Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

ते पंधरा लाख !

स
सुधीर मुतालीक
Mon, 06/04/2018 - 12:44
🗣 264 प्रतिसाद
२०१४ च्या निवडणुकीच्या धामधुमीत प्रत्येक अकौंटमध्ये पंधरा लाख जमा करू अशी घोषणा झाली आणि जणू प्रत्येक भारतीय कधी एकदा तो एसेमेस आपल्या मोबाईलवर येतोय याची डोळ्यात प्राण आणून वाट बघत होता. दोन तीन वर्षे झाले तरी असे काही झाले नाही हे जाणवून कळवळलेल्या जनसमुदायांनी " फेकतोय साला" अशी ओरड सुरु केली. माझ्या मते ते पंधरा लाख प्रत्येकाच्या अकौंटमध्ये कधीच जमा झाले आहेत. कल्पना अशी असेल की ते पैसे प्रत्यक्षात जमा व्हावेत आणि त्यातून आपण गाडी खरेदी करावी वा माडी बांधावी तर तसे फुकटच्या पाकट का बरे व्हावे आणि कशासाठी ? हे समजावून सांगण्याची गरज असू शकते. पण समजावून सांगितलं नाही हे ही ठीकच आहे. कारण मग ज्यांचा भ्रमनिरासच झाला आहे किंवा ज्यांना पोटदुखीच आहे त्यांनी गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा मधल्या " सोन्याच्या टोपीची" आठवण झाली असती आणि फेकू ऐवजी नाम्या म्हणून टिंगल केली असती, पण टिंगल चुकलीनसती. वैफल्य वगैरे. आपल्या अकाऊंट मध्ये पंधरा लाखच काय कोट्यवधी रुपये या सरकारने जमा केले आहेत. फक्त एकच म्हंजे उदाहरणार्थ : मागील सरकारने एकूण पेट्रोल खरेदीचे फक्त ५५ % बिल इराणला अदा केले होते. उर्वरित बिलाचे कर्ज देशावर म्हंजे तुमच्या माझ्या डोक्यावर २०१४ मध्ये आणि अलीकडेपर्यंत होते. आजच्या आकड्या नुसार ही रक्कम होती पाच हजार करोड रुपये. ही रक्कम आपल्या डोक्यावर देय होती. ती रक्कम एक टाकी अदा भारत सरकारने अलीकडे केली आहे. आता फक्त एका व्यवहाराने पाच हजार करोड भागिले एकशे तीस करोड एवढी रक्कम तुमच्या माझ्या डोक्यावरून कर्ज कमी झाले, म्हणजे खात्यात जमा झाली आहे. दर डोई पंधरा लाख कधीच वसूल झाले होते. असे अनेक व्यवहार आहेत ज्याचा स्वतंत्र अभ्यास करता येईल. आणखी उदाहरणार्थ नोटबंदी नंतर सुमारे अडीच लाख कंपन्या व्यवहारात गडबड जाणवल्यामुळे बंद करायचे आदेश सरकारने दिले. त्यांची बॅंकांमधली सुमारे तेहतीस हजार कोटी रुपयांची ठेव ही आजवर कुणीच व्यक्ती वा कंपनी मागायला आली नाही, म्हंजे क्लेम वगैरे केला नाही. ती संपुर्ण रक्कम सरकारी तिजोरीत जमा होईल. शिवाय अशा सर्व ठेवींचा स्रोत अज्ञात ठरवून ती ठेवणाऱ्या व्यक्ती वा कंपनी यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश इन्कम टॅक्सवाल्याना दिले आहेत. दंडाची वसुली त्यातून जी होईल ती रक्कम आणखी काहीपट असेल. काय पंधरा लाखाचं कौतुक करत बसलीय जनता !

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 65339 views

🗣 चर्चा (264)
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 06/07/2018 - 08:14 नवीन
संबंधित अधिकार्यानी तशी माहिती देऊन सरकारला मदत करावी हा उद्देश आहे त्या योजनेमागचा. अच्छा! म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती असे पुरावे देऊ शकत नसल्याने तीला ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही, असंच ना? एका अर्थी यंत्रणा हलविण्यासाठी सरकारमान्य लाच देण्याचा प्रकार म्हणता येईल.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 06/07/2018 - 09:08 नवीन
मार्मिका, अरे पण मूळ उद्देश सफल होण्याची शक्यता नाही का? शिवाय मिळालेल्या रकमेवर कर असणारच ना? बेनामी काळ्या व्यवहारांना अशा प्रकारे आळा बसण्यास मदत झाली तर स्वागतच आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 06/07/2018 - 09:10 नवीन
त्याला प्रोत्साहन भत्ता/ वेतन म्हटले जाते / जात असे. हि गोष्ट आजची नसून किमान ३० वर्षे तरी चालू आहे. तटरक्षक दलास(त्यावेळेस ते गृह खात्या अंतर्गत होते) पकडल्या गेलेल्या सोने चांदी इ मालाच्या किमतीच्या १० % किंमत प्रोत्साहन धन (INCENTIVE MONEY) दिला जात असे. १९९० च्या आसपास सोनेचांदी तस्करीतील माल (CONSIGNMENT) मोठ्या प्रमाणावर पकडला जात असे. कारण तस्करांशी साटेलोटे करण्यापेक्षा प्रत्यक्ष त्यांना पकडून दिल्याने मिळणारे पैसे कमी असले तरीही अधिकृत होते म्हणून तटरक्षक दलातील अधिकारी मोठ्या उत्साहाने अशा मोहिमेत भाग घेत असत. हे मी स्वतः नौदलात असल्याने पाहिलेले आहे.(दुर्दैवाने नौदल अधिकाऱ्यांनी असा माल पकडला तरी त्यांना त्यातील एक दमडी मिळत नसे.) रेल्वेच्या निवृत्त तिकीट तपासनीसांना असेच १० % देऊन फुकट्या लोकांना पकडण्यासाठी अधिकृत रित्या नियुक्त केले जात असे. आता आहे कि नाही ते माहित नाही. याला तुम्ही लाच म्हणा किंवा काही म्हणा.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ गुरुवार, 06/07/2018 - 09:00 नवीन
एका अर्थी यंत्रणा हलविण्यासाठी सरकारमान्य लाच देण्याचा प्रकार म्हणता येईल. होय बरोबर आहे तुमच, भाजपाच सरकार म्हणजे सरकारमान्य लाच अन्यथा कॉ़ग्रेस सरकारने केली असती तर त्याच वर्णन "सरकारी यंत्रणेला आपल्या कामाला उद्युक्त करण्यासाठी केलेली एक उत्तम योजना " असेच ना ?
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 06/07/2018 - 09:26 नवीन
भाजपाच सरकार म्हणजे सरकारमान्य लाच अन्यथा कॉ़ग्रेस सरकारने केली असती तर त्याच वर्णन "सरकारी यंत्रणेला आपल्या कामाला उद्युक्त करण्यासाठी केलेली एक उत्तम योजना " असेच ना ? असं मी कुठल्याच पक्षाच्या सरकार बद्दल म्हटलं नाही. पैसे दिल्याशिवाय यंत्रणा हलत नाही हे सरकारने मान्य केलं आहे , मागील सरकारनेही हेच केलं होते आणि हे सरकारही त्याच मार्गाने जात आहे. नवीन काहीही केलं नाही, काहीतरी नवीन केल्याचं फक्त ढोल बडवतय हे सरकार आणि त्याचे भक्त.
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 06/07/2018 - 09:33 नवीन
काहीतरी नवीन घडवण्यासाठी भविष्याबद्दलची दूरदृष्टी लागते. इकडे उलटच घडतंय. ६० ते हजारो वर्षे मागे मागेच चालले आहेत. इग्नोर..
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ गुरुवार, 06/07/2018 - 10:57 नवीन
अय्या खर की काय ? मागील सरकारनेही हेच केलं होते तरीच राजा आणी कन्नीमोळ्ळी भक्कम पुराव्या आभावी सुटले !! पुरावे नीट गोळा केले असते तर, कोर्टात केस भक्कम रीत्या उभी करता आली असती !! आता चिदंबरंम कुटुंबा विरुद्ध कसे पुरावे गोळा केलेले आहेत !!
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ गुरुवार, 06/07/2018 - 10:59 नवीन
अय्या खर की काय ? मागील सरकारनेही हेच केलं होते तरीच राजा आणी कन्नीमोळ्ळी भक्कम पुराव्या आभावी सुटले !! पुरावे नीट गोळा केले असते तर, कोर्टात केस भक्कम रीत्या उभी करता आली असती !! आता चिदंबरंम कुटुंबा विरुद्ध कसे पुरावे गोळा केलेले आहेत !!
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ गुरुवार, 06/07/2018 - 11:04 नवीन
काहीतरी नवीन घडवण्यासाठी भविष्याबद्दलची दूरदृष्टी लागते. कोणाकडे आहे म्हणे अशी दिव्यदृष्टी ? कॉंग्रेस कडे ?? ;-)
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 06/07/2018 - 11:20 नवीन
अवकाश संशोधन, उपग्रह, माहिती आणि तंत्रज्ञान ई. प्रगती फक्त २०१४ नंतरच झाले. ह्यापूर्वी दळणवळण मागासलेले होते. कबुतरे पत्र पोचवायचे, बैलगाडी हे प्रवासाचे एकमेव साधन होते.मारुती गाडी रामाने भक्तांवर खूष होऊन आकाशातून टाकली वगैरे वगैरे. अगोदरचे सरकार आंधळे होते. आताच्या सरकारची दृष्टी तर खोबणीतून बाहेर लटकत आहे. चालू द्या आरती ओवळणे.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com गुरुवार, 06/07/2018 - 11:30 नवीन
हिरण्यकश्यपूचा वध मोदींनी केला व 1857 चे युद्ध मोदींनी लढले , आता इतकेच ऐकायचे बाकी आहे
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ गुरुवार, 06/07/2018 - 12:29 नवीन
मोघल हिंदुस्थानी होते त्यापुढे सर्व माफ आहे !!
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 06/07/2018 - 14:52 नवीन
पण ते तर स्वतः ला तुर्क (तुर्कमेनिस्तानातील) म्हणवत. आईने अकबरीत आणि आलमगीरनाम्यात तसाच उल्लेख आहे. अकबर आणि आलमगीर यांचा आत्मा ( कि देह) थडग्यात तोबा तोबा म्हणून विव्हळत असेल मोगा खानचा शोध पाहून.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com गुरुवार, 06/07/2018 - 15:03 नवीन
जन्माने ते हिंदुस्थानी ना ? त्यामुळे ते हिंदुस्थानीच . मी उद्यापासून स्वतःला मंगळावरचा समजेन , होणार आहे का लगेच तसे ?
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ गुरुवार, 06/07/2018 - 11:41 नवीन
अवकाश संशोधन, उपग्रह, माहिती आणि तंत्रज्ञान ई. प्रगती LOL !! ऐक स्पेसेक्स नावाची खासगी कंपनी गेल्या काही वर्षात पुढे आली व तीने ईज्रोला मागे टाकलेल आहे !! त्यामुळे ईज्रोला हव तस स्वातंत्र्य पाठबळ नव्हत हेच सिद्ध होत ! पुर्वीच्या सरकारचा ईज्रोला भक्कम पाठींबा असता तर ईज्रो आताच्या स्थानापेक्षा फार पुढे गेली असती !! देशातल्या प्रत्येक खात्याचा विभागाचा वैज्ञानिक संस्थांचा गैरवापर पुर्वीच्या सरकारांनी केलेला आहे !! भारत त्याचीच दुष्परीणाम आज भोगत आहे !!
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 06/07/2018 - 13:19 नवीन
ऐक स्पेसेक्स नावाची खासगी कंपनी गेल्या काही वर्षात पुढे आली व तीने ईज्रोला मागे टाकलेल आहे !! कशाच्या बाबतीत मागे टाकलंय? माहित नाही म्हणून विचारतोय. तसंही मागील सरकारने अवकाश संशोधन हे आर्यभट ते insat सारखे गणपती तयार करण्याकरिता वापरले हे मान्यच करावे लागेल. आता बहुतेक तेथे राममंदिराच्या वीटा बनवत असतील, सरकारने स्वातंत्र्य आणि पाठींबा दिला असेलच.
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 06/07/2018 - 11:57 नवीन
२०१४ ला बहुमत मिळाले काय आणि चार वर्ष नुसताच फळा पुसायचे काम केले, तेही पूर्ण पुसायची हिम्मत झाली नाही. पुसट शब्द पुन्हा गिरवून ठळक करायचे ,असे एखादे वाक्य ठळक गिरवून झाले की नवनिर्मितीचा ढोल पिटायचा. बाकी फेकुगीरी मध्ये नाविन्य आणले हे मान्यच करावे लागेल. त्याचे श्रेय ह्या सरकारला द्यावेच लागेल.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक गुरुवार, 06/07/2018 - 12:03 नवीन
पुर्विच्या सरकारांनी काहीच केलं नाही, ती अगदीच टाकावू होती आणि आताचे सरकार खूप जास्त कार्यक्षम आहे. जर फरक इतका जास्त आहे तर मग तो आपसूकच दिसायला हवा. टीव्ही , रेडिओवरुन इतकी जास्त जाहिरात का करावी लागते. अखेर एक मतदार म्हणून मला जे दिसते त्यानुसारच मी माझे मत ठरवणार... मी शहरात राहतो, माझ्याकडे पुर्वीपासून गॅस आहे तर मी उज्वला योजनेकरिता भाजपचा गौरव करत त्याला २०१९ मध्ये मतदान करणार नाही. मी जे पेट्रोल/ डिजेल विकत घेतो त्याच्या किमतीचा विचार करेन. मी क्वचित ट्रेनने फिरलो तर त्या अनुभवाचा (पुरेशा ट्रेन असणे, आरक्षण मिळणे, गाडी वेळेवर धावणे) विचार करेन (कारण रेल्वे केंद्राच्या अखत्यारीत आहे), आयकर कमी झाला का याचा विचार करेन, GST मुळे मी ज्या वस्तू सहसा विकत घेतो त्या स्वस्त झाल्यात की महाग याचाही विचार करेन. कामगार कायदे वा तत्सम कोणत्या कायद्यांमुळे माझी आय टीतली नोकरी अधिक सुरक्षित झाली का त्याचा विचार करेन. किंवा केंद्राच्या कोणत्या धोरणामुळे मला अधिक संधी प्राप्त झाल्या का त्याचा विचार करेन. राष्ट्रीय महामर्ग अधिक चांगले, सुरक्षित व स्वस्त (कमी टोल) झालेत का याचा विचार करेन. मोदी १५-१६ तास काम करतात म्हणे.. करत असतील कदाचित .. तो त्यांचा प्रश्न आहे. त्याकरिता केवळ मी त्यांना /भाजपाला मत देवू शकत नाही.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ गुरुवार, 06/07/2018 - 12:26 नवीन
माझी आय टीतली नोकरी अधिक सुरक्षित जो करेल त्यालाच द्या तुमच मत !! तुमची नोकरीची शाश्वती फक्त सरकारवर आहे ? तुमचा परफॉर्मंस वाईट असला तर ? कंपनीकडे पुरेश्या अॉर्डर्स नसतील तर ? सरकास कोणाचही असो अश्या वेळेला नोकरी जाणारच !
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक गुरुवार, 06/07/2018 - 12:37 नवीन
माझी आय टीतली नोकरी अधिक सुरक्षित जो करेल त्यालाच द्या तुमच मत
असं मी म्हंटलेल तुम्हाला का दिसलं ? कोणतेच सरकार माझ्या नोकरीची १००% हमी देणार नाही हे मान्यच. पण योग्य कायदे करुन कंपन्यांच्या मनमानी कारभाराला वेसण नक्कीच घालू शकते.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 06/07/2018 - 15:13 नवीन
@मराठी कथालेखक मला जे दिसते त्यानुसारच मी माझे मत ठरवणार... मी शहरात राहतो, माझ्याकडे पुर्वीपासून गॅस आहे तर मी उज्वला योजनेकरिता भाजपचा गौरव करत त्याला २०१९ मध्ये मतदान करणार नाही.

PM Modi’s signature Ujjwala Yojana praised in WHO report: All you need to know

http://indianexpress.com/article/what-is/what-is-the-ujjwala-scheme-pradhan-mantri-ujjwala-yojana-5159570-5159570/ https://www.economist.com/international/2018/04/05/household-smoke-may-be-the-worlds-deadliest-environmental-hazard http://www.thehindu.com/sci-tech/health/when-kitchen-smoke-can-kill/article19897927.ece https://sites.ndtv.com/breathe-clean/smoke-from-chulahs-biggest-killer-in-rural-india असाच एक दुवा "शहरातील किडलेली जनता" (यात आपण पण येताय) या युयुत्सूनच्या धाग्यावर मी दिला होता. तोही पाहून घ्या जर फरक इतका जास्त आहे तर मग तो आपसूकच दिसायला हवा. टीव्ही , रेडिओवरुन इतकी जास्त जाहिरात का करावी लागते. आपण सुशिक्षित आहात. स्वयंपाकाच्या धुराचे दुष्परिणाम याबद्दल आपली माहिती किती आहे हे मला माहित नाही परंतु वरील दोन दुवे जे भाजप चे मुखपत्र नसलेल्या वृत्तपत्रांचे आहेत शिवाय जागतिक आरोग्य संघटना काय म्हणते आहे हेही दिलेले आहे. जाहिरात अशासाठी द्यायला लागते कि ज्या घरात उज्ज्वल योजना पोचवायची आहे तेथे निर्णय घेणाऱ्या व्यक्तीत या स्त्रिया नसून पुरुष आहेत. आपल्या बायकोचे आरोग्य धोक्यात आहे हे त्यांच्या गळी उतरवता आले तरच ते या योजनेला मान्यता देतील. निम्न स्तरातील किती पुरुष घरात बायको गरोदर आहे हे माहित असूनही घराच्या आत सिगरेट आणि विड्या ओढताना दिसतात ते लक्षात घेतले तर जन जागृती का करावी लागते हे दिसून येईल. अर्थात उज्ज्वल योजनेत "माझा काय फायदा" असे विचारणारे लोक आहेतच. राष्ट्र गेले खड्यात तर जाऊ दे. पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त झाले का ? मोदींनी नक्की काय केले?
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक गुरुवार, 06/07/2018 - 15:45 नवीन
उज्वला योजनाअ अपयशी झाली वगैरे असं काही मी म्हणत नाही. ती यशस्वी असेलही...त्या योजनेचा ज्यांना लाभ झाला असेल ते भाजपला मतदान करतील. मी मला ज्या गोष्टींचा लाभ झाला (असल्यास) त्या गोष्टींकरिता मतदान करेन.
असाच एक दुवा "शहरातील किडलेली जनता" (यात आपण पण येताय) या युयुत्सूनच्या धाग्यावर मी दिला होता
सुबोध खरे , आपल्या व्यासंगाबद्दल मला आपल्याबद्दल आदर आहे. पण तुम्ही इतरांना 'किडलेली जनता' म्हणू शकत नाही.
अर्थात उज्ज्वल योजनेत "माझा काय फायदा" असे विचारणारे लोक आहेतच. राष्ट्र गेले खड्यात तर जाऊ दे.
उज्वला योजना सरकारने राबवू नये असे माझे म्हणणे नाही. इतरांचा फायदा होवू नये असेही मला म्हणायचे नाही. पण त्याच वेळी माझा काहीच फायदा होत नसेल, माझ्या फायद्याची एकही योजना जर का राबवली गेली नसेल तर इतरांच्या फायद्याने खूष होवून मी सरकारचे गुणगान करणार नाही इतकेच फक्त मी स्पष्ट केले.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 06/07/2018 - 16:00 नवीन
हायला युयुत्सु नि खालील धाग्यात म्हटले आहे कि

अगदी स्पष्ट शब्दात सांगायचे झाले तर महानगरे "किडकी प्रजा" निर्माण करत आहेत...

https://www.misalpav.com/node/42260 यावर मी जोरदार प्रतिवाद केला आहे आणि तुम्ही मला उलटे बोलताय? एकदा हा धागा पूर्ण वाचून घ्या. त्यात मी चुलीच्या धुराने काय होते याचा हि दुवा दिला आहे तो हि एकदा वाचून घ्या https://timesofindia.indiatimes.com/india/chulhas-linked-to-25-of-pollut... अधिक काय लिहिणे
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक गुरुवार, 06/07/2018 - 16:28 नवीन
युयुत्सुच्या धाग्याचे इथे काय प्रयोजन ते कळले नाहि.. चुलीच्या धुराची लिंक उघडत नाही... पण चुलीच्या धूराने आरोग्यास त्रास होतो हे मान्य.. उज्वला योजनेची निकड आणि योजनेचे यश हे ही मान्य करतो. माझा मुद्दा इतकाच आहे की ज्याला ज्या योजनेचा फायदा झाला तो त्या योजनेचे गुणगान करणार. इथे मी मला कोणत्या योजनेचा /निर्णयाचा फायदा झाला का ह्याचा शोध घेतो आहे. नाही म्हणता नोटाबंदीचा सुरवातीला काहीसा त्रास झाला तरी नंतर काही फाय्दा झाला आणि होतो आहे (केशबॅक योजना, डिजिटल पेमेंट वाढल्याने अप्रत्यक्ष अर्थिक लाभ ई )...
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 06/07/2018 - 16:32 नवीन
https://timesofindia.indiatimes.com/india/chulhas-linked-to-25-of-pollution-related-deaths/articleshow/62465884.cms हा दुवा आहे तो
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Fri, 06/08/2018 - 11:55 नवीन
मराठी कथालेखक , तीन वर्षांपूर्वी सिलेंडर बुक केल्यानंतर एखाद्या चौकात सकाळी 6 वाजल्यापासून सिलेंडर वाल्या गाडी ची वाट पाहणारी जनता कधी बघितली का हो ? आता का बरं गॅस एजन्सी व चौकात ती दृश्य दिसत नाहीत ? सिलेंडर चा काळाबाजार बंद करण्यात यश आल्या मूळेच गोरगरिबांच्या आवाक्यात गॅस आता आला आहे . त्या गरिबांचा विचार करा ,कायम स्वकेंद्रित विचार नका करू .
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Fri, 06/08/2018 - 12:13 नवीन
तीन वर्षांपूर्वी सिलेंडर बुक केल्यानंतर एखाद्या चौकात सकाळी 6 वाजल्यापासून सिलेंडर वाल्या गाडी ची वाट पाहणारी जनता कधी बघितली का हो ?
नाही बघितली... तुम्ही म्हणता तशी कधी कुठे परिस्थिती नसेलच असं मी म्हणत नाही. पण माझ्या घरी अनेक वर्षापासून घरपोच सिलिंडर येतो आहे
त्या गरिबांचा विचार करा ,कायम स्वकेंद्रित विचार नका करू .
पुन्हा तेच.. मी त्यांचा विचार करायचा ? आणि माझा विचार नाही करायाचा ? मग माझा विचार कुणी करायचा ? मी या देशाचा हिस्सा नाही का ? स्वतःचा विचार करणं म्हणजे पाप आहे का ? मी काही दुसर्‍या कुणाचं ओरबाडून मला द्या असं तर म्हणत नाहीये.. दुसर्‍या एका प्रतिसादात मी म्हंटलय की अर्थिक फायदा मिळण्यातच मला रस आहे असे नाही. मी चांगली नोकरी करुन पैसा कमावतो आहेच. पण माझ्या इतर काही साध्या अपेक्षा आहेत त्या पुर्ण होताना किंवा त्या बाबतीत विशेष सुधारणा होताना दिसत नाहीये.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ गुरुवार, 06/07/2018 - 12:20 नवीन
मराठी लेखक : माझी आय टीतली नोकरी अधिक सुरक्षित झाली का त्याचा विचार करेन ?? ईतका स्वकेंद्री विचार ? तुमच्या घरात असेल हो गॅस सिलिंडर !! पण त्याच शहरात लाखो गॅस सिलिंडरचा काळा बाजार होत होता !! कोण घ्यायचे असा गॅस सिलिंडर ? हॉटेलवाले , गाडीला LPG Cylinder लावुन लोक खुशाल चालवायचे !! मग त्या वर आळा नको बसवायला ? का मला गॅस सिलिंडर मिळतो मग माझा प्रश्न सुटलाय ? आता आधार कार्ड लिंक झाल्यावर गेले ना असे सबसिडीवर घेणारे गॅस सिलिंडरचे ग्राहक !! देश स्वत:पेक्षा फार फार मोठा आहे !!
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक गुरुवार, 06/07/2018 - 12:43 नवीन
?? ईतका स्वकेंद्री विचार ?
का नाही ? स्वतःचा विचार करुन मतदान करण्यात गैर ते काय ?
देश स्वत:पेक्षा फार फार मोठा आहे !!
मान्य.. पण पुर्ण देश सुखी झालाय का , सगळ्या देशाचं भलं झालंय का याचा हिशेब मी कसा मांडत बसणार ? प्रत्येकजण स्वतःचा विचार करेल आणि मत देईल. ज्यांचं भलं झालंय , जे सरकारवर खूष आहेत असे लोक जास्त असतील तर येईल हेच सरकार पुन्हा सत्तेवर नाहीतर नाही येणार.. जर खरंच अनेक लोकांच जीवनमान उंचावलं असेल तर जाहिरात करायची गरज नाही आणि जर तसं ते झालं नसेल तर जाहिराती करुन फायदा नाही.. साधा-सरळ तर्क..
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ गुरुवार, 06/07/2018 - 13:01 नवीन
पण पुर्ण देश सुखी झालाय का , सगळ्या देशाचं भलं झालंय का याचा हिशेब मी कसा मांडत बसणार ? हे गेल्या 70 वर्षात झाल नाही पण श्री मोदीजींनी मात्र ५ वर्षांत करुन दाखवाव ?? व्वा !! जाहीरात का करावी लागते ? कारण ईतक्या मोठ्या देशातल्या नागरीकांना काही तरी आशा असेल की देशातल्या एका भागात समाजाच्या ऐका घटकाच जिवनमान उंचावलय !! उद्या माझ सुद्धा होईल !! आशेवरच जिवन आहे !! उगाच नाही सरकारवर पिंक टाकणारे १५ लाखच्या आशेला सोडायला तयार नाहीत !!
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक गुरुवार, 06/07/2018 - 13:23 नवीन
हे गेल्या 70 वर्षात झाल नाही पण श्री मोदीजींनी मात्र ५ वर्षांत करुन दाखवाव ?? व्वा !!
नका दाखवू.. राहिलं. .पण मग उगाच 'आपण कसे त्यांच्यापेक्षा भारी' ह्याचा डंका नका ना पिटू.. त्यांनी विशेष काही केलं नाही.. आणि आम्हीही केलं नाही म्हणत गप्प रहावं..
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 06/07/2018 - 13:28 नवीन
हे गेल्या 70 वर्षात झाल नाही पण श्री मोदीजींनी मात्र ५ वर्षांत करुन दाखवाव ?? व्वा !! आयत्या पिठावर एकही रेघोटी न मारता कोणती कामे ह्या सरकारनी केली ?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 06/07/2018 - 16:42 नवीन
आयत्या पिठावर एकही रेघोटी न मारता कोणती कामे ह्या सरकारनी केली ? गोडसे बुवा जर कोणताही पूर्वग्रह न ठेवता खालील दुवे वाचून पाहिलेत तर पुढे जाता येईल . अन्यथा तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहेत आणि मी माझ्या जागी असे म्हणून मी पूर्ण विराम देतो आहे. दिलेले दुवे हे डावीकडे झुकणाऱ्या वृत्तपत्रांचे आहेत. भाजप/ रास्व संघाची मुखपत्रे नाहीत हेही लक्षात घ्या. https://timesofindia.indiatimes.com/india/centre-passes-bills-to-repeal-245-obsolete-laws/articleshow/62285343.cms http://www.thehindu.com/news/national/ujjwala-yojana-to-benefit-eight-crore-women-now/article22682181.ece https://www.thehindubusinessline.com/economy/policy/modi-govts-ujjwala-scheme-leaves-women-healthier-happier/article9685035.ece https://www.financialexpress.com/money/good-news-jan-dhan-account-holders-can-enjoy-this-major-benefit-at-sbi-other-banks-here-are-details/945257/
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक गुरुवार, 06/07/2018 - 12:48 नवीन
देश स्वत:पेक्षा फार फार मोठा आहे !!
short & sweet - देश मोठा असला तरी मी माझं (छोटंस म्हणू हवं तर) मत मशिनवर नोंदवणार .. पुर्ण देशाचं मत नाही.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 06/07/2018 - 14:52 नवीन
म.क., तुमचा आगम (अॅप्रोच) अगदी योग्य आहे. कुणाला मत द्यायचं हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. मग मोदींनी जाहिरात केली तर तो देखील (वा भाजपचा) वैयक्तिक निर्णय झाला ना? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक गुरुवार, 06/07/2018 - 15:08 नवीन
मग मोदींनी जाहिरात केली तर तो देखील (वा भाजपचा) वैयक्तिक निर्णय झाला ना?
अगदी अगदी...मी कुठे लगेच न्यायालयात धाव घेतलीय.. फक्त आश्चर्य व्यक्त केलंय हो..चालेल ना ? बाकी जाहिरातचा खर्च पक्ष निधीतूनच होत असेल , सरकारी खजिन्यातून नाही अशी आशा करतो.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 06/07/2018 - 15:16 नवीन
जाहिरातचा खर्च पक्ष निधीतूनच होत असेल वर मी दिलेले दुवे वाचले तर हा खर्च भाजप ने करायचा का सरकारने हे लक्षात येईल.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 06/07/2018 - 22:25 नवीन
म.क., जरूर आश्चर्य व्यक्त करा. वैयक्तिक निर्णय घ्यायचं तुम्हाला जसं स्वातंत्र्य आहे अगदी तस्संच वैयक्तिक स्वातंत्र्य मोदींनाही आहे. इतकी सरळ गोष्ट तुमच्या ध्यानी कशी नाही आली? त्यामुळे तुम्ही आश्चर्य व्यक्त केलं की तुम्ही मोदीद्वेष्टे आहात यावर शिक्कामोर्तब होतं. म्हणजे, मी जरी असं विधान केलं नाही तरी लोकं तसाच तिरपागडा अर्थ काढतात. अशाने मोदींचे मतदार वाढतात. तेव्हा हा मुद्दा लक्षात घेऊन मग खुशाल आश्चर्य व्यक्त करा, ही विनंती. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 06/08/2018 - 06:53 नवीन
अशाने मोदींचे मतदार वाढतात
काही दिवसांपूर्वी ते कुमार केतकर(राज्यसभा कॉन्ग्रेस खासदार) टी.व्हीवर बोलत होते. सरकारी धोरणांवर टिका करण्यापेक्षा अर्धा वेळ त्यानी मोदींवर व्यक्तिगत टिका करण्यात घालवला. एकेकाळचे ते लोकसत्ता/म.टा.चे संपादक पण बोलणे अगदीच प्रचारकी थाटतले. खरे तर सुरेश प्रभू,नितिन गडकरी,धर्मेण्द्र प्रधान असे खूप काम करणारे मंत्री आहेत..ज्यानी आपापल्या खात्यांमध्ये बदल घडवूनही आणला आहे. मराठी कथालेखका, अरे , मोदी सरकारची धोरणे,योजना ह्या मुख्यत्वे गरीब वर्गासाठी बनवल्या आहेत, राबवल्या जात आहेत. तेव्हा प्रत्येक योजनेचा फायदा हा प्रत्येक नागरिकास मिळेलच असे नाही.
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 06/08/2018 - 09:20 नवीन
माझ्या कोथींबीर च्या चार काड्यांची किंमत कमी झाली तरच मी महागाई कमी झाली असं समजत असेल तर!!! चांगल्या कामाची प्रशंसा करण्याची नसते एखाद्या ला सवय, किंवा चांगलं बघायचं नसेल तर उपयोग काय? उघडा डोळे बघा (आनंदाने) निट नाखु हो तोच शिक्का बसलेला
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Fri, 06/08/2018 - 09:33 नवीन
जो तो स्वतः:चेच पहात असतो. काँग्रेसने रस्ते केले , एम्स काढले , पण मंदिर बांधले नाही ना ? मग काँग्रेस ब्लॅक लिस्टमध्ये सगळे असेच करत असतात . त्यात काय चुकीचेही नाही.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Fri, 06/08/2018 - 15:08 नवीन
काँग्रेसने रस्ते केले , एम्स काढले LOL पहील AIMS साल १९५६ दिल्लीला त्पानंतर ५ AIMS ऐकाच २०१२ सालात लोकांच्या डोळ्यात धुळ झोकण्यासाठी !! पण भाजप सरकारने २०१६ सालात दोन AIMS निर्माण केले !! ईंग्रजांनी १९४७ पर्यंत ९४००० किमीची रेल्वे लाईन टाकली त्यांच्या स्वतःच्या ब्रिटीश सरकारच्या पैश्यावर !! पण कॉंग्रेसने १९४७ नंतर ६५ वर्षांत फक्त ११००० किमी रेल्वे लाईन टाकली ? २०१४ पुर्वी महामार्ग बनवण्याचा वेग होता २ ते ३ किमी/दिवस आणी आता २० किमी/दिवस .
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Fri, 06/08/2018 - 15:32 नवीन
इंग्रजानी आधीच रेल्वे निर्माण केली होती , ती मोडून पुन्हा नव्याने सुरू करायला हवी होती ? एम्स म्हणजे दिल्लीचे एम्स वाजपेयींनी कुठल्या एम्स काढल्या म्हणे ?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 06/08/2018 - 16:10 नवीन
अगोदरच्या काळात म्हणजे ७० वर्षात १५००० किमी रेल्वे मार्ग बांधले गेले. २०१४ पासून त्याला जास्त वेग आला हि वस्तुस्थिती आहे. परंतू सर्वात मोठी गोष्ट म्हणजे रेल्वे बजेटच काढून टाकले आणि ते मुख्य अर्थ संकल्पात जोडून घेतले. यामुळे आता रेल्वे मंत्री पद हे फारसे प्रतिष्ठेचे राहिलेले नाही. यामुळे स्वतःच्या मतदार संघाचंच काम करायचे आणि बाकी रेल्वेला उन्हात उभे करायचे हे वर्षानुवर्षे लहान पक्षांनी चालवलेले धोरण आता रद्दबातल झाले आहे. लालू प्रसाद यांनी आपल्या मतदार संघ मधेपुरा येथे रेल्वे इंजिनांचा कारखाना आणला मग त्याचा मुख्य रेळे मार्गाशी संपर्क नसला तरी चालेल. ए बी एघनी खान चौधरी यांनी दिल्ली कलकत्त्यापासून पासून आपल्या मालदा मतदारसंघापर्यंत नव्या गाड्या चालू केल्या मग त्यात प्रवासी असोत कि नसोत. ममता बॅनर्जी यांनी असाच सवता सुभा राबवला. या प्रकरणात रेल्वेची भाडेवाढ १५ वर्षात झालीच नाही. भारतीय रेल्वे जगात सर्वात स्वस्त आहे फक्त ३६ पैसे एका किमीला. रिक्षा एक किमी ला १० रुपये घेते. एस टी बस रुपये साडे सहा घेते तर शिवनेरी १५ रुपये किमी ला. यामुळे रेल्वे सतत तोट्यात चालत आहे. मग हा तोटा भरून काढायला मालवाहतुकीवर भाडे वाढवले. त्यामुळे माल रस्त्यावरून जायला लागला आणि रेल्वे परत तोट्यातच राहिली. २०१६ मध्ये श्री सुरेश प्रभू यांनी राजधानी शताब्दी सारख्या आरामदायी गाडयांची भाडेवाढ केली त्यावर विरोधी पक्षानी केवढा गदारोळ केला होता याची आठवण झाली.https://www.firstpost.com/politics/railway-passenger-fare-hike-why-the-public-outcry-against-suresh-prabhu-is-overreaction-2997112.html त्यामुळे नंतर झालेल्या अपघातामुळे श्री सुरेश प्रभुना मंत्रालय सोडावे लागले यानंतर परत रेल्वे भाडेवाढ करून राजकीय हाराकिरी करण्याची तसदी पुढच्या मंत्र्यांनी घेतली नाही आणि श्री जेटलींनी ते मंत्रिमंडळ शक्तिहीन करून टाकले यामुळे आता रेलवे ला हळू हळू भाडेवाढ करून तोट्यात चालणारी रेल्वे फायद्यात आणण्याचं मार्ग चालू तर केला आहे. परंतु पुढच्या निवडणूक वर्षात हि भाडेवाढ करणे भाजपाला परवडणार नाही असेच दृश्य आहे.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Fri, 06/08/2018 - 16:18 नवीन
<<<त्यामुळे नंतर झालेल्या अपघातामुळे श्री सुरेश प्रभुना मंत्रालय सोडावे लागले>>> ==>> अपघात हे निम्मित झाले, बुलेट ट्रेन ला विरोध केला म्हणून प्रभूंना नारळ दिला असे ऐकण्यात आले होते. खरे खोटे वरचेच जाणो! === पण प्रभूंनी लोकांच्या लक्ष्यात राहील असे काम चालू केले होते, पण जनता आपली कमनशिबी आहे ना ! काय करणार.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 06/08/2018 - 16:56 नवीन
अपघात हे निम्मित झाले, बुलेट ट्रेन ला विरोध केला म्हणून प्रभूंना नारळ दिला असे ऐकण्यात आले होते. खरे खोटे वरचेच जाणो! जालावर खोदकाम केले असता फक्त "श्री राज ठाकरे" तसं म्हणताना आढळले आहेत. त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हा एक प्रश्नच आहे. http://www.dnaindia.com/mumbai/report-live-updates-raj-thackeray-mns-mumbai-elphinstone-stampede-railways-protest-march-metro-cinema-to-churchgate-police-permission-2550640 परंतु बाकीचे बरेचसे दुवे श्री सुरेश प्रभू बुलेट ट्रेनचे समर्थनच करताना दिसतात. मुळात जर ते बुलेट ट्रेनला विरोध करत असते तर या शिवसेनेने अडगळीत टाकलेल्या या गुणी नेत्याला शोधून त्याला इतके महत्त्वाचे खाते देण्याचे वर त्याला आंध्र प्रदेशातून राज्यसभेवर पाठवायचे मोदी याना काहि कारण असावे असे वाटत नाही. त्यांना वाणिज्य आणि उद्योग हे दुसरे महत्त्वाचे खाते दिले गेले आहे कारण रेल्वे मंत्रालयाचे महत्त्व कमी करायचा बेत ठरला असावा. https://www.ndtv.com/india-news/is-there-deliberate-misinformation-on-bullet-trains-asks-suresh-prabhu-1400064
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Fri, 06/08/2018 - 10:10 नवीन
ज्या गोष्टी माझ्याशी संबंधित आहे त्या मी बघणार.. सामान्य नैसर्गिक तत्व आहे हे.. मोदींनी कोणत्या खेड्यात कुठे वीज आणली असेल. पण त्या खेडेगावात ना मी राहतो ना माझा कुणी नाते वाईक तर त्याबद्दल मी कशाला कौतूक करु. थोडक्यात काय तर प्रत्येकच वर्गासाठी काहीतरी करायला पाहिजे ना.. सब का साथ सब का विकास असं बोलले होते ना मोदी. शहरी मध्यम/उच्च मध्यम वर्गाकरिता काही केलेलं दिसत नाहीये.. आयकर कमी केला असता तरी काहीतरी केलं असं म्हंटलं असतं. असो. अजून एक वर्ष आहे. या वर्गाकरिता काही करता येतं का ते बघावं मोदी सरकारने..
  • Log in or register to post comments
ग
गब्रिएल Fri, 06/08/2018 - 17:00 नवीन
भले शाबास ! मंग गावाकड्च्या लोकांन्नी त्येंच्यापुरत बगून मतदान क्येलं (त्येंची संक्या जास्त है बर्का ;) ) आनि तुमच्यासारक्या शहरात्ल्या लोकांला बांदावर बशिवलं तर मंग बोंबा मारू नका बर्का. :) आशी शिकलीसवर्ली मान्सं त्येला काय म्हंतात त्ये "वैयक्तिक स्वार्थ" समोर ठ्येवून त्ये आपलं "कॉमन गुड" इसराया लागली की देश्याचे चांगभलं व्हनारंच बगा... कारन याच गोष्टीचा राजकारनी फाय्दा घेत्यात नव्हं. ह्ये आपलं आपलं अडानी मत. तुमी म्होटी लोकं ज्यास्त शानी असताल. आता म्हारास्ट्रात बी मतं जमवाय्ला तामीलनाडू वानी शेरातल्या परत्येकाला येक येक कलर टीवी, मिस्कर, साडी, धोतर... नव्हं, नव्हं... जीनची पँट देयाला पायज्ये, नाय्का ?!
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Sat, 06/09/2018 - 20:00 नवीन
लोकशाहीत तसाही निवडणूकीचा कौल मानावाच लागतो. बोंबा काय मारणार...
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 06/10/2018 - 09:02 नवीन
खरे आहे ! म्हणूनच म्हणतात की लोकशाहीत, "यथा प्रजा तथा राजा" असे असते. स्वार्थी लोक स्थार्थी नेता निवडून देतात... किंबहुना स्वार्थी लोकांची नाडी ओळखून नेता स्वार्थी निवडून येतो व "आवळा देऊन कोहळा काढणे" ही म्हण सार्थ करतो. अश्या परिस्थितीत, "आम्ही निवडून दिलेल्या नेत्यानं आमचं भलं करण्या ऐवजी स्वतःचंच भलं केलं" ही बोंब मारायचा हक्क लोकांना कसा असेल ? !
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    19 hours 55 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 7 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 9 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 11 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 15 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा