Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

ताज्या घडामोडी-मार्च २०२४

म
माईसाहेब कुरसूंदीकर
Sat, 03/01/2025 - 18:22
🗣 548 प्रतिसाद
गेल्या दोन दिवसात ट्रम्प/व्हान्स आणी झेलिन्स्की ह्यांच्यातील चर्चा(की हाणामारी) जगभर चर्चेचा विषय झाली. युक्रेनमध्ये टिटॅनियम्,लिथियमच्या सम्रुद्ध खाणी आहेत. अमेरिकेबरोबर ह्या संबंधात करार करण्यासाठी झिलिन्स्की व्हाईट हाउसमध्ये गेले होते. चर्चा ,युद्धाचा विषय,त्यातुन वाद आणि मग होणारा करार फिस्कटला. जगातील महत्वाच्या राष्ट्रप्रमुखांनी ह्यावर तात्काळ प्रतिक्रिया दिल्या. जर्मनी ,नेदरलँड ,पोर्तुगाल,कॅनडा,पोलंड,आयर्लेंड,नॉर्वे,स्पेन,एस्टोनिया,लॅट्व्हिया ह्या देशप्रमुखांनी 'जर-तर' वगैरे गोल गोल प्रतिक्रिया न देता.. "आमचा रशियाला विरोध असुन युक्रेनला पाठिंबा आहे" असे सरळ सांगितले. https://indianexpress.com/article/world/global-reactions-zelenskyy-trump-white-house-clash-9862068/ https://www.aljazeera.com/news/2025/2/28/world-reacts-after-donald-trump-jd-vance-berate-ukaines-zelenskyy चीन ह्या प्रकरणावर मुग गिळुन गप्प बसणार ही अपेक्षा होती. https://www.scmp.com/news/china/diplomacy/article/3300688/chinas-media-plays-russian-response-trump-zelensky-white-house-clash

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 65467 views

🗣 चर्चा (548)
श
श्रीगुरुजी Sun, 03/16/2025 - 10:13 नवीन
हा हन्त हन्त नलिनीं गज उज्जहार
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sun, 03/16/2025 - 13:24 नवीन
काहीही झाले तरी शिष्यच!
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 03/16/2025 - 18:46 नवीन
मूढ अज्ञानी
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sun, 03/16/2025 - 19:03 नवीन
https://marathi.abplive.com/news/india/sharad-pawar-has-taught-me-in-politics-says-pm-modi-314135/amp
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sun, 03/16/2025 - 19:18 नवीन
आजच लेक्स फ्रिडमनला दिलेल्या मुलाखतीत मोदी म्हणतात- "मी राजकारणात २०००/२००१ साली आलो."पवारांनी काँग्रेस फोडुन २ वर्षे झाली होती.आणि पवार लोकसभेत विरोधी पक्षनेता होते ना? मोदी ऑक्टोबर २००१ मध्ये मुख्यमंत्री झाले. मग हे बोट पकडायचे लॉजिक काय कळेना.कदाचित केशुभाईना बाजुला करुन त्याच्वेळी अडवाणी/वाजपेयीना पटवण्यासाठी पवारांनी मोदींना मदत केली असावी.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sun, 03/16/2025 - 19:30 नवीन
सहमत! पण पवारांचीच राष्ट्रवादी फोडून पवारांचे चांगलेच पांग फेडल्या गेले.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 03/17/2025 - 02:44 नवीन
मोदी पवारा़चा जाहीर उपहास करतात हे अनेकदा दिसले आहे. पवारांनी मला बोट धरून राजकारणात आणले ही तर मोठी टिंगल होती. अगदी मागच्या महिन्यात मराठी साहित्य संमेलनात नेहमीप्रमाणे पवार व्यासपीठावर घुसले. नाट्य संमेलन असो, साहित्य संमेलन असो, क्रिकेट संबंधित कार्यक्रम असो, ऍथलेटिक्स संबंधित कार्यक्रम असो . . . आपला काहीही संबंध नसताना हे सर्वात आधी घुसून व्यासपीठावर जाऊन मोक्याचे आसन पकडतात. तर त्या साहित्य संमेलन कार्यक्रमासाठी यांनीच जाऊन मोदींना आमंत्रित केले व मोदींनी त्यावेळी अत्यंत सुंदर भाषण केले. जेव्हा पवार चाचपडत व्यासपीठावर आसनस्थ होण्यास आले तेव्हा पवारांनी स्वतः त्यांच्या हाताला धरून आसनात बसविले व नंतर एका प्याल्यात पाणी ओतून प्यायला दिले. तुम्ही किती गलितगात्र झाला आहात व इतरांच्या मदतीशिवाय तुम्हाला उठता बसतो चालता येत नाही आणि तरीही खासदारकी सोडवत नाही हे मोदींनी दाखवून दिले. पवारांना गुरू म्हणून हरबऱ्याच्या वृक्षावर चढवून योग्य वेळी त्यांचा पक्ष फोडून पवारांचा गट पूर्ण नामशेष करून फक्त अवशेष शिल्लक ठेवले. मोदी चेहऱ्यावरील हसू लपवित उपहास करतात आणि मुर्खांना वाटते की पवार हेच मोदींचे गुरू. प्रत्यक्षात मोदींचा गुरू म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व कालच्या मुलाखतीत मोदींनी पवारांचे नावही घेतले नाही व संघावर स्तुतीसुमने उधळली.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Mon, 03/17/2025 - 03:21 नवीन
अच्छा म्हणजे पवारांना जाहीरपणे गुरु म्हणणारे मोदी खोटे नी तुम्ही खरे? किती जड जाते ना? मान्य करायला की आपल्या आवडत्या नेत्याचा गुरु पवार साहेब आहे ते?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 03/17/2025 - 04:07 नवीन
अजून किती उलगडून सांगायचं? मूढ अज्ञान्यांना मोदींनी केलेला उपहास अजूनही समजला नाही. एखादा मॅट्रिकच्या परीक्षेत पहिला क्रमांक मिळविलेला विद्यार्थी एका अनुत्तीर्ण विद्यार्थ्याची मी शिकवणी लावली होती व त्याच्या मार्गदर्शनामुळेच मी पहिला आलो असे सांगतो तेव्हा तो उपहास असतो. ५० वर्षे राजकारणात राहूनही तुम्हाला थथातथाच यश मिळविता आले, पण राजकारणात येऊन जेमतेम १३-१४ वर्षात मी सर्वोच्च पदावर पोहोचलो हा टोमणा मूढ अज्ञान्यांना समजतच नाही. त्यांना ते खरं कौतुक वाटतंय.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 03/19/2025 - 05:16 नवीन
कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय?
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sun, 03/16/2025 - 18:34 नवीन
लेक्स फ्रिड्मनच्या मुलखती ऐकणे म्हणजे पर्वणी असते. लेक्स हा मूळचा रशियन पण आता अमेरिकन संगणक तज्ञ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांची त्याने नुकतीच घेतलेली मुलाखत ऐकण्यासारखी आहे. https://www.youtube.com/watch?v=ZPUtA3W-7_I&t=4958s
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 03/17/2025 - 11:00 नवीन
लाचखोरी प्रकरणात अदानीसाठी आलेले समन्स भारत सरकारने अहमदाबाद जिल्हा न्यायालयाला पाठवले. आता अदानीला वाचवण्यासाठी आपली यंत्रणा कशी चालढकल करते ते पाहणे मनोरंजक असेल. गेल्या महिन्यात अदानीला वाचवायचा प्लान ठरलाच होता. त्यामुळे ट्रम्प ह्यांनी १९७७ चा एफ पी सी ए कायद्याला सहा महिन्यांची स्थगिती दिली होती. दरम्यान टेस्ला/स्टार लिन्क, अमेरिकन व्हिस्की/सफरचंदावरचे आयात शुल्क कमी होणे.. हे सगळे विनासायास घडले. पण तिकडची सेबी,म्हणजे एस ई सी पण वस्ताद आहे. Despite this, the SEC recently made a fresh court filing, suggesting that the executive order does not apply retroactively. This means the SEC’s investigation into the Adani Group is likely to continue unless the law itself is changed. https://www.outlookbusiness.com/corporate/trouble-for-gautam-adani-modi-govt-forwards-sec-summons-to-ahmedabad-court
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 03/17/2025 - 11:09 नवीन
अदानीच्या खापरपणतूला पुढील सुनावणीचे पत्र येईल. तेव्हा आम्ही नक्कीच नसणार, पण माई व माईंचे 'हे' नक्की असतील.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 03/17/2025 - 11:38 नवीन
अदानी राजकीय नेत्यांना व्यवस्थित मॅने़ज करतो हे मान्य.पण Growth with goodness साठी ह्या प्रकरणातून बाहेर येणे महत्वाचे आहे.अन्यथा सर्वत्र अडथळे येणार आहेत अदानीला. म्हणूनच तर मान खाली घालुन आयात शुल्क कमी करणे, एफ-३५ चा प्रस्ताव, टेस्लाचा शिरकाव, स्टार-लिंकचे जिओ/एयरटेल बरोबर करार.. हे सगळे ट्रम्प आणि मस्कच्या हुकुमाबर पार पडल्यासारखे दिसले. अमेरिकेने आदेश द्यावेत आणी भारताने 'येस सर' करावे असेच दिसत होते. जयशंकरांचे अनेक आठवडे ठाण मांडुन असणे,ट्रम्प जे काही बडबडतात त्याला भारताने होकार देणे, गाजावाजा न करता पियुष गोयलांचे अमेरिकेला जाणे. सगळेच विचित्र होते.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 03/17/2025 - 12:49 नवीन
यातलं अजून काहीच झालेलं नाही, पण माई व माईंचे 'हे' हे अजूनही सुतकात आहे.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 03/17/2025 - 13:09 नवीन
आयात शुल्क भारताने कमी नाही केले? Amid Trump Tariff Threats, India Cuts Import Duty On American Bikes, Cars In Boost To Harley And Tesla https://www.ndtv.com/world-news/amid-trump-tariff-threats-india-cuts-import-duty-on-american-cars-bikes-in-boost-to-harley-and-tesla-7616866 व्हिस्कीवरील आयात शुल्क कमी नाही केले? https://www.indiatimes.com/news/india/reciprocal-tariffs-india-cuts-duty-on-bourbon-whiskey-several-other-us-made-products-652777.html ईतर देशांनी जो तडफदारपणा दाखवला तो भारताला का नाही दाखवता आला? स्टार-लिंकचा एयरटेल आणि जिओचा करार? तो होणार नाही असे म्हणताय? उत्साहाच्या भरात वैष्ण्व ह्यांनी "स्टारलिंकचे स्वागत असो" असे ट्वीट केले आणि नंतर डिलिट केले. म्हणजे मस्कसाठी पायघड्या घालायच्या आहेत हे आधीच ठरले आहे.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Mon, 03/17/2025 - 13:13 नवीन
अदाणीसाठी देश विकायला काढतील भाजपेयी!
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Mon, 03/17/2025 - 14:53 नवीन
ट्रम्पच्या मागच्या कारकिर्दीतही बऱ्याच गोष्टींचे आयात शुल्क माफ केले होते. मग ते कोणाला वाचवायला होते? भारत सरकार अदानी ला नक्कीच वाचवत आहे. पण प्रत्येक गोष्टीत अदानी संबंध असेलच अस नाही. बर, अमेरिकेच्या कोर्टात अदानी विरुद्ध जो आरोप आहे त्यात त्या वेळची काँग्रेस शासित राज्यही आहेत.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 03/17/2025 - 15:44 नवीन
आयात शुल्क मुळातच जास्त होते. पण आधीच्या अध्यक्षांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. तस्मात् अदानीचा संबंध नाही. तसेही अमेरिकन व्हिस्की, हर्ले डेव्हिडसन् वगैरे भारतात किती जण घेतात? मस्क व जिओ-एअरटेल यांच्यात करार झाला तर तो दोन कंपन्यामधील करार असेल. त्यात सरकारचा किंवा अदानीचा संबंध नाही.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Mon, 03/17/2025 - 16:57 नवीन
स्पेक्ट्रम तर सरकार देणार ना? मस्क सांगेल त्या अटी मान्य करणार का सरकार? जिओ आणि एअरटेल स्पेक्ट्रम लिलाव मागतात ,सरकार लिलावाच्या विरुद्ध आहे. त्यांना २जी प्रमाणे स्पेक्ट्रम द्यायचा आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 03/17/2025 - 17:02 नवीन
झाला आहे का करार? कोणत्या तरंगलहरी मागितल्या? मस्कने कोणत्या अटी घातल्या?
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Mon, 03/17/2025 - 17:41 नवीन
दोन वर्षापासून ते कालपर्यंतच्या starlink च्या भारतसंबंधीत बातम्या वाचा. सगळी माहिती मिळेल.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 03/17/2025 - 18:16 नवीन
करारावर सह्या झाल्या अशी बातमी कोठे आहे?
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 03/17/2025 - 17:51 नवीन
असली माहिती सरकारतर्फे यायला हवी होती. त्यावर चर्चा झाली पाहिजे होती. पण अशावेळी पंतप्रधान वनतारात, जयशंकर लंडनमध्ये,वाणिज्य मंत्री अमेरिकेत.त्यांच्या ट्वीटवर , काहीही माहिती नाही. प्रत्येक़जण आपण त्या गावचेच नाही असा अभिनय करतोय. १३ वर्षपुर्वी २-जी स्पेक्टम बद्दल भाजपावाले काय म्हणत होते- "पंतप्रधानांनी जनतेसमोर येउन खरे काय ते सांगितले पाहिजे.पण ते ए राजा ह्यांना वाचवु पाहत आहेत" the party said that Home Minister P Chidambaram’s continuation in the Union Cabinet “had become untenable” and argued that the UPA Government had made Delhi “a capital of crony capitalism”. https://www.newindianexpress.com/nation/2012/Feb/03/2g-scam-bjp-seeks-explanation-from-pm-336374.html
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 03/17/2025 - 18:20 नवीन
उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग अशी तुझी अवस्था झालीये माईडे. अजून काही झालंच नाही, कशाचा कशाला पत्ता नाही आणि तुला सरकारी निवेदनाची घाई झालीये. फक्त साखरपुड्याचा दिवस ठरलाय आणि तू निघालीस त्या जोडप्याच्या नातवाच्या मुंजीसाठी कार्यालय ठरवायला.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Mon, 03/17/2025 - 17:55 नवीन
बाजारात तुरी अन् भट भटनीला मारी .. असला प्रकार आहे हा..
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 03/17/2025 - 18:22 नवीन
अगदी. अर्धवट अर्धसत्य बातम्या देणारा एकजण, एक सर्वज्ञ मोहिनी अवतार आणि एक येडं अगदी कासावीस झालेत.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Mon, 03/17/2025 - 18:26 नवीन
कासावीस कोण झालंय हे लवकरच कळेल.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 03/17/2025 - 18:49 नवीन
जेव्हा कळेल तेव्हाच थयथयाट करा की. इथे अजून लग्नाचा पत्ता नाही आणि निघाले नातवंडाची मुंज ठरवायला.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 03/18/2025 - 06:08 नवीन
इकडे मुलगा मुलीचा हात धरून, नव्हे खेचुन पळुन गेलाय. मुलगा बडबड करतोय.मुलगी गप्पच आहे. मुलाने वाट्टेल तो हुंडा मागावा आणि मुलीने फक्त लाजुन हसायचे. मुलीला मुलगा पसंत आहे की नाही हे मुलीकडच्या मंडळीना कळणार कसे? पद्धतशीरपणे, पंचाग्,मुहुर्त वगैरे बघुन झाले असते तर हरकत नव्हती.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 03/18/2025 - 06:52 नवीन
कोणीही कोणाचाही हात धरून पळालेले नाही. कोणीही कोणाला लग्नाकरता विचारवेले नाही किंवा हो सुद्धा म्हटलेले नाही. सगळ्या तुझ्या मनातल्याच गप्पा माईडे. अजूनही तू पंचांग, मुहूर्त, पसंतापसंती, याद्या, हुंडा, मानपान,. देणीघेणी या काळातच वावरतीयेस.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Mon, 03/17/2025 - 17:46 नवीन
आमचं तात्या आहेच भारी! उगा नाही अडाणी आडून भारत सरकाटला गुडघ्यावर आणलं, गावात कुणाचं कुणाशी लफड, नी जगात कोणत्या सरकारचं कोणत्या उद्योगपतीशी लफड ह्याची खडानखडा माहिती तात्या ठेवतात. आणी वेळ आली की खटक्यावर बोट जाग्यावर पलटी करून इंगा दाखवतात. :)
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 03/18/2025 - 14:25 नवीन
रमजान काळात बाटगे अधिक कट्टर होतात असं म्हणतात. ते खरं दिसतंय. अपेक्षेप्रमाणे उबाठा गट या मुस्लिम पक्षाच्या प्रमुखाने औरंग्या व अफजुल्याची कबर हटवायला विरोध केलाय. ओवेसी, अबू आझमी, शप गट, सुळे, आव्हाड, कॉंग्रेस यांची हीच भूमिका आहे.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 03/18/2025 - 14:58 नवीन
'छावा' चा परिणाम? लहान/तरूण पोरांचे पॉप्कॉर्न खात मल्टिप्लेक्सात रडणे समजता येते पण सुमारे ९ लाख कोटीचे कर्ज असलेल्या महाराष्ट्रातील सत्ताधार्यांकडुन ही अपेक्षा नाही. Those glorifying Aurangzeb are 'traitors': Eknath Shinde https://www.thehindu.com/news/national/maharashtra/those-glorifying-aurangzeb-are-traitors-eknath-shinde/article69343162.ece उपमुख्यमंत्री,नगरविकास्,सार्वजनिक काम .. ही खाती. इकडे दिवे लावायचे सोडुन ३२५ वर्षपुर्वी निधन पावलेल्या औरंगझेब, त्याची कबर.. ह्यावर चर्चा. बहुसंख्य लोकांची टाळकी गरम करायची, नोकर्या,व्यवसाय,वाहतुक प्रश्न ह्यावरुन लक्ष वळवायचे. स्वतःच्या संपत्तीत मात्र पाच वर्षात तिप्पट वाढ. https://www.loksatta.com/maharashtra/cm-eknath-shinde-property-in-nomination-form-affidavit-way-more-than-kedar-dighe-pmw-88-4679899/
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 03/18/2025 - 15:03 नवीन
पुरोगामी महाराष्ट्र अविकसित नि अधोगामी करायचा चंग बांधला आहे भाजपेयीनी!
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 03/18/2025 - 16:34 नवीन
अजूनही अनाजी दत्तो, भीमा-कोरेगाव, कृष्णाजी भास्कर, नथुराम, समर्थ रामदास स्वामी, दादोजी कोंडदेव, स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांच्यावरच चर्चा. बहुसंख्य लोकांची टाळकी गरम करायची. नोकऱ्या, व्यवसाय, वाहतुक प्रश्न ह्यावरुन लक्ष वळवायचे. स्वतःच्या संपत्तीत मात्र पाच वर्षात तिप्पट वाढ.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/19/2025 - 03:22 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 03/19/2025 - 04:22 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/19/2025 - 05:03 नवीन
बनावट चित्र.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Wed, 03/19/2025 - 05:07 नवीन
चित्रातील सगळेच ' बनावट ' आहेत. मूळ रूप दाखवले तर सेन्सॉर होईल.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/19/2025 - 05:31 नवीन
निर्भय बना. त्यासाठी भेटा अथवा लिहा - असीम सरोदे, विश्वंभर चौधरी.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 03/19/2025 - 05:46 नवीन
https://timesofindia.indiatimes.com/india/pm-modi-visits-mughal-ruler-bahadur-shah-zafars-grave-in-yangon/articleshow/60405523.cms# कधी कधी शोध घ्यावा, संघ किंवा भाजपच्या आयटीसेल वर विसंबून राहू नये!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 03/19/2025 - 06:37 नवीन
सद्य पंतप्रधान यांच्या विरोधात जे जे असतं ते ते सर्व खोटं असतं. व्यवस्थेच्या विरोधात जे जे असेल ते ते खोटं आहे, हे सांगण्यासाठी देशभर गोबरभक्तांची फळी उभी आहे. गोबरयुगात हे सर्व व्हायचंच. कोणी कितीही वरीजनल बातम्या दिल्या तरी त्या खोट्याच आहेत असे, गोबरपंथी अनुयायी म्हणत असतात. अर्थात, लोक आता असे मेसेजेस, बातम्या सर्व तपासून घेतात त्यामुळे थोडा फार विश्वास टीकून आहे, देश टीकून आहे. दुव्याबद्दल धन्यवाद. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/19/2025 - 08:55 नवीन
तो जफर होता, तुमचा लाडका औरंग्या नाही.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Wed, 03/19/2025 - 04:03 नवीन
औरंग्याच्या कबरीचा मुद्दा भाजपच्या नेत्यांनीच काढलेला आहे. खालच्या नेत्यांनी कबर हटवण्याची मागणी करायची आणि मुख्यमंत्र्यांनी हटवता येणार नाही म्हणायचं. वरच्या कार्टून मधले आणि मुख्यमंत्र्यांची भूमिका एकच आहे. नागपूर मध्ये ३० पोलिस जखमी झालेत तर महिला पोलिसांचे कपडे काढण्याचा प्रकार झाला. सध्याला कमकुवत विरोधी पक्ष, लाडकी बहीण सारख्या फुकट्या योजना, ED, CBI,ह्या मुळे भाजपा आणि इतर सत्ताधारी लोकांचं फावत आहे.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 03/19/2025 - 05:37 नवीन
'मुस्लिम वाईट होते/आहेत' चा प्रचार 'छावा'नंतर जोरात चालु झाला. किंबहुना छावाची निर्मीती ह्यासाठीच झाली होती असे म्हंटले तर वावगे ठरू नये.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/19/2025 - 05:44 नवीन
'मुस्लिम वाईट होते/आहेत' चा प्रचार 'छावा'नंतर जोरात चालु झाला. किंबहुना छावाची निर्मीती ह्यासाठीच झाली होती असे म्हंटले तर वावगे ठरू नये. 'ब्राह्मण वाईट होते/आहेत', 'ब्राह्मणांनीच औरंग्याशी हातमिळवणी करून मनुस्मृतीनुसार संभाजी महाराजांना मारले' असा प्रचार 'छावा'नंतर जोरात चालु झाला. किंबहुना छावाची निर्मीती ह्यासाठीच झाली होती असे म्हंटले तर वावगे ठरू नये.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Wed, 03/19/2025 - 05:47 नवीन
एका ठराविक वर्गाचा हा ' गनिमी कावा ' आहे. बहुजन वर्गातील युवकांनी ह्यास बळी पडू नये.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Wed, 03/19/2025 - 06:16 नवीन
मुस्लिम वाईट होते/आहेत हे दुसऱ्यांना सांगायची गरज नाही. तेच स्वतः ह्यासाठी काम करत असतात.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 03/19/2025 - 06:49 नवीन
सारखे ईतिहास उकरून कोण काढतात्?कोणताही ऐतिहासिक पुरावे नसताना 'टिपु सुलतानाने लाखो हिंदुंना मारले" हे कोण सांगते? दिवसातून फक्त १० ते १५ मिनिटे प्रार्थनेची वेळ असताना त्यावर बंदी आणण्याची मागणी कोण करतात?"पाकिस्तानला चालते व्हा" हे कोण म्हणते? ३०० वर्षपुर्वि मरण पावलेल्या बादशहाच्या कबरीची चर्चा करायची गरज काय? ट्रम्प तात्या/मस्क तिकडे भारताचा प्रत्येक अवयव पिरगळून टाकत असताना हिंदु राष्ट्रवाले गप्प. का? चीनने अरूणाचलमधील अनेक गावांवर हक्क सांगितल्यावरही त्यांच्याशी दोस्तीची भाषा का ? मुस्लिमांना चेपणे सोपे आहे पण ट्रम्प/चीनबद्दल काही बोलाल तर हे दोन्ही देश उरावर बसतील ही भीती?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 17 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 20 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 24 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा