Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - जानेवारी २०१९

व
वामन देशमुख
Tue, 01/01/2019 - 15:48
🗣 616 प्रतिसाद
सर्व मिपा करांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! राम मंदिरासाठी अध्यादेश नाही ! घटनात्मक मार्गाचाच वापर करणार ; पंतप्रधान मोदींनी मांडली भूमिका “राम मंदिराच्या मुद्यावरून मागील काही दिवसांपासून वातावरण चांगले तापले आहे. आरएसएसनेही राम मंदिराचे लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी अध्यादेश काढण्याची मागणी केली होती. शिवसेनाही यासाठी मागील अनेक दिवसांपासून आग्रही होती. पण भाजप नेमकी याबाबत काय भूमिका घेणार हे स्पष्ट नव्हते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नसून, घटनात्मक मार्गानेच राम मंदिराची उभारणी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एका वृत्तवाहिनीने मोदींनी अशी भूमिका मांडल्याचा दावा केला आहे.” मोदींच्या भूमिकेचे स्वागतच आहे, तथापि, राममंदिरासाठी न्यायालयाचा मार्ग धरणे हे घटनात्मक आहे, आणि त्यासाठी अध्यादेश काढणे, हे घटनात्मक नाही, असे आहे का? संघाने राममंदिरासाठी अध्यादेशाची मागणी करणे आणि सरकारने मात्र न्यायालयीन मार्गाचा आग्रह धरणे ही मे २०१९ च्या लोकसभेची तयारी म्हणावी का? नोटः यासाठी अध्यादेश काढावा असं माझं मत नाही, न्यायालयात जे काही चाललंय ते चालू द्यावं.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 225912 views

🗣 चर्चा (616)
ट
ट्रम्प गुरुवार, 01/10/2019 - 05:37 नवीन
‌आखिल भारतीय काँग्रेस महासमिति च्या महिला विभागाच्या चिटणीस म्हणून रागा नी नवीन इतिहास घडविला . अप्सरा रेड्डी या तामिलनाडु मधील तृतीयपंथी ची निवड ही लक्षणिय बाब आहे . गरजू , अडले नडलेल्याना रात्रदिवस न पाहता मदत करने ही राष्ट्रीय कुटुंबा ची खासियत वेळो वेळी दिसून आली आहे व अशा कित्तेक गरजू इच्छुक लोकांना रागाचे डैडी व काका ने राजकारणात आणले ( लोकसभेत ही !! ही !! करून हसणारी हिडिंबा ही त्यातलीच ) .त्या दोघानी राजकारणात प्रस्थापित केलेल्या अनेक लोकांच्या सुरस कथा बी बी सी वर उपलब्ध आहेत आणि विशेष म्हणजे बी बी सी भाजप विरोधी बातम्या देण्यात एक्सपर्ट आहे . तीच परंपरा पुढे चालवत रागानी एका तृतीयपंथीला हात देवून संजय काका आणि डैडी च्या पुढे पावुल टाकले आहे . ‌ ‌या अप्सरे नी काही दिवस भाजपची वाट धरली होती परंतु कलागुणानां तेथे किंमत न मिळाल्या मुळे रागा ला त्यांनी हाक दिली व रागाने ही पटकन चिटणीस पदी नेमणुक करून औदार्य दाखवले .
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice गुरुवार, 01/10/2019 - 12:50 नवीन
FB वर अफवा पसरवण्यात म्हातारे आघाडीवर {{_https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/science-technology/people-older-than-65-share-the-most-fake-news-on-facebook/articleshow/67469590.cms}}
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 01/10/2019 - 13:08 नवीन
कुणाल काम्राचा एक भारी कॉमेडी वीडियो आहे. नोट: भाषा आक्षेपार्ह आहे, याची कृपया नोंद घ्यावी. https://youtu.be/9NUXCAZs5VU
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice गुरुवार, 01/10/2019 - 15:06 नवीन
थेरडेशाही.... अजुन काय !!!!
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 01/10/2019 - 15:02 नवीन
श्रीलंकेनंतर मलेशिआ पण पाकिस्तानी जेएफ- १७ पेक्षा भारतीय बनावटीच्या तेजसवर जास्त भरोसा ठेवायचा विचार करायला लागलीय. तिथे भरणाऱ्या २०१९ च्या संरक्षण विषयक प्रदर्शनात तेजस विमान ठेवण्यासाठी भारताला कळवण्यात आलय. खरतर तेजस विमान, पाक व चिनने संयुक्तरित्या बनविलेल्या विमानापेक्षा २५ कोटींनी महाग आहे तरीही मलेशिआची पसंती तेजसला असल्याचे दिसून येते आहे. खरतर तेजस अजूनही पूर्णपणे विकसीत झालेले नाहीये. तरीही या क्षेत्रातील तज्ञांच्या मते तेजस विमान जेएफ- १७ पेक्षा वजनाला हलके असून अद्ययावत डिजीटल नियंत्रण सुविधा, मायक्रोप्रोसेसरवर आधारीत उपकरणे यामुळे जास्त प्रभावी बनले आहे. विमानाच्या इंजिनाबद्दल तर सगळेच मान्य करतात की, तेजसला बसवलेले अमेरिकन बनावटीचे जीई४०४ इएन हे इंजिन नक्कीच पाकी विमानापेक्षा उत्कृष्ट आहे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 01/10/2019 - 16:21 नवीन
पंतप्रधान, सर्वोच्च न्यायाधिशांनी नियुक्त केलेले सर्वोच्च न्यायालयातिल एक सद्य न्यायाधिश आणि विरोधी पक्षनेता, यांच्या सिलेक्शन पॅनेलने अलोक वर्मा यांना, भ्रष्टाचार आणि कर्तव्यात कामचुकारपणा (corruption and dereliction of duty) या कारणांनी सीबीआयच्या संचालकपदावरून बडतर्फ केले आहे. निवृत्तीच्या ३१ जानेवारी २०१९ पर्यंत, डायरेक्टर जनरल (फायर सर्विसेस, सिव्हिल डिफेन्स आणि होमगार्ड्स) या पदावर त्यांची बदली केली आहे. काही दिवसांपूर्वी, त्यांना सुट्टीवर पाठविण्याचा निर्णय तांत्रिक कारणांसाठी अवैध ठरवून सर्वोच्च न्यायालयाने त्यांची त्या पदावर परत नेमणूक केली होती. तसे करताना न्यायालयाने त्यांना धोरणात्मक निर्णय (policy decisions) घेण्यास प्रतिबंध केला होता.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 01/10/2019 - 18:46 नवीन
हा निर्णय २ विरुद्ध १ अश्या बहुमताने घेण्यात आला आणि या प्रक्रियेमध्ये सर्वात गमतीची (खरे तर दुर्दैवाची) गोष्ट अशी झाली आहे... लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसचे नेता या नात्याने पॅनेल सदस्य असलेल्या... श्री मल्लिकार्जुन खर्गे यांचे, आलोक वर्मा यांच्या नियुक्त करण्याच्या वेळेस = विरोधी मत. आणि आता, श्री मल्लिकार्जुन खर्गे यांचे, आलोक वर्मांना भ्रष्टाचाराच्या कारणाने काढून टाकण्याच्या वेळी = विरोधी मत. टीप्पणीची गरज नाही (No comments) !
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Fri, 01/11/2019 - 00:32 नवीन
आपली कुठलीच भूमिका ठामपणे धरून ठेवता येत नाही अशी काँग्रेसींची स्थिती झाली आहे. म्हणून तर वैयक्तिक आणि अशिष्ट हल्ले चालू आहेत. मोदी स्त्रीच्या मागे लपतात हे म्हणणे काय किंवा पर्रीकरांच्या घरात राफेलची फाईल लपवून ठेवली आहे म्हणणे काय किंवा निवडणुकीत फायदा मिळावा म्हणून ही महत्वाची बिले/ योजना सादर करण्यात येतात हा आरोप काय. सगळाच मूर्खपणा आहे. काय तर म्हणे अलोक वर्मा राफेलमधील तथाकथित घोटाळ्यांची चौकशी करणार होते म्हणून त्यांना त्रास देतात. या लोकांना हे पण माहित नाही की ते ३१ जानेवारीला निवृत्त होणार आहेत. एवढ्या कमी वेळात कसली चौकशी करणार होते?
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Fri, 01/11/2019 - 01:37 नवीन
असे यु टर्न तर मोदीजींनी भरपूर घेतले आहेत, आणि एखाद्याच्या नियुक्तीच्या वेळचेच मत काही काळाने तसेच ठेवावे , असा काही नियम आहे का ?
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Fri, 01/11/2019 - 02:00 नवीन
म्हणून तर तुम्ही मोदींचा द्वेष करता ना? मग ते जसा यु टर्न घेतात तसाच यु टर्न तुमचे लाडके घेतात तेव्हा त्यांचा का द्वेष करत नाही? एखाद्याच्या नियुक्तीच्या वेळचेच मत काही काळाने तसेच ठेवावे , असा काही नियम आहे का ? नाहीये ना? पण निदान हे मत का बदलले ते तरी सांगावे. तसेच आधी विरोध का होता हे पण सांगावे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 01/11/2019 - 05:06 नवीन
अहो मोगा नी इतके यु टर्न घेतले आहेत कि नक्की कोणत्या दिशेला जायचंय तेच समजेनासे झाले आहे. LLRC
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 01/11/2019 - 05:04 नवीन
आतली बातमी -- अगोदर खर्गे साहेबाना वाटलं कि आलोक वर्मा हे "लवचिक" नाहीत. म्हणून त्यांना विरोध झाला. मग हरयाणातील जमीन घोटाळा ( कोण ते ओळखा) मध्ये त्यांनी "सोयीस्कर" भूमिका घेतली. अशी भूमिका घेतल्यावर "नावडती"ची "आवडती" झाली. म्हणून मग शेवटचे १५ कामाचे दिवस असतानासुद्धा त्यांना पदावर कायम ठेवण्याचा निकराचा प्रयत्न चालू होता. आणि अलोक वर्मानी पहिल्या ३६ तासातच आवडत्या माणसांना परत आणण्याचे आदेश देऊन आपली निष्ठा दाखवून दिली. परंतु श्री मोदी १ आणि श्री खर्गे १ अशा बरोबरीतील सामना असताना न्यायमूर्ती अर्जन कुमार सिक्रि यांनी तिसऱ्या पंचासारखे सर्व पुरावे पाहून श्री आलोक वर्मा ना आउट दिलंय. त्यामुळे आता खर्गे आणि काँग्रेसी लोक नोबॉल होता, बॅड लाईटच होता असले भंपक आरोप करत आहेत? कोणीही न्यायमूर्ती अर्जन कुमार सिक्रि यांनी असा निर्णय का दिला हे बोलत नाहीत. हरयाणातील जमिनीच्या घोटाळ्यातील घाण बाहेर आली तर काय हि खरी भीती आहे.
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Fri, 01/11/2019 - 08:18 नवीन
हे सगळे तुम्ही सुप्रीम कोर्टास का नाही वदले ?
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Fri, 01/11/2019 - 08:38 नवीन
कॉग्रेस चे लोक स्वतःचीच कबर खोदत आहेत, चांगल आहे, देश वाचेल !!
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Fri, 01/11/2019 - 08:15 नवीन
गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक झालेला परशुराम वाघमोरे (वय २६) याच्या टूथब्रशवरील डीएनएचे नमुने हा न्यायालयात महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे. हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातून ही बाब समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी १८ जणांविरोधात तब्बल ९ हजार २३५ पानी आरोपपत्र दाखल केले आहे. https://www.loksatta.com/desh-videsh-news/gauri-lankesh-murder-case-dna-from-toothbrush-parashuram-waghmore-key-evidence-1821051/
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 01/11/2019 - 08:33 नवीन
काय तर म्हणे अलोक वर्मा राफेलमधील तथाकथित घोटाळ्यांची चौकशी करणार होते म्हणून त्यांना त्रास देतात. या लोकांना हे पण माहित नाही की ते ३१ जानेवारीला निवृत्त होणार आहेत. एवढ्या कमी वेळात कसली चौकशी करणार होते?
मग ३१ जानेवरीपर्यंत कामावर ठेवायला काय हरकत होती? मोदींच्या विश्वासातले रकेश अस्थाना हे काही प्रामाणिक म्हणून प्रसिद्ध नाहीत. ४ कोटी लाच घेतल्याचा आरोप आहे. वर्मा ह्यांनी त्यांचे मोबाईल्स टॅप केले होते. ज्या दिवशी अस्थाना ह्यांना अटक होणार होती त्याच्या आदल्या रात्री मध्यरात्री वर्मा ह्यांचे ऑफिस सील केले गेले. शिवाय गुजरात्मध्ये संदेसरा कुटुंबियांशी जवळीक करून पैसे खाल्ल्यचाही आरोप अस्थाना ह्यांच्यावर आहे. आता अस्थाना कोणत्या स्थानी जाउन विराजमान होतात ते बघुया.
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Sat, 01/12/2019 - 04:51 नवीन
अहो माई, ही बातमी वाचा. ही पण आता बोला. मोदींच्या विश्वासातले रकेश अस्थाना हे काही प्रामाणिक म्हणून प्रसिद्ध नाहीत. ४ कोटी लाच घेतल्याचा आरोप आहे. मोदी आणि त्यांचे चेले तसलेच आहेत हो, त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडून फार अपेक्षा करू नका. वर्मांनी त्यांचे फोन टॅप केले असं कोण म्हणतंय? आणि त्यातून काय निष्पन्न झालं?
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Fri, 01/11/2019 - 08:40 नवीन
विद्यार्थ्यांचे म्हणणे काय ? काही विद्यार्थी संघटनांचा पुणेरी पगडीला विरोध आहे. ‘पुणेरी पगडी हे पेशवाईचं प्रतीक असून फुले पगडी हे शिक्षणाचं प्रतीक आहे. तळागाळापर्यंत शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी फुलेंनी अथक मेहनत घेतली. तर पुणेरी पगडीचा शिक्षणाशी काडीमात्र संबंध नाही. त्यामुळे पुणेरी पगडीच्या जागी फुले पगडीचा समावेश करण्यात यावा, असे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे. https://www.loksatta.com/pune-news/savitribai-phule-pune-university-convocation-ceremony-puneri-pagdi-row-4-students-detained-1821131/
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Fri, 01/11/2019 - 14:22 नवीन
मोदींविरुद्ध प्रतिज्ञापत्र देणाऱ्या माजी पोलीस अधिकारी संजीव भट यांच्या पत्नीच्या गाडीला डम्परने उडवले. पत्नी व मुलगा जखमी.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 01/11/2019 - 15:24 नवीन
कठिण आहे. आता 'अपघात हे रोजचेच असतात. त्यात विशेष ते काय?" अशी भक्त-संप्रदायी प्रतिक्रिया येईल. असो. "Moreover, there was no number plate on the dumper nor were any vehicle registration or identification papers available." https://newscentral24x7.com/ishrat-jahan-fake-encounter-case-cop-accused-g-l-singhal-promoted-gujarat-bjp-govt/
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Fri, 01/11/2019 - 17:31 नवीन
हा अपघात भाजप ला अडकवन्या साठी काँग्रेसने केले नसेल कशावरुन ? वर्षानूवर्षे काँग्रेस च्या आशिर्वादा मुळे माजलेल्या भ्रष्ट्र बाबू शाहीने सुद्धा अपघात घडवन्या साठी मदत केली असेल आणि शिवाय काँग्रेस ला असे योगायोग घडविन्याची सवय आहे जसे कांग्रेस च्या काळात काही वर्षा पूर्वी इसरो चे चार शास्रध्न्य अचानक मरण पावले होते .
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Fri, 01/11/2019 - 18:10 नवीन
ते तर गुजरातेत होते ना ? तिथे तर मोदी अन भाजपाच आहेत ना?
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Fri, 01/11/2019 - 19:22 नवीन
अब्यास वाडवा !
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Sat, 01/12/2019 - 05:10 नवीन
News central सोडून इतर कोणत्याही न्यूज़ पेपर , न्यूज़ चैनल वाल्यानी या बातमी ला महत्व दिले नाही अगदी बरखा आणि राजदीप सरदेसाई ने सुद्धा . मोदींच्या नावाने शंक वाजवत बसणाऱ्या एका ही न्यूज़ चैनल ने ही बातमी दाखवली नाही . ब्लैक कैट ला तर भाजप कावीळ झाली आहे त्यामुळे त्यांना प्रत्येक बातमी मध्ये भाजपला दोषी धरण्याची सवय लागली आहे . पण माई , तुझी देखील भाजप विरोधाची हातचलाखी वाखणन्याजोगी आहे = )
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sat, 01/12/2019 - 05:30 नवीन
चॅनेलवर दाखवले नाही की म्हणायचे , बातमीला महत्व नाही, चॅनेल्सवरदाखवले की म्हणायचे , ते विकले गेले आहेत , म्हणून मोदीविरोधात लिहीत असतात , कुठे शिकवतात ही मारीचकला ? नागपुरात ?
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Fri, 01/11/2019 - 19:21 नवीन
https://youtu.be/h39RogYBCFc कॉंग्रेस व मोगा मिंया च्या लाडक्या पाकिस्तानची करामात !! भारतावर अतिरेकी हल्ला करायच्या तयारीत आहेत !! तरी बर श्री मोदी मुळे भारताची तयारी उत्तम आहे आता ! गेल्या मुंबई हल्ल्या सारख झोपलेल सरकार आता नाही !! ज्या सॅटेलाईट मुळे हा धोका लक्षात आलेला आहे तो आताच्या सरकारच्या पाठींब्यामुळे त्वरेने केलेल्या सॅटेलाईट मुळे लक्षात आलेला आहे !! आता मोगा मिंया ह्यावर सुद्धा पचकल्या शिवाय रहाणार नाही वर Intolerence म्हणुन नाचायला मोकळा !!
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sat, 01/12/2019 - 05:27 नवीन
कारगिल सोडता उरलेल्या लढाया काँग्रेसनेच केल्या आहेत, मोदी सरकारला युद्धांचा अनुभव नाही
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Sat, 01/12/2019 - 06:17 नवीन
कारगिल सोडता उरलेल्या लढाया काँग्रेसनेच केल्या आहेत, -- काँग्रेस ?? मोग्या लेका किती फेकतोस !
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sat, 01/12/2019 - 06:43 नवीन
पूर्वीच्या लढाया काँग्रेसने केल्या नाहीत ? मग सर्जिकल स्त्राईक मोदींनी केला हेही खोटेच का ?
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Sat, 01/12/2019 - 07:14 नवीन
मग सर्जिकल स्त्राईक मोदींनी केला हेही खोटेच का ? -- असे मोदीनी केंव्हा म्हटले ? सर्जिकल स्ट्राईक भारतीय सैन्याने केला व त्या मागे श्री मोदींचा भक्कम सपोर्ट होता.
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sat, 01/12/2019 - 07:35 नवीन
काँग्रेसचेही तसेच .
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 01/12/2019 - 06:46 नवीन
कारगिल सोडता उरलेल्या लढाया काँग्रेसनेच केल्या आहेत, पण एकही युद्ध निर्णायक जिंकता आलेल नाही ! म्हणुन पाकिस्तान दर पाच वर्षांनी युद्ध करण्यासाठी यैत होता. युद्ध म्हणजे जनतेला लुटायची पर्वणी, त्यात कॉंग्रेसचा हात कोणीही धरु शकत नाही ! प्रत्येक खरेदीत कॉंग्रेसच्या भ्रष्ट सरकारने भ्रष्टाचार केला !
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sat, 01/12/2019 - 06:55 नवीन
कुठल्या कोर्टात हा भ्रष्टयाचार सिद्ध झाला ?
  • Log in or register to post comments
न
नंदन Fri, 01/11/2019 - 21:27 नवीन
रिपब्लिकन पार्टी ही रेसिस्टांची (आणि अलीकडे रेपिस्टांची) पार्टी बनत चालली आहे*, असं कुणी** म्हटलं की काही सुशिक्षित रिपब्लिकन (ही जमातही आता दुर्मीळ होत चालली आहे म्हणा!) दुखावले जातात. डिनायल (उदा. ट्रम्पतात्यांवर थेट निक्सनच्या काळापासून रेसिझमचे आरोप आणि पुरावे असताना - "छे, छे, तो तर न्यू यॉर्क शहरातला आहे. तो कसा रेसिस्ट असेल!" सारखे पोकळ युक्तिवाद), लंगड्या सबबी, काणाडोळा, समस्येचे गांभीर्य आणि वारंवारिता आहे त्याहून फारच कमी आहे असा दावा करणं, व्हाटअबाऊटरी, 'ट्रम्प-जिंकला-म्हणून-हे-कांगावे आहेत' अशी स्वत:च स्वत:ची समजूत करून घेणं इत्यादी नेहमीचे डिफेन्सिव्ह उपाय मग चोखाळले जातात. त्यांच्यासाठी हा, त्यांच्याच पक्षाच्या सिनेटरचा (टिम स्कॉट) हा घरचा अहेर:
Three months ago, a white supremacist killed two black people in a parking lot in Kentucky. We are only 18 months from Charlottesville, where white nationalists killed a white woman with a car and severely beat multiple black people. Almost four years ago, a white supremacist murdered nine African Americans in a church in Charleston, S.C....These are just a sliver of the havoc that white nationalists and white supremacists have strewn across our nation for hundreds of years.
Some in our party wonder why Republicans are constantly accused of racism — it is because of our silence when things like this are said. Immigration is the perfect example, in which somehow our affection for the rule of law has become conflated with a perceived racism against brown and black people.
ह्या लेखाची पार्श्वभूमी ही आयोवा राज्यातले काँग्रेसमन स्टीव्ह किंग यांच्या वक्तव्यांची आहे. आयोवा हे प्रायमरीमधलं (पक्षांतर्गत निवडणुका) सर्वात पहिलं राज्य असल्यामुळे तिथल्या जय-पराजयाचा पुढील राज्यांतील निवडणुकांवर मोठा प्रभाव पडतो. त्यामुळे, २०१६ च्या रिपब्लिकन प्रायमरीमध्ये सगळे उमेदवार स्टीव्ह किंगच्या रेसिस्ट वक्तव्यांकडे दुर्लक्ष करून, त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी झगडत होते. त्यात कोण यशस्वी ठरलं, हे वेगळं सांगायला नकोच! मेक्सिकन सीमेवर भिंत बांधणं, गौरेतर इमिग्रंट्सना शिव्याशाप देणं, चुकीच्या गोष्टी/आकडे/बातम्या दडपून देणं, जन्माद्वारे प्राप्त होणाऱ्या नागरिकत्वाच्या ('बर्थराईट सिटिझनशिप') घटनादत्त हक्काला विरोध# आणि एकंदरीत श्वेतवर्णीय हाच सर्वोच्च वंश अशी भूमिका ("श्वेतवर्णीय वेस्टर्न सिव्हिलायझेशन सोडलं तर, जगातल्या इतर कुठल्याही संस्कृतीने/वंशाने मानवी विकासात भर घातलेली नाही" असा अज्ञानी, द्वेषमूलक दावा ह्या किंगआजोबांनी केला होता!) ही श्री. स्टीव्ह किंग यांची विचारअपत्यं. (ट्रम्पतात्यांनी ती बेमालूम आपलीशी करून घेतली. ट्रम्पतात्यांचे भक्त मात्र, हे ओरिगिनल विचार आमच्या दूरदृष्टीच्या तात्यांचेच असं मानतात, हा भाग अलाहिदा! :)))
Mr. King’s influence over national politics derives from his representation of the reddest district in the first presidential nominating state. Nearly all the 2016 Republican presidential contenders sought his blessing at a forum he hosted in Des Moines in January 2015, Mr. Trump included.
*अर्थात, इथे सगळेच रिपब्लिकन्स रेसिस्ट असतात असं म्हणायचं नाही. तसं ज्यांना वाटत असेल, त्यांना वाढदिवसाच्या आणि अभ्यास वाढवण्याच्या शुभेच्छा! Most of the racists are Republicans, but most of the Republicans are not...इ.इ. वानगीदाखल, टेक्ससमधली ही बातमी पहा: Texas Republicans reject vote to oust GOP leader because he is Muslim. ** असले राजकारणी weasel words सराईतपणे वापरणं, हा आपण राजकारणी नसल्याचा दावा करणाऱ्या ट्रम्पतात्यांचा आवडता छंद आहे :) # एरवी अमेरिकन राज्यघटना ही पवित्र असून, ती अजिबात बदलू नये - जशी आहे तशीच राहू द्यावी असा आग्रह धरणारे तथाकथित "कॉन्स्टिट्युशनली प्युरिस्ट" कन्झर्व्हेटिव्ह मात्र याबाबतीत कमालीची लवचीकता दाखवतात! ;);)
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sat, 01/12/2019 - 10:08 नवीन
चौकीदार उवाच :  काँग्रेसचे अनेक मोठे जामिनावर बाहेर आहेत. – काँग्रेस विरोधात जन्मलेले पक्ष आज काँग्रेससमोर शरणागती पत्करत आहेत. – चौकीदार थांबणार नाही, आता तर सुरुवात झाली आहे. – चोर देशात असो किंवी विदेशात चौकीदार एकालाही सोडणार नाही. – आधीच्या सरकारमध्ये शौचलये, रेल्वे मार्ग, घरे, वीज-गॅस जोडणींची कामे ज्या वेगाने सुरु होती त्याच वेगाने ही काम चालली असती तर भरपूर वर्ष लागली असती माझ्या सरकारने ही सर्व कामे वेगाने केली. – सर्व समस्या दूर झाल्या असे मी म्हणणार नाही अजून भरपूर काही करण्याची गरज आहे. – शेतकऱ्यांवर कर्जाचा भार आहे त्याची कल्पना आहे. – आम्ही अन्नदाता म्हणजे शेतकऱ्याला सशक्त बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. – स्वामीनाथन आयोगाची शिफारस मंजूर केली. शेतकऱ्यांना खर्चाच्या दीडपट समर्थन मुल्य देत आहोत – शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्याची आधी ज्यांची जबाबदारी होती त्यांनी शॉर्टकटचे मार्ग अवलंबले. – आधीच्या सरकारने शेतकऱ्यांकडे मतपेटी म्हणून पाहिले. – आधीपासून लागू असलेल्या आरक्षणाशी छेडछाड न करता नवीन आरक्षण दिले. – काही जण नव्या आरक्षणावरुन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते कारस्थान आपल्याला हाणून पाडायचे आहे. – युवा शक्ती भारताची मुख्य ताकत. – देशाचा प्रत्येक पैसा राष्ट्र निर्माणासाठी वापरला जात आहे. – १० टक्के आरक्षण नव्या भारताचा आत्मविश्वास वाढवणारा आहे. – सरकार भ्रष्टाचाराशिवाय चालू शकते हे भाजपाने सिद्ध केले आहे. – दलालाना बाहेर काढता येते हे भाजपाने दाखवून दिले. – देश नव्या विश्वासाने भाजपाकडे पाहत आहे. – सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. – आपल्या आधीच्या सरकारने देशाला अंधारात ढकलले. – २००४ ते २०१४ ही दहावर्ष देशाने भ्रष्टाचार, घोटाळयामध्ये गेली. – सरदार वल्लभभाई पटेल पहिले पंतप्रधान बनले असते तर देशाचे चित्र वेगळे असते. – २००४ च्या निवडणुकीत अटलजी पंतप्रधानपदी कायम राहिले असते तर भारत आणखी उंचीवर गेला असता. – देश प्रामाणिकपणाच्या मार्गाने चालत आहे – मला आज जास्त वेळ बोलायचे आहे. – भारताला आपले लक्ष्य गाठायचे आहे. – दोन खासदार असलेल्या पक्षाचे आज विशालस्वरुप झाले आहे. – देशातील १६ राज्यांमध्ये भाजपाचे सरकार आहे.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 01/12/2019 - 10:17 नवीन
चौकीदार जो बोले सही बोले !!
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 01/12/2019 - 16:19 नवीन
मोगा खान असं बोलतात? गांजा कडक दिसतोय
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sat, 01/12/2019 - 10:18 नवीन
पटेलांच्या भारतात सामील होऊ नका , अशी संस्थानिकांना पत्रे कुणी लिहिली होती म्हणे ?
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 01/12/2019 - 13:36 नवीन
नेहरुंनी लिहीली असतील !!
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sat, 01/12/2019 - 16:10 नवीन
एकंदरित कामाचा वेग व आखणी पाहिली तर भाजपा सरकार बर्यापैकी प्रगती करत आहे. मात्र सुडाचे राजकारण त्यांनी सोडायला हवे. संजीव भट्ट ह्यांना का गुंतवण्यात येत आहे, आलोक वर्मा ह्यांचे ऑफिस रात्री अडिच वाजता सील करणे. हे सर्व उदात्त हेतुने होत आहे ह्यावर भक्तही विश्वास ठेवणार नाही. अरविंद पांगारिया, अरविंद सुब्रमण्यम्,सुरजीत भल्ला ,उर्जित पटेल ही सर्व परदेशस्थित आर्थिक क्षेत्रातील तज्ञ मंडळी. कालावधी पूर्ण न करता हे सर्व लोक सोडून गेले. आणी आता आलोक वर्मा. 'आम्हालाच सर्व कळते कारण आम्ही निवडून आलो आहोत' हा माज भाजपा-सेना युतीला १९९५-९९ ह्या काळात होता. चांगले काम तेव्हा झाले असूनही १९९९ च्या निवडणूकीत माज मतदारांनी उतरवला व पुन्हा काँग्रेसला निवडून आणले. ईतिहास सर्वानी लक्षात ठेवायला हवा.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 01/12/2019 - 16:18 नवीन
माईसाहेब सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अर्जन कुमार सिक्री यांनी पण श्री अलोक वर्मा याना हटवण्यासाठी आपले मत दिले याचाच अर्थ श्री अलोक वर्मा यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत त्यात काही तरी तथ्य असणार. श्री मोदी आणि श्री मल्लिकार्जुन खर्गे यांचे विचार पक्षीय दृष्टिकोनातून असतील त्यामुळे एकांगी/ पक्षपाती असतील हे गृहीत धरले तरी एक निष्पक्ष न्यायाधीश जर तातडीने त्यांना हटवा यावर शिक्का मोर्तब करतो याचा अर्थच "पाणी मुरते आहे" हे स्पष्ट आहे. काँग्रेसने जेवढी जहरी टीका केली त्यामधेय हा एक मुद्दा खुबीने टाळला आहे यातच सर्व काही आले.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sat, 01/12/2019 - 16:48 नवीन
आलोक वर्मा ह्यांच्यावर जर गंभीर आरोप आहेत ह्याची सरकारला खात्री असेल तर कामावरून काढून का नाही टाकले? होम गार्ड खात्यात बदली का केली? वर्मा ह्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे कोणतेही पुरावे नाहीत ( https://www.livelaw.in/top-stories/no-evidence-of-corruption-against-alok-verma-justice-patnaik-speaks-out-against-high-powered-committee-142053 ) आलोक वर्मा काही महत्वाच्या केसेस हाताळत होते. १) पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी भास्कर खुल्बे केस. (ह्यांचे नाव बंगाल मधील कोळसा घोटाळ्यात आले होते) २)रजेवर जाण्याआधी राफेल घोटाळ्याची चौकशी व्हावी अशी मागणी यशवंत सिन्हा/प्रशांत भूषण ह्यांनी केली होती. ३)पंतप्रधान कार्यालयातील दुसरे अधिकारी- हसमुख आढिया केस. सुब्रमण्यम स्वामी ह्यांनी हसमुख आढिया ह्यांनी नीरव मोदीला व मेहुल चोक्सीला मदत केल्याची तक्रार केली होती. ४) स्टर्लिंग बायोटेक- संदेसरा कुटुंबीय. राकेश अस्थाना ह्यांनी मदत केल्याचा आरोप आहे. अस्थाना ह्यांच्या मुलीचे लग्न संदेसरा ह्यांच्या फार्म हाउसवर झाले होते. https://www.indiatoday.in/india/story/cases-that-were-on-alok-verma-s-table-when-he-was-removed-1375111-2018-10-25 आता वर्मा ह्यांना ३१ जानेवारी पर्यंतही वेळ का दिला नाही ते लक्षात आले असेल ?
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 01/12/2019 - 17:12 नवीन
माई साहेब, आलोक वर्मा ह्यांच्यावर जर गंभीर आरोप आहेत ह्याची सरकारला खात्री असेल तर कामावरून काढून का नाही टाकले? होम गार्ड खात्यात बदली का केली? अजुन तुम्ही लक्षात घेत नाहीत की सिबीआय च्या मुख्य अधिकार्याला नेमणुकीसाठी तिन लोकांची कमिटी नेमलेली आहे. त्यात मलिक्कर्जुन खरगे एक न्याय मुर्ती व पंत प्रधान सामिल आहेत. अस असताना सुद्धा तुम्हाला बरेच प्रश्न कसे काय पडतात ? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अर्जन कुमार सिक्री यांनी पण श्री अलोक वर्मा याना हटवण्यासाठी आपले मत दिले याचाच अर्थ श्री अलोक वर्मा यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत त्यात काही तरी तथ्य असणार. **(( - एकंदरित कामाचा वेग व आखणी पाहिली तर भाजपा सरकार बर्यापैकी प्रगती करत आहे. मात्र सुडाचे राजकारण त्यांनी सोडायला हवे. संजीव भट्ट ह्यांना का गुंतवण्यात येत आहे, आलोक वर्मा ह्यांचे ऑफिस रात्री अडिच वाजता सील करणे. हे सर्व उदात्त हेतुने होत आहे ह्यावर भक्तही विश्वास ठेवणार नाही. )) ** तुम्ही फारच नाईव्ह आहात ! सुडाच राज कारण काँग्रेस कस खेळत हे बघायला उघड्या डोळ्याने ईतिहास बघायला हवा !! ईतक्या लोकांनी पुरावा दिला, कोर्टात साबित झाल तरीही, मिडीया व काँग्रेस अजुनही इसरत जहान व सोहराबुद्दीन ह्या फेक एन काँऊंटर म्हणुन प्रसिद्ध आहेत. हलकट लोक आहेत हे. नेताजींना व लाल बहादुर शास्त्रींना संपवुन वर अहिंसेचा खेळ खेळत आहेत.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sat, 01/12/2019 - 17:23 नवीन
सोहराबुद्दीन्/ईशरत जहान एन्काउंटर खोटे नव्हते? त्यांना मारणारे अधिकारी विनाकारण ५/६ वर्षे जेल्मध्ये गेले? तत्कालीन सी.बी.आय् अधिकारी /न्यायाधीश भ्रष्ट होते? आता नाहीत?
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 01/12/2019 - 18:55 नवीन
इसरत जहान केस : Was tortured, told to sign on Ishrat affidavit, claims former bureaucrat RVS Mani, former under secretary (Internal Security) in MHA, has claimed that he was used as a rubber stamp by government. Evidence in Ishrat case was engineered: Ex-bureaucrat RVS Mani alleged he was tortured by the SIT chief https://timesofindia.indiatimes.com/india/Was-tortured-told-to-sign-on-Ishrat-affidavit-claims-former-bureaucrat/articleshow/51212517.cms
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 01/12/2019 - 19:12 नवीन
ईसरत जहान व तिचे तिन पाकीस्तानी साथीदार हे पर्यटनासाठी भारतात सशस्त्र फिरत होते ह्यावर फक्त सोनिया गांधी, दिग्विजय सिंग सारख्यांचा विश्वास बसला असेल !!
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sat, 01/12/2019 - 19:38 नवीन
सशत्र फिरत होते ? मुंबई(ठाणे) येथून ते अहमदाबादला गेले. ह्या प्रवासा दरम्यान गाडी थांबवता आली असती. मुंबई पोलिसाना कळवून त्याना आहे तेथेच अटक करण्यात आली असती. पण ५५० किमी प्रवास करू दिला व मारण्यात आले. ह्याचे कारण "मोदीना मारण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा" ही बातमी द्यायची असे ठरले होते. हरेन पंड्या ह्यांचा मारेकरी शेवटपर्यंत मिळाला नाही. अनेक 'पाकिस्तानी' संशयिताना पकडण्यात आले व नंतर सोडून देण्यात आले.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 01/14/2019 - 06:35 नवीन
माईसाहेब तुमचा भाजप द्वेष सरळ दिसू लागला आहे. काहीही करून भाजप वर चिखलफेक करण्याची हि वृत्ती नैराश्य आणि चिडचिड यातून येते आहे असे दिसते आहे. डेव्हिड हेडली कोल यांनी मुंबईत न्यायालयात दिलेल्या कबुलीजबाबात इशरत जहाँ हि लष्कर ए तय्यबाची हस्तक होती हे स्पष्टपणे समोर आले आहे. With 26/11 co-conspirator David Headley confirming in his deposition before a Mumbai court that Ishrat Jahan was indeed a lashkar-e-Tayyeba operative तिची हत्या घडली कि घडवली हा मुद्दा वेगळा पण तिला क्लीन चिट देणारे कॉंर्ग्रेसी यांचे पितळ उघडे पडले आणि त्या पोलीस अधिकाऱ्यांवर भरलेले खोटे खटले उघडे पडल्यामुळे त्यांना सोडावे लागले हि वस्तुस्थिती असून आजही तुम्ही त्यांना मारणारे अधिकारी विनाकारण ५/६ वर्षे जेल्मध्ये गेले? तत्कालीन सी.बी.आय् अधिकारी /न्यायाधीश भ्रष्ट होते? आता नाहीत? अशी विधाने करता आहात हि लाजिरवाणी बाब आहे. The Congress-led Government of the day knew well that Ishrat Jahan was a terrorist. And yet, repeatedly and systematically, it sought to hide this fact from the public so that it could paint a political adversary in bad light. In the process, it also politicised what should have been a non-partisan security issue and polarised relations between communities. This only shows that, when it comes to politicking, the Congress's dirty tricks department has no problem in deifying a terrorist even if that’s what it takes to humiliate a political rival. the malicious political propaganda that had been unleashed by her apologists must end. In 2004, Ishrat Jahan, a 19-year-old college student suspected of conspiring to assassinate Mr Narendra Modi, then Chief Minister of Gujarat, was killed along with three associates by Gujarat Police in an armed encounter. Whether this encounter was staged is still being decided in a court of law. However, what has become clear is that Ishrat Jahan was no saint or martyr. She was an active member of a anti-India terrorist group and was planning to take down a sitting head of Government. This is not to suggest that she didn't deserve her day in court (assuming she was killed in a ‘fake encounter') or that it must not spark a larger debate on state-sanctioned extra-judicial killings that's for another day. The crucial issue now is the manner in which Ishrat Jahan's terror credentials were covered up or brushed aside with the sole intention of tarnishing the image of Mr Modi and his Government in Gujarat. https://www.dailypioneer.com/2016/columnists/reality-of-ishrat-jahan.html TerroristDavid Coleman Headley told a Mumbai court today that Indian investigators who met him in the US after he was arrested in 2009 did not pressure him to state that Ishrat Jahan, a college student killed by Gujarat's top cops, was a terrorist. https://www.ndtv.com/india-news/was-not-tutored-to-say-ishrat-jehan-was-terrorist-says-david-headley-1290522 असो आपल्या समतोलपणाचं पितळ उघड पडलंय. सांभाळून घ्या.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 01/14/2019 - 09:47 नवीन
पुन्हा पुन्हा वैयक्तिक दोषारोप का ? हेडलीला निकम ह्यांनी काय प्रश्न विचारले होते ? त्याने त्याप्रमाणे उत्तर दिले. गुजरात फाईल्स हे पुस्तक कृपया वाचा. गुजरात मधील भाजपा नेत्यांचे व पोलिस अधिकार्यांचे पितळ उघडे पडले आहे. "ईशरत जहान अतिरेकी नव्हती. पण तिला संपवण्याचा आदेश वरून आला" असे खुद्द तिला ठार मारणार्या वंजारा ह्यांनी कबुली दिली आहे. (वंजारा/अमित शहा/सिंघल्/अमीन ह्या सर्व मंडळींचे पितळ उघडे पडले आहे. पुस्तक प्रसिद्ध होऊन १ वर्ष होऊन गेले. पण ह्या सर्व मंडळीनी त्याबद्दल काहीही तक्रार केलेली नाही. कारण ह्या लोकांच्या बोलण्याचे रेकॉर्डिंग केले गेले आहे.) अमित शहा व मोदी ज्या मानसी सोनी ह्या तरूणीवर पाळत ठेऊन होते त्याबद्दल काय म्हणणे आहे? https://www.youtube.com/watch?v=KQg5JhA3LJI
  • Log in or register to post comments
म
मामाजी Mon, 01/14/2019 - 12:32 नवीन
आपण गुजरात फाईल्स हे पुस्तक कोर्टात पुरावा म्हणून सादर करा की आपल्याला कोणी आडवलय.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा