द काश्मीर फाइल्स
द काश्मीर फाइल्स या चित्रपटाच्या चर्चेसाठी हा धागा काढत आहे.
हा चित्रपट भारतातल्या काश्मिरी पंडितांच्या वेदना, दु:ख, संघर्ष यांचे चित्रण आहे. ९० च्या दशकात काश्मिर खोर्यात केल्या गेलेल्या हिंदुंच्या कत्तलीचे एक डॉक्युमेंटेशन तरी करतो. आजवर असा प्रयत्न ही झालेला नाही. लेखक दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी हिंदी भाषेत याची निर्मिती केली आहे.
११ मार्च २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. प्रमुख कलाकार अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आदी आहेत.
या चित्रपटाला विरोध झाला आहे. याविरुद्ध याचिकाही दाखल करण्यात आली होती. आता या चित्रपटाची चर्चा ही होऊ नये म्हणून दडपून टाकण्याचे प्रयत्न चालले आहेत असे दिसते. उदा: काश्मिरच्या हिंदूंचा ज्वलंत विषय असूनही कपिल शर्मा शो ने याचे प्रमोशन नाकारले आहे. आपल्याच इंडस्ट्रीतील सिनेमा असूनही विषय हिंदू विषयक असल्याने कोणत्याही खान किंवा प्रस्थापित चित्रपट कलावंतांनी द काश्मीर फाइल्सचा उल्लेख पूर्णपणे टाळला आहे.
या चित्रपटाची चर्चा व्हावी म्हणून हा धागा काढत आहे.
🗣 चर्चा
(327)
म
मुक्त विहारि
गुरुवार, 03/17/2022 - 17:16
नवीन
श्रीनगरमध्ये आलात तर संपवल्याशिवाय राहणार नाही!
https://www.esakal.com/manoranjan/bollywood-film-the-kashmir-files-vivek-agnihotri-share-letter-photo-death-threats-yst88
पुरावा असेल तर, इतिहास नाकारण्यात अर्थ नाही...
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
गुरुवार, 03/17/2022 - 17:09
नवीन
काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्या त्या १५०० हिंदूंसाठी कोण अश्रू ढाळणार?” The Kashmir Files वरुन ओवेसींचा मोदी सरकारला सवाल
https://www.loksatta.com/desh-videsh/asaduddin-owaisi-slams-modi-govt-on-the-kashmir-files-movie-hrc-97-2845652/
ह्यांच्याच पक्षातील नेत्याने, 100 कोटी गैर मुस्लिम जनतेला ठार मारण्याची धमकी दिली होती .....
https://youtu.be/krdym7gFVvA
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
गुरुवार, 03/17/2022 - 17:12
नवीन
The Kashmir Files वरुन संतापल्या मेहबूबा मुफ्ती; मोदी सरकारवर टीका करत म्हणाल्या, “ज्या पद्धतीने…”
इतके जर, काश्मीरी पंडितांवर खरोखर प्रेम आहे तर, त्यांच्या वंशजांना, त्यांच्या जमिनी परत द्या...
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
गुरुवार, 03/17/2022 - 17:17
नवीन
सगळे पक्ष, आपापली भुमिका ठाम पणे मांडायला लागले...
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
गुरुवार, 03/17/2022 - 22:42
नवीन
१९४८ जळीत फाईल्स जेव्हा हिंदूनीच हिंदू ची घरे जाळली होती,काही जणांना मारले होते,
१९८४ शीख फाईल्स जेव्हा शीख लोकांना मारले होते (हे आकडे भयावह आहेत) ..
लई पिक्चर स्टोऱ्या बाकी आहेत..
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 03/18/2022 - 02:50
नवीन
आणि काश्मीर हे कटकारस्थान आहे
रागाच्या भरांत मारलेली चपराक आणि ठरवून केलेली मारहाण, ह्यांत फरक असतो...
पटत असेल तर बघा, नाहीतर सोडून द्या...
बाय द वे,
1948ची झळ, आमच्या काही पुर्वजांना देखील लागली पण तो उद्रेक होता आणि अशावेळी माफ करणेच उत्तम ... पण, त्याच बरोबर, दुसर्या आजोळी अख्खा गांव, आमच्या घराचे संरक्षण करायला जमला होता ...
उद्रेकाच्या, चांगल्या आणि वाईट, दोन्ही बाजू बघीतल्या आहेत.....
- Log in or register to post comments
द
दिगोचि
Fri, 03/18/2022 - 03:57
नवीन
महाविकास आघाडीत 'शिवसेने'ला काळ कुत्र देखील विचारत नाही. सर्व अधिकार भ्रष्टवादी कॉंग्रेसच्या हातात आहेत >>>> माझ्यामते सर्व अधिकार काकान्च्या हाती आहेत. राज्यात २०२४ च्या निवडणुकीत पूर्ण बहुमताने सत्तेत येऊ, असा दावा करणाऱ्या भाजपला महाविकास आघाडीचे निर्माते व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले. राज्यात भाजपला पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही, असे प्रतिआव्हान त्यांनी केले. त्यासाठी आज त्यानी एक सभा घेऊन पुढच्या निवडणुकीत भाजपला कसे पराभूत करायचे याचा सल्ला आलेल्या तरुण कार्यक्र्त्याना दिला आहे.
- Log in or register to post comments
द
दिगोचि
Fri, 03/18/2022 - 04:28
नवीन
मेहबूबा मुफ्ती, फारुख अब्दुल्ला सारख्या अनेक लोकानी जनतेकडून गडगन्ज सम्पत्ती कमावली आहे. त्यामुळे त्यान्चा या सिनेमावर आक्षेप असणारच. त्यानी ना मुस्लिमासाठी ना हिन्दून्साठी काही केले फक्त आणि फक्त पैसे कमावले. असे माझे मत आहे. तसे नसते तर काश्मीर मधे आज शान्तता असती.
- Log in or register to post comments
S
sunil kachure
Fri, 03/18/2022 - 04:29
नवीन
ब्रिटिश सोडून गेले आणि भारतीय लोकात राज्य करण्याची कुवत नसल्या मुळे एका मागोमाग एक हिंसाचार उसळले.
स्वार्थी वृत्ती ही भारतीय नेत्यांमध्ये खूप आहे हे मान्य च करावे लागेल.
तरी ब्रिटिश आले त्यांनी एकसंघ भारत निर्माण केला.ह्या एकसंघ भू भाग नियंत्रित करण्यासाठी प्रशासन व्यवस्था निर्माण कायदे निर्माण केले,न्याय व्यवस्था निर्माण केली.
,सैन्य ,पोलिस यंत्रणा निर्माण केली.
रेल्वे चालू केली.
सर्व काही व्यवस्थित करून भारतीय राज्य कर्त्याना देश सोपवला.
पण काय झाले .
लगेच पाकिस्तान वेगळा,हिंसाचार,आणि फक्त सावळा गोंधळ.
ब्रिटिश नसते आले तर आज भारताचा भू भाग एकच केंद्रीय सत्तेच्या अमलात आहे
तो असता का?
काही तरी वेगळाच भूगोल असता.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sat, 03/19/2022 - 13:37
नवीन
https://www.esakal.com/desh/omar-abdulla-false-things-in-the-kashmir-files-movie-shk99
--------
किती खोटे बोलणार?
------
‘ट्रकमध्ये सीटच्या मागे लपून पळालो होतो’; The Kashmir Files पाहून अभिनेत्रीने सांगितला मन हेलावणारा अनुभव
https://www.tv9marathi.com/entertainment/bollywood/the-kashmir-files-is-literally-my-own-story-actress-sandeepa-dhar-recalls-how-her-family-fled-valley-664843.html
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sat, 03/19/2022 - 13:39
नवीन
'द काश्मीर फाइल्स' सिनेमा सुरू असताना 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या दिल्या गेल्या घोषणा
https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-news/the-kashmir-files-vivek-agnihotri-anupam-kher-in-telangana-pakistan-zindabad-slogans-anti-hindu-muslim/articleshow/90321679.cms?minitv=true
हा सिनेमा म्हणजे एक समुद्रमंथन आहे ... सगळे मूखवटे गळून पडत आहेत ....
- Log in or register to post comments
न
निनाद
Sun, 03/20/2022 - 23:30
नवीन
सिनेमात एक वाक्य आहे - सरकार उनकी है तो क्या - सिस्टिम तो हमारी है!
याचा प्रत्यय असा येत राहतो.
- Log in or register to post comments
S
sunil kachure
Sat, 03/19/2022 - 14:40
नवीन
काश्मीर प्रश्न ,कश्मिर मधील हिंदू ना सुरक्षित वाटत नसेल.
प्रश्न आहे तसाच राहतं असेल तर असल्या सिनेमाची काही गरज नाही
काश्मीर मध्ये काय घडले किंवा आता घडतं आहे ह्याची सर्व माहिती भारत सरकार ल आहे.
अनेक पक्ष केंद्रात येवून गेले .
कोणीच काश्मीर चे प्रश्न सोडवले नाहीत.
फक्त एक दुसऱ्या वर आरोप करण्या वतिरुक्त काही घडले नाही.
त्या मुळे कोणत्याच राजकीय पक्ष नी स्वतःला निरपराध समजू नये..
हा सिनेमा जर देशात दोन धर्मात द्वेष निर्माण करून राजकीय पोळी भाजण्यासाठी असेल तर ..हा खूप मोठा प्रश्न आहे.
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Sun, 03/20/2022 - 12:11
नवीन
https://youtu.be/cFtB21QymgY
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Mon, 03/21/2022 - 06:58
नवीन
“बाळासाहेब ठाकरेंमुळे आम्ही शिकलो, अन्यथा…”, काश्मिरी पंडितांनी आभार मानल्याचा व्हिडीओ शिवसेना खासदाराने केला शेअर
https://www.loksatta.com/trending/kashiri-pandit-students-thanks-to-balasaheb-thackeray-video-share-shivsena-mp-rmt-84-2840800/lite/?utm_source=Taboola_Recirculation&utm_medium=RC&utm_campaign=LS
तेंव्हा, बाळासाहेब ठाकरे यांनी, मदत केली आहे वाचनांत आले होते आणि त्यामुळेच शिवसेने कडून अपेक्षा होत्या...आज देखील शिवसेनेने, हेच धोरण ठेवले तर उत्तम...
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Mon, 03/21/2022 - 07:03
नवीन
The Kashmir Files: काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी पाकिस्तानला जबाबदार धरलं; जम्मू-काश्मीरमध्ये जे झालं ते…
https://www.loksatta.com/desh-videsh/pakistan-responsible-for-ghulam-nabi-azad-amid-the-kashmir-files-row-vsk-98-2850040/
समाज एकत्र राहायला हवा. जात आणि धर्म न पाहता प्रत्येकाला न्याय मिळायला हवा, असं मत आझाद यांनी व्यक्त केलं आहे.
--------
आझाद मैदान दंगल प्रकरणा बाबतीत, हे काही बोलले होते का?
मुजफ्फरनगर दंगल प्रकरणा बाबतीत हे काही बोलले होते का?
ते सोडा, नुकत्याच झालेल्या अमरावती दंगल प्रकरणाबाबतीत हे काही बोलले आहेत का?
---------
बाकी , बांगलादेश आणि पाकिस्तान मधील हिंदू मंदिराच्या तोडाफोडी बद्दल काही बोलले होते का?
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Mon, 03/21/2022 - 07:05
नवीन
The Kashmir Files: “मुस्लिमांना लाज वाटली पाहिजे…”, काश्मिरी लेखकाने काश्मिरी पंडितांची माफी मागत सांगितले सत्य
https://www.loksatta.com/manoranjan/the-kashmir-files-kashmiri-writer-javed-beigh-apolgies-to-kashmiri-pandit-community-dcp-98-2849664/
आणि अजूनही काही लोकांना वाटते की, सिनेमा अतिरंजित आहे...
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Mon, 03/21/2022 - 07:07
नवीन
The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स'वर न्यूझीलंडमध्ये बंदी, माजी उपपंतप्रधानांकडून निषेध
https://marathi.abplive.com/entertainment/bollywood/the-kashmir-files-film-another-attack-on-the-freedom-of-new-zealanders-informs-winston-peters-1043082
न्यूझीलंडचे माजी उपपंतप्रधान विन्स्टन पीटर्स म्हणाले, 'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा सेन्सॉर करणे म्हणजे न्यूझीलंडमधील नागरिकांच्या स्वातंत्र्यावर हल्ला करणे होय. विन्स्टन पीटर्स यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांचे मत व्यक्त केले आहे. फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे, 'द कश्मीर फाइल्स' या सिनेमाला सेन्सॉर करणे म्हणजे न्यूझीलंडमधील 15 मार्चच्या अत्याचाराची माहिती सेन्सॉर करणे होय.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Mon, 03/21/2022 - 07:08
नवीन
हे उत्तम ....
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Mon, 03/21/2022 - 07:16
नवीन
तीन वर्षांपूर्वी ख्राईस्टचर्चमध्ये मशीदीवर एका ख्रिस्ती कट्टरतावाद्याने हल्ला केला होता आणि पन्नासेक लोकांना मारले होते. त्यानंतर त्या देशाची पंतप्रधान जेसिंडा आर्डन स्वतः हिजाब घालून वावरत होती. ओबामानेही न्यू यॉर्कमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या-- ग्राऊंड झीरोच्या जवळ मशीद बांधायला पाठिंबा दिला होता. ज्या देशांचे नेते असतील त्या देशांकडून काय अपेक्षा ठेवणार? हा पोलिटिकल करेक्टपणा पूर्ण जगाला- खरं तर मानवजातीलाच धोक्यात आणत आहे. असो.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Mon, 03/21/2022 - 07:44
नवीन
सौदीत काम करत असतांना, एक पाकिस्तानी मुस्लिम, भारतीय मुस्लिमाला म्हणाला होता की, हम नें 60 साल में, पाकिस्तान को मुस्लिम राष्ट्र बनाया, बांगलादेश में भी ऐसा ही है, आप हिंदूस्थानी मुस्लिमों ने क्या किया? अगर हम सब साथ मिल जाएँ तो दुनिया को मुस्लिम बना सकते हैं ...
भारतीय मुस्लिमाने काही उत्तर दिले नाही, पण नंतर तो एकांतात मला म्हणाला की, ये सच बोल रहा हैं. हमारे कौम में भी ऐसे सोचने वाले लोग हैं...
-------
माझा उदारमतवादी पणा, त्या दिवशी विरघळून गेला...
- Log in or register to post comments
S
sunil kachure
Tue, 03/22/2022 - 07:57
नवीन
सौदी सारख्या मुस्लिम देशात तुमच्या सारख्या स्वाभिमानी हिंदू नी नोकरी करायला जायला च नव्हते पाहिजे होते.
एका मुस्लिम देशाच्या विकासासाठी तुम्ही तुमच्या बुद्धी चा वापर केला.
हा हिंदू द्रोह च आहे.
फक्त मुक्त विहिरी ह्यांच्या साठी.
- Log in or register to post comments
S
sunil kachure
Tue, 03/22/2022 - 07:57
नवीन
सौदी सारख्या मुस्लिम देशात तुमच्या सारख्या स्वाभिमानी हिंदू नी नोकरी करायला जायला च नव्हते पाहिजे होते.
एका मुस्लिम देशाच्या विकासासाठी तुम्ही तुमच्या बुद्धी चा वापर केला.
हा हिंदू द्रोह च आहे.
फक्त मुक्त विहिरी ह्यांच्या साठी.
- Log in or register to post comments
S
sunil kachure
Tue, 03/22/2022 - 08:03
नवीन
1) कट्टर धर्म वेडे ह्या मध्ये मुस्लिम धर्मीय ह्यांचे योगदान जास्त आहे.
२) आर्थिक क्षेत्र काही लोकांनी ठरवून घेवून बाकी लोकांस कंगाल करणारे.
आर्थिक क्षेत्रातील अतिरेकी.
३) काहीच लोकांच्या हितासाठी सरकार चालवणारे सत्ता वेडे सत्ता धारी.
ही पण लिस्ट मोठी आहे आणि हे सर्व घटक मानव जाती साठी विनाशक च आहेत.
फक्त धर्मवीर मानव जाती साठी विनाश कारी नाहीत.
उलट विनाशकारी घटकांच्या यादीत धर्म वेडे शेवटच्या स्थानावर आहे.
बाकी सर्व महा भयंकर आहेत.
- Log in or register to post comments
S
sunil kachure
Tue, 03/22/2022 - 08:15
नवीन
धर्मवीर ह्या शब्द ऐवजी धर्म वेडे असे वाचावे.
१) जर्मनी नी महाभयंकर युद्ध चालू त्या पाठी कारण धर्मांध पना हे नव्हते.
२) अमेरिका नी जपान वर अनु बॉम्ब टाकून जगातील सर्वात मोठा विनाश घडवला त्याला कारण धर्मांध पना नव्हतं
आर्थिक आणि जागतिक सत्ता होण्याचे वेड हे कारण होते.
आफ्रिका सारखे देश गरिबीत जीवन जगत आहेत पण तिथे स्वार्थी आर्थिक लालची त्यांच्या majburi च फायदा घेवून त्यांची लूट करत आहेत.
इथे धर्मांध लोकांचा संबंध नाही.
आज रशिया आणि युक्रेन युद्ध चालू आहे प्रचंड विनाश होत आहे
पैसा आणि आर्थिक अतिरेकी पना ह्या साठी सर्व चालू आहे.
जगाला धर्म वेड्या लोकांपेक्षा पांढरपेशा आर्थिक हवस असणाऱ्या स्वार्थी लोक पासून जास्त धोका आहे..
भारतात पण धर्माची भीती दाखवून देशातील सर्व नागरिकांची आर्थिक लूट करण्याचे षडयंत्र चालू अशें
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Tue, 03/22/2022 - 13:24
नवीन
दि काश्मिर फाईल्स चित्रपटाने
लिब्रांडुंची दातखिळ बसवली आहे.
दि काश्मिर फाईल्स हा चित्रपट नसुन डॉक्युमेंट्री आहे. मुळात घटना जश्या घडल्या तश्या पेक्षा दि काश्मिर फाईल्स चित्रपटात टोन डाउन केलेल्या आहेत. ओरीजीनल घटनाक्रम दाखवला असता तर बघवला नसता हा चित्रपट.
ज्या लोकांनी हे सगळ केल, त्यांना फक्त हैवानांची उपमा देता येईल. आपल्या समाजात आपल्या आजुबाजुला असे हैवान वावरत असतात व वेळ पडली तर ते त्यांचा मूखवटा फेकुन हैवानांची कृत्य करतात ह्याची जाणिव समाजाला होईल अशी आशा आहे. गिरीजा टिक्कुला जम्मु मधुन परत बोलवणारा तीच्या कॉलेज मधलाच असिस्टंट प्रोफेसर होता. बर्याच केसेस मध्ये २०-३० वर्षांच्या शेजार्यांनीच हिंदुंना गोळ्या घातल्या व त्यांची मालमत्ता हडप केली.
AK47 हाताशी असताना चिनार वृक्ष कापणासाठी वापरल्या जाणार्या मोठ्या करवतीने जिवंत पणे गिरीजाला कापणारे नराधमच असु शकतात. फक्त काफीर असण गुन्हा असेल तर त्या गुन्ह्याची शिक्षा द्यायला ड्रायव्हर, शाळेतला शिपाई किंवा प्रोफेसर कोणीही सहज नराधम बनु शकतो.
दि काश्मिर फाईल्स चित्रपटाने हिंदुंचे डोळे उघडावेत अशी आशा आहे !!
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Wed, 03/23/2022 - 10:32
नवीन
https://youtu.be/TGr9K8jcl44
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 03/23/2022 - 14:48
नवीन
काश्मिर फाई्ल्स चित्रपट म्हणजे...' माकप नेते सीताराम येचुरींचं गंभीर विधान
https://www.esakal.com/amp/manoranjan/bollywood-movie-the-kashmir-files-cpi-leader-sitaram-yechury-comment-viral-yst88
समुद्र मंथन....
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 03/23/2022 - 14:51
नवीन
https://mpcnews.in/show-tickets-to-the-kashmir-files-movie-and-get-admission-at-photography-school-271839/
हा चित्रपट, एक वेगळाच इतिहास घडवत आहे ...
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 03/23/2022 - 14:56
नवीन
द कश्मीर फाइल्स पाहिल्यानंतर दोन गटात हाणामारी, 15 जणांना अटक
https://marathi.abplive.com/news/maharashtra/two-groups-clash-in-amaravati-over-the-film-the-kashmir-files-raises-slogans-1043526
मिळालेल्या माहितीनुसार, 'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट पाहून परतणाऱ्या एका गटाने रस्त्यावर जय श्री रामच्या घोषणा दिल्या. यावरूनच दुसरा गट आणि चित्रपट पाहून आलेल्या या गटात जोरदार वादावादी झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की या दोन्ही गटांमध्ये हाणामारी सुरू झाली....
---------
हा चित्रपट, सगळे मुखवटे बाहेर काढत आहे... मध्यंतरी, अमरावती शहरांत दंगल झाली होती....
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 03/23/2022 - 14:59
नवीन
https://www.lokmat.com/movies/the-kashmir-files-pallavi-joshi-man-cut-into-pieces-vivek-agnihotri-film-anupam-kher-four-year-research-interview-a720/
आणि तरीही, काही लोकांना, हा सिनेमा अतिरंजित वाटतो ...
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 03/23/2022 - 15:03
नवीन
चित्रपट करमुक्त करून मोदी सरकार आमच्या…”; The Kashmir filesवर फारुख अब्दुल्लांची टीका
https://www.loksatta.com/desh-videsh/farooq-abdullah-reaction-on-the-kashmir-files-movie-hrc-97-2853004/
काय बोलणार?
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 03/23/2022 - 15:05
नवीन
https://www.loksatta.com/manoranjan/mns-to-show-the-kashmir-files-film-for-free-tweets-sandeep-deshpande-scsg-91-2854676/
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. कश्मीर फाइल्स या हॅशटॅगसहीत संदीप देशपांडेंनी एक फोटो पोस्ट केलाय. “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचा विशेष मोफत शो दाखवला जाणार आहे. २४ मार्च २०२२ मध्ये संध्याकाळी सव्वा सात वाजता माहीममधील एल. जे. रोडवरील सिटी लाईट चित्रपटगृहामध्ये हा शो दाखवला जाणार आहे,” असं या फोटोमध्ये म्हटलं आहे....
------
उत्तम निर्णय ...
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 03/23/2022 - 15:08
नवीन
संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदी, कारण ठरला The Kashmir Files; भाजपा झाली आक्रमक
https://www.loksatta.com/desh-videsh/the-kashmir-files-uproar-in-rajasthan-assembly-over-imposing-section-144-in-kota-scsg-91-2854259/
ही एक प्रकारची दंडेलशाही आहे ...
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 03/23/2022 - 15:10
नवीन
https://zeenews.india.com/marathi/maharashtra/women-denied-entry-due-to-wearing-saffron-shawl-during-kashmir-files-show-in-nashik/613613
आता, स्वयंघोषित, हिंदूत्ववादी शिवसेना, काय Action घेते? हे बघणे रोचक ठरेल ....
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
गुरुवार, 03/24/2022 - 08:31
नवीन
आता, आमची सौ म्हणते की, ह्यापुढे, मुस्लिम अभिनेत्यांचे सिनेमे पैसे खर्च करून बघणार नाही.
मी तर, मुस्लिम अभिनेत्यांचे सिनेमे टाॅकीज मध्ये बघणे, कधीच सोडून दिले आहे.
- Log in or register to post comments
क
कॉमी
गुरुवार, 03/24/2022 - 15:25
नवीन
वा, काय ती देशभक्ती, किती हा त्याग.
डोळे पाणावले. द
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 03/25/2022 - 05:36
नवीन
खरंय....!
माझे सुद्धा...! =))
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
गुरुवार, 03/24/2022 - 16:31
नवीन
हि एक विचित्रच मेण्टॅलिटी डेव्हलप होताना दिसतेय हल्ली.
पठाण फ्लॉप करा, लालसींग चड्ढा बुडवा.. का? तर ते शहारुख, आमीरचे चित्रपट आहेत म्हणुन.
(कप्पाळ बडवणारी स्माईली कशी द्यायची...)
- Log in or register to post comments
आ
आग्या१९९०
गुरुवार, 03/24/2022 - 16:56
नवीन
हि एक विचित्रच मेण्टॅलिटी डेव्हलप होताना दिसतेय हल्ली.
हे तर काहीच नाही,काही महाभाग ह्या सिनेमाचे तिकीट काढून थिएटर मध्ये बघायला जाणार नाहीत. जनतेनी हा सिनेमा बघण्याचा पंतप्रधान आग्रह करत आहेत. सर्वांना निर्मात्याच्या कमाईची काळजी. निर्मात्याचा पैसा वसूल झाला आहे, पण कोणीच त्याला मोफत यू ट्यूबवर टाकायला सांगत नाहीत. राज्यांनी करमणूक कर माफ करावा असल्या फालतू गोष्टी सांगायला लाजही वाटत नाही काहींना.
- Log in or register to post comments
प
प्रदीप
गुरुवार, 03/24/2022 - 18:20
नवीन
का? ह्यांतून जो नफा मिळेल, त्यावर त्याला पुढील निर्मीती कमी खर्चीक जावी, ना? तसेच स्वतःसाठी नफा हवाच की. त्याने काही विषयाने भारून जाऊन, त्यावर रीसर्च केला व चित्रपट बनवला. तेव्हा मग त्याने तो यूट्यूबवर फुकट का करावा?
ही खास मेंटॅलिटी मलातरी समजत नाही. एकतर, कुणाला जगण्यासाठी किती पैसा लागतो, हे त्या व्यक्तिने स्वतः ठरवावे. जोंवर त्या व्यक्तिचे, तिच्या कुटुंबियांची लाईफ स्टाईल, संपत्तीचे ओंगळ प्रदर्शन करत नाही, तोपर्यंत इतरांना त्याबद्त्दल काहीही टीका करण्याची जरूर नाही. हेच आर्गुमेंट काही सुप्रसिद्ध मराठी कलाकारांविषयी पूर्वी केले गेलेले ऐकून मी थक्क झालो आहे. असो, तो वादाचा एक वेगळा मुद्दा झाला.
खुद्द निर्मात्याने असे सांगितले नाही. दुसरे, ह्यांतून निर्मात्याला काहीच थेट लाभ नाही. कर कमी केल्याने, जास्त जनता तो चित्रपट पहाण्यास उद्युक्त होईल, इतकाच ह्या 'काहींची' ह्या मागणीमागे हेतू आहे. आणि असे झाल्याने, काश्मिरांतील हिंदूंवर तीन द्शकांपूर्वी, जे प्रचंड अत्याचार झाले होते, ते परागंदा झाले होते, व ज्याविषयी आतापर्यंतची सर्व सरकारे, मीडीया इत्यादी सर्वच मूग गिळून बसले होते, ते सर्व जास्त लोकांच्या नजरेत येईल, ह्यांत 'लाज वाटण्यासारखे' नेमके काय आहे?
- Log in or register to post comments
आ
आग्या१९९०
गुरुवार, 03/24/2022 - 18:41
नवीन
ज्याविषयी आतापर्यंतची सर्व सरकारे, मीडीया इत्यादी सर्वच मूग गिळून बसले होते, ते सर्व जास्त लोकांच्या नजरेत येईल
पुढे काय?
आणि टॅक्स फ्री करावे असे कोण मागणी करतेय ते पण बघा.
राज्यांनी का आपल्या महसुलावर पाणी सोडावे?
मुळात हा प्रश्न सामाजिक जागृती करून सोडविण्यासारखा नाही. जे काही करायचे आहे ते केंद्र सरकारने करायचे आहे. पंतप्रधानांनी हा सिनेमा बघितला आहे, त्यांना काश्मीरी जनतेच्या वेदना,व्यथा नीट समजल्या असतील तर त्यांनी करावे सरकारी पातळीवर प्रयत्न. जनतेकडून काय अपेक्षा आहेत पंतप्रधानांची?
- Log in or register to post comments
स
सुखीमाणूस
गुरुवार, 03/24/2022 - 19:18
नवीन
आणि राज्यात सत्तेवर मुस्लिम फेवरिसम वाले आणि केन्द्रात हतबल नेत्रुत्व असलेले सरकार असले तर काय होउ शकते हे हा चित्रपट दाखवतो.
काश्मिरची स्वायत्तता काढुन घेतली आहे पण तिथे अजुन बरेच काम करायला हवे आहे. तसेच समान नागरी कायदा आणायचा तर जनमानस त्याद्रुष्टिने तयार करणे आवश्यक आहे. हा चित्रपट त्यासाठी योग्य वातावरण निर्माण करतोय. आणि हिन्दु मुळात सहिष्णु असल्यामुळे या चित्रपटामुळे दन्गे उसळु नयेत ही अपेक्शा.
मुठभर लोक अतिरेकी विचाराने वागतात आणि वाइट काम करतात आणि बहुसंख्य त्यांच्यापुढे मन झुकवतात. हिंदू मध्ये दुफळी असल्यामुळे हिंदूंची धार्मिक कट्टरता आपलेच लोक कंट्रोल करतात. तसे मुस्लिम नाही करत. त्यामुळेच तर काश्मिर मधे एवढे मुस्लिम देखिल (खखोदेजा) अतिरेकी लोकान्कडुन मारले गेले तरी कोणी आवाज उठवला नाही. आणि बरेच हिन्दु मात्र या सिनेमामुळे दुफळी माजेल या काळजीत आहेत.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Fri, 03/25/2022 - 02:19
नवीन
पंतप्रधानांच माहित नाही पण सर्वसामान्य माणसाची , जनेते कडून हि अपेक्षा ठेवली तर चालेल का साहेब?
१) केंद्र सरकार या बाबत ठोस भूमिका घेत असेल तर राजकीय मते बाजूला ठेवून त्यास निंदण या बाबतीत तरी साथ देणे
२) अशी साथ देताना अप्लाय आवडीचा ( भाजप सोडून) पक्ष जर " काड्या" घालायला लागला तर त्यांना "तुम्ही सध्या तरी चूप बसा " हे ठणकावून सांगणे
अर्हताःत हे होणे नाही ... येथे जर काश्मिरी हिंदूंना न्याय द्यायला कोणी लागले तर " हे इस्लामोफोबिक " आहे म्हणून "आग " लावयायाला लावयायला लोक तयारच आहेत ,
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 03/25/2022 - 05:47
नवीन
इथे बरेच लोक टमरेल गॅंगचे आहेत.
म्हणजे
श्री मोदींची स्वच्छ भारत योजना निकामी होण्यासाठी रस्त्यावर टमरेल घेऊन बसणारे.
या लोकांना काश्मिरी हिंदू जनतेबद्दल सहनुभूती आहे परंतु त्यातून श्री मोदींना अंशभर जरी क्रेडिट मिळाले तरी यांचे बद्धकोष्ठ आणि कपाळशूल उठलाच असे समजा.
नवरा मेळा तरी चालेल पण सावंत रंडकी व्हायला पाहिजे हि विचारसरणी.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Sat, 03/26/2022 - 03:17
नवीन
या लोकांना काश्मिरी हिंदू जनतेबद्दल सहनुभूती आहे ( कदाचित असावी !)परंतु त्यातून श्री मोदींना अंशभर जरी क्रेडिट मिळाले तरी यांचे बद्धकोष्ठ आणि कपाळशूल उठलाच असे समजा.
नवरा मेळा तरी चालेल पण सावंत रंडकी व्हायला पाहिजे हि विचारसरणी.
१००%
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 03/25/2022 - 06:38
नवीन
>>>मुळात हा प्रश्न सामाजिक जागृती करून सोडविण्यासारखा नाही. जे काही करायचे आहे ते केंद्र सरकारने करायचे आहे. पंतप्रधानांनी हा सिनेमा बघितला आहे, त्यांना काश्मीरी जनतेच्या वेदना,व्यथा नीट समजल्या असतील तर त्यांनी करावे सरकारी पातळीवर प्रयत्न. जनतेकडून काय अपेक्षा आहेत पंतप्रधानांची ?
सामाजिक जागृती, वोट बँकेची करायची आहे. वादविवाद,तंटे, द्वेष उभा करणे हाच ज्या पक्षाचा अजेंडा आहे, त्यांच्याकडून काहीही अपेक्षा नाही. कोणत्याही विषयावरुन वाद कसा करायचा याचे 'चिंतन' मुख्यकेंद्र महाराष्ट्रातील 'संत्री' जिथून मिळते तिथून हे सुरु होते. समाजात दुफळी कशी निर्माण होईल त्याचा सातत्याने प्रयत्न इथे होतांना दिसतो. चित्रपटात जे घडले ते घडलेच आहे, कमी जास्त प्रमाणात. अधिक-उणे अशा कलाकृतीत असू शकते. तो संवेदनशील विषय आहे. त्याचं राजकारण करण्याचा विषय नाही. असे म्हणतात की 'अर्धे सत्य सांगणे हे खोटे सांगण्यापेक्षा मोठे पाप आहे' अर्धे सत्य सांगून जनतेला धुसमुसत ठेवण्याचा पडद्याआडून एक तो प्रयत्न आहे. काश्मिरी पंडितांची जी ससेहोलपट झाली त्याचं दु:ख मोठं आहे. कोणत्याही विस्थापिताचे दुखाची कल्पना फक्त सोसणा-यालाच माहिती असते. काश्मिरी पंडित जेव्हा विस्थापित होत होते, त्यांच्यावर अत्याचार होत होते, तेव्हा सरकारचा पाठींबा काढून घेतला नाही, सत्तेचा मोह भयंकर असतो, तो त्यांना सुटला नाही. आजही सुटत नाही. आज बत्तीस वर्षात पंडितांच्या पुनवर्सनासाठी किती प्रयत्न केले. किती पंडितांचे पुनवर्सन केले, हा मुख्य प्रश्न असतो. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. अश्वत्थाम्या सारखी काश्मी्री पंडितांची जखम केवळ भळभळत ठेवली जाते.
आज रात आठ बजेसे सब बंद रहेगा. असे म्हणून लाखो हातावर पोट भरणा-या मजुरांना क्षणात विस्थापित केले गेले. कितीक मेले, किती जगले याचा हिशेब नाही. अनवाणी पुरुष, गरोदर स्त्रीया मरणप्राय वेदना सहन करीत कितीतरी किलोमिटरचा प्रवास घरापर्यंत करत, काही घरी, पोहोचले, काही पोहोचलेच नाही. हे सर्व विसरुन जाऊ, कारण त्याचा मतांवर फार परिणाम होणार नाही. पण, 'आज रात आठबजह से सभी पंडितोकी एक सुची बनाकर सभी को अपने घर मिल्ट्री के द्वारा घर घर छोडा जायेगा' असा निर्णय घेणारी छाती छप्पन्न इंचाची नव्हे तर, असा निर्णय घेणारी निधड्या छातीची या पंडितांना गरज आहे. सिनेमा पाहा असे म्हणून पंडितांचे पुनवर्सन होणार नाही. राजकारणातील रक्तपिपासू जळु हे इतक्या लवकर होऊ देणार नाहीत, हेही माहिती आहे. बाकी, जनतेकडून त्यांची अपेक्षा फ़क्त मतांची असते. दुसरं काही नाही.
जय हिंद जय भारत.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 03/25/2022 - 15:28
नवीन
बिरुटे सर
तुम्हाला तोंडघशी पडायची सवयच लागली आहे. कारण आपला अभ्यास कमी पडतो आहे.
The minister said that the government provides Rs 13,000 per month to the families of 44,000 Kashmiri Pandits who have relief cards
Government's 2022 J&K plan: Resettlement of Kashmiri Pandits, 25,000 jobs, train link
Read more at:
http://timesofindia.indiatimes.com/articleshow/80899281.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst
आणि हा २०२१ चा दुवा आहे.
नाही तर परत म्हणाल कि आता सिनेमा आला म्हणून श्री मोदी ( तुमच्या भाषेत फेकूशेठ नाहीं तर तुम्हाला समजणार नाही कोण ते) यांनी हि योजना चालू केली.
आणि हा दुवा एकदा नीट वाचूनही घ्या त्यात काय काय लिहिलंय ते.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 03/25/2022 - 17:28
नवीन
आपला अभ्यास मला माहिती आहे. करोना काळात तो अनुभव घेतला आहे. आपल्या अभ्यासाबद्दल एकच प्रतिसाद टाकला आहे. देऊ का दुवा. बाकी, व्यक्तीगत टीका करण्यात मला इंट्रेष्ट नाही.
हं तर, मोदीशेठ. निवडणूकीपूर्वी असे म्हणाले होते की आम्ही सर्व पंडितांचे पूनर्वसन करु. आज आठवर्ष झाली काय दिवे लावले शेठने. नुसत्या थापा. काँग्रेसनेही विषयावर काही कमी थापा मारल्या नाहीत. त्यांनीही आश्वासने भरपूर दिली होती. पण, राहिला आर्थिक मदतीचा विषय. पंतप्रधान पॅकेज काही तुमच्या शेठने आत्ताच सुरु केलेली योजना नाही. काँग्रेसने एक गोष्ट केली. जम्मूमधे विस्थापितांसाठी कायमस्वरुपी छावण्या वसवल्या आणि पीएमपॅकेज त्यांनी आणले. माहिती नसेल तर शोधा. माहिती मिळेल. २००८ मधे, मनमोहनसिंग सरकारच्या काळात पीएम पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं. त्याचबरोबर त्या योजनेअंतर्गत काश्मीरमधील विस्थापितांसाठी नौक-याही देण्यात आल्या होत्या. या योजनेअंतर्गत २००८ आणि २०१५ मधे काश्मिरी पंडितांसासह विविध वर्गातील लोकांसाठी ६००० हजार नौक-या जाहीर करण्यात आल्या होत्या. आज काही हजार विस्थापित लोक नौक-या करीत आहेत. पण, काश्मीरमधे बांधलेल्या ट्रान्झिट हाऊसमधे त्यांना राहावे लागते. (ट्रान्झिट हाऊस सतत वाद आणि चर्चेत राहीले) दुवा.
काश्मिरी पंडितांचे म्हणने असे होते की, आम्हाला नौक-या दिल्या पण म्हणून याकडे पुनर्वसन योजना म्हणून बघीतल्या जाऊ नये. म्हणजे, काश्मीरमधे त्यांचं वडिलोपार्जीत घरे सोडावी लागली आणि ते जम्मूत राहण्यासाठी आले. सरकारने अशा विस्थापितांना काश्मीरमधे नौकरी करायला लावली. पण घरे दिली नाहीत. १९९० पासून काश्मीर खोरे सोडलेल्या सर्वच विस्थापितांना पीएम पॅकेज अंतर्गत रोजगाराव्यतिरीक्त ज्या कुटुंबांना मुळ ठीकाणी स्थायिक व्हायचं आहे, अशांना आर्थिक मदतीची तरतुद आहे. तसंच काश्मिरी स्थलातंरितांना रोख मदतही दिल्या जाते.
मनमोहनसिंग सरकारनेही विस्थापित काश्मिरी पंडितांच्या मदत आणि पुनर्वसनाची घोषणा केली. तेव्हा काश्मिरी पंडित संघर्ष समितीनेही विस्थापित नसलेल्या पंडितांसाठी वाटा मागितला होता. पुढे विस्थापित उच्च न्यायालयात गेले निर्णय फक्त विस्थापितांसाठी असा निर्णयही आला. (चर्चा दुवा )सध्या काश्मिरी खो-यात परतणे आणी पुनर्वसन हीच महत्वाची गोष्टा राहीलेली आहे.
आपल्या शेठने सिनेमा पाहा असा सल्ला देण्याऐवजी. पुनर्वसनासाठी पुढाकार घ्यावा. थापा बंद कराव्यात. अब कुछ करनेका वक्त है. मन की बाते करने का नही. एवढे बोलून थांबतो.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Sat, 03/26/2022 - 02:47
नवीन
आपल्या शेठने सिनेमा पाहा असा सल्ला देण्याऐवजी. पुनर्वसनासाठी पुढाकार घ्यावा. थापा बंद कराव्यात. अब कुछ
३२- ७ सध्याचे - ५ - -३ इतरांचे = काँग्रेस चे १७ नरसिंह राव शेठ आणि मनमोहन सेठ यांनीही तर काय दिवे लावले?
आणि आता खरंच काँग्रेस ला काश्मिरी हिंदूंच्या बद्दल पुळका असले तर मग या एवढीं नाकारात्मकता का हो? ( हो हिंदूच त्यांची जात महत्वाची नाही)
चित्रपट हे निमित्त आहे मूळ प्रश्नाला वाचा फोडणे हा मूळ हेतूआहे ,काँग्रेस च्या काळात यावर "दुर्लक्ष कर किंवा बंदी आणली असती
हिंदूंचे दुख्ख ते दुख्ख नाही ? त्यासाठी मग मेणबत्यांचं मोर्चह काढायला वेळ नसणार
देशभर आणि जगभर लोकांना हिंदूंवर हा अत्याचार झाले होते हे कळले यामुळे जळफळाट होतोय असं दिसतंय !
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- ›
- »