मविआचे सरकार गेले. पण नक्की ह्या प्रयोगात जिंकले कोण?
मविआचे सरकार गेले. पण नक्की ह्या प्रयोगात जिंकले कोण?
------
हा एक अद्भुत प्रयोग होता. भले तो भाजपाने शिवसेनाचा विश्वासघात केल्याने झाला असेल, काही शिवसैनिकांना श्री उध्दव ठाकरे मुख्यमंत्री बघायची हौस असेल आणि त्यात बारामतीच्या काकांची भर पडली, त्यामुळे हा प्रयोग झाला असेल.
शिवसेना: (जिंकले) त्यांचा भाजपच्या नाकावर टिच्चुन मुख्यमंत्री झाला. भाजपने शिवसेनेला गृहीत धरु नये हा संदेश गेला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसः (जिंकले) महत्वाची खाती मिळाली. कार्यकर्त्यांची कामे झाल्याने पक्ष वाढला.
कॉंग्रेसः (पराभुत) राकाबरोबर एक दुय्यम भागीदार म्हणुन जागा मिळाली. शिवसेन्यासारख्या पक्षाशी समजोता केल्याने मुस्लिम समाजात वेगळा संदेश गेला.
भाजप: (पराभुत) विनाकारण ३१ महिने सत्तेबाहेर राहवे लागले. शिवसेनेसारखा जुना सहकारी गमावला. आता फोडा-फोडी केलेल्या लोकांना ठेवायचे कोठे हा प्रश्न आहेच.
जनता: (पराभुत) कायम पराभुतच असते.
घराणेशाही वरील पक्ष जोपासू नका हे त्यांना का काळात नाही अजूनसहमत. २०१४ ला भाजपने घराणेशाहीतून आलेल्या देवेंद्र फडणवीसांना मामू केले तरी २०१९ ला भाजपला १०५ जागा मिळाल्या.शकुनी म्हणावे की अपशकुनी ---मला वाटते अपशकुनी म्हणावे. कारण हा माणुस ज्या कोणासोबत जातो त्याचा विनाश होतो.धारावी भेंडीबाजार येथील मुसलमान आता भीतीग्रस्त झालेले असतील. त्यांना खरी भीती भाजपची असे. कारण एका व्यापाऱ्याच्या मते शिवसेनेच्या हिंदुत्वाला ते कधीच घाबरत नसत. पैसे दिले कि काम होत असे. परंतु भाजपचे बरेचसे लोक सडे फटिंग असल्याने सहजासहजी पैशाने काम होत नाही.कैच्याकै. भाजप म्हणे हिंदूत्ववादी. भाजपने हिंदूंसैठी काय केले हे आजपर्यंत तुम्हाला सांगता आलेले नाही डाक्टर.आयुष्यभर सतत कारस्थाने करत राहण्याच्या स्वभावामुळे श्री शरद पवार यांच्यावर कोणीही भरवसा ठेवत नाहीबरोबर. म्हणून सेना आणी काॅंग्रेस ने एकत्र येऊन पवरांच्या भरवस्यावर महाविकाय आघाडी ऊभी केली. कारस्थानं करनार्यांना १०५ असूनही घरी बसावे लागले.खुद्द त्यांच्या पक्षाच्या लोकांचा आता विश्वास राहिलेला नाही.हे असं फक्त भाजपच्या लोकांना वाटतं.वृध्दापकाळात आपल्या पक्षाची वाताहत झाल्याचे सुद्धा पाहणे त्यांच्या नशिबी येणार आहे.वाताहत होऊनहा ८० व्या वर्षी ५५ आमदार जिंकवून १०५ घरी बसवून महाराष्ट्र वाचवला होता त्यांनी.असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ ही म्हण सार्थ आहेही म्हण सेनेसाठी सार्थ आहे. ३५ वर्षे ज्यांच्याशी संगं केला त्यांनीच ईडी सीबीआय लावून सेनेचा प्राण घ्यायचा प्रयत्न केला.म्हणे महाराष्ट्र वाचवला होता.. स्वतःच्या २ मंत्र्यांना वाचवू न शकणारे ते.त्यांना परस्पर क्लिनचीट दिली नाही.घरी बसलेले जोमाने बाहेर आलेतजोमाने वगैरे नाही ईडीचा धाक दाखवून फोडफोडी करून गुजरात आसाम ला आमदार लपवून मग आलेत.घराणेशाही असलेले पक्ष फार तर दोन किंवा तीन पिढ्या चालतील त्यानंतर पडझड, पीछेहाट अटळ आहे.असहमत. मूघलांच्या सात च्या सात पिढ्यांनी राज्य केलं. औरंगजेबाने आपल्या मूलांना राज्यकारभारापासून दूर ठेवलं म्हणून मूघल संपले. गांधी घराण्यात मोतीलाल, जवाहर, ईंदीरा (महापराक्रमी), संजय-राजीव हे चांगलेच नेते होते. एक राहूल गांधींवर फक्त गाडी अडली पुढे प्ढी नाही म्हणून. ठाकरे घराण्यात प्रबोधनकार, बाळासाहेब, ऊध्दव, आदीत्य सर्वच कर्तबगार आहेत. फडणवीस घराण्यात गंगाधर आमदार, शोभाकाकू मंत्री, देवेंद्र मूख्यमंत्री. त्यामुळे तीसरी पिढी दुबळी वगैरे ह्या सर्व कंड्या आहेत.मागील आडिच वर्षात का नाही केले२०१४ ते २०१९ का नाही केले?सेनेचा मतदार त्यांच्या पक्षाकडे वळणार.भाजपचे सध्याचे गलिच्छ राजकारण पाहीले तर भाजपचा ही वळनार.सेना म्हणजेच महाराष्ट्र