स्वतःचे खरे रूप .

स्वतःचे स्वरूप ,पाहू दे मज डोळा
नाही मी भोळा , कळेल मज .

जाऊ दे मला , माझीया आत्म्याकडे
अन्य कुणीकडे , कळेल निजरूप???

पहीला मी खादाड , नंतरचा आसक्त
त्यानंतर अजून काही (?), भ्रम हा गेला !

आसक्ती हे मूळ , त्यावरी अनंत बांडगूळ
वेगवेगळे खूळ , पोशिले मी आवडीने .

ऐश्या निरंतराची , आहे मज गाठी
याशिवाय पाठी , नाही काही !

आत्मा म्हणे आता , पाहूनी मूळ रुप
होऊ नको तद्रूप , पुन्हा एकदा .

मूळ रुप खरे , जन्मांतरीचे बरे
. साफ करुनी त्याला , घडव पुन्हा .

आहे ऐसी क्रिया , धुवेल मूळ रूप
हाती देईल खूप , पुन्हा मातीचा गोळा .

'मलईदार खाते (!?)' वाटप

https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-cabine…

दादांना अर्थखाते
जर फायली दिल्या
तर जसे चोराहाती
तिजोरी किल्या !

घरी तो आला
मित्र हाडवैरी
सावरण्या जुनी
आपली हेराफेरी

पांढरा कपड्यात जा व लूट
पोलीस मारती कडक सॅल्यूट
पाहीला नाही जनमत दट्ट्या
लोकशाही म्हणजे नाही थट्टा!!

हिमालयाच्या कुशीत - चोप्ता- चन्द्रशिला ट्रेक

"अबे चल ना बे, काही नाही होत... मस्त मजा करू" बस एवढ्याच खात्रीलायक आणि दमदार वाक्यानी राहुल नी मला पटवलं. तसं तर निखिल ने सुद्धा आधी विचारलं होतं की आपण ट्रेक ला जायचं का, पण पुण्यात राहून ट्रेक म्हणजे सह्याद्री आणि त्यातही सिंहगड ! पण या वेळी काहीतरी वेगळं शिजत होतं, ट्रेकिंग ला जायचं, ते पण हिमालयात ! तसं आमच्या पैकी ट्रेक करणे ही काही आवड किंवा छंद नाही कोणाचाच, पण "कुछ तुफानी करते है, और कुछ अलग करते है" याच तत्वावर हिमालय च्या कुशीत कुठेतरी जायचं ठरलं.

आंबोली

सह्याद्रीतील पावसाळा हा सह्याद्रीला जणू काही स्वर्गाचंच रुपडं बहाल करतो. हिरवे गालीचे आणि फेसाळणाऱ्या जलप्रपातांच्या आडून, धुक्याच्या गच्च आच्छादनाखाली लपून सह्याद्री भटक्यांना खुणावू लागला की मग त्याच्या भेटीला निघण्यावाचून दुसरा पर्याय नसतो.

एकटा जीव सदाशिव

अनोळखी शहरात 'एकट्याने' वास्त्यव्य करणं पण कधी कधी सुखाचं असतं. अट एकच खिसा भरलेला हवा. खर्च केलाच पाहिजे असं बंधन नाही पण चिंता नसावी. मग मन मारायची गरज उरत नाही. मन मानेल तसं निश्चिन्तपणे भटकवता येतं. मनाचा व्यायाम हा वेगळा न झेपणारा गहन विषय, आतातरी नको.
तर अनोळखी शहरात 'एकट्याने' आल्यावर life कसं शांत होतं. सुपरफ़ास्ट चालणारी गाडी एकदम पॅसेंजर होते. सुट्टीचा दिवस तर रेंगाळत रेंगाळत निघून जातो. धावपळीत अडकलेल्या जीवाला उसंत मिळते.
वेळ कसा Invest करावा याचा Sense असलेल्या एखाद्याला तर पर्वणीच वाटावी. काय छंद जोपासायचे ते जोपासा. कोणाचाच अडथळा नाही.

कलंक

कलंक

स्वत: धरला
घरचा पलंग
म्हणे नागपूरचा
तुम्ही कलंक

धोका दिल्याने
तुम्ही,त्यांनी
केला हा चंग
फिरवले मोहरे
झालात दंग

पार्टी फोडून
केले हो नंग
वाचवेल कोण
तो तैमूरलंग?

थांबवा आता
बोलणे सवंग
भेटा मग त्या
ममतास वंग

वाटला फटाका
निघाला लवंग
कसा तू सोडला
भगवा संग
नि झाला भणंग

।। 'हिंग' पुराण - अध्याय पहिला ।।

मिसेस पोद्दार ने पेश कि बेसनगट्टे कि सब्जी
मिसेस मोंगा ने बनाई दाल मखनी
मिसेस चॅटर्जी कि बैंगन भाजी
मिसेस नायर का सांबार
मिसेस गुप्ता का राजमा
और मिसेस विरानी का उंधियू

वाह! सबको मिलते है दस में से दस...
अब चिट निकालके हि होगा मिसेस शेफ का फैसला...

इन दस नंबरीयोंने ऐसा क्या डाला कि स्वाद हुवा निराला?

आपली तुपली स्वप्नं..

स्वप्नं सगळ्यांनाच पडतात. भली,बुरी. मलाही पडतात. पण कशी? कर्मदशा! मला नेहमी स्वप्नं पडतात ती बस,ट्रेन चुकल्याची,गणित, इंग्रजी ते नापास झाल्याची (हो.