Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

द काश्मीर फाइल्स

न
निनाद
Wed, 03/09/2022 - 04:34
🗣 327 प्रतिसाद
द काश्मीर फाइल्स या चित्रपटाच्या चर्चेसाठी हा धागा काढत आहे. हा चित्रपट भारतातल्या काश्मिरी पंडितांच्या वेदना, दु:ख, संघर्ष यांचे चित्रण आहे. ९० च्या दशकात काश्मिर खोर्‍यात केल्या गेलेल्या हिंदुंच्या कत्तलीचे एक डॉक्युमेंटेशन तरी करतो. आजवर असा प्रयत्न ही झालेला नाही. लेखक दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी हिंदी भाषेत याची निर्मिती केली आहे. ११ मार्च २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. प्रमुख कलाकार अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आदी आहेत. या चित्रपटाला विरोध झाला आहे. याविरुद्ध याचिकाही दाखल करण्यात आली होती. आता या चित्रपटाची चर्चा ही होऊ नये म्हणून दडपून टाकण्याचे प्रयत्न चालले आहेत असे दिसते. उदा: काश्मिरच्या हिंदूंचा ज्वलंत विषय असूनही कपिल शर्मा शो ने याचे प्रमोशन नाकारले आहे. आपल्याच इंडस्ट्रीतील सिनेमा असूनही विषय हिंदू विषयक असल्याने कोणत्याही खान किंवा प्रस्थापित चित्रपट कलावंतांनी द काश्मीर फाइल्सचा उल्लेख पूर्णपणे टाळला आहे. या चित्रपटाची चर्चा व्हावी म्हणून हा धागा काढत आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 93281 views

🗣 चर्चा (327)
त
तर्कवादी गुरुवार, 03/17/2022 - 16:13 नवीन
धन्यवाद प्रदीप जी
ह्यांतील एकानेही, आपण खाली दिलेल्या श्रेणीक्रमांतील १- ३ च्या वर (४ आणि/ अथवा ५) प्रतिक्रिया दिलेली नाही
वाचून बरं वाटलं.
आताही ह्यांतून हिंदू- मुस्लिम दुफळी निर्माण होण्याइतका हिंदू समाज बावळट नाही
बस.. हीच अपेक्षा आहे.. सर्वांनी ह्याच सुज्ञ विचारसरणीची कास धरावी ..
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 03/15/2022 - 07:43 नवीन
The Kashmir Files : ‘देशविरोधी सरकार जुन्या जखमा कोरून…’ काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे भाजपावर टीकास्त्र https://www.loksatta.com/manoranjan/the-kashmir-files-congress-criticizes-bjp-over-kashmiri-pandits-pvp-97-2840274/lite/ कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, हे हिंदू हितवादी नाहीत, असेच माझे वैयक्तिक मत, अधिक दृढ होत चालले आहे ....
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Tue, 03/15/2022 - 08:10 नवीन
पंडीतांनी काश्मिरमधे कधी जायचे ते सरकारला विचारवे - सचिन सावंत अतिशय निर्लज्ज विधान. दुसर्‍या महायुध्दानंतर ज्युंच्या वंशविच्छेदानंतर इस्त्राइल जसा बनला तसे सोल्युशन काँग्रेसी बगलबच्चांना चालेल का. साधे रोपटे पण एका कुंडीतून उपटून दुसर्‍या कुंडीत घातले की नेहमीच तग धरत नाही. भाड्याचे घर बदलताना पण जरी शेजारच्या इमारतीत जायचे असेल तरी किती तांरांबळ उड्ते इकडे काश्मिरी कितीतरी कुटुंबे विस्थापित झाली त्यात काहींचे बाप, भाऊ वगैरे मारले गेले होते, त्यांचे अंत्यसंस्कार तरी झाले होते का देव जाणे. त्यांना फक्त काश्मिरमधे जागा दिली की झाले असे ज्यांना वाटते त्यांचा धिक्कार. थू तुमच्या आयुष्यावर.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 03/15/2022 - 08:21 नवीन
आणि काश्मीरचा प्रश्र्न युनोत का नेला? ते पण जाऊ दे 1965 आणि 1972 मध्ये, काश्मीर स्वतंत्र करता आले असते, ते का केले नाही? आजही, CAA आणि NRCला विरोध करून, कॉंग्रेस हिंदू हितवादी नाही, हेच सिद्ध होत आहे.... कॉंग्रेसची धोरणे, तेंव्हाही हिंदू हितवादी न्हवती आणि आज देखील नाहीत...
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Tue, 03/15/2022 - 18:52 नवीन
३७० कलम रद्द करायला जमले नाही सत्तेवर असताना कौन्ग्रेस् ला. आता याना त्रास होतोय काश्मिर फाइल्स प्रदर्शित झाला म्हणुन..
  • Log in or register to post comments
द
दिगोचि Wed, 03/16/2022 - 03:33 नवीन
कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, हे हिंदू हितवादी नाहीत मला असे गेली अनेक वर्शे वाटत आहे. लोकसत्ताचे सम्पादक कुबेर हे नेहेमी भाजप विरोधी राहिले आहेत. तुम्ही दिलेल्या लोकसत्तेच्या सदरातले "सरकार जुन्या जखमा कोरून त्या भळभळत राहतील हे पाहते" हे वाक्य घेतले तर पन्डिताना जखम झाली हे कबुल करताना त्यानी मोदीसरकारला देशविरोधी हे विशेशण लावले आहे.
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Tue, 03/15/2022 - 08:04 नवीन
https://thenationaltelegraph.com/culture/the-kashmir-files-bringing-a-politically-incorrect-genocide-to-light आणि आरती टिक्कु सिन्ग यान्ची मुलाखत. बरीच मोठी आहे पण महितीपुर्ण आहे. https://www.youtube.com/watch?v=CNl3WRCa8OA
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 03/15/2022 - 08:36 नवीन
The Kashmir Files : पुण्यातील 'हॉटेल खान्देश'चा देशप्रेमी तडका,'द कश्मीर फाइल्स'चे तिकीट दाखवा अन्... https://marathi.abplive.com/news/pune/hotel-khandesh-in-pune-collect-tickets-for-the-kashmir-files-and-get-discounts-1041450 उत्तम निर्णय...
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Tue, 03/15/2022 - 08:36 नवीन
कोणतेही मत बनवायच्या अगोदर थोडा विचार करायलाच हवा पण माणूस बुद्धिमान आहे असे वाटत असले तरी तो उथळ विचाराचा आहे . हे अनेकदा सिद्ध झाले आहे. जेव्हा कोणत्याही समाज कडून ( ह्या मध्ये सर्व गट आले,धार्मिक,जातीय,प्रांतीय,भाषिक) हिंसक प्रतिक्रिया उठते . तेव्हा ते असे हिंसक का झाले ह्याला मोठी पार्श्वभूमी असते. समाज एकत्र होवून हिंसक कारवाया करण्यास लगेच तयार होत नाही त्या साठी तसे प्रयत्न किती तरी वर्ष काही लोक करत असतात. चंद्रकुमार ह्यांनी उल्लेख केल्या प्रमाणे स्फोटक तेल निर्माण करावे लागते. मग ठिणगी टाकली की आज लागणार च.. केंद्रात जे सत्तेवर असतात त्यांची एक निती असते विरोधी पक्षांची राज्य सरकार अडचणीत आणणे..त्या साठी राज्यपाल हा सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता त्या साठी वापरला जातो. (राज्यपाल हे पद राजकीय व्यक्ती लं असू च नये.) इंदिरा गांधी ची वृत्ती पण तशीच होती विरोधी पक्षांची राज्य सरकार काही ही योग्य कारण नसताना फक्त राजकीय हेतू साठी बरखास्त करणे. चंद्र सूर्य कुमार ह्यांनी त्याचा उल्लेख केला आहे. राज्यसरकार ही राज्याचं प्रतिनिधित्व करतात राज्यातील लोकांच्या भावना राज्य सरकार शी जुळेल्ल्या असतात. केंद्रात सत्तेत असणाऱ्या पक्षाने राजकीय हेतू नी राज्य सरकार बरखास्त केले किंवा अडचणीत आणले की त्या राज्यातील जनता अस्वस्थ होते त्यांना असुरक्षित वाटते. काश्मीर मधील सरकार केंद्रातील काँग्रेस नी बरखास्त केले आणि जगमोहन हे राज्यपाल होते त्या काळात. चंद्रकुमार ह्यांची पोस्ट. आणि नंतर असलेल्या vp sing सरकार नी त्या जगमोहन ह्यांना च राज्यपाल म्हणून नेमणूक केली .इथेच हिंसाचार ची बीज आहेत काश्मीर मध्ये मुस्लिम बहुसंख्य आहेत म्हणून त्याला धार्मिक रंग आहे. पण तो संघर्ष स्थानिक जनता विरुद्ध बाहेरचे असाच आहे.. हिंदुस्थान सरकार म्हणजे हिंदू चे सरकार. म्हणजे आमच्या अधिकारावर गदा आणणारे . म्हणून हिंदू विरुद्ध तेथील जनता एक झाली आणि पुढे हिंसाचार झाला. माझ्या मते हेच कारण आहे .त्या मध्ये संधी बघून धर्म वेडे सहभागी झाले असतील पण बोट घालण्यास जागा दिल्ली मधील राजकीय लोकांनीच निर्माण केली. आज पण मोदी सरकार बंगाल ,महारष्ट्र मध्ये त्यांच्या अधिकाराचा गैर वापर करत आहे. दोन्ही राज्यातील जनता त्या मुळे केंद्र सरकार वर नाराज आहे. हे स्फोटक तेल च आहे पण जास्त ज्वालाग्राही अजून तरी नाही.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Tue, 03/15/2022 - 09:00 नवीन
भाजप संसदीय समिती बैठकीत द काश्मीर फाईल्स ह्या चित्रपटाचे कौतूक केले आहे पंतप्रधान महोदयांनी ह्या प्रसंगी प्रत्येकाने पहावा असे वर्णन काश्मीर फाईल्स ह्या चित्रपटाचे केले आहे.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Tue, 03/15/2022 - 09:05 नवीन
काश्मिरी हिंदू चे पुनर्वसन कसे करणार ह्या वर देशाच्या पंतप्रधान असलेल्या व्यक्ती नी बोलले पाहिजे. पण ते काम खूप अवघड आहे ,त्या साठी कष्ट आहेत. सर्वात सोप हिंदू मुस्लिम मध्ये दरी निर्माण करून राजकीय फायदा करणे . आणि सत्ता मिळवणे.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Tue, 03/15/2022 - 09:17 नवीन
राज्यपाल हे सरळ त्या राज्यातील लोकांच्या मतदान नी सरळ निवडून आला पाहिजे.. हे पद अनेक समस्या चे कारण आहे .यूपी ची राज्यपाल आनंदी बाई पटेल. Bjp पक्षाची गुजरात ची माजी मुख्य मंत्री जोक आहे मोठा. महाराष्ट्राचे राज्यपाल bjp चे कार्यकर्ते rss शी संबंधित .ही लोक निरपेक्ष निर्णय घेवूचं शकत नाहीत
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 03/15/2022 - 09:42 नवीन
https://www.lokmat.com/international/china-said-india-pakistan-should-hold-talks-conduct-probe-into-accidental-missile-firing-a719/ हे कोण आम्हाला सांगणारे?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 03/15/2022 - 10:12 नवीन
गल्ली चुकली कृपया, डिलीट करावे
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 03/15/2022 - 09:53 नवीन
युवक काँग्रेस निवडणूक, तौसिफ खान नागपूरचे शहराध्यक्ष, निवडणुकीत गैरप्रकार झालाय? https://www.tv9marathi.com/maharashtra/nagpur/youth-congress-election-tousif-khan-nagpur-city-president-the-election-was-rigged-662209.html वसीम खान, अक्षय घाटोळे यांच्या म्हणण्यानुसार, तौसिफ खानवर गुन्हे दाखल आहेत. शिवाय वय पस्तीस वर्षांपेक्षा जास्त आहे. त्यामुळं तौसिफ खान युवक काँग्रेसची निवडणूक लढू शकत नाहीत. शीलजरत्न पांडे समर्थकांनी आक्षेप घेतला की, सर्वाधिक मते घेणारे तीन उमेदवार निवडणुकीसाठी पात्र नाहीत.....
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Tue, 03/15/2022 - 10:03 नवीन
हा प्रतिसाद ताज्या घडामोडी धाग्यावर चपखल बसेल असं माझं वैयक्तिक मत आहे. बाकी तुम्ही म्हणाल ते प्रमाण, नाहीतरी आपण मिपावर अमरपट्टा घेऊनच वावरता आम्ही मर्त्य उगा आपलं आदराने काहीतरी सुचवायचं म्हणून बोललो हो :)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 03/15/2022 - 10:10 नवीन
गल्ली चुकली
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 03/15/2022 - 10:12 नवीन
कृपया डिलीट करावे
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 03/15/2022 - 10:02 नवीन
https://marathi.abplive.com/entertainment/the-kashmir-files-film-imdb-rating-dropped-due-to-reported-unusual-voting-activity-1041419/amp रेटिंग कितीही असो, ज्याला सिनेमा बघायचा आहे, तो बघणारच ...
  • Log in or register to post comments
T
Trump Tue, 03/15/2022 - 10:03 नवीन
किती घाण करणार!!!
‘द काश्मीर फाईल्स’मुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न, गृहमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता या चित्रपटाच्या आडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जात आहे, अशी चिंता दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली. गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील नेमकं काय म्हणाले? काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराशी संबधित ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाला करमाफी देण्याची मागणी भाजप सदस्यांनी केली होती. मात्र हा चित्रपट संपला की चित्रपटगृहाच्या बाहेर लोकांना एकत्र करुन हिंदू जनजागृती विशेष संवादाच्या माध्यमातून धर्म प्रसार केला जात आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून आता झुंड चित्रपटाचे मोफत खेळ दाखविले जात आहेत. त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे, असे गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील म्हणाले. https://www.loksatta.com/manoranjan/home-minister-dilip-walse-patil-concern-over-the-kashmir-files-movie-attempt-to-endanger-law-and-order-in-the-state-nrp-97-2841874/
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 03/15/2022 - 10:22 नवीन
एक गोष्ट लक्षात आली आहे. हा चित्रपट रिलीज झाल्यापासून समस्त जमात-ए-पुरोगामी चवताळून त्या चित्रपटावर हल्ला करायला लागले आहेत- जणू काही हा चित्रपट म्हणजे त्यांच्याच जीवनमरणाचा प्रश्न आहे. पण आता ते लोक असे का करत आहेत त्याचे कारण समजले. हा चित्रपट खरोखरच त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. इतकी वर्षे समाजकार्य किंवा अन्य दुसरे कोणते लेबल लाऊन हिंदूविरोध हाच अजेंडा हे लोक राबवत होते. इतकी वर्षे ही गोष्ट हिंदूंच्या लक्षात आली नाही म्हणून किंवा बरेच लोक बावळट होते म्हणून ती गोष्ट कळूनही त्याला पाठीशी घातले गेले. पण आता या चित्रपटाच्या निमित्ताने हे लोक नक्की कोणाचे समर्थन करत होते हे आता सामान्यांना समजले आहे. मग हळूहळू लोक इतर प्रश्नही विचारायला सुरवात करत आहेत. उदाहरणार्थ अरूंधती रॉय आणि यासीन मलिकचे नक्की काय साटेलोटे होते की त्याच्याबरोबर अगदी खिदळत होती? Image removed. इंडिया टुडेने यासिन मलिकला त्यांच्या इंडीया टुडे कॉनक्लेव्हमध्ये पण बोलावले होते. अशी इतर उदाहरणेही असतीलच. काश्मीरमधून हिंदूंचे विस्थापन झाले हे सगळ्यांना माहित असली तरी परिस्थिती नक्की किती भयानक होती याची कल्पना सगळ्यांना नसते. ती कल्पना सगळ्यांना या चित्रपटामुळे मिळाली आहे. आपसूकच इतकी वर्षे हे जमात-ए-पुरोगामी नक्की कोणाची बाजू घेत होते हे समजले की मग त्यांनी जी डावी इकोसिस्टीम उभी केली आहे त्याच्या विश्वासार्हतेला तडा जाऊन त्यांच्या अस्तित्वावरच घाला येईल हे त्यांना समजले नसेल असे अजिबात नाही. एका अर्थी हा चित्रपट आणि त्याला मिळणारा उदंड प्रतिसाद या जमात-ए-पुरोगामीच्या अस्तित्वावरच प्रहार करायची क्षमता बाळगून आहे. मग ते चवताळून उठले नाहीत तरच नवल.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 03/15/2022 - 10:30 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
य
यश राज Tue, 03/15/2022 - 11:00 नवीन
++११
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब Tue, 03/15/2022 - 18:56 नवीन
चित्रपट पाहायचा आहे पण 2.5 वर्षाचा मुलाला सोबत घेऊन जाता येईल का ?? घरी सांभाळणारे कोणी नाही ... त्याला एकट्याला सोडून जाता देखील येणार नाही... त्यामुळे कसे करावे ते समजत नाही.. कोणी लहान मुलाला घेऊन हा चित्रपट पाहिला आहे का. थेटर मध्ये सोडतात का?
  • Log in or register to post comments
T
Trump Wed, 03/16/2022 - 11:40 नवीन
माझा सल्ला: लहान मुलांना असल्या ठिकाणी घेउन जाउन नये. मुले रडल्यामुळे इतरांना त्रास होतो. मुलांना तत्सम चित्रपटातील भयवहता पाहुन त्रास होतो.
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Tue, 03/15/2022 - 19:28 नवीन
या नावाखाली हिन्दु जाती जातीन्मधे तेढ निर्माण करायची. आणि राज्य करायचे. या पुरोगाम्याना हिन्दु उच्च जातिन्चा राग का? एक कारण पैसाआहे. तेलामुळे मुस्लिम् देशान्कडे पैसा आहे. आणि पाश्चात्य देशान्कडे भरपुर पैसा आहे. मग परदेशी मदत मिळवायची तर हिन्दु धर्म आणि त्यातल्या उच्च जाती याना बदनाम करणे सोपे आहे. यात परत जिवाला धोका नाही. आणि३.५ की ४.५ टक्के लोकान्ची भीती दाखवुन उरलेला समाज ताब्यात ठेवणे सोपे तस पाहिल तर कुळ कायदा करुन शेतीचे कुळाना वाट्प, आरक्शण, ईतक्या वर्षाचे कौन्ग्रेस्स सरकार, आम्बेडकरान्ची घटना, असे असताना देश सुजलाम सुफलाम व्ह्यायला हवा होता,एकदम धरतीवरचा स्वर्ग... काश्मिर फाइल्स च्या निमित्ताने समाज ढवळुन निघतो आहे हे खुप चान्गले आहे. सगळ्या बाजु समोर येतायत हे देखिल चान्गले आहे. वैचारिक बदल होताना त्रास तर होणारच. बर्याच युरोप मधील देशाना मुस्लिम बहुसन्ख्य झाल्यामुळे त्रासाचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे भारताने योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
T
Trump Wed, 03/16/2022 - 11:42 नवीन
या पुरोगाम्याना हिन्दु उच्च जातिन्चा राग का?
बनावटी पुरोगामी लोकांना हिंदुमध्ये जातीद्वेष पसरवायला आवडतो.
बर्याच युरोप मधील देशाना मुस्लिम बहुसन्ख्य झाल्यामुळे त्रासाचा सामना करावा लागतो आहे.
कोणत्या युरोपियन देशांत मुस्लिम बहुसंख्य झाले आहेत?
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Wed, 03/16/2022 - 17:50 नवीन
https://www.sundayguardianlive.com/world/europe-struggling-problem-islamist-extremists https://www.europarl.europa.eu/doceo/document/E-9-2020-004329_EN.html https://eclj.org/religious-freedom/pace/le-conseil-de-leurope-sinquite-grandement-de-lapplication-de-la-charia-en-europe https://www.i24news.tv/en/news/international/europe/1568920086-poll-46-of-french-muslims-believe-sharia-law-should-be-applied-in-country https://www.cfr.org/backgrounder/understanding-sharia-intersection-islam-and-law
  • Log in or register to post comments
T
Trump Wed, 03/16/2022 - 18:04 नवीन
बहुसंख्य होणे आणि लोकसंख्या वाढणे ह्यात फरक आहे. कृपया मुस्लीम बहुसंख्य झालेल्या युरोपियन देशांची नावे द्यावीत.
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Wed, 03/16/2022 - 18:18 नवीन
युरोपमधे मुस्लिम बहुसन्ख्य होउ घातल्यामुळे त्रासाचा सामना करावा लागेल अशी चिन्ता व्यक्त होते आहे असे म्हणायचे आहे. चुक लक्शात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ह
हणमंतअण्णा शंक… Tue, 03/15/2022 - 20:15 नवीन
खऱ्या काश्मीर फाइल्स/स्टोऱ्या पाहायच्या असतील तर खालील ३ व्हिडीओ पहा. प्रोपोगंडा नाही. म्हणजे यांचाही नाही आणि त्यांचाही नाही. काश्मिरी पंडितांचे शिरकाण करणाऱ्या मुस्लिम अतिरेक्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती ऐकून काटा आला. १. मुस्लिम अतिरेक्यांची मानसिकता, अतिशय प्रतिगामी इस्लामी कट्टरता ( डार्विनला विरोध, आधुनिक शिक्षणाला विरोध, स्त्री समानतेचा विरोध ) काय चीज आहे हे अतिशय थोडक्यात पण परिणामकारकरित्या कळते. सॅम हॅरिस म्हणतो की "(धार्मिक) मूलतत्ववाद हा वाईट नसतो जर धर्माची मूलतत्त्वेच चांगली असतील तर. उदा. एखादा जैन जितका कट्टर होत जाईल तितका तो समाजावर उपकारक, अहिंसक आणि चांगला होत जाईल. इतका की पडलेली फळं खाऊन पोट भरेल, चालताना मुंगी देखील चिरडणार नाही, बोलताना तोंड झाकून घेईल. म्हणून इस्लामी मूलतत्ववादी आणि जैन मूलतत्ववादी यांच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे." अर्थात व्यवहारात सगळ्याच धर्माची मूलतत्त्वे तितकी साधी सरळ आणि सोपी मात्र नाहीत हे ही तितकेच खरे आहे. आणि असली तरी अनुयायी त्यांचे वेगवेगळे अर्थ लावून असंख्य प्रथा परंपरा रूढी निर्माण करतातच. अशा गोष्टींवर बळावरच आधुनिक समाज चालवणे, त्यासाठी कायदे करणे हे शेवटी समाजाला मागासच करणार आहे. आता व्हिडीओत दाखवलेल्या इस्लामी मागण्या (डार्विनला विरोध, आधुनिक शिक्षणाला विरोध, स्त्री समानतेचा विरोध ) ह्या कमी अधिक फरकाने हिंदुत्ववादीही तेही समाज प्रबोधनाच्या नावाने करतच आहेत. ( उदा. आपले लाडके कॉमेडी कीर्तनकार). आणि मूळ विषय म्हणजे पंडितांचे विस्थापन, त्यांच्या हत्या. त्यांचे समर्थन डोके ताळ्यावर असलेला कुणीही माणूस करूच शकत नाही. संतोष शिवनच्या चित्रपटात भुतासारखा हिंडणारा काश्मिरी पंडित बघून, भीषण सिंग चे हे श्रीनगरचे चित्र पाहून वेदना होतात. २. दुसरा व्हिडीओ: अभाविप आणि तत्सम संघटनांनी केलेले आंदोलने (एकता यात्रा) हा मुख्य विषय. गमंत म्हणजे आपले लाडके विश्वगुरु तेव्हाही तितकेच थापाडे होते हेही लक्षात येईल. साक्षात आदरणीय अटल बिहारी देखील त त प प करताना पाहून मला धक्का बसला. ( परंतु निदान पत्रकारांना सामोरं गेले हे सुद्धा पुरेसे आहे ) ३. तिसरा व्हिडीओ: दुराईस्वामी अपहरण, त्यांचा स्टॉकहोम सिन्ड्रोम, मस्त गुल ह्या पाकिस्तानी अतिरेक्याची मुलाखत असा आहे. हा पण अतिशय धक्कादायक. असो. काश्मीर फाईल्स पाहण्यापूर्वी पूर्वतयारी केली आहे. या वीकांताला पाहण्याचा प्लॅन आहे.
  • Log in or register to post comments
ड
डाम्बिस बोका Tue, 03/15/2022 - 22:31 नवीन
सॅम हॅरिस म्हणतो की "(धार्मिक) मूलतत्ववाद हा वाईट नसतो जर धर्माची मूलतत्त्वेच चांगली असतील तर. उदा. एखादा जैन जितका कट्टर होत जाईल तितका तो समाजावर उपकारक, अहिंसक आणि चांगला होत जाईल. इतका की पडलेली फळं खाऊन पोट भरेल, चालताना मुंगी देखील चिरडणार नाही, बोलताना तोंड झाकून घेईल. म्हणून इस्लामी मूलतत्ववादी आणि जैन मूलतत्ववादी यांच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे." हा मुद्दा नाही पटला कुठलाही धर्म जेव्हा कट्टरते कडे झुकतो तेव्हा त्याचे दोष दिसू लागतात. स्वतःला शांतताप्रेमी म्हणून मिरवणारे जैन धर्मीय जेव्हा मांसाहारी मराठी लोकांना सोसायटी मधून हाकलून देतात किंवा मुंबई मध्ये आसुन घर द्यायला नकार देतात, तेव्हा धर्म शेवटी कुठे घेऊन जातो ते कळते
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 03/16/2022 - 04:40 नवीन
कुठलाही धर्म जेव्हा कट्टरते कडे झुकतो तेव्हा त्याचे दोष दिसू लागतात. स्वतःला शांतताप्रेमी म्हणून मिरवणारे जैन धर्मीय जेव्हा मांसाहारी मराठी लोकांना सोसायटी मधून हाकलून देतात किंवा मुंबई मध्ये आसुन घर द्यायला नकार देतात, तेव्हा धर्म शेवटी कुठे घेऊन जातो ते कळते
तुम्ही चुकीचे अजिबात बोलला नाही आहात. अति सर्वत्र वर्जयेत पण. मी माझे घर कोणाला द्यायचे याचा अधिकार मला असणे मी योग्य समजतो. मी मासे खात नाही. त्याचा वासही मला सहन होत नाही. असे असताना मी का बरे मासे खाणार्‍या माणसांना माझ्या घरात जागा देऊ? अगदी त्याच पध्दतीने साधारणतः माझ्या विचारांची जवळीक असलेला शेजार असेल तर तो मला भावतो. इथे कोणत्या धर्माचा वगैरे प्रश्न नसून ही साधारणतः मानसिकता असते. त्या बद्दल बोलतोय. कट्टर जैन कसे वागतात याच्या समर्थनार्थ मी हे बोलत नाही आहे. पण ते असो. जैन कितीही कट्टर झाला तरीही ते दोषपूर्ण वर्तवणूक करतात म्हणजे ते बलात्कार, खून, जाळपोळ वगैरे करत नाहीत. किंवा "जैन धर्म स्विकारा किंवा मरा" अशा अटीही लादत नाहीत. एवढे तरी मान्य करू शकाल का? "काश्मिर फाईल्स" हा धाग्याचा विषय आहे म्हणून विचारतोय. तरीही काश्मीर फाईल्स मधली कट्टरता व जैन कट्टरता ही एकाच प्रकारची आहे. त्यात डावे उजवे असे काहीही करता येत नाही असे तुम्हाला वाटत असेल तर मात्र माझा पास.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Wed, 03/16/2022 - 05:31 नवीन
जैन कितीही कट्टर झाला तरीही ते दोषपूर्ण वर्तवणूक करतात म्हणजे ते बलात्कार, खून, जाळपोळ वगैरे करत नाहीत.
हे फारच धाडसी विधान झाले काका. बलात्कार खून जाळपोळ हे फक्त धार्मिक सेंटिमेंट्स मधूनच होतात असे नाही ना हो. म्हणजे वरील गुन्हे करायला आर्थिक, सामाजिक व इतरही कारणे असू शकतात ना,
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 03/16/2022 - 07:18 नवीन
म्हणजे वरील गुन्हे करायला आर्थिक, सामाजिक व इतरही कारणे असू शकतात ना,
धाग्याचा विषय आहे काश्मीर फाईल्स. मी धागा विषयाच्या संदर्भात बोलतोय. काश्मीर फाईल्स मधे आर्थिक व सामाजिक तसेच इतरही कारणे असून धार्मिक कारणे ही त्यामुळे फारशी महत्वाची ठरत नाहीत असे तुम्हाला म्हणावयाचे असेल तर माझा पास.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड गुरुवार, 03/17/2022 - 10:22 नवीन
फक्त "जैन असे करत नाहीत" ह्या क्लीनचिटला माझा आक्षेप होता, किंबहुना काश्मीरमध्ये पाकिस्तानी लष्कर घुसले त्या क्षणापासून ते धर्मयुद्ध होतेच की, त्याबाबतीत वादच नाही माझा काही. मुद्दा अजून सुलभ करता, जैन अजिबातच हिंसक गुन्हे करत नाहीत असे नाही इतके मात्र मी म्हणतोय.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 03/17/2022 - 11:39 नवीन
मला जे काही म्हणावयाचे आहे ती मी म्हटले आहे. तुम्ही जो काही खुलासा करायचा आहे तो केला आहे. मिपाकर सुज्ञ आहेत. ते योग्य तो बोध त्यातून घेतीलच.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Wed, 03/16/2022 - 05:33 नवीन
मराठी माणसाला बऱ्याच गुजराती सोसायटीमध्ये घर भाड्याने सोडा पण विकतही घेता येत नाही. घराचे उदाहरण सोडल्यास जैन वगैरे लोक कितीही कट्टर वागले तरीही त्यांचा मात्र होईल आस वाटत नाही.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 03/16/2022 - 07:26 नवीन
तरीही त्यांचा मात्र होईल आस वाटत नाही.
हे चक्क डोक्यावरून गेलं. :)
  • Log in or register to post comments
ड
डाम्बिस बोका Wed, 03/16/2022 - 14:18 नवीन
थोडे अवांतर होते आहे. विषय वेगळा आहे म्हणून हा मुद्दा आटोपता घेऊया. बाकी चर्चा खूप चांगलीं चालली आहे. बरीच नव्याने माहिती मिळाली.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 03/16/2022 - 14:24 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
न
निनाद Wed, 03/16/2022 - 02:02 नवीन
हिंदू एक असला पाहिजे. आपल्या बांधवांवर कुणी हल्ल्ला करत असेल तो परतवण्यासाठी हे आवश्यक आहे. आज वर आपल्याला कसा धार्मिक छळ भोगावा लागला याचे रेकॉर्ड्स जपले पाहिजेत. त्या चुकातून शिकले पाहिजे. पण चित्र काय आहे? हिंदूंचा छळ हे एक विकिपिडिया चे पान सुद्ध आपण पाहिले तर पूर्ण झालेले नाही. https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%9B%E0%A4%B3 यात लाल रेघा असलेले प्रत्येक पान हिंदूंनी तयार केले पाहिजे! जितका छळ आपला हिंदूंचा झाला आहे तेव्हढा कोणत्याही धर्माचा या भूतलावर झालेला नाही. मग प्रत्येक छळाचा प्रकार येथे नोंदलेला हवा. तुम्ही चांगली चित्रे काढता? मग काढा या छळाची चित्रे आणि डकवा येथे! अगदी साठी लाईन आर्ट पण चालतील पण त्यातून काय भोगले ते कळले पाहिजे पुढील पीढीला. हे एक गोष्ट लक्षात ठेवा इंग्रजी विकि हा डाव्यांनी ताब्यात घेतला आहे. त्यामुळे तिकडे जाण्यात अर्थच राहिलेला नाही! मग कोण कोण येतंय?
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Wed, 03/16/2022 - 03:35 नवीन
हिंदू एक असला पाहिजे. आपल्या बांधवांवर कुणी हल्ल्ला करत असेल तो परतवण्यासाठी हे आवश्यक आहे. नक्की काय करायला हवे?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 03/16/2022 - 03:44 नवीन
https://www.esakal.com/manoranjan/kashmir-files-is-tax-free-in-bjp-ruling-states-shk99 हिंदू हितवादी भाजपने तर करून दाखवले... आता स्वयंघोषित हिंदू हितवादी शिवसेना काय निर्णय घेते? हे बघणे रोचक ठरेल...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 03/16/2022 - 03:55 नवीन
हा प्रतिसाद, आग्या 1990 , यांना नाही ...
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Wed, 03/16/2022 - 04:21 नवीन
हिंदूंनi एकत्र व्हायचे म्हणजे नक्की काय करायचे? २)एकत्र येवून नॉन पॉलिटिकल संस्था स्थापन करायच्या आणि जेव्हा असे धार्मिक हल्ले होतील तेव्हा एकजूट होवून प्रतिकार करायचा. २) हिंदू च्या उन्नती साठी सामूहिक प्रयत्न करायचे. ३) की हिंदू वादी म्हणून स्वतःला प्रमोट करणाऱ्या राजकीय पक्षांना मत द्यायचे. ४) की कोणत्या ही योग्य राजकीय पक्षांना मत द्यायचे पण त्यांना मुस्लिम धर्माचे वेगळे लाड करून द्यायचे नाहीत. नक्की काय करायचे. हिंदुवादी म्हणून स्वतःला प्रोमोट करणाऱ्या राजकीय पक्षांना मत देणे सोडून बाकी सर्व हिंदू नी केले तर . त्याला हिंदू नी एकत्र येणे समजले जाईल का? की फक्त आणि फक्त हिंदुत्व वादी पक्षांना निवडणुकीत मत देणे म्हणजे हिंदू नी एकत्र येणे अशी एका वाक्यात व्याख्या आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 03/16/2022 - 03:43 नवीन
चित्रपट पाहणे आलं. बाकी रोचक चर्चा. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 03/16/2022 - 04:03 नवीन
मुळांत, हे तिन्ही सिनेमे, सत्य घटनेवर आधारित आहेत... सकारात्मक विचारसरणी असलेले लोक काय करू शकतात? हे झूंड दाखवतो तर, इतरांना धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडणारे आणि इतर धर्मियांना त्रास देणारे, काय करू शकतात? हे काश्मीर फाइल्स दाखवतो. पावनखिंड हा उत्कृष्ट नेता असेल तर, सामान्य जनता देखील, त्या नेत्याच्या पाठीमागे कशी उभी राहते? हेच दाखवतो ...
  • Log in or register to post comments
द
दिगोचि Wed, 03/16/2022 - 04:03 नवीन
येथे लिहिणार्या अनेकाना हे ठाउक नसावे की कुराणात अनेक ठिकाणी असेच सान्गितले आहे. कि जे मुस्लिम नाहीत त्यानी मुस्लिम धर्म स्वीकारावा नाहीतर मरायला तयार रहावे. उदा" Muster against them all the men and cavalry at your disposal so that you can strike terror into the enemies of Allah and of the believers and others besides them who may be unknown to you, though Allah knows them. अजुनहि मुस्लिम्स तेच करत आहेत कारण कुराणच्या विरुद्ध कोणीहि बोलु शकत नाही कारण तो अल्लाह चा शब्द आहे. (रच्याकने अल्ला या शब्दाचा अर्थ आई असाआहे)
  • Log in or register to post comments
स
सुरिया Sat, 03/19/2022 - 15:40 नवीन
(रच्याकने अल्ला या शब्दाचा अर्थ आई असाआहे)
कुठल्या भाषेत?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 9 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 9 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 9 hours ago
  • सुंदर !!
    1 day 9 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 9 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा