Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

ते पंधरा लाख !

स
सुधीर मुतालीक
Mon, 06/04/2018 - 12:44
🗣 264 प्रतिसाद
२०१४ च्या निवडणुकीच्या धामधुमीत प्रत्येक अकौंटमध्ये पंधरा लाख जमा करू अशी घोषणा झाली आणि जणू प्रत्येक भारतीय कधी एकदा तो एसेमेस आपल्या मोबाईलवर येतोय याची डोळ्यात प्राण आणून वाट बघत होता. दोन तीन वर्षे झाले तरी असे काही झाले नाही हे जाणवून कळवळलेल्या जनसमुदायांनी " फेकतोय साला" अशी ओरड सुरु केली. माझ्या मते ते पंधरा लाख प्रत्येकाच्या अकौंटमध्ये कधीच जमा झाले आहेत. कल्पना अशी असेल की ते पैसे प्रत्यक्षात जमा व्हावेत आणि त्यातून आपण गाडी खरेदी करावी वा माडी बांधावी तर तसे फुकटच्या पाकट का बरे व्हावे आणि कशासाठी ? हे समजावून सांगण्याची गरज असू शकते. पण समजावून सांगितलं नाही हे ही ठीकच आहे. कारण मग ज्यांचा भ्रमनिरासच झाला आहे किंवा ज्यांना पोटदुखीच आहे त्यांनी गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा मधल्या " सोन्याच्या टोपीची" आठवण झाली असती आणि फेकू ऐवजी नाम्या म्हणून टिंगल केली असती, पण टिंगल चुकलीनसती. वैफल्य वगैरे. आपल्या अकाऊंट मध्ये पंधरा लाखच काय कोट्यवधी रुपये या सरकारने जमा केले आहेत. फक्त एकच म्हंजे उदाहरणार्थ : मागील सरकारने एकूण पेट्रोल खरेदीचे फक्त ५५ % बिल इराणला अदा केले होते. उर्वरित बिलाचे कर्ज देशावर म्हंजे तुमच्या माझ्या डोक्यावर २०१४ मध्ये आणि अलीकडेपर्यंत होते. आजच्या आकड्या नुसार ही रक्कम होती पाच हजार करोड रुपये. ही रक्कम आपल्या डोक्यावर देय होती. ती रक्कम एक टाकी अदा भारत सरकारने अलीकडे केली आहे. आता फक्त एका व्यवहाराने पाच हजार करोड भागिले एकशे तीस करोड एवढी रक्कम तुमच्या माझ्या डोक्यावरून कर्ज कमी झाले, म्हणजे खात्यात जमा झाली आहे. दर डोई पंधरा लाख कधीच वसूल झाले होते. असे अनेक व्यवहार आहेत ज्याचा स्वतंत्र अभ्यास करता येईल. आणखी उदाहरणार्थ नोटबंदी नंतर सुमारे अडीच लाख कंपन्या व्यवहारात गडबड जाणवल्यामुळे बंद करायचे आदेश सरकारने दिले. त्यांची बॅंकांमधली सुमारे तेहतीस हजार कोटी रुपयांची ठेव ही आजवर कुणीच व्यक्ती वा कंपनी मागायला आली नाही, म्हंजे क्लेम वगैरे केला नाही. ती संपुर्ण रक्कम सरकारी तिजोरीत जमा होईल. शिवाय अशा सर्व ठेवींचा स्रोत अज्ञात ठरवून ती ठेवणाऱ्या व्यक्ती वा कंपनी यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश इन्कम टॅक्सवाल्याना दिले आहेत. दंडाची वसुली त्यातून जी होईल ती रक्कम आणखी काहीपट असेल. काय पंधरा लाखाचं कौतुक करत बसलीय जनता !

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 65339 views

🗣 चर्चा (264)
ड
डँबिस००७ Mon, 06/11/2018 - 16:26 नवीन
सोमनाथ खांदवे , नमस्कार, भावना पोहोचल्या !! खरोखर गुड चॉईस ऑफ कविता !
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Tue, 06/12/2018 - 06:05 नवीन
संपादकांना विनंती प्रत्येक भारतीयाला पंधरा लाख मिळेपर्यंत अथवा या धाग्यावर पंधरा लाख प्रतिसाद येईपर्यंत (दोन्हीपैकी जे आधी होईल ते) हा धागा जिवंत ठेवावा व सतत वर राहिले हे बघावे :)
  • Log in or register to post comments
व
विशुमित Tue, 06/12/2018 - 09:15 नवीन
संपादकांना विनंती प्रत्येक भारतीयाला पंधरा लाख मिळेपर्यंत अथवा या धाग्यावर पंधरा लाख प्रतिसाद येईपर्यंत अथवा २०१९ वर्ष (तिन्हीपैकी जे आधी होईल ते) हा धागा जिवंत ठेवावा व सतत वर राहिले हे बघावे :)
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Tue, 06/12/2018 - 13:44 नवीन
हा धागा जिवंत ठेवावा व सतत वर राहिले हे बघावे मंगु श्री हे कार्य करण्यास सक्षम आहेत !! त्यात त्यांचा स्वार्थ आहे हा भाग सोडा !!
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Wed, 06/13/2018 - 20:11 नवीन
19 june 1970 रोजी गांधी घराण्यात जन्म झालेले बाळ पुढे एक महान कलाकार , विनोदवीर होईल असे तेंव्हा काँग्रेस च्या चार सल्लागार ( चांडाळचौकडी )ला सुद्धा वाटले नसेल . 48 वर्षा चा होईल तरी मुंडावळ्या बांधण्याचा योग नाही , एक एक करून सतरा अठरा काँग्रेस चे बहुमत असलेली राज्य हातातून निसटून गेली , प्रादेशिक पक्षाची मारण्यात काँग्रेस आख्खी ची हायात गेली त्या प्रादेशिक पक्षांना मुखमंत्री पद दोन्ही हाताची ओंजळ करून द्यावे लागले . अशी कित्ती कित्ती दुःख एकट्याने सहन करून व चेहऱ्यावर मात्र सतत हासू ठेवून , या भारत देशातील जनतेला सतत हसत ठेवण्याचे महान कार्य या राजपुत्राने केले आहे . 15 लाख मिळावे म्हणून आसुसलेल्या जनतेचे दुःख आपल्या राष्ट्रीय विनोदवीर नक्कीच कमी केले आहे . काहीही असू द्या पण या विनोदवीर रागा ला किमान 100 वर्ष आयुष्य लाभो व पुढील काही पिढया चें असेच मनोरंजन करो . " स्पीकर मॅडम, सॉरी ! सॉरी !!, चेअरमन सर !" टाळ्या . "गुजरात को दूध दिया हैं तो इन महिलाओ ने दिया है "टाळया चां कडकडाट . " इधर से आलू डाला ,उधर से सोना " या वाक्याला तर मतदार खल्लास . मी तर म्हणतो मोदींनी 15 लाख देण्याचे वचन काही पाळले नाही ज्यांना ज्यांना ते 15 लाख हवेत त्यांनी रागा ला विनंती करावी , देतील तुम्हाला काही तरी शोध लावून . " इधर से कुछ तो डाला , उधर से 15 लाख " ज्यांना 15 लाख हवेत बघावे त्यांनी नशीब अजमावून .
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Wed, 06/13/2018 - 20:40 नवीन
नोटाबंदीच्या अपयशाने खचलेले भक्त आता स्वतःची केविलवाणी करमणूक करून घेत आहेत.
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे गुरुवार, 06/14/2018 - 07:51 नवीन
चुकतो एखादा निर्णय , अशा हजारो चुकलेल्या निर्णय मूळे काँग्रेस ने तर किमान 100 वर्ष निवडणूक लढविली नाही पाहिजे .भाजप ला नोटबंदीत अपयश आले तर आपणांस हर्षवायू झालेला दिसतोय . मी तर पूर्वीच सांगितले आहे की मी मोदी भक्त नाही , पण तुम्ही रागा चें भक्त आहात हे पाहून माझा आनंद द्विगुणित झाला . असते गुलामगिरी त खितपत पडण्याची काहींची ईच्छा . आपण सुद्धा रागा चे यू ट्यूब वरील व्हिडिओ पाहून फिदीफिदी हसला होता की नाही ते सदसद्विवेकबुद्धी ला स्मरूण सांगा .
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 06/14/2018 - 09:30 नवीन
नोटबंदीच्या तुलनेचे काँग्रेसचे चुकलेले हजार जाऊ द्यात पण ३-४ चुकलेले निर्णय कृपया सांगता का ? तुलना करायला बरे पडेल. तेवढीच आमच्या ज्ञानात भर.
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 06/14/2018 - 17:28 नवीन
चुकतो एखादा निर्णय , मान्य केल्याबद्दल धन्यवाद. भाजप ला नोटबंदीत अपयश आले तर आपणांस हर्षवायू झालेला दिसतोय . नोटाबंदीच्या काळात जनतेचे झालेले हाल , atm, बँकेच्या रांगेत उभे राहिल्याने झालेले मृत्यू पाहून तुम्हाला हर्षवायू झाला होता का? नोटाबंदीच्या भोंगळ अंमलबजावणीला माझा विरोध मी कधीच लपवला नाही. पण तुम्ही रागा चें भक्त आहात हे पाहून माझा आनंद द्विगुणित झाला . कशाच्या आधारे तुम्ही असा निष्कर्ष काढला? आपण सुद्धा रागा चे यू ट्यूब वरील व्हिडिओ पाहून फिदीफिदी हसला होता की नाही ते सदसद्विवेकबुद्धी ला स्मरूण सांगा . मी कोणाचेही व्हिडिओ पूर्ण बघतो, त्यामुळे एखादेच वाक्य ऐकून चुकीचा अर्थ काढून फिदीफिदी हसण्याचा बालिशपणा करत नाही.
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे गुरुवार, 06/14/2018 - 12:40 नवीन
ऑ आश्चर्य आहे , काँग्रेस ने देशाची आर्थिक, सामाजिक ,शैक्षणिक क्षेत्रात किती प्रगती केली हे तुम्हाला माहीत असून तुम्ही मला विचारताय . तरी पण आसू द्या मी करतो बापुडा सूर्याला दिवा दाखवण्याचा प्रयत्न . रोजगार हमी योजना - यात त्या त्या दुष्काळी भागातील आमदार,पंचायत समिती सदस्य , सरकारी अधिकारी सगळ्या नीं खोटे मजूर दाखवून बक्कळ पैसे कमावले . दिल्ली ते गल्ली तील सगळ्यांना माहीत होते की यात भ्रष्ट्राचार होतोय पण ती कोणीही बंद किंवा बदलण्याचा प्रयत्न केला नाही .किती कोट्यवधी रुपये पाण्यात गेले हा संशोधनाचा विषय . आणीबाणी - सर्रास होणारा भ्रष्ट्राचार आणी त्याबद्दल कार्यवाही करायच्या ऐवजी 1972 साली देशाला 21 महिन्याच्या आणीबाणीत ढकलले . काँग्रेस चे मवाली नेते सोडून इतर सगळ्या पक्षाचे नेते , कार्यकर्ते व सामान्य जनता अक्षरशः क्रूरपणे भरडली गेली होती . गेल्या महिन्यात देशपातळीवर केलेल्या सर्व्हे मध्ये नोटबंदी त झालेला त्रास सहन करून पुन्हा भाजप / मोदींवर च विश्वास दाखविला होता हे आपल्या लक्षात असेलच . लोकसंख्या नियंत्रण , गरिबी हटाव मध्ये सपशेल अपयशी . शहाबानो केस मध्ये राजीव गांधी चे घुमजाव . . मुस्लिम समुदायाचे लांगुलचालन केल्यामुळे बहूसंख्य हिंदू काँग्रेस पासून दुरावले .टाडा आणि पोटा या कायद्यांचे काँग्रेसच्याच काळात दुरुपयोग वाढल्या मुळे दोन्ही कायदे बंद करावे लागले . अजून भरपूर आहेत पण काँग्रेस चा नाकर्तेपणा सिद्ध करण्यासाठी एवढे पुरेसे ठरतील आणि मला वाटतंय वरील मुद्दे दुव्या शिवाय तुम्हाला पटतील . शेतकरी आत्महत्या , रोजगार उपलब्धता , आता पर्यंत झालेल्या हजारो दंगली व त्यात फक्त हिंदुनाच झालेला त्रास , 1984 शीख हत्याकांड असे भरपूर मुद्दे सापडतील जे नोटबंदी च्या तुलनेत ज्यास्त चुकीचे आहेत .
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com गुरुवार, 06/14/2018 - 12:48 नवीन
तरी जुनाच जप अजून सुरू आहे. नोटांबंदीने काय साधले ? याचे उत्तर काय , तर काँग्रेसने शहाबानो प्रकरण केले !
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे गुरुवार, 06/14/2018 - 14:32 नवीन
आणले ना ! मग थांबा ना पाच दहा वर्षे , का सत्तेवाचून जीव तळमळतोय ? .
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 06/14/2018 - 14:03 नवीन
<<<शेतकरी आत्महत्या , रोजगार उपलब्धता , आता पर्यंत झालेल्या हजारो दंगली व त्यात फक्त हिंदुनाच झालेला त्रास , 1984 शीख हत्याकांड असे भरपूर मुद्दे सापडतील जे नोटबंदी च्या तुलनेत ज्यास्त चुकीचे आहेत .>>> ==>> हे खूप महत्वाचे मुद्दे आहेत. १. शेतकरी आत्महत्या - काँग्रेसच्या कोणत्या निर्णयामुळे ही समस्या निर्माण झाली? २. रोजगार उपलब्धता - २ करोड रोजगाराचं पुढे काही समजलं नाही. पण काँग्रेसच्या मागच्या १० वर्षामध्ये चांगली स्थिती होती. आमच्या मागच्या पिढीच्या काळात पण नोकऱ्या मुबलक होत्या, पण जागा भरायला लोकं मिळत नसायचे.(मला वाटतंय हा मुद्दा दुव्या शिवाय तुम्हाला पटेल). ३. आता पर्यंत झालेल्या हजारो दंगली- काँग्रेस सत्तेत असल्यावर कशाला स्वतःच दंगली घडवेल.(घडवू ही शकतो, पण त्याला काहीतरी आधार द्या) ४. त्यात फक्त हिंदुनाच झालेला त्रास- हा हवेतला गोळीबार आहे. ५. 1984 शीख हत्याकांड - माझ्या अल्प माहिती प्रमाणे त्या हत्याकांडानंतर पंजाब शांत/थंड होत गेले. (हत्याकांडाचे बिलकुल समर्थन नाही, हे नमूद करू इच्छितो). एवढे होऊन देखील आज घडीला तेथे काँग्रेसची सत्ता आहे. ६. रोजगार हमी योजना - भ्रष्टाचाराची पाळेमुळे शोधून संबंधित लोकांना शिक्षा झाली पाहिजे, यात वाद नाही. फक्त चालू सरकार ने हा चुकीचा ठरलेला निर्णय मॉडिफाय (?) करून पुढे का चालू ठेवला आहे? ७. काँग्रेससी आणीबाणी - आपला पास. ==== शहाबानो वगैरे विषयामध्ये मला बिलकुल गती नाही आहे.
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे गुरुवार, 06/14/2018 - 15:24 नवीन
शेतकरी आत्महत्या - मी स्वतः शेती करत असल्यामुळे शेतकऱ्याचे दुःख थोडं तरी समजत . शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या पिका साठी हमीभाव निश्चित नसणे , मारवाडी व्यापाऱ्यांची साखळी ,पावसाचे प्रमाण , सावकारी पाश , दुष्काळी भाग किंवा कोल्हापूर पट्टा येथील जुन्याच पद्धतीने केली जाणारी शेती त्यामुळे ऐका ठिकाणी पाण्याचा अपव्यय तर दुसऱ्या ठिकाणी सतत दुष्काळ , 60 वर्ष सत्तेत असून सुद्धा कृष्णा खोरे योजने मधील आपण आपल्या वाट्याचे पाणी उचलू शकलो नाही कारण पूर्वी ची काही धरणे अर्धवट आहेत व कालव्याच्या नियोजनाचा पत्ता नाही .गेल्या 40 / 50 वर्षात ज्यांच्या जमीनी धरणात गेल्या ते धरण ग्रस्त सतत त्यांच्या मागण्यासाठी मोर्चे काढत आहेत , आता मला तुम्ही सांगा 60 वर्षात काँग्रेस ला हे प्रश्न का नाही सुटले ? . रोजगार उपलब्धता -आपल्या वेळी लोकसंख्या कमी होती म्हणून जागा भरायला माणसं मिळत नसतील (40 वर्षा पूर्वी ). सुशिक्षित पदवीधर रिक्षा चालवतात , शिपाई च्या पदा साठी बी कॉम , एम कॉम चे उमेदवार मुलाखती साठी येतात असल्या शैक्षणिक विटंबनेच्या सुरस कथा आपण किमान 20 वर्षा पासून ऐकल्या असतील . आपण जरा " आहे रे " दृष्टी सोडून "नाही रे " दृष्टी ने बघितले तर गरीब सुशिक्षित लोकांना पावलो पावली उदभवणार्या अडचणी कळतील . दंगल - हजारो दंगली मध्ये काँग्रेस ने मुस्लिमनां कुरवाळले , हिंदु ना वाऱ्यावर सोडले . पण " काँग्रेस ने दंगली घडवल्या " असे मी म्हणलोच नाही . शहाबानो प्रकरणात सुद्धा काँग्रेस ने दुटप्पीपणा केला होताच . रोजगार हमी योजना - कोण ? कोणाचा ?आणि केंव्हा पासून ? भ्रष्टाचार उकरून काढणार . शीख हत्याकांड - माझा पण पास . मोगा भाऊ , काँग्रेस चे मुसळ सोडून भाजपचे कुसळ नका शोधत बसू .
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 20 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 33 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 36 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा