Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

युक्रेनवरून तणाव

प
पराग१२२६३
Sat, 02/12/2022 - 04:51
🗣 434 प्रतिसाद
सध्या रशियाच्या युक्रेन, युरोप आणि अमेरिकेबरोबरच्या संबंधांमध्ये बराच तणाव निर्माण झालेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून रशियाने आपले सुमारे 1 लाख 10 हजार सैनिक युक्रेनच्या सीमेवर तैनात केलेले आहेत. त्यामुळे युक्रेनवर रशिया आक्रमण करण्याच्या तयारीत आहे, अशी भिती पाश्चात्य देशांकडून व्यक्त होत आहे. मॉस्कोकडून ती शक्यता फेटाळून लावली जात आहे. हा तणाव निवळावा यासाठी यात सहभागी असलेली प्रत्येक बाजू आग्रही आहे. मात्र त्याचवेळी यातील मुख्य घटक असलेले अमेरिका आणि रशिया आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत. पण एकीकडे राजनयिक पातळीवरून हा तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न होत असतानाच दोन्ही बाजूंमध्ये आपापली शक्ती दाखवून देण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. युक्रेनच्या पूर्वेकडील डोनबास, दोनेस्क आणि क्रिमीया द्वीपकल्पामधील (Crimean Peninsula) आपल्या समर्थक फुटिरतावाद्यांना रशियाने पाठिंबा दिल्यापासून युक्रेनमधील स्थिती अस्थिर बनली आहे. कीवच्या वाढत्या रशियाविरोधी भूमिकांच्या पार्श्वभूमीवर 2014 मध्ये युक्रेनच्या रशियनबहुल आणि व्यूहात्मकदृष्ट्या महत्वाच्या क्रिमीया द्वीपकल्पावर रशियाने ताबा मिळवला. तेव्हापासून अमेरिका आणि युरोपीय संघाने रशियावर वेगवेगळे निर्बंध घातले आहेत. पण त्याचवेळी अमेरिकेकडून नाटोच्या (NATO) विस्ताराचे प्रयत्नही अविरतपणे सुरू आहेत, ज्यावर रशियाचा मुख्य आक्षेप आहे. युक्रेन नाटोमध्ये सामील झाल्यामुळे रशियाच्या सुरक्षेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हणूनच युक्रेनला नाटोचे सदस्यत्व दिले जाऊ नये, ही मागणी मॉस्कोने आग्रहाने लावून धरलेली आहे. त्यावर विचार करण्याऐवजी अमेरिकेडून रशियाला आक्रमक ठरवून आपले धोरण पुढे रेटण्याचा प्रयत्न केला जात आहे. युक्रेनवरून निर्माण झालेल्या या तणावाचा आपल्या आणि एकूणच युरोपच्या सुरक्षेवर परिणाम होत असल्यामुळे हा प्रश्न शांततामय मार्गाने सोडवण्यासाठी फ्रान्स, जर्मनीने पुढाकार घेतला आहे. युरोपीय देशांना रशियाशी संबंध सुरळीत सुरू ठेवणे आर्थिक, व्यापारी दृष्टीने आवश्यक वाटत आहे. पण दुसरीकडे अमेरिकेच्या स्वत:च्या भू-राजकीय गरजांमुळे युरोपीय देशांना स्वतंत्रपणे भूमिका घेणे अवघड होत आहे. या परिस्थितीतच गेल्या काही महिन्यांपासून युरोपात इंधनाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. इंधनाच्या टंचाईमुळे त्याचे दर युरोपात भडकलेले आहेत. त्यामुळे रशियाकडून गॅसपुरवठा होण्याशिवाय युरोपसमोर अन्य पर्याय नाही. नॉर्ड स्ट्रीम-2 चा मुद्दा युरोप मोठ्या प्रमाणात रशियातून निर्यात होणाऱ्या इंधनावर अवलंबून आहे. युरोपला हा पुरवठा सध्या युक्रेनमार्गेच नॉर्ड स्ट्रीम-1 वायूवाहिनीद्वारे होत आहे. या वायूवाहिनीमुळे युक्रेनला दरवर्षी सुमारे 1.2 अब्ज अमेरिकन डॉलरचा महसूल मिळत आहे. काही वर्षांपूर्वी कीवकडून या वाहिनीचे वापर शुल्क वाढवून मिळवण्यासाठी अडवणूक होत होती. त्याचा परिणाम युरोपच्या गॅसपुरवठ्यावर झाला होता. त्यामुळे जर्मनीने वाढती मागणी आणि सुरक्षा या कारणांनी बाल्टिक समुद्रातून नॉर्ड स्ट्रीम-2 (Nord Stream-2) वायूवाहिनी टाकण्यासाठी 2018 मध्ये मान्यता दिली. नॉर्मंडी आराखडा जर्मनी, फ्रांस, रशिया आणि युक्रेन यांचाय प्रतिनिधींनी फ्रांसमधील नॉर्मंडी येथे चर्चा केली होती. 6 जुलै 2014 रोजी नॉर्मंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या विजय दिवसाच्या 70 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या देशांचे नेते पहिल्यांदा भेटले होते आणि त्यामध्ये युक्रेनच्या दोनबास प्रांतातील संघर्ष मिटवण्यावर चर्चा झाली होती. या 4 देशांदरम्यानचा हा एक अनौपचारिक मंच आहे. याच मंचाच्या माध्यमातून युक्रेनचा प्रश्न चर्चेच्या आणि शांततापूर्ण मार्गी लावण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. लिंक https://avateebhavatee.blogspot.com/2022/02/blog-post_12.html

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 117188 views

🗣 चर्चा (434)
र
रावसाहेब चिंगभूतकर Tue, 02/22/2022 - 06:08 नवीन
रशियावर आर्थिक निर्बंध लावण्याची तयारी अमेरिका आणि युरोपकडून सुरू झाली आहे. माझी काळजी फक्त S400 ताब्यात येण्याबद्दल आणि सुपर सुखोई अपग्रेड वेळेत होण्याबद्दल आहे. भारताचा विचार सुपर सुखोई घेऊन रफाले ची संख्या मर्यादित ठेवण्याचा होता, पण रशिया वर निर्बंध लागणार असतील तर आपण पुन्हा कदाचित रफाले कडे वळू शकतो.
  • Log in or register to post comments
T
Trump Tue, 02/22/2022 - 07:59 नवीन
भाऊ, नुसते ताब्यात येऊन काय होणार आहे!!! देखभाल, दुरुस्ती, सुटे भाग यांचीही चिंता करायला हवी.
माझी काळजी फक्त S400 ताब्यात येण्याबद्दल आणि सुपर सुखोई अपग्रेड वेळेत होण्याबद्दल आहे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 02/22/2022 - 05:45 नवीन
एक तर्क करुन पाहतो... रशिया आणि युक्रेन यांच्यात जर युद्ध झाले तर फ्लॅश पॉइंट Donbass असेल. :) फ्लॅश पॉइंट क्रिएट करण्यात आला. जाता जाता :- U.S. officials prep big banks for potential Russian cyberattacks as Ukraine crisis deepens

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “God created war so that Americans would learn geography.” :- Mark Twain
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 02/22/2022 - 17:47 नवीन
फ्लॅश पॉइंट क्रिएट करण्यात आला. Putin seeks permission from lawmakers to use troops abroad Russia’s parliament approves Vladimir Putin request to use armed forces abroad पुतीन ने त्याची चाल आत्ता पर्यंत व्यवस्थित खेळली आहे.आता हाणामारी कशी वाढत जाते ते पाहुया. जाता जाता :- आधी अमेरिका मग त्याच्या मागे त्याचे शेपुट ब्रिटन ! Britain warns of cyberattacks as Russia-Ukraine crisis escalates

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “God created war so that Americans would learn geography.” :- Mark Twain
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Tue, 02/22/2022 - 06:00 नवीन
अमेरिकेने युनायटेड नेशन्सला कळवले आहे की त्यांच्याकडे असणाऱ्या विश्वासार्ह माहिती नुसार लष्करी कब्जानंतर ठार मारण्या साठी किंवा छळ छावण्यांमध्ये पाठवण्यासाठी मॉस्को युक्रेनियन लोकांच्या याद्या संकलित करत आहे. वॉशिंग्टन पोस्टने याबाबतीत बातमी दिली आहे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 02/22/2022 - 08:10 नवीन
जे सोविअत संघ विभागल्याने आताच्या रशियाला मिळत नाही?/ वंचित राहिले? १) तेल , २) इतर खनिज द्रव्ये, ३) मासे आणि इतर अन्नधान्य, ४) फिलोसोफर हुशार लोकं, ५) वैज्ञानिक --------- इतर कारणे - भडास काढणे आणि शस्त्रास्त्रे जाळणे. हा हेतू अमेरिकेचाही आहेच.
  • Log in or register to post comments
T
Trump Tue, 02/22/2022 - 08:23 नवीन
भरपुर आहेत. पुढील निर्यात उत्पादन गट 2020 मध्ये रशियन जागतिक शिपमेंटमध्ये सर्वोच्च डॉलर मूल्याचे प्रतिनिधित्व करतात. तसेच रशियाकडून एकूण निर्यातीच्या संदर्भात प्रत्येक निर्यात श्रेणीचा टक्केवारी हिस्सा दर्शविला जातो. तेलासह खनिज इंधन: US$141.3 अब्ज (एकूण निर्यातीच्या 42.1%) हिरे, मौल्यवान धातू: $३०.४ अब्ज (९%) लोह, पोलाद: $16 अब्ज (4.8%) तृणधान्ये: $9.5 अब्ज (2.8%) संगणकासह यंत्रसामग्री: $8.3 अब्ज (2.5%) लाकूड: $8.2 अब्ज (2.5%) खते: $7 अब्ज (2.1%) तांबे: $5.6 अब्ज (1.7%) अॅल्युमिनियम: $5.5 अब्ज (1.6%) मासे: $4.6 अब्ज (1.4%) The following export product groups represent the highest dollar value in Russian global shipments during 2020. Also shown is the percentage share each export category represents in terms of overall exports from Russia. Mineral fuels including oil: US$141.3 billion (42.1% of total exports) Gems, precious metals: $30.4 billion (9%) Iron, steel: $16 billion (4.8%) Cereals: $9.5 billion (2.8%) Machinery including computers: $8.3 billion (2.5%) Wood: $8.2 billion (2.5%) Fertilizers: $7 billion (2.1%) Copper: $5.6 billion (1.7%) Aluminum: $5.5 billion (1.6%) Fish: $4.6 billion (1.4%) https://www.worldstopexports.com/russias-top-10-exports/ ------------------------------------------------ नुसताच कच्चा माल किंवा मनुष्यबळ असुन चालत नाही. बाजार, भांडवल, आधुनिक तंत्रज्ञान इ. पण लागते.
  • Log in or register to post comments
स
साहना Tue, 02/22/2022 - 08:47 नवीन
पुतीन ह्यांनी काल जे भाषण केले त्यातील एक मुद्दा म्हणे ( मी UN च्या प्रतिनिधींची भाषणे ऐकताना अमेरिकन आणि ब्रिटिश प्रतिनिधींनी हा उल्लेख केला) हा होता कि रशियन साम्राज्याच्या सर्व जागांवर रशियाचा अधिकार आहे असे वक्तव्य पुतीन ह्यांनी केले. ह्यांत गॉर्जिया, फिनलंड वगैरे प्रदेश सुद्धा अंतर्भूत होतात. मी हाच मुद्दा माझ्या रशियावरील लेखांत मांडला होता. युक्रेन का पाहिजे ह्याचे उत्तर युक्रेन मध्ये काय आहे ह्यावर नसून, तो एके काळी रशियन साम्राज्याचा भाग होता त्यामुळे आता सुद्धा आम्हाला तो पाहिजे अशी पुतीन ह्यांची उघड भूमिका आहे. काश्मीर बळकावण्यासाठी पाकिस्तान चा जो मार्ग आहे तोच मार्ग पुतीन ह्यांनी चोखाळला आहे. अस्थिरता निर्माण करून रशियन धार्जिण्या लोकांचे बहुमत सीमेलगत भागांत करायचे आणि नंतर हळूच त्याला ताब्यांत घ्यायचे. युक्रेन मध्ये काही रशियन धार्जिणे असले तरी बहुतेक लोकांना रशिया विषयी प्रेम नाही. आणि युद्ध सुरु झाल्यास सुशिक्षित आणि श्रीमत लोक युरोप मध्ये निर्वासित म्हणून जातील. इतर देश जे निर्बंध टाकतील त्यामुळे जो फायदा होणार होता तो होणार नाही.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 02/22/2022 - 09:13 नवीन
युक्रेन मध्ये काही रशियन धार्जिणे असले तरी बहुतेक लोकांना रशिया विषयी प्रेम नाही. काही वर्षांपूर्वी चा अनुभव ( रशियन साम्राज्य तुटल्या नंतर ) कामाच्या ठिकाणी दोन व्यक्ती रशियन होते .. ओळख वाढली आणि नंतर कळले कि त्यातील एक रशियन आणि एक युक्रेनिय होती फरक काय म्हणून विचारल्याचे आठवते उत्तर मिळाले होते तसा काही फारसा नाही म्हणजे जणू मलेशिया आणि इंडोनेशिया यातील जसा फरक तसा ! रेस ( वर्ण ) या दृष्टीने बघतले तर साम्य दिसत होते मग गाडी पुढे गाडी का घसरली ?
  • Log in or register to post comments
स
साहना Tue, 02/22/2022 - 10:20 नवीन
मी पहिला जॉब करत होते तिथे रशियन एक मुलगा माझा चांगला मित्र होता आणि दुसरा युक्रेनियन. युक्रेनियन आर्मी मध्ये कॅप्टन होता आणि नंतर अमेरिका सोडून आता युक्रेन मध्ये आहे. युक्रेन आणि रशिया ह्यांचा संबंध किमान माझ्या समजुती प्रमाणे गोवा आणि महाराष्ट्र (किंवा नेपाळ आणि भारत) प्रमाणे आहे. दोन्हीत सांस्कृतिक, भाषिक आणि वांशिक साम्य असले तरी थोडे फार बदल सुद्धा आहेत आणि युक्रेनियन लोकांना रशियन लोकांशी भांडण नको असले तरी रशियन राज्यव्यवस्थेखाली राहणे मान्य नाही. रशिया जास्त जाचक आहे, क्लेप्टोक्रसी असल्याने फक्त काही लोक चांगले जीवन जगू शकतात , विविध प्रकारच्या स्वातंत्र्याची पायमल्ली होते इत्यादी त्यांची कारणे होती. त्याशिवाय भविष्यांत युक्रेन EU चा भाग बानू शकतो आणि त्यामुळे त्यांना प्रचंड फायदा होऊ शकतो असे युक्रेनियन लोकांचे म्हणजे होते. त्यामुळे माझ्या ओळखीच्या त्या युक्रेनियन मंडळींना कुठल्याही परिस्थितींत रशियाचा भाग बनणे मंजूर नव्हते.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 02/22/2022 - 10:06 नवीन
भूभाग ताब्यात ठेवणे.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Tue, 02/22/2022 - 08:37 नवीन
क्रिमिया मुख्य राशियनभूमी बरोबर जोडलेला नाही, अत्ता पुतीन ने ज्या प्रदेशाला स्वतंत्र republic म्हणून मान्यता दिली त्यामुळे रशिया क्रिमिया बरोबर भविष्यात जोडला जाऊ शकेल. महत्त्वाचे म्हणजे त्या प्रदेशातील ukraniyan जनता जी वंशाने रशियन आहे त्यांचा रशियाला पाठिंबा आहे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 02/22/2022 - 10:09 नवीन
त्याने काय भूमिका घेतली असती हा विचार येऊन गेला.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Tue, 02/22/2022 - 11:17 नवीन
युक्रेन नी अमेरिकेची मदत मागितली आहे का? मागितली नसेल तर अमेरिकेचा काय संबंध युक्रेन ची वकिली करायची. लोकांच्या स्वतंत्र ची जर खूप काळजी असेल अमेरिका नी बाकी मुक्त वादी लोकांना तर हे उत्तर कोरिया ची सत्ता का उलटून टाकतं नाहीत.
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Tue, 02/22/2022 - 14:09 नवीन
बाकीचे ग्रॅज्युएशन लेव्हल चं लिहीत असताना तुम्ही तिसरी (ब) मध्ये लिहिल्यासारखे निबंध का लिहिता?
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Tue, 02/22/2022 - 14:16 नवीन
युक्रेन वर रशिया ची लष्करी कारवाई चे कारण अमेरिका चा नको तितका युक्रेन मधील इंटरेस्ट,हस्तक शेप . वाघांनी शिकार केली कोल्हे कुत्रे राहिलेले जेवण मिळावे म्हणून आशा ठेवून असतात तसे युरोपियन देश. म्हणून शिकार कोण होते काही देणे घेणे नाही वाघा नी शिकार केलीच पाहिजे ही इच्छा. असे उत्तर कोणी तरी देईल प्रामाणिक पने . म्हणून तसे lihale होते.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 02/23/2022 - 04:47 नवीन
साम्राज विस्तार ... ४थी ता शिकवलं होतं चीन उत्तर कोरिया चा मित्र का? चीन , तैवान ला कोणी इतर देशांनी मान्यता दिली तर खपवून घेत नाही का? अर्थात हे मान्य कि अमेरिका कधी कधी हा हस्तक्षेप करताना इतकी ढोंगी वागते कि शेम्बड्या पोराला पण कळेल कि खरा हेतू वेगळाच आहे
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Tue, 02/22/2022 - 14:34 नवीन
ह्या युरोपियन ,गोऱ्या लोकांच्या हव्यास मुळे जगात पाहिले,दुसरे महा युद्ध झाले . जागाच खूप मोठे नुकसान झाले तरी हे नालायक त्यांचा नालायक पना सोडत नाहीत युक्रेन वर रशिया का आक्रमक झाला? जगातील सर्वात जास्त भू भाग असणारा रशिया आहे. विपुल खनिज संपत्ती त्यांच्या भूमीत आहे. खरे युद्ध खोर हे युरोपियन देश आणि अमेरिका चा आहे.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Tue, 02/22/2022 - 14:37 नवीन
दयावान सारखी खूप गुन्हे करा आणि थोडे से दान करा,जगासमोर नम्र बना. आतून खुंकार ,आक्रमक,लबाड ,. असे ह्या देशांचे वर्णन करता येईल.
  • Log in or register to post comments
T
Trump Tue, 02/22/2022 - 20:21 नवीन
1.168 / 5.000 Übersetzungsergebnisse मेक्सिको सिटी (रॉयटर्स) - मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांनी सोमवारी अमेरिकन सरकारला मेक्सिकोमधील त्यांच्या प्रशासनावर टीका करणार्‍या गटांना निधी देणे थांबविण्याचे आवाहन केले आणि आर्थिक मदतीला “लज्जा” आणि मेक्सिकोच्या सार्वभौमत्वाचा भंग असल्याचे म्हटले. लोपेझ ओब्राडोरने पॉवर मार्केटवरील राज्य नियंत्रण बळकट करण्यासाठी प्रस्तावित केलेल्या सुधारणेवरून युनायटेड स्टेट्स आणि मेक्सिको यांच्यातील घर्षणाच्या वेळी हा फटकार आला आहे, ज्याला यूएस अध्यक्ष जो बिडेन यांच्या प्रशासनाने चेतावणी दिली आहे की अक्षय ऊर्जेतील गुंतवणूक मर्यादित करू शकते. लोपेझ ओब्राडोर यांनी मे महिन्यात यूएस सरकारला एक डिप्लोमॅटिक नोट पाठवली होती ज्यामध्ये मेक्सिकोमधील राजकीय गटांसाठी यूएस फंडिंगबद्दल चिंता व्यक्त केली होती. सोमवारी त्यांनी युनायटेड स्टेट्सला विरोधी गट म्हणून वर्णन केलेल्या निधीवर अंकुश ठेवण्याचे आवाहन नूतनीकरण केले, कोणतेही नाव न घेता. "आम्ही यूएस सरकारला सरकारचे विरोधक म्हणून खुलेपणाने काम करणार्‍या गटांना निधी देणे थांबवण्यास सांगत आहोत ... आमच्या बाबतीत, कायदेशीर आणि कायदेशीररित्या स्थापन केलेल्या सरकारच्या," त्यांनी त्यांच्या सकाळच्या पत्रकार परिषदेत सांगितले. "दुसऱ्या देशाच्या अंतर्गत जीवनात गुंतणे हे जगातील कोणत्याही सरकारसाठी लाजिरवाणे आहे ... शिवाय, पैसे हस्तांतरित करणे." MEXICO CITY (Reuters) - Mexican President Andres Manuel Lopez Obrador on Monday urged the U.S. government to stop funding groups in Mexico that are critical of his administration, calling the financial support a "shame" and a breach of Mexico's sovereignty. The rebuke comes at a time of friction between the United States and Mexico over a reform proposed by Lopez Obrador to strengthen state control of the power market, which the administration of U.S. President Joe Biden has warned could limit investment in renewable energy. Lopez Obrador also sent a diplomatic note to the U.S. government in May expressing concerns over U.S. funding for political groups in Mexico. On Monday he renewed his calls for the United States to curb funding against what he described as opposition groups, without stating any by name. "We are asking the U.S. government to stop funding groups that openly act as opponents of governments ... in our case, of a legally and legitimately constituted government," he told his morning news conference. "It is a shame for any government in the world to get involved in the internal life of another country ... plus, handing over money." https://news.yahoo.com/mexican-president-urges-u-end-162311196.html
  • Log in or register to post comments
T
Trump Wed, 02/23/2022 - 08:55 नवीन
श्री पुतीन आणि रशियन गुप्तहेर संस्थेच्या प्रमुखाचे संभाषण 'Speak directly!': Putin has tense exchange with his chief spy
  • Log in or register to post comments
T
Trump Wed, 02/23/2022 - 20:54 नवीन
Imran speaks to Russian TV as US-China-Russia geopolitics turns full circle in 50 years
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख गुरुवार, 02/24/2022 - 06:46 नवीन
इंडियन एक्सप्रेसची बातमी याच पानावरचा नकाशा: रशिया ने हल्ला केलेली ठिकाणे - Image removed.
  • Log in or register to post comments
T
Trump गुरुवार, 02/24/2022 - 07:00 नवीन
धन्यवाद. लवकर संपले तर बरे होईल. सध्या नैसगिक वायु आणि कच्चे तेल खुप महाग झाले आहे.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure गुरुवार, 02/24/2022 - 07:59 नवीन
युक्रेन का युरोपियन आणि अमेरिकन प्रभावातून मुक्त करणे हा आहे हा हेतू लवकर साध्य होणार नाही. युक्रेन नी युद्ध टाळायचा प्रयत्न केला तरी मित्र मोठे कुटील आहेत. ते युद्ध लवकर संपू देणार नाहीत.
  • Log in or register to post comments
स
साहना गुरुवार, 02/24/2022 - 08:40 नवीन
युक्रेन मधील माझ्या मित्रांशी माझा संपर्क तुटला आहे. काल पर्यंत त्यांच्या कडून स्टेटस वगैरे दिसत होते. युक्रेन ची मिलिटरी सोडल्यास इतर जनता सुद्धा बऱ्यापैकी देशभक्त आहे आणि सशस्त्र आहे. नवमाता असलेली माझी मैत्रीण काल पोलंड सीमेच्या दिशेने प्रवास करती झाली तिच्या सोबत तिचे वृद्ध आई वडील आणि ३ लहान मुले होती. तिचा पती युक्रेन आर्मीत असल्यायन तो युद्धभूमीवर गेला आहे. इतर पुरुषांनी बंदुका वगैरे घेऊन मोक्याच्या ठिकाणी स्थलांतर केले आहे. सध्यातरी इंटरनेट बंद पडला आहे असे वाटत आहे. मोल्दोवावर सुद्धा रशिया हल्ला करेल असे वाटत आहे.
  • Log in or register to post comments
T
Trump गुरुवार, 02/24/2022 - 08:54 नवीन
तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे? युक्रेनचे सैन्य देशभक्त आणि सशस्त्र नाही, असा अर्थ निघतो यातुन.
युक्रेन ची मिलिटरी सोडल्यास इतर जनता सुद्धा बऱ्यापैकी देशभक्त आहे आणि सशस्त्र आहे.
माल्दोवाला कशाला घेताय ह्यामध्ये? ते तर कायमस्वरुपी तटस्थ आहेत. संदर्भः मोल्दोव्हाच्या संविधानाच्या अनुच्छेद 11 मध्ये असे म्हटले आहे: "मोल्दोव्हा प्रजासत्ताक त्याच्या कायमस्वरूपी तटस्थतेची घोषणा करते. मोल्दोव्हा प्रजासत्ताक इतर राज्यांच्या सशस्त्र दलांना त्याच्या प्रदेशावर तैनात करण्याची परवानगी देत ​​नाही." अशाप्रकारे, मोल्दोव्हाची तटस्थता त्याच्या घटनेत निहित असल्याने, देशाची नाटो किंवा सीएसटीओमध्ये सामील होण्याची कोणतीही योजना नाही. Article 11 of the Constitution of Moldova states: "The Republic of Moldova proclaims its permanent neutrality. The Republic of Moldova does not allow the deployment of armed forces of other states on its territory." Thus, since Moldova's neutrality is enshrined in its constitution, the country has no plans to join either NATO or CSTO. https://en.wikipedia.org/wiki/Moldova%E2%80%93NATO_relations
मोल्दोवावर सुद्धा रशिया हल्ला करेल असे वाटत आहे.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure गुरुवार, 02/24/2022 - 10:23 नवीन
जनता देश भक्त आहे युक्रेन. ची. म्हणजे नक्की काय आहे. रशिया ची जनता ,बाकी देशाची जनता देश विरोधी आहे का? जनता सशस्त्र आहे. ह्या वाक्याचा पण अर्थ नाही समजलं. बंदूक,पिस्तूल ह्यांनी युद्ध होतात का हल्ली.? मग ती आधुनिक शस्त्र फक्त शो रूम मध्येच असतात का?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/24/2022 - 08:56 नवीन
युक्रेनने अमेरिकेस मदत मागितली आहे. अमेरिका काय भूमिका घेते ते बघीतले पाहिजे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 02/24/2022 - 09:04 नवीन
भारताचे बरेच विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले आहेत. त्यांच्या साठीचे कीव बाऊंड एअर इंडिया विमान युक्रेनची एअरस्पेस बंद असल्याने दिल्लीत परतले.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 02/24/2022 - 10:12 नवीन
हे नेहमी तहान लागलियावर विहीर का खंदतात? कोरोना वेळीही असेच अडकून पडले होते
  • Log in or register to post comments
स
साहना गुरुवार, 02/24/2022 - 12:17 नवीन
काही निर्ल्लज भारतीय विद्यार्थी "रशिया प्लिज हल्ला करा म्हणजे आमच्या परीक्षा रद्द होतील " असे काळ ट्विट करत होते.
  • Log in or register to post comments
T
Trump गुरुवार, 02/24/2022 - 12:27 नवीन
येथेही काही युध्द होणार म्हणुन आंनद साजरा करणारे निर्लज्ज (मनोरुग्ण?) आहेतच की.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 02/24/2022 - 14:44 नवीन
पाकिस्तान ने सैनिक मारले चिनने जमीन बळकावली तरी भारताने शांतता बाळगावी म्हणणारे जास्त मनोरूग्न म्हणावे लागतील.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/24/2022 - 17:27 नवीन
भारतीय विद्यार्थी "रशिया प्लिज हल्ला करा म्हणजे आमच्या परीक्षा रद्द होतील " असे काळ ट्विट करत होते.
  • Log in or register to post comments
स
साहना गुरुवार, 02/24/2022 - 12:51 नवीन
ह्या विद्यार्थ्यांनी खूप आधीच आपल्या विद्यापीठाकडे अर्ज केला होता कि आम्हाला जाऊ द्या आम्ही नंतर येऊन कार्यक्रम कम्प्लिट करू. वैद्यकीय शिक्षण असल्याने रिमोट शिकणे किंवा परीक्षा शक्य नव्हत्या. विद्यापीठाने त्यांचा अर्ज नामंजूर केला त्यामुळे एक तर संपुन डिग्री सोडणे कदाचित त्यांना शक्य झाले नसावे. विश्वगुरू भारताचे २०,००० विद्यार्थी मुलांत युक्रेन मध्ये जाऊन का शिकतात ह्यावर लोकांनी चिंतन करण्याची गरज आहे.
  • Log in or register to post comments
T
Trump गुरुवार, 02/24/2022 - 12:57 नवीन
तुमचा विश्वगुरू शब्दावर भलताच राग आहे. :)
विश्वगुरू भारताचे २०,००० विद्यार्थी मुलांत युक्रेन मध्ये जाऊन का शिकतात ह्यावर लोकांनी चिंतन करण्याची गरज आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 02/25/2022 - 02:03 नवीन
विश्वगुरू मोदींनी स्वतःला उद्देशून म्हणले कि भारत देशाला ? भारत देशाला उद्देशून म्हणले असले तर असे स्वतःचं देशाचे ब्रॅण्डिंग करणे काय चुकीचे आहे ? नाहीतरी "गुरु " बिझिनेस मध्ये तरी भारताची मक्तेदारी आहेच कि .... कोणत्या रंगाचे आणि कोणत्या "थेअरी" चे पाहिजेत सांगा स पासून स कडे नेनारे, कि प्राणायाम शिकवणारे , कि शून्यातून विभूती निर्माण करणारे ! ..... !
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 02/24/2022 - 15:35 नवीन
२०,००० विद्यार्थी मुलांत युक्रेन मध्ये जाऊन का शिकतात The cost of studying MBBS in Ukraine is very less compared with private medical colleges in India. The total cost of MBBS education for six years in Ukraine is about 16.25 Lacs.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/24/2022 - 09:18 नवीन
Image removed. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
S
sunil kachure गुरुवार, 02/24/2022 - 10:28 नवीन
रशिया ची बाजू ही इथे तरी न्यायाची आहे.रशिया च्या सीमेवर अमेरिका सारखा देश युक्रेन चा वापर करून प्रभाव निर्माण करत असेल रशिया सहन करूच शकतं नाही. भारत अमेरिका जवळ जातोय असे वाटले की चीन आक्रमक होतो . असे खूप प्रसंग आहेत. रशिया आक्रमक का झाला? अमेरिका त्याच्या वेशीवर आली
  • Log in or register to post comments
S
sunil kachure गुरुवार, 02/24/2022 - 10:47 नवीन
जगात कुठे ही युद्ध.. देशप्रेमी,मानव प्रेमी तर कुठे दिसत नाहीत. पण साठेबाज लबाड. वस्तू बाजारातून गायब करून त्याचा तुटवडा निर्माण करतात ..आणि प्रचंड महाग विकतात. कारण युद्ध फायदा देश प्रेमी साठे बाज. पेट्रोल , डिझेल महाग. युद्ध ज्या देशात होत आहे ते देश आणि इंधन वाढ ह्यांचा काही दुरून पण संबंध नसला तरी इंधन वाढ होते. लाभर्ती देश प्रेमी ऑईल कंपन्या ,त्यांचे मालक. सोने मात्र स्वस्त होत नाही सोन्यावर युध्दाचा परिणाम होत नाही. अजब आहे युद्ध होणे म्हणजे दिखाव करणारे देश प्रेमी ह्यांची चांदी. युद्ध ची स्थिती मी अनुभवली नाही पण मुंबई मध्ये ,दंगल,पूर ह्या मुळे निर्माण झालेली स्थिती बघितली आहे .. खूप कमी अगदी पॉइंट मध्येच percent काढावे लागतील अशी लोक मदत करणारी होती ..बाकी स्थिती चा फायदा उचलून स्वतःचा फायदा कसा होईल हे बघणारेच होते. खूप मोठ्या प्रमाणात देश प्रेमी संकट काळात कधीच दिसले नाहीत.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर गुरुवार, 02/24/2022 - 11:50 नवीन
मला युरोपीयन युनियन (EU) काय भूमिका घेते त्यात जास्त स्वारस्य आहे! BREXIT नंतर युरोपीयन युनियनचे नेतृत्व करण्याची संधी फ्रान्स आणि जर्मनीला मिळाली आहे आणि आता त्यांना अमेरिकेच्या सुरात सूर मिसळणाऱ्या ब्रिटनची भूमिका विचारात घ्यायची आवश्यकता राहिली नाहीये. गेल्या दोन-तीन वर्षातल्या घडामोडींवर सोशल मिडियावर झालेल्या चर्चा वाचताना आणि तिथल्या मित्रमंडळींकडून ऐकलेल्या गोष्टींतुन युरोपीयन युनियनच्या सहभागी देशांतील नागरिक ज्या प्रकारे ब्रिटनची निर्भत्सना करताना दिसतात त्यावरून लोकमताचा अंदाज येतोय. आता फ्रान्स आणि जर्मनी, अमेरिका आणि ब्रिटनची तळी उचलतात, की कठोर शब्दात (कोरडा) निषेध नोंदवत अलिप्त रहात युरोपचे स्वतंत्र हितसंबंध निर्माण करण्याला प्राधान्य देतात हे पाहण्याची उत्सुकता आहे. तसेही अमेरिकेच्या निर्बंधाना हल्ली इराण पण जुमानत नाही तर रशिया त्यांना फार गांभीर्याने घेईल असे वाटत नाही. जाता जाता : अमेरिका आणि युकेने त्यांच्या सोयीसाठी जगभरातल्या अनेक देशांत हस्तक्षेप करून बरेच शत्रू निर्माण केले आहेत. ह्या युद्धाच्या निमित्ताने त्या देशांमध्ये अराजकता माजून तिथेही विद्यमान सरकार उलथवण्यासाठी उठाव / क्रांती वगैरे होते का हे पाहणेही औत्सुक्याचे असेल.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 02/24/2022 - 11:53 नवीन
इंग्लिश बऱ्यापैकी चांगले आहे.
  • Log in or register to post comments
स
साहना गुरुवार, 02/24/2022 - 12:25 नवीन
काही भाकिते. कुठल्याही पुराव्यावर आधारित नसून निव्वळ वैयक्तिक मते आहेत. नंतर किती खरी ठरतील पाहूया. मार्च २५ मध्ये पुन्हा इथे व्हिसिट करेन. - रशियन सैनिक हे अप्रशिक्षित, लढण्यास उत्सुक नाहीत असे असतील. - रशियन सैनिक अपेक्षेपेक्षा बराच मार खातील आणि ह्या युद्धांतून रशियन सैन्य अत्यंत ढिसाळ आहे असे दिसून येतील. - युक्रेन चे राष्ट्रपती वोलडोमीर ह्यांतून चांगले तावून सुलाखून प्रसिद्ध होतील. - क्यिव मध्ये रशियन सैन्य पोचण्यासाठी साधारण ७२ तास तरी लागतील. - पुतीन काही दिवसांत माघार घेतील पण कदाचित युक्रेन चा बऱ्यापैकी भाग आपल्या हाताखाली ठेवतील. - रशियन अर्थव्यवस्था बराच काळ कोलमडेल.
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर गुरुवार, 02/24/2022 - 13:43 नवीन
रशिया वर अत्यंत कडक प्रतिबंध लावले जातील. रशियन अर्थव्यवस्था कोसळेल आणि पुतीन सत्तेवर असेपर्यंत ती कोसळलेली राहील. या सगळ्यामुळे रशिया स्वतः च तुटला नाही म्हणजे मिळवली. युक्रेनियन्स किती तीव्र विरोध करतात यावर त्या देशाचे भवितव्य अवलंबून राहील. पुतीन आपले पपेट सरकार सत्तेवर बसवेल, पण जर देशात अंतर्गत यादवी सुरू झाली तर ती रोखणे नवीन सरकारला शक्य नाही. पुतीन ला याची फारशी काळजी दिसत नाही. आर्थिक निर्बंध किती भयंकर असतात त्याची पुतीन ला कल्पना दिसत नाही.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 02/24/2022 - 14:04 नवीन
मग रशिया चीनकडे झुकणार. तैवान हा चीनचा प्रदेश आहे हे जाहीर करूनच मग पुतीनने युध्दाला सुरवात केली आहे. चीन रशिया युती भयंकर असेल. मला तरी यावरून इंदिरा गांधींची आठवण आली. रशियाशी करार करून मग बांगला देश युध्द छेडलं. असो. उंदीर मारणाऱ्यांनी किती तो विचार करायचा? ;)
  • Log in or register to post comments
T
Trump गुरुवार, 02/24/2022 - 14:52 नवीन
- युक्रेन चे राष्ट्रपती वोलडोमीर ह्यांतून चांगले तावून सुलाखून प्रसिद्ध होतील.
आणि देशही सोडतील
  • Log in or register to post comments
T
Trump Fri, 02/25/2022 - 06:45 नवीन
चेहरा रडवेला झाला आहे. सामान्य नागरीकांचे वाईट वाटते.
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 02/24/2022 - 13:37 नवीन
युद्धसदृश्य परिस्थितीत ट्विटरवर शिटपोस्टिंग करणारा इतिहासातला पहिला देश:

pic.twitter.com/IaqFbpayqz

— Ukraine / Україна (@Ukraine) February 24, 2022
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 10 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 10 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 10 hours ago
  • सुंदर !!
    1 day 10 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 10 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा