Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - जानेवारी २०१९

व
वामन देशमुख
Tue, 01/01/2019 - 15:48
🗣 616 प्रतिसाद
सर्व मिपा करांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! राम मंदिरासाठी अध्यादेश नाही ! घटनात्मक मार्गाचाच वापर करणार ; पंतप्रधान मोदींनी मांडली भूमिका “राम मंदिराच्या मुद्यावरून मागील काही दिवसांपासून वातावरण चांगले तापले आहे. आरएसएसनेही राम मंदिराचे लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी अध्यादेश काढण्याची मागणी केली होती. शिवसेनाही यासाठी मागील अनेक दिवसांपासून आग्रही होती. पण भाजप नेमकी याबाबत काय भूमिका घेणार हे स्पष्ट नव्हते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नसून, घटनात्मक मार्गानेच राम मंदिराची उभारणी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एका वृत्तवाहिनीने मोदींनी अशी भूमिका मांडल्याचा दावा केला आहे.” मोदींच्या भूमिकेचे स्वागतच आहे, तथापि, राममंदिरासाठी न्यायालयाचा मार्ग धरणे हे घटनात्मक आहे, आणि त्यासाठी अध्यादेश काढणे, हे घटनात्मक नाही, असे आहे का? संघाने राममंदिरासाठी अध्यादेशाची मागणी करणे आणि सरकारने मात्र न्यायालयीन मार्गाचा आग्रह धरणे ही मे २०१९ च्या लोकसभेची तयारी म्हणावी का? नोटः यासाठी अध्यादेश काढावा असं माझं मत नाही, न्यायालयात जे काही चाललंय ते चालू द्यावं.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 225912 views

🗣 चर्चा (616)
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sun, 01/20/2019 - 18:57 नवीन
Less than three months before the parliamentary elections, the Europe chapter of the Indian Journalists’ Association (IJA) is set to demonstrate how electronic voting machines (EVMs) can be hacked. The demonstration will be held in London Monday, and the IJA has roped in a US-based cyber expert, who they say is also a designer of EVMs in India. “His contention is these machines are not only hackable, but have routinely been hacked in recent Indian national and state elections so as to rig elections,” reads the IJA invite. https://theprint.in/governance/how-to-hack-indian-evms-us-cyber-expert-set-to-demonstrate-to-a-live-london-audience/180548/
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sun, 01/20/2019 - 20:19 नवीन
निवडणुक आयोगाच्या EVM Machine हॅक करुन दाखवा ह्या खुल्या चॅलेंजला कोणी माई का लाल समोर आला नव्हता मग ईंग्लंड मध्ये EVM Machine हॅक करुन दाखवली तरी फरक पडणार नाही कारण निवडणुका सध्या तरी भारताच्या बाहेर होण्याचा चांस नाहीय !! पुढे मागे कॉंग्रेसने बनवलेल्या EVM Machines मात्र हॅक झाल्या नाही तरच नवल !!
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sun, 01/20/2019 - 22:29 नवीन
खुद्द इंग्लडवालेही विलेक्शनला पेपर वापरतात ना ?
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 01/20/2019 - 22:34 नवीन
अजून कोणत्याही गोष्टीसाठी इंग्लंडकडे पहायचे सोडून द्या. गोर्‍यांचे राज्य १९४७ साली संपले. तुमच्या मनातूनही त्याला जितके हद्दपार कराल, तितके तुम्हाला नीट दिसू लागेल. (कठीण आहे, पण प्रयत्न करून बघायला हरकत नाही.) :) ;)
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Mon, 01/21/2019 - 05:49 नवीन
नुसते बेलट पेपर स्वीकारले तर गोरयांचे अनुकरण होते का ? ( तुमची डिग्री संस्कृतात घेतली की इंग्रजीत)
  • Log in or register to post comments
व
विशुमित Mon, 01/21/2019 - 05:55 नवीन
हाहाहा..!!
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 01/21/2019 - 08:26 नवीन
गोरे करतात ते सर्वोत्तम असते, अशी गुलामिची मनोवस्था अजून काही भारतियांमध्ये जागून आहे, हे दु:खद आहे. १. इंग्लंडचे उदाहरण तुम्हीच दिले होते, हे इतक्यातच विसरलात ? सत्य व तर्कशुद्ध बोलत राहण्याचा सर्वात मोठा फायदा असा की पूर्वी काय बोललो होतो हे लक्षात ठेवावे लागत नाही, आणि मग असे होत नाही. =)) २. शिवाय, तुमची डिग्री संस्कृतात घेतली की इंग्रजीत अश्या असंबंध टीप्पणीमुळे सभ्यतेने वादविवाद करण्याची तुमची क्षमता (परत एकदा) उघड झाली आहे. बेताल वक्तव्ये करून तोंडावर आपटल्यानंतर, स्वतःवरचा ताबा सुटून, काहींची अशी अवस्था (वारंवार) होते. तेव्हा, उगी उगी ! =)) =)) =)) *************** अवांतर : आता विषय काढलाच म्हणूनच केवळ सांगत आहे की, माझ्या एका कर्मभूमीत अनेक गोरे माझे कनिष्ठ म्हणून काम करत होते. सर्वसाधारण गोर्‍यात विशेष फार मोठी विचारक्षमता आहे असे मला दिसले नाही. मात्र, कातडी गोरी आहे म्हणून त्यांच्यासमोर (शारिरिक व मानसिकरित्या) सतत वाकून राहणारे अनेक भारतिय होते व त्याचा ते पुरेपूर फायदा उठवत असत, हे पाहून सकारण दु:ख होत असे. भारतातही अजून असे लोक आहेत, हे सिद्ध करणारे प्रतिसाद वाचून काय वाटते, हे तुम्हाला सांगून समजणार नाही आणि ते तुम्हाला सांगण्यात अर्थही नाही. :( तेव्हा, मोठे व्हा!
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Mon, 01/21/2019 - 09:07 नवीन
म्हणून मी विचारले , की डिग्री संस्कृतात घेतली की इंग्रजीत , यात माझी काहीच चूक नाही, इंग्रजी अनुकरण , म्हणून ,बेलेट पेपर वापरा , असेही मी बोललो नाही, मी सहज विचारले होते , Evm बंद केलेल्या अनेक देशांची सकारण यादी नेटवर आहे, आणि evm ला विरोध ह्या लोहपुरुषांनीही केला होता, अडवाणी , १०इयर चॅलेंज 2009-2019 उदाहरण घ्यायला हरकत नसावी. http://archive.indianexpress.com/news/advani-has-doubts-about-evm-wants-ballot-papers-back/485248/
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Mon, 01/21/2019 - 09:13 नवीन
आणि EVM परदेशातून आले , तर बेलेट पेपर भारतात भोजराजाने आणले की काय ? तेही परदेशातच प्रथम वापरले गेले ना ? अमेरिकेत ना ? मग जगाने अनुकरण केले ना ?
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 01/22/2019 - 19:30 नवीन
दुसर्‍याने (मग ते ज्याच्या पायी आपली निष्ठा वाहिली आहे अश्या आपल्या नेत्याने असो, की दुसर्‍या एखाद्या देशाने) केले म्हणून ते बरोबर आणि आपण पण तेच करायला पाहिजे, यालाच गुलामगिरीची मनोवस्था म्हणतात. अश्या मनोवस्थेत, जगाने अनुकरण करावे असे काही आपण काही तरी जगात सर्वप्रथम करावे (किंवा करू शकतो) हा विचार मनाला शिवत नाही! आधी ज्यांना आपण नाक मुरडले आहे अश्या गोष्टी (उदा : योग) पश्चिमेकडे जाऊन परत आल्या (उदा : योगा) की मग आपोआप गोड वाटू लागतात. अनेक पाश्चिमात्य देश ईव्हीएमच्या वापराचा विचार करत आहेत. त्यांनी त्याचा वापर सुरु केला की मग ते अश्या मनोवस्थेला चांगले वाटू लागेल. =)) =)) ही मनोवस्था बदलणे कठीण असते. बाकी चालू द्या. शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Mon, 01/21/2019 - 11:05 नवीन
Evm हैक होतात ऐसे जर काँग्रेस के म्हणणे आहे तर 1999 पासून 2009 पर्यंत एम एम चे सरकार मशीन हैक करून निवडून आले होते ऐसे म्हणावे लागेल . मग त्या न्याय्याने मोदिना अजुन 5 वर्ष सरकार चालवायला भेटली पाहिजे .
  • Log in or register to post comments
व
विशुमित Mon, 01/21/2019 - 10:42 नवीन
भारतीय निवडणूक आयोगाने त्या गोर्याना पण चालेंज द्यायला हवे की आमच्या भारतात येवून EVM ह्याक करुन दाखवा.. काय हरकत आहे? मग काळे भेदच नाही रहायचा?
  • Log in or register to post comments
व
विशुमित Mon, 01/21/2019 - 10:43 नवीन
मग गोरे काळे भेदच नाही रहायचा? कृपया असे वाचावे
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Mon, 01/21/2019 - 12:14 नवीन
भारतीय निवडणूक आयोगाने सगळ्यांनाच खुल्ले चालेंज दिले होते पण काळा का गोरा कोणीही आला नव्हता !!
  • Log in or register to post comments
व
विशुमित Mon, 01/21/2019 - 15:25 नवीन
काथ्या कुटायला ह्या घ्या दोन बातम्या. .. === https://www.loksatta.com/desh-videsh-news/bjp-sp-bsp-congress-aap-involved-in-evm-rigging-claims-expert-1827030/ https://www.loksatta.com/desh-videsh-news/gopinath-munde-was-aware-of-evm-tampering-so-was-murdered-1826921/
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 01/21/2019 - 07:18 नवीन
खुद्द इंग्लडवालेही विलेक्शनला पेपर वापरतात ना ? इंग्लडवालेही विलेक्शनलाच नव्हे तर इतर अनेक गोष्टींसाठी पेपर वापरतात. मग पुढे?
  • Log in or register to post comments
C
Chandu Mon, 01/21/2019 - 11:11 नवीन
जेथेजेथे कायदा,तेथे तेथे पळवाट त्याप्रमाणेजेथे संगणकीय तांत्र , तेथेह्यकिंगची शक्यता आहेच.त्यावर उतारा म्हणून्ं EVPAT असे काही तरी तन्त्र आहेच.त्यात मतदाराला छापील पावती मी ळ ते असे म्हणतात.(मी अजून अनुभवले नाही)
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Mon, 01/21/2019 - 12:01 नवीन
पावती बहुतेक मिळत नाही , एका वेगळ्या पेटीत त्या पावतीचे सात की किती सेकंद दर्शन होते अन मग ती पावती पेटीत अंतर्धान पावते, हातात येत नाही.
  • Log in or register to post comments
म
महेश हतोळकर Mon, 01/21/2019 - 13:28 नवीन
पावती सात सेकंदानंतर पेटीत पडते हे बरोबर (पण अर्धवट). पुढे जाऊन गरज पडल्यावर त्या पावत्यांचीही गणना करता येते. आणि सात सेकंदात एखाद्या व्यक्तीला पावतीवरील नाव जरी वाचता आले नाही तरी चिन्ह नक्कीच कळेल? संदर्भ : https://www.misalpav.com/node/43800 पण आजवरची तुमची वाटचाल बघता, तुम्हाला सकारात्मक चर्चा न करता फक्त गैरसमज आणि गोंधळच माजवायचा असतो हे कळतं.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sun, 01/20/2019 - 20:08 नवीन
India likely to surpass UK in world's largest economy rankings: Report https://m.timesofindia.com/india/india-likely-to-surpass-uk-in-the-worlds-largest-economy-rankings-pwc/articleshow/67615365.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst वर्ल्ड बँकेच्या अहवाला नुसार २०१७ मध्ये भारताच्या अर्थ व्यवस्थेने फ्रांसच्या अर्थ व्यवस्थेला मागे टाकल होत ! ५-६ जागेसाठीची स्पर्धा ईंग्लंड व फ्रांस मध्ये दर वर्षी असते. फ्रांसला मागे टाकल्याने ह्या वर्षी भारत ईंग्लंडलाही मागे टाकेल अशी आशा वर्ल्ड बँकेच्या अहवालात केलेली आहे !! अंध विरोधकांच अश्या बातम्यांकडे दुर्लक्ष होण असहज आहे ! किती डोळे झाक कराल ? हा विजय भारतीय अर्थ व्यवस्थेचा म्हणजे जनतेचा आहे ! अर्थ व्यवस्थेला वळण द्यायचे काम नेत्याचे आहे हे आणी नेता काम करत आहे व अश्या बातमी मुळे अर्थ व्यवस्था योग्य मार्गावर आहे ह्याला दुजोरा मिळतो !!
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sun, 01/20/2019 - 22:35 नवीन
त्यांनी सगळ्या देशांची इकॉनॉमी मोजली , अन आपल्या मोदी सरकारला किती नोटा गोळा झाल्या , हे अजून मोजता येईना . ( आपल्या जुन्या अन नव्या दोन्ही नोटा चुकून वर्ल्ड ब्यांकवाल्यानी हिशोबात धरल्याने इकॉनॉमी वाढली असेल का ? )
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Mon, 01/21/2019 - 15:10 नवीन
http://nbt.in/nItG6a/bga via @NavbharatTimes: http://app.nbt.in आता पुन्हा दिल्ली पोलीस , सी बी आय कामाला लागणार . कोणी फोन केला ? हल्ल्याचा प्लान करण्याचा उद्देश्य काय ? हे सगळ चौकशी करून निष्पन्न काय होणार ? तर पुन्हा एकदा केजरीवाल चे थोबाड फोडन्याचा प्लान होता = ) = )
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Mon, 01/21/2019 - 19:59 नवीन
लोकसंख्या वाढल्याने अर्थव्यवस्थेचा आकार वाढतोय ह्यात कोणत्याही सरकारचे काही कर्तृत्व नाहीय. पर कॅपिटा इनकम, इनकम इक्वॅलिटी, ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स, पर्यावरण संवर्धन ह्या सगळ्या बाबतीत पीछेहाट चालू आहे आणि सरकार जीडीपीचे, पर्यावरण विकासाचे खोटे आकडे पब्लिश करण्यात मश्गुल आहे. नुकताच युएनने भारतीय सरकारने दिलेला जंगलवाढीसंबंधीचा विधा नाकारला आहे. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत अंगूठाछाप असलेल्या नेत्याचे तितकेच निर्बुद्ध चेले मात्र आनंदात निथळत असतात. रिसोर्स लिमिट्स व क्लायमेटचेंजमुळे ह्या अवाढव्य लोकसंख्येला किती त्रास होणार आहे ह्या विचाराची तिरीपही ह्यांच्या घनगर्द अंधाऱया मेंदूत पडत नाही. चांगला विकास चालू आहे.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Mon, 01/21/2019 - 21:53 नवीन
"गेल्या साडे चार वर्षांत लोकसंख्या वाढल्याने अर्थव्यवस्थेचा आकार वाढतोय ह्यात कोणत्याही सरकारचे काही कर्तृत्व नाहीय " हे वाचुन खुप करमणुक झाली !! गेली कित्येक दशक भारत हा चीन पाठोपाठ लोकसंख्या असलेला देश आहे , मग तेंव्हाच्या अर्थ व्यवस्थेने काय घोड मारल होत की भारताच्या अर्थ व्यवस्थेला पहीला नंबर मिळाला नाही ?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 01/22/2019 - 04:44 नवीन
शारीरिक बद्धकोष्ठतेवर इलाज आहे. वैचारिक बद्धकोष्ठावर इलाज नाही.
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Tue, 01/22/2019 - 06:19 नवीन
' काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशन मध्ये आलेल्या कार्यकर्त्यांना डोक्याला कायमचूर्ण चोळायला सांगत ' अस मी कूठ तरी वाचलय बुवा !!!
  • Log in or register to post comments
म
महेश हतोळकर Tue, 01/22/2019 - 09:25 नवीन
अर्थव्यवस्थेच्या बाबतीत अंगूठाछाप असलेल्या नेत्याचे तितकेच निर्बुद्ध चेले मात्र आनंदात निथळत असतात.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ञ गीता गोपीनाथ यांच्या म्हणण्यानुसार तर भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. आता त्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीत अंगूठाछाप आहेत की अर्थव्यवस्थेच्या बाबतीत अंगूठाछाप नेत्यांच्या तितक्याच निर्बुद्ध चेल्या आहेत की त्यांनी हे पर कॅपिटा इनकम, इनकम इक्वॅलिटी, ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स, पर्यावरण संवर्धन ह्या सगळ्या बाबतींंचा विचार न करता मत ठोकून दिलय हे माहिती नाही. जाता जाता, ही बातमी NDTV Twitter handle वरून घेतली आहे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 01/22/2019 - 19:48 नवीन
India to become bigger than China eventually: Raghuram Rajan "WEF Annual Meeting 2019" मध्ये, आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांनी, त्यांच्याच मिपावरील तथाकथित अर्थतज्ज्ञ पाठीराख्यांना, घरचा आहेर देऊन ,तोंडावर पाडले आहे... =)) India will eventually surpass China in economic size and will be in a better position to create the infrastructure being promised by the Chinese side in South Asian countries, former RBI governor Raghuram Rajan said on Tuesday. Addressing a session on Strategic Outlook for South Asia, Rajan said Indian economy would continue to grow while growth rate is slowing down in China.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 01/22/2019 - 19:50 नवीन
India to become bigger than China eventually: Raghuram Rajan मिपावरील तथाकथित अर्थतज्ज्ञांच्या लाडक्या आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांनी, "WEF Annual Meeting 2019" मध्ये, त्यांच्याच पाठीराख्यांना, घरचा आहेर देऊन, तोंडावर पाडले आहे... =)) India will eventually surpass China in economic size and will be in a better position to create the infrastructure being promised by the Chinese side in South Asian countries, former RBI governor Raghuram Rajan said on Tuesday. Addressing a session on Strategic Outlook for South Asia, Rajan said Indian economy would continue to grow while growth rate is slowing down in China.
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Mon, 01/21/2019 - 05:56 नवीन
पंजाब नॅशनल बँकेला करोडो रुपयांचा चुना लावून देश सोडून गेलेला आरोपी मेहुल चोक्सी याला भारतात आणण्याचा मार्ग आता आणखी बिकट होणार आहे. कारण चोक्सीने भारतीय नागरिकत्व सोडले आहे. एबीपीच्या वृत्तानुसार, चोक्सीने भारतीय पासपोर्ट एंटीगुआ उच्च आयोगामध्ये जमा केला आहे. मेहुल चोक्सीने आपला पासपोर्ट क्र. Z3396732 कन्सिल्ड बुकसोबत जमा केला आहे. भारतीय नागरिकता सोडण्यासाठी त्याला १७७ डॉलरचा ड्राफ्टही जमा करावा लागला आहे. याबाबतची सूचना परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव अमित नारंग यांनी गृहमंत्रालयाला दिली आहे. नागरिकता सोडण्याच्या फॉर्ममध्ये चोक्सीने आपला नवा पत्ता जॉली हार्बर सेंट मार्कस, एंटीगुआ असा नोंदवला आहे.
  • Log in or register to post comments
C
Chandu Mon, 01/21/2019 - 11:19 नवीन
एवढ़ी मोठी भानगड मेहुल एकटा कशी करू शकेल?त्याला इथल्यानोकर्शाहीची साथ असणारच.
  • Log in or register to post comments
C
Chandu Mon, 01/21/2019 - 11:19 नवीन
एवढ़ी मोठी भानगड मेहुल एकटा कशी करू शकेल?त्याला इथल्यानोकर्शाहीची साथ असणारच.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Mon, 01/21/2019 - 05:59 नवीन
Karnataka Congress MLA lands in hospital after 'clash': What happened at resort ! कॉंग्रेसच्या एका आमदाराने दुसर्या आमदाराचे डोके फोडले ते पण जेंव्हा सगळे आमदार एका रीझोर्ट मध्ये लपुन बसलेले होते ! कामल आहे ? हे म्हणे ईतर पक्षांबरोबर महा गठ बंधन करुन देशाला सरकार देणार !! ह्यांचे महाठगबंधन होणार !! Read more at: https://m.timesofindia.com/india/karnataka-congress-mla-lands-in-hospital-after-clash-what-happened-at-resort/articleshow/67617964.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Mon, 01/21/2019 - 12:15 नवीन
लेह, लडाख, कारगील पाॅवर ग्रीड मधे आल्यावर भारताने आता पुढची खेळी खेळायला सुरवात केली की काय अशी शंका यायला लागलीय. आता काश्मीरमधे विजनिर्मिती वाढवायच्या मागे भारत लागलाय. तस म्हटल तर भारताच्या वाटणीच बरच पाणी पाकिस्तानात वाहून जातय. धरण बांधून ते अडवल पाहिजे. पण ते होत नव्हत. किशनगंबावर धरण बांधून विजनिर्मिती सुरू केली होती व त्याचा फायदा लेह लडाखला व्हायलाही लागला होता, पण पूर्ण क्षमतेने विजनिर्मिती करता येत नव्हती. आता हा विजनिर्मितीचा व्याप वाढवायचा खटाटोप चालू झालाय. इतकेच नव्हे तर चिनाब नदीवरील रातलेच ८५० मेगॅवॅटचा विद्युत प्रकल्पाचे धरणाचेच काम सरकारने चक्क सुरू केलय. दिल्लीतील पाक वकिलातीमधील सल्लागार, तारीख करीम यांनी ०८/११/२०१८ च्या पत्राद्वारे पाकीस्तानला तस कळवलय सुध्दा. (भारत स्वत:हून कशाला हे जाहीर करेल म्हणा.) अस वाटतय की पाॅवर ग्रीडच्या जोडणीचीच जणू सरकार वाट बघत होत. जरा भूतकाळात डोकावल तर अस दिसतय की, हे सर्व एखादी बुध्दीबळावरची खेळी असल्यासारख वाटतय. सिंधू नदीच्या पाणी वाटपाचा करार १९६० साली झाला. पण पुढे काहीच होत नव्हत. भारताच्या वाटणीचे पाणी पाकिस्तानला मिळत होत. पण... जम्मू काश्मीरमधील अतिरेकी कारवायांना शह म्हणून सिंधू नदीचे भारताच्या वाटणीच पाणी अडवायच व पाकिस्तानच नाक दाबायचा प्रयत्न करायचा, शिवाय हे सर्व करत असताना भारत कागाळी करत नसून पाकच आडमुठेपणा करतोय हे जगापुढे मांडायच अस काहीस सुरू व्हायला लागलय. खर तर या कामाला पाकिस्तानने हरकत घेतलीय. त्यांच अस म्हणणे आहे की, रातले विद्युतयोजनेचा आराखडा चुकीचा आहे. काहीही करून भारताला त्याच्या वाटणीच पाणी अडवू द्यायच नाही, जेणेकरून ते पाणी आपोआप पुढे पाकिस्तानात वाहत जाईल इतकी साधीसुधी पाकीस्तानची रणनिती आहे. पाकिस्तानची इच्छा आहे की, ७ सदस्यांच्या आंतरराष्टीय लवाद कोर्टापुढे याचा निवाडा व्हावा. तर भारत म्हणतय की तटस्थ तज्ञ नेमला जावा. (कोर्टापुढे प्रकरण गेले की कालापव्यय करणे सोपे जाते तर तटस्थ तज्ञ फारच चटकन निर्णय देतो.) यात जागतीक बॅंकेने शेवटी लक्ष घालून १२ डिसेंबर २०१६ ला भारताला काम थांबवायला सांगितल. भारताने काम थांबवल. पाकिस्तान खूष झाल. (प्रत्यक्षात जोपर्यंत पाॅवर ग्रीडची जोडणी होत नाही तोपर्यंत विजनिर्मितीच्या प्रयत्नांना काही अर्थच नव्हता) तटस्थ तज्ञ नेमण्याची भारताची मागणी मान्य होणार यात काहीच शंका नव्हती. कारण आंतरराष्ट्रीय लवाद नेमण्यासाठी दोन्ही देशांची परवांगी लागते. कोणी एक देश म्हणतो म्हणून असा लवाद नेमला जात नाही. फक्त याबाबत निर्णय व्हायला वेळ लागणार होता व तेच पाकीस्तानला पाहिजे होते. गंमत म्हणजे भारतालाही ३५० किमीची विजेची लाईन टाकायला वेळ पाहिजेच होता. दोघांनाही वेळ पाहिजे होता. दोघांनाही तो मिळाला. दोघेही खूष होते. ३५० किमी लाइनचे काम सुरू झाले. लेह लडाख बद्दल जेव्हा भारत काही करायला सुरवात करते तेव्हा चीन एकदम सावधगिरीचा पवित्रा घेते. यावेळीही तसेच झाले असावे. भारत ही लाईन चीनपासूनची संरक्षण सिध्दता करण्यासाठी टाकत असावी असा ग्रह पाकचा झाल्यास नवल नव्हते. ही समजूत घट्ट व्हायला डोकलाम प्रकरणाचाही फायदा झाला असावा. प्रत्यक्षात डोकलाम प्रकरण पूर्णपणे वेगळ होत. पण ही लाईन पूर्ण झालीय व भारत चीन संबंधातला ताण खूप निवळला आहे. हा योगायोग आहे का आणखी काही आहे? काय माहिती? तटस्थ तज्ञ नेमण्याचे भारताचे म्हणणेही ३१ मे २०१८ला जागतीक बॅंकेने मान्य केले व तसे पाकिस्तानला कळवले सुध्दा. अर्थात पाकिस्तान तरीही त्याकडे कानाडोळा करत राहीले. त्यांना न्याय मिळण्यात रस नव्हताच. काम बंद पडल्यामुळे ते खूष होते. आता भारताने काम सुरू केलय. पाकिस्तानची ७ सदस्याची अट मान्य होत नाहीये. तटस्थ तज्ञ नेमायला सांगूनही पाकिस्तान ऐकत नाहीये. भारत ऐकत नाहीये ही तक्रार कोणत्या तोंडाने जागतीक बॅंकेकडे करायची असा प्रश्न पाकीस्तानपुढे पडलाय. जर प्रश्न उकरून काढला तर त्याची परिणिती तटस्थ तज्ञ नेमण्यात होणार हे पाकिस्तानला कळून चुकलय. गप्प बसून चालणार नाहीये कारण भारताने धरणाचे काम तर सुरू केलय. धरल तर चावतय...... अशी स्थिती पाकिस्तानची झालीय. भारताकडे मात्र बोलायला बरेच मुद्दे आहेत. जागतीक बॅंकेने जे सांगितले त्याचा आम्ही आदर केलाय. आम्ही १२/१२/२०१६ पासून काम थांबवलय. मात्र ३१ मे २०१८ पासून पाकीस्तान मात्र त्याला जे सांगितले ते ऐकत नसेल तर आम्ही किती वाट पहायची? थोडक्यात स्टे आॅर्डर भारत मोडतय पण पाकिस्तानच्या आडमुढेपणामुळे तस नाईलाजाने कराव लागतय!!!! वगैरे वगैरे. पण भारत गप्प आहे. काय करायचे आहे बोलून? धरणाचे काम तर सुरू केलय!!!!
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Mon, 01/21/2019 - 14:10 नवीन
ह्याला म्हणतात आंतराष्ट्रिय राजकारण , आता पर्यंतच भारत सरकार अहिंसा, दया बुद्धी वैगेर सारख्या बाळबोध रीतीचा वापर करत होता. आता कुठे चाणक्य नीती सुरु केलेली आहे.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Mon, 01/21/2019 - 14:11 नवीन
अर्थात ह्याच श्रेय श्री मोदी सरकारलाच !!
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Tue, 01/22/2019 - 03:42 नवीन
खूप छान !!! इंदिरा गांधी नंतर झालेली भारताची झालेली मिळमिळत प्रतिमा आता हळूहळू बदलत आहे .
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Mon, 01/21/2019 - 12:58 नवीन
हा ४०० वा प्रतिसाद. अजून महिन्याचे १० दिवस राहील्येत. मे २०१९ ला आठवड्याच्या घडामोडी काढायला लागणार बहुतेक. :)
  • Log in or register to post comments
R
Ramesh Patil Mon, 01/21/2019 - 22:21 नवीन
26 जानेवारी 26 January Speech in Hindi म्हणजे भारताचा प्रजासत्ताक दिवस. पण बऱ्याच जणांना माहिती नाहीये कि जर २६ नोव्हेंबर १९४९ ला संविधान पूर्ण झाले तरीही आपण २ महिने का थांबलो. कारण कॉंग्रेसन जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या अभूतपूर्व अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली आणी संपूर्ण देशाला आव्हान केले कि २६ जानेवारी १९३० पासून सबंध भारतभर हा दिवस स्वतंत्रता दिवस म्हणून साजरा करावा अन त्यानंतर हा दिवस स्वतंत्रता दिवस म्हणून नेहमी साजरा केला जायचा, अन म्हणूनच या दिवसाच महत्व हजारो वर्ष जसेच्या तसे राहावे म्हणून या दिवसापासून संविधान लागू केले गेले अन हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा केला जातो
  • Log in or register to post comments
R
Ramesh Patil Mon, 01/21/2019 - 22:26 नवीन
लिहिलेले एडीट कसे करावे ?
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Tue, 01/22/2019 - 04:59 नवीन
सुधा मूर्ती यांनी विचारलेला प्रश्न https://youtu.be/scRnSo2ZEgw आनंद महिंद्रा यांनी विचारलेला प्रश्न https://youtu.be/5YHE7uo5TqM ठकलपत्रे जशी आली तशी इथे ढकलली आहेत. तज्ञ लोक खर खोट योग्य अयोग्य वगैरे सांगतील अशा अपेक्षेत.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 01/22/2019 - 07:44 नवीन
ये क्या हो रहा है ?! Jyotiraditya Scindia-Shivraj Singh surprise meet sparks political buzz
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Tue, 01/22/2019 - 09:03 नवीन
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 01/22/2019 - 13:25 नवीन
कुणी शुजा नामक हॅकरने 'आप' व भाजपाने ईव्हीएम हॅक करून निवडणूका जिंकल्या होत्या असे सांगितले. काही प्रश्न १) हा हॅकर एवढे वर्षे गप्प का होता? २) निवडणूक आयोगाने चॅलेंज दिला होता. त्यावेळी हा का नाही बोलला? २) ह्याने घेतलेल्या परिषदेत कपिल सिब्बल दिसले. हा काय प्रकार ? ई.व्ही.एम. ला इंटरनेट कनेक्शन नसते मग अशी शेकडो हजारो ई.व्ही.एम्स कशी काय हॅक करता येतील? काँग्रेसवाले अजिबात अभ्यास न करता असले गेम खेळतात व तोंडावर आपटतात असे ह्यांचे मत.
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Tue, 01/22/2019 - 13:46 नवीन
हा आजच का बोलला , पूर्वी का नाही बोलला , हा युक्तिवाद खरा मानला तर भाजपाला मंदिर मुद्दा स्वाहा करावा लागेल, त्याने सर्व पक्षाच्या लोकांना व निवडणूक आयोगास बोलावणे दिले होते म्हणे,
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 01/22/2019 - 13:57 नवीन
त्याने सरळ टी.व्ही. वर यावे व ई.व्ही.एम. भाजपा व आपने कशी हॅक केली ते सांगावे. 'एथिकल हॅकिंग' का काय म्हणतात ते. "मी इस्रोचा उपग्रह हॅक केला ' असे कोणी विधान केल्यास काय म्हणाल? "सिद्ध करून दाखव' असेच ना? राजकारण व विज्ञान्/तंत्रज्ञान वेगळे आहे. विज्ञान्/तंत्रज्ञानात 'बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर' हा नियम आहे.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Tue, 01/22/2019 - 16:42 नवीन
राम मंदिर हा हिंदुंच्या अस्मितेचा प्रश्न आहे ! गेली 70 वर्षे कॉंग्रेसने हिंदुंच्या अस्मितेशी खेळ केलेला ! त्यापुढे जाउन श्री राम हा मिथ्थ असल्याच प्रतिज्ञा पत्र सु कोर्टाला दिल ! आता तेच कॉंग्रेस चे नेते जनतेला उल्लु बनवायला जनैवुधारी म्हणवुन घेत आहेत ! कॉंग्रेसच्या अंध अनुयायांना हे दिसत नाही !
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Tue, 01/22/2019 - 17:18 नवीन
मग बाबराच्या काळात जो अयोध्यानरेश होता , तो तेंव्हा गप्प का बसला ? ( तो आताच का बोलला, तेंव्हा का नाही बोलला , ह्या चालित हे वाचावे, म्हणून उदाहरण दिले.) (तुम्ही तिथेच काय सगळीकडे राममंदिरे बांधा, माझी हरकत नाही.)
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Tue, 01/22/2019 - 18:52 नवीन
तुम्ही लाख हरकट घ्याल हो पण तुमच्या हरकतीला कोण जुमानतो ?
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Tue, 01/22/2019 - 17:21 नवीन
मोदी राममंदिर का बांधत नाहीत? , तर उत्तर द्यायचे , कोर्ट बांधायचा आदेश देईल, मग काँग्रेसच्या नावाने का बोंबा मारायच्या ? त्यांना कोर्टाचे आदेश लागू होत नाहीत ?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा