ताज्या घडामोडी-मार्च २०२४
गेल्या दोन दिवसात ट्रम्प/व्हान्स आणी झेलिन्स्की ह्यांच्यातील चर्चा(की हाणामारी) जगभर चर्चेचा विषय झाली. युक्रेनमध्ये टिटॅनियम्,लिथियमच्या सम्रुद्ध खाणी आहेत. अमेरिकेबरोबर ह्या संबंधात करार करण्यासाठी झिलिन्स्की व्हाईट हाउसमध्ये गेले होते. चर्चा ,युद्धाचा विषय,त्यातुन वाद आणि मग होणारा करार फिस्कटला.
जगातील महत्वाच्या राष्ट्रप्रमुखांनी ह्यावर तात्काळ प्रतिक्रिया दिल्या.
जर्मनी ,नेदरलँड ,पोर्तुगाल,कॅनडा,पोलंड,आयर्लेंड,नॉर्वे,स्पेन,एस्टोनिया,लॅट्व्हिया ह्या देशप्रमुखांनी 'जर-तर' वगैरे गोल गोल प्रतिक्रिया न देता.. "आमचा रशियाला विरोध असुन युक्रेनला पाठिंबा आहे" असे सरळ सांगितले.
https://indianexpress.com/article/world/global-reactions-zelenskyy-trump-white-house-clash-9862068/
https://www.aljazeera.com/news/2025/2/28/world-reacts-after-donald-trump-jd-vance-berate-ukaines-zelenskyy
चीन ह्या प्रकरणावर मुग गिळुन गप्प बसणार ही अपेक्षा होती. https://www.scmp.com/news/china/diplomacy/article/3300688/chinas-media-plays-russian-response-trump-zelensky-white-house-clash
फक्त १० ते १५ मिनिटे प्रार्थनेची वेळ असताना त्यावर बंदी आणण्याची मागणी कोण करतात?प्रार्थना कोकलुनच करायची असते का? ती पण ५ वेळा. जाता जाता : तुमचा पण १०८ किंवा अबा होतोय. सांभाळा ..देशात आणि महाराष्ट्रात, धर्मा-धर्मात द्वेष उभा राहिला तरच, आपलं राजकारण सुरक्षित राहील असं सद्य व्यवस्थेला वाटतं म्हणून सातत्याने महाराष्ट्र असो की देश असो वातावरण धुसमुसत राहिलं पाहिजे असे, काही विक्रुत राजकीय आणि माथेफिरुंना वाटत असते, त्यासाठी कायम वेगवेळे मुद्दे उकरुन काढले जातात. कोणत्या तरी एका विषयावर लोकांचे लक्ष जायला लागले की दुसरे मुद्दे आले पाहिजेत, ज्यामुळे लोकांना आपल्या जीवन मरणाच्या प्रश्नांचा विसर पडला पाहिजे. लोकांच्या प्रश्नांसाठी कधीही आग्रही नसणारे, सरकारातील नेते मात्र भडक विधाने करुन शांत असलेल्या महाराष्ट्र धुसमुसत ठेवतात. आता महानगरपालिका, जिल्हापरिषदा निवडणूका आहेत. राजकारणासाठी मुद्दे पाहिजेत आणि सामान्य माणसाच्या जीवन मरणाच्या मुद्यांचा विसर व्हावा म्हणून पद्धतीशीर सर्व घडवल्या जाते. महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राला पुरोगामी वैचारिक द्रुष्टीकोनातून आदींच्या विचारातून महाराष्ट्र घडला आहे त्यांच्या विचारांमुळे ओळखला जातो. राज्यांच्या सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक जडणघडणीत मोठ्या प्रमाणात बदल इथे समाजसुधारकांमुळे घडला आहे. महाराष्ट्र भडकावणा-या लोकांपासून दूर राहण्याची योग्य वेळ आहे, लोकांनी अफवांवर विश्वास न ठेवता. कायदा व सुव्यवस्था बिघडवणा-यांचे प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत. सावध व्हा...! -दिलीप बिरुटे
उबाठांचे एक इनोदी वक्तव्य आलेले आहे.उठा आणि उबाठा हे कायमच विनोदाचे विषय असतात. आपण आपल्याला हास्यास्पद करून घेतलंय हे अजूनही यांच्या डोक्यात घुसत नाही.