ताज्या घडामोडी एप्रिल २०२५ (भाग २)
आधीच्या भागात ३०० पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे.
भारताचे राष्ट्रपतीपद दोनदा थोडक्यात हुकलेले अभिजीत बिचुकले यांनी आपली केशभूषा बदलली आहे. नव्या केशभूषेत ते असे दिसत आहेत-
![]()
https://marathi.indiatimes.com/lifestyle-news/yuva-katta/abhijeet-bichu…
आरक्षण नेहमीच दुधारी तलवारीचे काम करते. अयोग्य राजा निवडणे, नंद राजा... हा इतिहास.+ १ याचे उत्तम उदाहरण म्हणजे दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट संघासाठी लादलेले वर्णाधारीत निवड धोरण. या धोरणानुसार एका हंगामात संघातील ११ खेळाडूंपैकी सरासरी ६ खेळाडू असलेच पाहिजे व त्यात किमान २ कृष्णवर्णीय असायला हवे. त्यामुळे आफ्रिकेच्या संघात आता अनेक कृष्णवर्णीय, भारतीय, मुस्लिम खेळाडू दिसतात. जास्तीत जास्त ५ श्वेतवर्णी खेळाडू संघात असू शकतात. यामुळे अनेक आफ्रिकन श्वेतवर्णी खेळाडू आता इतर देशांकडून खेळण्याचा प्रयत्न करतात. आफ्रिका संघ मागील ८-१० वर्षात पूर्ण ढेपाळलाय त्यामागे हे महत्त्वाचे कारण असणार.एका हंगामात संघातील ११ खेळाडूंपैकी सरासरी ६ खेळाडू असलेच पाहिजे.हे वाक्य असे हवे. एका हंगामात संघातील ११ खेळाडूंपैकी सरासरी ६ खेळाडू अश्वेत असलेच पाहिजे.