Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - जानेवारी २०१९

व
वामन देशमुख
Tue, 01/01/2019 - 15:48
🗣 616 प्रतिसाद
सर्व मिपा करांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! राम मंदिरासाठी अध्यादेश नाही ! घटनात्मक मार्गाचाच वापर करणार ; पंतप्रधान मोदींनी मांडली भूमिका “राम मंदिराच्या मुद्यावरून मागील काही दिवसांपासून वातावरण चांगले तापले आहे. आरएसएसनेही राम मंदिराचे लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी अध्यादेश काढण्याची मागणी केली होती. शिवसेनाही यासाठी मागील अनेक दिवसांपासून आग्रही होती. पण भाजप नेमकी याबाबत काय भूमिका घेणार हे स्पष्ट नव्हते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नसून, घटनात्मक मार्गानेच राम मंदिराची उभारणी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एका वृत्तवाहिनीने मोदींनी अशी भूमिका मांडल्याचा दावा केला आहे.” मोदींच्या भूमिकेचे स्वागतच आहे, तथापि, राममंदिरासाठी न्यायालयाचा मार्ग धरणे हे घटनात्मक आहे, आणि त्यासाठी अध्यादेश काढणे, हे घटनात्मक नाही, असे आहे का? संघाने राममंदिरासाठी अध्यादेशाची मागणी करणे आणि सरकारने मात्र न्यायालयीन मार्गाचा आग्रह धरणे ही मे २०१९ च्या लोकसभेची तयारी म्हणावी का? नोटः यासाठी अध्यादेश काढावा असं माझं मत नाही, न्यायालयात जे काही चाललंय ते चालू द्यावं.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 225912 views

🗣 चर्चा (616)
स
सुबोध खरे Sat, 01/05/2019 - 14:52 नवीन
मला जेटलींचे म्हणने समजले नाही. तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजत नाहीत तरीही त्या नाक खुपसलंच पाहिजे हा अट्टाहास कशाला? मी तुम्हाला वरती provisions of Section 56(2)(vii)(a) of the Income Tax Act, 1961 मधील एका कलमात सूट दिली आहे असं लिहिलं आहे ते कुठलं ते अगोदर समजून घ्या. उगाच व्हॉट्स ऍप ची घाण इकडे कशाला आणताय? जिकडे तिकडे नुसती पचपच
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sat, 01/05/2019 - 14:56 नवीन
तुम्हालाही माहीत नसावे , असे वाटते.
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sat, 01/05/2019 - 14:58 नवीन
तुम्हालाही माहीत नसावे , असे वाटते.
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Sun, 01/06/2019 - 02:51 नवीन
राहुल गांधींच्या मते राफेल चा ऑफसेट 30 ते 50 % येईल तो बहुतांश राफेलच्या पार्ट बाबत असेल ३६ राफेल विमाने "फ्लाय अवे" कंडिशन मध्ये भारताला देण्यात येणार आहेत. याचा अर्थ तर सगळं काम फ्रांस मधेच होणार आहे आणि संपूर्णपणे तयार विमान भारताला देण्यात येणार आहे. ऑफसेट मधली एक कंडिशन अशी आहे की ऑफसेट पार्टनर्स डील झाल्यापासून ३ वर्षांनंतर फायनलाईझ करण्यात येतील. म्हणजे ऑक्टोबर २०१९ पर्यंत हे पार्टनर्स फायनल करायचे आहेत. राफेलची पहिली बॅच सप्टेंबर २०१९ मध्ये भारतात दाखल होणार आहे. मग रिलायन्स कसे काय भारताला देण्यात येणाऱ्या राफेलचे पार्टस बनवेल? भविष्यात पाकिस्तानने राफेलबरोबर करार केला आणि त्यांना देण्यात येणाऱ्या विमानाचे पार्टस रिलायन्सने बनवले तर तुम्हाला किंवा रागाला काय प्रॉब्लेम असेल? पुढचा मुद्दा म्हणजे राफेलचे एकूण डील ५८००० करोडचे आहे त्यात ५०% ऑफसेट म्हणले तरी २९००० करोड होतात. यात जवळपास ७५ ऑफसेट पार्टनर्स आहेत. मग रिलायन्सला ३०००० करोडचे ऑफसेट कॉन्ट्रॅक्ट कुठून देणार? बाकीचे काय काँट्रीब्युशन काढून १००० करोड रिलायन्सला देणार का? रिलायन्सला फक्त ३% चे काँट्रॅक्टस मिळणार आहेत. म्हणजे २९००० करोडचे ३% म्हणजेच फार तर ८७० कोटींचे काम मिळेल ते पण ऑक्टोबर २०१९ नंतर. मला जेटलींचे म्हणने समजले नाही. बदाम खाल्ल्याने बुद्धी वाढते म्हणतात!
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sun, 01/06/2019 - 03:11 नवीन
भारताचा ऑफासेट द्यायला पाकिस्तानच्या विमानाचे पार्ट भारतात बनवायला द्यायचे! मग पाकिस्तानला ऑफसेट द्यायला नेपालकडून ऑर्डर घेणार की काय ? त्यापेक्षा तुझा ऑफसेट ठेव अन डिस्काउंट मागायचा !
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Sun, 01/06/2019 - 03:29 नवीन
बदाम फार महाग आहेत का हो? परवडत नाहीत का? नसेल तर तसं सांगा आपण काहीतरी उपाय शोधू. भारताचा ऑफासेट द्यायला पाकिस्तानच्या विमानाचे पार्ट भारतात बनवायला द्यायचे! तुम्हाला भारताच्या पेक्षा पाकिस्तानची जास्त चिंता दिसतेय.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sun, 01/06/2019 - 05:49 नवीन
मग पाकिस्तानला ऑफसेट द्यायला नेपालकडून ऑर्डर घेणार की काय ? रा गा चा चेला शोभतोस ! ट्रंप ह्याला बदाम खाउन काहीही फरक पडणार नाहिय! आडात नाही मग पोहर्यात कोठुन येणार ?
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sun, 01/06/2019 - 17:41 नवीन
काहीही म्हणा, राहुल गांधी हा एकच गाढव नाही आहे भारतात! पाकिस्तानी विमानाना जर पार्ट पुरवायचे कंट्रात दिले तर ऐन युद्धात खाका वर करता येतील की आणि वर बोलता येईल की तुम्ही आणि दसॉल्ट बघून घ्या
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sun, 01/06/2019 - 18:03 नवीन
माझ्या मते बोफोर्स आणि राफेल दोन्ही वायफळ खर्च आहेत, 3 दिवसात आरमी करून देणारी स्वयंसेवी फौज असताना , हे खर्च इनाकारणच वाढवून ठेवलेत.
  • Log in or register to post comments
ग
गब्रिएल Sun, 01/06/2019 - 18:44 नवीन
न्हाय न्हाय. त्येची काय गरज नाय. आपल्याकडं पाकिस्तान्यांच्ये पाय धरून आमाला निवडून आना आसं म्हणनार्‍या बेईमान्यांची आख्खी फौज हाय की.
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Sat, 01/05/2019 - 13:12 नवीन
MT: केरळ वादाचे पडसाद पिंपरी-चिंचवडमध्ये http://maharashtratimes.indiatimes.com/pune-news/repulcations-of-sabrimala-temple-row-in-pune-outside-cpm-office/articleshow/67387875.cms?utm_source=MT&utm_medium=copyclip&utm_campaign=onpagesharing via @mataonline: http://app.mtmobile.in विशेष म्हणजे मार्क्सवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजित अभ्यंकर आहेत . मार्क्सवादी पक्षात हिंदू धर्माचेच अतिशहाणे का असतात ? हे एक न उलगड़लेले कोड़े आहे .
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Sun, 01/06/2019 - 04:27 नवीन
मार्क्सवादी पक्षात हिंदू धर्माचेच अतिशहाणे का असतात ? केवळ मार्क्सवादी नव्हे तर हिंदू सेक्युलर सगळीकडेच अशी गडबड करताना दिसतात. एका तरी मुसलमानाला तुम्ही इस्लामविषयी वाईट बोलताना बघितलं आहे का? किंवा किरिस्ताव माणसाला ख्रिश्चन धर्माविषयी वाईट बोलताना बघितलं आहे का? पण आपले हिंदूच नुसते इतर धर्मांना चांगले म्हणत नाहीत तर त्याबरोबरच हिंदू धर्माला नावे पण ठेवतात. मला याचंच आश्चर्य वाटतंय की एवढं असूनही हिंदू धर्म कसा टिकून आहे. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की बहुतेक हिंदूंना आपल्याला असलेला धोका कळतंच नाही. लव्ह जिहाद अस्तित्वातच नाही,काही ठराविक मंदिरांमध्ये स्त्रियांना प्रवेश नाही याबद्दल इतर धर्मियांनी उठलेले रान, हिंदू सणांना सतत केला जाणारा विरोध त्याचबरोबर इतर धर्मांतील प्रथा परंपरांचा उदोउदो हे कसं लोकांच्या लक्षात येत नाही? हे एक न उलगड़लेले कोड़े आहे याला आपले शिक्षण जबाबदार आहे. महाराष्ट्रातील किती मुलांना येथील हिंदू राजांची नावे क्रमवार सांगता येतील? हेच इतर सर्व राज्यांमधील मुलांना लागू आहे. मुघल राजांची नावे मात्र क्रमवार पाठ असतात, औरंगझेब टोप्या शिवून उदरनिर्वाह करायचा हे कौतुकाने शिकवतात त्याच बरोबर संभाजी कसा कवीच्या मागे लागलेला आणि बाजीराव पेशवा कसा बाईलवेडा होता हे सांगतात. तरुण पिढीला कदाचित सम्राट अशोक, पृथ्वीराज चौहान, चोला साम्राज्य वगैरे राजांबद्दल माहितीही नसेल. त्यामुळे सेक्युलॅरिझम म्हणजे नुसते इतर धर्मांना आणि त्यांना त्यांच्या प्रथांचा आदर राखणे न राहता हिंदू धर्माचा अनादर करणे म्हणजे सेक्युलॅरिझम अशी व्याख्या रूढ झाली आहे. आपल्या नवीन पिढीच्या लक्षात हे लवकर आले नाही तर पुढील काही दशके अवघड आहेत. हिंदू मुलींना प्लॅन करून जाळ्यात ओढायचे प्रकार भरपूर आहेत. इंग्लंड मध्ये सेक्युलॅरिझममुळे काय झालं हे जरा मुस्लिम ग्रूमिंग गँग्स म्हणून गुगलून बघा. अश्याच गँग्स भारतातही ऍक्टिव्ह आहेत, फक्त बातम्यात येत नाहीत. सेक्युलॅरिझमचा मुखवटा सांभाळता सांभाळता जर्मनीसारख्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या देशात तेथील स्थानिक मुलींनाच सामूहिक अत्याचारांना बळी पडावे लागले. युरोपातील बहुतेक देशांची हीच परिस्थिती आहे. तेथील स्थानिक लोकसंख्या वाढीचा दर आणि स्थलांतरित मुस्लिम लोकसंख्या वाढीचा दर बघता संपूर्ण युरोप येत्या २-३ दशकात मुस्लिम अधिपत्याखाली येईल. हीच परिस्थिती थोड्याफार फरकाने अमेरिका आणि कॅनडाची आहे. आफ्रिका तर बहुसंख्य मुस्लिम झालीच आहे. शबरीमालामध्ये प्रवेशासाठी बुरखाधारी महिला प्रोटेस्ट करतात हे हास्यास्पद नाही का? ती तृप्ती देसाई शनी शिंगणापूरमध्ये मात्र जोरात होती पण हाजी अली मध्ये जायचं म्हणल्यावर शेपूट घालून बसली. आपल्या हिंदू सेल्युलर लोकांना हे दिसत नाही किंवा दिसूनही समजत नाही किंवा समजूनही उमजत नाही हेच दुर्दैव आहे. लिंक १ लिंक २ लिंक ३ United Kingdom's Daughters
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sun, 01/06/2019 - 05:46 नवीन
हाजी अलीत स्त्रिया जातात , फक्त स्त्री पुरुष रांगा अलग असतात. महाराष्ट्रातील किती मुलांना येथील हिंदू राजांची नावे क्रमवार सांगता येतील? येतील की , महाराष्ट्रात मराठा पेशवे ह्यांचा इतिहास माहीत असतो, तसे सर्व प्रांतात त्या त्या हिंदू घराण्यांचा इतिहास शिकवलाजातो, गाव पातळीवर संस्थानिकांचा इतिहासही त्या त्या गावात माहीत असतो. संभाजी महाराज बाईलवेडे होते , हे शासकीय अभ्यासक्रमात आम्हाला तरी शिकवले नव्हते , शाळेबाहेरील जीवनातही तसे कुणी शिकवले नाही.
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sun, 01/06/2019 - 06:04 नवीन
हाजी अलीत स्त्रिया जातात , फक्त स्त्री पुरुष रांगा अलग असतात. महाराष्ट्रातील किती मुलांना येथील हिंदू राजांची नावे क्रमवार सांगता येतील? येतील की , महाराष्ट्रात मराठा पेशवे ह्यांचा इतिहास माहीत असतो, तसे सर्व प्रांतात त्या त्या हिंदू घराण्यांचा इतिहास शिकवलाजातो, गाव पातळीवर संस्थानिकांचा इतिहासही त्या त्या गावात माहीत असतो. संभाजी महाराज बाईलवेडे होते , हे शासकीय अभ्यासक्रमात आम्हाला तरी शिकवले नव्हते , शाळेबाहेरील जीवनातही तसे कुणी शिकवले नाही.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 01/05/2019 - 13:59 नवीन
Special court declares Vijay Mallya a 'fugitive economic offender' Prevention of Money Laundering Act अन्वये स्थापन झालेल्या कोर्टात ऑगस्ट २०१८मध्ये पास झालेल्या Fugitive Economic Offenders Act खाली विजय मल्ल्याला "आर्थिक गुन्हेगारी करून पळून गेलेला गुन्हेगार (Fugitive Economic Offender)" जाहीर केले गेले आहे. यामुळे, मल्ल्याच्या संपत्तीवर टाच आणण्याचा मार्ग सोपा झाला आहे. याव्यतिरिक्त, आर्थिक गुन्हेगारी करून पळून गेलेल्या अजून २० गुन्हेगारांवर "रेड कॉर्नर" नोटीस जाहीर करण्याबात इंटरपोलशी बोलणे सुरू झाले आहे.
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sat, 01/05/2019 - 14:28 नवीन
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात राजकीय समीकरणे बदलणार आहेत. उत्तर प्रदेशात ‘बुआ- भतिजा’ जोडी म्हणजे अखिलेख यादव आणि मायावती एकत्र येणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत आघाडी करण्याविषयी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीमध्ये एकमत झाले आहे. समाजवादी पार्टीच्या नेत्याने शनिवारी ही माहिती दिली.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 01/05/2019 - 15:22 नवीन
उत्तर प्रदेशात ‘बुआ- भतिजा’ जोडी त्या पुढची बातमी तुम्ही वगळलेली दिसते !! ह्या जोडीने कॉंग्रेस नावाच्या तुमच्या लाडक्या पक्षाला दोन सिटा देउन कॉंग्रेसला त्याची जागा दाखवलेली आहे !!
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sat, 01/05/2019 - 17:28 नवीन
तुमच्या भाजपणेही कुठेतरी 5 जागा सोडून दिल्या म्हणे की , काँग्रेसची कुठेही युती झाली की तुमचे लोक लगेच व्हाट्सअप्पवर नाचत येत होते - शेर अकेला लडता है ! हल्ली शेरोवाले मेसेजेस दिसत नाहीत.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 01/05/2019 - 20:08 नवीन
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात राजकीय समीकरणे बदलणार आहेत. अश्या गमज्या काय बुआ भतिजा च्या जोडगोळी च्या आशे वर केल्या होत्या !! अरेरे बराच त्रास होतोय का ? बर्नॉल हाताशी ठेवा !! तुमच्या युवराजा सकट मॉं साहेबांना लवकरच कोर्टाच बोलवण येणार आहे पण तत्पुर्वी भाजपा त्या दोघांचे धिंडवडे काढणार !!
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 01/05/2019 - 23:57 नवीन
महागठबंधन नै तुमच्या लाडक्या पक्षाचा महा पोपट केलेला आहे ! पुर्वी दोन कॉंग्रेसच्या पारंपारीक सिटा कॉंग्रेस साठी सोडणार होते तेवढ्या दोन सिटा सुद्धा सोडल्या नाहीत !!
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Sun, 01/06/2019 - 05:57 नवीन
हि युती झालीच तर युपीए मधे सपा, बसपा कदाचीत राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा जास्त पॉवरफुल होतील... आमच्या पवार साहेबांचं पंप्र होण्याचे चान्सेस तसेही क्षीण होते... आता तर अजुनच पंचाईत :(
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Wed, 01/23/2019 - 09:19 नवीन
कलकत्त्याला स्टेजवर असलेल्या सगळ्या वक्त्यांनी केलेल्या भाषणात मा.पवार यांचे कोणीच कसे नाव घेतले नाही की साधा उल्लेखही केला नाही. आणी मग हे महाशय स्वतःला पंप्रचा उमेदवार कसे समजतात.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 01/23/2019 - 09:22 नवीन
वाईल्ड कार्ड एन्ट्री ची गाजरे खात असतील. बाकी देवेगौडा साहेब कसे पंतप्रधान झाले तसे काही तरी होईल अशी अपेक्षा असावी कदाचित.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 01/23/2019 - 09:30 नवीन
कोलकाता मिटिंगमधील एका नेत्याची इतर नेत्यांबद्दलची मते... :)
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sun, 01/06/2019 - 06:08 नवीन
‘आर्थिकदृष्ट्या जर तुम्हाला झेपत नसेल तर शिकू नका, नोकरी करा’ असं वक्तव्य महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले आहे. अमरावतीमध्ये आयोजित एका महाविद्यालयीन कार्यक्रमात बोलताना तावडे यांनी हे वक्तव्य केले आहे. ‘गरीब विद्यार्थ्यांना सरकार मोफत उच्च शिक्षण देणार का?’ असा प्रश्न एका पत्रकारितेचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्य़ाने विचारला असता ‘शिक्षण घेणं झेपत नसेल तर सोडून दे आणि नोकरी कर’ असं उत्तर विनोद तावडे यांनी दिलं. विनोद तावडे यांनी ज्यावेळी ही प्रतिक्रिया दिली त्यावेळी एका विद्यार्थाने हे सर्व मोबाईल रेकॉर्डींग केले. तावडे यांच्या हे लक्षात आल्यानंतर मोबाईलमध्ये रेकॉर्डींग करणाऱ्या विद्यार्थ्यांना अटक करा आणि त्यांचे मोबाईल काढून घ्या’ असे आदेशही दिला. त्यांच्या आदेशानंतर विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याच्या मोबाईलमधले रेकॉर्डींग डिलीट केल्याचा दावा काही वेबसाईटने केला आहे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 01/06/2019 - 10:17 नवीन
A covert operation in CBDT to save Sonia and Rahul from Income Tax case in National Herald collapses लोकशाहीत सरकार बदलले तरी, बाबूशाही आणि अनेक संवैधानिक/असंवैधानिक संस्थांमधील अधिकारी बदलत नाहीत... त्यातले पहिल्या १० अधिकार्‍यांपैकी अनेकजण (अ) मागील सरकारातील भ्रष्ट नेत्यांच्या हातात हात घालून किंवा (आ) त्यांच्या गुलामीत/जबरदस्तीने किंवा (इ) भ्रष्ट नेत्यांच्या छत्राखाली लपून, केलेल्या कुकर्मात सामील झालेले असतात. दुकाने बंद झालेले असे अधिकारी जुन्या नेत्यांना छुपी मदत करणे जास्त सोईचे समजतात, कारण, (अ) जुना नेता बुडाला तर त्या प्रकरणाशी संबंध असलेला अधिकारीही बुडण्याची शक्यता असते आणि (आ) पुढच्या निवडणूकीत जर जुना नेता परत निवडून आला तर आपले जुने दुकान परत जोमाने चालू होण्याची शक्यता भ्रष्ट अधिकार्‍याला खुणवत असतेच. सरकारी कार्यालयांतूनच, सरकारी खटल्यांना असा सुरुंग लावण्याचा, हा पहिलाच प्रयत्न नाही. यावरून, असे बरेच अधिकारी आहेत असेच दिसते आहे.
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sun, 01/06/2019 - 10:44 नवीन
*पंतप्रधान उज्ज्वला योजना निष्फळ* महिलांच्या आरोग्याची निगा राखणे आणि त्यांच्या सक्षमीकरणाच्या उद्देशाने केंद्र सरकारने पंतप्रधान उज्ज्वला योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत देशभरात सहा कोटी मोफत घरगुती गॅसजोडणीचे उद्दिष्ट नुकतेच पूर्ण करण्यात आले. ठाणे जिल्ह्यातही दारिद्र्य रेषेखालील ३१ हजार १७ लाभार्थींना गॅसजोडणी देण्यात आली होती. मात्र या कुटुंबांना योजनेतील दुसरा सिलिंडर खरेदी करणे परवडत नसल्याने तब्बल ७९ टक्के म्हणजेच २४ हजार ५०३ कुटुंबांनी योजनेकडे पाठ फिरवल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. केवळ ठाणे जिल्ह्यात नव्हे तर राज्यातील उर्वरीत भागांतही हीच परिस्थिती असल्याची माहिती सूत्रांनी दिली. https://maharashtratimes.indiatimes.com/thane-kokan-news/thane/poor-in-thane-district-got-lpg-cylinders-under-pradhan-mantri-ujjwala-yojana-but-they-vant-afford-gas-refills/articleshow/67387743.cms?utm_source=facebook.com&utm_medium=referral&utm_campaign=ujjwalayojana050119
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 01/07/2019 - 08:20 नवीन
योजना निष्फळ कशाला? सर्व गॅस जोडणी धारकांना फुकट गॅस पुरवू म्हणून काँग्रेसने जाहीर करून टाकावे म्हणजे निवडणूक जिंकता येईल. होईल गरिबाचं चांगभलं होऊ द्या खर्च सरकार आहे घरचं जाता जाता -- केरोसिन फुकट मिळत होतं काय?
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sun, 01/06/2019 - 10:57 नवीन
राजकीय सभा, रॅली आणि आंदोलनाची साक्ष असलेल्या दिल्लीतील रामलीला मैदानावर भाजपा कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. आगामी काही दिवसांसाठी रामलीला मैदान भगवा गड आणि दिल्ली भाजपाचे कँप ऑफिस राहणार आहे. आज रविवारपासून पुढील ३ आठवड्यापर्यंत रामलीला मैदानावर भाजपाने मोठे कार्यक्रम आयोजित केले आहेत. आज रविवारपासून भाजपाने दलित समाजाला आकर्षित करण्यााठी ‘भीम महासंगम’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमांतर्गत एकाच भांड्यात ५००० किलो खिचडी तयार केली जाणार आहे. या मार्फत सामजिक समानतेचा संदेश देण्याचा भाजपाचा प्रयत्न असणार आहे. ही खिचडी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर तयार करणार आहेत. या खिचडीसाठी तीन लाख अनुसूचित जातींमधील लोकांच्या घरुन तांदूळ आणि डाळ आणली आहे. थोड्याच वेळात या रॅलीला सुरुवात होणार आहे. या रॅलीद्वारे भाजप एकाच वेळी सर्वात जास्त खिचडी शिजवण्याचा विश्वविक्रम करणार आहे. सध्या ९१८ किलो तांदळाच्या खिचडीचा रेकॉर्ड प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांच्या नावावर आहे. भाजपा आता हा रेकॉर्ड मोडण्याच्या तयारीत आहे.
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Sun, 01/06/2019 - 13:32 नवीन
म्हणजे उमा भारती आता प्युअर होणार .
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sun, 01/06/2019 - 14:37 नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh-news/secretaries-of-3-up-ministers-arrested-for-seeking-bribes-1818128/?utm_source=whatsapp&utm_medium=social&utm_campaign=WhatsappShare : लाच प्रकरणात योगींचे 3 मंत्री अडचणीत, तीन स्वीय सहायकांना अटक
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sun, 01/06/2019 - 15:59 नवीन
*ममता बॅनर्जी देशाच्या पहिल्या बंगाली पंतप्रधान होतील, भाजपा प्रदेशाध्यक्ष* पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी शनिवारी आपला वाढदिवस साजरा केला. देशभरातून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. मात्र, भाजपाचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी ममता बॅनर्जींना अशा शुभेच्छा दिल्या आहेत की, त्यामुळे भाजपा अडचणीत येऊ शकते. ममता बॅनर्जी देशाच्या पहिल्या बंगाली पंतप्रधान होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवत घोष यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. https://www.loksatta.com/desh-videsh-news/if-a-bengali-became-pm-mamata-banerjees-name-is-first-in-this-list-says-west-bengal-bjp-chief-dilip-ghosh-1818118/ ----------------------------- कुणाला मराठी पंतप्रधान हवा , कुणाला बंगाली , हे सगळे बोलणारे भाजपाचेच लोक !
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 01/06/2019 - 16:45 नवीन
अजुन सुधा प्रत्येक राज्या ला आपल्यावर अन्याय होतो असेच वाटते आणि ते थोडीफार खर पण आहे . म्हणून pm कोणत्या राज्यातलं आहे हे महाराष्ट्र सोडून बाकी राज्यांना महत्वाचं प्रश्न वाटतो . महाराष्ट्र नेहमीच खूप भोळा राहिला आणि हरला.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sun, 01/06/2019 - 20:42 नवीन
मराठी माणसाची विचारसरणी अशी कोत्या मनोवृत्तीची कधीच नव्हती. म्हणून १९६७ साली स.का. पाटिल ह्या मराठी ताकदवान काँग्रेस नेत्याचा पराभव ३७ वर्‍शाचा 'परप्रांतिय' जॉर्ज फर्नांडिस करू शकले. १९८४/८९ मध्ये मराठीवर प्रभुत्व असणारे नरसिंह राव रामटेक मधून निवडून येऊ शकले ते प्रांतिकतेपेक्षा वैचारिकतेला महत्व देणार्या माणसामुळे. गेल्या २० वर्षात परिस्थिती बदलली.'आपला माणूस/ आपली जात' ह्या 'अभिमानाच्या' गोष्टी झाल्याने महाराष्ट्र ईतर राज्यांसारखेच एक झाले.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 01/06/2019 - 16:08 नवीन
राम मंदिर हा प्रश्न मला तर वाटतं इंग्रज गेल्यानंतर निर्माण झाला अगोदर नव्हता माझ्या माहिती प्रमाणे . पण बाबरी मशीद किती तरी शे वर्षा पासून मंदिराच्या जागेवर आहे ( बहुसंख्य हिंदू जे महाराष्ट्र सहित उत्तर आणि पश्चिम राज्यातील.साऊथ la काही देणंघेणं नाही ,() पण देशात असंख्य अतिशय गंभीर प्रश्न असताना राम मंदिर च का आठवलं हा पहिला प्रश्न . गरीबी जी पाचवीलाच पुजलीय,काश्मीर ( हा पण जाणूनबुजून latkavlela प्रश्न ,) अशिक्षित पना राज्याराज्यांत खूप गंभीर आर्थिक विषमता आणि हे सर्व प्रश्न देशाचं अखंडत्व संकटात आणि शकतात . तरी राम मनिर हाच प्रश्न पुढे केला जातो हा निर्णय कोर्टावर सोपवून नेते मंडळी देश समोर जे गंभीर प्रश्न आहेत ते सोडवत नाहीत . आणि कोर्ट ते पण भारतीय मानसिकतेचा ते पण मंदिर मशित वादावर निर्णय न देता आपण पण नेत्यांपेक्षा कमी नाही हेच दाखवून देत आहे . आशा ह्या आपल्या भारत देशाला देव च ( आसेल तर ( वाचवू शकतो . नाहीतर भविष्य पुढील पिढ्यांच ज्यांनी भारतात जन्म घेतला आहे ते . खूप अंधारमय आहे
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sun, 01/06/2019 - 16:33 नवीन
BJP sticks to JPC demand on 2G scam https://www.thehindu.com/news/national/BJP-sticks-to-JPC-demand-on-2G-scam-Pradhan/article15131655.ece भाजपाचा भूतकाळ
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 01/07/2019 - 07:57 नवीन
भाजपाचा भूतकाळ वाईट होता आणि विरोधकांचा भविष्यकाळ वाईट आहे
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Mon, 01/07/2019 - 08:08 नवीन
विरोधकांचा भविष्यकाळ वाईट आहे वर्तमानातील वर्तनही वाईट आहे.
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Mon, 01/07/2019 - 08:11 नवीन
भाजपाच्या जाहीरनामा कमिटीत नारायण राणेंचा समावेश. भाजपाला दुसरी तिसरी फळी तयार झाली.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 01/07/2019 - 08:15 नवीन
शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र आहे असे पुर्वी भाजपावाले म्हणायचे. 'समविचारी' का काय म्हणतात ते. नारायण राणेंचा पक्ष नैसर्गिक मित्र की कृत्रिम ?
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Mon, 01/07/2019 - 13:41 नवीन
मिपाकरांचा जीव थंडावला , हे बरे झाले , भाजपात दुसरी फळी , तिसरी फळी यांच्यावरून चिंतातुर होते, आता चांगली फणसाच्या झाडाची फळी घावली !!
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 01/07/2019 - 13:59 नवीन
चिंतातुर तुमच्यासारखे "बाहेरचेच" होते. भाजपाला चिंता नव्हतीच. त्यांची वैचारिक बैठक पक्की आहे. बाकी दिसायला दिसतं ते निवडणुकीची/ सत्ताकारणाचा अपरिहार्यता (पोलिटिकल कंपल्शन). कारण "राज"कारण स्वच्छ असू शकतं. "सत्ता"कारण नाही त्यावरून विरोधक ठणाणा करत असतात. त्यांना बोंबलू द्यायचं. हा का ना का
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Mon, 01/07/2019 - 14:12 नवीन
आम्हाला नाय हो चिंता, पण मायबोलीवर कुणीतरी बोलत होते , राणे हे फळी की शेवटचा खिळा ? म्हणून तुम्हाला सांगितले ,
  • Log in or register to post comments
ग
गब्रिएल Mon, 01/07/2019 - 14:44 नवीन
त्येची काळजी करन्याबिगर, तुमच्या मालकीन-मालकाच्या कबाटातून लईच दलालांची हाडं धडा धाडा भायेर पडू लागलीत तीकडं बगा की. का तिकडं बगीतलं की काळजात लईच धडधड व्हतीया म्हनून दुसर्याच्या घरात डोकाऊ लागलाय? =)) =)) =))
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 01/08/2019 - 05:11 नवीन
आम्हाला नाय हो चिंता, मग कशाला प्रत्येक धाग्यावर पचपच करताय? आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Mon, 01/07/2019 - 13:11 नवीन
MT: भाजप रोडरोमियोसारखा मागे लागलाय: संजय राऊत http://maharashtratimes.indiatimes.com/mumbai-news/shiv-sena-mp-sanjay-raut-criticises-bjp-over-allianc महाराष्ट्रातील तथाकथित हिंदूवादी पक्ष सेना आणि भाजप पुन्हा एकदा कुत्र्यासारखे भांडायला लागले आहेत आणि यामध्ये मरण त्यांना मते देणाऱ्याचें होत आहे . बिहार आणि ओरिसा राज्या प्रमाणे महाराष्ट्रात देखील सेनेला मोठेपणा दिला असता तर भाजप चे नेते भिकेला लागले असते का ? पण नाही अमितशाह ला शतप्रतिशत भाजप च वेड लागलय आणि त्या वेडा मध्ये पाच वर्ष सेने बरोबर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहून सेनेच्या शेपटा वर पाय द्यायला सुरवात केली , मग सेना भूंकनारच ना ? बिहार मध्ये कस भांडण लवकर मिटवून एकत्र निवडणूकिला सामोर जाण्याची तयारी केली , मग महाराष्ट्रात त्यांना काय रोग आला होता ? या दोघाच्या भांडाणा मुळे कॉ व रा कॉ चा फायदा नाही झाला म्हणजे मिळवली !!!
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 01/07/2019 - 13:28 नवीन
सेना-भाजपवाले दिवसा नळावर भांडल्यासारखे भांडतात व रात्री एकत्र प्यायला बसतात.. असे ह्यांचे मत. आपापल्या कार्यकर्त्याना बरेच तापवायचे व नंतर निवडणूकीच्या आधी 'थंड' करायचे. गेले २५ वर्षे हेच चालू आहे.
  • Log in or register to post comments
त
तेजस आठवले Mon, 01/07/2019 - 14:10 नवीन
https://www.loksatta.com/maharashtra-news/shiv-sena-leader-sanjay-raut-slams-on-bjp-president-amit-shah-on-alliance-1818441/ मी आधीच म्हटल्याप्रमाणे शिवाजी महाराजांचा कॉपीराईट घेतल्यासारखे हे वागणे आहे.काय भाषा. संदर्भ : https://www.misalpav.com/comment/985992#comment-९८५९९२ अर्थात जिथे दोन भांडणाऱ्यांत पहिले कानाखाली कोणी वाजवली ह्यावर मर्दूमुकी ठरते(मग पहिला काडीपैलवान असला आणि पुढे त्याने दुसर्याकडून मरेस्तोवर मार का खाल्ला असेना) तिथे दोघातला कोणता पक्ष लोकांवर प्रभाव पाडतो हे सांगणे तितकेसे कठीण नसावे.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Mon, 01/07/2019 - 15:11 नवीन
किंबहुना काकणभर जास्तच.
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Mon, 01/07/2019 - 14:15 नवीन
सर्वाना आरक्षण आले ते बरे झाले , म्हणजे आता परदेशात जाऊन बक्कळ पैसा मिळवून , वर आम्हाला आरक्षण न दिल्याने आम्ही देश सोडला , किंवा पूल पडला तो आरक्षित माणसांमुळे पडला, असले फेसबुक्की , व्हॅटसप मेसेजेस बंद होतील, तसेही यावर्षीच्या आंदोलनानंतर असे मेसेजेस आलमोस्ट बंदच झाले आहेत. –-------------------–------------------ सवर्णांमध्ये कोणा-कोणाला मिळेल आरक्षण – ज्यांचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रूपये किंवा त्याहून कमी – ज्याची ५ एकर किंवा त्याहून कमी शेत जमीन – ज्याचे १ हजार चौ.फुटापेक्षा कमी जागेवर घर – राजपूत, भूमिहार, बनिया, जाट गुर्जर यांना या श्रेणीत आरक्षण मिळेल. – शिक्षण (सरकारी किंवा खासगी), सावर्जनिक रोजगारात याचा फायदा मिळेल. – यासाठी संविधानातील अनुच्छेद १५ आणि १६ मध्ये दुरूस्ती केली जाईल. – ज्यांना अजून आरक्षणाचा फायदा मिळाती नाही, अशा आर्थिक मागास घटकातील गरिबांना आरक्षण दिले जाईल. –----------------------------- सरकारचे अभिनंदन
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा