Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

युक्रेनवरून तणाव

प
पराग१२२६३
Sat, 02/12/2022 - 04:51
🗣 434 प्रतिसाद
सध्या रशियाच्या युक्रेन, युरोप आणि अमेरिकेबरोबरच्या संबंधांमध्ये बराच तणाव निर्माण झालेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून रशियाने आपले सुमारे 1 लाख 10 हजार सैनिक युक्रेनच्या सीमेवर तैनात केलेले आहेत. त्यामुळे युक्रेनवर रशिया आक्रमण करण्याच्या तयारीत आहे, अशी भिती पाश्चात्य देशांकडून व्यक्त होत आहे. मॉस्कोकडून ती शक्यता फेटाळून लावली जात आहे. हा तणाव निवळावा यासाठी यात सहभागी असलेली प्रत्येक बाजू आग्रही आहे. मात्र त्याचवेळी यातील मुख्य घटक असलेले अमेरिका आणि रशिया आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत. पण एकीकडे राजनयिक पातळीवरून हा तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न होत असतानाच दोन्ही बाजूंमध्ये आपापली शक्ती दाखवून देण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. युक्रेनच्या पूर्वेकडील डोनबास, दोनेस्क आणि क्रिमीया द्वीपकल्पामधील (Crimean Peninsula) आपल्या समर्थक फुटिरतावाद्यांना रशियाने पाठिंबा दिल्यापासून युक्रेनमधील स्थिती अस्थिर बनली आहे. कीवच्या वाढत्या रशियाविरोधी भूमिकांच्या पार्श्वभूमीवर 2014 मध्ये युक्रेनच्या रशियनबहुल आणि व्यूहात्मकदृष्ट्या महत्वाच्या क्रिमीया द्वीपकल्पावर रशियाने ताबा मिळवला. तेव्हापासून अमेरिका आणि युरोपीय संघाने रशियावर वेगवेगळे निर्बंध घातले आहेत. पण त्याचवेळी अमेरिकेकडून नाटोच्या (NATO) विस्ताराचे प्रयत्नही अविरतपणे सुरू आहेत, ज्यावर रशियाचा मुख्य आक्षेप आहे. युक्रेन नाटोमध्ये सामील झाल्यामुळे रशियाच्या सुरक्षेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हणूनच युक्रेनला नाटोचे सदस्यत्व दिले जाऊ नये, ही मागणी मॉस्कोने आग्रहाने लावून धरलेली आहे. त्यावर विचार करण्याऐवजी अमेरिकेडून रशियाला आक्रमक ठरवून आपले धोरण पुढे रेटण्याचा प्रयत्न केला जात आहे. युक्रेनवरून निर्माण झालेल्या या तणावाचा आपल्या आणि एकूणच युरोपच्या सुरक्षेवर परिणाम होत असल्यामुळे हा प्रश्न शांततामय मार्गाने सोडवण्यासाठी फ्रान्स, जर्मनीने पुढाकार घेतला आहे. युरोपीय देशांना रशियाशी संबंध सुरळीत सुरू ठेवणे आर्थिक, व्यापारी दृष्टीने आवश्यक वाटत आहे. पण दुसरीकडे अमेरिकेच्या स्वत:च्या भू-राजकीय गरजांमुळे युरोपीय देशांना स्वतंत्रपणे भूमिका घेणे अवघड होत आहे. या परिस्थितीतच गेल्या काही महिन्यांपासून युरोपात इंधनाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. इंधनाच्या टंचाईमुळे त्याचे दर युरोपात भडकलेले आहेत. त्यामुळे रशियाकडून गॅसपुरवठा होण्याशिवाय युरोपसमोर अन्य पर्याय नाही. नॉर्ड स्ट्रीम-2 चा मुद्दा युरोप मोठ्या प्रमाणात रशियातून निर्यात होणाऱ्या इंधनावर अवलंबून आहे. युरोपला हा पुरवठा सध्या युक्रेनमार्गेच नॉर्ड स्ट्रीम-1 वायूवाहिनीद्वारे होत आहे. या वायूवाहिनीमुळे युक्रेनला दरवर्षी सुमारे 1.2 अब्ज अमेरिकन डॉलरचा महसूल मिळत आहे. काही वर्षांपूर्वी कीवकडून या वाहिनीचे वापर शुल्क वाढवून मिळवण्यासाठी अडवणूक होत होती. त्याचा परिणाम युरोपच्या गॅसपुरवठ्यावर झाला होता. त्यामुळे जर्मनीने वाढती मागणी आणि सुरक्षा या कारणांनी बाल्टिक समुद्रातून नॉर्ड स्ट्रीम-2 (Nord Stream-2) वायूवाहिनी टाकण्यासाठी 2018 मध्ये मान्यता दिली. नॉर्मंडी आराखडा जर्मनी, फ्रांस, रशिया आणि युक्रेन यांचाय प्रतिनिधींनी फ्रांसमधील नॉर्मंडी येथे चर्चा केली होती. 6 जुलै 2014 रोजी नॉर्मंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या विजय दिवसाच्या 70 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या देशांचे नेते पहिल्यांदा भेटले होते आणि त्यामध्ये युक्रेनच्या दोनबास प्रांतातील संघर्ष मिटवण्यावर चर्चा झाली होती. या 4 देशांदरम्यानचा हा एक अनौपचारिक मंच आहे. याच मंचाच्या माध्यमातून युक्रेनचा प्रश्न चर्चेच्या आणि शांततापूर्ण मार्गी लावण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. लिंक https://avateebhavatee.blogspot.com/2022/02/blog-post_12.html

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 117188 views

🗣 चर्चा (434)
प
प्रसाद गोडबोले Sat, 02/12/2022 - 05:44 नवीन
युध्द व्हायला हवे ! ह्या कोव्हिड मुळे जवळपास सर्वच जगात सर्वच देशांनी एक्स्ट्रा लिक्विडीटी पंप केलेली आहे, अमेरिकेने तर काही ट्रिलियन डॉलर्स स्टिम्युलस चेक्स , पीपीपी अन अन्य सबसीडींच्या माध्यमातुन वाटले आहेत . शिवाय इन्टरेस्ट रेट्स सुध्दा लो लेव्हल ला आहेत अन सर्वच जण घाबरत आहेत की इन्टरेस्ट रेट्स वाढवले तर एकॉनॉमी ढासळेल. अन रेट्स आहेत त्या लेव्हला ठेवले तर लाँगटर्म स्टॅग्फ्लेशन चा धोका आहे. अमेरिकेत आधीच भयंकर इन्फ्लेशन झालेले आहे. त्या तुलनेने भारतात समहाऊ आपण अजुन कुशन्ड आहोत. (तरी रडाणारे राजकीय पक्ष रडत आहेतच ते अलहिदा.) एकुणच जगाची आर्थिक स्थिती गंभीर आहे. युध्द झाले तर पेट्रोल सह जवळपास सर्वच गोष्टी अचानक वाढतील , काहीकाळ इन्फ्लेशन भयंकर वाढेल, पण युध्दानंतर सर्व नॉर्मल ला आले , सुरळीत झाले की अर्थचक्राला गती मिळेल ह्यात शंका नाही ! Even a broken window creates an employment for glass manufacturing! त्यामुळे एक व्यवस्थित युध्द व्हायला हवे , व्यवस्थित , शीतयुध्द वगैरे नको , त्याने आर्थिक परिस्थिती अजुन चिघळेल !
  • Log in or register to post comments
T
Trump Sat, 02/12/2022 - 06:46 नवीन
नक्की कोठे युध्द व्ह्यायला हवे?
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Sat, 02/12/2022 - 07:52 नवीन
आमच्या बाजूच्या हौसिंग सोसायटीने न्यूक्लियर वेपन्स चा साठा करून ठेवला आहे ही बातमी अमेरिकन अध्यक्षांपर्यंत पोचवता येईल काय? ट्रम्प च्या वेळी सोपं होतं. डायरेक्ट ट्विट करता येत होतं.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Sat, 02/12/2022 - 08:48 नवीन
प्रतिसादावरुन बौध्दिक कुवत दाखवुन दिल्याबद्दल मंडळ आभारी आहे =))))
  • Log in or register to post comments
क
कासव Sat, 02/12/2022 - 13:27 नवीन
नक्कीच. मला तर वाटतं मोठ युद्ध (महायुद्ध) व्हायला हवे. ह्याने मोठे मासे एकमेकात भांडून मरतील. लहान मासे तसेही मरतील. आपल्यासारख्या मध्यम मस्याचे पण हाल हाल होतील पण शेवटी सगळ्यांना अक्कल तरी येईल.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sat, 02/12/2022 - 14:12 नवीन
या तिसर्‍या युध्दात जर मानवजातच नष्ट झाली तर अक्कल नक्की कुणाला येईल? :) कारण आता जर युध्द झाले तर सर्वांची एकच स्लोगन असेल. मला जिंकता आलं नाही तर मी निदान दुसर्‍या कुणालाही जिंकू देणार नाही. आणि हाच विचार सर्वनाश घडवून आणू शकतो. असो.
  • Log in or register to post comments
स
साहना Mon, 02/14/2022 - 11:16 नवीन
हे असले वैफल्यग्रस्त बोलणे, ह्याला काहीही अर्थ नाही. काय अक्कल अपेक्षित आहे आणि कशा बद्दल ? सध्याचा मानवजातीचा काळ सर्वांत शांततेचा आहे, अभूतपूर्ण शांतीचा आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्या सध्या लोकशाहीत आहे, अन्नाची कमतरता नाही इत्यादी इत्यादी इत्यादी. अत्याधिक हिंसा होऊन आलेले शहाणपण काय फायद्याचे आहे ? मेलेले शव पाण्यांत वर येते त्याला पोहणे म्हणत नाहीत आणि त्याचा त्या शवाला काहीही फायदा नाही.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Mon, 02/14/2022 - 12:43 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 02/24/2022 - 07:33 नवीन
युध्द व्हायला हवे ! >>> अब आयेगा मजा !!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 02/12/2022 - 07:14 नवीन
कर्जबाजारी अमेरिका [ ३० ट्रिलियन कर्जाचा बोजा असलेला नवा टप्पा हल्लीच ओलांडला आहे. ] या सगळ्या प्रकरात सारख्या काड्या करत आहे. ब्लुमबर्ग ने ४ फेब्रुवारीला रशियाने युक्रेनवर आक्रमण केले अशी फेक न्यु़ज त्यांच्या पोर्टलवर बाराच काळ ठेवली होती, नंतर मग मागे घेतली. स्वत:ची अर्थव्यवस्था आणि चलन गाळात जाताना जगाचे लक्ष युद्धाकडेच जावे यासाठी सगळी खटपट. काळ्या समुद्रात रशियन नेव्ही वॉर ड्रिल्स करणार आहे म्हणे ! तर बेलारुस मध्ये देखील अशीच ड्रील्स होतील.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Happy... :- Pharrell Williams
  • Log in or register to post comments
T
Trump Sat, 02/12/2022 - 09:06 नवीन
वैश्विक चलन म्हणुन असलेली डॉलरला मान्यता जात नाही तोपर्यंत अमेरीकेचा कर्जबाजारीपण वाढतच जाणार. दुवे: https://www.thebalance.com/world-currency-3305931 https://www.thebalance.com/dollar-strength-why-is-it-so-strong-right-now-3305726 https://foreignpolicy.com/2021/01/15/rise-fall-united-states-financial-empire-dollar-global-currency/
कर्जबाजारी अमेरिका [ ३० ट्रिलियन कर्जाचा बोजा असलेला नवा टप्पा हल्लीच ओलांडला आहे. ]
  • Log in or register to post comments
T
Trump Sat, 02/12/2022 - 09:03 नवीन
हे हा वादविवाद वाटतो इतका सरळ नाही. इथे काही मी दुवे दिले आहेत. https://misalpav.com/comment/1133244#comment-1133244 रशियाचे आणि युरोपचे वादविवाद होणे, अमेरीकेसाठी चांगले आहे. सध्या कोणत्याही ठिकाणी मोठे युध्द सुरु नसल्याने, शस्रास्त्रे विकणे, रशियाचा गॅस ऐवजी स्वत:चा गॅस विकणे इत्यादीसाठी चांगले आहे. इतर दुवे: https://www.vox.com/22881709/nord-stream-2-russia-ukraine-germany-united-states-cruz https://www.reuters.com/business/energy/us-european-lawmakers-issue-statement-opposing-nord-stream-2-2021-08-02/ https://www.cleanenergywire.org/factsheets/gas-pipeline-nord-stream-2-links-germany-russia-splits-europe
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Sat, 02/12/2022 - 14:28 नवीन

सो मेनी दत्तोबा कदम्स, इज धिस मिसळपाव ऑर बेनसन अँड जानसन कंपनी ऑफ बॅलार्ड इस्टेट मुंबई

&#129315 &#129315 &#129315 &#129315 &#129315 &#129315
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Sat, 02/12/2022 - 15:26 नवीन
त्यांना शहर,गाव विभागून ह्यांची वस्ती वेगळी करावी . आणि सहा मशीन त्यांच्या वस्ती चा वीज पुरवठा,पाणी पुरवठा,खाद्य पुरवठा,औषध पुरवठा बंद करावा. त्यांना रोजगार,पगार,बँक सेवा काहीच मिळणार नाही ह्याचा बंदोबस्त करावा. आणि सीमा बंद कराव्यात. सहा महिन्यांत तेथील मागणी वाढेल आणि त्या वस्त्या श्रीमंत होईल. हा प्रयोग करावाच.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Sat, 02/12/2022 - 18:42 नवीन
तुम्ही नक्की किती आयडी काढुन ठेवलेत हो ? =))))
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Wed, 02/16/2022 - 08:35 नवीन
युक्रेन चे जे राजदूत आहेत त्यांनी भारतातील अती शहाण्या मीडिया वर ( आणि ही अती शहाणी मीडिया मध्ये bjp समर्थक च मीडिया आहे)आरोप केला आहे. ते वेगळे सभ्य भाषेत बोलले पण भारतीय भाषेत. भारतीय मीडिया नी (bjp समर्थक अविचारी मीडिया) बकवास करू नये मूर्ख सारखे परिस्थिती चे वर्णन करू नये युक्रेन मधील स्थिती खराब नाही रशिया शी असलेले आमचे मतभेद आम्ही शांतेत चर्चे नी सोडवू.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 02/16/2022 - 14:49 नवीन
राजेश भाऊ, कोणी कोणी काय काय बातमी दिली ते पम सांगा जर एकदा..
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 02/16/2022 - 17:55 नवीन
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 02/16/2022 - 17:59 नवीन
आज आलेलं कायप्पावरील ढकलपत्र . युक्रेनियन संकटाचा युक्रेनशी काहीही संबंध नाही. हे जर्मनीबद्दल आहे आणि विशेषतः, नॉर्ड स्ट्रीम 2 नावाची जर्मनीला रशियाशी जोडणारी जी पाईपलाईन आहे त्याच्याशी संबंधीत आहे. वॉशिंग्टनला या पाइपलाइन मुळे युरोपमधील आपले प्रभूत्व धोक्यात येईल असे वाटते आणि त्यासाठी जेव्हां संधी मिळेल तेव्हां हा प्रयत्न अयशस्वी व्हावा असं काहीतरी करण्याचा प्रयास करते. असे असले तरी, नॉर्ड स्ट्रीमची प्रगती चालूच राहीली व आता तर ती पूर्णपणे कार्यरत व्हायला तयार झाली आहे. एकदा जर्मन नियामकांनी अंतिम प्रमाणपत्र प्रदान केले की, गॅस वितरण सुरू होईल. असे झाले तर जर्मन घरमालक आणि व्यवसायांना स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जेचा विश्वासार्ह स्त्रोत असेल तर रशियाच्या गॅसच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल. ही दोन्ही पक्षांसाठी जमेची बाजू आहे. या घडामोडींबद्दल अमेरिकन परराष्ट्र धोरण अनुकूल नाही. जर्मनीने रशियन गॅसवर अधिक अवलंबून राहावे असे त्यांना वाटत नाही कारण फायदेशीर व्यापार विश्वास निर्माण करतो आणि विश्वासामुळे या व्यापाराचा विस्तार होतो. जसजसे संबंध विश्वासार्ह होत जातात, तसतसे व्यापारातील अडथळे दूर होतात, नियम सुलभ होतात, प्रवास आणि पर्यटन वाढते आणि एक नवीन सुरक्षा संरचना विकसित होते. जर असे झाले तर, जर्मनी आणि रशिया हे मित्र आणि व्यापारी भागीदार बनतील व मग जर्मनीला अमेरिकेच्या लष्करी तळांची गरज नाही, अमेरिकेने बनवलेल्या महागड्या शस्त्रास्त्रे आणि क्षेपणास्त्र यंत्रणेची गरज नाही आणि नाटोचीही गरज नाही. परकीय चलनातील हिशोब ठेवण्यासाठी ठेवण्यासाठी यूएस डॉलरमध्ये व्यवहार करण्याची किंवा यूएस ट्रेझरींचा साठा करण्याची आवश्यकता नाही. व्यावसायिक भागीदारांमधील व्यवहार त्यांच्या स्वतःच्या चलनात केले जाऊ शकतात ज्यामुळे डॉलरच्या मूल्यात तीव्र घट आणि आर्थिक शक्तीमध्ये नाट्यमय बदल घडून येऊ शकतात. म्हणूनच बिडेन प्रशासन नॉर्ड स्ट्रीमला विरोध करते. ही केवळ पाइपलाइन नाही, तर ती भविष्यात डोकावयाची खिडकी आहे. त्यातून असं भविष्य दिसतंय की, ज्यामध्ये युरोप आणि आशिया एका मोठ्या मुक्त व्यापार क्षेत्रामध्ये एकत्र आले आहेत. त्यामुळे त्यांचे परस्पर सामर्थ्य आणि समृद्धी वाढते आहे आणि यूएस फक्त हे हात चोळत बघत बसली आहे. अमेरिकेने गेल्या 75 वर्षांपासून जर्मनी व युरोपची देखरेख केली आहे. जर्मन-रशिया युतीने या महासत्तेच्या ऱ्हासाचा जणू संदेश दिला आहे. सध्याच्या अमेरिकेच्या विश्वासाला जो तडा जाऊ पाहतो आहे त्यासाठी हे आणखीनच त्रासाचे आहे. म्हणूनच नॉर्ड स्ट्रीमची योजना तडीस जाऊ नये आणि जर्मनीला आपल्याच कह्यात ठेवण्यासाठी वॉशिंग्टनने सर्व काही करण्याचा निर्धार केला आहे. हा अमेरिकेच्या जणू काही जीवन मरणाचा प्रश्न झाला आहे. इथे मग युक्रेन चित्रात येते. नॉर्ड स्ट्रीम उधळण्यासाठी, जर्मनी आणि रशिया यांच्यात फूट पाडण्यासाठी युक्रेन हे वॉशिंग्टनचे ‘निवडलेले एक शस्त्र आहे. ही रणनीती यूएस फॉरेन पॉलिसी हँडबुकच्या रुब्रिक अंतर्गत पृष्ठ एकवरून घेतली आहे: फूट पाडा आणि राज्य करा. ----------------------------------------------------------------------------------------------------- ही मात्र मी माझ्या डोक्याने चालवलेली टिपण्णी आहे. रशिया असो की अमेरिका, दोघेही लबाड आहेत, स्वार्थी आहेत. कोणाचे भले व्हावे म्हणून ते काही करत नाहीत. तर फक्त स्वत:चे हित साधण्यासाठी जगाच्या कल्याणाची भाषा बोलत असतात. इतकेच नव्हे तर युक्रेनने गॅस पाईपसाठी वाढीव दर मागीतला म्हणूनच ही दुसरी पाइपलाईन टाकायची वेळ आली असे रशिया/जर्मनी म्हणतात. हा दर वाढवणे प्रकार सुध्दा अमेरिकेच्या सुपिक डोक्यातून आलेला असू शकतो. किंवा युक्रेनला वाढीव दर दिला तर सर्व अर्थकारणच बिनसू शकते. शिवाय दर वाढवणे हा युक्रेनचा हक्कच आहे असा काहीसा अर्थ यातून काढला जाऊन, भविष्यात युक्रेन दर आणखीही वाढवू शकते. ही नवीनच टांगती तलवार स्वतःवर स्वतःहून कोण लादून घेणार? त्यासाठीही हे सगळं चालू असेल. सगळं स्वार्थी जगाचे खेळ आहेत. काय खरं काय खोटं कसं ओळखणार? असो.
  • Log in or register to post comments
ॲ
ॲबसेंट माइंडेड… Wed, 02/16/2022 - 19:37 नवीन
प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Fri, 02/18/2022 - 09:27 नवीन
या वरच्या गडबडीत माझ्या वनप्लसच्या "नॉर्ड २ " या मोबाईलला काही धोका नाही नां? इति. श्री. श्री. श्री. १८८ (२०१६ रा. रा. रा. )
  • Log in or register to post comments
स
साहना Fri, 02/18/2022 - 22:11 नवीन
सध्या रशिया विरुद्ध नाटो जो तणाव आहे त्याला नॉर्दस्ट्रीम २ कारणीभूत नाही. नॉर्दस्ट्रीम २ ला विरोध हा २०११ पासून आहे आणि जर्मनीने अमेरिकेला इथे न जुमानता प्रकल्पाला पाठिंबा दिला आहे. त्यासाठी युद्धाचे बिगुल अमेरिका वाजवू पाहत आहे असे अजिबात नाही. १. रशियाने युक्रेन सीमेवर प्रचंड सैन्य आणून ठेवले आहे. साधारण १४०,००० सैनिक ह्या सीमेवर सध्या तैनात आहे. नवीन पूल, टँक्स वगैरे सर्वत्र आहेत हे उपग्रहावरील चित्रांतून स्पष्ट दिसत आहे. २. रशियन सैनिकांची जमवा जमव हि खूप आधीपासून सुरु होती आणि कदाचित त्याचाच वास लागून बायडन ह्यांनी घाई घाईने अफगाणिस्तानातील आपली मोहीम बंद केली असावी असा कयास आहे. ३. रशियाचे ६०% निर्यात उत्पन्न हे शेवटी फॉसिल ऊर्जास्रोतातून येते. हे ऊर्जास्रोत हळू हळू गायब होत जाणार आहेत आणि त्यांची जागा नवीन स्रोत घेणार आहेत. रशियाची खेळी हि दूरगामी फायद्याची नसून त्याचा फायदा फार तर २०-३० वर्षेच त्यांना होईल. जर्मनीलाही हे ठाऊक आहे आणि अमेरिकेलाही. ४. युरोप रशियावर अवलंबून नाही तर रशिया युरोप च्या आयातीवर अवलंबून आहे. रशियन आर्थिक व्यवस्थेतील हि एक महत्वाची कमजोरी आहे आणि ती दूर होणे शक्य नाही. नॉर्दस्ट्रीम २ बंद झाली तरी युरोप ला खूप त्रास होतील हे खरे असले तरी, तो त्रास कमी करण्यासाठी नॉर्वे, टर्की, ऑस्ट्रेलिया, कतार इत्यादींनी कंबर कसली आहे. "वातावरण बदल" ह्या ढोंगाच्या खाली नॉर्वे, जर्मनीने आपल्याच पायावर कुर्हाड मारून घेतली म्हणून हा प्रसंग त्याच्यावर ओढवला आहे. ५. पुतीन सध्या काही तरी प्लॅन करत आहेत हे १००% खरे आहे. बायडन ह्यांची लोकप्रियता अमेरिकेत खूपच खालावली आहे त्याशिवाय त्यांची मती ठीक नाही असे आरोप केले जातात. कमला ह्यांच्यावर कुणाचाच विश्वास नाही. आधी ट्रम्प आणि आता अफगाणिस्तान ह्यांच्यामुळे नॅटो संबंध ताणले गेले आहेत. ह्या सर्वांचा फायदा घेऊन युक्रेन वर आक्रमण नाही तर किमान युक्रेन ला अस्थिर करणे हा पुतीन ह्यांचा डाव असू शकतो. ६. बायडन ह्यांनी पाठीचा कणा दाखवून रशियाविरोधांत युद्धाची तयारी सुरु केली, त्यांच्या राजकीय विरोधकांनी सुद्धा त्यांत खो घातला नाही उलट बायडन हे गरजेपेक्षा मऊ आहेत असे म्हटले. जर्मनी आणि uk ने अमेरिकेच्या री मध्ये री ओढत युद्धाची तयारी केली. अनेकदा गॅस किंवा तेल वगैरे साठी अमेरिका युद्धाची आखणी अमेरिका करते असे म्हटले जाते पण त्यांत तथ्य नाही. बहुतांशी युद्धाची आखणी अनेक विविध कारणांनी केली जाते आणि तेल कंपन्या वाहत्या गंगेत हात धुवून घेतात. तो निव्वळ एक छोटासा घटक आहे. रशिया चे एकूण गॅस एक्स्पोर्ट बिल आहे २५-३० बिलियन. असले शुल्लक आकडे अमेरिकेच्या खिजगणतीत सुद्धा नाही. फक्त काही रणगाडे इकडून तितके न्यायला अमेरिकेला तितका खर्च येईल. त्यामुळे २५-५० बिलियन साठी युद्ध बायडन करतील शक्य नाही. डॉलर चलन म्हणून बदलण्याची लायकी रुबल ची नाही त्यामुळे तोही अँगल इथे नाही. पुतीन ह्यांना वेळीच काबूत आणणे हा नाटो चा हेतू वाटतो. पुढे काय होते हे पाहणे मनोरंजक ठरेल ! भारताने ह्यांत तटस्थ भूमिका घेणेच युक्तीचे ठरेल.
  • Log in or register to post comments
स
साहना Fri, 02/18/2022 - 22:12 नवीन
https://www.youtube.com/watch?v=D8owY8TBvzI
  • Log in or register to post comments
T
Trump Sat, 02/19/2022 - 06:04 नवीन
संदर्भ द्या
"वातावरण बदल" ह्या ढोंगाच्या खाली नॉर्वे, जर्मनीने आपल्याच पायावर कुर्हाड मारून घेतली म्हणून हा प्रसंग त्याच्यावर ओढवला आहे.
रशियन नैसर्गिक वायु निर्यातीची मुल्य ४७.०२१ अब्ज अमेरीकन डॉलर आहे. ४७.०२१ अब्ज अमेरीकन डॉलर https://tradingeconomics.com/russia/exports-of-natural-gas ५४.०२१ अब्ज अमेरीकन डॉलर https://www.reuters.com/markets/europe/russias-oil-gas-revenue-windfall-2022-01-21/ कृपया तुमचे संदर्भ द्या.
रशिया चे एकूण गॅस एक्स्पोर्ट बिल आहे २५-३० बिलियन. असले शुल्लक आकडे अमेरिकेच्या खिजगणतीत सुद्धा नाही. फक्त काही रणगाडे इकडून तितके न्यायला अमेरिकेला तितका खर्च येईल. त्यामुळे २५-५० बिलियन साठी युद्ध बायडन करतील शक्य नाही. डॉलर चलन म्हणून बदलण्याची लायकी रुबल ची नाही त्यामुळे तोही अँगल इथे नाही.
असे श्री पुतीन का करतील? त्यातुन त्यांना काय मिळेल?
ह्या सर्वांचा फायदा घेऊन युक्रेन वर आक्रमण नाही तर किमान युक्रेन ला अस्थिर करणे हा पुतीन ह्यांचा डाव असू शकतो.
  • Log in or register to post comments
स
साहना Mon, 02/21/2022 - 22:37 नवीन
> संदर्भ द्या? का ? त्यातून काय साध्य होणार आहे ? तुम्हाला आक्षेप असल्यास तुम्ही प्रतिवाद लिहू शकता ! > ४७.०२१ अब्ज अमेरीकन डॉलर आहे. मूळ मुद्दा तोच आहे. युद्ध करण्याच्या कारणासाठी हि किमंत फारच शुल्लक आहे ! आणि हि फक्त आय आहे, नफा सुद्धा नाही. नफा आणखीन कमी असेल. दुसरी गोष्ट म्हणजे लॉन्ग टर्म च्या दृष्टिकोनातून नैसर्गिक वायूचे महत्व दिवसेंदिवस कमी होत जाणार आहे. इथे कुठलेही राष्ट्र जास्त रिस्क घेणार नाही. > असे श्री पुतीन का करतील? त्यातुन त्यांना काय मिळेल? https://youtu.be/xmqVfiFGpOA?t=853 ह्या काही मुलाखती आहेत त्या पहा. "पुतीन ला काय पाहिजे ?" ह्या विषयावर Nick Clegg ह्यांचे स्पष्टीकरण एका.
  • Log in or register to post comments
न
निनाद Tue, 02/22/2022 - 04:46 नवीन
शुल्लक? क्षुल्लक असा शब्द अपेक्षित आहे का? शुल्लक म्हणजे काय याची कल्पना नाही. क्षुल्लक म्हणजे नगण्य अशा अर्थाचा हा शब्द आहे. शब्दकौमुदी प्रमाणे याचा अर्थः टीचभर, गुंजभर, चिमूटभर, सूक्ष्म, इवलासा, बिंदुसमान, नखाएवढा, अल्प, लहान, कमी, एवढासाच, उगीच नांवाला, जवळ जवळ नाहींच, एवढातेवढा, तुटके तोटके, अगण्य, क्षुद्र, तुच्छ, नीच, फडतूस, भिक्कार, ऐरेगैरे, फालतू, यःकत्रित, गण्यागंपू, कोणत्या झाडाचा पाला? कवडी किंमतीची, एक नया पैसा किंमत होणार नाहीं, फुटकी कवडी कोणी देणार नाहीं, चार चव्वल किंमत नाहीं, दीड दमडीची सस्ती चीज.
  • Log in or register to post comments
स
साहना गुरुवार, 02/24/2022 - 21:04 नवीन
क्षुल्लक
  • Log in or register to post comments
T
Trump Tue, 02/22/2022 - 07:26 नवीन
मी वातावरण बदल नाकारणार्‍यांबद्दल प्रतिवाद करणार नाही. बरेचसे लिहिले गेले आहे.
का ? त्यातून काय साध्य होणार आहे ? तुम्हाला आक्षेप असल्यास तुम्ही प्रतिवाद लिहू शकता !
धन्यवाद. वायुवाहिनी हे तात्कालीक कारण आहे. मुळ कारण श्री पुतीन आणि चीन यांच्या भविष्यातील महत्वाकांक्षांना प्रतिबंध घालणे हे आहे. जे निक केग्ग यांनी सांगितले त्यात तथ्य आहे. टिप: जे कोणी यजमान (host) (नाव विसरलो मी आता) आहेत, ते कमालीचे वंशभेदी आणि white saviour प्रकारचे आहेत.
ह्या काही मुलाखती आहेत त्या पहा. "पुतीन ला काय पाहिजे ?" ह्या विषयावर Nick Clegg ह्यांचे स्पष्टीकरण एका.
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 02/24/2022 - 13:16 नवीन
ट्रम्पजी, प्लिज कोटेशन वर आणि तुमचे मत/प्रतिवाद खाली देत जावा. आधी तुमची टिप्पणी वाचून काही अर्थ लागत नाही.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 02/24/2022 - 13:57 नवीन
:) खरंय. जर तुम्ही गुगल भाषांतरावर एक हात फिरवणार नसाल तर इंग्रजी क्वोट प्रथम द्या. मराठीत लिहिलेलं कुठेही असलं तर मलातरी काही फरक पडत नाहीत. माझे डोळे प्रथम मराठीतलंच प्रथम शोधून काढतात व प्रथम तेच वाचलं जातं. गुगल भाषांतराची मला सवय आहे व मी नेहमीच त्यावर शेवटचा हात फिरवून मग पुढे पाठवत असल्याने मला अर्थही चटकन कळतो. :)
  • Log in or register to post comments
न
नगरी Sun, 03/06/2022 - 11:22 नवीन
  • Log in or register to post comments
न
नगरी Sun, 03/06/2022 - 11:22 नवीन
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 02/17/2022 - 06:12 नवीन
रशिया असो की अमेरिका, दोघेही लबाड आहेत, स्वार्थी आहेत. कोणाचे भले व्हावे म्हणून ते काही करत नाहीत. तर फक्त स्वत:चे हित साधण्यासाठी जगाच्या कल्याणाची भाषा बोलत असतात. जगात सर्वच देश तसे आहेत. त्यात कोणीही शुद्ध परमार्थ शोधू नये. तसे कशाला सर्व माणसे आणि प्राणी सुद्धा.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 02/17/2022 - 06:16 नवीन
बिडेन प्रशासन नॉर्ड स्ट्रीमला विरोध करते. बिडेनच नव्हे तर कोणतेही अमेरिकी प्रशासन नॉर्ड स्ट्रीमला विरोध करते. कारण साधे आहे जर जर्मनीने रशिया सोबतचा तेल/ गॅसचा व्यापार युरो किंवा रुबल्स मध्ये सुरु केला आणि त्याचे इतर देशांनी अनुकरण केले तर अमेरिकी डॉलर्स ची किंमत कागदाच्या कपट्यासारखी होईल. आणि कर्जावर दिवाळी करणारी अमेरिका दिवाळ्यात निघेल. अर्थात असे काही न होऊ देण्यात अमेरिका कोणतीही कासार सोडणार नाही हे उघडच आहे. मुळात पेट्रोलियम उत्पादने डॉलर्स देऊन का विकत घ्यायची हा मूलभूत प्रश्न आहे? हि अमेरिकेची दंडेली च आहे
  • Log in or register to post comments
T
Trump गुरुवार, 02/17/2022 - 07:28 नवीन
मुळ येथे आहे. फियाट चलन. The Bretton Woods agreement of 1944 established a new international monetary system. It replaced the gold standard with the U.S. dollar as the global currency. By so doing, it established America as the dominant power in the world economy. After the agreement was signed, America was the only country with the ability to print dollars. https://www.thebalance.com/bretton-woods-system-and-1944-agreement-3306133 https://en.wikipedia.org/wiki/Bretton_Woods_system ---- Fiat money became the norm after U.S. President Richard Nixon decided to abandon the gold standard in 1971. By doing so, he announced that the dollar was no longer convertible into gold. https://www.investopedia.com/ask/answers/041615/what-difference-between-fiat-money-and-representative-money.asp
मुळात पेट्रोलियम उत्पादने डॉलर्स देऊन का विकत घ्यायची हा मूलभूत प्रश्न आहे?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 02/17/2022 - 07:50 नवीन
हि अमेरिकेची दंडेली च आहे
  • Log in or register to post comments
T
Trump गुरुवार, 02/17/2022 - 08:59 नवीन
आता मुक्त जग आणि Leader of the free world वाले लपुन बसतील.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure गुरुवार, 02/17/2022 - 09:10 नवीन
Trump तुमचे मत आवडले एकदम स्पष्ट आहे किंवा कोणत्या ही विचारधारेचे आंधळे हमाल तुम्ही नाही आहात. मुक्त व्यापार,मुक्त अर्थ व्यवस्था ह्यांची वकिली करणारे . अमेरिका च नाही तर देश खऱ्या रुपात त्याच्या मध्ये अडथळा आणू स्वतःचा फायदा होण्यासाठी कोणी कोणाला काय विकावे,कोणी काय कर लावावेत.कोणी कशावर सबसिडी द्यावी हे ठरवता त. आणि मुक्त अर्थ व्यवस्थेचे भोई , हमाल इथे मात्र तोंड बंद करून असतात. कोणाला पटले नाही तर चालेल पण सत्य व्यक्त करण्याची हिंमत स्वतःला माणूस म्हणून घेणाऱ्या जीवात असलीच पाहिजे.
  • Log in or register to post comments
T
Trump गुरुवार, 02/17/2022 - 13:53 नवीन
अजि मी ब्रह्म पाहिले... चक्क श्री सुबोध खरे, श्री ट्रंप, श्री sunil kachure यांचे एकमत झाले.
  • Log in or register to post comments
T
Trump Sat, 02/19/2022 - 06:07 नवीन
Here’s How Reserve Currencies Have Evolved Over 120 Years https://www.visualcapitalist.com/cp/how-reserve-currencies-evolved-over-120-years/
  • Log in or register to post comments
T
Trump Sun, 03/06/2022 - 15:33 नवीन
  • Log in or register to post comments
S
sunil kachure गुरुवार, 02/17/2022 - 08:05 नवीन
मुक्त व्यापार , खुला व्यापार ह्याचे महत्व अमेरिका पाठीराखे भारताला सांगत असतात. स्वतः अमेरिका सर्व उपाय करून,दमदाटी करून मुक्त व्यापार होवू देत नाही. असे युक्रेन,अमेरिका,रशिया ,जर्मनी ह्यांच्या उदाहरण वरून वाटत.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर गुरुवार, 02/17/2022 - 13:09 नवीन
चांगला लेख आणि काही चांगले प्रतिसाद. तपशीलात थोडा बदल सुचवतो. लेखात म्हंटले आहे कि
युरोपला हा पुरवठा सध्या युक्रेनमार्गेच नॉर्ड स्ट्रीम-1 वायूवाहिनीद्वारे होत आहे.
नॉर्ड स्ट्रीम-1 (आणि नॉर्ड स्ट्रीम-२) पाईपलाईन युक्रेन मार्गे जात नसून बाल्टिक समुद्रातून जाते. Image removed. युक्रेन मधून युरोपला होणारा गॅस पुरवठा अन्य पाईपलाईन्स मधून होतो. EU साठी पाठवण्यात येणाऱ्या गॅस मध्ये युक्रेन हेराफेरी करत असल्याची रशियाची तक्रारही तशी जुनी आहे. जवळपास दोन दशकांपासून त्यांच्यात अनेक कारणांवरून कुरबुरी सुरु आहेत. युक्रेन कडून मागितले जाणारे वाढीव ट्रांझिट शुल्क हा मुद्दाही महत्वाचा आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये काम पूर्ण झालेल्या नॉर्ड स्ट्रीम २ पाईपलाईनचा वापर लवकरात लवकर सुरु करून युरोपला युक्रेनमार्गे होणारा गॅस पुरवठा पूर्णपणे थांबवण्यासाठी रशिया प्रयत्नशील आहे, पण अमेरिका त्यात काड्या घालत आहे. सध्या युक्रेन सीमेवरची तणावसदृश्य परिस्थिती ही नाटो मध्ये युक्रेनचा समावेश होऊ नये ह्यासाठी पुतीन ह्यांच्या दबावतंत्राचा भाग असून त्या आडून नॉर्ड स्ट्रीम २ चा वापर सुरु करण्याच्या दृष्टीने असलेले अडथळे दूर करणे हा उद्देशही असू शकतो. सध्या युरोपात प्रचंड वाढलेल्या नैसर्गिक वायुच्या किमती बघितल्यावर युरोपीयन देशही ही पाईपलाईन लवकरात लवकर सुरु व्हावी ह्यासाठी प्रयत्न करतील, त्यासाठी रशियाची बाजू घेतील असे माझे वैयक्तिक मत!
  • Log in or register to post comments
प
पराग१२२६३ गुरुवार, 02/17/2022 - 16:53 नवीन
धन्यवाद टर्मीनेटर, अभिप्रायाबद्दल आणि लेखात झालेल्या चुकीच्या उल्लेखाकडे लक्ष वेधल्याबद्दल.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Sat, 02/19/2022 - 07:19 नवीन
दोन्ही सांड अमेरिका आणि रशिया स्वार्थ साधण्यासाठी च युद्ध करण्या पर्यंत जात आहेत. अमेरिकेचा इतिहास बघितला तर अमेरिका एशियन देशात खूप हस्तक्षेप करते. मग तो इराण,इराक,अफगाण, रशिया, व्हिएतनाम,भारत,पाकिस्तान. अशी खूप मोठी देशांची लिस्ट आहे. युक्रेन वादात युरोपियन राष्ट्र ना विरोध करण्यात अशियन देशांनी एकजूट दाखवावी. स्वार्थ शेवटी सर्व च बघणार त्या साठी चीन शी हात मिळवणी करायला लागली तरी काही हरकत नसावी.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 02/19/2022 - 07:26 नवीन
युक्रेन वादात युरोपियन राष्ट्र ना विरोध करण्यात अशियन देशांनी एकजूट दाखवावी. म्हणजे काय काय आणि कसं कसं ते डिटेलवार मध्ये सांगा बघू
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Sat, 02/19/2022 - 07:53 नवीन
आशिया खंडातील देशांनी इतकेच करावे की हे सर्व देश युरोपियन देशांची बाजारपेठ बनू नयेत.. अमेरिका किंवा युरोपियन राष्ट्र आशिया खंडात सैनिकी हस्तक शेप करत असते त्याचा मूळ हेतू बाजार पेठ वाढवणे हाच असतो. त्या मुळावर च घाव घातला पाहिजे. व्यापारी संबंध आशिया खंडातील देशांनी मजबूत करावेत.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 02/19/2022 - 13:48 नवीन
आशिया खंडातील देशांनी इतकेच करावे की हे सर्व देश युरोपियन देशांची बाजारपेठ बनू नयेत. म्हणजे काय काय आणि कसं कसं ते डिटेलवार मध्ये सांगा बघू
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Sat, 02/19/2022 - 07:32 नवीन
जसा नेहमीच अमेरिकेची पाठराखण करत असतो मग तिथे त्याचा संबंध असो किंवा नसो. युरोपियन राष्ट्र एकमेका विरुद्ध कधी उभी राहत नाहीत पण आशिया,आफ्रिका,ह्या भागातील देशांना आपले मंडलिक बनवण्यासाठी मात्र एकत्र येतात. नेहमी युद्ध ची स्थिती च ह्या भागात राहावी म्हणून शस्त्र अस्त्र ह्या देशात विकणे,नेहमीच ह्यांच्यात वाद निर्माण होईल अशीच भूमिका घेणे. हे सर्व प्रकार ते करत असतात. रशिया ही लष्करी महासत्ता म्हणून टिकलीच पाहिजे ,त्या मुळे समतोल राहील.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Tue, 02/22/2022 - 04:29 नवीन
तथ्य- युक्रेनमधले रशियन भाषिक लोक युक्रेन सोडून रशियात जात आहेत. रशियन अर्थ- "रेफ्युजी लोक युक्रेनमधून रशियात येतायत तरी पाश्चिमात्य मिडियानुसार रशियाच आक्रमक आहे!" अमेरिकन/युक्रेनियन अर्थ- "इथून निघून जाण्यासाठी रशियन सरकारकडून काहीतरी संदेश आल्याशिवाय ही लोकं गेलीच नसती. ही लोकं निघातायत ही पुढील आक्रमणाची धोक्याची घंटा आहे." पुतीनने युक्रेनच्या डोनेस्क आणि लुहान या रशियन वर्चस्ववादी भागांना स्वतंत्र म्हणून रेकग्नाइझ केले आहे.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 9 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 9 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 9 hours ago
  • सुंदर !!
    1 day 9 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 9 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा