Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • चालू घडामोडी: मार्च २०२६ / चैत्र १९४८
  • राजस्थानची रोजनिशी : ४ : पत्रिका गेट, अल्बर्ट हॉल, इसरलाट
  • एका रेषेत सहा ग्रह?
  • किंमत प्रणाली - भाग १
  • उद्याच्या मभागौदि (#) ची कविता
  • "गाॅसिपिंग" याने की "कुचाळक्या"..
  • राजस्थानची रोजनिशी : ३ : आमेर, नाहरगड
  • साधी सुकी भेळ
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ६: मुन्सियारीतला ट्रेक आणि थरारक जीप प्रवास
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
काथ्याकूट

ताज्या घडामोडी एप्रिल २०२५ (भाग २)

च
चंद्रसूर्यकुमार
Tue, 04/15/2025 - 13:12
🗣 426 प्रतिसाद

आधीच्या भागात ३०० पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे.

भारताचे राष्ट्रपतीपद दोनदा थोडक्यात हुकलेले अभिजीत बिचुकले यांनी आपली केशभूषा बदलली आहे. नव्या केशभूषेत ते असे दिसत आहेत-
Bichukale

https://marathi.indiatimes.com/lifestyle-news/yuva-katta/abhijeet-bichu…


  • Log in or register to post comments
  • 47490 views


वाचनखूण लावा
| 47490 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

🗣 चर्चा (426)
अ
अमरेंद्र बाहुबली Mon, 04/21/2025 - 18:02 नवीन
वर काय लिहिलय ते तरी पूर्ण वाचा! इतकी काय घाई लगेच टंकायची, बाकी दोन चार अंधभक्तानी पळ काढला, “म्हणजे सिरियस घेत नाहीत ब्वा” असे डायलॉग तुमच्या कडेच ठेवा.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Sun, 04/20/2025 - 18:16 नवीन
इंग्लंडच्या सर्वोच्च न्यायालयाने परवा एक निकाल दिला- जी व्यक्ती स्त्री म्हणून जन्माला येते तिलाच स्त्री असे स्वतःला म्हणवून घेता येईल- अर्थात पुरूषांची स्त्री झालेल्या ट्रान्सजेंडरांना आपण स्त्री असल्याचा दावा करता येणार नाही. त्याविरोधात लंडनमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली आहेत. https://timesofindia.indiatimes.com/world/uk/trans-rights-now-londons-parliament-square-sees-huge-protests-over-uk-supreme-court-ruling/photostory/120455767.cms?picid=120455833 मला वाटते सगळीकडे पुढील नियम अंमलात आणावेत- १. प्रत्येकाला आपण किती टक्के स्त्री आणि किती टक्के पुरूष आहोत हे ठरवायचे स्वातंत्र्य द्यावे- म्हणजे ७८%-२२% अशाप्रकारचे. २. या टक्केवारीत कधीही बदल करायची परवानगी देण्यात यावी. म्हणजे जिथेजिथे स्त्री म्हणवून घेणे फायदेशीर असेल तिथे तिथे प्रत्येकाला स्त्री म्हणवून घ्यायचा अधिकार असला पाहिजे. ३. सरकारने यासाठी एक मोबाईल अ‍ॅप विकसित करावे. त्यावर एक स्क्रोल बार असावा आणि तो पाहिजे तिकडे आणि पाहिजे तसा हलवून ही टक्केवारी बदलायचे स्वातंत्र्य प्रत्येकाला असावे. ४. कोणीही आपण अमुक इतके टक्के स्त्री आणि अमुक इतके टक्के पुरूष आहोत असा दावा केला तर त्याला कोणताही प्रश्न विचारायची परवानगी कोणालाही नसायला हवी. एखाद्याने १२%-८८% असे आकडे दिले तर कशावरून १२%-८८%? मला तर तू साडे-अकरा टक्के आणि साडे सत्यांशी टक्के वाटत आहेस असे म्हटले तर ती व्यक्तीस्वातंत्र्याची सगळ्यात मोठी पायमल्ली धरली जाऊन अशी पायमल्ली करणार्‍याला ताबडतोब फासावर लटकविण्यात यावे. बाकी आता गोर्‍यांमधील डापु गँगचे लोक 'every man has a right to call himself a woman and every woman has a right to call herself a man' असल्या फुकाच्या गोष्टींवरून उड्या मारत आहेत त्यांनी फार तर २५-३० वर्षे थांबावे. एकदा इंग्लंडमध्ये शरीयाचे राज्य आले की मग कोणाला किती आणि कोणते अधिकार आहेत ते त्यांना लगेच समजून येईल. असो.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Tue, 04/22/2025 - 16:13 नवीन
काश्मीर राज्यातील पहलगाम येथे (बहुदा इस्लामिस्ट) दहशतवाद्यांनी, पर्यटकांची ओळखपत्रे पाहून व इतर प्रकारे ओळख पटवून फक्त गैर-मुस्लिम पर्यटकांना ठार मारले आहे. पंतप्रधान गृहमंत्री मुख्यमंत्री इतर राजकीय पुढार्‍यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.‌ संदर्भ: https://www.opindia.com/2025/04/pants-pulled-down-id-cards-checked-hindu-tourists-targeted-in-pahalgam-pakistan-coas-asim-munirs-anti-hindu-rant/
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Tue, 04/22/2025 - 16:16 नवीन
भारतीय प्रजासत्ताक नामक जमिनीच्या तुकड्याची वेगाने काफिरमुक्त होण्याकडे वाटचाल सुरू आहे. --- खोटं वाटतंय? अहो या हल्ल्यातच पाच-सात काफिर संपले की!
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 04/23/2025 - 07:00 नवीन
घडवून मुस्लिमविरोधी वातावरण निवडणूक जिंकायचा गावठी चाणक्याची सुपिक आयडिया? पुलवामाही
संपादक महोदय, असले प्रतिसाद वारंवार देऊनही हा आय.डी मिपावर अजून का ठेवला का जात आहे? सदर सदस्याचे म्हणणे दिसत आहे की हा हल्ला सरकारने घडवून आणला आहे. असले काही या संकेतस्थळावर राहून देऊन आपण स्वतःही कदाचित अडचणीत येऊ शकाल याचे भान तुम्हाला असावे इतकीच माफक अपेक्षा.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 04/23/2025 - 07:13 नवीन
माफ करा चानसुकू साहेब, पण असे हल्ले देशात घडतातच कसे? नी ह्याबाबतीत सरकारवर टीका केली तर आयडी उडवा अशी मागणी करणे मला योग्य वाटत नाही? म्हणजे तुमचे म्हणणे आहे की सरकार हल्ले रोखायला अयशस्वी ठरले तर सरकारवर टीकाही करू नये का? तुमचे भाजपप्रेम समजू शकतो पण पर्यटकांचा जीव गेला त्याचे काय? की मरुद्या पर्यटक पण भाजप सरकारला जाब विचारू नाक किंवा टीका करू नका असे तुमचे म्हणणे आहे? दरवर्षी काश्मीरवर ३५-४० हजार करोड खर्च होतात, आजच्या वर्तमानपत्रात बातमी आहे की पंचस्तरीय सुरक्षा व्यवस्था भेदून अतिरेकी २००km आत आले! हे शक्य वाटत नाही, पुलवामाचे सत्य अजून बाहेर आले नाही.
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास Wed, 04/23/2025 - 07:24 नवीन
अ बा या भीषण हल्ल्यानंतर ही मोदी द्वेषाची गरळ ओकणं तुला जास्त महत्वाचे वाटते .. तुझ्यासारखी ****** मिपावर नकोच
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 04/23/2025 - 07:29 नवीन
अमर विश्वास! ह्या भीषण हल्ल्यानंतर मोदीप्रेमची उबळ सुटणे तुला जास्त महत्वाचे वाटते? अमर विश्वास! ह्या भीषण हल्ल्यानंतर मोदीप्रेमची उबळ सुटणे तुला जास्त महत्वाचे वाटते? हल्ला कसा झाला? ह्याबद्दल खुर्च्या उबवणाऱ्या सरकारला जाबही विचारू नये? अंधभक्तांचा कसा तिळपापड होतोय बघा!
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 04/23/2025 - 07:30 नवीन
अवी तुझ्यासारखी ****** मिपावर नकोच
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास Wed, 04/23/2025 - 07:40 नवीन
जाब विचार ना ... पण हे सरकारने घडवून आणले असा सूर का ? आणि मी कधी मोदींची बाजू घेतली ? या हल्यानंतर मोदींचा बचाव करणारी एकतरी कमेंट दाखव ... उगाच स्वतःचा द्वेष लपविण्यासाठी इतरांना दोष देऊ नकोस ..
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 04/23/2025 - 07:43 नवीन
पण हे सरकारने घडवून आणले असा सूर का ?>>>> असा सूर कुठे आहे? प्रश्न विचारूच नये का? असे प्रश्न प्रत्येक हल्ल्यानंतर विचारले जातात, सरकारवर टीका करणे प्रश्न विचारणे चूक कसे? लोकशाही आहे की हुकूमशाही? सरकार अपयशी ठरले तर आम्ही काही लिहू किंवा बोलूही नये? का तर तुमचे भाजप सरकार आहे म्हणून?
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास Wed, 04/23/2025 - 08:34 नवीन
का तर तुमचे भाजप सरकार आहे म्हणून? >>>>>> तर हे भारताचे सरकार नाही ... तर आमच्या भाजपाचे सरकार आहे .. Get well soon
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 04/23/2025 - 08:51 नवीन
माग भारत सरकारवर टीका केल्यावर तुम्हाला इतकी मिरची का लागली?
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 04/23/2025 - 07:35 नवीन
सरकारवर टीका केली म्हणून? वर काय लिहिले आहे ते जरा वाचायचे कष्ट घ्या- हा हल्ला सरकारनेच घडवून आणला आहे असा तो म्हणण्याचा रोख आहे. सरकारवर टीका म्हणजे काय? हा हल्ला होऊच कसा शकला, कोणतेच इंटेलिजेन्स इनपुट्स नव्हते का, कुठे चूक झाली, त्यावर सरकार काय करणार आहे असे प्रश्न विचारणे. असे प्रश्न विचारायला कोणाचीच ना नाही. मला पण ते सगळे प्रश्न पडले होते. मात्र तुम्ही वर जे काही लिहिले आहे ती सरकारवर टीका नाही तर सरकारनेच तो हल्ला मुद्दामून घडवून आणला असे सूचित करणे झाले. तो आरोप झाला. टीका आणि आरोप या दोन्ही गोष्टी सारख्याच का?
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 04/23/2025 - 07:39 नवीन
चानसुकू साहेब मी प्रश्नचिन्ह दिले आहेत. असेही होऊ शकते का? किंवा कसे? मी कुठेही हा हल्ला सरकारनेच घडवला असे ठामपणे म्हटलेले नाही. तसेच आता सरकारला प्रश्न विचारणेही तुम्हाला चालत नसेल तर मग तुमचा आदर ठेवून मी इथे काहीही लिहीत नाही. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Wed, 04/23/2025 - 12:54 नवीन
सरकारवर टीका म्हणजे काय? हा हल्ला होऊच कसा शकला, कोणतेच इंटेलिजेन्स इनपुट्स नव्हते का, कुठे चूक झाली, त्यावर सरकार काय करणार आहे असे प्रश्न विचारणे. असे प्रश्न विचारायला कोणाचीच ना नाही. मला पण ते सगळे प्रश्न पडले होते. मात्र तुम्ही वर जे काही लिहिले आहे ती सरकारवर टीका नाही तर सरकारनेच तो हल्ला मुद्दामून घडवून आणला असे सूचित करणे झाले. तो आरोप झाला. टीका आणि आरोप या दोन्ही गोष्टी सारख्याच का?
दुर्दैवाने सहमत. सरकारच्या अकार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करणे, सरकार हा हल्ला रोखण्यात अपयशी ठरले आहे हे म्हणणे अगदी योग्य आहे आणि त्याला कुणाची ना असणार नाही. पण हा हल्ला या सरकारनेच घडवून आणला आहे, आधीचाही असा हल्ला या सरकारनेच घडवून आणला होता असे म्हणणे हे मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याच्याही पलीकडचे आहे. दुर्दैवाने, तणकट वेळीच उपटून न टाकल्याने ही जमात मिपावरही फोफावत आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/23/2025 - 07:17 नवीन
१४ फेब्रुवारी २०१९ या दिवशी जैशेमहम्मद संघटनेने दहशतवादी हल्ला करून ४० सैनिक मारल्यानंतर, हौ इज द जैश (हौ इज द जोश या वाक्याची टिंगल) असे ट्विट कुत्सित हसणारा चेहराचित्र टाकून मुग्धा कर्णिक व अनेक मोदीद्वेषींनी केले होते. या दहशतवादी हल्ल्यामुळे मोदींना शिव्या द्यायची संधी मिळाली याचा अपार आनंद त्यांना झाला होता. नंतर प्रचंड टीका झाल्याने घाबरगुंडी उडून ट्विट डिलीट करून धूम ठोकली होती. त्या सर्वांना कालच्या दहशतवादी हल्ल्यामुळे आनंदाच्या उकळ्या फुटत असतील. हा सदस्य त्याच नालायक जातकुळीतला आहे. गलिच्छ लेखनामुळे अनेकदा हकालपट्टी होऊनही याला परत परत आणले जाते.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Wed, 04/23/2025 - 07:17 नवीन
मुंबई हल्ल्या नंतरही अशाच प्रवृत्ती बाहेर आल्या होत्या. मुंबई हल्ला हा हिंदूंनीच केला होता असं पाकडे म्हणतं होते तर भारतातील काही लोक त्याला दुजोराही देत होते. नशीब कसाब जिवंत पकडला गेलेला.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 04/23/2025 - 07:23 नवीन
मुंबई हल्ला संघाने केला अश्या टाइपचे पुस्तक प्रकाशित करणारा कृपाशंकर आज भाजपात आहे.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Wed, 04/23/2025 - 07:29 नवीन
तो भाजपात आहे म्हणून त्याच्या चुका माफ होतात का?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/23/2025 - 13:05 नवीन
संपादक महोदय, असले प्रतिसाद वारंवार देऊनही हा आय.डी मिपावर अजून का ठेवला का जात आहे? हा विकृत प्रतिसाद आता दिसत नाही. पुन्हा वेगळ्या शब्दात येईलच. विकृती मरत नसते.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 04/23/2025 - 08:24 नवीन
३५-४० हजार करोड वार्षीक खर्च काश्मीर सुरक्षेवर होतो तरीही अतिरेकी येतातच कसे? भुजबळ बुवा एकदा काश्मीर मध्ये जाऊन पहा. तेथे लष्कर कसे गोट्या खेळतंय किंवा दारूच्या पार्ट्या करतंय ते. त्यांना काय पडलं आहे? काही पर्यटक मेले तर मेले. नाही तरी गुप्तचर खातं, लष्कर, काश्मीरचे राज्य सरकार केंद्र सरकार यांच्याच्यानं काही होण्यातलं नाही आता तुम्ही स्वतः च जाऊन काही केलं तर शक्य आहे. आमची कळकळीची विनंती आहे तुम्हीच आता हे मनावर घ्या आणि थेट पहलगामला जाऊन त्या अतिरेक्यांची लंबे करून या!
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 04/23/2025 - 08:28 नवीन
डॉक साहेब, लष्कराला कुणी दोष दिलाच नाहिये, लष्कर आहे म्हणून काश्मीर आज माझ्या भारतात आहे नाहीतर नालायक राजकारण्यांनी काश्मीरही पाकिस्तानला दिले असते.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 04/23/2025 - 08:39 नवीन
असं कसं ? साडे तीन लाख लष्करी आणि निमलष्करी सैनिक काश्मीर मध्ये तैनात असताना दहशतवादी येतातच कसे? सगळे युसलेस आहेत बघा आता तुम्हीच प्रकरण हाती घ्या आणि काही तरी करा हि कळकळीची वनंती
  • Log in or register to post comments
स
सुक्या Wed, 04/23/2025 - 20:30 नवीन
डबल ढोलकी प्रकार आहे हा. मुळात असली ब्याद काही झाले तरी माझेच म्हणणे खरे, बघा मी सांगितलेच होते असल्या बाता करत असतात. हेच लोक जेव्हा जास्त मिलीटरी असते तेव्हा "कश्मिर ला तुरुंग बनवले आहे. सगळ्यावर संशयाने पाहिले जात आहे. मिलिटरी राहीली तर लोकशाही कशी रुजणार" वगेरे वगेरे बोंबलत असतात. आता मिलिटरी कमी केली तर "हे झालेच कसे? ईतकी सुरक्षा होती तर हे भारतीय ईंटेलिजन्स चे अपयश आहे." वगेरे वगेरे बोंबलताहेत. भारतीय मिलिटरी आपले काम चोख करत आहे. वेळ आली की बरोबर फैसला करते. त्यावर काहीही शंका नाही. अबा मागेच कुठल्यातरी धाग्यावर पादत्राणे / फोन ठेवायला मोठा राऊंड मारावा लागला तेव्हा सुरक्षेच्या नावाखाली कुरकुर करत होते. कश्मिरात सैनिक कुठे कुठे व कशा कशा परीस्थीतीत राऊंड मारते हे त्यांना ठाऊकही नसेल. तस्मात. फाट्यावर मारा.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Wed, 04/23/2025 - 09:16 नवीन
कुठल्या राज्यात निवडणुका येताहेत सध्या? अतिरेकी येउन गोळ्या मारून निघून जातात, ३५-४० हजार करोड वार्षीक खर्च काश्मीर सुरक्षेवर होतो तरीही अतिरेकी येतातच कसे? की अतिरेकी हल्ला घडवून मुस्लिमविरोधी वातावरण निवडणूक जिंकायचा गावठी चाणक्याची सुपिक आयडिया? पुलवामाही निवडणूक तोंडावरच घडला (की घडवला? ) गेला होता.
संपादक मंडळ, शत्रूला मदत करणारी असली विधाने करणारी प्रवृत्ती मिपावर असणे हे योग्य नाही. तात्काळ कायमची कारवाई करावी ही विनंती. --- कुण्या हिंदू राजाने घौरी कि कुणा एका दरोडेखोराला अनेक वेळा माफी क्षमा केली होती, घौरीने मात्र संधी मिळाल्यावर त्या राजाला एकदाही क्षमा केली नाही. सादर आयडीला मिपाने अनेकदा क्षमा केली आहे. यापुढेही करायची आहे का हे ठरवावे. --- हिंदूंचे लष्कर या हल्ल्याचा बदल घेईल यात शंका नाही.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 04/23/2025 - 09:21 नवीन
सरकारवर टीका केली किनलहेच अंधभक्ताना मिरची लागते, संपादक मंडळाला विनंती की मिपा हा असल्या मनुवाद्यांचा अड्डा बनवण्याचा डाव उधळून लावावा व मनुवादी विचारसरणीच्या वामन देशमख ह्या आयडीला कडक समाज द्यावा.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 04/23/2025 - 09:21 नवीन
सरकारवर टीका केली कि लगेच अंधभक्ताना मिरची लागते, संपादक मंडळाला विनंती की मिपा हा असल्या मनुवाद्यांचा अड्डा बनवण्याचा डाव उधळून लावावा व मनुवादी विचारसरणीच्या वामन देशमख ह्या आयडीला कडक समाज द्यावा.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Wed, 04/23/2025 - 12:59 नवीन
आबा, अतिरेक्यांनी उपस्थित पर्यटकांची ओळखपत्रे पाहून, लिंगनिदान करून, व्यवस्थित ओळख पटवून केवळ काफिर लोकांना निवडून, त्यांना कुराणाच्या आयती म्हणायला लावून ठार मारले आहे. दुर्दैवाने तुम्ही तिथे असता तुम्ही तुमची काय ओळख सांगितली असती? मनुवादी? जय बीम जय मीम? ततफफ? फुरोगामी? आणि त्याने तुमची सुटका झाली असती?
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Tue, 04/22/2025 - 16:21 नवीन
फारच वाईट घटना. ह्यानंतर पर्यटक कशाला काश्मिरात जातील. खरं तर काश्मिरात फिरायला गेलंच नाही पाहिजे.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Tue, 04/22/2025 - 16:33 नवीन
धोंडा मारून घेत आहेत. पर्यटक नाही तर उपाशी मरतील. पर्यटकांनी फक्त अमरनाथ यात्रेवर संपुर्ण बहिष्कार टाकला तर यांचे डोके ठिकाणावर येईल. नाही आले तर उपाशी मरतील. २०२२ मधे आठ लाख यात्रेकरू व तिन हजार कोटींची अर्थिक उलाढाल. प्रती यात्री साधारण साठ ते सत्तर हजार रूपये. बाकी खरेदी अलग.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 04/22/2025 - 19:41 नवीन
दहशतवाद्यांनी २७ हिंदूंना ठार मारले आहे. अत्यंत वाईट व संतापजनक हल्ला आहे. भारताने लवकरात लवकर प्रतिहल्ला करून व्याजासहीत सूड घ्यावा, तोयबाच्या मसूद अझर आणि इतरांना ठार मारावे, पाकव्याप्त काश्मीरमधील मोक्याची शिखरे भारतात सामील करावी.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 04/22/2025 - 19:51 नवीन
गुरुजी, सूड घ्यायला आपण १९७५ सालात नाही तर २०२५ सालात आहोत, जास्तीत जास्त आपण कडी निंदास्त्र वापरू शकतो.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/23/2025 - 07:18 नवीन
सुसुने कालच्या हल्ल्याला दहशतवादी हल्ला न म्हणता गोळीबाराची घटना म्हटले आहे. साहजिकच आहे. नवल वाटत नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/23/2025 - 09:39 नवीन
असा दहशतवादी हल्ला झाला की नेहमीच्याच यशस्वी कलाकारांना मनापासून आनंद होतो. मोदींना, भाजपला झोडपायला मस्त संधी मिळाल्याने त्यांचे भान हरपते. अश्या हल्यांमागे एक समान सूत्र दिसते. जानेवारी २००० मध्ये क्लिंटन भारत दौऱ्यावर असताना श्रीनगरमध्ये ३५ शिखांना दहशतवाद्यांनी मारले होते. २०२० मध्ये ट्रंप भारत दौऱ्यावर असताना दिल्लीत सीएए कायदाविरोधात शाहीनबाग येथे दंगल करून त्यात ५५ नागरिक गेले होते. २०२५ अमेरिकेचे उपाध्यक्ष व्हान्स भारत दौऱ्यावर असताना हा दहशतवादी हल्ला केला आहे. प्रत्येक वेळी हल्यानंतर पाकिस्तानप्रेमींना प्रचंड आनंद होतो व लगेच भाजपला आणि पंतप्रधानांना सामूहिक प्रारंभ होतो. मिपावर प्रारंभ झालाच आहे. राऊतच्या डोक्यातली विकृती बाहेर आली आहे. आता टोमणेबाई, पेंग्विन, सुसु तयारीत असतीलच. वागळे, चौधरी, परूळेकर, सरोदे इ. पार्टी करीत असणार. विकृतीचा महापूर येणार. मिपावरील ठराविक सदस्य आता बिळातून बाहेर येऊन भान हरपून नाचणार. सुरूवात झाली आहेच.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/23/2025 - 09:41 नवीन
लगेच भाजपला आणि पंतप्रधानांना झोडपायला सामूहिक प्रारंभ होतो.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 04/23/2025 - 09:45 नवीन
श्रीगुरूजी आम्हाला आनंद झालेला नाही तर संताप आलाय, सरकारला प्रश्न विचारणे ह्यात काहीही चूक नाही. हा हल्ला रोखायला सरकार अपयशी ठरले हे खोटे का? लोकांनी प्रश्नही विचारू नये का? काँग्रेस काळात हल्ले झाले तेव्हाही सरकारवर टीका झाली होती काहिनी राजीनामेही दिले होते. ( आज राऊतनी राजीनामा मागितला तर ती विकृती ठरवली तुम्ही) पण पूर्वी सरकार नी जनतेत अंधभक्त नावाची ढाल नव्हती जी आता दिसू लागलीय. एकाच गोष्ट नम्रपणे सांगेन आपण आदरणीय आहात देशप्रेमी बना अंधभक्त नको.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 04/23/2025 - 09:45 नवीन
दहशतवाद्यांनी भारताची सीमा अवैधरित्या ओलांडली आणि देशात घुसखोरी केली. त्यांनी बंदुकी आणि शस्त्रास्त्रांसह एका लोकप्रिय आणि अतिशय गर्दीच्या पर्यटनस्थळावर प्रवेश केला, ते पोलिस आणि मिलिटरी च्या वेशात आले होते. जिथे त्यांनी निष्पाप लोकांना धर्माच्या आधारावर लक्ष्य केले आणि त्यांची क्रूरपणे हत्या केली. या भयंकर कृत्यानंतरही ते कोणत्याही अडथळ्याशिवाय पळून जाण्यात यशस्वी झाले, आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यांना पकडण्यात कोणालाही यश आले नाही. त्या ठिकाणी मदत उशिरा पोचली..अशा गंभीर घटनेनंतरही कोणीही सरकारवर प्रश्न उपस्थित करू नये, असे का अपेक्षित आहे? त्याऐवजी, आपण सर्वांनी ‘सरकार करारा जबाब देईल’ या भविष्यातील कृतीवर आधारित सरकारचे आणि त्याच्या नेत्यांचे गुणगान करत बसायचे .जर तुम्ही या घटनेत सुरक्षेच्या गंभीर त्रुटींबद्दल विचारले, किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, भारतीय लष्कर, सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), रॉ (संशोधन आणि विश्लेषण विंग), आयबी (इंटेलिजन्स ब्युरो) यांची जबाबदारी आणि उत्तरदायित्व काय आहे, असे प्रश्न उपस्थित केले, तर तुम्हाला देशद्रोही ठरवणार. कारण, सरकार आणि त्यांच्या यंत्रणांवर प्रश्न विचारणे म्हणजे त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि समर्पणावर शंका घेणे आहे अशी लोकांची समजूत करून दिली आहे. एक भारतीय म्हणून , हिंदू म्हणून आपण दहशतवादाविरुद्ध एकत्र आहोतच पण हा हल्ला सुरक्षा यंत्रणा, गुप्तचर यंत्रणा आणि नेतृत्व यांचे अपयश आहे . हे सत्य स्वीकारण्यात कमीपणा नसावा. इतर पक्ष सत्तेत असताना ते त्यांचे अपयश होते हे यांचे अपयश आहे. एक भारतीय म्हणून मला या हल्ल्याचे दुःख वाटते आणि अतिरेक्यांवर व त्यांच्या मालकांवर तशीच कारवाई व्हावी अशी इच्छा आहे
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 04/23/2025 - 10:02 नवीन
सहमत आहे. मीपावरील अंधभक्ताना सरकारला प्रश्न विचारलेले आवडत नाहीत, ते आधीच तयारीने बसले होते आता मैदानात उतरलेत.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/23/2025 - 09:58 नवीन
मिपावरील ठराविक सदस्य आता बिळातून बाहेर येऊन भान हरपून नाचणार. हे वर लिहिले आहे. अजून काही नेहमीच्याच यशस्वी कलाकारांची प्रतीक्षा आहे.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 04/23/2025 - 10:30 नवीन
या पाच प्रश्नांची उत्तरे मागायची वेळ आली आहे .
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 04/23/2025 - 10:38 नवीन
+१
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Wed, 04/23/2025 - 11:18 नवीन
अगदी नेमके प्रश्न आहेत. धन्यवाद जुना दुवा शोधून इथे टाकल्याबद्दल. मिपावरील उजव्या विचारसरणीच्या व भाजपा समर्थकांचे काय म्हणणे आहे?
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Wed, 04/23/2025 - 13:20 नवीन
ह्यांच्याकडे तर पेगासस आहे, ते नक्की कोणावर नजर ठेवतेय?
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 04/23/2025 - 13:26 नवीन
असे प्रश्न विचारायचे नसतात!
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/23/2025 - 10:30 नवीन
समाजमाध्यमांवर उबाठा समर्थक, राशप समर्थक, खांग्रेस समर्थक अक्षरशः भडाभडा विकृती ओतताहेत.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 04/23/2025 - 14:05 नवीन
आता फाटे फोडतील.. मुख्य प्रश्नांना बगल देतील
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Wed, 04/23/2025 - 14:28 नवीन
खरं म्हणजे उजव्या विचाराचे प्रचारक समाजात धर्माचे विष कालवत आहेत आणि सरकार विरोध करताना दिसत नाही. मागे रेल्वे सुरक्षा रक्षकाने रेल्वे प्रवाशांना असेच नावं विचारून गोळ्या घातल्या. तो कोणत्या धर्माचा होता? त्याला असे करण्याचे धैर्य कुठून आले?
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Wed, 04/23/2025 - 15:24 नवीन
हिंदू आणि मुस्लिम हिंसेची तुलना म्हणजे सफरचंदाची तुलना गटारात पडलेल्या सडक्या वांग्याची तुलना करण्यासारखे आहे. हे असले प्रतिसाद हाफिज सैदला वाचायला दिले तर हसून हसून मरेल तो. केवळ भाजप सत्तेत आहे आणि आपल्याला विरोधच करायचा आहे ह्यासाठीच हे असले प्रतिसाद पडत आहेत. गांधींच्या जावयालही ह्यावेळी सुद्धा मुस्लिम भावनांची पर्वा आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/23/2025 - 14:50 नवीन
अपेक्षेप्रमाणे अपेक्षित माणसांनी तारे तोडले.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 48 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 56 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: दिप्ती हिंगमिरे
    नोंदणी: Sat, 03/02/2024 - 22:27
  • सदस्य: Amol Sanas
    नोंदणी: Sat, 11/18/2023 - 16:06
  • सदस्य: Narmade Har
    नोंदणी: Wed, 11/15/2023 - 19:53
  • सदस्य: SHRIPAD DAMODH…
    नोंदणी: Fri, 09/22/2023 - 13:14
  • सदस्य: स्नेहा.K.
    नोंदणी: गुरुवार, 08/24/2023 - 04:22
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा