द काश्मीर फाइल्स
द काश्मीर फाइल्स या चित्रपटाच्या चर्चेसाठी हा धागा काढत आहे.
हा चित्रपट भारतातल्या काश्मिरी पंडितांच्या वेदना, दु:ख, संघर्ष यांचे चित्रण आहे. ९० च्या दशकात काश्मिर खोर्यात केल्या गेलेल्या हिंदुंच्या कत्तलीचे एक डॉक्युमेंटेशन तरी करतो. आजवर असा प्रयत्न ही झालेला नाही. लेखक दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी हिंदी भाषेत याची निर्मिती केली आहे.
११ मार्च २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. प्रमुख कलाकार अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आदी आहेत.
या चित्रपटाला विरोध झाला आहे. याविरुद्ध याचिकाही दाखल करण्यात आली होती. आता या चित्रपटाची चर्चा ही होऊ नये म्हणून दडपून टाकण्याचे प्रयत्न चालले आहेत असे दिसते. उदा: काश्मिरच्या हिंदूंचा ज्वलंत विषय असूनही कपिल शर्मा शो ने याचे प्रमोशन नाकारले आहे. आपल्याच इंडस्ट्रीतील सिनेमा असूनही विषय हिंदू विषयक असल्याने कोणत्याही खान किंवा प्रस्थापित चित्रपट कलावंतांनी द काश्मीर फाइल्सचा उल्लेख पूर्णपणे टाळला आहे.
या चित्रपटाची चर्चा व्हावी म्हणून हा धागा काढत आहे.
हा माणूस नक्कीच विचारवंत असणार. कारण असल्या लोकांना समोर दिसत असते ते बघायचे नसते. त्यातही बळी पडणार्यांमध्ये हिंदू असले तर त्याकडे कानाडोळा करायचा हा या लोकांचा शिरस्ता असतो.निखिल वागळ्यानंही हीच आकडेवारी त्याच्या वॉलवर लावलीय फेबुवर