Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

ते पंधरा लाख !

स
सुधीर मुतालीक
Mon, 06/04/2018 - 12:44
🗣 264 प्रतिसाद
२०१४ च्या निवडणुकीच्या धामधुमीत प्रत्येक अकौंटमध्ये पंधरा लाख जमा करू अशी घोषणा झाली आणि जणू प्रत्येक भारतीय कधी एकदा तो एसेमेस आपल्या मोबाईलवर येतोय याची डोळ्यात प्राण आणून वाट बघत होता. दोन तीन वर्षे झाले तरी असे काही झाले नाही हे जाणवून कळवळलेल्या जनसमुदायांनी " फेकतोय साला" अशी ओरड सुरु केली. माझ्या मते ते पंधरा लाख प्रत्येकाच्या अकौंटमध्ये कधीच जमा झाले आहेत. कल्पना अशी असेल की ते पैसे प्रत्यक्षात जमा व्हावेत आणि त्यातून आपण गाडी खरेदी करावी वा माडी बांधावी तर तसे फुकटच्या पाकट का बरे व्हावे आणि कशासाठी ? हे समजावून सांगण्याची गरज असू शकते. पण समजावून सांगितलं नाही हे ही ठीकच आहे. कारण मग ज्यांचा भ्रमनिरासच झाला आहे किंवा ज्यांना पोटदुखीच आहे त्यांनी गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा मधल्या " सोन्याच्या टोपीची" आठवण झाली असती आणि फेकू ऐवजी नाम्या म्हणून टिंगल केली असती, पण टिंगल चुकलीनसती. वैफल्य वगैरे. आपल्या अकाऊंट मध्ये पंधरा लाखच काय कोट्यवधी रुपये या सरकारने जमा केले आहेत. फक्त एकच म्हंजे उदाहरणार्थ : मागील सरकारने एकूण पेट्रोल खरेदीचे फक्त ५५ % बिल इराणला अदा केले होते. उर्वरित बिलाचे कर्ज देशावर म्हंजे तुमच्या माझ्या डोक्यावर २०१४ मध्ये आणि अलीकडेपर्यंत होते. आजच्या आकड्या नुसार ही रक्कम होती पाच हजार करोड रुपये. ही रक्कम आपल्या डोक्यावर देय होती. ती रक्कम एक टाकी अदा भारत सरकारने अलीकडे केली आहे. आता फक्त एका व्यवहाराने पाच हजार करोड भागिले एकशे तीस करोड एवढी रक्कम तुमच्या माझ्या डोक्यावरून कर्ज कमी झाले, म्हणजे खात्यात जमा झाली आहे. दर डोई पंधरा लाख कधीच वसूल झाले होते. असे अनेक व्यवहार आहेत ज्याचा स्वतंत्र अभ्यास करता येईल. आणखी उदाहरणार्थ नोटबंदी नंतर सुमारे अडीच लाख कंपन्या व्यवहारात गडबड जाणवल्यामुळे बंद करायचे आदेश सरकारने दिले. त्यांची बॅंकांमधली सुमारे तेहतीस हजार कोटी रुपयांची ठेव ही आजवर कुणीच व्यक्ती वा कंपनी मागायला आली नाही, म्हंजे क्लेम वगैरे केला नाही. ती संपुर्ण रक्कम सरकारी तिजोरीत जमा होईल. शिवाय अशा सर्व ठेवींचा स्रोत अज्ञात ठरवून ती ठेवणाऱ्या व्यक्ती वा कंपनी यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश इन्कम टॅक्सवाल्याना दिले आहेत. दंडाची वसुली त्यातून जी होईल ती रक्कम आणखी काहीपट असेल. काय पंधरा लाखाचं कौतुक करत बसलीय जनता !

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 65339 views

🗣 चर्चा (264)
र
राजेंद्र मेहेंदळे Mon, 06/04/2018 - 12:50 नवीन
मी पयला!! लेख उपरोधिक आहे की तुम्ही बीजेपी समर्थक आहात?
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Mon, 06/04/2018 - 13:25 नवीन
यावर तुमचा ॲप्रोच ठरणार का ? (हघ्या )
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Mon, 06/04/2018 - 14:18 नवीन
( जनतेचा )अ‍ॅप्रोच तर २०१९ मध्ये दिसेलच पण नोटबंदी आणि जी एस टी ने दुकानदार किरकोळवाले यांचे मोडलेले कंबरडे आणि रेरा मुळे बिल्डर लॉबीची लागलेली वाट सरळ दिसत असताना असे लेख म्हणजे जखमेवर मीठ चोळल्यासारखे वाटतात. माझ्यासारख्या पगारदार (पक्षी व्हाईटवाले) आणि क्रेडिट / डेबिट कार्ड आणि पेटीएम वाल्यांनी तरी परिस्थितीशी लवकरच जुळवुन घेतले आणि वेळच पडली तर निमुटपणे बँकांबाहेर रांगाही लावल्या. पण वर उल्लेख केलेल्या वर्गाचे काय हाल झाले ते त्यांनाच माहित. ईंधन दरवाढीचे चटके तर सर्वजण रोजच सोसत आहेत मग ते थेट असो किंवा वाहतुकीचे दर वाढल्याने होणारी भाव वाढ असो. आता प्लॅस्टीकबंदीचे वारे वाहु लागलेत. थोडक्यात काय योजना कितीही चांगल्या असल्या तरी अंमलबजावणी कशी करावी याचा काही विचार कराल की नाहि?
  • Log in or register to post comments
ब
बाबा योगिराज Mon, 06/04/2018 - 17:43 नवीन
जिएस्टी मुळे फक्त करबुडव्यांना त्रास होतोय. बाकी काही नाही. मार्केट आणि व्यापारी केव्हांच पुढे निघून गेलेत. रेरा हा सुद्धा कायदा आपल्यासाठी हितकारक आहे. सामान्य माणसाला लुबाडणाऱ्या बिल्डर लॉबीला नियंत्रणात आणता यावे म्हणून हा कायदा आणण्यात आलेला आहे. प्लास्टिक बंदी सुद्धा खूप गरजेची आहे. त्याने धंद्याच कसलंही नुकसान होत नाही. सरतेशेवटी इंधन भाव वाढ. जी काही कारण दिली जात आहेत ती तर मलाही पटत नाहीये. कारण आजूबाजूच्या राज्यात, महाराष्ट्रापेक्षा कमी भाव आहेत. महाराष्ट्रातच इतकी भाव वाढ झालेली आहे. धन्यवाद बाबा योगीराज.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Mon, 06/04/2018 - 13:42 नवीन
त्यांची बॅंकांमधली सुमारे तेहतीस हजार कोटी रुपयांची ठेव ही आजवर कुणीच व्यक्ती वा कंपनी मागायला आली नाही, मागणारे , देणारे , घेणारे तुम्हाला सांगुन देवाण्घेवाण करणार आहेत का ? आम लोकाना नोटाबन्दीचा बडगा दाखवुन ऐन नोटाबन्दीत अचानक वॉलन्टरी डिस्क्लोजरची सन्धी देणारे लोक हे ३३ हजार कोटी तुम्हाला सांगुन देह्घे करणार आहेत की काय ? अरे देवा , हा आकडाही ३३ कोटीच का ?
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Mon, 06/04/2018 - 14:04 नवीन
पेट्रोलियम तेलाचं बिल अदा केलं पण तेलाचे भाव कमी होते तेव्हाही पेट्रोल /डिझेलचे भाव चढेच ठेवलेत त्याबद्दल काय म्हणाल ?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 06/04/2018 - 15:31 नवीन
मुळात

"आम्ही लोकांच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करू"

असे मोदी म्हणाल्याचे कधीही पाहिले किंवा वाचले नाही. मी पाहिलेल्या व्हिडीओ मध्ये श्री मोदी असे म्हणतात कि

"जर काँग्रेसच्या काळात देशाबाहेर गेलेला पैसा परत आला तर प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा होतील".

या दोन वाक्यात असलेला स्पष्ट फरक लक्षात घेतला तर विरोधी ही पक्षांनी याचे केलेले राजकीय भांडवल सहज लक्षात येईल. अर्थात त्यांचा याला आक्षेप असाच असणार आहे कि मग परदेशात असलेले पैसे आणा कि भारतात तुम्हाला कोणी थांबविले आहे. श्री मल्ल्या किंवा स्पष्ट पणे पुरावे असणाऱ्या अबू सालेम सारख्या लोकांना येथे आणण्यात किती कायद्याच्या भानगडी कराव्या लागत आहेत हे जर आपण पहिले तर हे काम किती कठीण आहे हे समजून येईल. अर्थात मोदी द्वेष्ट्या लोकांना समजूनच घ्यायचे नाही त्यामुळे मी अजून काही लिहिणारच नाही. जर श्री मोदी "आम्ही लोकांच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करू" हे म्हणाल्याचं व्हिडीओ कुणाकडे असेल तर मी माझे म्हणणे मागे घेईन. अन्यथा आरोपांचे गुऱ्हाळ चालू द्या. आम्ही बसतो पोपकोर्न घेऊन.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Mon, 06/04/2018 - 16:29 नवीन
मोदी असे बोललेच नव्हते, मग शहा चुनावी जुमला नेमक्या कशाला बोलले होते ?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 06/04/2018 - 17:13 नवीन
(मोदी असे बोलल्याचा) तुम्ही पुरावा द्या उगाच (सवयीप्रमाणे) पिचक्या टाकू नका
  • Log in or register to post comments
र
राही Mon, 06/04/2018 - 17:33 नवीन
माफ करा पण आपला आदर राखून विचारावेसे वाटते की आपण अनेकदा पिचक्या, पिंका असे शब्द का वापरता? आपल्या प्रतिसादांत हे शब्द अगदी खड्यासारखे खुपतात.
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Mon, 06/04/2018 - 19:08 नवीन
काही तरी म्हटल्याचे आठवते. म्हणजे १५ लाख आपल्या खात्यात जमा होतील हि जनतेची अपेक्षा अगदीच अस्थानी होती असे नाही. जनताच मूर्ख आहे अशा अर्थाचे आता बरेच ऐकावयास येते. पर्वा गडकरी म्हणाले कि टोल रद्द होईल असे ते कधी म्हणालेच नाही. मग 'जो खेल मैने शुरू किया उसे मैंही खतम् करुंगा' हे त्यांच्या स्टॅन्ड अप कॉमेडीमधील वाक्य असे समजायचे काय?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 06/04/2018 - 20:19 नवीन
सगळा काळा पैसा चार वर्षात परत येईल अशी आपली अपेक्षा असेल तर ती फारच बाळबोध आहे असेच म्हणावे लागेल. चिदंबरम यांच्या आणि त्यांच्या मुलाच्या इतक्या न्यायालयीन डावपेचातुन सबळ पुरावा असूनही गोष्टी बाहेर काढायला इतका वेळ लागतो आहे मग जिथे पैसा झिरपला आहे त्याचा मग शोधून काढायला किती वेळ लागेल. जनतेला आपले बूड न हलवता 15 लाख पाहिजेत नाही तर मोदी कुचकामी फेकू आशा शिव्या द्यायला लोक मोकळे. 1995 सालची केस आता निकाल लगीन लालू प्रसाद तुरुंगात जातात 23 वर्षांनी आणि लोकांना 23 दिवसात पैसे पाहिजेत.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Tue, 06/05/2018 - 08:07 नवीन
https://www.loksatta.com/nagpur-news/nitin-gadkari-comment-on-toll-naka-1591528/
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Mon, 06/04/2018 - 17:45 नवीन
70 % टक्के गरीब जनता असलेल्या देशा ची प्रगती करण्यास मोदींनां 5 काय 15 वर्ष सुध्दा कमी पडतील . 60 वर्ष्यात देशाचा खूळखुळा करून ठेवला होता काँग्रेस व त्यांच्या बगलबच्यानीं . मी म्हणत नाही की सेना व भाजप चे नेते भ्रष्ट्राचार करत नाही पण स्वतः मोदी वर आता पर्यंत एक ही रुपया चा आरोप झालेला नाही . सत्तेत नसताना सुद्धा सरकारी बंगले बळकावून बसणाऱ्या काँग्रेस , भाजप ,बीएसपी व इतर पक्ष्यातील निर्लल्ज जनसेवकांना शेवटी बंगले सोडावे लागलेच . राहिला प्रश्न 15 लाखाचा , ' गरिबी हटाव ' घोषणा देऊन काँग्रेस ने कित्तेक निवडणुका जिंकल्या , पण त्यांनी फक्त काँग्रेस चे नेते व कार्यकर्त्याचीं गरिबी हटवली . काहीही केले तरी 130 करोड लोकसंख्या असलेल्या देशाची प्रगती हळूहळू च होणार . पायाभूत सुविधा , शिक्षण , नोकऱ्या आरोग्याचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न चुटकीसरशी मोदींनीं आपण दिलेल्या 5 वर्षात सोडवले पाहिजेत अशी अपेक्षा ठेवणे म्हणजे मूर्खपणा आहे . 60 वर्षात देशातील बहूसंख्य जनता ही गरीब राहीली हा त्या जनते चा दोष नाही तर त्यांना गरीब ठेवून आपल्या उरावर राज्य करणाऱ्या निर्लल्ज काँग्रेस चा आहे . मी मोदी भक्त बिलकुल नाही पण ' अजून 10 वर्ष भाजप ला देऊन मगच भाजप ने देशा चा काय विकास केला याचा हिशोब मागावा ' या मताचा आहे .
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 06/04/2018 - 17:48 नवीन
भारतात्/भारताबाहेर एवढा काळा पैसा आहे की तो जर पूर्ण पांढरा असेल तर तेवढे पैसे जमा होऊ शकतात... अशा प्रकारचे ते विधान होते रे मंगू. बाकी निश्चलनीकरणाचा निर्णय योग्यच होता असे आमचे मत. अनेकाना त्रास झाला हे मान्य व सरकारने अधिक खबरदारी घ्यायला हवी होती.
ईंधन दरवाढीचे चटके तर सर्वजण रोजच सोसत आहेत मग ते थेट असो किंवा वाहतुकीचे दर वाढल्याने होणारी भाव वाढ असो. आता प्लॅस्टीकबंदीचे वारे वाहु लागलेत.
आधीच्या सरकारच्या तुलनेत ह्या सरकारच्या अनेक योजना चांगल्या आहेत..कौशल विकास, सुकन्या सम्रुद्धी वगैरे.. कदाचित त्या योजनांसाठी हा जास्तीचा पैसा वापरला जात असावा. वाजपेयी सरकारची धोरणे मुख्य्त्वे मध्यमवर्गासाठी असायची. मोदी सरकारची धोरणे कनिष्ठ्/गरीब वर्गासाठी आहेत असे ह्यांचे मत.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Mon, 06/04/2018 - 18:19 नवीन
मोदी असे बोललेच नव्हते, मग शहा चुनावी जुमला नेमक्या कशाला बोलले होते ?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 06/04/2018 - 20:12 नवीन
मोगा खान स्पष्ट पुरावा असेल तर द्या. मूळ व्हिडीओ काय आहे तो तुम्ही पण पाहिला असेलच पण निवडक विस्मरण होण्याची तुमची सवय आहे शाह साहेब यांचा व्हिडीओ मी पाहीलाआहे.
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 06/04/2018 - 17:49 नवीन
हा आरोप पंधरा लाख प्रतिसाद मिळेपर्यंत तेवत ठेवण्याची जबाबदारी संपूर्णपणे या स्वयंघोषित लोकांनी घेतली आहे तुम्ही सफरीवर लक्ष केंद्रित करावे हीच विनंती शिक्कामोर्तब झालेला य:किंश्चित नाखु
  • Log in or register to post comments
प
प्रभू-प्रसाद Mon, 06/04/2018 - 19:55 नवीन
पटलं आपल्याला नाखुजी ... बाकी गुऱ्हाळ चालतच राहणार आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Mon, 06/04/2018 - 21:34 नवीन
नाखुंनी पुढील पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणुन पिंपरी चिंचवड (नदी पल्याडचे) मतदार संघातुन निवडाणुकीला उतरावे अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे हो ! - ह घ्या
  • Log in or register to post comments
R
Ram ram Mon, 06/04/2018 - 17:56 नवीन
साधारण नव्वद टक्के भारतीय फुकटे आहेत, कोणाची तरी इस्टेट मिळावी फुकट काही तरी पदरात पडावं अशी अपेक्षा ठेवून असतात. यांच्या बापाने ठेवलेत पंधरा लाख रुपये.कसाब व त्याच्या साथीदारांचं मी आभार मानले असते जर त्यांनी सर्व आमदार मारून टाकले असते. या हरामखोरांची संपत्ती एवढी कशी वाढली हे आधी विचारा.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Tue, 06/05/2018 - 03:21 नवीन
द्या आम्हाला.
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Mon, 06/04/2018 - 18:48 नवीन
व्हाट्सअँपिय अँड फेसबुकीय दाव्यांमधला शिरपेच म्हणावा असा लेख. खुद्द मोदींनी देखील 'सलाम लेलो साहब' म्हणावा असा लेख.
  • Log in or register to post comments
स
साहना Mon, 06/04/2018 - 21:33 नवीन
कशाला उगाच कष्ट घेताय ? "मोदी साहेबांचा जयजयकार" "मोदी साहेब की जय" इतके लिहिले तरी भावना पोचतात. १५ लाख वगैरे मिळण्याची अपेक्षा ठेवून कुणी जगतोय असे वाटायला लोक मूर्ख आहेत काय ? थापच मारायची आहे तर काँग्रेस ५० लाख द्यायची थाप मारू शकते म्हणून लोक काय राहुल गांधीला वोट मारण्याइतके ठोंबे आहेत काय ? मोदी साहेब नेहमीच्या साच्यातले राजकारणी वाटत नव्हते. दिल्लीत जाऊन ते नेहमीच्या ल्युटेन वाल्यांचे तक्थ फोडतील, कोंग्रेस च्या पॉलिसी १८० डिग्री दिशेने फिरवतील. इतर भाजप नेत्याप्रमाणे गुळमुळीत धोरण न पत्करता विरोधकांना सळो कि पळो करतील इत्यादी लोकांची अपेक्षा होती. ती अपेक्षा बहुतांशी फोल ठरली आहे हे भाजपचेच कार्यकर्ते मान्य करतात. हि ५ वर्षे गेली आता पुढील ५ वर्षांत तर किमान काही मोठे निर्णय मोदी साहेब घेतील अशी अपेक्षा बाळगून दिवस काढायचे. नाही तर आपले नेहमीचे बाबू छाप राममाधव, प्रकाश जावडेकर इत्यादी लोक खुर्च्या गरम करत राहतील.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Mon, 06/04/2018 - 21:50 नवीन
+१ एकदम मनतील बोललात ! ममसिंगांना दहा वर्षे पाहिल्यानंतर मोदींकडुन जितक्या अपेक्षा होत्या त्या पुर्ण झाल्या नाहीत हे कोंणीही मान्य करेल ! शिवाय नोटाबंदी , जी. एस.टी.ची घाई गडाबडीत केलेली अंमलबजावणी वगैरे चुकाही झाल्याच आहेत फक्त एका विरोधकाला धड अक्कल नसल्याने ह्या गोष्टींचे भांडवल करुन सरकार पाडाता आले नाही ! बाकी ही आजादी गँग कितीही अव्वाच्या सव्वा करुन गोष्टी फुगवत असली तरीही ते तुर्तास बाजुला ठेवुन विचार केल्यास दलितांवर अत्याचार वाढले हे नाकरता येत नाही . . शहरी सुसंस्कृत हिंदु "हे आम्ही केले नाही" म्हणुन झटकुन टाकत असला तरीही भाजपाला ते तसे झडाकता येणार नाही . विशेषकरुन उत्तरभारतातील निर्बुध्द स्वमतांध दांभिक हिंदुंचा माज पाहुन फार फार कीव वाटते ! इथे काही भाजपा समर्थक लोकं लगेच " आधीच्या सरकार मध्ये अत्याचार होत नव्हते का ?" असला मुर्खागमनी व्हॉटअबाऊटिझम करणारा प्रश्न करुन ह्या विषयत भाजपाला अजुनच कमकुवत बनवतात. भाजपाला सगळ्यात जास्त घाईला कोणी आणले असेल तर ह्या असल्या निर्बुध्द समर्थकांनी ! बाकी तुर्तास कितीही झाले तरी मोदी साहेबांना विरोधी पक्षात सबळ पर्याय दिसत नाही . यदाकदाचित सर्वच्या सर्व विरोधी पक्षांनी युती करुन मोदी सरकात पाडले तरी पंप्र कोण होणार हा फार गहन प्रश आहे ! त्यातल्या त्यात ममतादींचेच चांसेस सर्वात जास्त आहेत ! ह्या मॅडम पंप्र झाल्यास ५ वर्षे मजा येणार =)))) आसो. आपण आपले मजा पहात राहु , कारण कोणीही निवडौन येवो देत , ना इनकम टॅक्स कमी होणार आहे ना जी. एस.टी ना डवल टॅक्सेशन ! तस्मात - तुका म्हणे उगी रहावे | जे जे होईल ते ते पहावे !!
  • Log in or register to post comments
स
साहना Mon, 06/04/2018 - 23:49 नवीन
> बाकी तुर्तास कितीही झाले तरी मोदी साहेबांना विरोधी पक्षात सबळ पर्याय दिसत नाही . सध्या बाराचा ठोका वाजला आहे आणि अश्या वेळेला सिंड्रेलाची हालत काय होते हे सर्वांना ठाऊक आहे . पुढील विलेक्शन जवळ असताना चुकून जरी काँग्रेस ममता वगैरे आली तर देशाचे बारा आणखीन वेगाने वाजणार आहेत. त्यामुळे मन मारून का होईना पण कमळावर शिक्का मारणे आवश्यक आहे अर्थांत कमळावर शिक्का मारायचा म्हणजे बुद्धी गहाण टाकून मोदी साहेबांचा जयजयकार करायचा असे नाही.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Tue, 06/05/2018 - 03:18 नवीन
हा एक अगदीच भंपक प्रचार आहे. मोदीना पर्याय कुणी नम्हण्वेणे. असे म्हणणे हा लोकशाहीचा अपमानच आहे.
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Tue, 06/05/2018 - 06:38 नवीन
आस कस ? , आहेत ना पर्याय --- 1 ) रागा उर्फ चौकट राजा -मीडिया समोर बावळट सारखी बडबड करणारा व मोलकरणी सारख अचानक 1 महिना सुट्टीवर जाणे , त्या बदनाम चार राजकीय सल्लागार च्या तालावर नाचणे . 2) बॉंगली दीदी - रक्तरंजीत हिंसाचार करवून निवडणूक जिंकणाऱ्या व हिंदू च्या हत्ये कडे दुर्लक्ष करून मुल्ला ची दाढी कुरवाळनाऱ्या . 3) मायावती - दलितांची उद्धारकर्ती चा आव आणून काळी माया जमा करने , सरकारी बंगला खाली करण्या ऎवजी बंगल्यास कांशीराम भवन नाव देणारी बाई . 4) अखिलेश व मुलायम - हे म्हणजे बॉंगली दीदी ला लाजवेल असे काम करतात . हे वरील सर्व व चंद्राबाबू , लालू , तेलंगणा मुख्यमंत्री राव , नितीशकुमार या पैकी कुणीही राजकीय दृष्ट्या परिपक्व नाही , एकमुखी नेतृत्व करू शकत नाही . भाजप व वि ही प च्या काही कार्यकर्त्यांनी गेल्या चार वर्षात माज करून मोदी साहेबांची डोकेदुखी वाढवली हे नक्की . गोरक्षक बनून त्यांनी दलितांना व मुस्लिमांना मारहाण करून त्याचे व्हिडीओ व्हायरल केले ,त्या मुळे जागतिक स्तरांवर भारताची व हिंदुत्वाची प्रतिमा मलिन झाली .
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Tue, 06/05/2018 - 11:54 नवीन
आम्हाला पृथ्वीराज चव्हाण हवेत !!
  • Log in or register to post comments
व
विशुमित Tue, 06/05/2018 - 13:14 नवीन
हायला हा ऑप्शन डोक्यात आला नव्हता. तिहेरी फायदा १) प्रथमदर्शनी माहिती प्रमाणे स्वच्छ प्रतिमा आणि उच्च विद्याविभूषित २) महाराष्ट्राचा पंतप्रधान ही मराठी मनात राहिलेली खंत ३) भाषणे ऐकवण्यात वेळ न दवडता मान खाली घालून मस्त काम करतील हा विश्वास. (मॅडमचे लाडले तर ते आहेतच)
  • Log in or register to post comments
प
पुंबा Tue, 06/05/2018 - 13:53 नवीन
++१११ फालतूचे हीतसंबंध महाराष्ट्रात नाहीत(शिक्षणसंस्था, सा. कारखाने वगैरे). भ्रष्टाचाराचा आरोप नाही. उलट 'हाताला लकवा मारला' गेल्याची ख्यातीच आहे. पृथ्वीराजबाबा उमेदवार असतील तर काँग्रेसला फुल्ल सपोर्ट.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Tue, 06/05/2018 - 14:23 नवीन
चला तर मग ... अब की बार PC (पृथ्वीराज चव्हाण) सरकार...
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Tue, 06/05/2018 - 18:11 नवीन
बारामतीकरांशी कारण नसताना वाकडं आहे या साहेबांचं. रा.काँ. काँग्रेसमधे विलीन व्हावी, शरद पवार पं.प्र. व्हावे, आणि त्यांनी काँग्रेसला गांधी फॅमिलीमुक्त करावे हि आमची इच्छा... पण ति पूर्ण होण्याचे शान्सेस शुण्य :(
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 06/05/2018 - 05:48 नवीन
मुर्खपणा, प्रच्छन्न मुजोरी आणि बेताल वक्तव्ये करणार्या मंत्री संत्री नेत्यांचा धिक्कार केला च पाहीजे मूक राहून या गणंगाच समर्थन केले जात असेल तर फार घातक आहे भाजपालाही आणि राजकारणालाही!!! त्यांनी शेण @@@म्हणून आम्ही शेण @@@ हा युक्तिवाद बोगस आणि निर्लज्ज आहे सरधोपट नाखु वाचकांची पत्रेवाला
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Tue, 06/05/2018 - 11:55 नवीन
ते @@@ चुकीच्या ठिकाणी टाकलंत आणि शेण तसंच राहिल की ओ :)
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 06/05/2018 - 06:07 नवीन
@ मार्कस ऑरेलियस फक्त एका विरोधकाला धड अक्कल नसल्याने ह्या गोष्टींचे भांडवल करुन सरकार पाडाता आले नाही ! याचा नक्की अर्थ काय? आणि एवढं बहुमत असताना सरकार कसं काय पडणार होतं? दलितांवर अत्याचार वाढले हे नाकरता येत नाही हि स्थिती केवळ २०१४ पासूनची नसून २००६ पासूनची आकडेवारी पाहिलीत तर हा आलेख वाढतच आहे https://www.firstpost.com/india/crime-rate-against-dalits-increased-by-25-from-2006-to-2016-cases-pending-investigation-up-by-99-4419369.html हा मुर्खागमनी व्हॉटअबाऊटिझम आहे असे आपल्याला वाटते का? त्यातल्या त्यात ममतादींचेच चांसेस सर्वात जास्त आहेत हि शक्यता सर्वात कमी आहे कारण या बाई अत्यंत एककल्ली लहरी आणि हेकेखोर आहेत तेंव्हा त्यांच्या नावाचे एकमत होणे हे केवळ अशक्य आहे. सर्वात उत्तमी व्यक्ती म्हणजे नितीश कुमार होती पण मोदी शाह जोडीने त्यानं धूर्तपणे आपल्याकडे वळवल्याने बादशाह वारल्यावर जनानखान्याची जशी केविलवाणी स्थिती होती तशी विरोधकांची झाली आहे. त्यातल्या त्यात बरी म्हणता येईल अशी व्यक्ती म्हणजे "अखिलेश यादव" आहे. कारण मायावती, अजित सिंह, लालू पुत्र किंवा चंद्राबाबू नायडू याना जनाधार फारसा नाही. खरं तर सर्वव्यापी असा जनाधार कुणालाच नाही. राहुल गांधी नावाचे बुजगावणे उभे केले आहे त्याला काँग्रेसने टेकू देऊन उभा केलेला जनाधार आहे परंतु जर यदाकदाचित राहुल गांधी पंतप्रधान झालेच तर कपिल सिब्बल सारख्या धूर्त माणसांना रान मोकळे मिळेल.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 06/05/2018 - 16:27 नवीन
याचा नक्की अर्थ काय? आणि एवढं बहुमत असताना सरकार कसं काय पडणार होतं?
नोटाबंदीचा निर्णय नक्कीच चुकीचा होता , हेतु शुध्द होता असे म्हणता येईल पण निर्णय मात्र धाधांत चुकीचा होता , तेव्हा योग्य नेतृत्वाने ह्या निर्णयचे सामाजिक आर्थिक परिणाम कसे चुकीचे आहेत हे मुद्देसुद दाखवुन दिले असते अन ५० दिवसांच्या मुदतीनंतर निर्णय कसा गंडला हे दाखवले असते तर सरकार नक्कीच पडले असते, भाजपातील कित्येकांचा ह्या नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध होता म्हणे. नोटाबंदीच्या निर्णायानंतर पहिल्यांदा मला मोदींच्यात इंदिरागांधी स्टाईल हुकुमशाही मनोवृत्तीची झलक दिसुन आली होती ! ( माझा पॉलिटिकल इकोनॉमिक्स चा अभ्यास नाही पण ऐकीव माहीती नुसार देशाच्या करन्सी चे निर्णय हे सर्वस्वी आ.बी. आय च्या चेअरमन च्या हातात असले पाहिजेत , " मै ग्राहक को ५०० रुपये देणे का वचन अदा करता हुं" असे म्हणुन खाली त्याची सही असते. त्याचा तो अधिकार ओव्हर राईड करुन स्वतःच तडकाफडकी निर्णय घोषित करणे हा सर्वप्रथम स्टंट होता , सेकंडली असंविधानिक होते , आणि सर्वात महत्वाचे म्हणाजे मी म्हणीन तेच खरे ह्या वृत्तीचे प्रतीक होते . रगुराम राजन सरां सारखा एक जरी जाणता अभ्यासु विरोधक असता तर सरर्कार नक्कीच पडले असते . मम सिंग अन थुरुर वगैरे आहेत पण गांधी घराण्याची पायचाटु माणसे कधीच राजकारणात वर येवु शक्णार नाहीत , हा भाजपाचा लै लै मोठ्ठा अ‍ॅडव्हान्टेज आहे !)
हि स्थिती केवळ २०१४ पासूनची नसून २००६ पासूनची आकडेवारी पाहिलीत तर हा आलेख वाढतच आहे
हे असे असेल तर एक हिंदुत्वावादी विचारसरणीचे सरकार म्हणुन ह्याबाबत सक्त कारवाई करणे भाजपाचे नैतिक कर्तव्य होते असे मी म्हणेन . त्याबाबत भाजपा कमी पडाला हे मान्य करायला हवे , इट्स नॉट अ गूड डिफेन्स टू से की २००६ पासुन हे चालु आहे ! अ गूड डिफेन्स वुड बी - २००६ पासुन हे चालु होते , आमच्या राज्यात आम्ही हे अत्याचारांचे प्रमाण लक्षणीय रित्या कमी करण्यात यशस्वी झालो आहोत ! खरेतर दलितांना आज बाबासाहेबांची गरज आहे पण त्यांना आज कोणतेच सक्षम नेतृत्व नाही , जे आहेत ते आपसाआपसात भांडत बसलेत हे पाहुन फार वाईट वाटते . त्यातुन मेवानी सारखे अनार्कीस्ट नेतृत्व उदयाला येत आहे हे अत्यंत धोकादायक आहे , भाजपा आणि हिंदुत्ववाव्यांसाठी नव्हे तर देशासाठी! ममतादीं ह्या एक अत्यंत धुर्त बाई आहेत आणि त्यांना त्यांच्या न्युसन्स पावर ची चांगलीच जाण आहे ! त्यांनी बंगालात ज्या प्रकारे हरामखोर कम्युनिस्टांना गुंडाळले आहे ते पाहुन थोडासा आदरच आहे त्यांच्या विषयी . तस्मात मला त्यांची शक्यता जास्त वाटते. .
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 06/05/2018 - 17:39 नवीन
@ मार्कस ऑरेलियस मै ग्राहक को ५०० रुपये देणे का वचन अदा करता हुं" असे म्हणुन खाली त्याची सही असते. काही मूळ गृहीतके चुकीची आहेत. ५०० रुप्याच्या नोटा बदलून दिल्या गेल्या आहेत. जुन्या नोटा ऐवजी नव्या नोटात किंवा पैसे खात्यात जमा झाले.याचा अर्थच असा आहे कि त्याला ५०० रुपये अदा झाले आहेत. तेंव्हा या सही आणि शिक्क्याचा अधिकार ओव्हरराईड कसा झाला हे सांगा कि. सेकंडली असंविधानिक होते ,"असंविधानिक" होते तर कोणत्याच माणसाने त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान कसे दिले नाही? कारण निर्णय चूक आहे कि बरोबर आहे यावर न्यायालय निर्णय देत नाही पण घटनाबाह्य गोष्ट असेल तर न्यायालय त्यात स्वतःहून आक्षेप घेऊन(किंवा कोणीही जनहित याचिका दाखल केल्यास) असा निर्णय रद्दबातल करू शकते. न्यायाधीशांच्या नेमणुकीची घटनादुरुस्ती सर्वोच्च न्यायालयाने अशीच रद्द केली आहे. शिवाय जर बहुमत सरकारकडे असेल तर सरकार कसे पडेल ते आपण संगितले नाहीत. उगाच लांब काथ्याकूट कशाला? रगुराम राजन सरां सारखा एक जरी जाणता अभ्यासु विरोधक असता तर सरर्कार नक्कीच पडले असते ते कसं काय बुवा? त्यांनी एवढी नोटबंदी वर टीका केली तरी सरकारला काही ढीम झालं नाही. .सगळी अक्कल आणि शहाणपणा काही एकाच व्यक्तीची मक्तेदारी नाही हेही समजून घ्यावे. काँग्रेसमध्ये किंवा इतर विरोधी पक्षात केवळ भंम्पक माणसे आहेत असे नाही. अतिशय हुशार माणसेही आहेत. केवळ रघुराम राजनच हुशार आहेत असे नाही. इतका गोल आणि भोंगळ प्रतिसाद आपल्याकडून अपेक्षित नव्हता एवढे बोलून मी खाली बसतो.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 06/05/2018 - 18:29 नवीन
ओके. माझ्याकडे आज जुनी ५०० / १००० रुपायाची नोट असेल तर बदलुन मिळणार का ? की त्याव्र केलेली आर.बी.आय गव्हर्नर्ची सही गायब होणार ? माझ्या माहीती प्रमाणे नोटाबंदी असंविधानिक होती म्हणुन त्या विरोधात सुप्रीमकोर्टात केसेस केल्या गेलेल्या आहेत अगदीच नाही असे नाही. ( तुर्तास माझ्या कडे डिटेस नाहीत म्हणुन ह्या विषयाव्र जास्त काही लिहु शकत नाही. ) सबळ नेतृत्वाने खंबीर पणे आणि योग्य मुद्देसुद मांडणी करुन नोटाबंदी नंतर अविश्वासदर्शक ठराव आणल असता तर एन.डी. ए च नव्हे तर खुद्द भाजपातील काही लोकांनीही कदाचित त्याल समर्थन दिले असते ! रघुरामराजन एकटेच हुशार आहेत असे मी म्हणात नाही , पण ते योग्य इकॉनॉमिक सेन्स देवुन हा निर्णय कसा चुकीचा होता हे सिध्द करु शकतात इतकेच मी म्हणात आहे ( ते ममसिंगही करु शकतात पण त्यांना मॅडमची आणि राहुलबाबा ओव्हरशॅडो व्हाय्चही काळजी वाटली असवी बहुतेक ) बाकी मी आधीच म्हणले की माझा पॉलिटिकल इकोनॉमीचा अभ्यास नाही आणि संविधानाचाही खोलवर अभ्यास नाही. नोटाबंदी चुकीची होती हे माझे अल्पशा इकोनॉमिक्स आणि संविधानाच्या अभ्यासावरुन अन बेसिक इन्ट्युशन वरुन बनलेले मत आहे. त्यामुळे माझा प्रतिसाद गोलमटोल आणि भोंगळ असु शकतो , अगदीच नाही असे नाही . मान्य आहे :)
  • Log in or register to post comments
प
पुंबा Tue, 06/05/2018 - 08:50 नवीन
त्यातल्या त्यात ममतादींचेच चांसेस सर्वात जास्त आहेत !
नविन पटनायक हे नावसुद्धा ऐनवेळी चर्चेत येऊ शकते, अर्थात ओदीशात भाजपची मुसंडी अन स्वतःच्या पक्षातील प्रवासी पक्षी रोखू शकले तर. हा माणूस ममतापेक्षा बरा वाटतो.
  • Log in or register to post comments
प
पुंबा Tue, 06/05/2018 - 08:44 नवीन
इतर भाजप नेत्याप्रमाणे गुळमुळीत धोरण न पत्करता विरोधकांना सळो कि पळो करतील इत्यादी लोकांची अपेक्षा होती.
++१११११ सळो कि पळो म्हणजे कुठल्याही संबंधांचा, राजकिय अपरिहार्यतेचा मुलाहिजा न राखता भ्रश्ट नेत्यांना बेड्या ठोकतील अशी अपेक्षा होती. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, अशोक चव्हाण, धेंडं, कृपाशंकर, हुडा, गेहलोत, वीरभद्रसिंग, मुलायम, मायावती, काण व्यवसायातील रेडी बंधू प्रभृती(स्वपक्षीय असतील तरी मोदी त्यांना दाद देणार नाहीत असे वाटत असे) वगैरे बड्या धेंडांच्या मागे हे सरकार लागेल, त्यांची कृष्णकृत्ये खणून काढेल असे प्रामाणीकपणे वाटत होते. दिल्लीत अनेक भ्रष्ट लॉब्या कित्येक दशकांपासून सत्तेच्या वर्तुळाभोवती वेटोळे घालून बसल्या आहेत त्यांना मोदी जेरबंद करतील असे वाटले होते. राज्यात तसेच केंद्रात भ्रष्ट अधिकार्‍यांची दलालीची संस्थाने निर्माण झाली होती ती खालसा होतील असा सामान्यांचा कयास होता. याची कारणे म्हणजे मोदींना मिळालेले भव्य मँडेट, २०१४ पुर्वीची भ्रष्टाचारविरोधी लढ्याची पार्श्वभुमी आणि सर्वात महत्वाचे मोदींचे प्रस्थापित वर्तुळाबाहेरचे ( ल्युटियन्स झोन) सामान्य माणसाला जवळचे वाटणारे नेतृत्व. भुजबळांना ज्याप्रकारे धडा मिळाला त्यावरून योग्य कारवाई सुरू असल्याचे चित्रही सुरुवातीच्या काळात दिसून आले होते. नंतर मात्र काय झाले माहिती नाही. अक्षरशः नाम्गी टाकल्याप्रमाणे सरकार सुस्त पडले आहे. वर उल्लेखलेल्या लोकांवर विरोधात असताना भाजपनेच आरोपांची राळ उठवली होती. सत्तेबरोबर येणारी मस्ती म्हणावी की मांडवलीची अपरिहार्यता लक्षात आली म्हणावी. पण अजून ही धेंडं कारवाईविना सन्मानाने राजकारणात वावरत आहेत. हा अपेक्षाभंग आहे. दुर्दैवाने या मुद्द्यावर चौथा स्तंभ चिडीचूप असलेला दिसतो( विशेषतः लोकसत्ता गोसी खुर्द वगैरे प्रकल्पातील अनियमेततेवर, सिंचन घोटाळ्यावर बराच पाठपुरावा करत असे २०१४ पुर्वी, अशात काहीच आवज नाही). 'कोल'गेट, २जी, कॉमनवेल्थ, रॉबर्ट वाध्रा, आदर्श घोटाळा, सुप्रीम कोर्टाने दिलेली स्विस बँकेत पैसा असणार्‍यांची यादी यातलं कुठलं प्रकरण लॉजिकल क्लोझ्यरला गेलेलं दिसतं आहे का? स्वतः भाजपच्या काळात असे घोटाळे होत नाहीत हे खरे असले तरी पुर्वीच्या प्रकरणांचं काय? माझ्या मते, आमचे वैर फक्त राजकिय स्वरूपाचे, वैयक्तिक जिवनात आम्ही मित्र, गुरू शिष्यआहोत, असला भोंगळ कारबहर करणार्‍या 'विलासराव- मुंंडे, शरद पवार- ठाकरे' टाईप राजकारण्यांना तोडपाणी करून आपापली घरे भरण्यात रस असतो केवळ. हा भोंदूपणा सोडून विरोधात असणार्‍यांशी खुलेपणाने वैर करणार्‍या आणि विरोधकाची भ्रष्ट प्रकरणे बाहेर काढून त्याला तुरूंगात पाठवणार्‍या पक्षांची आपल्या देशाला जास्त गरज आहे. काँग्रेसची सत्ता आली की त्यांनी भाजपच्या नेत्यांवर डूख धरून अपहारांच्या चौकश्या कराव्यात. भाजप आली की त्यांनी पण सेम करावे. हे 'मिल कर खावो' वाले सर्वपक्षीय साप देशाला गिळंकृत करतील.
  • Log in or register to post comments
स
साहना Tue, 06/05/2018 - 09:26 नवीन
४४ सीटच्या जोरावर काँग्रेसने मुख्य न्यायाधीशावर महाभियोगाची चर्चा केली. रात्री अपरात्री त्याच न्यायाधीशाला गाठून येड्डियुरप्पांच्या सरकारला सुरुंग लावला. हे काँग्रेसचे किलिंग स्पिरिट आहे. मोदी बरोबर काडीचीही मांडवली हा पक्ष करणार नाही, चुकून ह्यांना पूर्ण बहुमत मिळाले तर मोदींची उचलबांडगी सर्वप्रथम या ना त्या मार्गाने तिहार जेल मध्ये करतील. कसलीही दया माया दाखवणार नाहीत. वायपेयींनी उदार मनाने सोनिया गांधींना दया दाखवली पण नंतर ह्या बाईने प्रत्येक भाजप नेत्याच्या मागे CBI लावली. काँग्रेसची पाळे मुळे फारच खोल आहेत. उदाहरण घ्या तर शिबू सोरेन आणि भाजपला दोघांना मिळून बहुमत मिळाले होते पण काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष होता. राज्यपालांनी काँग्रेसला सरकार करण्यासाठी बोलावले. भाजप एक दोन दिवसांनी कोर्टांत गेला. त्यावेळी काँग्रेसी बाजूने अभिषेक मनू सिंघवी हे उतरले होते तर भाजपाच्या बाजूने मुकुल रोहतगी. कर्नाटक राज्याच्या बाबतीत पार्टी त्याच होत्या पण दोघांच्या अर्ग्युमेण्ट १८० उलट. दोन्ही वेळेला काँग्रेस ने बाजी तर मारलीच पण शिबू सोरेंच्या मागे हार प्रकारचा ससेमिरा लावला. काँग्रेसी मुळे खणण्यासाठी खरोखर कठोर नर-सिंह माणूस हवा होता आणि किमान भशानबाजीवरून तरी मोदी तसे माणूस वाटत होते पण सत्य परिस्तितीत मोदी सुद्धा वाघाचे कातडे पांघरलेले गाढव वाटते. त्यामुळे अपेक्षा कमी करून किमान काँग्रेसला सत्ते पासून ते दूर ठेवतील इतके जरी साध्य केले तरी देश आणि हिंदू जनतेचे भले होईल. गुळमुळीत धोरण म्हणजे काय ? उदाहरण म्हणजे राम माधव. हा संधीसाधू माणूस संघाचा प्रवक्ता होता. भाजप सत्तेत आल्यावर ह्याने सरकार मध्ये बदली करून घेतली. नंतर इंडिया फौंडेशन नावाचा तथाकथित विचारगट (थिंक टँक) काढला आणि स्वतःला मध्यस्त म्हणून काश्मीर, नागालॅन्ड इत्यादी भागांत नाक खुपसायला सुरवात केली. इंडिया फौंडेशनचे पैसे वापरून गोव्यांत वगैरे पार्टी ठेवायच्या शोभा डे पासून इतर सर्व हिंदू विरोधी लोकांबरोबर मैत्री ठेवायची त्यांच्या पुस्तकांचे प्रकाशन वगैरे करून स्वतःला जणू काही थोर विचारवंत असल्या प्रमाणे मिरवायचे असे प्रकार सुरु केले. अर्थांत सरकार ह्यांचे असल्याने इंडिया फौंडेशन ला बक्कळ पैसे मिळतो पण आउटपुट शून्य. उलट आपल्या फेस्टिवल मध्ये चिदंबरम, कुठला तरी बिशप , एक वॉन्टेड इस्लामिक प्रचार असल्या लोकांना बोलावून शोभा करून घ्यायची. श्री एलस्ट ह्या बेल्जियन इंडोलॉजिस्ट ला बोलावले. त्याची मुलाखत घ्यायला सदानंद धुमे ह्या विदेशी पत्रकाराला सांगितले. सदानंद धुमे दररोज भाजप वाल्यांची धुतो, त्याला इथे बोलावयाचे कामाचं नव्हते पण असो. तर धुमे ह्यांनी एलस्ट ला त्याचे इस्लाम विषयी मत विचारले. एलस्ट ह्यांनी भीड भाड ना ठेवता इस्लाम हा अतिशय मागासलेला धर्म असून मुस्लिम लॉग ह्या मागासलेल्या विचारांचे शिकार झाले आहेत आणि घरवापसी करून ह्या लोकांना पुन्हा आपल्या जुन्या धर्मात आणणे भारताच्या हिताचे आहे असे सांगितले. भाजपच्या फेस्टिवल मध्ये, गोव्यांत भाजपचे सरकार असताना हे विचार ऐकून राम माधव ह्यांची बोबडी वळाली. एलस्ट ह्यांना काढता पाय तर घ्यावा लागलाच पण त्याच वेळी पुढील कुठल्याही थिंक फेस्टिवल मध्ये त्यांना बोलावले गेले नाही. त्याच समारंभांत एका संघ वाल्याने बिशप ला विचारले "एखादा हिंदू माणूस चांगल्या पद्धतीने आयुष्य घालवत असेल तर ख्रिस्ती धर्माप्रमाणे त्याला स्वर्ग मिळेल का ? " तर त्या विदेशी बिशपने स्पष्ट शब्दांत "हिंदू लोक जो पर्यात जीजस ला आपला प्रेषित मानून त्याला शरण जात नाहीत तो पर्यांत ते नर्कांत जातील असे सांगितले" तरी सुद्धा दार वर्षी राम माधव कुणा बिशप ला असल्या थिंक फेस्टिवल मध्ये बोलावतात. काश्मीर मध्ये सत्तेच्या धुंदीत रॅम माधव ह्यांनी हिंदूंच्या हिताचा बाली दिला आहे. भाजप साठी वर्षोनु वर्षे काम केले कित्येक कार्यकर्ते आणि काश्मीर पंडित माधव च्या नावाने ट्विटर वर बोंबलत आहेत. जम्मू खोरे इस्लाम बहुसंख्य करण्यात माधव ह्यांचा सिंहाचा वाटा आहे. रोहिंग्यांना काश्मीर मध्ये सेटल करण्याचा चाणक्य बुद्धी त्यांचीच. आता रमजान मध्ये शस्त्रसंधी सुद्धा राम माधव ह्यांचाच विचार आहे. थोडक्यांत फक्त सत्ता मिळवण्यासाठी राम माधव ह्यांनी मुफ्ती पुढे लोटांगण घातले. जम्मू खोऱ्यातील हिंदू लोकांच्या अगदी मामुली डिमांड्स सुद्धा मुफ्ती ह्यांनी मान्य केल्या नाहीत. बिप्लब देव ह्या मूर्ख माणसाला त्रिपुरांत मुख्यमंत्री करण्यात सुद्धा ह्यांचा मोठा सहभाग. मे ११ ला हा माणूस सांगतो "जिहादी लोकांनी आधी रमजान म्हणून शस्त्र संधी करावी. शत्रूचा बिमोड करणे हे सैन्याचे प्रथम कर्तव्य आहे. " https://t.co/5sKhXaEXxo मे २० उजाडताच PM has shown his respect for sentiments of the common people in Kashmir, thereby asking security forces to cease operations. आता अचानक सोन्याचे प्रथम कर्तव्य वगैरेला कसली तिलांजली लावली ? अश्या प्रकारे आपल्याच घराला आग लावून झाल्या नंतर आपण जणू काही हेन्री किसींगर असल्या प्रमाणे राम माधव FBI चीफ कोमी, हिलरी क्लिंटन, डॅनिअल बायमान, ट्रम्प आदी विषयांवर ट्विट करतो. माधव ह्यांचे अमेरिकेत भाषण होते. भाषणातील ठळक मुद्दे लिहिण्यासाठी मी पेन पेपर घेऊन बसले होते. हा माणूस अक्षरशः तास भर बरळला पण त्या एक तासांत मी एक सुद्धा मुद्दा लिहू शकले नाही कारण मुलांत नोंद घेण्यासारखा मुद्दाच नव्हता. इकडच्या तिकडच्या श्री श्री किंवा जग्गी वासूदेणाच्या प्रवचनाप्रमाणे निरर्थक analogy आणि आपणच किती हुशार आहोत ह्याच्या वल्गना. मोदी सारख्या तळागाळांतून आलेल्या माणसाला असल्या गुळमुळीत लोकांची संगत का बरे आवडावी आणि राम माधव सारख्या माणसाला नारळ का देण्यात येत नाही हे आश्चर्य आहे. टीप : राम माधव ह्यांनी ह्या काळांत बरीच माया जमवली आहे असे ऐकू आले. त्यांच्या इंडिया फौंडेशन च्या देणग्या सुमारे ३० पटीने वाढल्या आहेत.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 06/05/2018 - 06:36 नवीन
कोणी काही म्हणो....पाकड्यांच्या बाबतीत जशास तसे उत्तर खुलेआम देणे आणि जगात भारताची पत वाढवणे हे काम भरभरून झालेले आहे....यासाठी काही गोष्टींकडे नक्की कानाडोळा करू शकतो
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Tue, 06/05/2018 - 09:17 नवीन
कसले उत्तर दिले ? कसली पत वाढली ?
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Tue, 06/05/2018 - 12:45 नवीन
खात्यात पंधरा लाख नको आहेत पण चार वर्षात किती काळा पैसा परदेशातून भारतात आला हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 06/05/2018 - 13:20 नवीन
हा 'बाहेर' असलेला पैसा सुटकेस/ट्रंकांमध्ये भरून स्वीस बँकांमध्ये ठेवलेला असतो हा (गैर)समज आता दूर झाला असावा असे वाटले होते. तो पैसा आणणार म्हणजे कसा आणणार? राजकारणी/उद्योगपतींच्या लोकांच्या नावावर स्वीस खाते नसणार. ते वेगळ्या लोकंच्या नावावर असते. मग त्यांच्या खात्यातला पैश्यावर भारत सरकार हक्क सांगणार, तो पैसा येथे आणणार आणी लोकांना देणार?
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 06/05/2018 - 13:56 नवीन
पुंबा,
सळो कि पळो म्हणजे कुठल्याही संबंधांचा, राजकिय अपरिहार्यतेचा मुलाहिजा न राखता भ्रश्ट नेत्यांना बेड्या ठोकतील अशी अपेक्षा होती. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, अशोक चव्हाण, धेंडं, कृपाशंकर, हुडा, गेहलोत, वीरभद्रसिंग, मुलायम, मायावती, काण व्यवसायातील रेडी बंधू प्रभृती(स्वपक्षीय असतील तरी मोदी त्यांना दाद देणार नाहीत असे वाटत असे) वगैरे बड्या धेंडांच्या मागे हे सरकार लागेल, त्यांची कृष्णकृत्ये खणून काढेल असे प्रामाणीकपणे वाटत होते. दिल्लीत अनेक भ्रष्ट लॉब्या कित्येक दशकांपासून सत्तेच्या वर्तुळाभोवती वेटोळे घालून बसल्या आहेत त्यांना मोदी जेरबंद करतील असे वाटले होते. राज्यात तसेच केंद्रात भ्रष्ट अधिकार्‍यांची दलालीची संस्थाने निर्माण झाली होती ती खालसा होतील असा सामान्यांचा कयास होता
या स्तरावरचं कार्य करायला शिवाजीस ३३ वर्षं संघर्ष करावा लागला. तेव्हा कुठे दक्षिण दिग्विजय साकारला. थेट मदुराईपर्यंत स्वराज्य पोहोचलं. दिसायला भल्यामोठ्या कर्नाटकप्रांतीचा ३ वर्षांचा दिग्विजय दिसतो, पण त्यामागे पराकोटीचे कष्ट आहेत. यशाच्या समीकरणात ते पण बघायला हवेत ना? मोदींच्या बाबतीत थोडी घाई होतेयसं नाही वाटंत ? भव्य जनादेश (=मँडेट) कुचकामी आहे. तो फक्त पाच वर्षांनी कामास येतो. तोही टिकवून ठेवला तरंच. मोदी ही जादूची कांडी नव्हे. आज आयेयेस वगैरे उच्चाधिकारी निवडण्याच्या प्रक्रियेत मूलभूत बदल होताहेत. आजवर उत्तीर्ण उमेदवाराचा केवळ गुणक्रमांक पाहून आयेयेस, आयपीएस, आयेफेस, आयारेस, वगैरे सेवा मिळंत असे. मात्र मोदींच्या सुधारणेनंतर या उमेदवारांना प्रत्यक्ष लोकांत जाऊन काम केल्यावर नंतरच यथोचित सेवा प्राप्त होणार आहे. मग जुना नियम बदलायचा कोणी? प्रशासनसेवा लोकाभिमुख करायच्या कोणी? मोदींनी? मग प्रशासकीय अधिकारी काय फक्त झोपाच काढीत बसणार का? मोदींनी भ्रष्टाचारी नेत्यांना सळो की पळो करून टाकायला पाहिजे. मग तुम्हीआम्ही काय करणार? असा तो प्रश्न आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Tue, 06/05/2018 - 14:10 नवीन
काँग्रेस सरकार असताना हे प्रश्न भाजप्याना कधीच पडत नव्हते.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Tue, 06/05/2018 - 14:21 नवीन
३३ वर्षे ठीक आहे... पण मोदींची ३३ वर्षे आपण २०१४ पासून मोजत आहात का ? शिवाजी महाराजांची १६७४ पासून मोजलीत का ?
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 06/05/2018 - 18:04 नवीन
म.क., शिवाजी जन्मजात राजा नव्हता. इतकं तर तुम्हांस माहिती असेलंच. या माहितीच्या आधारे तुम्हीच ठरवा केव्हापासनं मोजायची ३३ वर्षं ते. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 27 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 39 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 43 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा