Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

ताज्या घडामोडी-मार्च २०२४

म
माईसाहेब कुरसूंदीकर
Sat, 03/01/2025 - 18:22
🗣 548 प्रतिसाद
गेल्या दोन दिवसात ट्रम्प/व्हान्स आणी झेलिन्स्की ह्यांच्यातील चर्चा(की हाणामारी) जगभर चर्चेचा विषय झाली. युक्रेनमध्ये टिटॅनियम्,लिथियमच्या सम्रुद्ध खाणी आहेत. अमेरिकेबरोबर ह्या संबंधात करार करण्यासाठी झिलिन्स्की व्हाईट हाउसमध्ये गेले होते. चर्चा ,युद्धाचा विषय,त्यातुन वाद आणि मग होणारा करार फिस्कटला. जगातील महत्वाच्या राष्ट्रप्रमुखांनी ह्यावर तात्काळ प्रतिक्रिया दिल्या. जर्मनी ,नेदरलँड ,पोर्तुगाल,कॅनडा,पोलंड,आयर्लेंड,नॉर्वे,स्पेन,एस्टोनिया,लॅट्व्हिया ह्या देशप्रमुखांनी 'जर-तर' वगैरे गोल गोल प्रतिक्रिया न देता.. "आमचा रशियाला विरोध असुन युक्रेनला पाठिंबा आहे" असे सरळ सांगितले. https://indianexpress.com/article/world/global-reactions-zelenskyy-trump-white-house-clash-9862068/ https://www.aljazeera.com/news/2025/2/28/world-reacts-after-donald-trump-jd-vance-berate-ukaines-zelenskyy चीन ह्या प्रकरणावर मुग गिळुन गप्प बसणार ही अपेक्षा होती. https://www.scmp.com/news/china/diplomacy/article/3300688/chinas-media-plays-russian-response-trump-zelensky-white-house-clash

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 65467 views

🗣 चर्चा (548)
श
श्रीगुरुजी Fri, 03/21/2025 - 07:46 नवीन
देफच्या काळात कोणते प्रकरण पूर्णत्वास गेले? विरोधी पक्षातील नेत्यांनी आपल्याला पाठिंबा द्यावा यासाठी परमार आत्महत्या प्रकरण, करमुसे मारहाण प्रकरण, नबाब मलिक दाऊद इब्राहिम प्रकरण, सचिन वाझे प्रकरण, दिशा सेलियन व सुशांतसिंग राजपूत प्रकरण, रश्मी ठाकरे अलिबागमधील १९ घरे प्रकरण अशी सर्व प्रकरणे टांगत्या तरवारीसारखी डोक्यावर टांगून दडपण ठेवण्यासाठी वापरली जात आहेत. संजय राठोड, अजित पवार, रवींद्र वायकर, प्रताप सरनाईक, यशवंत जाधव इ. प्रकरणे त्यांनी देफला पाठिंबा दिल्याने कायमस्वरूपी बंद करण्यात आली. मला पाठिंबा द्या आणि निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र घ्या, नाहीतर प्रकरणाच्या तपासाची तलवार डोकी सहन करा, हे धोरण २०१४ पासून यशस्वीपणे राबविले आहे. यातील कोणतेही प्रकरण पूर्णत्वास जाणार नाही. पाठिंबा देत नाही तोपर्यंतअधूनमधून तपासाची धमकी देऊन दडपण आणले जाईल व पाठिंबा देताक्षणीच निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र प्रदान केले जाईल. आव्हाड, राऊत, मलिक, राठोड, परब, पवार, ठाकरे इतके निवांत का आहेत हे आता समजलं असेल.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 03/21/2025 - 07:52 नवीन
भाजपला पाठिंबा देणाऱ्याना थोडी वाटली पाहिजे!
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 03/21/2025 - 07:57 नवीन
वाल्मिक कराड, स्वारगेट बस स्थानकातील बलात्कारी गाडे वगैरेंनी भाजपत प्रवेश करावा. निर्दोष सुटका होईलच, वर एखादे पदही मिळेल.
  • Log in or register to post comments
र
रामचंद्र Sat, 03/22/2025 - 21:11 नवीन
देफ 'वरून' आदेश व पाठबळ असल्याशिवाय असं करू धजतील काय?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 03/23/2025 - 03:20 नवीन
नक्कीच करू शकतात. अजित पवार, ठाकरे इ. ना वाचविण्यात वरिष्ठांची संमती असू शकते. परंतु राठोड, आव्हाड, सत्तार, मुश्रीफ इ. फुटकळांना वाचविणे हे यांचेच निर्णय असणार. पुण्यातील माफिया मोहोळच्या बायकोला पक्षात आणणे असले निर्णय तर वरिष्ठांच्या कानावर गेले सुद्धा नसतील.
  • Log in or register to post comments
र
रामचंद्र Sun, 03/23/2025 - 14:03 नवीन
<माफिया मोहोळच्या...> ??? अधिक माहिती मिळेल का? कारण एक मोहोळ हे महापौर, खासदार अशी वाटचाल करत आता केंद्रीय मंत्री आहेत हे माहीत आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 03/23/2025 - 14:12 नवीन
नाही, नाही. ते मुरलीधर मोहोळ जे सध्या मंत्री आहेत. मी म्हणतोय तो पुण्यातील माफिया गुंड शरद मोहोळ. तो १०-११ वर्षे तुरूंगात होता व सुटल्यानंतर विरूद्ध टोळीने त्याला गोळ्या घालून मारले.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 03/21/2025 - 08:07 नवीन
"दिशा सालीयान प्रकरणात आठांचा उल्लेख वारंवार केला जातोय" दिशाचा मृत्यु झाल्यावर तिचे आई-वडिलांनी पत्रकार परिषद घेतली होती. "आमच्या म्रुत मुलीची बदनामी थांबवा. आमचा कुणावरही संशय नाही" असे सांगत होते. तरीही कोकणातल्या नेपाळी नेत्यांनी तिची बदनामी सुरुच ठेवली. तिच्यावर बलात्कार झाला व तिला ढकलले असे हे नेपाळी नेते सांगत होते. जर पुरावे आहेत तर पोलिसांना द्या ना? मुंबई पोलिसांवर विश्वास नाही तर सी बी आय ला द्या. पण पुरावे काही दिले नाहीत. आता पडद्यामागे आपले नेते कशा चाव्या फिरवतात ते सर्वाना ठाउक आहे. दिशाचे वडिल सतिश सालियान ह्यांनी दिशावर बलात्कार करुन तिचा खून झाला असे म्हणत आहेत. ही घटना घडली(जून २०२०) मध्ये. "We are very hurt by her death. People are spreading rumours on social media platforms that she was thrown off the building and her body was found naked. There is no truth in these claims. This kind of talk is highly offensive and hurts us," Satish said. हे त्यांचे विधान आहे ऑगस्ट २०२० मधले. Talking about Disha's friends who were in her Malvani flat the day she died, Satish said, "They are Disha's childhood friends and belong to good families. We knew them and their families very well." https://203.112.159.176/amp/mumbai/mumbai-news/article/Disha-Salian-father-Satish-Stop-victimising-my-dead-daughter-22933348 मग आता ह्या सतिश रावांचा कान पकडुन विचारायला हवे, की असे काय झाले की आता पलटी मारताय?
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Fri, 03/21/2025 - 08:32 नवीन
अशा बातम्यांकडे दुर्लक्ष करावे. चर्चा करण्याच्या अजिबात लायकीची नाही ही बातमी.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 03/21/2025 - 09:06 नवीन
+१ दिशा सालियन, आत्महत्या केलेला सुशांत राजपूत ही प्रकरणे कधीच बंद झाली आहेत, हे विषय फक्त मूर्ख लोकांच्या चर्चेचे विषय आहेत.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Fri, 03/21/2025 - 08:40 नवीन
दिशा सालीयान आणि सुशांतसिंग प्रकरणांचा वापर फक्त आदित्य ठाकरेंना बदनाम करण्यासाठीच केला जातोय. थोड जरी तथ्य असल असत तर नक्कीच कारवाईच नाटक तरी केलं असतं. ह्यात फक्त फडणवीसांना दोष देऊन उपयोग नाही, भाजपच केंद्रीय नेतृत्व पण हेच करतय. एकदा भाजप प्रवेश केला की कारवाई बंद.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 03/21/2025 - 08:47 नवीन
तथ्य असणार आणि पुरेसे पुरावेही असणार. पण याचा वापर फक्त दडपण आणून पाठिंबा मिळविण्यासाठी केला जातोय. म्हणून तर प्रकरण बंद केले जात नाही, पुढे नेले जात नाही किंवा पूर्णत्वास नेले जात नाही.
  • Log in or register to post comments
आ
आंद्रे वडापाव Fri, 03/21/2025 - 13:34 नवीन
होय आणि समजा एकदा का पाठिंबा मिळाला ... कि हे महाराष्ट्रात असलेले आणि आपण मराठी आहोत हे भासवणारे गुज्जू (स्लीपिंग सेल) आणि कावकाव करणारे काही भटजी ... गुपचूप मूग गिळून गप्प बसतील ... सगळं काही शांत शांत होईल ... कुठली दिशा अन कुठला सुशांत ...
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 03/21/2025 - 08:44 नवीन
लोकशाही मूल्ये, भाषण/मत स्वातंत्र्य हे शब्द केवळ भाषणात असून चालत नाहीत. आपणास 'अमुक गुरु,तमुक गुरु'असे जगाने म्हणावे असे वाटत असेल तर ते क्रुतीतून्/बोलुन दाखवावे लागते. नुसतेच हसून वेळ मारुन नेउन चालत नाही. सुदैवाने फ्रान्समध्ये ही मुल्ये जपण्याची परंपरा दिसते एक फ्रेंच संशोधक अमेरिकेत ह्युस्टन येथे ९ मार्च रोजी परिषदेसाठी आले असताना त्यांना विमानतळावर उतरल्यावर 'रँडम चेक' मध्ये अडवण्यात आले व त्यांचा फोन तपासण्यात आला. ह्यात ट्रम्प्/सरकार व त्यांच्या संशोधनात्म्क धोरणांवर टीका केली होती. According to an unnamed source cited by AFP, US authorities labelled the messages as “hatred towards Trump” that “could be qualified as terrorism”. ह्या संशोधकाला पुन्हा फ्रान्सला पाठवण्यात आले. ह्यावर फ्रान्सचे उच्च शि़क्षण आणि संशोधन मंत्री फिलिप ह्यांनी सरळ highly deplorable म्हणुन निषेध व्यक्त केला. देशात कोणाला घ्यायचे हा अमेरिकेला अधिकार आहेच पण हे झाले ते अयोग्य आहे.असे मत नोंदवले. https://www.france24.com/en/americas/20250320-french-scientist-denied-us-entry-over-text-messages-criticising-trump दुसरे एक भारतिय संशोधक(ह्यांच्याकडे ग्रीन कार्ड आहे) बादर खान सुरी ह्यांना डिटेन करण्यात आले आहे. 'हमासशी संबंध' आहे म्हणुन ह्यांना भारतात पाठवण्यात येणार होते. मात्र तेथील न्यायाधीशांनीच सुरी ह्यांना तसे करता येणार नाही असा निर्णय दिला आहे. सुरी पत्नी पॅलेस्तेनियन आहे व वडिल तेथे हमासशी संबंधीत आहेत म्हणुन बादर सुरी ह्यांचे हमासशी संबंध असणार..हे तार्किक अमेरिकन सरकारचे आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 03/21/2025 - 08:51 नवीन
हा खान व त्याची पालिस्तिनी बायको अमेरिकेतच राहछ दे. ही घाण भारतात नको. पण ते जाऊ दे. स्टारलिंक व टेस्लाचे पुरावे कधी देणार?
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 03/21/2025 - 09:03 नवीन
लोकं पण फार खोडसाळ झाले आहेत आजच्या काळात एकाने विचारले कि औरंगजेब आज असता तर कोणत्या राजकीय पक्षात गेला असता सगळे गुन्हे करून :)
  • Log in or register to post comments
आ
आंद्रे वडापाव Fri, 03/21/2025 - 09:25 नवीन
औरंगजेबाची कबर, छत्रपती संभाजी महाराजांच्या वंशजांनी सुद्धा उखडली नाही किंवा कबरीची विटंबना केली नाही. ३०० वर्ष्यानंतर हे आज कालचे छपरी नेपाळी छत्रपतींचे प्रतिनिधी असल्याच्या थाटात बोलतात .. मोदीजी किंवा अमित शहांकडे जाऊन यांचा आवाज बाहेर येत नाही, येऊही शकत नाही, कारण त्यांनी ह्यां नेपाळी पोरांच्या तोंडांत दिलेला असतो ना चोखायला ... आपला अंगठा ..
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 03/21/2025 - 09:35 नवीन
खिक्क!
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 03/21/2025 - 10:35 नवीन
औरंगजेब कशाला भाजपत किंवा दुसऱ्या पक्षात जाईल? त्याचा स्वत:चा वेगळा पक्ष आहे की.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 03/21/2025 - 10:38 नवीन
असता तर? आहे की महाराष्ट्रात औरंगजेब आणि तो कशाला भाजपत किंवा दुसऱ्या पक्षात जाईल? त्याचा स्वत:चा पक्ष आहे की महाराष्ट्रात.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 03/21/2025 - 11:30 नवीन
+1 आधुनिक औरंगजेबाने गोव्यात गोमंतक पार्टी तसेच पंजाबात अकाली दल, आसामात आसाम गण परिषद बुडवल्या ( जश्या औरंगजेबाने आदिलशाही कुतुबशाही बुडवल्या होत्या) पण मराठेशाही (आजचे शिवसेना आणी राष्ट्रवादी) बुडवणे त्या औरंगजेबलाही शक्य झाले नव्हते नी आजच्या भंपक औरंग्याच्या बापालाही शक्य नाई!
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Fri, 03/21/2025 - 09:32 नवीन
पक्ष बदलला असता का ते माहिती नाही पण नक्कीच तो काँग्रेस मध्ये असला असता.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 03/21/2025 - 09:34 नवीन
मग त्याच्या मागे आयडी, सीबीआय लावल्या गेल्या असत्या नी भाजपात आणून मोठे पद दिले असते, सगळे घोटाळे माफ केले असते, संघाच्या केशव माधव ने त्याच्यासाठी सतरंज्या उचलल्या असत्या. तो किती मोठा देशभक्त होता असे पो अंधभक्तानी व्हॉट्सअपवर पाडले असते. आलमगीरभक्त नावाची मोदीभक्त सारखं आणखी एक नवीन जमात असती!
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 03/21/2025 - 10:47 नवीन
आधुनिक औरंगजेब सुद्धा कॉंग्रेसमध्ये आतबाहेर करत आलाय.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Fri, 03/21/2025 - 11:22 नवीन
जागतीक आनंदी देश नेमेची येतो मग पावसाळा या धरतीवर या महिण्यात जागतीक आनंदी देशांची क्रमवारी जाहीर झाली. खरे तर मी असले तत्सम शोधनिबंध फाट्यावर मारतो, पण या वेळेच्या क्रमवारीत दहाव्या क्रमांकावर मेक्सिको हा देश पाहिल्यावर मजा वाटली. खरे तर ह्या चाचण्या कोण करते, कधी करते, कुठे करते, कशी करते हे कागदोपत्री जरी दिसत असले तरी कितपत खरे आहेत हे सर्वे घेणार्‍याला व देणार्‍याला माहीत. ज्या मेक्सिकोमधले यच्च्यावत लोक पडेल ते काम करण्यासाठी जीव धोक्यात घालुन अमेरिकेत येतात त्या मेक्सिकोचा नंबर अमेरिकेच्याही पुढे? जगात हातात कटोरे घेउन भीक मागत फिरणारा पाकीस्तान भारताच्या पुढे? सौदि अरेबिया ३२, जिथे मानवी हक्क काय असतात हे कुणाला माहीत नाही. ग्वाटेमाला / हांडुरास / वेनेझुएला पहिल्या १०० मधे? बरे ते बर्‍याच वेळा वाचले होते की भुतान हा जगातला सगळ्यात आनंदी देश आहे. तो कुठे दिसत नाही. मान्य आहे जीडीपी ह्यात प्रमुख निकष आहे पण बाकीचे निकष? मागच्या महिण्यात किती लोकांना मदत केली, किती पैशे चॅरीटी ला दिले, तुमचे हरवलेले पाकीट कुणी परत दिले असले प्रश्न विचारुन काय साध्य होणार आहे? प्रत्येक देश सांस्क्रुतीक द्रुष्ट्या वेगळा असतो. सौदी अरेबिया जिथे चोरी केली तर हात छाटले जातात तिथे चोरीचे पाकीट कोण घेणार? भारत किंवा चीन सारख्या जास्त लोकसंख्या असलेल्या देशात १० / २० हजार लोकांना प्रश्न विचारुन काय निष्कर्ष काढणार ?
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Fri, 03/21/2025 - 11:29 नवीन
प्रतिकूल परिस्थितीतील लोकं आनंदी असतात. जंगलात राहणारा आदिवासी समाज नेहमी आनंदी असतो.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Fri, 03/21/2025 - 11:35 नवीन
तेच म्हणतो मी. आनंदी आहात हे मोजणार कसे?
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Fri, 03/21/2025 - 11:30 नवीन
प्रतिकूल परिस्थितीतील लोकं आनंदी असतात. जंगलात राहणारा आदिवासी समाज नेहमी आनंदी असतो.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 03/21/2025 - 11:37 नवीन
हजारो करोडो खर्च करून जागोजागी मोदींचा चेहरा दिवसातून ४ वेळा लोकाना दिसावा आशो व्यवस्था सरकारने केलीय, तरीदेखील भारत आनंदी देशांच्या यादीत नसेल तर प्रश्न गंभीर आहे!
  • Log in or register to post comments
आ
आंद्रे वडापाव Fri, 03/21/2025 - 11:48 नवीन
तरीदेखील भारत आनंदी देशांच्या यादीत
म्हणूनच भारत आनंदी देशांच्या यादीत नाही...
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 03/21/2025 - 11:53 नवीन
खिक्क! मला वाटले मोदीजींचा फोटो दिवसातून ४ वेळा पाहून लोकाना आत्मविश्वास, स्फूर्ती, नी प्रेरणा मिळून भारतीय फार आनंदी असावेत, संडासाची भिंत ते दारूचा गुत्ता अशी एक जागा नाही जिथे महामहिम विश्वगुरू श्री नरेंद्र मोदी ह्यांचा फोटो नाही!
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Fri, 03/21/2025 - 13:17 नवीन
जागतीक आनंदी देश...
प्रतिसादाच्या आशयाशी सहमत. असली संशोधने, पाहण्या व त्यांचे निष्कर्ष हे पाहून त्यांच्यातला फोलपणा लगेच जाणवतो. --- "शेणपट्ट्यात वळवळणारे किडे, साजूक तुपातही शेणच शोधतात" हे अधोरेखित करणारे काही उप-प्रतिसाद या प्रतिसादाखाली दिसले.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 03/21/2025 - 13:21 नवीन
बरोबर. जन्मापासून मरेपर्यंत शेणगोळे हेच ज्यांचे विश्व त्यांच्याकडून वेगळे काय अपेक्षणार?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 03/21/2025 - 11:51 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 03/21/2025 - 11:58 नवीन
औरंग्याने वयाच्या अंदाजे ६० व्या वर्षी महाराष्ट्रावर आक्रमण केले व पुढील २७ वर्षे तो आक्रमण करीत राहिला पण महाराष्ट्र जिंकू शकला नाही. आधुनिक औरंग्याने सुद्धा ६० वयाच्या आसपास पक्ष काढून महाराष्ट्रावर जातीयवादाचे आक्रमण केले व पुढील २६-२७ वर्षे महाराष्ट्रात जातीय आगी लावत राहिला, पण महाराष्ट्र जिंकू शकला नाही. त्या औरंग्याला एक मुलगी होती जी शेवटपर्यंत त्याच्याबरोबर होती. आधुनिक औरंग्याला एकच मुलगी आहे व तो उतारवयात मुलीकडेच राहतो.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 03/21/2025 - 12:21 नवीन
'आधुनिक'ला पद्मविभूषण देउन गौरव करणार्या ब्रम्हावृंदाचे काय करायचे? 'आधुनिक' ने पाठिंबा द्यावा म्हणुन ब्रम्हावृंद नेहमीच कार्यशील राहिला आहे. https://timesofindia.indiatimes.com/elections-2004-news/mahajan-vouches-for-pawars-support/articleshow/432859.cms
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 03/21/2025 - 12:35 नवीन
बुद्धिमतेला २१ तोफांची सलामी! आधुनिक औरंग्या बरोब्बर ओळखला.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Fri, 03/21/2025 - 14:23 नवीन
आधुनिक औरंग्या बरोब्बर ओळखला. सहमत आहे; माईंनी बरोब्बर ओळखला आधुनिक औरंग्या.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 03/21/2025 - 13:05 नवीन
गुजरातेत जन्मलेल्या औरंग्याने अनेक वर्षे गुजरातचा सुभेदार म्हणून काम पाहिले, केंद्रात पद बळकावयला आपल्या दारा शिकोह सारख्या आपल्या बंधूंच्याच हत्या केल्या, आधुनिक औरंग्याही गुजरातेत जन्म घेऊन बरीच वर्षे गुजरातची सुभेदारी करत होता तसेच त्यानेही आपले बंधूची सीडी कांड घडवून राजकीय करिअरची हत्या केली! गुजरातेत जातीय दंगल घडवून आपला खुंटा हलवून बळकट केला, जुन्या औरंग्याने आपल्या बायका सांभाळल्या होत्या!
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 03/21/2025 - 13:19 नवीन
जुन्या औरंग्याने गचकल्यानंतर अंदाजे दोनशे पंचवीस तीस वर्षांनंतर महाराष्ट्रात हिंदू कुटुंबात पुनर्जन्म घेतला व नवीन जन्मातही आपले हिंदूविरोधी जुनेच काम सुरू ठेवले. जुन्या औरंग्याला महाराष्ट्र कधीही जिंकता आला नाही कारण हिंदूंनी प्रखर प्रतिकार केला व तो तब्बल ८८ वर्षे जगून महाराष्ट्रातच वारला. पुनर्जन्मित औरंग्यालाही महाराष्ट्र कधीही जिंकता आला नाही कारण हिंदूंनी त्याला कायम पराभूत केले. इथले काही फुटकळ चिल्लर शेंदाड शिपाई त्याला सामील झाले. तरीही हिंदू जनतेने त्याला महाराष्ट्र जिंकू दिला नाही. आता पार थकलाय तो. या जन्मातही आपल्याला महाराष्ट्र जिंकता आला नाही हे शल्य उराशी बाळगूनच तो उसासे टाकतोय.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 03/21/2025 - 13:35 नवीन
७५ पूर्ण झाले की रिटायर्ड होणार आहे म्हणे?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 03/21/2025 - 13:49 नवीन
पुनर्जन्मित औरंग्याची पंचाहत्तरी उलटून जवळपास दशक लोटलं. पण रिटायर व्हायचे नाव नाही. लोकांनी धरून चालवायला लागतं, बोलता येत नाही . . . पण जातीजातीत फूट पाडून, जातीय आगी लावून महाराष्ट्र जिंकण्याची हौस कायम आहे. तो औरंग्या सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत रिटायर झाला नव्हता.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 03/21/2025 - 13:52 नवीन
अजून गाठायचीय ७५! तख्तावर औरंग्याच आहे ना? बाकी हे मात्र खरं! गुंड, मावळी, तडीपार, भोगी, इडी, गणोजी, सूर्याजी, निवडणूक आयोग सगळं वापरूनही औरंग्याने काही महाराष्ट्र जिंकला गेला नाही!
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Fri, 03/21/2025 - 12:01 नवीन
धाग्याचे पंचशतक लवकर होण्यासाठी आमची एक काडी :)
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sat, 03/22/2025 - 18:47 नवीन
घरी आग लागल्याचे निमित्त झाले आणि दिल्ली हायकोर्टाचे ज्येष्ठ न्यायाधीश यशवंत वर्मा ह्यांच्या घरी तब्बल १५ कोटी रुपयांची रोकड सापडल्याची बातमी प्रसिद्ध झाली आणि एकच गदारोळ झाला. ही घटना घडली १४ मार्च पण जाहीर झाली काल-२१ मार्चला. सरकारी यंत्रणा किती सचोटीने काम करते ते येथे दिसले. नंतर रोकड सापडलीच नाही असा खुलासा दिल्ली अग्निशमन दलातर्फे देण्यात आला.ह्या वर्माची बदली असोसियशनने पुन्हा अलाहाबादला केली. अलाहाबादच्या बार असोसियेशनने हा 'कचरा' इकडे नको म्हणुन निषेध व्यक्त केला. हे वर्मा आधी अलाहाबाद कोर्टात होते. अलाहाबाद कोर्टात अशा 'प्रामाणिक' न्यायाधीशांसारखी 'विद्वान' न्यायाधीशांचीही फौज आहे. हल्लीच तिकडच्या एका न्यायाधीशाने बलात्कार संबंधीत प्रकरणी असा निर्णय दिला होता- that a man allegedly grabbing an 11-year-old girl’s breasts, breaking her pyjama strings, and dragging her under a culvert is not enough to charge him with ‘attempt to rape’ has sparked widespread outrage and calls for the Supreme Court’s intervention https://www.thehindu.com/news/national/uttar-pradesh/demands-for-sc-to-act-against-allahabad-hc-judge-who-sparked-public-outrage-in-attempt-to-rape-case/article69354228.ece दोन वर्षपुर्वी गुजरात हायकोर्टाचे एक न्यायाधीश- समीर दवे ह्यांनी १६ वर्षाच्या पीडीत मुलीला 'मनुस्म्रुती वाचली नसशील तर वाच. पुर्वी १७ व्या वर्षी मुली बाळंत व्हायच्या" असा सल्ला दिल्याचे वाचलेले आठवते. एवढे बिन्डोक आणी भ्रष्ट न्यायाधीश देशात कार्यरत आहेत ही शरमेची गोष्ट आहे. आता ह्या वर्मानी कोणते निकाल दिले होते, कोणते संशयास्पद होते ह्याची चौकशी होईल अशी अपे़क्षा करूया.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 03/22/2025 - 18:51 नवीन
काही चौकशी होणार माही माई! विशिष्ट पक्षाच्या बाजूने निकाल द्यायच्या बोलीवर ह्या न्यायाधीशाला स्वच्छ करून घेतले जाईल, रिटायर्डमेंट नंतर हाती कमळ घेऊन तो राज्यसभेचा खासदारही होईल! गोबरयुग गं गोबरयुग!
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sat, 03/22/2025 - 19:06 नवीन
ह्यावरुन सोहराबुद्द्दिन एन्काउंटरची जुनी केस आठवली. ही केस आधी न्यायाधीश जे टी उत्पत ह्यांच्याकडे होती. त्यांनी अमित शहा ह्यांना हजर रहायला सांगितल्यावर त्यांची बदली झाली आणि जज्ज लोया ह्यांची नेमणुक झाली. डिसेंबर २०१४ मध्ये त्यांचा संशयास्पद म्रुत्यु नागपूरमध्ये झाला होता. ह्यांच्या बहिणीने(ज्या सोलापूरला असतात. राठी आडनाव आहे बहुदा) टी.व्ही वर येउन सांगितले होते की 'न्यायाधीश मोहित शहा ह्यांनी त्यांच्या भावाला अनेक कोटींची ऑफर दिली होती. लोया ह्यांच्या मृत्युनंतर एम बी गोसावी ह्यांची नेमणूक झाली.ह्या न्यायाधीशांनी सी बी आय न बनवलेली चार्ज शीट(जी साधारण दहा हजार पानांची होती) ती फक्त १५ दिवसात वाचली !!आणि निकाल देउन टाकला.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 03/22/2025 - 19:34 नवीन
सगळीच यंत्रणा किडवलीय गं यांनी, इडी काय, सीबीआय काय, निवडणूक आयोग काय, ठाकरेंची शिवसेनाही ह्या किडक्या यंत्रणेने संबंध नसलेल्या लोकाना दिली, पवारांनी स्वत स्थापलेली राष्ट्रवादी त्यांच्या हयातीतच काढून घेतली, वाटले होते न्याययंत्रणातरी सुरक्षित असेल पण तसेही काही दिसत नाही. गोबरयुगात आणखी काय काय पाहावे लागणार देव जाणे!
  • Log in or register to post comments
र
रामचंद्र Sat, 03/22/2025 - 21:17 नवीन
पंचवीसेक वर्षांपूर्वीचे पुण्यातले कर्नल जयंतराव चितळे आठवतात का?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 03/23/2025 - 03:21 नवीन
नाव स्मरतंय पण संदर्भ स्मरत नाही.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 18 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 22 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 25 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा