Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

मविआचे सरकार गेले. पण नक्की ह्या प्रयोगात जिंकले कोण?

T
Trump
Wed, 06/29/2022 - 19:34
🗣 222 प्रतिसाद
मविआचे सरकार गेले. पण नक्की ह्या प्रयोगात जिंकले कोण? ------ हा एक अद्भुत प्रयोग होता. भले तो भाजपाने शिवसेनाचा विश्वासघात केल्याने झाला असेल, काही शिवसैनिकांना श्री उध्दव ठाकरे मुख्यमंत्री बघायची हौस असेल आणि त्यात बारामतीच्या काकांची भर पडली, त्यामुळे हा प्रयोग झाला असेल. शिवसेना: (जिंकले) त्यांचा भाजपच्या नाकावर टिच्चुन मुख्यमंत्री झाला. भाजपने शिवसेनेला गृहीत धरु नये हा संदेश गेला. राष्ट्रवादी कॉंग्रेसः (जिंकले) महत्वाची खाती मिळाली. कार्यकर्त्यांची कामे झाल्याने पक्ष वाढला. कॉंग्रेसः (पराभुत) राकाबरोबर एक दुय्यम भागीदार म्हणुन जागा मिळाली. शिवसेन्यासारख्या पक्षाशी समजोता केल्याने मुस्लिम समाजात वेगळा संदेश गेला. भाजप: (पराभुत) विनाकारण ३१ महिने सत्तेबाहेर राहवे लागले. शिवसेनेसारखा जुना सहकारी गमावला. आता फोडा-फोडी केलेल्या लोकांना ठेवायचे कोठे हा प्रश्न आहेच. जनता: (पराभुत) कायम पराभुतच असते.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 38723 views

🗣 चर्चा (222)
श
श्रीगुरुजी Wed, 06/29/2022 - 20:09 नवीन
मला वाटते राष्ट्रवादी व कॉंग्रेस जिंकले. १) सत्तेची अजिबात शक्यता नसताना ३१ महिने सत्ता व महत्त्वाची खाती मिळाली. त्याचा उपयोग करून भरपूर निधी मिळाला. २) ज्यांच्याकडून सलग दोन लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पराभव झाला व बहुसंख्य महापालिका निवडणुकीतही पराभव झाला, तेच आता एकमेकांचे कट्टर शत्रू झाल्याचे फायदे आगामी निवडणुकीत दिसतील कारण यांची युती अबाधित आहे. पुढील निवडणूक भाजप वि. सेना वि. कॉंग्रेस-राष्ट्रवादी युती अशी होईल ज्यात सर्वाधिक जागा या युतीला मिळतील हे उघड आहे. ३) दोन प्रतिस्पर्ध्यांपैकी एक म्हणजे सेना जवळपास संपली. ४) ३१ महिन्यातील सर्व अपयशाचे खापर सेनेवर फुटणार. हे नामानिराळे राहणार. ५) जरी भाजपला सत्ता मिळाली तरी सेनेचा फुटीर गट, बच्चू कडूची गुर्मी, कायदेशीर अडथळे यामुळे या सरकारची वाटचाल अवघड आहे.
  • Log in or register to post comments
T
Trump गुरुवार, 06/30/2022 - 06:26 नवीन
४) ३१ महिन्यातील सर्व अपयशाचे खापर सेनेवर फुटणार. हे नामानिराळे राहणार.
लोक विसरतात लगेच. तसेही सेना भावनेचे राजकारण करते.
५) जरी भाजपला सत्ता मिळाली तरी सेनेचा फुटीर गट, बच्चू कडूची गुर्मी, कायदेशीर अडथळे यामुळे या सरकारची वाटचाल अवघड आहे.
+१
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 06/29/2022 - 20:19 नवीन
मला वाटते भाजपाचा दीर्घकालीन फायदा झालाय. मतदान टक्केवारी खूप सुधारणार आहे. त्याचे पहिले प्रत्यंतर महानगरपालीकांत येण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे राकॉं + कॉ. यांच्या एकत्रीत मतदान टक्केवारीच्या पुढे भाजप जाते का ते पहायचंय. तसे झाले तरच लोकसभेसारखे यश विधानसभेत मिळेल. शरद पवारांनी भाजपाला रान मोकळे करून दिलंय. या अगोदर समाजवादी, प्रजा समाजवादी, कम्युनिस्ट, शेकाप यांना संपवलं. यांना संपवण भाजप किंवा जनसंघाला कधीच शक्य झालं नसतं. शरद पवारांनी भाजपाचं खूप मोठ्ठं काम करून ठेवलंय. असो.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 06/29/2022 - 20:42 नवीन
स्वबळावर भाजपची सर्वाधिक टक्केवारी २८.५% होती. कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडे एकत्रित किमान ३०% मते आहेत. बहुसंख्य मराठा मतदारांना ब्राह्मण मुख्यमंत्री नको आहे. ते आपोआपच राष्ट्रवादीलाच मत देणार. त्यासाठी भाजपला इतर मागासवर्गीय मतदारांना चुचकारावे लागेल. ब्राह्मणांची ३-४% मते सुद्धा महत्त्वाची ठरतील. दुर्दैवाने शेखचिल्लीप्रमाणे फडणवीसांनी भाजप समर्थक असलेल्या इतर मागासवर्गीय व ब्राह्मण मतदारांनाच दुखावून ठेवले व मराठा मतांच्या मागे गेले. परीणामी २०१९ मध्ये सत्ता गेली. युती असल्याने फार मोठा पराभव झाला नाही. स्वबळावर लढले असते तर खूप कमी जागा जिंकल्या असत्या. अजूनही त्यांनी आपली कार्यपद्धती सुधारलेली नाही. याचा अजून जोरदार फटका आगामी निवडणुकीत बसेल. असो. त्यांना मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 06/30/2022 - 07:13 नवीन
शब्दा शब्दाशी सहमत.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे गुरुवार, 06/30/2022 - 07:59 नवीन
बहुसंख्य मराठा मतदारांना ब्राह्मण मुख्यमंत्री नको आहे गेल्या दोन निवडणुकीत भाजपा सगळ्यात मोठा पक्ष असूनही बहुसंख्य मराठा मतदारांना ब्राम्हण मुख्यमंत्री कसा काय नको? २०१९ ला सेना भाजप युती आली तर फडनविसच मुख्यमंत्री होणार हे माहिती असूनही दोघांचे मिळून 162 आमदार आले. ह्यात बहुसंख्य मराठा मतदारांना ब्राम्हण मुख्यमंत्री नको असता तर दोघांचे 162 आमदार निवडून तरी आले असते का.?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 06/30/2022 - 10:45 नवीन
२०१४ मध्ये भाजपने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता. त्यामुळे फडणवीस, खडसे, मुंडे असा कोणताही चेहरा मत देताना मतदारांसमोर नव्हता. २०१७ ते २०१८ या काळात फडणवीसांनी मराठा जातीवर सवलतींच वर्षाव केला. सारथी ही संस्था स्थापन करून त्याद्वारे मराठा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, परदेशी शिकायला जाणाऱ्या मराठ्यांना मोठी आर्थिक मदत व शिष्यवृत्ती, वसतिगृहे अशा अनेक गोष्टी दिल्या. मागील वर्षी मी एका मराठी वृत्तपत्रात वाचले होते की सारथीने पहिल्या २ वर्षात १३५० कोटी रुपये शिष्यवृत्ती, आर्थिक मदत इ. साठी दिले. यावर कळस चढविला तो नोव्हेंबर २०१८ मध्ये मराठ्यांना तब्बल १६% राखीव जागा दिल्या. २०१४ विधानसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर २८.५% व सेनेला १८.२५% मते होती (एकूण ४६.७५%). २०१९मध्ये युती असूनही व मराठ्यांना अनेक सवलती देऊनही भाजपला २५.७५% व सेनेला १६.२५% (एकूण ४२%) मते मिळाली. म्हणजे एकूण ४.७५% मते घटली व त्यातून दोघांच्या एकत्रित २५ जागा कमी झाल्या. आता फडणवीस नको म्हणून वगेच सर्व मराठा भाजपविरोधात मत देतात असे नाही. जेथे जेथे भाजपचा मराठा उमेदवार असतो तेथे तेथे तेथील मराठा त्याला मत देतातच. पण जेथे भाजपकडून मराठा उमेदवार नसतो तेथे असे झालेले दिसत नाही.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे गुरुवार, 06/30/2022 - 12:07 नवीन
2014 साली भाजपाने 280 च्या आसपास जागा लढवल्या असतील तर 2019 साली 150, त्यामुळे मतांच्या टक्केवारीत फरक हा असनारच. लोक जाती बघून मतदान करत नाहीत असं काहीही नाही हे सगळ्या जातीत थोड्याफार आहे याला मराठाही अपवाद नाहीत.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 06/30/2022 - 12:52 नवीन
२०१४ मध्ये भाजपने २५२ तर २०१९ मध्ये १६४ जागा लढविल्या होत्या. परंतु २०१९ मध्ये युती असल्याने १६४ मतदारसंघात भाजप + सेना अशी मते होती.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे गुरुवार, 06/30/2022 - 07:59 नवीन
बहुसंख्य मराठा मतदारांना ब्राह्मण मुख्यमंत्री नको आहे गेल्या दोन निवडणुकीत भाजपा सगळ्यात मोठा पक्ष असूनही बहुसंख्य मराठा मतदारांना ब्राम्हण मुख्यमंत्री कसा काय नको? २०१९ ला सेना भाजप युती आली तर फडनविसच मुख्यमंत्री होणार हे माहिती असूनही दोघांचे मिळून 162 आमदार आले. ह्यात बहुसंख्य मराठा मतदारांना ब्राम्हण मुख्यमंत्री नको असता तर दोघांचे 162 आमदार निवडून तरी आले असते का.?
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 06/29/2022 - 20:38 नवीन
"हा एक अद्भुत प्रयोग होता. " कमरेचे सोडुन डोक्याला गुंडाळण्याचा हा अद्भुत प्रयोग होता.काँग्रेसवाले शिवसेनेला ४० वर्षे'जातियवादी' कम्युनल म्हणून हेटाळणी करायचे. तर शिवसेना नेते काँग्रेस्वाल्याना सुडो-सेक्युलर्/अल्पसंख्यांकांचे लांगुलचलन करणारा पक्ष म्हणायचे. "राष्ट्रवादी म्हणजे रिकामे डबडे आहे. पवारांचे योगदान काय?" उद्धव ठाकरे(https://www.youtube.com/watch?v=GjPqJMU2Z88) २०१५ "पवारांचे योगदान वादातीत" संजय राउत्/उद्धव ठाकरे.२०२१ ह्या तिन्ही पक्षांचे निष्ठावान कार्यकर्ते गेल्या अडीच वर्षात आपापल्या पक्षापासुन दुरावले नसतील तर नवल. त्याचीच परिणती शेवटी एकनाथ शिंदे ह्यांच्या बंडात दिसली.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Wed, 06/29/2022 - 20:46 नवीन
ह्या तिन्ही पक्षांचे निष्ठावान कार्यकर्ते गेल्या अडीच वर्षात आपापल्या पक्षापासुन दुरावले नसतील तर नवल. त्याचीच परिणती शेवटी एकनाथ शिंदे ह्यांच्या बंडात दिसली. सहमत, पण काही लोक दोष फडणवीसांनाच देतायत. मुळात मविआ टिकवण्याची जबाबदारी काही फडणवीसांची नव्हती.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 06/29/2022 - 20:48 नवीन
कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे कोणी कार्यकर्ते आपल्या पक्षापासून दुरावलेत असे दिसते नाही.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 06/29/2022 - 20:53 नवीन
सेनेचे ही नैही. २०१९ वेळी भाजपला पाठींबा देऊ नका म्हणून शिवसैनिकांनी ट्विटर मोहीम चालवली होती जिला प्रचंड प्रमाणात यश आले होते.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 06/30/2022 - 07:15 नवीन
सहमत. सर्वात जास्त कार्यकर्ते भाजपचे दुरावलेत. १२२ चे १०५ झाले. भाजपची अधोगती अशीच चालू राहनार.
  • Log in or register to post comments
T
Trump गुरुवार, 06/30/2022 - 06:29 नवीन
ह्या तिन्ही पक्षांचे निष्ठावान कार्यकर्ते गेल्या अडीच वर्षात आपापल्या पक्षापासुन दुरावले नसतील तर नवल. त्याचीच परिणती शेवटी एकनाथ शिंदे ह्यांच्या बंडात दिसली.
शिवसेना आणि काँग्रेसचे नक्कीच दुरावले आहेत. राकॉचे जोपर्यंत फायदा आहे तो पर्यंत दुरावत नाहीत, मला तर राकॉ म्हणजे फायद्यासाठी एकत्र आलेली टोळी / कंपनी वाटते.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 06/30/2022 - 07:05 नवीन
शाहु फूले आंबेडकरांची विचारधारा भाजप जोपासतेय का?
  • Log in or register to post comments
स
सुक्या गुरुवार, 06/30/2022 - 07:42 नवीन
शाहु फूले आंबेडकरांची विचारधारा म्हणजे नक्की काय हो? जरा उलगडुन सांगता का?
  • Log in or register to post comments
ट
टीपीके गुरुवार, 06/30/2022 - 16:20 नवीन
नाही मिळणार याचे उत्तर कधी. कारण जातीयवाद, द्वेष याशिवाय काहीच विचारधारा नाहीये
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 06/30/2022 - 16:22 नवीन
असं फक्त भाजपवाल्यांना वाटतं.
  • Log in or register to post comments
ट
टीपीके गुरुवार, 06/30/2022 - 16:32 नवीन
पण सांगा ना नक्की काय आहे विचारधारा
  • Log in or register to post comments
स
सुक्या गुरुवार, 06/30/2022 - 18:17 नवीन
त्यांना त्यातले काहीही माहीती नाही हे मला चांगले माहीत आहे. लोक उगाच आपल्याला जास्त कळतं हे दाखवण्यासाठी असले शब्द फेकत असतात. :-)
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 06/30/2022 - 18:22 नवीन
संघ समजून घेण्यासाठी संघात या तसे ही विचारधारा समजून घ्यायला राष्ट्रवादीत या . :)
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 06/30/2022 - 18:50 नवीन
हा हा हा हा राष्ट्रवादी मध्ये या! त्यांची तरी "खा आणि खाऊ द्या" सोडून कुठली विचारसरणी आहे
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 06/30/2022 - 18:58 नवीन
त्यांची तरी "खा आणि खाऊ द्या" सोडून कुठली विचारसरणी आहे अशी विचारसरणी असती तर पहाटेच्या शपथविधीला मोशांना हिरवा कंदील दिला असता का?
  • Log in or register to post comments
ट
टीपीके गुरुवार, 06/30/2022 - 19:47 नवीन
नाही पण विचारधारा समजावा ना. की आपण दोघं भाऊ भाऊ महाराष्ट्र आणि देश लुटून खाऊ? डोंबलाचे पुरोगामी. फक्त स्वार्थीच राष्ट्रवादी बरोबर जाऊ शकतात. त्यांच्याकडे खाणे हीच एक विचारधारा आहे. नुसते फुले आंबेडकर आणि शाहूंचे नाव. म्हणजे काय विचारले की गप्प. महाराष्ट्राला लागलेली कीड. अणि म्हणे महाराष्ट्र वाचवला यांनी. जोक ऑफ द सेंच्युरी. बाळासाहेबांची पूर्ण शिवसेना संपवली यांनी. राऊत पण यांच्याच पे रोल वर. थोडा जरी जमीर जिंदा असेल तर कृपया चुकीच्या गोष्टींचे समर्थन करू नका. अणि दुसरे चुकले म्हणून तुमच्या चुका बरोबर नाही होत त्या मुळे त्या पद्धतीचे प्रतिसाद सोडा. असो तुमचे वय बघून आत्ता तरी तुम्हाला हा सल्ला कळेल/पटेल असे वाटत नाही, पण तरीही एक प्रयत्न. उगाच याला प्रतिसाद देऊन मिपाचे संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नका. या पुढे माझ्या कडून उप प्रतिसाद नाही.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 06/30/2022 - 20:02 नवीन
फक्त स्वार्थीच राष्ट्रवादी बरोबर जाऊ शकतात म्हणजे अजित पवारांबरोबर शपथ घेनारे फडणवीस स्वार्थी का? महाराष्ट्राला लागलेली कीड कीड आहे तर मग मोदी पवारांना गुरू का मानतात?
  • Log in or register to post comments
ट
टीपीके गुरुवार, 06/30/2022 - 20:15 नवीन
तुम्हाला खरंच कळतं नाही की कळूनही न कळल्यासरखे करताय? विचारधारा सांगा, उगाच इकडच्या तिकडच्या गप्पा नको
  • Log in or register to post comments
ट
टीपीके गुरुवार, 06/30/2022 - 20:18 नवीन
अणि बिजेपी हलकट, नालायक म्हणून राष्ट्रवादी अणि काका चांगले होत नाहीत. उलट गुरू म्हणजे अनेक पटींनी जास्त ... (पुढचे समजून घ्या नाहीतर माझी चितळे नाहीतर कन्हैया होईल)
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 06/29/2022 - 20:52 नवीन
ह्या सर्वात एकनाथ शिंदे ह्यांना काय मिळालं हा मोठा प्रश्न आहे. त्यांना सेनेत आज ना ऊद्या मुख्यमंत्रीपद मिळालंच असतं ईतकी ताकद त्यांच्यात होती. २०१९ ला ठाकरेंना राज्यपालांना पत्र देखील पाठवलं होतं पण पवारांच्या आग्रहामुळे ठाकरेंना मामूपद स्विकारलं. आता फडणवीसना पाठींबा देऊन फडणवीस त्यांना मुख्यमंत्रीपद कधीच देनार नाहीत. पैसा मिळाला असेल तर तो त्याना सेनेत राहूनही प्रचंड प्रमाणात मिळालाच असता. मूलाची केंद्रात सोय लावावी म्हणून हे केलं असेल तर ते ही किती टिकेल?? ऊद्या सेना-भाजप झालं गेलं विसरून पुन्हा एकत्र आले तर शिंदेंच्या मुलाला सेना मंत्रीपदावर राहू देनारच नाही ही काळ्या दगडावरची रेख आहे. किरीट सोमय्यांनी सेनेला अंगावर घेऊन अशीच खासदारकी गमावून घेतली. बाकीचे लोक चुपचाप केंद्रात मंत्रीपदं घेऊन मजा करताहेत. तेच सेनेत राहूनही श्रिकांत शिंदेना मंत्रीपद मिळाले असते. बाकी हिंदूत्वासाठी म्हणून बाहेर पडलो असं शिंदे कितीही सांगत असले तरी २०१९ चा भाषणांत फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही हे तो स्वच:च सांगत होते. ऊद्या राजकारनात शिंदे टिकतीलही पण त्यांच्या बरोबर फुटलेले आमदार संपतील. शिवसेना ऊद्या पुन्हा जोमाने ऊभा राहील पण एकनाथ शिंदेंना स्वत:चं जे राजकीय नूकसान करून घेतलंय ते न भरून येनारं आहे.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 06/30/2022 - 15:30 नवीन
हा प्रश्न मा कालच विचारला होता. ह्याचं ऊत्तर आत्ता मिळालं. स्वतचा मुख्यमंत्री पाडून दुसर्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवावा ईतके कच्चे खेळाडू शिंदे नक्कीच नाहीत. भाजपचे सगळे चाणक्य डोकं आपटत असताल ईतका भारी गेम खेळून त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवलं. शिंदेशाही ला नमन. महादजी शिंदेंनंतर महाराष्ट्रात दुसरा कुणी शिंदे असेल तर हाच.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Wed, 06/29/2022 - 21:06 नवीन
आदित्य ठाकरेचा सर्वात जास्त फायदा झाला आहे. संघटना विदाऊट शिलेदार अशी आयतीच शिवसेना त्यांच्या पदरी पडली आहे. सोनीया गांधी काँग्रेसला राहुल गांधींच्या पाठीशी फार काहि जोमाने उभी करु शकल्या नाहि. उद्धव ठाकरेंना बराच स्कोप आहे आदित्यला सेटल करुन द्यायला. भाजपचा फायदा झालाय कारण शिवसेनेचा लचका तोडला गेला आहे. तुर्तास तरी नव्याने बांधणी होणार्‍या सेनेशी लढणं सोपं आहे. राष्ट्रवादी फायद्यात आहे. २०२४ च्या निवडणुका चारही पक्ष वेगवेगळे लढतील. भाजपला हे गणीत जुळ्वुन आणावच लागेल. त्याकरता आता कदाचीत पवार फॅमिली आणि काँग्रेस नेत्यांच्या भोवती अदृष्य फास आवळले जातील. भाजपला बहुमत नाहि मिळालं तर अजीत दादा राष्ट्रवादीचा फुटीर गट घेऊन बाहेर पडण्याचा प्रयोग परत एकदा करतील आणि यंदा तो सक्सेसफुल फोईल. वैयक्तीक तोटा झालाच असेल तर तो शरद पवारांचा झाला आहे. मविआ सरकार नीट ५ वर्षं चालवणं (आणि कंपल्सरी झालच तर त्या नंतर निवृत्त होणं) हे पवारांच्या दृष्टीने आवष्यक होतं. पण पवारांचा राजकीय इनींगचा क्लायमेक्स फडणवीसांच्या डावपेचाने चितपट होणारा दिसतोय.. अर्थात, पवार इतक्यात हत्यार खाली ठेवणार नाहित. फदणवीसांचा वैयक्तीक फायदा झाला आहे. अतिप्रचंड म्हणावा असा मुत्सद्दी विजय मिळाला त्यांना. राज्यात देवेंद्रला स्पर्धा नाहि, आणि केंद्रात त्याचे पाठीराखे त्याच्यावर खुष असावेत अशी परिस्थिती. जनतेचा फायदा... तसाही तो गौण विषय आहे राजकारण्यांच्या दृष्टीने :(
  • Log in or register to post comments
T
Trump गुरुवार, 06/30/2022 - 06:30 नवीन
आदित्य ठाकरेचा सर्वात जास्त फायदा झाला आहे. संघटना विदाऊट शिलेदार अशी आयतीच शिवसेना त्यांच्या पदरी पडली आहे. सोनीया गांधी काँग्रेसला राहुल गांधींच्या पाठीशी फार काहि जोमाने उभी करु शकल्या नाहि. उद्धव ठाकरेंना बराच स्कोप आहे आदित्यला सेटल करुन द्यायला.
+१
वैयक्तीक तोटा झालाच असेल तर तो शरद पवारांचा झाला आहे.
बहुतेक शेवटाच खेळ झाला हा त्यांचा
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 06/29/2022 - 21:36 नवीन
अर्धा अजून बाकी आहे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 06/29/2022 - 21:41 नवीन
अर्धा अजून बाकी आहे.
  • Log in or register to post comments
ह
हणमंतअण्णा शंक… Wed, 06/29/2022 - 22:36 नवीन
शिवसैनिक आदित्य ठाकर्‍यांना कितपत साथ देतील कोणास ठाऊक. उद्धव असेपर्यंत सेना टिकून राहील. आताचे बरेच बंडखोर आमदार एकतर भाजपमधून निवडणूक लढवतील किंवा शिंदेसेनेकडून. जसे मनसेचे झाले तसे, शिवसेना, शिंदेसेना क्रमाक्रमाने संपत जातील. भाजप संपूर्ण बहुमतात येणार. भाजपकडे मात्र दुसर्‍या फळीचे नेते नाहीत. विखेपाटलांसारखे लोक मनाने कधीच कोणत्याच पक्षात नसतात. भाजप एकतर यांना संपवून टाकेल किंवा चंद्रकांत पाटलांसारखे अजिबात जनाधार नसलेले पपेट नेमून सत्ता दोन तीन लोकांकडेच राहील याची पुरेपूर काळजी घेणार. देवेंद्र यांच्याकडे अजून साडेसात वर्षे आहेत. केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र नंतर, केंद्रात देवेंद्र/शहा/योगी अशा चर्चा होतील. देवेंद्रने अजून मुत्सद्दीपणा दाखवला तर पहिला मराठी पंतप्रधान देवेंद्र होण्याची शक्यता आहे. देवेंद्रचे खरे शत्रू आता शहा आहेत.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 06/30/2022 - 04:10 नवीन
देवेंद्र यांच्याकडे अजून साडेसात वर्षे आहेत. फार घाई करू नका. ही उर्वरीत सव्वादोन वर्षे तरी पूर्ण करू देत. मग पुढील पाच वर्षांविषयी बोलू.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 06/30/2022 - 07:17 नवीन
फार घाई करू नका. ही उर्वरीत सव्वादोन वर्षे तरी पूर्ण करू देत. मग पुढील पाच वर्षांविषयी बोलू. काही झालं तरी पाच वर्षांनी काॅंग्रेस-राष्ट्रवादीचेच सरकार येनार आहे. सेना भाजप युती होनार नाही. झाली तरी सेनेचे लोक भाजपला आज्बात मतदान करनार नाहीत.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ गुरुवार, 06/30/2022 - 12:43 नवीन
सेना भवन व मातोश्रीच्या बाहेर काल पासुन शुकशुकाट आहे. जिल्हा प्रमुख, गट प्रमुख गटा गटात येऊन राजिनामे देत आहेत. सर्वच लोक एकनाथ शिंदेंच्या मागे पाय घट्ट रोऊन ऊभे ठाकलेले आहेत. अश्याने शिवसेनेतच नविन प्रमुख उदयास येत आहे.
  • Log in or register to post comments
य
यश राज Wed, 06/29/2022 - 22:37 नवीन
सगळ्यात जास्त तोटा शिवसेनेचा झालाय .. नको त्यांच्या नादी लागून भरवशाची माणसे हातची गेली. तेल ही गेले तूप ही गेले आणि हाती राहिलं धुपाटणे अशी परिस्थिती झालीय. अगदी पूर्ण सेनेचा लचका तोडला गेलाय. माणसं ओळखण्यात कमी पडले असेच म्हणावे लागेल. सगळं गमावलच गमावलं. सत्तालालसे साठी पक्ष गमावण्याची नौबत आलीय. दुसरा तोटा काकांचा झालाय - नाही पार्टी शाबूत आहे त्यांची पण त्यांनी स्वतःची(स्वतः) बनवलेली राजनीतिक चाणक्य ही पदवी किती फोल आहे ते जनतेला कळून चुकलं. त्यांच्या ही वरचढ कोणीतरी आहे हे ही जनतेला कळलं. अजून एक तोटा म्हणजे मुलीचं करियर मार्गी लावण्यासाठी २०१९ मध्ये मोदी शहांशी बोलणी चालवलेली , तिथे डाळ शिजली नाही म्हणून महाराष्ट्रात मविआ चा प्रयोग व तिथे मुख्यमंत्रीपदाची चाचपणी. तो ही घास आता तोंडातून हिसकवला गेला आहे. थोडक्यात बाबाही गेला आणि दशम्याही. काँग्रेसचा फार काही तोटा झाला नाही. मुळात ते सत्तेत असून नसल्यासारखे. त्यामुळे त्यांना जास्त फरक पडणार नाही. फायदा झालाय तो भाजपचा.. जनाधार त्यांच्या व सेनेच्या युतीचा बाजूला होताच पण त्या जनाधराच्या विरूद्ध सरकार बनवून सेनेने जी घोडचूक केली त्यामुळे जनतेच्या मनात तसेच पर्यायाने सेनेच्या आमदारांमध्ये जी खदखद होती. त्याचा पुरेपूर उपयोग भाजपने करून घेतला व महाराष्ट्राच्या जनतेवर जबरदस्तीने लादलेले सरकार उतरवले. याचा उपयोग २०२४ च्या निवडणुकीत होईलच. अजून एक फायदा झालाय तो एकनाथ शिंदे यांचा. त्यांच्या बंडानंतर गेल्या काही दिवसांपासून बातम्यांमध्ये लक्ष दिले तर कळून येईल की त्यांच्या मागे सेनेतले तळा गाळातले कार्यकर्ते मोठ्या संख्येने उभे राहायला सुरुवात झालिये. आज जी लोकं सेनेमध्ये आहेत ते उद्या शिंदेकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 06/30/2022 - 07:18 नवीन
सेनेचा काहीही तोटा झालेला नाही. ऊलट पक्षातील घाण गेली. आता दुसर्या फळीतील ताज्या दमाचे शिवसैनिक वर येतील.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 06/30/2022 - 07:52 नवीन
पक्षातील घाण गेली. म्हणेज इतकी वर्षे पक्ष घाणीने भरलेला होता? आणि ते तुम्हाला समजलेच नाही? इतकी वर्षे याच माणसांबरोबर काढल्यावर त्यांना घाण म्हणताय? ज्यांनी तुमच्या खांद्याला खांदा लावून कित्येक वर्षे काम केले त्यांना डुक्कर, प्रेते म्हणणे हे सभ्य संस्कृतीत बसत नाही. तुम्ही सुद्धा संजय राऊत यांचाच वारसा चालवताय, ज्यांना याच माणसांनी निवडून राज्यसभेवर पाठवले आहे. कृतघ्नतेचा कळस आहे.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 06/30/2022 - 09:09 नवीन
म्हणेज इतकी वर्षे पक्ष घाणीने भरलेला होता? आणि ते तुम्हाला समजलेच नाही? हो. फितूर हा फिकूरी करे पर्यंत आपलाच असतो. इतकी वर्षे याच माणसांबरोबर काढल्यावर त्यांना घाण म्हणताय? सेनेच्या जिवावर वाढून सेनेचाच मुख्यमंत्री खाली खेचनार्यांना हाच शब्द योग्य. ऊद्या भाजपच्या जिवावर वाढलेल्याने भाजपला खाली खेचले तरीही मी हेच म्हणेन. ज्यांनी तुमच्या खांद्याला खांदा लावून कित्येक वर्षे काम केले त्यांना डुक्कर, प्रेते म्हणणे हे सभ्य संस्कृतीत बसत नाही. मला तरी आदित्य ठाकरेंच्या त्या वाक्यात काहीही तुकीचे वाटले नाही. तुम्ही सुद्धा संजय राऊत यांचाच वारसा चालवताय, ज्यांना याच माणसांनी निवडून राज्यसभेवर पाठवले आहे. त्यांना सेनेने निवडूण आणले होते. राऊत हे सेनेचे ऊमेदवार होते. त्यांना मतदान करून आमदारांनी ऊपकार केलेले नाहीत. कृतघ्नतेचा कळस आहे. सहमत. सेनेच्या नावावर मते मागून, सेनेच्या जिवावर मोठं होऊन सेनेच्याय मुख्यमंत्र्या बरोबर गद्दारी करणे हा कृतघ्णपनाचा कळसच आहे.
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु गुरुवार, 06/30/2022 - 08:41 नवीन
आता दुसर्या फळीतील ताज्या दमाचे शिवसैनिक वर येतील.
मागे ही मी हेच म्हणालो होतो.भाजपबद्दल ममत्व नाही व शिवसेनेबद्दल शत्रुत्व नाही.पण जुन्याची जागा नव्याने घेतली पाहिजे व बदल होत राहिले पाहिजेत. सेनेसाठी ही पुन्हा पक्षबांधणीसाठी चांगली संधी ठरु शकते. (ब्लेसिंग्ज इन डिज्गाईज.) अर्थात मनसे नेतृत्वाप्रमाणे शिवसेनेचे नेतृत्व ही तंगड्या पसरुन बसायला नको.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 06/30/2022 - 09:04 नवीन
सहमत. २०१९ साली राष्ट्रवादीत असेच अनेक नेते जागा अडवून बसले होते. भाजपेयींच्या मुर्खपणामूळे म्हणा किंवा राष्ट्रवादीच्या सुदैवाने ही लोकं भाजपात गेली. राष्ट्रवादीतील दुसर्या फळीतील नेत्यांना ही संधी मिळाली नी त्यांनी जोर लावून निवडणूका लढवल्या. त्यामुळे संपलेल्या राष्ट्रवादीच्या तब्बल ५५ जागा निवडून आल्या. सेनेबरोबर ही असेच होनार. ठाकरे फिरनारे नेते आहेत. आता जबाबदारीतून मोकळेरी झालेत विधान परिषदेचाही राजिनामा दिलाय. महाराष्ट्र पुन्हा पिंजून काढून ते सेनेला नवी ऊभारी देतील. सेनेसाठी ही ईष्टापत्ती ठरनार.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 06/30/2022 - 04:20 नवीन
- फायदा झाला तो काकांचा असे दुर्दैवाने म्हणावे लागते - भाजपला तात्पुरता फायदा दिसत असला तरी "तुटलेली शिवसेना " हा काही फार फायद्याचा भाग होणार नाही - सेनेची इज्जत गेली खरी पण ती मूळ टिकावी असे अनेकांना वाटते , शिंदे गटाचे प्रवक्ते केसरकर यांचं व्यक्तव्यातुन ते दिसते सर्वात मोठा तोटा झाला तो भारतीय लोकशाही हि परिपक्व आहे या समजुतीचा ,, आणि जनेतेचा ( पण जनतेने तो स्वतःवर ओढवून घेतला ,, घराणेशाही वरील पक्ष जोपासू नका हे त्यांना का काळात नाही अजून ! - हे काय विचीत्र नाटक देश/ जगासमोर आले... , सभापतींच नाही एवढे दिवस, कोर्टात काय जावे लागते , पक्षाचं अंतर्गत असे बेबनाव सोडवू शकले जात नाहीत / हि अशी मुंबई-सुरत- गुहाती आणि गोआ जत्रा काय .. सगळंच गोंधळ.. माफ करा पण दुर्दैवाने असे म्हणावे लागते कि भारतीय समाजाने खरी लोकशाही अजून स्वीकरली नाहीये ... याचे हे जिवंत उधारण
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 06/30/2022 - 05:25 नवीन
म्हणजे आता स्थानिक पक्षांतही उपस्थानिक पक्ष निर्माण होणार.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 06/30/2022 - 07:42 नवीन
शिंदे गट कुठेतरी विलीन होनार.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा गुरुवार, 06/30/2022 - 05:32 नवीन
खरी लोकशाही ही कल्पना केवळ कल्पनेतच आहे. वास्तवात कोणत्याही देशात खरी लोकशाही अस्तित्वात नाही. बाकी चालू द्या..
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 06/30/2022 - 06:27 नवीन
अब्राहम लिंकन यांनी लोकशाहीची एक मूलभूत व्याख्या केलेली आहे: https://www.toppr.com/ask/question/give-abraham-lincolns-definition-of-democracy/ परंतु, जगभरातील वास्तव त्याच्या पूर्ण विरुद्ध झालेले दिसते ते असे: Democracy is a government - off the people, far the people & buy the people !!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 6 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 6 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 6 hours ago
  • सुंदर !!
    1 day 6 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 7 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा