१४ मे भाग-२

पुनश्च १४ मे
सकाळी साडेसहा वाजता गजर वाजला आणि तो नेहमीप्रमाणे आज झोपला आणि काल सकाळी उठला. १४ मेला रात्री झोपला आणि १४ मेला सकाळी उठला!
हा गजर बरा पडतो. बायको उठून गदा गदा हलवून जागं करणार त्यापेक्षा हा नाजूक किणकिण करणारा गजर परवडला. उठायचा अगदी कंटाळा आला होता. रोज रोज उठायचा कंटाळा करून कसं चालेल?

१४ मे. भाग १

१४ मे.
सब तीरथ एक बार. लेकीन १४ मे बार बार!
आज काय तारीख आहे? 1 ऑगस्ट. कशावरून? कारण काल ३१ जुलै होती. हा तुमचा निव्वळ भ्रम आहे. मी तुम्हाला सांगतो आज १४ मे आहे. काही दिवसांनी लोक म्हणतील आज १८ सप्टेंबर आहे. मग म्हणतील आज २० डिसेंबर आहे. तुम्ही कुणा कुणावर विश्वास ठेवणार? ही मिस्टर कुलकर्णीची कथा वाचा. मग मी काय सांगतो आहे त्याच्यावर तुमचा विश्वास बसेल.
संध्याकाळचे सात वाजण्याची वेळ असावी. कुलकर्णी हॉटेलमध्ये आला तेव्हा फक्त एकजण शेवटच्या टेबलापाशी बसला होता. हे सद् गृहस्थ नेहमीच्यातले नव्हते. त्याच्याच वयाचे असावेत.

‘यू’ का ‘नॉन-यू' ? : एक इंग्लिश भेदभाव

आणि का आनि? पुष्कळ का लई? होतं की व्हतं? किल्ली का चावी? वॉशर का वायसर? वस्तू मिळते का भेटते? ?.........
ही यादी आपल्याकडे कितीही वाढवता येईल. यातला कळीचा मुद्दा वाचकांच्या लक्षात आला असेल - संभाषणात प्रमाणभाषा की बोलीभाषा ?

एक भयानक (गंमतीशीर नसलेला) अनुभव

आधीच्या लेखावर आलेल्या प्रतिक्रियांवरुन आपल्याला आलेले अनुभव दुसर्‍यांच्याही उपयोगी पडु शकतात हे लक्षात आले म्हणुन हा अजुन एक अनुभव वाचकांपुढे मांडतोय.

पं वसंतराव देशपांडे

मी वसंतराव

मित्रहो यांनी एक सुंदर लेख लिहिल्याबद्दल अभिनंदन.त्याला प्रतिसाद द्यावा म्हणून लिहीत असताना शब्द भरकटत गेले व खुप मोठा प्रतिसाद झाला. तसेही आज तीस जुलै, कलर्स वर दिवसभरात दोन वेळेस पं वसंतराव हा चित्रपट दाखवला गेला. इतरत्र सुद्धां पं वसंतराव यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या रसीकांनी कार्यक्रम केले असतील. वाटले वेगळा धागा डकवावा.

पं वसंतराव यांना जवळून बघण्याचा,बोलण्याचा योग आला होता. काही मखमली आठवणीं पैकी एक. मी सतरा वर्षाचा नुकतीच शाळा संपवलेला तर पंडितजी पन्नाशीचे.

पुस्तक खरेदी - काल आणि आज

हा लेख अर्धवट लिहून मे मधेच ठेवला होता परंतु आत्ता पूर्ण केला त्यामुळे कदाचित असंबद्ध वाटू शकतो
हा माझा पहिलाच लेख असल्या मुळे लिखाणात व व्याकरणाच्या चुका होऊ शकतात त्यामुळे क्षमस्व

पुस्तक खरेदी - काल आणि आज

इलाज नाही

कविवर्य विंदा करंदीकर यांची माफी मागून......

गर्भात वेदनेच्या रुजवू नकोस काही
उसळू दे वेदनांना त्याला इलाज नाही.

उसने घेवून बीज पेरु नकोस काही
मातीत खोट आहे त्याला इलाज नाही.

सद्भाव माणसांचा आणि स्वप्ने सुखाची
विषवल्लीनी वेढली त्याला इलाज नाही.

बोल ते फुकाचे आणि आदर्श देवाघरचे
नजरेत विखार आहे त्याला इलाज नाही.

------- अभय बापट
२९/०७/२०२३

माझाही एक भयानक अनुभव

या आठवड्यात मला एक जरा वेगळा आणि भनायक अनुभव आला
अहमदाबाद मधे दोन तीन दिवसांच्या कामासाठी गेलो होतो.
ऑफिसने हॉटेल बुक केले होते. पण जी रूम मिळाली त्या रूमला एकही खिडकी नव्हती. रूम वातानुकूलीत असल्याने खिडकी नसल्यामुळे काही फरक पडणार नव्हता म्हणून घेतली. सकाळी बाथरूम मधे गेलो. बाथरूमला ही अर्थातच खिडकी नव्हती, व्हेंटीलेशन साठी छतावर एक एक्झॉस्ट फॅन होता. अंघोळ करून बाथरून मधून बाहेर जाण्यासाठी दार उघडायला गेलो तर लक्ष्यात आले की दाराचे लॅच लॉक झाले आहे. आणि दार उघडता येत नाहिय्ये.

पीएनामा: झाडाची फांदी आणि एसीआर

(पीएनामा: केंद्र सरकारच्या सीएसएसएस केडर मध्ये ग्रुप सी पासून ते ग्रुप ए पर्यन्त प्रवासच्या दरम्यान अनेक वरिष्ठ आयएएस, आयपीएस इत्यादींच्या दरबारात कार्य करताना मला आणि माझ्या बांधवांना आलेले अनुभव, ऐकलेले किस्से आणि थोडी कल्पना, पीएनामाच्या रूपाने सादरीकरण करण्याचा प्रयत्न) किस्से सांगण्यासाठी काही टोपण नावे मी अर्थात पटाईत, सुनील, सुशील आणि श्याम सुंदर ही ठेवली आहे)

(ऐकलेल्या किस्याचा आधारावर काल्पनिक कथा) .