चांद्रयान ३

चांद माझा हांसरा, उधाण येई सागरा
चंद्र उगवला नभी, लाजली वसुंधरा
स्मरणातील रुप तुझे जे कवीने रेखले
चांदभरल्या रातीतले स्वप्न आज भंगले

चंद्रमुखी तू मेघसावळी कसे म्हणू मी....
क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणाचा
कसे म्हणू मी.....

आता कसे म्हणू मी चंद्र उगवले दोन
एक चंद्र अंबरी,एक मंचकावरी
कसे म्हणू मी.....
......
......
होईल वर्षाव लाटण्यांचा.

जेव्हां तुझ्या नजीक चांद्रयान तीन पोहचले
अन् नव रुप तुझे यान चक्षुंनी पाहिले
यान चक्षुंनी जे दाविले,ते मी ही पाहिले....

हिंग पुराण-अल्प पुरवणी

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ' (Council ofScientific and Industrial Research - CSIR) ह्या केंद्र सरकारच्या संशोधन संस्थेशी संलग्न असलेल्या हिमाचल प्रदेशातील 'इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन बायोरिसोर्स टेक्नॉलॉजी, पालमपूर' (Institute of Himalayan Bioresource Technology, Palampur - IHBT) ह्या संस्थेने २०१८ च्या ऑक्टोबर ते डिसेंबर ह्या काळात इराण मधून दोन टप्प्यांत 'फेरुला असाफोटीडा' ह्या वनस्पतीच्या सहा वाणांचे बियाणे आयात करून 'नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस, नवी दिल्ली' (National Bureau of Plant Genetic Resources, New Delhi -NBPGR) ह्या संस्थेच्या देखरेखीखाली भारतात प्रथम

पाहिले म्यां डोळा..

मृत्यू! एक भयभीत करणारा शब्द! पण जन्मलेल्या प्रत्येकाला तो अटळ आहे. मृत्यूचा विषय निघाला की बरेच जण रादर सगळेच गंभीर होतात. नको तो अभद्र विषय अशीच बहुतेकांची प्रतिक्रिया असते. काहीजण मात्र थोड्या वेगळ्या प्रतिक्रिया देतात, अर्थात् त्यातली अटळता स्वीकारुन. "येईल तेव्हा बघू. आत्तापासूनच कशाला काळजी?" "मरणाच्या भीतीने काय काही मजा करायचीच नाही?" "भीतीपोटी काय घाबरत घाबरत जन्म काढायचा की काय?" "येऊ दे. यायचा तेव्हा येईल. तेव्हाचं तेव्हा बघता येईल. " "प्रत्येकाला जायचंच आहे. कुणीही अमरपट्टा घेऊन जन्माला आलेलं नाही. "

वार्तालाप: दुर्जनांचा ही सन्मान करा.


दुर्जन प्राणी समजावे.
परी ते प्रगट न करावे.
सज्जना परीस आळवावे.
महत्त्व देऊनी.

समर्थ म्हणतात राजकारण करताना, दुर्जन लोक असतील ते ओळखून ठेवावे पण त्यांचा दुर्जनपणा प्रगट करू नये. इतकेच नव्हे, तर त्यांना सज्जनापेक्षाही अधिक मोठेपण देऊन प्रसन्न ठेवावे. राजकारणात दुर्जन लोक तुम्हाला त्रास देऊ शकता तर त्यांना महत्त्व देऊन संतुष्ट करावे. त्यांच्या उपयोग करून त्यांना आपल्या शत्रू वर सोडावे. योग्य वेळी त्यांना नष्ट ही करून टाकावे. नीती कथाही म्हणतात दुर्जन आणि नीच शत्रूला थोडे बहुत देऊन संतुष्ट केले पाहिजे आणि तुल्यबळ शत्रूशी युद्ध केले पाहिजे.

अमेरिका ३ - पर्याय सापळा..

एक दिवस इथल्या मॉलमध्ये खरेदीला गेलो होतो...एकतर अवाढव्य मॉल असतात. खरेदीच्या आनंदापेक्षा 'हरवू आपण' ही भीतीच वाटते. 'ग्रोसरी स्टोअर्स' मध्ये केवळ खाण्यापिण्याच्या गोष्टी असल्याने ते थोडं आपल्या सरावाचं वाटतं. भारतात पण डी मार्ट सारख्या ठिकाणी भाज्या, फळं, दूध इत्यादी विभाग आपण पाहिलेला असतो. त्यामुळे थोडसं 'घरेलू' फिलिंग येत. अशीच काहीशी खरेदी करायला आम्ही गेलो. डॉलर्स गुणिले ८० हा मनातील कॅल्क्युलेटर 'सायलेंट मोड'ला टाकला कारण खरंच इथे 'लेकीच्या बापाचं' काही जाणार नव्हतं ! तरीही इथे वस्तू सापळ्याचे दर्शन घडलेच. इथे सॅन्टा क्लॅराजवळ 'आपना बजार' नावाचा एक बजार आहे.

अमेरिका २- बावळट आम्ही..!!

'खुदके गली मे कुत्ता भी शेर होता है ।' असा कुण्या एका हिंदी सिनेमामध्ये डायलॉग होता. पण आपल्या घरात-कामात-गावात 'शेर' नसलो तरी काहीतरी साध्य केलेल्या आमच्यासारख्या पालकांना 1-2 टक्के ते 100 % इन्फिरीएरीटी कॉम्प्लेक्स इथे आल्यावर येत असणार. याची झलक खरंतर एअरपोर्टला आल्यावरच सगळ्या भारतीय आई-बाबांच्या चेहऱ्यावर दिसायला लागते. भारतातून निघतानाच ठासून भरलेल्या बॅगा, वजनाला जास्त झालं की विमानतळावर होणारे चेक इन बॅगेतून 'वस्तूहरण' आणि केबिन बॅगेमध्ये 'वस्तूभरण' होते. नव्याने घेतलेल्या बुटांमधून अवघडत चालणार्या, मुद्दाम परदेश प्रवासासाठी घेतलेली नवी पर्स सांभाळणाऱ्या आया लगेच ओळखू येतात.

आयुष्य

निर्णय चुकतात, चुकू द्यावे
श्रेय हुकतात, हुकू द्यावे
जगता जगता आयुष्याकडून
जुगारातले दान घ्यावे.

बंध सुटतात,सुटू द्यावे
माणसं तुटतात, तुटू द्यावे
जगता जगता नात्याकडून
आपुलकीचे फुल घ्यावे.

मार्ग चुकतात, चुकू द्यावे
रस्ते सरतात, सरु द्यावे
चालता चालता रस्त्याकडून
सावलीचे दान घ्यावे.

प्रश्न पडतात, पडू द्यावे
उत्तरं चुकतात,चुकू द्यावे
सोडवता सोडवता उत्तराकडून
ज्ञानाचे कण घ्यावे.

ध्येय हुकतात, हुकू द्यावे
अनुभव मुकतात, मुकू द्यावे
जगता जगता अनुभवाकडून
स्वत्वाचे भान घ्यावे.