द काश्मीर फाइल्स
द काश्मीर फाइल्स या चित्रपटाच्या चर्चेसाठी हा धागा काढत आहे.
हा चित्रपट भारतातल्या काश्मिरी पंडितांच्या वेदना, दु:ख, संघर्ष यांचे चित्रण आहे. ९० च्या दशकात काश्मिर खोर्यात केल्या गेलेल्या हिंदुंच्या कत्तलीचे एक डॉक्युमेंटेशन तरी करतो. आजवर असा प्रयत्न ही झालेला नाही. लेखक दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी हिंदी भाषेत याची निर्मिती केली आहे.
११ मार्च २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. प्रमुख कलाकार अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आदी आहेत.
या चित्रपटाला विरोध झाला आहे. याविरुद्ध याचिकाही दाखल करण्यात आली होती. आता या चित्रपटाची चर्चा ही होऊ नये म्हणून दडपून टाकण्याचे प्रयत्न चालले आहेत असे दिसते. उदा: काश्मिरच्या हिंदूंचा ज्वलंत विषय असूनही कपिल शर्मा शो ने याचे प्रमोशन नाकारले आहे. आपल्याच इंडस्ट्रीतील सिनेमा असूनही विषय हिंदू विषयक असल्याने कोणत्याही खान किंवा प्रस्थापित चित्रपट कलावंतांनी द काश्मीर फाइल्सचा उल्लेख पूर्णपणे टाळला आहे.
या चित्रपटाची चर्चा व्हावी म्हणून हा धागा काढत आहे.
🗣 चर्चा
(327)
श
श्रीगुरुजी
Wed, 03/16/2022 - 18:23
नवीन
काश्मिरी पंडितांच्या हत्या या वि. प्र. सिंह पंतप्रधान झाल्यानंतर सुरू झाल्या नसून त्यापूर्वीच सुरू झाल्या होत्या.
उदाहरणार्थ टिकालाल टपलू यांना १४ सप्टेंबर १९८९ या दिवशी मारण्यात आले होते जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान होते. मकबूल भटला फाशीची शिक्षा देणारे न्यायाधीश नीलकंठ गजलू यांना ४ नोव्हेंबर १९८९ या दिवशी मारण्यात आले होते जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान होते. त्यापूर्वी १९८६ मध्ये काश्मीरात हिंदू मुस्लिम दंगलीत काही हिंदू मारले गेले होते व तेव्हाही राजीव गांधी पंतप्रधान होते. फेब्रुवारी १९८४ मध्ये मकबूल भटला फाशी दिल्यानंतर सुध्दा काश्मीरमध्ये हिंदूंवर हल्ले झाले होते.
एकंदरीत काश्मीर ्मधीर परिस्थिती बिघडण्यास १९८४ मध्ये प्रारंभ झाला होता.
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Wed, 03/16/2022 - 18:57
नवीन
जगमोहन यांनी त्यांच्या राज्यपालपदाच्या दुसर्या कारकिर्दीत काश्मीरी लोकांवर अत्याचार केले आणि त्यामुळे दहशतवाद अजून वाढला ही टीका सगळे विचारवंत एकेकाळी त्यांच्यावर करायचे. पण हा चित्रपट आल्यानंतर अचानक टीकेचा सूर बदलून जगमोहन यांनी राज्यपालपदावर असताना काश्मीरी पंडितांच्या स्थलांतराविरोधात काहीही केले नाही असा झाला आहे. जे काही असेल ते असेल. पण जगमोहन यांच्या राज्यपालपदाच्या कारकिर्दीविषयी सगळ्यात महत्वाचे प्रशस्तीपत्र कोणी दिले असेल तर ते बेनझीर भुत्तोने. 'आम्ही जगमोहनला भागमोहन बनवून त्याचे तुकडे तुकडे करू' अशी गरळ बेनझीरने ओकली होती. म्हणजेच जगमोहन यांची राज्यपालपदाची कारकिर्द आपल्यासाठी खूप उत्तम होती याचे दुसरे कोणते प्रमाणपत्र मिळू शकेल?
https://www.newsncr.com/national/tribute-to-jagmohan-when-benazir-bhutto-said-bhagmohan-will-make-cut-and-cut-it-into-pieces/
- Log in or register to post comments
स
सुरिया
Wed, 03/16/2022 - 20:19
नवीन
सर्टिफिकेट बघायचे असेल तर संजय गांधीची चांडाळ चौकडी म्हणून भाजपा नेत्यांनी एक सर्टिफिकेट ह्याच जगमोहन, विद्याचरण शुक्ला, कमलनाथ आणि आर के धवन याना प्रदान केले होते. तूर्कमान गेट चे हत्याकांड प्रकरण ज्या दिल्ली डेव्हलपमेंट अथॉरिटी द्वारे पार पडले त्यामागे हेच जगमोहन होते. ती सर्टिफिकेट पण जोडावित ह्या बायोडेटा मध्ये.
- Log in or register to post comments
ज
जेम्स वांड
गुरुवार, 03/17/2022 - 02:55
नवीन
🤣 🤣
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 03/17/2022 - 04:26
नवीन
का हो तुम्हाला मराठी वाचता येत नाही का? वरच तुर्कमान गेटचा उल्लेख केला आहे तो दिसला नाही का?
- Log in or register to post comments
प
प्रदीप
गुरुवार, 03/17/2022 - 05:33
नवीन
त्यांना आपण दुव्यासकट, तुम्ही ह्याच धाग्यात, थोडेसे अगोदरच, काय लिहीले होतेत ते भरवूयांतः
त्या प्रतिसादाचा दुवा इथे
- Log in or register to post comments
स
सुरिया
गुरुवार, 03/17/2022 - 05:33
नवीन
नुसते मराठी वाचायला येऊन उपयोग नसतो. कळावी लागते.
मुद्दा तुर्कमान गेट चां नाहीये. आपापल्या सोयीने सर्टिफिकेट वाटण्याचा आणि ती मिरवण्याचा आहे.
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 03/17/2022 - 05:46
नवीन
बरं.
- Log in or register to post comments
स
सुरिया
गुरुवार, 03/17/2022 - 05:55
नवीन
गुड गोइंग.
हेच कळलेले "ते सगळ्यांना माहिती भरवण्याचा ठेका घेतलेल्या " मित्रवर्याना पण भरवा.
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 03/17/2022 - 09:09
नवीन
मी आणीबाणीचे आणि त्याकाळात झालेल्या तुर्कमान गेटसारख्या प्रकारांचे कधी समर्थन केले आहे? एकच माणूस (जगमोहन) आणीबाणीच्या वेळेस वाईट काम पण नंतर काश्मीरचे राज्यपाल म्हणून चांगले काम करू शकत नाही का? तुमच्या म्हणण्यानुसार त्याचे उत्तर नाही असे दिसते- कारण आपापल्या सोयीने सर्टिफिकिटे मिरविणे की तत्सम काहीतरी तुम्ही म्हणाला आहात. त्याच न्यायाने इंदिरा गांधींनीही पण काहीही चांगले केले नाही असे म्हणायला हवे. असो. तरीही 'नुसते मराठी वाचायला येऊन उपयोग नसतो. कळावी लागते.' हे वर तुम्हीच लिहिले आहेत. आता हाच प्रश्न उलटा विचारता येईल- जगमोहन यांनी काश्मीरच्या राज्यपालपदावर असताना चांगले काम केले होते हे लिहिणे याचा अर्थ त्यांनी आणीबाणीदरम्यान वाईट काम केले होते याकडे दुर्लक्ष केले असा होतो का? (स्पेसिफिकली तुर्कमान गेटचा उल्लेख वरच्याच प्रतिसादात केलेला असताना). तरीही तो संबंध तुम्ही लावत आहात असे दिसते. इथे लिहिलेल्या नक्की कोणत्या प्रतिसादात तसे लिहिले आहे? तुम्हाला खरोखर मराठी समजते का?
असो. यापुढे मला तुमच्याशी कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायची इच्छा नाही. मुख्य बोर्डावर काही सदस्यांचे प्रतिसाद आले की दिसताक्षणी दुर्लक्षित करावेत हा आदेश मी माझ्याच सबकॉन्शस माईंडला दिला आहे त्या यादीत तुमचेही नाव जोडत आहे.
- Log in or register to post comments
स
सुरिया
गुरुवार, 03/17/2022 - 09:40
नवीन
तुम्ही आणि तुमचे ते सबकाँसिअस का काय ते माईंड मिळून काहीही करा. उगी माझी यादी अन माझे दुर्लक्ष असली आरशाची आरती करण्यापेक्षा एक बघा काही कळते का ते.
"बेनझीर एखाद्या भारतीय माणसाला वाईट ठरवते तेव्हा तो भारतासाठी चांगलाच असतो.
त्याच माणसाला भाजपा कधीकाळी वाईट ठरवते तेव्हा तो भारतासाठी वाईट असतो.
तोच माणूस भाजपा मध्ये गेला की तो भाजपासाठी पण चांगला असतो अर्थात देशासाठी पण चांगला असतो."
ही सगळी सर्टिफिकेट तुम्हीच नमूद केली आहेत. त्यावर मी सर्टिफिकेट सोडून काहीही लिहिलेले नाहीये. वरील तीन विधान परत वाचा आणि ठरवा काय म्हणायचे ते.
आता conscious मनाने बरं म्हणून परत sub conscious मनाने प्रतिसाद लिहायचा असेल तर तुमची मर्जी.
तुमच्या याद्या तुम्हाला लखलाभ.
- Log in or register to post comments
प
प्रदीप
गुरुवार, 03/17/2022 - 10:48
नवीन
माफ करा, हे तुमच्यांत व चंसुकूंमधे आहे. तरीही
"बेनझीर एखाद्या भारतीय माणसाला वाईट ठरवते तेव्हा तो भारतासाठी चांगलाच असतो." -- हे चंसुकूंनी म्हटले आहे, व ते बरोबरच आहे.
" त्याच माणसाला भाजपा कधीकाळी वाईट ठरवते तेव्हा तो भारतासाठी वाईट असतो." --- असे चंसुकूंनी म्हटले असल्याचे अथवा तसे ध्वनित केल्याचे मलातरी जाणवले नाही. का मी कशाकडेतरी दुर्लक्ष करतो आहे (म्हणून मला ते दिसत नसावे?)
"तोच माणूस भाजपा मध्ये गेला की तो भाजपासाठी पण चांगला असतो अर्थात देशासाठी पण चांगला असतो."-- वरीलप्रमाणेच.
मलातरी चंसुकूंच्या प्रतिसादांतून फक्त जगमोहनांनी वेळोवेळी काय केले ह्याची क्रॉनॉलॉजिकली लिहीलेली जंत्री दिसली. त्यांत काही चूक असल्यास ते नक्कीच दर्शवून द्यावे.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
गुरुवार, 03/17/2022 - 11:49
नवीन
सहमत आहे.
- Log in or register to post comments
T
Trump
गुरुवार, 03/17/2022 - 10:24
नवीन
श्री सुरिया आणि श्री चंद्रसूर्यकुमार
आपण येथील चर्चा पश्चातबुद्धी ( hindsight ) ह्या सदरात करतोय. त्यावेळी त्या माणसाला (श्री जगमोहन ) यांना निर्णय घेताना कोणती माहीती उपलब्ध होती, आजुबाजुला कोणती माणसे होती, त्यांना योग्य ती माहीती मिळाली होती की नाही, त्यांच्या आज्ञा व सुचना यांचे योग्य पालन झाले का हे पण बघायला हवे. एकच मुद्दा घेउन कोणत्याही इसमाविरोधात बोलणे म्हणजे चरित्रहणण केल्यासारखे आहे. राजकारणात आणि प्रसासनामध्ये बरेचसे चापलुसी करणारे, आपल्या स्वार्थ दुसर्याच्या आडुन साधणारे पण असतात.
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 03/17/2022 - 11:07
नवीन
जगमोहन यांनी My Frozen Turbulence in Kashmir हे पुस्तक लिहिले आहे. त्यात त्यांच्या राज्यपालपदाच्या दोन्ही कारकिर्दींचा उल्लेख आहे. १९८७-८८ पासून जास्त परिस्थिती बिघडायला लागल्यावर त्यांनी केंद्र सरकारला वारंवार लिहिलेल्या पत्रांचा मजकुर दिला आहे. नक्की काय होऊ घातले आहे हे त्यांना नक्कीच कळले होते. आणि त्यावर राजीव गांधींच्या सरकारने काही पावले उचलली असे दिसत नाही. उदाहरणार्थ एप्रिल १९८९ मध्ये त्यांनी लिहिलेल्या पत्रात ताबडतोब कारवाई करा अशीच मागणी केली होती--
“The situation is fast deteriorating. It has almost reached a point of no return. For the last five days there has been large-scale violence, arson, firing, hartals, casualties and what not. Things have truly fallen apart. Talking of the Irish crisis, British Prime Minister Disraeli had said: “It is potatoes one day and Pope the next.” Similar is the present position in Kashmir. Yesterday, it was Maqbool Butt; today it is Satanic Verses; Tomorrow it will be repression day and the day after it will be something else. The Chief Minister stands isolated. He has already fallen-politically as well as administratively; perhaps, only constitutional rites remain to be performed. His clutches are too soiled and rickety to support him. Personal aberrations have also eroded his public standing. The situation calls for effective intervention. Today may be timely, tomorrow may be too late”.
नंतर एप्रिल १९९० मध्ये राजीव गांधी पंतप्रधानपदावरून गेल्यानंतरही जगमोहन यांनी राजीव गांधींना तीन पत्रे लिहिली होती. त्यात 'मी वारंवार दिलेल्या इशार्यांवर तुमच्या सरकारने काहीही केले नाही म्हणून परिस्थिती इतकी बिघडली' असे स्पष्टपणे म्हटले होते. तेव्हा जगमोहन यांना पुरेशी माहिती नव्हती असे अजिबात नाही.
आता हे पुस्तक जगमोहन यांनीच लिहिले असल्याने ते आपली चांगली बाजूच उघड करतील हे वेगळे सांगायलाच नको. पण मग या सगळ्याचा प्रतिवाद करता आला तर तो पुढील मुद्द्यांवरच होऊ शकेल--
१. जगमोहन यांनी अशी पत्रे लिहिलीच नव्हती.
२. त्यांनी अशी पत्रे लिहिली होती आणि त्यावर सरकारने विचार केला होता. पण त्यावर कारवाई करावी इतक्या महत्वाची ती पत्रे वाटली नाहीत.- पण मग परिस्थिती चिघळायला लागल्यावरही राजीव गांधींना कारवाई का करावीशी वाटली नाही हा पुढचा प्रश्न त्यातून उभा राहतो.
३. त्यांनी अशी पत्रे लिहिली होती आणि सरकारने कारवाईही केली त्यामुळे जगमोहन खोटे बोलत आहेत. तसे असेल तर मग परिस्थिती का चिघळली याचे उत्तर मिळत नाही. की परिस्थिती चिघळली नव्हतीच?
अवांतर- जगमोहन यांनी १९८९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीतून काँग्रेसकडून निवडणुक लढवावी अशी ऑफरही राजीव गांधींनी दिली होती. पण राजीव गांधींच्या राजकारणाला आणि अकार्यक्षमतेला वैतागलेल्या जगमोहन यांनी त्याला नकार दिला. आता जमात-ए-पुरोगामी जगमोहन हे संघी होते असे म्हणत होते. आतापर्यंत वाजपेयी आणि मोदींनी संघाच्या लोकांना राज्यपालपदावर नियुक्त केले होते हे ऐकले होते पण इंदिरा गांधींनीही तेच केले होते हे माहित नव्हते :) आणि राजीव गांधी संघाच्या माणसाला लोकसभेची उमेदवारी द्यायचा विचार करत होते? ऐकावे ते नवलच.
- Log in or register to post comments
T
Trump
गुरुवार, 03/17/2022 - 11:22
नवीन
धन्यवाद चंद्रसूर्यकुमार.
माझा मुद्दा एवढाच होता की जर माणसाच्या चरीत्राविषयी किंवा एकुनच मानसिकतेविषयी चर्चा करायची असेल तर पुर्णकष चर्चा व्हावी. एकाद - दुसर्या अनावधानामुळे, किंवा दुसर्यांच्या प्रभावामुळे झालेल्या चुकीमुळे पुर्ण माणसाला दोषी ठरवणे चुकीचे आहे. तुम्ही कालही श्री नरसिंहराव यांना https://www.misalpav.com/comment/1136300#comment-1136300 दोष दिला होता. काही चुका होतातच, कितीही प्रयत्न केला तरी.
--
अवांतरः येथे चांगले पुस्तक आहे. मी खुप दिवसांपुर्वी वाचले होते.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
गुरुवार, 03/17/2022 - 11:43
नवीन
मला असे वाटते की, नरसिंहराव हे अल्पमतातील सरकार होते. त्यामुळे त्यांना बर्याच तडजोडी कराव्या लागल्या.
हर्षद मेहताचे १ कोटी प्रकरणही गाजले होते.
असो.
मिपावर असे बरेच जण होते की, आरेमधील झाडे तोडल्याने ते इतके व्यथित झाले होते की त्यांनी भाजपाविरोधात मतदान करू असे सांगितले होते.
तेव्हां आदित्य ठाकरे हे पर्यावरणवादी होते.
पण राजकारण्यांना याबाबत मानायलाच हवे. भावनिक मुद्यांवर जोर देऊन तो व्यवस्थित मांडून भल्या भल्या अभ्यासकांना ते आरामात गंडवू शकतात.
असो.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
गुरुवार, 03/17/2022 - 11:47
नवीन
+१
आपल्याला सगळ्या बाजूंचे आकलन झालेले नाही याचे भान सतत ठेवता येणे यासारखे भाग्य नाही. ते ज्यांना लाभते तेच फक्त सर्वोच्च स्थानी स्वबळावर जाऊ शकतात. फक्त त्यांना एखादी संधी मिळणे फक्त आवश्यक असते.
असो.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Mon, 03/14/2022 - 12:58
नवीन
Vidya Bhushan Dhar
- Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२
Mon, 03/14/2022 - 15:03
नवीन
अतिशय अस्वस्थ करणारे सत्य आहे तेही पुराव्यांसहित. चित्रपटाचा शेवट अगदी हादरवून टाकणारा आहे. अनुपम खेरचा अभिनय अलिकाडच्या काळातला सर्वौत्कृष्ठ अभिनय म्हणवा लागेल. चिन्मय मांडलेकर बद्दल तर काय बोलावे 'फारुक अहमद डार उर्फ बिट्टा' त्यांने हुबेहुब उभा केलाय इतका की चित्रपट पाहाताना त्याच्या बद्दल तिरस्कार निर्माण होतो.
--
सर्वानी हा चित्रपट एकदा तरी जरुर पहावा.
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
Mon, 03/14/2022 - 15:42
नवीन
आपल्याला एखाद्या गंभीर गोष्टीची माहिती पाहिल्यावर कळते हेच मुळात धक्कादायक आहे.
काश्मीरी पंडीतांचा प्रश्न अनेक वर्षे सुशील पंडीत यांनी लावून धरला आहे. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी आपल्या व्याख्यानातून भारतभर हा प्रश्न कित्येक वर्षापासून लावून धरलेला आहे. युट्युब वर शोधले तर अनेक जुन्या चित्रफीती पाहायला मिळतील.
चित्रपटामुळे कदाचित प्रश्नाला जास्त वाचा फुटत असेल एवढेच वाटते.
- Log in or register to post comments
S
sunil kachure
Mon, 03/14/2022 - 18:49
नवीन
काश्मीर मध्ये हिंदू चे हत्याकांड झाले आणि ते किती भयानक होते हे ह्या सिनेमात दाखवले आहे
मी अजून सिनेमा बघितला नाही पण एकंदरीत चर्चे वरून तसे वाटते.
इतकी मोठी घटना अचानक घडत नाही
त्याच्या पाठी अनेक कारणे असतात
हिंदू चा इतका द्वेष निर्माण केला गेला की त्याचे रूपांतर हत्याकांड मध्ये झाले.
हे नीट समजून घ्यायचे असेल तर इंदिरा गांधी ह्यांच्या हत्ये नंतर ज्या काही देशात राजकीय घडामोडी होत होत्या त्याचा अभ्यास करायला हवा .इंदिराजी गेल्या नंतर सर्वांना च सत्ता मिळवण्याची स्वप्न पडत होती
राजीव गांधी नवखे होते..
काँग्रेस अंतर्गत राजकारण,विविध विरोधी राजकीय पक्षांचे राजकारण .
ह्या सर्वांचा परिपाक म्हणजे हिंदू चे हत्याकांड..
इतके होत असताना bjp च्या पाठिंब्यावर केंद्रात असलेले vp सिंग सरकार.
.राजकीय पक्ष स्वतःच्या फायद्यासाठी काही ही करू शकतात
- Log in or register to post comments
द
दिगोचि
Tue, 03/15/2022 - 03:05
नवीन
दुसर्या एका मराठी साईटवर १९९० मधे भाजप कॉन्ग्रेस बरोबर सत्तेत होती म्हणून त्यान्चा पण पन्डितान्च्या हत्त्येमधे थोडा का होईना हातभार आहे असे काहीजण म्हणत आहेत. एकाने तर फक्त ८९ पन्डित व इतर धर्माचे १६३५ मारले गेले असे एक पोलिसचे पत्र चिकटवले आहे.
- Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२
Tue, 03/15/2022 - 06:38
नवीन
फारुक अहमद डार उर्फ बिट्टा यांने टिव्हीवरिल मुलाखतीत (हि मुलाखत युट्युबवर आहे) त्याने स्वत: २० ते २२ पंडीताना डोक्यात गोळी मारुन ठार केले होते असे मान्य केले आहे, जेकेएलएफचे असे कितीतरी बिट्टा त्यावेळी सक्रिय होते. संपूर्ण काश्मिर खोर्यात अश्या शंभर-एक बिट्टानी प्रत्येकी २० पंडीत मारले असतील तर त्याचीच संख्या २०,००० च्या आसपास होईल.
- Log in or register to post comments
स
सुरिया
गुरुवार, 03/17/2022 - 22:46
नवीन
एक बिट्टा २० पंडित.
शंभर बिट्टा २००० (अक्षरी दोन हजार) हा हिशोब होतो. २०००० नाही.
भावना ओके, हिशोब तेवढा व्यवस्थित मांडा.
किंवा हे भाजपिय वैदिक वगैरे गणित असल्यास तसे नमूद करा.
- Log in or register to post comments
न
निनाद
Fri, 03/18/2022 - 00:14
नवीन
एका चुकीबद्दल वैदिकाचा द्वेष का?
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Tue, 03/15/2022 - 05:15
नवीन
कुठची ती साईट? मायबोली किंवा ऐसीअक्षरे असली तर अजिबात आश्चर्य वाटणार नाही. तिथे असल्या लोकांचा भरणा आहे.
हा माणूस नक्कीच विचारवंत असणार. कारण असल्या लोकांना समोर दिसत असते ते बघायचे नसते. त्यातही बळी पडणार्यांमध्ये हिंदू असले तर त्याकडे कानाडोळा करायचा हा या लोकांचा शिरस्ता असतो. आता हेच बघा ना- एप्रिल ते जून १९९८ या तीन महिन्यात जम्मू विभागात (जम्मू, उधमपूर, पूंछ, दोडा वगैरे) दीडशे लोकांना दहशतवाद्यांनी ठार मारले अशी ही रेडिफवरील बातमी सांगते. https://www.rediff.com/news/1998/aug/06kash.htm . या बातमीतील एक वाक्य आहे- "The ISI has gradually shifted its stand from azadi to a pan-Islamic jihad. It now aims at communalisation and ethnic cleansing by hitting soft targets." यातील अधोरेखित केलेल्या शब्दावरून दहशतवाद्यांनी नक्की कोणाला ठार मारले हे समजून येईल. ही गोष्ट १९९८ मधील आणि ती पण जम्मू विभागातील. काश्मीर खोर्यात असले प्रकार किती चालत होते याची आकडेवारी तपासायला मी गेलो नाही पण जम्मूपेक्षा कितीतरी जास्त होते हे त्या काळातील घटनांचा मागोवा ठेवणार्या कोणालाही सांगता येईल. तरीही 'फक्त' ८९ लोक मारले गेले असली पोपटपंची विचारवंत ही घाणेरडी जमात सोडून दुसरे कोणी करूच शकणार नाही.
- Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे
Tue, 03/15/2022 - 05:43
नवीन
पण समजा मेलेल्यामध्ये मुस्लिम जास्त आहेत आस समजलं तरी प्रश्न पडतो की त्यांना मारले कोणी? हिंदूंनि एकवटून त्यांना मारले ही शक्यता फारच कमी वाटते. कदाचीत जे काही मुस्लिम नागरिक मेले असतील मग तो नंबर काही का असेना त्यात त्यांचाच धर्मातील दहशतवादी लोकांनी त्यांना मारले असेल. सध्याही मधून मधून बातम्या येतात की काश्मीर मध्ये ग्रेनेड हल्ल्यात सामन्य नागरिक मेले किंवा एखादा सामान्य काश्मिरी युवक सैनिक सुट्टीसाठी गावाला आला असताना दहशतवाद्यानी त्याला मारले. पण तरीही काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्याविरुद्ध असंतोष आहे किंवा आंदोलन होतात हे ऐकून पण नाही. उलट आपले सैनिक एखादि मोहीम चालवत असताना मशिदींमधून घोषणा दिल्या जातात. बुऱ्हाण वाणी सारखा दहशतवादी मारला गेला की तेथील सामान्य मुस्लिम लोक आंदोलन करतात. गेल्यावर्षी एक बातमी आलेली की दहशतवाद्यांनी एका मुस्लिम सरपंचाची हत्या केली होती.
दहशतवाद्यांना सपोर्ट करून कश्मिरी जनतेचेच नुकसान झालेले आहे
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Tue, 03/15/2022 - 05:56
नवीन
इतकं होऊनही त्यांना ते समजत नसेल तर त्यांच्याविषयी अजिबात अश्रू ढाळायची गरज नाही. थोडीथोडकी नाही ३० वर्षे तोचतोच अनुभव परत परत घेऊनही त्यांना ते समजत नसेल तर काय करायचे? त्यांना त्यांच्या नशीबावर सोडून द्यायचे दुसरे काय?
- Log in or register to post comments
आ
आग्या१९९०
Wed, 03/16/2022 - 11:32
नवीन
मायबोली किंवा ऐसीअक्षरे असली तर अजिबात आश्चर्य वाटणार नाही. तिथे असल्या लोकांचा भरणा आहे.
मला ऐसीअक्षरेवर ह्या चित्रपटावर एकच धागा दिसत आहे व चित्रपटाच्या बाजूने किंवा विरुद्ध चर्चा तर नाहीच्या बरोबर आहे. बैलाचे दूध काढत नाही वाटतं ते.
- Log in or register to post comments
स
स्वप्निल रेडकर
Tue, 03/15/2022 - 06:33
नवीन
काश्मिर फाईल्स बघताना मला Mathieu kassovitz चा चित्रपटामधला एक डायलॉग पुन्हा पुन्हा आठवत राहिला -hate breeds hate ..असो
मी प्रत्येक कहाणी पडद्यावर ऊतरली पाहिजे याचा समर्थक आहे ,जर गोष्ट हिंस्त्र असेल तर तर ती तशी पडद्यावर दाखवली जायला हवी.
जेव्हा Terentino किंवा Gaspaer noea ,fantacy चित्रपटात एवढी क्रूर दृश्य शकतात तर सत्य घटनेवर आधारित चित्रपटात त्याच चित्रण येण स्वाभाविक आहे किंवा यायलाच हवं .roman पोलान्स्की ची पियानिस्ट हि अशीच एक film आहे ज्यात नाझी राजवटींच्या अत्याचार आणि हिंसेचा चित्रण आहे . जालियनवाला बागेच्या हत्याकांडामधली क्रूरता पूर्ण ऑथेन्टिसिटी ने शुजीत सरकार ने फिल्म मध्ये मांडलीय .पण असं का होत कि पोलान्स्की चा “दा पियानिस्ट “बघून आपल्याला जर्मनी मधल्या गैर ज्यू बद्दल द्वेष निर्माण होत नाही ,आणि शुजीत सरकार चा ”सरदार उधम सिंग “बघितल्यावर सगळ्या इंग्रजाना आपण शत्रू समजत नाही. असं का...?
या “का ”च उत्तर या ओळीत दिसत .”की गोष्ट काय आहे यापेक्षा ती कशी सांगितली गेली आहे “एक चांगला फिल्म मेकर आपली गोष्ट प्रेक्षकांपुढे मांडताना आपली जबाबदारी नाही विसरत . थोडं अजून सोपं करून सांगतो जस लिंकन ने लोकशाहीची व्याख्या केलीय ऑफ द पीपल ,बाय द पीपल अँड फॉर द पीपल ,तशीच काहीशी परिभाषा या अग्निहोत्रींच्या चित्रपटांसाठी लागू होते .एका विशिष्ट वर्गाद्वारा ,विशिष्टवर्गासाठी ,एका विशिष्ट वर्गाविरुध्द .... आपण थोडा विचार केला तर लक्षात येईलकी १७० मिनीटस चित्रपटामध्ये एका हि नॉर्मल मुस्लिम कॅरेक्टरला अर्ध्या मिन च पण फुटेज दिल गेलं नाहीय .लिटरली निल ,अगदी मुस्लिम स्त्रियांपासून,इमाम पर्यंत सगळ्यांना व्हिलन केलं गेलाय. पण त्या कम्युनिटी मधल्या एकही कॅरॅक्टरला ला व्हाईट शेड मध्ये दाखवलं नाही गेलाय .आता तुम्ही म्हणाल कि सगळे तसेच होते मग दाखवणार कस पॉसिटीव्ह त्यांना? तर मी म्हणेन कि बकवास बंद करा. ज्या वेळी काश्मीर मधून exodus झालं त्यावेळी काश्मिरी पोलिटिकल फिगर्स पासून ईस्लामिक धर्मगुरूंच्या पण हत्या झाल्या कारण ते काश्मिरी पंडितांसाठी बोलत होते .,दहशतवाद्या विरुद्ध उभे होते. पण असं स्क्रीन वर दाखवलं तर नॅरेटिव्ह सपक झालं असत ना .कारण जेवढं लोकांचं रक्त सळसळेल तेवढं चांगलं,जेवढ्या शिव्या लोक घालतील तेवढं चांगलं ,घोषणाबाजी जेवढी जास्त फायदा ..
film जशी पुढे सरकते तास एकामागून एक प्रोपोगांडा समोर येत जातो. secular मतलब sickular ,संघवाद से आझादी मनुवाद से आझादी म्हणणं म्हणजे गद्दारी ,काश्मिरी महिलेवर जे अत्याचार होतात ते आतंकवादी आर्मीचे युनिफॉर्म घालून करतात ,मुसलमान किती पण जवळचा असो तो वेळ आल्यावर धर्मच निवडणार .वगैरे वगैरे .पण हे सगळं असून सुद्धा मी म्हणेन कि आपण जरूर हा चित्रपट बघा .म्हणजे तुम्हाला चित्रपटाबरोबर त्याचा परिणाम पण दिसु शकेल. तुमच्या पाठीमागच्या सीट वर बसलेल्या लोकांना काँग्रेस ला आयाबहिणीवरून शिव्या देताना ऐकू शकू. त्यांना हे सांगायला भीती वाटेल कि बाबानो जेव्हा हे सगळं घडत होत तेव्हा केंद्रामध्ये काँग्रेस नाही तर जनता दल सरकार होता त्यात तुमची लाडकी भाजप सामील होती.,कारणाशिवाय जय श्री राम च्या घोषणा ऐकू येतील आणि पुरुषांच्या बडबडी पण ऐकू की हिंदू एक झाले पाहिजेत हो नाहीतर हे साले आपल्याला पण कापून टाकतील,मोदी असते ना तर असं झालाच नसतं .,खरं सांगायचं तर हि film अशाच लोकांसाठी बनवली गेलीय ज्यांच्या मनात आधीपासूनच मुस्लिम द्वेष खच्चून भरलाय पण तो डायरेक्ट व्यक्त कारण पांढरपेशा स्वभावामुळे सुसंगत वाटत नसल्यामुळे आता फिल्मचा आडून आणि ते पण सध्याच्या वातावरणात व्यक्त कारण सोपं झालाय ..डोक्यात आधी “ते लोक सगळे तसेच असतात ”याला खतपाणी घालायला आणखी एक कारण बस्स.आणि काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार आणि त्यांना त्यांच्या मातृभूमीपासून करावा लागलेलं स्थलांतर याचा उपयोग देशात कुठेपण मायनॉरिटीस होणाऱ्या अन्यायामधे ढालीसारखा करायचा बस्स!!"तेव्हा कुठे होता जेव्हा काश्मिरी पंडितांवर वर अत्याचार झाले"type . मुस्लिम दहशवाद्यांपेक्षा पूर्ण मुस्लिम समाजालाच व्हिलन ठरवायला सोपं. फिल्म बघून काश्मिरी पंडितांच्या दुःखाबद्दल उमाळे काढणाऱ्यांनी कधी विचारलं का सरकारला कि काय केलं काश्मिरी पंडितांना पुन्हा काश्मीर मध्ये सेटल करण्यासाठी.गेल्या ७ वर्षात किती पंडित परत गेले व्हॅली मध्ये ..किती गुन्हेगारांना शिक्षा केली जे जबाबदार होते यासाठी. पण असे प्रश्न अडचणीचे असतात त्यापेक्षा भारत माता कि जय ,पाकिस्तान चाले जाव . वगैरे उन्माद पसरावं जास्त सोपं नाही का?
आणि कोणीही नाकारत नाहीय कि हे सर्व islamic fanatics मुळे झालाय पण यात भारतीय राजकारण्यांचे हाथ पण काश्मीरच्या रक्ताने माखले आहेत फक्त दहशतवाद्यांचेच नाहीत आणि अग्निहोत्रीच्या हिम्मतीला दाद देणारे विसरताहेत कि हिम्मत प्रतिकूल परिस्थितीमध्ये असते जेव्हा भक्त मंडळींचं राज्य चालू असताना धार्मिक उन्माद पसरवणारी फिल्म बनावं तेवढं कठीण नसावं बहुतेक .आणि चित्रपटातून इतिहास शिकायचं ट्रेंड पण धोकादायक आहेच.
आणि शेवटी हा प्रश्न उरतोच कि फक्त काश्मिरी बांधवांवर झालेला अन्याय आणि अत्याचार जगासमोर यावा हे या फिल्म चा ध्येय आहे कि दुसरा पण काही मोटिव्ह आहे. (हा प्रश्न प्रेक्षकांनी स्वतःलाच विचारायचा आहे आणि त्याच उत्तर पण स्वतःलाच मिळेल )
( आणि थोडे फॅक्टस -हल्लीच(भाजप राजवटीत)फाईल केलेल्या एका rti नुसार गेल्या ३० वर्षात दहशतवाद्यांनी १७२४ लोकांची हत्या केली त्यात ८९ काश्मिरी पंडित होते.आणि यात काश्मिरी पंडितांचा आकडा कमी आहे म्हणून त्यांची शोकांतिका कमी होत नाही. फक्त समाज म्हणून आपणापण कसे दुटप्पी आहोत हे दिसून येत. ) आणि हा फिल्म बद्दल पर्सनल view आहे ,तुमची मत वेगळी असू शकतात .शेवटी लोकशाही आहे :) may peace prevail
आणि जाता जाता “परझानिया ” नावाचा एक चित्रपट आलाय तो पण बघता आला तर बघा कारण गुजरात मध्ये तरी unofficial बॅन आलाय ,हा पण सत्य घटनेवर आधारितच आहे एक पारशी जोडप्याचे गोध्रा दंगलीमध्ये हरवलेल्या मुलाला शोधण्याचा प्रयत्न दाखवलाय .कदाचित तेवढं जास्त भावुक नाही व्हायला जमणार !असो ...
मूळ लेख रिषभ दुबे
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Tue, 03/15/2022 - 06:41
नवीन
बकवास पोस्ट एवढेच लिहितो.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 03/15/2022 - 07:50
नवीन
त्यामुळे, उत्तर देण्याची तसदी घेतली नाही...
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
Tue, 03/15/2022 - 07:58
नवीन
+१
काश्मिर फाईल्स मधल्या पल्लवी जोशीच्या व्यक्तीरेखेची मानसिकता असणारी ही लोक.
१. काश्मिरमधे दहशतवादात बळी पडलेले हिंदू, मुस्लिम आणि इतर, यात मुस्लिमांची संख्या
२. १९९० मधे झालेला फक्त हिंदुंचा वंशविच्छेद आणि जबरदस्ती झालेले विस्थापन
वरील १ आणि २ ला लोक एकाच पारड्यात तोलताना बघून चीड आली.
कॉग्रेसच्या काळात अगदी २०१२/१३ पर्यंत हुर्रीयत नेते दिल्लीतील काँग्रेसींना भेटायला, चर्चा, मसलत वगैरे करायला यायचे.
ज्या गटाची स्थापनाच काश्मिर वेगळे करण्यासाठी आहे त्यांना पायघडया का घातल्या जायच्या कोण जाणे.
भाजपा सत्तेत आल्यापासून हुर्रियत हा विषय कमीत कमी राजकारणातून तरी संपला आहे.
असे चित्रपट काढून लोकांचे संरक्षण कसे होणार, दहशतवाद वगैरे कसा संपणार वगैरे प्रश्न विचारणार्यांची कीव येते.
असे चित्रपट हे प्रश्न सोडवायचे नाही तर जनजाग्रुतीचे माध्यम आहेत. राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय हीरो यांवर प्र्त्येक वर्षात कमीत कमी दोन तीन चित्रपट तरी यायलाच पाहिजेत.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 03/15/2022 - 08:11
नवीन
सहमत आहे ...
- Log in or register to post comments
T
Trump
Tue, 03/15/2022 - 07:07
नवीन
चालु द्या तुमचे विचारजंत. तुम्ही सरळ सरळ वंशद्वेषाचापुरस्कार करताय.
याचा अर्थ गोरे ते सगळे चांगले आणि अगोरे ते वाईट.
ज्या पध्दतीने तुम्ही ईस्लामिक दहशतवादाचे समर्थन करत आहात त्याच पध्दतीने गोर्या वंशवादाचे समर्थन करत आहात.
- Log in or register to post comments
S
sunil kachure
Tue, 03/15/2022 - 07:57
नवीन
समतोल आणि प्रश्नाच्या सर्व बाजूंचा विचार करून लिहलेली पोस्ट.
सिनेमा बनवणाऱ्या लोकांकडे इतका डेटा असेल तर सरकार कडे खूप मोठी माहिती असेल
केंद्र सरकार कडे अनेक एजन्सी आहेत.
काश्मिरी हत्याकांड मध्ये कोण सहभागी होते त्याची माहिती सरकार कडे असणारच.
2014 पासून केंद्रात सत्तेवर आहेत.
किती दोषी लोकावर कारवाई केली.
दोषी मध्ये खूप सारे राजकीय पक्षांचे नेते च असतील हे नक्की.
किती काश्मिरी हिंदू मारले गेले विस्थापित झाले त्याची सर्व माहिती सरकार कडे असेल.
2014 पासून केंद्रात सत्ता आहे.
किती विस्थापित हिंदू लोकांना त्यांच्या मूळ जागी सुरक्षा देवून मूळ जागी बसवले.
कंगना ल z plus सुरक्षा सरकार देत असेल .
ज्या विस्थापित हिंदू ना z security तरी देवू शकते.
किती विस्थापित लोकांची संपत्ती परत मिळवून दिली
हे प्रश्न खरेच कोणाला पडत नाहीत
शोकांतिका आहे.
फक्त उन्माद निर्माण करून राजकीय पोळी भाजणे इथ पर्यंत विषयाचे गांभीर्य असते.
- Log in or register to post comments
त
तर्कवादी
Wed, 03/16/2022 - 19:37
नवीन
काश्मीरी पंडितावर झालेल्या अन्यायाचा इतिहास जाणून घेणे आणि त्यामुळे व्यथित होणे ही एक गोष्ट तर त्यामुळे लोकांच्या मनात व एकंदरीत समाजात मुस्लिमद्वेषास उत्तेजन दिले जाणे हे धोकादायक वळण घेवू शकते.
जसे "जय भीम" हा चित्रपट पाहून आपण व्यथित होतो (हा चित्रपटही सत्यघटनेवर आधारित आहे म्हणून हे उदाहरण घेतले) , त्यातील आदिवासी जमातीच्या पात्रांवर झालेल्या अन्यायाबद्दल आपल्याला राग येतो. पण म्हणून आपण समस्त उच्चवर्णीयांबद्दल किंवा फार काय समस्त पोलिसांबद्दलही मनात राग धरत नाही. तशीच प्रतिक्रिया "काश्मीर फाईल्स" बघितल्यावरही असल्यास उत्तमच. त्या चित्रपटाची हाताळणी त्या पद्धतीने असेल तर चांगलेच (मी अद्याप हा चित्रपट पाहिला नाही) . पण सध्यातरी चित्रपटाचे प्रमोशन व प्रेक्षकांच्या ढोबळ प्रतिक्रिया बघता ही अपेक्षा अवास्तवच ठरेल व पहिल्या वाक्यात उल्लेखलेली भीतीच खरी ठरेल की काय असे चित्र आहे.
असो.. पुढे समाजात काय वाढून ठेवले आहे ते येणारा काळच ठरवेल. आपण आपल्या परीने सुज्ञ विचारसरणीस पाठिंबा द्यावा इतकंच काय ते आपल्या हातात.
- Log in or register to post comments
T
Trump
Wed, 03/16/2022 - 19:49
नवीन
मला तसे वाटत नाही. ढोंगी पुरोगामी विनाकारण वातावरण बिघडवुन आणि बुध्दीभेद करुन ताणतणाव निर्माण करत आहेत. दुर्देवाने मुस्लीम समाजातील काही लोक त्याला बळी पडतात आणि वादविवाद सुरु करतात. भारतीय समाज नेहमीच मुस्लीम व मुस्लीमेतर यांच्यात तणावाचा सामना करत आला आहे, जो पर्यंत मुस्लिम त्यांच्या चुका स्विकारत नाहीत तो पर्यंत तो तसाच राहणार आहे. अशीच परिस्थिती गदर चित्रपटानंतर झाली होती.
ज्या लोकांचे वाचन नाही आणि चित्रपटातुन नवीन इतिहास कळतो अशा लोकांना मात्र धक्का आहे.
- Log in or register to post comments
त
तर्कवादी
गुरुवार, 03/17/2022 - 08:59
नवीन
तसे असेल तर उत्तमच. म्हणूनच मी वर म्हंटले की "पुढे समाजात काय वाढून ठेवले आहे ते येणारा काळच ठरवेल" ते खासकरुन या चित्रपटाच्या निमित्ताने - चित्रपटाचा बरावाईट काय परिणाम होतो ते..
थोडाफार वाद झालाही असेल पण अगदीच समाज ढवळून निघाला असं काही झालं नाही.
तशीही गदरची मांडणी हिंदू विरुध मुस्लिम अशी नव्हती - भारत/भारतीय विरुद्ध पाकिस्तानी अशी होती.
थोडाफार बॉम्बेच्या वेळेसही झाला - मला वाटतं मुस्लिम नायिका हिंदू नायकाशी लग्न करते असं दाखवल्याने काही मुस्लिम संघटनांनी विरोध केला होता असं काहीसं आठवतंय. पण नंतर चित्रपट स्वीकारला गेला. फार काही गदारोळ झाला नाही. मला आठवतंय मी १५ वर्षांचा होतो आणि एकट्यानेच जावून दापोडीला हा चित्रपट पाहिला. घरच्यांनी आधी थोडी काळजीचा सूर लावला होता पण मी बघितलाच.
पिंजर चित्रपटातही (नुकताच मी हा पुन्हा पाहिला होता) मुस्लिम युवक (मनोज वाजपेयी) हा हिंदू युवतीला (उर्मिला) पळवून नेतो - तेही स्वातंत्र्यापुर्वी. आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर फाळणीच्या वेळी आणखी एका हिंदू मुलीचे (संदाली सिन्हा) पाकिस्तानातील मुस्लिमांकडून अपहरण केले जाते. पण तरीही चित्रपटाची मांडणी हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी वाटत नाही. चित्रपट पाहून त्यावेळी ज्यांनी जे काही भोगलंय त्यांच्याबद्दल हळहळ वाटते पण त्यातुन कुठेही मुस्लिमविरोधी प्रतिक्रिया निर्माण झाली नाही. "आताच जागे व्हा - नाहितर हे कुठेही घडू शकते ... तुमच्या आमच्या सोबतही घडू शकते" किंवा "सेक्युलरांना चपराक" वगैरे प्रकारचा प्रचार वा अशा प्रकारची भावना निर्माण करण्याचे काम या चित्रपटाने कुठेही केले नाही. (अमृता प्रीतम यांच्या कथेवर आधारित हा चित्रपट कलात्मकरित्या दिग्दर्शित केला होता चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी. - अलीकडे २०१८ मध्ये द्विवेदींनी वाराणसीतील अस्सी घाट येथील समाजजीवनातील स्थित्यंतरांवर बेतलेला "मोहल्ला अस्सी " हा सुंदर चित्रपट दिग्दर्शित केला -तो ही आवर्जुन बघण्यासारखा आहे- असो.)
मग आताच " काश्मीर फाईल्स" बाबत हे का घडत आहे ? या चित्रपटाने अतिरेक्याबद्दल चीड निर्माण होणे अपेक्षित आहे की सरसकट मुस्लिमविरोधी वा भावनांना उत्तेजन दिले जात आहे/किंवा तेच अपेक्षित आहे काय? आणि मुस्लिमांना सरसकट व उघडपणे थेट शिव्या घालणे पॉलिटिकली इनकरेक्ट ठरेल म्हणून सेक्युलर लोकांना शब्दांनी बडवावे - अशी काही मांडणी अभिप्रेतच आहे ?चित्रपटाला पाठिंबा देणार्यांपैकी कुणी (शक्यतो चित्रपट बघून ) प्रामाणिक मत व्यक्त करु शकेल काय ? बाकी काँग्रेस - भाजप - जगमोहन - व्ही पी सिंग इत्यादींना तुर्तास बाजूला ठेवून ठळक ओळीतील प्रश्नाचे उत्तर मिळाले तर बरे होईल.
- Log in or register to post comments
T
Trump
गुरुवार, 03/17/2022 - 10:47
नवीन
याचा बराचसा दोष तथाकथित पुरोगामी लोकांना जातो. माझ्या माहितीमध्ये कट्टर कॉंग्रेसवाले किंवा तत्सममतवाले, भाजपा कि समकंक्षविचारणीकडील पक्षाकडे वळले आहेत. ढोंगी पुरोगामी लोकांनी ज्या पध्दतीने हिंदु मंदीरावर हल्ले झालेच नाहीत, इस्लाममध्ये सगळेच कसे समान असतात, दंगलीमध्ये हिंदुचा दोष नेहमी कसा असतो, बाटला हाऊस, इसरत जहॉ प्रकरण, समान नागरी कायदा, अश्या उचापती केल्याने मध्यममार्गी लोक वैतागले आहेत आणि संयम जवळपास संपला आहेत. तेच मतदारपेटीमधुन व्यक्त होत आहे.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुस्लिमांनी आणि युरोपियन हिंदुंची आणि भारतीयांची माफी मागणे अपेक्षित होते. इतर देशांमध्ये truth and reconciliation commission सारखे प्रयोग झाले, दुर्देवाने ते भारतामध्ये झाले नाहीत उलट भारतामध्ये डावी लोक इतरांना बोलुनही देत नाहीत. उदा. सीएए आणि एनआरसी सारखे युरोपियन देशांमध्ये आहेत, मुस्लीमांना तिथे त्यांच्याबद्दल अडचण नाही, पण भारतामध्ये आंदोलने चालतात. मुस्लीम इतर देशामध्ये समानतेसाठी आंदोलने करतात आणि भारतामध्ये समान नागरी कायद्याला विरोध करतात. तांत्रिक प्रगतीमुळे आणि वाढलेल्या संवादामुळे ह्या गोष्टी सहज कळतात आणि ढोंगी डाव्यांच्या दांभिकपणा उघडकीस येतो.
मी श्री पटेल यांचे भाषण येथे डववतो, तुम्हीच सांगा हे भाषण कोणताही कॉंग्रेसवाला किंवा तथाकथित डावा आज देईल का?
----
तथाकथित डाव्यांच्या जोडीला गजवा - ए - हिंद, बुरखा, इस्लाममधील असमानता हे जोडीला आहेतच. तुम्हाला जवळचे उदाहरण देतो. https://www.misalpav.com/comment/1127514#comment-1127514
- Log in or register to post comments
त
तर्कवादी
गुरुवार, 03/17/2022 - 13:59
नवीन
ट्रम्पजी,
माफ करा .. पण मला वाटते आपण कारण मीमांसा नंतर करुयात. मला फक्त आता चित्रपटामुळे प्रेक्षकांची किंवा चित्रपटाच्या एकुणच समर्थकांची प्रतिक्रिया काय स्वरुपाची आहे - म्हणजे साधारणपणे
१) काश्मीरमध्ये १९९० साली काश्मीरपंडितांवर झालेले अत्याचार मला व्यथित करत आहेत
२) क्र १ + त्यामुळे काश्मिरी अ तिरेक्यांबद्दल माझ्या मनात अतिशय राग निर्माण झाला आहे
३) क्र १ + क्र २ + असे घडण्यास प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष कारणीभूत सर्व राजकारण्यांबद्दल मनात अतिशय राग निर्माण झाला आहे
४) क्र १+ क्र२ + क्र ३ + सर्वच मुस्लिम व्यक्तिंबद्दल माझ्या मनात राग व संशय निर्माण झाला आहे
५) क्र १+ क्र२ + क्र ३ + क्र ४ + या घटनेबद्दल मी व इतरांनी जमेल तेव्हा जमेल तसा सूड घ्यायला हवा असे मला वाटते.
किंवा अन्य काही प्रतिक्रिया....किंवा वरच्या १ ते ५ मधले इतर काही कॉम्बीनेशन्स...
तुम्हाला काय वाटते ? साधारण पणे काय प्रतिक्रिया निर्माण होत आहेत ?
सध्या तरी मला चित्रपटाच्या परिप्रेक्ष्यातुन फक्त चर्चा करायला आवडेल.
एक सामान्य व्यक्ती म्हणून माझी फक्त इतकीच अपेक्षा आहे की - चित्रपट जरुर बनावेत, बघितलेही जावेत, इतिहास लोकांसमोर नक्कीच यावा पण चित्रपट अशा प्रकारचा असाव की त्याची प्रतिक्रिया म्हणून समाजात एखाद्या जाती वा धर्माविरुद्ध द्वेष निर्माण होवू नये- एखाद्या चुकीच्या प्रवृत्तीबद्दल फक्त राग असावा. - जसे मी वरच्या प्रतिसादात पिंजर या चित्रपटाचे उदाहरण दिले-- हा चित्रपट कुठल्याही प्रकारे द्वेषास उत्तेजन देत नाही. माझ्या या अपेक्षेचे आणि व एकूण्च माझ्या मुस्लिमद्वेष न करण्याचे वर्गीकरण ढोंगी पुरोगामी म्हणून केले जाईल का ? एकूणातच मुस्लिमद्वेष मनात न बाळगणे = ढोंगी पुरोगामी असे नवसमीकरण (न्यू नॉर्मल) तयार होत आहे का ?
- Log in or register to post comments
T
Trump
गुरुवार, 03/17/2022 - 14:14
नवीन
जर तुम्ही सगळी पार्श्वभुमी काढुन टाकली तर चर्चा कशी करणार!!! दुर्देवाने भारतीय लोकांना त्याविषयी ईतिहास आहे, आणि तो काढुन टाकणे अशक्य आहे. उदा. किलींग फिल्ड (https://en.wikipedia.org/wiki/The_Killing_Fields_(film)) नावाचा चित्रपट आहे, तसे सध्याच्या कंबोडीयाबरोबर भारतीय समाजाचे संबध कमी आहेत, त्यामुळे भारतीय समाज त्याविषयी तट्स्थ मत देउ शकतो. जर तुम्हाला तटस्थ (फक्त चित्रपटाच्या परिप्रेक्ष्यातुन) मत हवे असेल तर ज्यांचा कोणतही संबध नाही अशी लोक घ्यायला हवेत.
ढोंगी पुरोगामी म्हणजे आपल्या उध्दीष्ठासाठी खोटा / अपुरा किंवा एकतर्फी इतिहास तयार करतात, इतिहासिक चुका न स्वीकारता, त्यावर पांघरुन घालतात त्यांना म्हणतात.
तुम्ही तसे करता का, हा प्रश्न तुम्हीच तुम्हाला विचारा.
- Log in or register to post comments
क
कॉमी
गुरुवार, 03/17/2022 - 14:31
नवीन
उत्तम प्रतिसाद. मला वाटते १-५ सर्वच रेंजमध्ये काही प्रतिक्रिया येत आहेत.
पण ४-५ या प्रतिक्रिया जास्त चर्चिल्या जाणार. त्यामुळे साधारणपणे काय होते हे सांगणे अवघड आहे.
- Log in or register to post comments
त
तर्कवादी
गुरुवार, 03/17/2022 - 16:10
नवीन
धन्यवाद कॉमी जी
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 03/17/2022 - 15:16
नवीन
आवडला प्रतिसाद. अगदी योग्य.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
त
तर्कवादी
गुरुवार, 03/17/2022 - 16:11
नवीन
धन्यवाद सर
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
गुरुवार, 03/17/2022 - 16:30
नवीन
उत्तम प्रतिसाद.
माझ्यासाठी क्रमांक ३
- Log in or register to post comments
त
तर्कवादी
गुरुवार, 03/17/2022 - 18:22
नवीन
धन्यवाद
परफेक्ट !!
- Log in or register to post comments
प
प्रदीप
गुरुवार, 03/17/2022 - 15:56
नवीन
हे निव्वळ कंजेक्चर आहे. आणि अर्थात हे व्यक्तिगत आहे. उदा. मी स्वतः उजवीकडे झुकणारा असल्याने, सोशल मीडियावर मी त्याच बाजूच्या अनेकांना फॉलो करतो. ह्यांतील एकानेही, आपण खाली दिलेल्या श्रेणीक्रमांतील १- ३ च्या वर (४ आणि/ अथवा ५) प्रतिक्रिया दिलेली नाही.
एक मात्र खरे, ह्या चित्रपटाच्या निमीत्ताने जी चर्चा होते आहे, त्यांतील डाव्या व तथाकथित उदारमतवाद्यांच्या आक्रस्ताळ्या भूमिका पहाता, त्याची दाहकता मूळापेक्षा वाढली आहे. म्हणजे, तुमच्या श्रेणीक्रमांत खरे तर ३अ आहे-- 'जे ढळढळीत पुराव्यांनिशी मांडले जात आहे, त्याविषयी नकारात्मक, सांशयिक भूमिका घेणार्या त. क. उदारमतवाद्यांविषयी माझ्या मनांत राग व संशय निर्माण झाला आहे' ते बर्याच जनतेचे होत आहे. 'जे झाले असे चित्रपट मांडतो, ते तसे झालेच नाही'/ 'इतक्या पूर्वी होऊन गेलेल्या त्या घटनांचा आता उल्लेख कशाला?"/ 'ह्याने समाजांत दुफळी निर्माण होईल' असली वावदूक वक्तव्ये ही मंडळी चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीपासून आतापर्यंत करत आली आहेत, ते चीड आणणारे आहे.
'शिंडलर्स लिस्ट' सारखा चित्रपट प्रसिद्ध झाल्यावर, ह्यामुळे दुफळी माजेल, लोक समस्त जर्मनांशी वाईट वागू लागतील, असले काही झालेले नाही. आताही ह्यांतून हिंदू- मुस्लिम दुफळी निर्माण होण्याइतका हिंदू समाज बावळट नाही. सर्वसामान्य जनता व त. क. पुरोगामी/ उदारमतवादी ह्यांतील दुफळी नक्कीच वाढेल, मात्र. आणि त्याला चित्रपट निर्माता/ दिग्दर्शक जबाबदार न राहता, हे त. क. पुरोगामीच असतील.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- ›
- »