पुस्तक खरेदी - काल आणि आज

हा लेख अर्धवट लिहून मे मधेच ठेवला होता परंतु आत्ता पूर्ण केला त्यामुळे कदाचित असंबद्ध वाटू शकतो
हा माझा पहिलाच लेख असल्या मुळे लिखाणात व व्याकरणाच्या चुका होऊ शकतात त्यामुळे क्षमस्व

पुस्तक खरेदी - काल आणि आज

काल लेकाच्या शाळेत ( इयत्ता २ री ) पालक सभे साठी बोलावले होते, मी फिरस्ती वर असल्या मुळे सहसा हे खाते आमच्या कडे आमचे गृह खात च सांभाळते , वेळ असल्या मुळे ह्या वेळी मी गेलो .
शाळेत गेलो तर इतर काही सूचना व मार्गदर्शना नंतर मूळ मुद्दा आला कि पुस्तक विक्रेता शाळेत हजर असून पुस्तके २ दिवसात घेऊन टाका, त्या नंतर पुस्तक विक्रेत्या कडे जाऊन आणावी लागतील.
मग काय सूचना मिळताच पुस्तकाच्या दुकान समोर ( शाळेतच १ खोलीत त्याने दुकान मांडले होते ) पालकांची रांग लागली. FOMO च्या भीती ने व असा पण आज ना उद्या घ्यावीच लागतील असं म्हणून मी पण रांगेत लागलो, ५ मिनिट मध्ये माझा नंबर आला त्याला इयत्ता सांगितली , त्याने १ वह्या पुस्तकाचा गठ्ठा पुढ्यात ठेवला व किंमत सांगितली, UPI ने पैसे न दिले व गठ्ठा घेऊन निघालॊ.
घरी येताना माझं मन भूतकाळात गेले व माझी शालेय पुस्तक खरेदी आठवली. कुठल्या हि शाळकरी मुला साठी हि खरेदी एखाद्या सण उत्सवा पेक्षा कमी नसायची .
हा उत्सव बरेच दिवस चालायचा , पण ह्याची सुरवात व्हायची ते शाळा सुरु झाल्या वर २-३ दिवसांनी. शाळेत पहिले १५ दिवस फक्त १ रफ वही नेली तरी चालायचे . आधी मागच्या इयत्ते चे पुस्तके विकावी लागायची ( अर्थात लहान भावंडं त्या इयत्ते मध्ये नसतील तर ) . वर्ष भर जपून वापरलेली पुस्तके त्याच कव्हर काढताना वाईट वाटायचे पण कव्हर काढल्या वर ते नवीन दिसणार पुस्तक बघून अभिमान वाटायचा , अश्या पुस्तकांची किंमत पण थोडी जास्त भेटत असे.
आधी शेजारी -पाजारी किंवा परिसरातील कोणाला हि पुस्तक विकत हवी का ह्याची चौकशी व्हायची व गिर्हाईक भेटला तर थोड्या चांगल्या भावात जागेवर च पुस्तके विकली जात. नाही तर पुस्तके घेऊन जुना बाजार ची वारी करावी लागायची
शाळा उघडण्या च्या काळात ( सत्र सुरु होण्याला असेच म्हणत ) जुन्या बाजारात जत्रा च भरायची व खूप चिव चिवट असे , त्यामुळे च ह्या बाजाराला चिव चिव बाजार म्हणत.

CHIW CHIW BAJAR

चिव चिव बाजारात दुकानदार आधी पुस्तके उलटू पालटून चालायचा, कुठे पेन पेन्सिल चे मार्किंग असेल ते ३०% -४० % पैसे सांगायचं . चांगले दिसणारे स्वछ पुस्तके ५०% किमतीत घ्यायचा व विकताना ६० तो ७० % ने विकायचा. माझी पुस्तके दर वर्षी ५०% ने विकली जायची.
एकदा जुनी पुस्तके विकली की वेध लागायचे नवीन पुस्तकांचे , परंतु ते लगेच मिळत नसत . आता सारखी क्रेडिट कार्ड नसल्या मुळे हि खरेदी आप आपल्या वडलांच्या पगारा च्या तारखे नुसार होत असे. त्या मुळे शिक्षक पण ह्या बाबत जास्त कठोर होत नसत .
वाट पाहून पाहून एकदाचा तो पगाराचा दिवस उजाडे व आमची स्वारी सुभाष स्टोअर्स कडे वळे . वर्षभर सुस्त असलेले हे दुकान पण जून जुलै मध्ये कात टाकून (खरं तर बाहेर १ पलंग टाकून ) विद्यार्थ्यांची वाट पाहत असे.
शाळे कडून पुस्तकांची लिस्ट , वह्या चे १०० प्रकार असे काही नसे , दुकानात जाऊन फक्त इयत्ता सांगितली कि तो सगळे पुस्तक काढून समोर ठेवी , त्यात हि जर पैश्या ची काही अडचण असेल तर आवश्यक तेच पुस्तक घेतली जात व बाकी नंतर आनली जात. वह्या तर जेव्हा लागेल व जश्या लागेल तश्या १-१ आणल्या जात ( तोवर रफ वही जिंदाबाद ) , बर हि रफ वही म्हणजे पण वही नसे , तर मागच्या वर्षी च्या वह्यांचे उरलेले कोरे पान फाडून त्यांना शिवून १ वही तय्यार केली असे.
पुस्तके घरी आली कि महत्वाचे काम म्हणजे त्यांना कव्हर लावणे . खाकी कव्हर विकत घेणे परवडत नसे त्यामुळे घरच्या रद्दी पेपर ची नेमणूक ह्या कमी होत असे , त्यात पण रंगीत पुरवणी चे पान भाव खाऊन जाई . प्रत्येक कव्हर वेगळे असल्या मुळे नाव टाकायची पण गरज राहत नसे .

कव्हर लावण्या सोबत च ह्या वार्षिक उत्सवाची सांगता होत असे .
हे सगळं आठवत आठवत घर आल आणि मी ह्या नॉस्टॅल्जिया ( मराठी पर्यायी शब्द माहित नाही ) मधून बाहेर आलो .
आमच्या काळात शालेय पुस्तक खरेदी ही टेस्ट क्रिकेट सारखी धेर्याची परीक्षा घेणारी होती तर आता T-२० सारखी झटपट आहे , पण ह्या T-२० ला टेस्ट म्याच ची मजा नाही गड्या ...