Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

ते पंधरा लाख !

स
सुधीर मुतालीक
Mon, 06/04/2018 - 12:44
🗣 264 प्रतिसाद
२०१४ च्या निवडणुकीच्या धामधुमीत प्रत्येक अकौंटमध्ये पंधरा लाख जमा करू अशी घोषणा झाली आणि जणू प्रत्येक भारतीय कधी एकदा तो एसेमेस आपल्या मोबाईलवर येतोय याची डोळ्यात प्राण आणून वाट बघत होता. दोन तीन वर्षे झाले तरी असे काही झाले नाही हे जाणवून कळवळलेल्या जनसमुदायांनी " फेकतोय साला" अशी ओरड सुरु केली. माझ्या मते ते पंधरा लाख प्रत्येकाच्या अकौंटमध्ये कधीच जमा झाले आहेत. कल्पना अशी असेल की ते पैसे प्रत्यक्षात जमा व्हावेत आणि त्यातून आपण गाडी खरेदी करावी वा माडी बांधावी तर तसे फुकटच्या पाकट का बरे व्हावे आणि कशासाठी ? हे समजावून सांगण्याची गरज असू शकते. पण समजावून सांगितलं नाही हे ही ठीकच आहे. कारण मग ज्यांचा भ्रमनिरासच झाला आहे किंवा ज्यांना पोटदुखीच आहे त्यांनी गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा मधल्या " सोन्याच्या टोपीची" आठवण झाली असती आणि फेकू ऐवजी नाम्या म्हणून टिंगल केली असती, पण टिंगल चुकलीनसती. वैफल्य वगैरे. आपल्या अकाऊंट मध्ये पंधरा लाखच काय कोट्यवधी रुपये या सरकारने जमा केले आहेत. फक्त एकच म्हंजे उदाहरणार्थ : मागील सरकारने एकूण पेट्रोल खरेदीचे फक्त ५५ % बिल इराणला अदा केले होते. उर्वरित बिलाचे कर्ज देशावर म्हंजे तुमच्या माझ्या डोक्यावर २०१४ मध्ये आणि अलीकडेपर्यंत होते. आजच्या आकड्या नुसार ही रक्कम होती पाच हजार करोड रुपये. ही रक्कम आपल्या डोक्यावर देय होती. ती रक्कम एक टाकी अदा भारत सरकारने अलीकडे केली आहे. आता फक्त एका व्यवहाराने पाच हजार करोड भागिले एकशे तीस करोड एवढी रक्कम तुमच्या माझ्या डोक्यावरून कर्ज कमी झाले, म्हणजे खात्यात जमा झाली आहे. दर डोई पंधरा लाख कधीच वसूल झाले होते. असे अनेक व्यवहार आहेत ज्याचा स्वतंत्र अभ्यास करता येईल. आणखी उदाहरणार्थ नोटबंदी नंतर सुमारे अडीच लाख कंपन्या व्यवहारात गडबड जाणवल्यामुळे बंद करायचे आदेश सरकारने दिले. त्यांची बॅंकांमधली सुमारे तेहतीस हजार कोटी रुपयांची ठेव ही आजवर कुणीच व्यक्ती वा कंपनी मागायला आली नाही, म्हंजे क्लेम वगैरे केला नाही. ती संपुर्ण रक्कम सरकारी तिजोरीत जमा होईल. शिवाय अशा सर्व ठेवींचा स्रोत अज्ञात ठरवून ती ठेवणाऱ्या व्यक्ती वा कंपनी यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश इन्कम टॅक्सवाल्याना दिले आहेत. दंडाची वसुली त्यातून जी होईल ती रक्कम आणखी काहीपट असेल. काय पंधरा लाखाचं कौतुक करत बसलीय जनता !

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 65339 views

🗣 चर्चा (264)
स
सोमनाथ खांदवे Sun, 06/10/2018 - 14:11 नवीन
तुमचे असे म्हणणे आहे की बिल्डिंग मध्ये राहणारे पाईप ने गॅस भेटण्या अगोदर फ्लॅट मध्ये चूल पेटवत होते ? त्यांच्या कडे पूर्वी सुद्धा कनेक्शन असणार ना . जर नव्हते , तर आता पुण्यातील वितरकाकंडे गॅस शिल्लक कसा राहिला व त्याच्यावर दूर दूर पर्यंत वितरित करण्याची वेळ का आली ? दोनच शक्यता आहेत 1) गॅस चे प्रोडक्शन ज्यास्त होत आहे 2 काळाबाजार थांबविण्यात यश आले ज्या रंगाचा चष्मा घालू तसे दिसणार .
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sun, 06/10/2018 - 14:54 नवीन
गॅस चे प्रोडक्शन ज्यास्त होत आहे हे शक्य नाही कारण भारत गॅस आयात करतो. याचा अर्थ दुसरा पॉईंट बरोबर आहे.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sun, 06/10/2018 - 16:27 नवीन
पूर्वी तर टेलिफोनलाही रान्गा लागायच्या. लोक्सण्ख्या वाढेल, गावाचा विस्तार वाढेल , तशा एजन्सीही वाढल्या, स्पर्धेमुळे लोकाना चाण्गली सुविधा मिळू लागली. केबल ऑपरेटर , गॅस एजन्सी , मोबाइल सगळ्या व्यवसायात हेच चित्र आहे. पूर्वी विकणार्याचे मार्केट होते, आज ग्राहकांचे आहे. पण काय आहे, उद्या सूर्यग्रहण सुटले तरी ते मोदींमुळे सुटले, असे म्हणायची पद्धत आहे. जगभर एल ई डी दिव्याच्या किमती कमी झाल्या हेच सप्रमाण दाखवले तरी मोदींच्या योजनेमुळे भारतातील बल्बच्या किमती ढासळल्या , यावर भक्त ठाम असतात.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 06/11/2018 - 05:56 नवीन
मोगा खान India orders 770 million LED light bulbs, prices drop 83 per cent https://www.theregister.co.uk/2016/04/01/india_orders_770_million_led_light_bulbs_prices_drop_83_per_cent/

आपण चष्मा लावलेला असल्याने आपले डोळे उघडले तरी आपल्याला अंधारच दिसणार आहे.

पण इतर लोकांच्या माहितीसाठी वरील दुवा पाठवला आहे जो भारतातील पत्रकारांचा नसून विलायतेतील आहे. त्यांनी The scheme's already seen over 50 million LED bulbs distributed and India's reportedly placed massive orders with manufacturers as it chases a target of 770 million LED bulbs. No wonder the price is going down: India may well be scoring bulk purchase discounts.असा म्हटलं आहे. मोदीद्वेष असला किंवा हिरवा चष्मा लावला कि असाच होतंय.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Mon, 06/11/2018 - 07:19 नवीन
http://www.ledlightsinindia.com/news/led-bulb-will-get-cheaper-worldwide Philips Electronics is also offering low-cost LED bulbs. You can buy Philips’s 10.5-watt LED at The Home Depot for less than $15, which is 50% less compared to competing LED bulbs. The company plans to provide a same bulb for below $10 by the end of 2013. Philips 10.5-watt LED bulbs are as bright as 60-watt incandescent lighting. They are even 80% more efficient and don’t have mercury. These bulbs cannot be dimmed like expensive ones. 2013 ची बातमी आहे , 11 जून 2013 जरा मोगाद्वेष बाजूला ठेवून राष्ट्रहित पहा
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 06/11/2018 - 08:19 नवीन
हायला तुम्हाला उंदराबद्दल फारच आकर्षण आहे असं वाटतंय. जेंव्हा पाहावा तेंव्हा डोंगर पोखरुन उंदीर काढताय? २०१३ चा दुवा देताय ज्यात एल इ डी चा भाव ६५० रुपयाचा आसपास दाखवला आहे/ होता. मी दुवा दिला आहे जो २०१६ चा आहे ज्यात एल इ डी चा भाव ५५ रुपये दिला आहे. बाकी सर्व सोडा निदान दुवा उघडून पाहायचे कष्ट तरी घ्या. आणि हो डोळे उघडले नाही तर अंधार दिसणारच. उगाच मोगा द्वेष करायला तुम्ही माझ्या खिजगणतीतहि नाही. तुमच्या भंपक आणि बिनबुडाच्या वाक्यांचा प्रतिवाद मात्र मी करतो.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Tue, 06/12/2018 - 23:45 नवीन
2013 साली worldwide हे शब्द त्यात आहेत. असे bulb ग्राहपोपयोगी असले तरी ते company च्या पायावर धोंडा हाणानारे आहे , कारण bulb ची life वाढल्याने कमी पिसेस भविष्यात विकले जाणार , त्यामुळे जितका मिळेल तितका बिझनेस , किमतीत अडून न रहाता करणे क्रमप्राप्त होते. पूर्वी 60 जीबी हार्ड डिस्कचा पीसी 30 हजारला यायचा. आता 500 जीबी चा 18000 त असेंम्बल करून मिळतो, पण म्हणून काँग्रेसने computer क्रअंती आणली , म्हणून किमती कमी झाल्या , असे कुणी म्हणत नाही कंपन्या त्यांचे प्रॉफिट कुणाच्या सांगण्यावरून कमी करत नाहीत मै व्यापारी हू, तसे , वो भी व्यापारीही है
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Wed, 06/13/2018 - 00:06 नवीन
https://thewire.in/economy/why-you-shouldnt-be-bedazzled-by-modis-led-claims Image removed. सगळीकडे दिवे लावून झाले , तर नंतर govt order बंद झाल्या , तर किमती पुन्हा वर जाणार आहेत का ? नाही ना ?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 06/13/2018 - 06:27 नवीन
मोगा खान तुमचा दुवा असुरक्षित आहे त्यामुळे उघडत नाही.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 06/13/2018 - 06:33 नवीन
कंपन्या त्यांचे प्रॉफिट कुणाच्या सांगण्यावरून कमी करत नाहीत तुम्ही व्यापारी असलात तर तुम्हाला व्यापारात काही कळत नाही असेच म्हणावे लागेल. लोक एवढी प्रचंड ऑर्डर मिळवण्यासाठी जेमतेम नफ्यावरही काम करण्यास तयार होतात. ७७ कोटी एल इ डी बल्ब ची ऑर्डर किती प्रचंड आहे हे समजतंय का? एकदाच ऑर्डर पूर्ण करून आयुष्यभर बसून खाता येईल इतकी आहे. अगदी १० रुपये नफा धरला तरी ७७० कोटी होतील. ५ रुपये नफा धरला तरी ३८८ कोटी होतात. आणि एल इ डी बल्ब चे आयुष्य ५ वर्षे धरले तरी त्याची परत मिळणारी ऑर्डर परत तितकीच मोठी आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 06/13/2018 - 06:40 नवीन
एल इ डी बल्ब चे आयुष्य This particular 10-year claim means that the bulb can last for nearly 11,000 hours. So if we were to have the bulb on for eight hours every day (two hours in the morning and six hours in the evening, for instance—possibly longer on the weekends), this means that it would only last shy of three and a half years. https://www.howtogeek.com/280843/do-led-light-bulbs-really-last-10-years/ एल इ डी बल्ब लावण्याचे कारण केवळ त्याचे आयुष्य जास्त आहे असे नव्हे तर ते एक एकक विजेट साध्या बल्ब च्या १० पट प्रकाश देतात. ( ENERGY TO LIGHT CONVERSION ५% IN BULB AND ५० % IN LED). म्हणजेच ६ वॉट चा एल इ डी ६० वॉट च्या बल्ब इतका प्रकाश देतो तोसुद्धा पिवळा नव्हे तर पांढरा. मोदीद्वेषाचा चष्मा लावला आहे आणि त्यावर डोळे हि बंद केले आहेत. मग प्रकाश दिसणार कसा?
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Wed, 06/13/2018 - 08:42 नवीन
LED lights पुराण, What is so special about LED lights? LED lights are up to 80% more efficient than traditional lighting such as fluorescent and incandescent lights. 95% of the energy in LEDs is converted into light and only 5% is wasted as heat. ... Less energy use reduces the demand from power plants and decreases greenhouse gas emissions How much can you save by buying LED light bulbs? If you run a single incandescent bulb 5 hours a day for two years, it will cost you around $32 (depending on your energy rates). Most of that money is spent on electricity. If you run a single LED bulb 5 hours a day for two years, it will cost you $12. What are the benefits of using LED lights? Benefits Of LED Lighting. LEDs are extremely energy efficient and consume up to 90% less power than incandescent bulbs. Since LEDs use only a fraction of the energy of an incandescent light bulb there is a dramatic decrease in power costs ईतकी महती असलेल्या LED lights चा प्रसार मा. श्री मोदीजींनी भारताच्या प्रगतीसाठीच केलेला आहे. पॉवर सेव्ड = पॉवर प्रोडुस्ड , ह्या समिकरणा नुसार मा. श्री मोदीजींनी त्यांच्या ह्या एका प्रोजेक्ट द्वारे हजारो मॅगाव्हॅट विज निर्मिती केलेली आहे. "विकास , विकास" आणखी काय असत ? मिपावर काही लोक, ब्रिटिशांनी बनवलेली रेल्वे मोडुन नविन रेल्वे करायला पाहीजे होती का काँग्रेसने ? असा तिरसट सवाल विचारत असतात. जिथे आस असते तिथे रस्ता असतो
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Wed, 06/13/2018 - 09:48 नवीन
म्हणजेच ६ वॉट चा एल इ डी ६० वॉट च्या बल्ब इतका प्रकाश देतो तोसुद्धा पिवळा नव्हे तर पांढरा. पिवळा प्रकाश देणारा एल ई डी बल्ब हा पांढरा प्रकाश देणाऱ्या एल् ई डी बल्ब पेक्षा महाग असतो.
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Wed, 06/13/2018 - 08:40 नवीन
लोक एवढी प्रचंड ऑर्डर मिळवण्यासाठी जेमतेम नफ्यावरही काम करण्यास तयार होतात. ७७ कोटी एल इ डी बल्ब ची ऑर्डर किती प्रचंड आहे हे समजतंय का? ही इतकी मोठी ऑर्डर नेमकी कोणाला मिळाली हे सांगू शकाल का?
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Tue, 06/12/2018 - 17:08 नवीन
India orders 770 million LED light bulbs, prices drop 83 per cent भारताने कोणाला ह्या बल्बच्या ऑर्डर दिल्या आणि ह्या ऑर्डरमुळे जगात कुठे कुठे ह्या बल्बच्या किमती कमी झाल्या?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 06/12/2018 - 17:24 नवीन
जाला वर खोदून पहा उत्तरे मिळतील.
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Tue, 06/12/2018 - 17:33 नवीन
तुम्ही दिलेल्या लिंक मध्ये सापडले नाही. तुम्हाला सापडल्यास येथे डकवा.
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Sun, 06/10/2018 - 17:15 नवीन
तुम्ही एका प्रतिसादात राजकीय विचारधारा बदलण्याचा संकेत दिला होता म्हणून हा प्रतिसाद. अन्यथा आडमुठ्या प्रतिसादांचा मी प्रतिवाद करीत नाही. असं बघा, पाईप गॅस आल्यामुळे जी कनेक्शन्स उपलब्ध झाली ती कुणालातरी मिळालीच ना. म्हणजे गॅसच्या दुकानाबाहेर जी पहाटेपासून रांग लागत होती ती तशीच राहायला हवी होती. तशी परिस्थिती नाहीये. आमच्या परिसरातील गॅस वितरकाला त्याचा एरिया वाढवून दिला आहे. म्हणजे उज्वल योजनेतील वाढीव कनेक्शन्स आकडा हा निदान पुण्यापुरता तरी संशयास्पद आहे. गॅसचा काळाबाजार हा तुम्ही म्हणता तेव्हडा कधीच मोठा प्रश्न नव्हता. तरीही तुमच्या भूमिकेवर ठाम असाल तर देवाक काळजी.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sun, 06/10/2018 - 13:57 नवीन
पुण्यात बऱ्याच वितरकांना आता दूर दूरपर्यंत गॅस वितरित करावा लागतोय कारण पाईप गॅस मुळे त्यांचे ग्राहक कमी झालेत !! चांगलीच गोष्ट आहे की ही, गॅस सिलींडर सोडाच आता गॅस पाईपने सुद्धा घरोघरी पोहोचवला गेलेला आहे. सबका साथ सबका विकास !!
  • Log in or register to post comments
T
Topi Sun, 06/10/2018 - 14:12 नवीन
फक्त एक कुटुंब वगळता बाकी काँग रेस चांगली आहे
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sun, 06/10/2018 - 14:52 नवीन
ग्राहकांच्या एका चुकीमुळे स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (एसबीआय) ने गेल्या 40 महिन्यांमध्ये 38 कोटी 80 लाख रुपयांची कमाई केली आहे. धनादेशावरील स्वाक्षरी न जुळल्याने एसबीआयने एवढी रक्कम ग्राहकांच्या खात्यातून कमी केली आहे. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, स्टेट बॅंक ऑफ इंडियाने गेल्या 40 महिन्यांमध्ये 24 लाख 71 हजार 544 लाख धनादेश स्वाक्षरी न जुळल्याने परत पाठवले. एका आरटीआयचं उत्तर देताना बॅंकेने मान्य केलं की, कोणताही धनादेश परत होतो (चेक रिटर्न) त्यावेळी बॅंकेकडून १५० रुपये चार्ज आकारला जातो, तसंच त्यावर जीएसटीही लागतो. म्हणजे प्रत्येक चेक रिटर्न झाल्यावर खातेदाराला १५७ रुपयांचा भुर्दंड बसला. आर्थिक वर्ष ( परत गेलेले चेक) 2015-16 60,0169 2016-17 99,2474 2017-18 79,5769 2018-19 83,132 (केवळ एप्रिल) यापूर्वी जानेवारीमध्ये आलेल्या एका अहवालानुसार एसबीआयने खात्यामध्ये किमान शिल्लक (मिनिमम बॅलन्स) न ठेवणाऱ्यांकडून 1771 कोटी रुपये दंड म्हणून वसूल केले होते. मिनिमम बॅलन्स म्हणून वसूल करण्यात आलेली ही रक्कम एसबीआयच्या दुसऱ्या तिमाहीच्या नेट प्रॉफिटपेक्षाही जास्त आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत एसबीआयचं नेट प्रॉफिट १५८१.५५ कोटी रुपये होतं. https://www.loksatta.com/desh-videsh-news/sbi-deducted-rupees-from-customers-account-due-to-non-match-of-cheque-1694637/
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sun, 06/10/2018 - 15:01 नवीन
स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (एसबीआय) ने गेल्या 40 महिन्यांमध्ये 38 कोटी 80 लाख रुपयांची कमाई केली आहे हे श्रेय मात्र श्री माननिय मोदीजीनाच द्यायला पाहीजे. १) स्टेट बॅंक ऑफ इंडिया एफिशीयंट झालेली आहे. २) धनादेशावरील स्वाक्षरी बारकाईने तपासली जात असल्याने होणार्या संभाव्य ग्राहकाम्च्या पैश्याच्या चोरीला अटकाव केलेला आहे. ३) धनादेशावरील स्वाक्षरी बारकाईने तपासली जात असल्याने व त्यावर दंड आ कारत असल्याने बँकेच्या ग्राहकांनी किमान स्वाक्षरी करताना तरी सावधानी बाळगली पाहीजे. असे अनेक धडेच या मुळे सामान्य जनतेला मिळालेले आहेत.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sun, 06/10/2018 - 16:39 नवीन
देशाची अर्थव्यवस्था कॅशलेस करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला मोठा झटका बसला आहे. जनतेच्या हाती असलेल्या रोख रकमेने विक्रम केला आहे. १८.५ लाख कोटींवरही ही रोकड पोहोचली आहे. नोटाबंदीच्या काळातील तुलनेत हे प्रमाण दुप्पट आहे. नोटाबंदीनंतर जनतेच्या हाती जवळपास ७.८ लाख कोटी रुपये होते. रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून ही बाब समोर आली आहे. सध्या १९.३ लाख कोटीहून अधिक रक्कम चलनात आहे. पण नोटाबंदीच्या काळात हा आकडा ८.९ लाख कोटी रुपये इतका होता. बँकांकडील रक्कम वगळता चलनात जनतेच्या हाती किती रोकड आहे हे समोर आलं आहे, रिझर्व्ह बँकेने ही माहिती दिली.
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Sun, 06/10/2018 - 17:41 नवीन
आता बोटांनी पूर्वीपेक्षा जास्त नोटा मोजायच प्रमाण वाढलं,ह्यालाच डिजीटल व्यवहार वाढले असं म्हणायचं.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sun, 06/10/2018 - 18:03 नवीन
मा श्री मोदीजींच्या जीवाच बर वाईट करण्याचा कट आता ऊघडकीस आलेला आहे !! हा कट वाम पंथीय पक्षाच्या नेत्यांनी नक्षल अतिरेक्यांबरोबर मिळुन केला असल्याच समोर आलेल आहे !! ह्या संबधीचे लिखीत पुरावे नावानीशी पुणे पोलिसांनी हस्तगत केलेले आहेत !! ह्या कटात कॉंग्रेसचे जेष्ठ नेतेही लिप्त असल्याच समजल आहे !! ऐका निस्वार्थी जन नेत्यांच्या जिवा ऊठणे हे ह्या कट करणार्या लोकांचा नाईलाज झालेला दिसतोय !! मा श्री मोदीजीच्या अथक परीश्रमामुळे देश प्रगतीपथावर वेगाने धावु लागलेला विरोधी पक्षाला पहावत नाही म्हणुनच त्यांनी मिळुन ठग बंधन निर्माण करण्याचा प्ल्ँन आहे !! पुणे पोलिस ह्या कटाच्यामागे असलेल्या सर्व कारस्थानींना लवकरच अटक करेल !! ह्या कटाचा सुगावा पोलिसांना लागल्यामुळे हादरलेल्या शैला राशिद ह्या वाम पंथिय स्रीला मा श्री मोदीजींच्या जीवा बद्दल अचानक कळवळा आला व ह्या कटाचा आळ त्यांनी गडकरी व आरऐसऐस वर केलेला आहे !! त्याला ऊत्तर म्हणुन गडकरींनी शैला राशिद वर मानहानीचा दावा ठोकला !!
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Sun, 06/10/2018 - 18:47 नवीन
तिचे नाव शेहला रशीद जे एन विद्यापीठ ची स्तूडेंट आहे , ज्या विद्यापीठात इंडिया मुर्दाबद व भारत तेरे तुकडे होंगे हजार चे नारे दिले जातात .ह्या विदयार्थ्यां वरील खर्च मंगु बाबा सारख्या लोकांनी भरलेल्या इनकम टॅक्स मधून केला जातो हे विशेष .
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sun, 06/10/2018 - 19:45 नवीन
मुरदाबादचे व्हिडीओ प्रथम भाजपयानाच मिळतात अन नंतर ते खोटेही ठरतात , त्यांचा खर्च कोण करते ?
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sun, 06/10/2018 - 19:48 नवीन
नोटांबंदीनंतर श्री मोदीजी बोलले - सगळे अतिरेकी , नक्षली समाप्त आता हे अजून कुठून आले ? की त्या 21 वेळा निक्षत्रियसारखे आहे ?
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sun, 06/10/2018 - 20:18 नवीन
मोगा खानला जीव्हरी लागलय !! ईव्हळतय !!
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sun, 06/10/2018 - 20:12 नवीन
एक कट उघडकीस काय आला , तोही खरा की खोटा , हेही माहीत नाही , तर मोदीजी व भक्तजी चिंतेत पडले. गांधीजींवर तर नथुरामने तीन वेळा attempt केले होते . तरी गांधीजी स्थितप्रज्ञ होते. गांधीजींचे फोटो हलवून स्वतःचे घालणे सोपे नाही.
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Mon, 06/11/2018 - 03:54 नवीन
तो कट खरा किंवा खोटा काहीही असू द्या , पण ज्यांनी देशाविरोधात एल्गार परिषद आयोजित करून दंगल घडऊन देशाच्या संपत्ती चे नुकसान केले अशा नक्सलींना चकमकीत यमसदनी धाडले पाहिजे .या देशात सहिष्णुता आहे म्हणूनच नक्षलीचें कार्यकर्ते ढोबळे ,विल्सन,राऊत गडलिंग व इतर उजळमाथ्याने शिक्षण क्षेत्रात काम करत आहेत व तरुणांची डोकी भडकवत आहेत ( मुंगा बाबा , तुम्हाला मी देश प्रेमी नागरिक समजतो ) .
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Mon, 06/11/2018 - 05:14 नवीन
देशातील संपत्तीचा नाश करणे , हा गुन्हा आहेच , त्याला पोलीस व कोर्ट कारवाई करेल पण असे नुकसान तर अयोध्या , सेना , मनसे , गोमांस प्रकाराने यातही झाले आहे, शिक्षा सर्व अपराध्याना द्याव्यात .
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 06/11/2018 - 07:02 नवीन
योग्य बोललास रे मंगू. "लोकशाही गेली तुमची चूलीत'म्हणणर्या शिवसेनेकडे भाजपाने 'आमचा नैसर्गिक मित्र' म्हणूनच पाहिले. १९९२ साली दंगलीचा आगडोंब उसळवून देणारे उप-पंतप्रधानही झाले. अमित शहांबद्दल तर बोलायलाच नको. जे.एन.यु.मध्ये डाव्यांचे प्राबल्य आहे ते भाजपावाल्यांना मोडून काढायचे आहे.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sun, 06/10/2018 - 19:25 नवीन
शेहला राशिद , उमर खालिद , कन्हय्या कुमार हे सर्व लाल सलाम वाले व त्यांचे पाठीराखे कोण ? सिताराम येचुरी , डी राजा सारखे कम्युनिस्ट व पप्पु सारखे टाळु वरचे लोणी खाणारे !!
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sun, 06/10/2018 - 20:27 नवीन
ठग्ज अॉफ ईंडीया !! पुर्वीच्या काळातले ठग्ज म्हणे लुटायचे लुट झाल्यावर जिव ही घ्यायचे !! आता अश्याच ठगांनी "ठग बंधन" करुन श्री मोदीजींविरुद्ध मोर्चा उघडलाय व आता हा कटाची बातमी आलीय!!
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Mon, 06/11/2018 - 04:34 नवीन
उत्तरेकडील राज्यांमध्ये दलित समाज मोदी सरकारविरोधात आक्रमक झाला होता. आता तर भाजपने नक्षलवाद्यांनी दलित आंदोलनाचा वापर करून मोदींच्या हत्येचा कट रचल्याचा ढिंढोरा पिटल्यामुळे दलित समाज आणखी संतापलेला आहे. नक्षलवाद्यांनी लिहिलेली कथित पत्रे पोलिसांच्या हाती लागण्याआधीच प्रसारमाध्यमांना मिळतात यावरूनच या सर्व प्रकरणात खरोखरच किती गांभीर्य आहे हे लक्षात येते. पुणे पोलिसांनी या पत्रांची सत्यता तपासून पाहिलेली नाही. न्यायालयातही या पत्रांच्या वस्तुनिष्ठतेबाबत शहानिशा झालेली नाही. त्यामुळे भाजपने दलितविरोधी पाऊल उचलून राजकीय धोका पत्करला आहे असे म्हणावे लागते. https://www.loksatta.com/lal-killa-news/bjp-in-india-1694739/
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Mon, 06/11/2018 - 07:24 नवीन
NDTV: PM Modi Assassination Plot Revealed In Maoist Letter, Say Cops: 10 Facts All India Reported by Saurabh Gupta, Edited by Deepshikha Ghosh A plot to assassinate Prime Minister Narendra Modi in a "Rajiv Gandhi-type incident" during one of his roadshows has been revealed in a letter seized from a suspected Maoist, the Pune police told a court on Thursday.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Mon, 06/11/2018 - 07:57 नवीन
First the Maoists plot to assassinate Modi. Then they write a long letter detailing the entire plan of assassination giving reasons on why they think Modi should be assassinated. They also give the possible locations where Modi can be targetted and how in the same letter. They talk about BJP's electoral victories in the same letter almost praising Modi for being instrumental in getting those victories. Then, in the same letter the Maoists ask for specific sum of money to procure specific type of arms and specific amounts of rounds of ammunition. They also solicit a reply to the letter in writing from the person to whom the letter has been sent. They mention the names of their "Comrades" in that letter, who would be involved in this assassination. They end the letter with even a "date" written at the end clearly defining when it was written. 18/4/17 And all this happens in that digital age, where data encrypted messaging apps are on every phone and one doesnt really have to send anyone any written letters. So yes, either the Maoists are stupid or someone thinks that the people are stupid to fall for this.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 06/11/2018 - 08:42 नवीन
थत्ते साहेब सगळे कम्युनिस्ट आणि माओवादी हे भाजप आणि रा स्व संघासारख्या राष्ट्रवादी संघटनांचा कट्टर द्वेष करतात. माओवादी कोणत्याही थरा ला जाऊ शकतात. जे लोक १२-१४ वर्षाच्या मुलांना फूस लावून दहशतवादी कार्याला लावून घेतात ते लोक मोदींसारख्या माणसाची हत्या करण्याचा करण्याचा कट करणार नाहीत हे म्हणणेच मूर्खपणाचे आहे. पत्र कदाचित योगायोगाने पोलिसांच्या हाती लागले असेल. माओइस्ट हे घातपाती आणि देशद्रोही कारवाया करण्याबद्दल प्रसिद्ध आहेतच. त्यांना चीनचा छुपा किंवा उघड पाठिंबा आणि आर्थिक आणि शस्त्रास्त्रांची मदत मिळत असते. या लोकांवर (कम्युनिस्ट आणि माओवादी) भरोसा ठेवणे हि एक संपूर्ण चूक आहे. कारण लोकशाहीवर त्यांचा मुळातच विश्वास नाही. डॉ मनमोहन सिंह काय म्हणाले ते खाली वाचून घ्या. आणि ही काँग्रेसची स्वतःचो योजना होती. आता केवळ विरोधी पक्षात गेले म्हणून माओवाद्यांना सहानुभूती दाखवणारा असतील तर पूर्णपणे आत्मघातकी धोरण ठरेल. In April 2006, Indian Prime Minister Manmohan Singh, a celebrated “moderate,” described the Maoists as the “single biggest internal security threat” — underscoring the country’s adherence to seeking a purely military solution to the conflict. Thereafter, Singh proceeded to allot a special budget for providing combat assistance to districts where Maoists were present. A rapid militarization of the police was undertaken and armories were upgraded with drones and other equipment designed for high-intensity warfare. Traditionally, anti-Maoist activities had been under the purview of civilian police and the central paramilitary forces. But Singh — for the first time — tried roping in the Indian military. Ideas like the bombing of Maoist strongholds floated around New Delhi’s power circles. The move was decried as overkill and unethical. Singh’s cabinet didn’t find adequate support for this even in the ranks of his own party. Moreover, the Indian Army publicly expressed its reluctance to get involved in domestic issues and turn its guns on citizens. शेवटी महाभारतात काय लिहिले आहे आम्ही पाच विरुद्ध शंभर असू परंतु बाह्य आक्रमण असेल तर आम्ही १०५ आहोत. हे धोरण सोडून संजय निरुपम किंवा श्री शरद पवार हे पत्र खोटं आहे असं कोणत्याही सबळ पुराव्या अभावी म्हणतात यात त्यांची कोती, आत्मकेंद्रित आणि राष्ट्रविरोधी वृत्तीच दिसून येते. गंमत म्ह्ण्जे सीताराम येचुरी यांच्या सारख्या कट्टर मोदी आणि भाजप द्वेष्ट्या माणसाने सुद्धा त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 06/11/2018 - 08:43 नवीन
दुवे https://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/cops-book-maoists-for-using-minors-in-subversive-activities/articleshow/63945822.cms https://thediplomat.com/2017/09/half-a-century-of-indias-maoist-insurgency/
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Mon, 06/11/2018 - 07:26 नवीन
A plot to assassinate Prime Minister Narendra Modi in a "Rajiv Gandhi-type incident" during one of his roadshows has been revealed in a letter seized from a suspected Maoist, the Pune police told a court on Thursday. Soon after, it was reported that Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis has also received letters, alleged from Maoist outfits, threatening him and his family. Home Minister Rajnath Singh said: "We are always concerned about our PM's security. Maoists are just fighting a losing battle".
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Mon, 06/11/2018 - 07:50 नवीन
सर्व विरोधी पक्षाचे धाबे दणाणले असल्यामुळे वाम पंथी पक्ष आपल्या नक्षलवादी अतिरेक्याकडुन पं प्र श्री मोदीजींच्या हत्त्येचा कट रचला होता ! पण सक्रिय पोलिसांनी माहिती मिळाल्यावर लगेच अॅक्शन घेतली! देशाच्या पंप्र च्या जीवावर उठणारे वामपंथी लोक जनतेच भल ईच्छितात ह्यावर कोणाचाच विश्वास राहीलेला नाही !!
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Mon, 06/11/2018 - 09:50 नवीन
आहे. माझ्या शेतातला आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते. आजपर्यंत 180 जोडप्यांनी हा आंबा खाल्ला असून, त्यापैकी दीडशे जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाल्याचा दावा भिडे गुरूजी यांनी केला आहे. आंधश्रद्धेला खतपाणी घालणारं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं असं म्हणायला हरकत नाही. दरम्यान, अहमदनगरचा उल्लेख 'अहमदनगर' नव्हे तर 'अंबिकानगर' असा करण्याचे आवाहन संभाजी भिडे यांनी केलं. तसंच सिंहासनाच्या रक्षणासाठी खरे तर या धारकऱ्यांच्या हाती तलवारी असायला पाहिजे होत्या. मात्र, त्यावरून लगेच लोकशाही वाचवण्याचा टाहो फुटेल असंही ते म्हणाले. ते अहमदनगरच्या टिळक रोड इथं झालेल्या सभेत बोलत होते. https://lokmat.news18.com/maharastra/couples-got-children-by-eating-mango-strange-statement-of-sambhaji-bhide-292287.html
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Mon, 06/11/2018 - 09:56 नवीन
तसंच हिंदूंचे खरे शस्त्रू भारतातले सुशिक्षीतच असल्याचं संभजी भिडे गुरुजी म्हणाले.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Mon, 06/11/2018 - 10:00 नवीन
मग साक्षरता मिशन बंद करून अशिक्षित वाढवा. भिडेजीही उच्चशिक्षित आहेत ना ?
  • Log in or register to post comments
व
विशुमित Mon, 06/11/2018 - 11:04 नवीन
| डँबिस००७ - अहो बास करा राव आता आदरणीय परमपुज्यपणा!
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Mon, 06/11/2018 - 14:07 नवीन
संदीप चांदणे साहेब तुम्ही आजच मिपावर कविता विभागा मध्ये पोस्ट केलेली कविता त्यांची परवानगी न घेता पोस्ट करत आहे . बांडगूळं आधीही दिसायची… पण, ती रानात. राईतल्या भल्याथोरल्या झाडांवर… ....जुन्या खोडांवर. आता मात्र ती दिसतात अगदी कुठेही… म्हणजे... रोपांवर वगैरे. इथपर चाललं असतं पण आता ती यायला लागलीत तणांवर.. माजलेल्या… …विचारांच्या तणांवर! संदीप चांदणे (११/६/२०१८
  • Log in or register to post comments
व
विशुमित Mon, 06/11/2018 - 14:49 नवीन
कविता इथे चिटकवण्याचं प्रयोजन काय आहे, कृपया हे समजू शकेल का? म्हणजे नक्की काय अर्थ गवसला आहे, हे आम्हाला पण समजू द्या.
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Mon, 06/11/2018 - 15:58 नवीन
काँग्रेस च्या आता पर्यंत च्या वर्तणुकीला चांदणे साहेबा च्या कविते तुन भावार्थ योग्य प्रमाणात प्रकर्षित झाला म्हणून त्यांची माफी मागून चिटकवली !!! असो ! सुज्ञास वेगळे सांगण्यास कारण नसावे .
  • Log in or register to post comments
व
विशुमित Tue, 06/12/2018 - 09:12 नवीन
अच्छा असे आहे व्हय! समजले. === अवांतर: चांदणेंच्या नजरेतून कवितेचा काय भावार्थ प्रकर्षित होतो हे समजले असते तर आणखी मज्जा आली असती. पण त्यावर ते काही लिहतील या बद्दल शंका आहे. (तसे त्यांनी लिहूच नये म्हणा!) जो जे वांच्छिल तो तें लाहो .. असो..
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 52 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 4 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 8 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 11 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा