ते पंधरा लाख !
२०१४ च्या निवडणुकीच्या धामधुमीत प्रत्येक अकौंटमध्ये पंधरा लाख जमा करू अशी घोषणा झाली आणि जणू प्रत्येक भारतीय कधी एकदा तो एसेमेस आपल्या मोबाईलवर येतोय याची डोळ्यात प्राण आणून वाट बघत होता. दोन तीन वर्षे झाले तरी असे काही झाले नाही हे जाणवून कळवळलेल्या जनसमुदायांनी " फेकतोय साला" अशी ओरड सुरु केली.
माझ्या मते ते पंधरा लाख प्रत्येकाच्या अकौंटमध्ये कधीच जमा झाले आहेत. कल्पना अशी असेल की ते पैसे प्रत्यक्षात जमा व्हावेत आणि त्यातून आपण गाडी खरेदी करावी वा माडी बांधावी तर तसे फुकटच्या पाकट का बरे व्हावे आणि कशासाठी ? हे समजावून सांगण्याची गरज असू शकते. पण समजावून सांगितलं नाही हे ही ठीकच आहे. कारण मग ज्यांचा भ्रमनिरासच झाला आहे किंवा ज्यांना पोटदुखीच आहे त्यांनी गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा मधल्या " सोन्याच्या टोपीची" आठवण झाली असती आणि फेकू ऐवजी नाम्या म्हणून टिंगल केली असती, पण टिंगल चुकलीनसती. वैफल्य वगैरे.
आपल्या अकाऊंट मध्ये पंधरा लाखच काय कोट्यवधी रुपये या सरकारने जमा केले आहेत. फक्त एकच म्हंजे उदाहरणार्थ : मागील सरकारने एकूण पेट्रोल खरेदीचे फक्त ५५ % बिल इराणला अदा केले होते. उर्वरित बिलाचे कर्ज देशावर म्हंजे तुमच्या माझ्या डोक्यावर २०१४
मध्ये आणि अलीकडेपर्यंत होते. आजच्या आकड्या नुसार ही रक्कम होती पाच हजार करोड रुपये. ही रक्कम आपल्या डोक्यावर देय होती. ती रक्कम एक टाकी अदा भारत सरकारने अलीकडे केली आहे. आता फक्त एका व्यवहाराने पाच हजार करोड भागिले एकशे तीस करोड एवढी रक्कम तुमच्या माझ्या डोक्यावरून कर्ज कमी झाले, म्हणजे खात्यात जमा झाली आहे. दर डोई पंधरा लाख कधीच वसूल झाले होते. असे अनेक व्यवहार आहेत ज्याचा स्वतंत्र अभ्यास करता येईल. आणखी उदाहरणार्थ नोटबंदी नंतर सुमारे अडीच लाख कंपन्या व्यवहारात गडबड जाणवल्यामुळे बंद करायचे आदेश सरकारने दिले. त्यांची बॅंकांमधली सुमारे तेहतीस हजार कोटी रुपयांची ठेव ही आजवर कुणीच व्यक्ती वा कंपनी मागायला आली नाही, म्हंजे क्लेम वगैरे केला नाही. ती संपुर्ण रक्कम सरकारी तिजोरीत जमा होईल. शिवाय अशा सर्व ठेवींचा स्रोत अज्ञात ठरवून ती ठेवणाऱ्या व्यक्ती वा कंपनी यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश इन्कम टॅक्सवाल्याना दिले आहेत. दंडाची वसुली त्यातून जी होईल ती रक्कम आणखी काहीपट असेल. काय पंधरा लाखाचं कौतुक करत बसलीय जनता !
"आम्ही लोकांच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करू"
असे मोदी म्हणाल्याचे कधीही पाहिले किंवा वाचले नाही. मी पाहिलेल्या व्हिडीओ मध्ये श्री मोदी असे म्हणतात कि"जर काँग्रेसच्या काळात देशाबाहेर गेलेला पैसा परत आला तर प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा होतील".
या दोन वाक्यात असलेला स्पष्ट फरक लक्षात घेतला तर विरोधी ही पक्षांनी याचे केलेले राजकीय भांडवल सहज लक्षात येईल. अर्थात त्यांचा याला आक्षेप असाच असणार आहे कि मग परदेशात असलेले पैसे आणा कि भारतात तुम्हाला कोणी थांबविले आहे. श्री मल्ल्या किंवा स्पष्ट पणे पुरावे असणाऱ्या अबू सालेम सारख्या लोकांना येथे आणण्यात किती कायद्याच्या भानगडी कराव्या लागत आहेत हे जर आपण पहिले तर हे काम किती कठीण आहे हे समजून येईल. अर्थात मोदी द्वेष्ट्या लोकांना समजूनच घ्यायचे नाही त्यामुळे मी अजून काही लिहिणारच नाही. जर श्री मोदी "आम्ही लोकांच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करू" हे म्हणाल्याचं व्हिडीओ कुणाकडे असेल तर मी माझे म्हणणे मागे घेईन. अन्यथा आरोपांचे गुऱ्हाळ चालू द्या. आम्ही बसतो पोपकोर्न घेऊन.