ताज्या घडामोडी-मार्च २०२४
गेल्या दोन दिवसात ट्रम्प/व्हान्स आणी झेलिन्स्की ह्यांच्यातील चर्चा(की हाणामारी) जगभर चर्चेचा विषय झाली. युक्रेनमध्ये टिटॅनियम्,लिथियमच्या सम्रुद्ध खाणी आहेत. अमेरिकेबरोबर ह्या संबंधात करार करण्यासाठी झिलिन्स्की व्हाईट हाउसमध्ये गेले होते. चर्चा ,युद्धाचा विषय,त्यातुन वाद आणि मग होणारा करार फिस्कटला.
जगातील महत्वाच्या राष्ट्रप्रमुखांनी ह्यावर तात्काळ प्रतिक्रिया दिल्या.
जर्मनी ,नेदरलँड ,पोर्तुगाल,कॅनडा,पोलंड,आयर्लेंड,नॉर्वे,स्पेन,एस्टोनिया,लॅट्व्हिया ह्या देशप्रमुखांनी 'जर-तर' वगैरे गोल गोल प्रतिक्रिया न देता.. "आमचा रशियाला विरोध असुन युक्रेनला पाठिंबा आहे" असे सरळ सांगितले.
https://indianexpress.com/article/world/global-reactions-zelenskyy-trump-white-house-clash-9862068/
https://www.aljazeera.com/news/2025/2/28/world-reacts-after-donald-trump-jd-vance-berate-ukaines-zelenskyy
चीन ह्या प्रकरणावर मुग गिळुन गप्प बसणार ही अपेक्षा होती. https://www.scmp.com/news/china/diplomacy/article/3300688/chinas-media-plays-russian-response-trump-zelensky-white-house-clash
स्टार-लिंकला होकार दिला, टेस्ला गाडी विकायला परवनागीही दिली.कधी होकार दिला? कधी अनुमती दिली? कळू दे तरी आम्हाला. नंतर पुढील प्रतिसाद लिहितो.परंतु starlink ला २जी प्रमाणेच स्पेक्ट्रम वाटप होईल असे वाटते.वाटू दे, वाटू दे. अजून बरेच काही वाटू दे. अकायदेशीर नेपाळ्यांना अमेरिकेने बेड्या न घालता परत पाठविले होते असंही काही जणांना वाटत होतं. ग्रॉक भाजपविरोधात, मोदींविरोधात बोलतो म्हणून मोदींनी ग्रॉकला नोटीस पाठविली असंही काही जणांना वाटलं. भारताने टेस्ला व स्टारलिंकला भारतात व्यवसाय करण्याची अनुमती दिली असंही काही जणांना वाटलं. सावित्रीबाईंशी संबंधित चित्रातून तर वेगळंच सत्य बाहेर आणलं. मी सगळीच थापेबाजी उघडकीस आणून थापेबाजांना तोंडावर आपटवलं.