Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - जानेवारी २०१९

व
वामन देशमुख
Tue, 01/01/2019 - 15:48
🗣 616 प्रतिसाद
सर्व मिपा करांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! राम मंदिरासाठी अध्यादेश नाही ! घटनात्मक मार्गाचाच वापर करणार ; पंतप्रधान मोदींनी मांडली भूमिका “राम मंदिराच्या मुद्यावरून मागील काही दिवसांपासून वातावरण चांगले तापले आहे. आरएसएसनेही राम मंदिराचे लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी अध्यादेश काढण्याची मागणी केली होती. शिवसेनाही यासाठी मागील अनेक दिवसांपासून आग्रही होती. पण भाजप नेमकी याबाबत काय भूमिका घेणार हे स्पष्ट नव्हते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नसून, घटनात्मक मार्गानेच राम मंदिराची उभारणी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एका वृत्तवाहिनीने मोदींनी अशी भूमिका मांडल्याचा दावा केला आहे.” मोदींच्या भूमिकेचे स्वागतच आहे, तथापि, राममंदिरासाठी न्यायालयाचा मार्ग धरणे हे घटनात्मक आहे, आणि त्यासाठी अध्यादेश काढणे, हे घटनात्मक नाही, असे आहे का? संघाने राममंदिरासाठी अध्यादेशाची मागणी करणे आणि सरकारने मात्र न्यायालयीन मार्गाचा आग्रह धरणे ही मे २०१९ च्या लोकसभेची तयारी म्हणावी का? नोटः यासाठी अध्यादेश काढावा असं माझं मत नाही, न्यायालयात जे काही चाललंय ते चालू द्यावं.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 225912 views

🗣 चर्चा (616)
त
तेजस आठवले Mon, 01/07/2019 - 14:42 नवीन
कागलकर तुम्ही फेबु, व्हॉट्सअँप वर पडीक असता मग रुग्ण कधी तपासता ? तुम्हाला मिपावर तहहयात आरक्षण कसे काय मिळते ते पण सांगा एकदा सगळ्यांना.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Mon, 01/07/2019 - 16:54 नवीन
हे बरोबर नाही. याचा अर्थ रेगुलर मिपाकर हे पडिक असतात असा अर्थ घ्यायचा का??
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 01/08/2019 - 05:12 नवीन
मिपावर तहहयात आरक्षण a cat has nine lives.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 01/08/2019 - 14:32 नवीन
मांजरीस नवजीवन (= ९ जीवने) मिळते. -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 01/07/2019 - 14:59 नवीन
आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना दहा टक्के आरक्षण, मोदी सरकारचा निर्णय

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- हुस्न पंचम... ;) :- ZERO
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Tue, 01/08/2019 - 14:30 नवीन
देशात नव्याने सुरु झालेल्या Iconic ट्रेन १८ वर रेल्वे ट्रॅकवरच्या माणसाने दगड भिरकावला ! त्यामुळे ट्रायल वर वेगाने जाणार्या ह्या ट्रेनची एक ग्लास फुटली ! आत प्रवासी नसल्याने कोणाला दुखापत झालेली नाही ! कसल्या मानसिकतेचे प्रदर्शन हे दगड फेके करतात ? काय आसुरी आनंद मिळतो त्यांना ? काही वर्षांपुर्वी मुंबईत लोकल वर झालेल्या दगड फेकीत एका स्रीला आपला डोळा गमवावा लागला होता!! तो अपराधी मिळाला वा नाही हे समजल नाही !!
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Tue, 01/08/2019 - 15:27 नवीन
डॉ. श्रीराम लागू ह्यांचा मुलगाही लोकलवर दगड टाकल्याने जखमी झाला होता.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 01/08/2019 - 15:43 नवीन
जखमी नव्हे मृत्युमुखी (दुर्दैवाने)
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Tue, 01/08/2019 - 16:13 नवीन
चालणार्या रेल्वेवर विरुद्ध दिशेने येणारा दगड हा खुप फोर्स ने लागत असतो, अगदी छोट खडाही असा रेल्वेवर लागला तर काचेची खिडकीच काय, अल्युमिनियमची भींत ही तडकवु शकतो. हे रेल्वे च्या ट्रॅकवर दगड फेक करणार्या लोकांच्या डोक्यात येत नसते, त्यांच्या मते ते गंम्मत करत असतात पण कोणा एकाद्याच्या जिवाशी खेळ होतो. अश्या लोकांना जर पकडायच असेल तर रेल्वेच्या आजु बाजुला कॅमेरे लावावे लागतील पण हे अशक्य आहे. लोकांनीच हे काम करायला पाहीजे, आपल्या मोबाईल मध्यल्या कॅमेर्याने फोटो घेऊन पोलिसांना द्यावे व पोलिसांनी त्यांना पकडुन, पोलिसी खाक्या दाखवावा.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Tue, 01/08/2019 - 16:14 नवीन
एखाद्या दुर्दैवी अपघातात आपल्या कॅमेर्यात लाईव्ह गोष्टी कैद करणारे महाभाग अश्या गोष्टी आपल्या जवाबदारी खाली येतात हे विसरतात.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 01/08/2019 - 16:19 नवीन
पोलिसांनी त्यांना पकडुन, पोलिसी खाक्या दाखवावा. आणि याला सार्वत्रिक प्रसिद्धी द्यावी पण आपल्याकडे असे झाले तर मेणबत्त्या घेऊन हलकट मानव अधिकार वाले मोर्चा काढतील आणि त्या पोलिसांवर चौकशीचा ससेमिरा लागेल.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 01/09/2019 - 08:02 नवीन
उगीच मानवी अधिकारवाल्यांच्या नावाने कशाला रिसीट फाडायची? भारतात अनेक वेळा पोलिस निर्दयपणे मारतात, संशयित म्हणून अनेक महिने डांबून ठेवतात, एन्काउण्टरच्या नावाखाली पैसे उकळतात.. ही वस्तुस्थिती आहे ना ? मध्यमवर्गाला ह्याची सहसा ह्याची झळ पोचत नाही पण गरीब वर्गातील अनेकांना हा नुभव येतो. 'विजय' चोर, जो अर्थमंत्र्यांना पळण्याआधी एक दिवस भेटतो , ३० बॅगा भरून इंग्लंडला पळतो, बाकीचे 'नीरव' चोर/संदेसरा चोर... ह्या चोरांना भारतात आणून 'पोलिसी खाक्या' कधी दाखवला जाणार ? की मग आता इंटरपोलच्या नावाने रिसीट फाडायची?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 01/09/2019 - 08:36 नवीन
माईसाहेब सामान्य माणसांना आणि असामान्य माणसांना कायदे वेगळे असतात. तुमच्या ह्यांना "घोटाळा" करून कुरसुंदीहून ३० बॅगा घेऊन परदेशात पळून जात येईल का? मल्ल्या साहेबाना मदत करणारे कोण कोण आहेत ते पाहून घ्या हो. He was elected to the Rajya Sabha as independent member twice from his home state of Karnataka, first in 2002 with the support of the Janata Dal (Secular) and Indian National Congress and then in 2010 with the support of the Janata Dal (Secular) and BJP [37]. तेंव्हा त्यांना बाहेर जाण्यास कुणी कुणी मदत केली असेल ते समजून घ्या असे करणारे लोक हाताच्या बोटावर मोजता येतील असे असतात. आणि त्यांना सहजासहजी कोणी हात लावू शकत नाही. श्री मोदी यांनी त्यांनी केलेल्या घोटाळ्यापेक्षा जास्त संपत्ती जप्त करून केवळ विरोधी पक्षाचा नव्हे तर स्वपक्षातील लोकांचा रोष ओढवून घेतलेला आहे. राजकारण हे असंच आहे. श्री राहुल गांधी अमेरिकेत परकीय चलनाच्या घोटाळ्यात अडकले( मादक द्रव्याच्या लफड्यात असे गुप्तचर विभागाचा अहवाल सांगत असे) असताना श्री अटल बिहारी वाजपेयी यांनी आपले "वजन" खर्च करून त्यांना सोडवले होते हा इतिहास आहेच ना? ज्या दहशतवाद्याला ए के ४७ आणि हातबॉम्ब सकट पकडले असता दुसऱ्या दिवशी तो जामिनावर सुटतो आणि पुढच्याच शुक्रवारी फारुख अब्दुल्लांबरोबर नमाज पढताना दिसतो हे माझ्या वर्गमित्राने स्वतः पाहीलेले उदाहरण आहे. सुरक्षा दलांनी एक्सीलरेटरवर पाय द्यायचा आणि राजकारण्यांनी ब्रेक मारायचा अशी नैराश्य आणणारी स्थिती कायमच दिसत आली आहे. अशा अनेक सुरस आणि चमत्कारिक कथा आहेत. इसाप म्हणून गेला आहे कि छोट्या चोरांना फाशी दिले जाते आणि मोठ्या चोरांना सलाम ठोकला जातो. पण कोणीही उठावे आणि रेल्वेवर दगडफेक करावी हे कसे चालेल. असे सरसकटीकरण होऊ दिले जाणे राजकारणी लोकांना कसे चालेल? बाकी मानव अधिकार वाल्यांबद्दल न बोलणेच चांगले. याकूब मेमनला मानवाधिकार असतात पण मेजर गोगोई यांनी केवळ दहशतवाद्याला जीपला पुढे बांधले म्हणून त्यांची चौकशी झाली हि आपल्याकडे शोकांतिका आहे. त्या दहशतवाद्याला जीपला पुढे बांधल्याबद्दल १० लाख रुपये मिळाले. https://www.news18.com/news/india/human-rights-panel-directs-jk-govt-to-pay-human-shield-victim-rs-10-lakh-1457117.html
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Wed, 01/09/2019 - 08:47 नवीन
घोटाळे केले , हा एक गुन्हा , तो काँग्रेस काळात झाला , मग पळून जाणे , हा दुसरा ( स्वतंत्र) गुन्हा , तेंव्हा सरकारात कोण होते , त्यांच्यावरही जबाबदारी येणारच ना ? की सगळ्याला नेहरू गांधी काँग्रेस जबाबदार ? 5 वर्षे बाजपेयीं व 5 वर्षे मोदी येऊनही काँग्रेस काळात सर्वाना न्याय सारखा नव्हता , याचे तुणतुणे कशाला ? आणि कर्जापेक्षा जास्त वसुली कुठल्या प्रकरणात केली म्हणे ?
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Wed, 01/09/2019 - 08:51 नवीन
साक्षात इसाप म्हणून गेला आहे कि छोट्या चोरांना फाशी दिले जाते आणि मोठ्या चोरांना सलाम ठोकला जातो. मग फक्त आमच्या बिचार्या काँग्रेसलाच का दोष द्यायचा म्हणे ?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 01/10/2019 - 06:11 नवीन
बिचार्या काँग्रेसलाच का दोष द्यायचा हो ना बिचारे काँग्रेस वाले त्यांचा २ G, कोळसा, कॉमन वेल्थ इ. कशाकशाशी संबंध नाही. हे प्रेसवाले उगाच त्यांना बदनाम करत आहेत. पण ते प्रेस वाले तर काँग्रेसचेच खाते पिते आहेत ना? बघा ना घरचं खाऊन परक्याची चाकरी करायची म्हणजे? नाक्यावर ऐकलेला एक संवाद
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Wed, 01/09/2019 - 08:56 नवीन
राहुल गांधी , डॉलर ( ड्रग ? ) हेही प्रकरण सांगोवांगीच दिसते आहे .
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 01/09/2019 - 09:08 नवीन
हे प्रकरण २००१ साली आम्हीही ऐकले होते रे ब्लॅक-कॅट्या. तेव्हा दोन प्रश्न पडले होते जे अजूनही अनुत्तरीत आहेत. १) वाजपेयीनी अमेरिकन अध्य़क्षांना फोन केला होता असे ऐकले होते. खरे तर अशी अनायासे काँग्रेसच्या बदनामीची संधी चालून आली असताना भाजपाने ही संधी सोडली कशी? २) अमेरिकन कस्टम खाते ज्यात सरकारी हस्तक्षेप सहसा नसतो, त्यांनी असे सहजासहजी सोडून दिले? हे ही विश्वास ठेवायला कठिण वाटते.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 01/10/2019 - 06:07 नवीन
http://zeenews.india.com/news/india/rahul-gandhi-was-caught-in-us-with-drugs-vajpayee-got-him-released-swamy_1634107.html http://subramanianswamy.blogspot.com/2013/04/dr-subramanian-swamy-explains-how-sonia.html
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 01/10/2019 - 07:19 नवीन
मूळ 2001 की 3 ची एकही बातमी नाही, हा त्याला बोलला , तो ह्याला , मग त्याने पेपरात लिहिले , ते वाचून तुम्ही लिहिले , असेच ते आहे ,
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 01/10/2019 - 07:57 नवीन
२००१ चे हि दुवे आहेत पण ते तुम्हीच जरा खणून काढा (नुसती पचपच करण्यापेक्षा) . तुम्हाला सोयीचे काही होईल असे करण्याची माझी मुळीच तयारी नाही. सुब्रमण्यम स्वामी हे एक खासदार आहेत आणि त्यांच्या विरुद्ध खोटे बोलत आहेत म्हणून खटला करण्याची गांधी कुटुम्बाची हिम्मत होत नाही यावरून काय ते समजून घ्या.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Wed, 01/09/2019 - 09:26 नवीन
(उगीच मानवी अधिकारवाल्यांच्या नावाने कशाला रिसीट फाडायची) ==)) आजकाल ती फ्याशन झाली आहे. विषय कोणता ही असो पुरोगामी, मानव अधिकार, पू. वाप्सी वाले, कर्जमाफी, पिछले 60साल, कॉंग्रेस्सी म्हणून मोकळे होय्चे. हा का ना का === तरी प्रतिसादकर्ते System मधे काम केले ले आहेत.असो...
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 01/09/2019 - 14:38 नवीन
त्या दहशतवाद्याला जीपला पुढे बांधल्याबद्दल १० लाख रुपये मिळाले. https://www.news18.com/news/india/human-rights-panel-directs-jk-govt-to-... हा दुवा वाचला का? काश्मीर मध्ये जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या सैनिक आणि अर्ध सैनिक दलांची काहीच किंमत नाही? का नेहेमीप्रमाणे त्यांना आमच्या करदात्यांच्या पैशातून पगार मिळतो आहे ना? त्यांना दगड खायला / मरायलाच नोकरी दिलेली आहे. दहशतवादापासून आपल्या सैनिकांना वाचवणार्या सैनिकी अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशीचं लफडं लावलं आणि ज्याला जीपला पुढे बांधलं त्याला १० लाख रुपये दिले. गटाराचे झाकण नसल्याने त्यात वाहून गेलेल्या माणसाच्या कुटुंबाला २ लाख मिळतात. कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केल्यावर त्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान म्हणून २ लाख मिळतात. रेल्वे अपघातात गेलेल्या तरुण माणसाच्या विधवेला ५ लाख रुपये मिळतात. मग हा गोमाजी कोण लागून गेला हो? का काश्मीरच्या मधल्या माणसांचे मानवाधिकार इतर भारतातील माणसांपेक्षा जास्त आहेत. बाकी "पू. वाप्सी वाले, कर्जमाफी, पिछले 60साल, कॉंग्रेस्सी म्हणून मोकळे होय्चे. हा का ना का" हे सर्व वड्याचे तेल वांग्यावर नात्याने या प्रतिसादात आणले तेंव्हा तुमचा पूर्वग्रह लगेच दिसून येतोच आहे. तेंव्हा चालू द्या.
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Wed, 01/09/2019 - 14:48 नवीन
https://www.indiatoday.in/india/story/farooq-ahmad-dar-tied-to-army-jeep-by-major-was-a-voter-confirms-kashmir-police-1051975-2017-09-25 पोलीस म्हणतात की तो फक्त वोटिंगला घराबाहेर आला होता, जर अतिरेकी होता , तर त्याच्यावर कारवाई कधी झाली होती का ? की नुसते जीपला बांधून सोडून द्यायचे , हीच कारवाई ?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 01/09/2019 - 14:59 नवीन
कसाबला सर्व पुरावे CCTV कॅमेऱ्यात कैद झाले तुकाराम ओंबळे यांनी बंदुकीसकट पकडला तरी दहशतवादी जाहीर करून फाशी द्यायला पूर्ण चार वर्षे लागली फुकटच्या फुसकुल्या सोडू नका. दहशतवादी पकडणे आणि त्याला कोर्टात उभे करून शिक्षा देणे हि गोष्ट मिपावर दर वेळेस हाकलले तरी लोचटासारख्या नवीन नवीन आय डी घेऊन येण्या इतके सोपे वाटले का? काश्मीर पोलिसांची निष्ठा कुठे पाणी भरते आहे ते एकदा श्रीनगरच्या पुढे चार दिवस प्रवासी म्हणून राहून या म्हणजे मग कळेल. आणि जीपला बांधल्याबद्दल १० लाख रुपये मिळणार असतील तर मी दर महिन्याला जीपला उलट टांगून घ्यायला तयार आहे.
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Wed, 01/09/2019 - 15:03 नवीन
सर्वात महत्वाचे म्हणजे , हे प्रकरण झाले 2017 ला , तेंव्हा खुद्द काश्मिरात भाजपा व केंद्रात मोदी सरकार होते, जर तो अतिरेकी असता तर मोदी सरकारने त्याला आत टाकला असता , पण कदाचित तो अतिरेकी नसेल म्हणून त्याच्या मनसतापाची भरपाई म्हणून मोदी सरकारनेच त्याला दहा लाख दिले ( अजून 5 द्यायला हवे होते , म्हणजे एकाला तरी 15 लाख मिळाले असते ! ) त्याच्या 10 लाखाबद्दल कुरकुर करून तुम्ही मोदींची गुंणग्राहकता , न्याय , व 56 इंच ह्या सर्वास काळिमा लावण्याचे कृत्य का बरे करत आहात ?
  • Log in or register to post comments
व
विशुमित Wed, 01/09/2019 - 18:58 नवीन
त्याच्या 10 लाखाबद्दल कुरकुर करून तुम्ही मोदींची गुंणग्राहकता , न्याय , व 56 इंच ह्या सर्वास काळिमा लावण्याचे कृत्य का बरे करत आहात ? ==अरर्रा खतरनाक.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Wed, 01/09/2019 - 18:39 नवीन
रेल्वेवर दगड मारणारा पोरासाठी किती मेन्बत्यावाले येतात ते आपण बघूच! === उगाच आपली अजेंडायुक्त मळमळ जिथे तिथे काढत बसायची.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Wed, 01/09/2019 - 18:46 नवीन
)काश्मीर मध्ये जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या सैनिक आणि अर्ध सैनिक दलांची काहीच किंमत नाही? का नेहेमीप्रमाणे त्यांना आमच्या करदात्यांच्या पैशातून पगार मिळतो आहे ना? त्यांना दगड खायला / मरायलाच नोकरी दिलेली आहे.)) ==)) मनाला येईल ते काही ही फेकता तुम्ही. कोणी किंमत दिली सैनिकाना. जिथे अतिरेक झाला तिथेच त्याना टोक ले गेले.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Wed, 01/09/2019 - 18:48 नवीन
"कोणी किंमत दिली नाही सैनिकाना" असे वाचावे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 01/10/2019 - 06:00 नवीन
कोणी किंमत दिली सैनिकाना. हे (चुकून) खरं लिहिलंत पहा.
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 01/10/2019 - 07:04 नवीन
प्रतिसादाचा आशय बघता टंकन चूक आहे हे शेमड्या पोराला पण समजले असते. आपण तर हुशार आणि अभ्यासू आहात. === बाकी तुम्हाला शिक्के मरायची भारी हौस आहे. जणू आम्हाला सैन्याबद्दल सहानुभूती आणि आपुलकीच नाही. === (संपादित)
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 01/10/2019 - 07:16 नवीन
अवांतर: तुमच्या मुलाला प्रोत्साहीत करता की नाही आर्मीत जायला? याचं उत्तर मी मागेच मिपावर दिलं आहे. शोधून काढा हवं तर. जिथे अतिरेक झाला तिथेच त्याना टोक ले गेले. किती अतिरेक झाला आणि त्याबद्दल १० लाख मिळाले हे वाचून आपली विचारसरणी समजली. बाकी चालू द्या
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 01/10/2019 - 07:17 नवीन
बाकी मुद्दे संपले कि वैयक्तिक पातळीवर उतरण्याची सवय काही जात नाही. असो.
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 01/10/2019 - 07:25 नवीन
बाकी मुद्दे संपले कि वैयक्तिक पातळीवर उतरण्याची सवय काही जात नाही. === लोग सब जाणते है! कोण काय कर्तय ते.
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 01/10/2019 - 07:30 नवीन
किती अतिरेक झाला आणि त्याबद्दल १० लाख मिळाले हे वाचून आपली विचारसरणी समजली. ==)) बघा मारला शिक्का! === संपादित
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 01/10/2019 - 07:58 नवीन
] माझ्या मुलाने काय करावे हे सांगणारे/ विचारणारे तुम्ही कोण गोमाजी लागून गेलात? एवढीच जळजळ होत असेल तर काढा शोधून. मिपावरच आहे ते
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 01/10/2019 - 08:05 नवीन
म्हणूनच सोनिया गांधींनी मुलाचे काय करावे , याबाबत तुमची मते आम्ही ह्या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देतो.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 01/10/2019 - 08:08 नवीन
वा! काय असंबद्ध प्रतिसाद आहे? artificial intelligence is no match for natural stupidity
  • Log in or register to post comments
स
साहेब.. गुरुवार, 01/10/2019 - 09:06 नवीन
वा!
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प गुरुवार, 01/10/2019 - 10:06 नवीन
भारतीय सैन्य ठिकानाची हेरगिरी करण्यात पूर्वी फक्त अल्पसंख्यक समाजाचे लोक सापडत होते परंतु गेले 10 / 15 वर्षात जेवणाच्या थाळीत भोक मारण्याची सवय हिंदू समाजात वाढल्या मुळे सैन्यविरोधात उलटसुलट प्रतिसाद देणाऱ्या मध्ये तीच वृत्ती आढळते , सैन्याकडून मोहिमा प्रतिकूल परिस्थितित राबवताना काही चुका होत असतील पण भाजप वरील राग सैन्यावर काढू नका .
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 01/10/2019 - 12:56 नवीन
कोण राग काढतय सैन्या वर? उगाच असंबंध रेटून लिहायचे? धर्मांध लोकांनी भाजप प्रेमापायी दिसेल त्याला गप्प बसवण्याचे तन्त्र अवलंबले आहे. == तुमच्या घरात सैन्यामधे कोण कोण आहे ? माझ्या घरात आहे अणि पंचक्रोशीत नात्यातील 40एक फौज मधे आहेत. डॉक्टर साहेबां इतके Technical Knowledge नसेल कदचित पण मी सैन्य जीवन खुप जवळून अनुभवले आहे. संपादक मन्डळ अणि डॉक्टर साहेबांना माझा प्रश्न का रुचला नाही हे याच्यत सर्व आले. === देश हा सिस्टम वर चालत असतो. त्यात चांगल्या वाईट गोष्टी घडतच असतात. पण याचा अर्थ असा नाही की चुकीच्या गोष्टींचा ट्रेंड सेट केला जावा.
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 01/10/2019 - 12:23 नवीन
सैन्याबद्दल माझी विचारसरणी काय आहे हे विचारणारे/ठरवणारे तुम्ही कोण दत्तोजी लागुन गेला आहात? === आमचे पोट एकदम व्यवस्थित आहे. काही जळजळ नाही.
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प गुरुवार, 01/10/2019 - 16:12 नवीन
सैन्याबद्दल तुमचे उदात्त विचार सांगण्या साठी पंचक्रोशितिल नातेवाईकांची मदत घ्यावी लागते इथेच सर्व आले , शिवाय इतके जवळचे लोक सैन्यात असताना फारुख अब्दुल्ला , पी डी पी च्या लोकासारखे प्रश्न उपस्थित करता ? सैन्यात माझ्या घरातील कोणीही नाही आणि तरीपण एक सर्वसामान्य माणसा प्रमाणे सैन्याबद्दल मला अभिमान वाटतो . ब्लैक कैट नीं विषय काय मांडलाय ? त्यात आपण साथ द्यावी का ? ब्लैककैट च्या समर्थनार्थ सैन्याबद्दल प्रतिक्रिया देण्याअगोदर तुम्ही थोरल्या साहेबानां कसे विसरून गेलात ? एके काळी निधड्या छातीने सरंक्षण मंत्रिपद संभाळलय ना त्यांनी !!!
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 01/09/2019 - 13:23 नवीन
अहो माईसाहेब,
अमेरिकन कस्टम खाते ज्यात सरकारी हस्तक्षेप सहसा नसतो, त्यांनी असे सहजासहजी सोडून दिले? हे ही विश्वास ठेवायला कठिण वाटते.
तुमच्या ह्यांना जरा अभ्यास वाढवायला सांगा. राजीव गांधीने रोनाल्ड रेगनची बायको नॅन्सीला मध्ये घेऊन आदिल शहरयारला कसा सोडवला याची कथा सुरस व चमत्कारिक आहे. तूर्तास इथे अधिक माहिती वाचायला मिळेल : https://timesofindia.indiatimes.com/india/Sushmas-counterattack-Who-is-Adil-Shahryar-and-what-was-his-connection-with-Rajiv-Gandhi/articleshow/48455131.cms आ.न., -गा.पै. जाताजाता : आदिल शहरयार हे महंमद युनुसचे दिवटे अपत्य व संजय गांधीचे सावत्र भावंड.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 01/09/2019 - 20:01 नवीन
After Lok Sabha, Quota Bill passes Rajya Sabha test जाती-धर्माच्या वर उठून केवळ आर्थिक परिस्थितीवर आधारीत शिक्षण आणि नोकर्‍यांत १०% जागा राखीव ठेवण्याचे बिल राज्यसभेतही मंजूर झाले. आता केवळ राष्ट्रपतींची मंजूरी आणि नोटीफिकेशन या दोन औपचारिक पायर्‍या बाकी आहेत... त्या त्वरीत होतील यात संशय नाही. जाती-धर्माच्या वर उठून केलेल्या या कायद्याबद्दल सरकारचे आणि त्याला (स्वतःहून व नाईलाजाने) पाठिंबा देणार्‍या सर्व पक्षांचे अभिनंदन !!!
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 01/10/2019 - 02:12 नवीन
या आधी नारसिंहराब यांनीही प्रयत्न केले होते. https://www.livehindustan.com/national/story-efforts-has-been-made-for-upper-caste-reservation-before-but-failed-know-all-about-2350660.html
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 01/10/2019 - 09:20 नवीन
अगोदरचे प्रयत्न यशस्वी झाले का ? तसेही तुमची पार्टी नरसिंह राव यांना आपले मानत नाही, हे त्यांचे पार्थिव काँग्रेसभवनात न येऊ देता फूटपाथवर अडवून तुमच्या लाडक्या नेत्यांनी सांगितले आहे. रावांची अनवधानाने स्तुती केलीत... आता तुमचे काही खरे नाही. =)) =)) =)) अवांतर : त्यांचे नाव (नारसिंहराब नव्हे) नरसिंह राव आहे हे विसरले, तरी सोईस्कर वाटले तेव्हा त्यांची आठवण आली... टिपिकल ! =)) =)) =))
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ गुरुवार, 01/10/2019 - 14:11 नवीन
ह्या जमोप्याची जेथे मिळेल तेथे त्याची अशीच ठासली जावो !! ह्याला कोणीही कुठेही भाव देत नाही म्हणु न सर्व ठिकाणी पिंका टाकत असतो !! फ्रस्टेटेड माणुस आहे !!
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ गुरुवार, 01/10/2019 - 14:20 नवीन
राज्य सभेत हे विधेयक मंजुर होत असताना कपिल सिब्बल म्हणत होते की हीच वेळ का मिळाली वैगेरे. त्यावर अमर सिंग ह्याची प्रतिक्रीया खुपच बोलकी होती. अमर सिंग : हे सर्वात चांगले विधेयक मोदी सरकारने आणलेले आहे, ह्या विधेयकाच मी समर्थन करतो. राज्यसभेत बरेच लोक ह्या विधेयकाला नावे ठेवत होते. पण विरोध करायला कोणातही दम नाही !! रविशंकर : हे विधेयक आणायला हीच वेळ का मिळाली ? सिक्सर स्लॉग ओव्हर मध्येच मारतात. असे अनेक सिक्सर आता येणार आहेत,
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा