युक्रेनवरून तणाव
सध्या रशियाच्या युक्रेन, युरोप आणि अमेरिकेबरोबरच्या संबंधांमध्ये बराच तणाव निर्माण झालेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून रशियाने आपले सुमारे 1 लाख 10 हजार सैनिक युक्रेनच्या सीमेवर तैनात केलेले आहेत. त्यामुळे युक्रेनवर रशिया आक्रमण करण्याच्या तयारीत आहे, अशी भिती पाश्चात्य देशांकडून व्यक्त होत आहे. मॉस्कोकडून ती शक्यता फेटाळून लावली जात आहे. हा तणाव निवळावा यासाठी यात सहभागी असलेली प्रत्येक बाजू आग्रही आहे. मात्र त्याचवेळी यातील मुख्य घटक असलेले अमेरिका आणि रशिया आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत. पण एकीकडे राजनयिक पातळीवरून हा तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न होत असतानाच दोन्ही बाजूंमध्ये आपापली शक्ती दाखवून देण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.
युक्रेनच्या पूर्वेकडील डोनबास, दोनेस्क आणि क्रिमीया द्वीपकल्पामधील (Crimean Peninsula) आपल्या समर्थक फुटिरतावाद्यांना रशियाने पाठिंबा दिल्यापासून युक्रेनमधील स्थिती अस्थिर बनली आहे. कीवच्या वाढत्या रशियाविरोधी भूमिकांच्या पार्श्वभूमीवर 2014 मध्ये युक्रेनच्या रशियनबहुल आणि व्यूहात्मकदृष्ट्या महत्वाच्या क्रिमीया द्वीपकल्पावर रशियाने ताबा मिळवला. तेव्हापासून अमेरिका आणि युरोपीय संघाने रशियावर वेगवेगळे निर्बंध घातले आहेत. पण त्याचवेळी अमेरिकेकडून नाटोच्या (NATO) विस्ताराचे प्रयत्नही अविरतपणे सुरू आहेत, ज्यावर रशियाचा मुख्य आक्षेप आहे.
युक्रेन नाटोमध्ये सामील झाल्यामुळे रशियाच्या सुरक्षेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हणूनच युक्रेनला नाटोचे सदस्यत्व दिले जाऊ नये, ही मागणी मॉस्कोने आग्रहाने लावून धरलेली आहे. त्यावर विचार करण्याऐवजी अमेरिकेडून रशियाला आक्रमक ठरवून आपले धोरण पुढे रेटण्याचा प्रयत्न केला जात आहे. युक्रेनवरून निर्माण झालेल्या या तणावाचा आपल्या आणि एकूणच युरोपच्या सुरक्षेवर परिणाम होत असल्यामुळे हा प्रश्न शांततामय मार्गाने सोडवण्यासाठी फ्रान्स, जर्मनीने पुढाकार घेतला आहे. युरोपीय देशांना रशियाशी संबंध सुरळीत सुरू ठेवणे आर्थिक, व्यापारी दृष्टीने आवश्यक वाटत आहे. पण दुसरीकडे अमेरिकेच्या स्वत:च्या भू-राजकीय गरजांमुळे युरोपीय देशांना स्वतंत्रपणे भूमिका घेणे अवघड होत आहे. या परिस्थितीतच गेल्या काही महिन्यांपासून युरोपात इंधनाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. इंधनाच्या टंचाईमुळे त्याचे दर युरोपात भडकलेले आहेत. त्यामुळे रशियाकडून गॅसपुरवठा होण्याशिवाय युरोपसमोर अन्य पर्याय नाही.
नॉर्ड स्ट्रीम-2 चा मुद्दा
युरोप मोठ्या प्रमाणात रशियातून निर्यात होणाऱ्या इंधनावर अवलंबून आहे. युरोपला हा पुरवठा सध्या युक्रेनमार्गेच नॉर्ड स्ट्रीम-1 वायूवाहिनीद्वारे होत आहे. या वायूवाहिनीमुळे युक्रेनला दरवर्षी सुमारे 1.2 अब्ज अमेरिकन डॉलरचा महसूल मिळत आहे. काही वर्षांपूर्वी कीवकडून या वाहिनीचे वापर शुल्क वाढवून मिळवण्यासाठी अडवणूक होत होती. त्याचा परिणाम युरोपच्या गॅसपुरवठ्यावर झाला होता. त्यामुळे जर्मनीने वाढती मागणी आणि सुरक्षा या कारणांनी बाल्टिक समुद्रातून नॉर्ड स्ट्रीम-2 (Nord Stream-2) वायूवाहिनी टाकण्यासाठी 2018 मध्ये मान्यता दिली.
नॉर्मंडी आराखडा
जर्मनी, फ्रांस, रशिया आणि युक्रेन यांचाय प्रतिनिधींनी फ्रांसमधील नॉर्मंडी येथे चर्चा केली होती. 6 जुलै 2014 रोजी नॉर्मंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या विजय दिवसाच्या 70 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या देशांचे नेते पहिल्यांदा भेटले होते आणि त्यामध्ये युक्रेनच्या दोनबास प्रांतातील संघर्ष मिटवण्यावर चर्चा झाली होती. या 4 देशांदरम्यानचा हा एक अनौपचारिक मंच आहे. याच मंचाच्या माध्यमातून युक्रेनचा प्रश्न चर्चेच्या आणि शांततापूर्ण मार्गी लावण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.
लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2022/02/blog-post_12.html
🗣 चर्चा
(434)
T
Trump
Mon, 03/07/2022 - 10:23
नवीन
जाउ द्या आता. तुम्हाला सगळे पुन्हा सांगायची गरज आहे.
नाटो, रशिया, श्री पुतीन यांची भाषणे, इशारे, क्युबन क्ष्रेपणास्त्र पेच इत्यादी वाचा.
- Log in or register to post comments
क
कॉमी
Mon, 03/07/2022 - 10:32
नवीन
खिक्क. उवहासाकडे वळला इथेच सगळे आले.
- Log in or register to post comments
T
Trump
Mon, 03/07/2022 - 10:38
नवीन
उवहास?
- Log in or register to post comments
न
निनाद
Mon, 03/07/2022 - 22:42
नवीन
आधी नोम चोम्सकी सर्व द्वेष्टा म्हणून (कु)ख्यात होता!
आता सर्व रडका नोम चोम्सकी असे ही म्हणता येईल! :)
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 03/07/2022 - 06:04
नवीन
त्यांच्याकडे ४००० विमाने आहेत पण ते मृदुहृदयाचे असल्याने आपली बी टीम ला पाठवत आहेत, बातम्या वाचून लिहणार्यांना युद्धाचे डावपेच काय ठाऊक ?,
तिकडचं धुणं इथे धुवायची गरज नव्हती.
घाव वर्मी लागलाय असं दिसतंय.
जाऊ द्या मीच माघार घेतो.
चालू द्या तुमचं एकतर्फी.
- Log in or register to post comments
T
Trump
Sun, 03/06/2022 - 11:56
नवीन
संरक्षण सचिवांसाठी ट्रम्प-नियुक्त माजी वरिष्ठ सल्लागार म्हणतात की रशियन सैन्याने युक्रेनवर 'खूप सौम्य' केले आहे आणि झेलेन्स्कीला 'कठपुतली' म्हटले आहे.
A Trump-appointed former senior adviser to the Secretary of Defense says Russian forces have been 'too gentle' on Ukraine and called Zelensky a 'puppet'
https://news.yahoo.com/trump-appointed-former-senior-adviser-073609454.html
- Log in or register to post comments
T
Trump
Sun, 03/06/2022 - 13:23
नवीन
एक राष्ट्र दुसर्या राष्ट्राचे राष्ट्रत्व काढुन घेऊ शकते का? मी असे पहील्यांचा बघतो आहे. इतर अभ्यासु लोकांनी अधिक प्रकाश टाकावा.
कोठे तरी भारत - पाकिस्तान, रशिया - युक्रेन यांची तुलना पाहीली.
- जर रशिया युक्रेनचे राष्ट्रत्व काढुन घेउन एक पायंडा पाडत असेल तर त्याच नियमाचा वापर करुन भारत सरकार, पाकिस्तान बाग्लादेश आणि म्यानमार (संदर्भ: https://www.irrawaddy.com/specials/on-this-day/burma-separated-british-india-82-years-ago-today.html) ह्यांचे राष्ट्र्त्व काढुन घेउ शकते का? असे नक्की आपण किती मागे जाउ शकतो?
- हे सगळे नियमांमध्ये कसे बसणार? कि वसाहतवाद ३.० म्हणायचे याला? https://www.un.org/press/en/2020/gacol3342.doc.htm
- Log in or register to post comments
S
sunil kachure
Sun, 03/06/2022 - 13:36
नवीन
पण भारतीय हिंदी न्यूज चॅनेल जगात मस्करी चे विषय झाले आहेत.
न्यूज अँकर ,त्यांनी बोलावलेल् पाहिजे असे काही अक्कले चे तारे तोडत आहेत की खूप दया येत आहे .
भारतीय हिंदी न्यूज चॅनेल वर.
ह्या हुशार न्यूज चॅनेल ना .
पुतीन कधी अणुबॉम्ब टाकणार आहे हे पण माहीत असते
युक्रेन काय डावपेच करणार हे पण ह्यांना माहीत असते..
युक्रेन आणि रशिया चे अध्यक्ष भारतीय न्यूज चॅनेल ह्या साठी बघतात.
की त्यांचे स्वतःचे प्लॅनिंग काय आहेत,डावपेच काय आहेत हे त्यांना समजावे म्हणून.
आणि 24 तास तोच तमाशा.
युद्ध कोणत्या देशात war room भारतात.
आणि ती पण 24 तास.
- Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे
Sun, 03/06/2022 - 14:41
नवीन
काहीच दिवसापूर्वी ukrain ला ताब्यात घेण्याचा रशियाचा प्लॅन TV9 च्या हाती लागला होता. पण रशियन सैनिकांना मराठी/हिंदी समजत नसल्यामुळे कदाचित अजून ukrain ताब्यात आला नसेल.
26 जानेवारिला भारतीय सैन्यदलने आपल्या गणवेशात काहीतरी बदल केले आहेत. बरीचशी हिंदी न्यूज चॅनेल्स अब नही दिखेंगे भारतीय सैनिक" " अशी ब्रेकिंग न्युज देत होते. पहिले राफेल भारतात येताना तर भारतीय चॅनेल्स ने अगदी उन्माद केला होता. सुशांतसिंग च्या वेळी आपल्या थोर मीडियाने त्याच्या girlfriend ला खुनी म्हणून जाहीरही केलं होतं.
- Log in or register to post comments
T
Trump
Sun, 03/06/2022 - 21:10
नवीन
वाचणीय
As Russia’s military onslaught in Ukraine sends refugees scattering, Moscow extends a helping hand to one group: Indians
https://www.washingtonpost.com/world/2022/03/03/russia-ukraine-india-students/
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
Mon, 03/07/2022 - 09:35
नवीन
४०० झाले. आता दुसरा धागा काढा. प्रतिसाद शोधाताना डोक्याचा युक्रेन होतोय.
- Log in or register to post comments
T
Trump
Mon, 03/07/2022 - 12:52
नवीन
अमेरीका आणि व्हेनेझुयला तेल उत्पादन वाढण्यासाठी चर्चा.
कोठे गेली आता तत्वे ?
https://www.cbsnews.com/news/venezuela-russia-ukraine-biden-team-nicolas-maduro/
https://www.washingtonpost.com/world/2022/03/06/venezuela-american-officials-visit/
- Log in or register to post comments
T
Trump
Mon, 03/07/2022 - 18:59
नवीन
Is Putin irrational or did he just miscalculate? And Ukraine war’s most overlooked sector
- Log in or register to post comments
न
निनाद
Mon, 03/07/2022 - 22:46
नवीन
परत परत शेखर गुप्ताचा कचरा कशाला आणताय?
हा माणूस वार दिसेल तशी पाठ फिरवतो!
आधी लॉजिकल बोलून मग हळूच डावा अजेंडा घुसवण्यात पटाईत!
त्याला म्हणा;
काँग्रेसच्या काळात तू इतका श्रीमंत अचानक कसा झाला यावर बोल.
तुला सोनिया बाईने पद्म का आणि कसे दिले यावर बोल.
मग लोकांना ज्ञान वाट!
- Log in or register to post comments
T
Trump
Tue, 03/08/2022 - 06:28
नवीन
हल्ली त्यांच्या विश्लेषणाची गुणवत्ता चांगलीच वाढली आहे.
- Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे
Tue, 03/08/2022 - 07:06
नवीन
हल्ली त्यांच्या विश्लेषणाची गुणवत्ता चांगलीच वाढली आहे.
ह्या बाबतीत सहमत. नाहीतर आजकाल निपक्ष पत्रकार राहिलेत कुठे. एक तर भाजपा समर्थक आहेत नाहीतर विरोधक. त्यातल्यात्यात शेखर गुप्ता बरा वाटतो.
- Log in or register to post comments
स
साहना
Tue, 03/08/2022 - 07:36
नवीन
दिवस १२ :
* युद्धाच्या बाराव्याला मोठे काही घडले नाही.
* रशिया युक्रेन ह्यांच्या चर्चची ३ री फेरी झाली. त्यातून काही अपेक्षित नव्हतेच.
* रशियन सैन्य आता शहरांत घुसायच्या ऐवजी दुरून गोळाफेक जास्त करत आहे.
* सीमेवर गोळा झालेले १००% सैन्य आता युक्रेन मध्ये सक्रिय आहे.
* फोटोग्राफिक पुराव्याद्वारे रशियाचे साधारण किमान १२० रणगाडे नष्ट झाले आहेत. रशियाच्या एकूण चालू शकणार्या रणगाड्या पैकी हे ४% आहेत.
* रशिया आपले रिसर्व सैनिक युक्रेन मध्ये आणत आहे असे पुरावे नाहीत असे अमेरिकन गुप्तचर यंत्रणेने सांगितले.
* युद्धामुळे भारतांत कदाचित वनस्पती तेलाचा तुडवडा भासू शकतो.
* भारताचे QUAD हे सुद्धा इंडो पॅसिफिक मधील NATO च असे चीन समजतो अशी धमकीवजा घोषणा चिनी पर राष्ट्र मंत्रालयाने केली.
* आधी आठवडा भरांत संपेल असे वाटणारे युद्ध आता कदाचित बराच काळ लांबेल.
* माझ्या कामाच्या ठिकाणचे (पण थेट ओळख नसलेले) काही युक्रेनी-अमेरिकन मातृभूमी साठी लढायला परत देशांत गेले. दोन्ही लोकांना युक्रेनी सैन्यांत कर्तव्य करण्याचा अनुभव होता.
- Log in or register to post comments
T
Trump
Tue, 03/08/2022 - 09:53
नवीन
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, तामिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्ह्यातील २१ वर्षीय विद्यार्थी, सैनिकेश रविचंद्रन हा रशियाविरुद्ध लढण्यासाठी युक्रेनियन निमलष्करी दलात सामील झाला आहे. वृत्तानुसार, अधिकार्यांनी त्याच्या घरी जाऊन रविचंद्रनच्या पालकांशी संवाद साधला आणि असे कळले की त्याने भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी अर्ज केला होता पण तो नाकारण्यात आला होता.
रविचंद्रन २०१८ मध्ये अभ्यासासाठी युक्रेनच्या खार्किव शहरात गेला होता. त्याचा अभ्यासक्रम २०२२ मध्ये पूर्ण होणार होता. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान रविचंद्रन यांच्या कुटुंबाचा संपर्क तुटला होता. दूतावासाची मदत घेतल्यानंतर कुटुंबीयांनी रविचंद्रन यांच्याशी संपर्क साधला. दरम्यान, रशियाविरुद्ध लढण्यासाठी युक्रेनच्या निमलष्करी दलात सामील झाल्याचे रविचंद्रनने कुटुंबीयांना सांगितले आहे.
https://www.loksatta.com/desh-videsh/indian-student-reached-ukraine-to-fight-against-russia-claims-ukrainian-media-abn-97-2833254/
- Log in or register to post comments
S
sunil kachure
Tue, 03/08/2022 - 10:12
नवीन
ह्या तमिळ nadu मधील व्यक्ती ला भारतीय समजू नये .
शत्रू समजून योग्य तो व्यवहार करावा
- Log in or register to post comments
T
Trump
Tue, 03/08/2022 - 10:16
नवीन
श्री कचुरे, हे जरा जास्तच होतेय.
वेगळे मत असणे वेगळे आणि उघड उघड इतर देशवासी लोकांबद्दल शत्रुत्वाची भावना वेगळी.
-
कृपया वर्तणुकीमध्ये सुधारणा करावी.
- Log in or register to post comments
S
sunil kachure
Tue, 03/08/2022 - 10:33
नवीन
त्या तमिळ nadu मधील व्यक्ती ल जबरदस्ती नी युक्रेन सेनेत सामील केले असेल तर भारत सरकार नी हस्तक्षेप करावा.
पण तो स्वतःच्या इच्छे नी रशिया विरुद्ध लढत असेल तर ते देश द्रोही काम आहे.
रशिया भारताचा मित्र आहे कोणत्या तरी मूर्ख व्यक्ती साठी देश हित संकटात येता कामा नये .
- Log in or register to post comments
क
कॉमी
Tue, 03/08/2022 - 18:45
नवीन
यूएस ने रशियन ऑइल आयातीवर निर्बंध घातले.
https://www.google.com/amp/s/www.nbcnews.com/news/amp/rcna19119
- Log in or register to post comments
T
Trump
Tue, 03/08/2022 - 19:05
नवीन
अखात्रीशीर : श्री झेलन्स्की यांनी क्रिमिया आणि डोम्बास रशियाला देण्यास तयार.
- Log in or register to post comments
T
Trump
Tue, 03/08/2022 - 20:19
नवीन
श्री पुतीन युक्रेन जिंकण्याऐवजी श्री झेलेन्स्की यांच्यावर दबाव आणुन आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यात जास्त उत्सुक असावेत. एकदा युक्रेनने मागण्या मान्य केल्या की रशियावरील बंधनांना कोणताच आधार राहत नाही, युक्रेनच्या पुनर्बांधणीचा खर्च वाचतो, युक्रेनचे सरकार पुढे चालवण्यासाठी सैनिक ठेवण्याची गरज नाही.
- Log in or register to post comments
T
Trump
Wed, 03/09/2022 - 07:07
नवीन
सौदी अरब आणि संयुक्त अरब अमिरातीच्या नेत्यांचा श्री बायडेन यांचा दुरध्वनी घेण्यास नकार. मी ही पहिल्यांदा बघत आहेत. अरब देश कायम अमेरिकेच्या कच्छपि होते.
-
Saudi Arabia, UAE Leaders Reportedly Decline Calls With Biden Amid Ukraine Crisis
https://news.yahoo.com/saudi-arabia-uae-leaders-reportedly-041055907.html
- Log in or register to post comments
स
साहना
Wed, 03/09/2022 - 12:35
नवीन
दिवस १३ :
* युक्रेन ला मिग विमाने देण्याचा प्रयत्न पोलंड करत असला तरी हि विमाने नक्की उडवून कोण युक्रेन मध्ये नेणार हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे हे होण्याची शक्यता कमीच वाटते.
* रशियन बनावटीची विमान विरोधी यंत्रणा अनेक युरोपिअन देशांकडे आहे ती युक्रेन कडे पोचविण्यात येत आहे.
* एकूण १७,००० रणगाडा विरोधी क्षेपणास्त्रे युक्रेन मध्ये पोचली आहेत. रशियाकडे एकूण साधारण १२,००० रणगाडे असले तरी त्यातील फारतर २८०० ऑपेरेशनल आहेत.
* एक भारतीय मुलगा युक्रेन तर्फे लढत आहे. भारतीय सैन्यांत प्रवेश नाही मिळाला म्हणून हा गॉर्जिया देशाच्या फॉरेन लिजिअन मध्ये गेला आणि त्यांच्या तर्फे आता तो युक्रेन मध्ये आहे.
* रशियन रक्षा मंत्रालयाचा इंग्रजी टेलिग्राम चॅनेल आहे त्यावर रशियन सरकार तर्फे माहिती इंग्रजीतून मिळते : https://t.co/fEgYZ6tlvj
* सौदी अरेबिया आणि इतर अरब राष्ट्र प्रमुखांनी बायडन ह्यांच्याशी बोलण्यास नकार दिला.
सौदी अरेबिया हा देश आणि त्याचे प्रमुख ह्यांच्या विषयी मला नेहमीच कुतूहल वाटत आले आहे. अतिशय तटस्थ माहिती हवी असेल तर हा लेख/मुलाखत मला खूप आवडली मार्च ३ ची आहे :
https://www.theatlantic.com/magazine/archive/2022/04/mohammed-bin-salman-saudi-arabia-palace-interview/622822/
* CIA डिरेक्टर बिल बर्न्स ह्यांची मुलाखत :
https://www.npr.org/2022/03/08/1085155440/cia-director-putin-is-angry-and-frustrated-likely-to-double-down
> The CIA director said Putin premised his war on four false assumptions: He thought Ukraine was weak, he believed Europe was distracted and wouldn't mount a strong response, he thought Russia's economy was prepared to withstand sanctions and he believed Russia's military had been modernized and would fight effectively.
> "He's been proven wrong on every count," said Burns, who served as the U.S. ambassador to Russia from 2005 to 2008.
* युक्रेन मधील युद्धाचा भारताला काही ठिकाणी बराच फायदा होणार आहे. मागच्या वर्षी भारतांत हजारो टन गहू सडून गेला. FCI कडे अक्षरशः लक्षावधी टन गहू पडून आहे ह्यांतील ५०० हजार टन भारत निर्यात करणार आहे आणि वर्षअखेर पर्यंत ७ दशलक्ष टन गहू निर्यात करण्यात येणार आहे.
* दोन रशियन FSB अधिकाऱ्यांचा संवाद इंटरसेप्ट करण्यात आला. ह्यांत FSB अधिकारी जनरल मेजर वीतली गररिसिमोव ह्यांचा मृत्यू खारकीव मध्ये झाला असे आपल्या बॉस ला सांगतो. हा एक अत्यंत उच्चपदस्थ तसेच खूप मेडल्स प्राप्त general होता : https://twitter.com/christogrozev/status/1500959074653024259
* काही मोठ्या रशियन अधिकाऱ्यांचा मृत्यू ह्या युद्धांत झाला आहे. हि माहिती रशियाने सुद्धा काही ठिकाणी मान्य केली आहे तर काही ठिकाणी मृतांच्या परिवारजनानी सुद्धा हे मान्य केले आहे. जास्त माहिती साठी : https://twitter.com/RALee85/status/1500794161963937793
* रशियन युद्धनीती ह्या युद्धांत कशी दिसून येत आहे त्याची चांगली वाईट बाजू कशी दिसून येत आहे आणि सैन्याच्या ढिसाळपणाची करणे काय आहेत त्यावर मेजर जनरल मायिक रायन ह्यांचे लेखन वाचण्यासारखे आहे : https://twitter.com/WarintheFuture/status/1501358032034275329
* एकूण हे युद्ध खुप दिवस लांबणार असे दिसते. युद्ध जितके दिवस लांबेल तितके ह्या युद्ध जिंकण्यासाठी रशिया आणखीन अधीर होईल. आधीच रशियन अर्थव्यवस्था कोलमडली आहे पण युद्धाचा खर्च त्यावर आणखीन ताण टाकेल. युक्रेन सोबत वाटाघाटी करून रशिया "जितं मया" करू शकतो पण ह्या वाटाघाटीत निर्बंध मागे घ्यावेत अशी मागणी करणे सध्यातरी रशियाला शक्य नाही.
* युद्ध जितके जास्त काळ चालेल तितकी रशियन अर्थव्यवस्था आणि रशियन कारखाने हे कमकुवत होत जातील. वेगाने पडणाऱ्या रशियन कंपन्यांचे स्टोक कवडीमोल किमतीत चीन विकत घेईल त्यामुळे गझप्रोम सारखया रशियन कंपन्या कदाचित चीन च्या हातांत जातील. ह्या सर्वाचा परिणाम शेवटी भारतीय संरक्षण सज्जतेवर होईल असे भाकीत अनेक लोक व्यक्त करत आहेत. भारतीय विमाने, बोटी इत्यादी रशियन बनावटीचे असल्याने त्या नेहमी सज्ज तेहवण्यासाठी सुटते भाग वगैरे रशियातून येणे आवश्यक आहे. त्यामुळे युद्धाचा सोक्षमोक्ष लवकर लागणे भारताच्या हिताचे आहे असे दिसते.
* सध्या इराण आणि नॉर्थ कोरिया ह्यांच्या पेक्षा रशियावर जास्त निर्बंध आहेत.
- Log in or register to post comments
स
सुखीमाणूस
गुरुवार, 03/10/2022 - 02:13
नवीन
एकत्र सगळी माहीती मिळाली. तुम्ही चान्गले सन्कलन करत आहात.
- Log in or register to post comments
स
साहना
Sun, 03/13/2022 - 09:05
नवीन
मार्च १३:
वैयक्तिक कारणांनी व्यस्त असल्याने जास्त लिहू शकले नाही पण युक्रेन मधील घडामोडीवर बारीक नजर आहे !
* युक्रेन आणि रशिया मध्ये वाटाघाटी चालू आहेत. सध्याच्या माहिती प्रमाणे वाटाघाटी ठरविक वेळेंत न होता, आता विविध छोट्या वर्किंग कमिटी निर्माण करून त्याच्या मध्ये होत आहेत.
* रशियाचे ३ उच्चपदस्थ अधिकारी मेजर जनरल मारले गेले आहेत असे युक्रेन ने सांगितले असले तरी त्यातील एकच confirmed आहे.
* रशियन सैन्य खरेच ढिसाळ आहे कि निव्वळ युक्रेनी-पाश्चात्य प्रोपागंडा ? ह्या प्रश्नाचे उत्तर आता हळू हळू मिळत आहे. पुतीन ह्यांनी आधी आपल्या भाषणात आपण conscript सैनिक वापरत नाहीत असे प्रतिपादन केले होते पण त्याच्याच आर्मीने काही दिवसांनी सार्वजनिक स्वरूपांत ह्यांचे खंडन केले. conscript होते आणि ते आता माघारी बोलवत आहोत असे त्यांनी सांगितले.
* पुतीन ह्यांनी आपल्या भाषणांत "सर्व काही प्लॅन प्रमाणेच चालले आहे" अशी घोषणा केली होती पण आज त्यांचे चेचेन मधील हस्तक kadyrov ह्यांनी रशियन प्रगती फार संथ असल्याने आणि अपेक्षेप्रमाणे नसल्याने सैनिकांचे मनोबल कमकुवत आहे असे सार्वजनिक पद्धतीने सांगितले. https://twitter.com/DAlperovitch/status/1502886300243927040
* पुतीन ह्यांनी आपल्या गुप्तहेर यंत्रणेचे एक प्रमुख आणि त्यांचे कनिष्ठ अधिकारी ह्यांना नजरकैदेत टाकले आहे. ह्या दोघांनी आपली दिशाभूल केली अशी पुतीन ह्यांची समजूत असावी असे अज्ञातवासांत असलेल्या ओझेचकीन ह्या रशियन वार्ताहराने सांगितले.
* चीन ने रशियाला विमानाचे सुट्टे भाग द्यायला नकार दिला. त्यामुळे रशियन विमाने आता उडू शकणार नाहीत (नागरी/व्यावसायिक) आणि बर्मुडा ने सुद्धा ह्या विमानांचे परवाने रद्द केले. बहुतेक रशियन व्यावसायिक विमाने बर्मुडा मध्ये रजिस्टर आहेत.
* रशियन रक्षा मंत्रायलने आपल्या टेलिग्राम चॅनल वर तसेच इतर माध्यमातून आपली बाजू दाखवायचा प्रयत्न केला आहे. रशियांतील विविध गांवातील मृत सैनिकांचा अंतिम संस्कार होत आहेत त्यामुळे बळींची संख्या नक्की किती असावी ह्याचा अंदाज येत आहे. युक्रेनी मंत्रालयाने रशियन बळींची संख्या साधारण १२,००० आहे असे सांगितले असले तरी प्रत्यक्षात हि ५००० च्या आस पास असावी असा इतर देशांच्या गुप्तहेरांचा अंदाज आहे.
* फोटो उपलब्ध आहेत त्यावरून रशियाने साधारण १९३ रणगाडे गमावले आहेत असे दिसून येते. युक्रेनी मंत्रालयाने हाच एकदा ५०० आहे असे सांगितले आहे. ह्याउलट रशियन मंत्रालयाने आपण युक्रेन चे ४०० रणगाडे नष्ट केले आहेत असे सांगितले आहे.
* खेरसण शहरावर रशियाने ताबा घेऊन तिथे आपला मेयर नियुक्त केला आहे.
* मेलिटोपोल हे शहर सुद्धा रशियाच्या ताब्यांत आले असून तिथे त्यांनी मेयर चे अपहरण केले आहे.
* पुढील आठवडा खारकीव आणि क्यिव शहरांवर रशिया कदाचित लक्ष केंद्रित करेल.
अवांतर:
जणू काही जगांतील सर्व समस्या कमी होत्या म्हणून कि काय भारतीय रक्षादलाने सुद्धा अत्यंत बेजबाबदार पणा दाखवला आणि भारतीय क्षेपणास्त्र म्हणे अपघाताने उडून पाकिस्तान मध्ये जाऊन पडले !
- Log in or register to post comments
T
Trump
Sun, 03/13/2022 - 13:01
नवीन
जर चुकुन झाले तर निव्वळ मुर्खपणा आणि बेजबाबदारपणा.
-
पण जर मुद्दामहुन केले असेल तर हीच वेळ योग्य. सगळे जग युक्रेनमध्ये गुंतले आहे. हीच वेळ असल्या उचापती करण्याची.
- Log in or register to post comments
T
Trump
Wed, 03/16/2022 - 12:44
नवीन
HQ-9P पाकिस्तान विकत घेतलेल्या वायु संरक्षण योजनेची उपयुक्ता जितकी जाहीर केली होती तितकी दिसुन येत नाही.
https://thesvi.org/induction-of-hq-9p-air-defence-system-by-pakistan-criticality-of-air-defence-systems/
https://militarywatchmagazine.com/article/pakistans-hq9p-complicate-indian-operations
https://www.sundayguardianlive.com/news/pak-fails-intercept-indias-missile-unease-ghq
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
Sun, 03/13/2022 - 12:24
नवीन
पाकीस्तानी मिडियामधील ही चर्चा रोचक वाटली.
- Log in or register to post comments
स
साहना
Mon, 03/14/2022 - 08:03
नवीन
मार्च १४ :
नितीन पै ह्यांचा हा लेख वाचण्याजोगा आहे. ह्या लेखांत युक्रेन युद्ध आणि भारतीय धोरण ह्यांचा उहापोह केला आहे.
ठळक मुद्दे
* रशियावरील भारताच्या अति अवलंबनाने भारताचे धोरणात्मक सार्वभौमत्व मर्यादित आहे असे दिसून येत आहे.
* कुठलाही निर्णय राष्ट्रहिताचा असावा. पण योग्य ते निर्णय घेण्यासाठी स्वातंत्र्य असणे महत्वाचे आहे.
* रशियाला डच्चू देण्याची भारतासाठी हि सुवर्ण संधी होती. भारतीय हिताच्या दृष्टीने आणि भारतीय भविष्यासाठी पाश्चात्य राष्ट्रांशी जास्त व्यापार, त्यांची जास्त गुंतवणूक हि भारतासाठी रशिये पेक्षा कैक पटीने महत्वाची आहे. ह्या युद्धाने रशिया हे चिनी मांडलिक राष्ट्र बनण्याची जास्त शक्यता आहे आणि त्याची फार मोठी झळ भारताला बसेल.
टीप: भारतीय नौदलाची बहुतेक टर्बाईन्स हि युक्रेन मध्ये बनवली जातात. ह्या फॅक्टरीवर आज रशियाने हल्ला करून ती नष्ट केली.
https://notes.nitinpai.in/In+no+particular+order/Indian+foreign+policy+after+the+Russia-Ukraine+war
- Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे
Mon, 03/14/2022 - 09:15
नवीन
युरोपियन गुंतवणूक करतील ह्या आशेवर भारताने रशियाला डच्चू वगैरे देऊ नये. परंतु भरताने संरक्षण क्षेत्रातील अवलंबित्व मात्र कमी करावे मग ते कोणत्याही देशावर का असेना. काहीच दिवसापूर्वी आपण अमेरिकेबरोबर होणार ड्रोन चा सौदा कॅन्सल केला आहे, DRDO स्वतः बनवणार आहे.
- Log in or register to post comments
स
साहना
Wed, 03/16/2022 - 23:14
नवीन
मार्च १७ :
पुतीन ह्यांनी आज एक भाषण केले. पुतीन ह्यांत बरेच चिडलेले आणि वैफल्यग्रस्त वाटत होते.
https://twitter.com/nntaleb/status/1504210862852165636
मागील काही दिवसांत यूक्रेन रशियन वाटाघाटीत रशियाला बरीच माघार घ्यावी लागली आहे आणि वेळ जाईल तशी आणखीन माघार घ्यावी लागेल अशी चिन्हे आहेत. कदाचित ह्याच मुले पुतीन भयंकर चिडलेले वाटत आहेत. ह्या भाषणात त्यांनी युक्रेन पेक्षा रशियन लोकांवरच जास्त तोंडसुख घेतले कास्ट (जात ह्या अर्थी), स्कम, देशद्रोही, गुलाम, ५वा स्तंभ (घरचे भेदी) अशी विविध विशेषणे लावून त्यांनी देशाला "सेल्फ प्युरिफिकेशन" ची गरज आहे म्हणजे ह्या लोकांना काढून टाकले पाहिजे शी चीड चीड व्यक्त केली.
https://twitter.com/simonmontefiore/status/1504184497042079755
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9