लग्न झाले नी अंकल झालो

गेल्या महिन्यात लग्नाला 37 वर्ष पूर्ण झाले. केस पांढरे झाले असले तरीही मी स्मार्ट दिसतो, किमान मला तरी असे वाटते. एक जुना किस्सा आठवला. उन्हाळ्याचे दिवस होते. त्यावेळी मी कृषी भवन मध्ये कार्यरत होतो. इमारतीतील एका छोट्या हॉलमध्ये माझ्यासोबत ६ स्टेनो त्यात ४ कन्या होत्या. दोन तर माझ्याच समवयस्क. दोघींचे लग्न झालेले होते. त्यातली एक अजूनही गुलाबाची कळी होती पण दुसरीचे गोबीच्या फुलात रूपांतरण झाले होते. सर्वच पुरूषांना बायकांचे बोलणे कान टवकारून ऐकण्यात एक आसुरी आनंद मिळतोच. दिवस मस्त जात होते. त्यादिवशी:

रॅप साँग....,बडबडगीत

मी कार्यकर्ता,
मीsssss कार्यकर्ता.....

वारसा,लाभ.... नेत्यांची मुलं-मुली
पदं मर्जीतल्यांना,आमच्या थंड चूली
सतरंजी उचलायला मात्र मी
टाईमपास खेळतो,जंगली रमी
मी कार्यकर्ता
मी कार्यकर्ता

वर्षानूवर्ष पक्षात मी ठाम
शपथघेती आयारामगयाराम
संकटमोचन मी,मी विघ्नहर्ता
जो विसरला जातो चरताचरता
मी कार्यकर्ता..मी मी मी कार्यकर्ता...

एक बिर्याणी आणि एक बीअर,
एक हिरवी नोट घेऊन मी चीअर
नेत्याने खांद्यावर हात ठेवला
तर हसतो मी मरतामरता
मी कार्यकर्ता..मी मी मी कार्यकर्ता

साक्षी

झुंजूमुंजूचे नभोनाट्य
क्षितिजावर रंगत जावे
सूर्यबिंब दवबिंदूंमधले
अलगद खुडून घ्यावे

त्या बिंदूंची रेष केशरी
लवलवती बनवावी
मावळतीची चांदणनक्षी
तिने हळू डहुळावी

स्पर्शाने अलवार विस्कटून
अवघी चांदणनक्षी-
-विरघळेल, त्या विरघळण्याला
एक विदेही साक्षी

विझणार्‍या सूर्यास्तबिंदूना
पश्चिम क्षितिजी टिपण्या
रिक्त ओंजळीत भरून घ्याव्या
मावळत्या चांदण्या

गतप्रभ नक्षत्रे अन् त्यातील
अगणित ह्या चांदण्या
तेज शिंपडित क्षितिजाखाली
जातील गात विराण्या

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

प्रेर्ना - मातीचे पाय

पयन स्प्र्शुन अले
ते हत मलले होते
लक्क उमग्ले तेवहा
ते पय मतिचे होते

मि केवल पहत होतो
पयन्च्य खल्चि धुल
ति ललतस लववि
हे एकच मथि खुल

मि इथ्वर पहुन अलो
पौल्खुना विर्नर्या
अधि कुन्वत, मगुन
कप्ति विकत हस्नर्या

अत पुन्ह चलवे पुधे,
कि परत फिर्वे?
सोस न-लयक पयन्चे
पुसुन अव्घे तकवे?

प्रेमल श्ब्दन्चि ओल
मनत र्झिपत नहि
व्हवे नत्मस्त्क
पयहि दिसत नहि

.....राजधानी Express.....

राजधानी Express
-------------------------------------------

कशी धावते..राजधानी पाहा ..
हॉर्न वाजवत..वेगात...सुसाट
वार्यालाही मागे टाकणारा.
वेग तिचा तो अफाट..

वेगाशी स्पर्धा करता तिच्या..
थकुनि जाती पळती झाडे..
HiTech तिचे इंजिन अवजड..
धुरांच्या रेषाही न हवेत सोडे..

स्टार-पॅंट्रीचा एक खास डबा..
स्टिम राइस..पिझ्झा बर्गर..नाही गावठी भात-वरण..
सुगरण तिथले शेफ..खरोखर..
सॅलाड मिळे..बास झाले आता शिकरण..!

छंद बायकोचा

(काल्पनिक कथा)

मैफिल वसंतोत्सव अंकात प्रकाशित ऋचा मायी लिखित कथा वाचत होतो. फावल्या वेळात:

बायकोने छंद जोपासला.
नवऱ्याला हिरा सापडला.
अंगणी वर्षाव झाला
नोटांचा.

जीऐ मराठीतील मैलाचा दगड - जन्म शताब्दी वर्ष

दिव्याचे तेज, डोळ्यांचे वेज
कोण तिथे जाळीत आहे

शंभर वर्षांनंतर कोण माझी
कविता वाचीत आहे?

माझी उन्हे मावळली आहेत
माझी फुले कोमेजली आहेत

कालचा प्रकाश कालचा सुवास
मात्रा वेलांटीत शोधीत आहे

शंभर वर्षांनंतर कोण माझी
कविता वाचीत आहे?

आजची फुले आजच्या उन्हात
पाखरांचा शब्द पिकला रानात

माझी कविता तिथे वाचा
जिथे ती दिनरात घडत आहे

स्तनांचा कर्करोग : धोका कुणाला व किती ?

जागतिक पातळीवर पाहता स्तनांचा कर्करोग हा स्त्रियांच्या कर्करोगांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे. हा आजार शहरी भागात आणि सामाजिक व आर्थिकदृष्ट्या उच्च गटातील स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो. याचे प्रमाण कॉकेशिय गौरवर्णीयांमध्ये सर्वाधिक आहे. गेल्या काही वर्षांत भारतातील जेमतेम चाळीशीत असणाऱ्या स्त्रियांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढते आहे. या कर्करोगाच्या उपप्रकारांपैकी सुमारे 80 % रोग शरीरभर पसरणारे व आक्रमक स्वरूपाचे असतात.