राजधानी Express
-------------------------------------------
कशी धावते..राजधानी पाहा ..
हॉर्न वाजवत..वेगात...सुसाट
वार्यालाही मागे टाकणारा.
वेग तिचा तो अफाट..
वेगाशी स्पर्धा करता तिच्या..
थकुनि जाती पळती झाडे..
HiTech तिचे इंजिन अवजड..
धुरांच्या रेषाही न हवेत सोडे..
स्टार-पॅंट्रीचा एक खास डबा..
स्टिम राइस..पिझ्झा बर्गर..नाही गावठी भात-वरण..
सुगरण तिथले शेफ..खरोखर..
सॅलाड मिळे..बास झाले आता शिकरण..!
राजधानीतुन जातो आता
पैसे फेकुन..ऐटित रुबाबात मी ..
साहेबासारखा प्रवास करतो..
एकांतात शिंकताना ही म्हणतो..प्लीज एक्स्क्युज मी..
कोट बिल्ला पाहुन उरात भरे धडकी..
T.C इथले बघा कसे तालेवार वाटती...
ते समोर येताच आपसुक ..
मला सुचते..इंग्रजी..विसरुनि मराठी...
जाते..जाते..राजधानी पाहा..
सुसाट..वेगात...भोंगा वाजवत..
मामाच्या गावालाच मात्र
आता राजधानी नाही थांबत...
.
.
.
.
.
.
.
मामाचा गाव मोठा.. आता झालाय फार छोटा...
मी बाळगतो खिशामध्ये आता पौंड-डॉलरच्या नोटा..
रात्री मामाचा गाव येताना धडधडणारी राजधानी झुकझुक करत जाते..
एरव्ही भोंगा मारणारी ती..आर्त शिटी मारुन..मला बहुदा खुणावते..
मी गाढ झोपेमध्येच मस्त...मामाचा गाव तसाच येऊन जातो निघुन..
पहाटे राजधानीने ढाळलेले अश्रु ही तसेच खिडकीवरुन जातात ओघळुन....राजधानी expresses..
मी उठतो सकाळी...संपतो प्रवास..थांबते राजधानी...
मी उतरतो..धुंदीत..
चिरडली जाते पायाखाली..
मामाच्या गावातुन उडत उडत कशीबशी माझ्यापर्यंत आलेली..कापसाची म्हातारी..
बहुदा तिच..जिच्यामागे धावलो होतो मी मामाच्या गावात...माझ्या बालपणी
----------कानडाऊ योगेशु.