तुम्ही याला निवडल आहे. शिवसेनेत घराणेशाही अजिबात नाही असे वक्तव्य कधी कानावर पडले तर आश्चर्य वाटणार नाही. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Imran Khan - Satisfya (Official Music Video)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/08/2022 - 07:04 नवीन
“माननीय पंतप्रधान, अशा प्रकरणांवर तुमचं मौन निराशाजनक आहे”, आयआयएमच्या प्राध्यापक-विद्यार्थ्यांचं मोदींना पत्र; व्यक्त केली चिंता! https://www.loksatta.com/desh-videsh/iim-students-professors-letter-to-pm-narendra-modi-on-intolerance-hate-speech-pmw-88-2752661/ ------ साधू हत्याकांड झाले, तेंव्हा ही मंडळी गप्प का बसली? पुलावामा हत्याकांड झाले, तेंव्हा ही मंडळी गप्प का बसली? अमरावती दंगल प्रकरणात, ही मंडळी गप्प का बसली? आझाद मैदान दंगल प्रकरणात, ही मंडळी गप्प का बसली?
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Sat, 01/08/2022 - 07:12 नवीन
जशी जशी उत्तरप्रदेश निवडणूक जवळ येईल तसे असले प्रकार वाढत जातील आणि एकदा निवडणूक झाली की हे लोक शांत बसतील.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Sat, 01/08/2022 - 07:50 नवीन
एखादा माणूस जितका जास्त शिकलेला आणि जितक्या मोठ्या संस्थेतून शिकलेला असतो तितका तो वायझेड असायची शक्यता वाढते असे मला वाटते असे काही बघितल्यामुळेच. यावर सही करणार्‍या लोकांपैकी काही तर तिथले प्रोफेसर आहेत. मग काय विचारायलाच नको. सगळाच आनंदीआनंद. अहमदाबादच्या तीन प्रोफेसर्सची नावे आहेत- अंकुर सरीन, नवदीप माथूर आणि राकेश बसंत. यापैकी पहिल्या दोघांविषयी मला विशेष माहिती नाही. पण तिसरे- राकेश बसंत मुसलमानांना आरक्षण द्या अशी शिफारस करणार्‍या सच्चर कमिशनचे सल्लागार होते. ट्रम्पतात्या भारतात आले होते तेव्हा पूर्व दिल्लीत दंगल झाली होती आणि त्यात हिंदूंची कत्तल झाली होती त्या दंगलीच्या दरम्यान विखारी वक्तव्ये देणारा विचारवंत हर्ष मांदरला गेस्ट प्रोफेसर म्हणून बोलावण्यात या राकेश बसंत यांनीच पुढाकार घेतला होता असे ऐकले होते. खखोदेजा. अशा माणसाकडून दुसरी अपेक्षा काय करणार? यात कलकत्त्याच्या आय.आय.एम च्या प्रोफेसर मंडळींनी कशी सही केली नाही याचेच आश्चर्य वाटत आहे. ती संस्था म्हणजे डाव्या विचारवंतांचा गड आहे. अशा संस्थांमध्ये डाव्या विचारांचे कित्येक विद्यार्थी असतात. एकीकडे म्हणायचे भांडवल हे सगळ्या वाईट गोष्टींचे मूळ असते पण इन्व्हेस्टमेंट बँकांमध्ये काम करताना गलेलठ्ठ पगाराचा चेक दिसला की मग परत आपल्या क्लाएंटला तेच भांडवल उभे करायला मदत करायची. आणि ते करताना सुध्दा आपले डावे विचार कायम ठेवायचे हे विशेष. या मंडळींच्या फालतूपणाविरोधात सृजनपाल सिंग (ए.पी.जे. अब्दुल कलामांचे शेवटच्या वर्षांमधील सचिव) आणि अमी गणात्रा सारखे प्रसिध्द माजी विद्यार्थी सह्यांची मोहिम वगैरे चालू करतील असे वाटते. सी.ए.ए च्या वेळेसही या प्रोफेसर लोकांनी असाच फालतूपणा केला होता त्याला अशा कोणीकोणी पुढाकार घेऊन उत्तर दिले होते. त्यांच्या पिटिशनवर मी पण सही केली होती.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Sat, 01/08/2022 - 09:22 नवीन
यात कलकत्त्याच्या आय.आय.एम च्या प्रोफेसर मंडळींनी कशी सही केली नाही याचेच आश्चर्य वाटत आहे. आजच निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत त्यामुळं सह्या करायला नक्कीच वेळ मिळेल.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 24 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 28 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 31 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा