आतापर्यंत हाती आलेले कल बहुसंख्य मतदानोत्तर सर्वेक्षणाच्या अंदाजाशी सुसंगत आहेत. कोरोना निर्बंधामुळे मतमोजणी नेहमीपेक्षा हळू होत आहे. त्यामुळे दुपारी १ वाजल्यानंतरच चित्र नक्की होईल.
बंगालात भाजपला 38 टक्के मते मिळाली.
उप्र सारखी चौरंगी निवडणूक झाली असती तर 40 टक्के मते पुरतात 200 सीट मिळवायला..
यावेळेस थेट लढत झाली, त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा चेहरा नसल्याचा फटका बसला असे माझे मत आहे.
तरी वरील बऱ्याच ठिकाणी ३ चे ७७ केले कळाले. पण हे सगळे भाजपाचे लोक आहेत कि फोडून आपल्या पक्षात ओढलेले निवडून येणारे इतर पक्षातील तेथील नेते आहेत?
भाजपने तृणमूलमधून आलेल्या एकूण १४८ जणांना उमेदवारी दिली होती (त्यात १२ विद्यमान आमदारांचा समावेश होता). त्यातील फक्त ६ जिंकले व उर्वरीत पडले. म्हणजे ७७ आमदारांमध्ये ६ आमदार आयाराम आहेत.
https://www.google.com/amp/s/theprint.in/politics/trinamool-turncoats-fail-bjp-in-bengal-polls-suvendu-mukul-roy-the-few-face-savers/650790/%3famp
@डॉ. सुबोध खरे..(प्रतिसाद निमूळता झाल्याने येथे देतोय )
-----
आजही आपल्यासारखे मुळमुळीत हिंदू मोठ्या संख्येने असल्याने ७० वर्षे झाली तरी मूळ घटनेत लिहिलेला "समान नागरी कायदा" अस्तित्वात येऊ शकलेला नाही असे मी कठोर शब्दात लिहितो आहे.
आपल्या सारखे म्हणजे? दुसऱ्याला मुळमुळीत म्हणल्याने तुम्ही जहाल होत नाही..
सोशल मिडीया वर जहाल लिहिने मला आवडत नाहि..
घटने मध्ये हे लिहिले आहे हे मला माहित नाही..
पण समान नागरी कायद्याचा मी पुरस्कर्ता आहे..
अटलबिहारी वाजपेयी यांच्या जाहीर नाम्या मध्ये हा मुद्दा होता..
मग निवडून आल्यावर काय केले..
बर तेंव्हा एकहाती सत्त्ता नव्हती आता आहे ना? मग काय झालेय?
मग याविरुद्ध तुम्ही जहाल नाही?
का फक्त त्यातल्या त्यात आपण मानतो ते सरकार आहे म्हणुन पर्याय नाही म्हणणे हे म्हणजे मुळमुळीत विचार नाहीत का?
अरे काय केले पाहिजे हे मला विचार ण्या पेक्षा ज्यांना निवडून दिलेय त्यांना विचारा ना..
आणि मुस्लिम गट माणसे यात फरक म्हणायचा आणि समान नागरी कायद्याचा पुरस्कार करायचा हा ढोंगी पणा आहे..
उलट माझ्या सारख्या व्यक्तीने समान नागरी कायदा मागितला तर योग्य आहे कारण मी सर्वांना समान मानतो..
काँग्रेस ने काय केले.. Bjp काय करतेय असले उत्तरे देत नाही..
असो..
आताशा मला राजकीय दृष्ट्या सोयीचे संवाद करायचा फार कंटाळा आला आहे. सडे तोड सत्य बोलल्यामुळे माणसे दुखावली गेली तरी आता मला त्याची फारशी पर्वा उरलेली नाही.
तुम्ही सडेतोड बोलता कायम, त्यात दुमत नाही.. पण आता मला पर्वा नाही हि patti कशाला? तुम्ही कायम पर्वा करत नाहीच..
हे चुकीचे आहे मला म्हणायचे नाही..
माझ्या दृष्टीने सत्य म्हणजे जे मला पट्ते तेच)
प्रत्येक जनाला तसे वाटते.. त्यामुळे संवाद करताना दुसऱ्याच्या विचारांचा आदर करावा.. मी करतो तो..
तुम्हाला ते हि गुळमुळीत वाटत असेल...
एक साधा प्रश्न ७७ मध्ये किती भाजपा चे मुळ लोक आहेत..
आणि खरेच मी follow केली नव्हती निवडणूक म्हणुन विचारलेले...
तरी हिंदू एकीकरण, काँग्रेस कशी खालची आणि जातीय कमेंट पाहून..
असल्या मूर्ख जहाल पणा पेक्षा माझे सर्वधर्म समभाव हा मुद्दा मला जास्त योग्य वाटतो..
तुम्हाला तो चुकीचा वाटत असेल वाटुद्या..
पण मानवता वाद.. हा कुठल्या एका धर्माला धरून टिकवता येत नाही..
समान नागरी कायदा तर खुप बेसिक आहे.. मला तर जात पात धर्म नसलेले लोक पहायला आवडले असते.. पण भारतात हे होईल असे मला कधी वाटत नाही...
तुम्ही सडेतोड बोलता कायम, त्यात दुमत नाही.. पण आता मला पर्वा नाही हि patti कशाला? तुम्ही कायम पर्वा करत नाहीच..
हे चुकीचे आहे मला म्हणायचे नाही..
आता मला पर्वा नाही हे वाक्य फार फार महत्वाचे आहे यातुन त्यांची हतबलता ठळक होते आहे. आणी हे घडणे चुकीचे आहे मग सडेतोड बोलणे हा त्यांचा स्वभाव असो की नसो. महत्वाच्या बाबी अशा दुर्लक्षुन तुम्ही तर विपर्यास करत आहात.
तुम्हाला ज्या कारणांसाठी बिजेपी आवडत नाही ती सोडुन इतर अनेक कारणे आहेत ज्यामुळे बी जे पी आज सत्तेत आहे. आणी ती कारणे आत्मसात करायचे सोडून इतर पक्ष वा त्यांचे समर्थक बि जे पी वर आवडत नसणार्या कारणासाठी चिखलफेक करुन जर तुम्ही भाजपाचा निषेध करत असाल तर तुम्ही स्वतः त्या निषेधाला तितकेच पात्र बनता.
संयत आणि तर्कपूर्ण.
दोनदा बहुमताने निवडून आलेल्या सरकारला विचारण्याऐवजी सोशल मीडियावर "आवेशाने" दुसऱ्यांना मूलमुळीत म्हणून "का आला नाही समान नागरी कायदा?" असे गुरकावणे म्हणजे एकदम विनोदी प्रकार.
ते पण ऍक्टिव्हली कधीही सनाका चा विरोध न केलेल्या, उलटे समर्थनच करणाऱ्या माणसाला !
समान नागरी कायदा तर खुप बेसिक आहे.. मला तर जात पात धर्म नसलेले लोक पहायला आवडले असते.. पण भारतात हे होईल असे मला कधी वाटत नाही...
राज्यसभेत बहुमत मिळाल्यावर होईल ही कदाचित. पण हे झालं तर भाजपकडूनच होईल. बाकी कोणाकडून नाही.
मी असं म्हणायचं धाडस करतोय कारण;
३७० कलम रद्द होऊ शकेल असे कुणालाही वाटत नव्हते. ३५ए रद्द करणेही अशक्यच वाटत होते.
पण ते ती स्वप्नवत गोष्ट प्रत्यक्षात आलीय. आंतरराष्ट्रीय समुदायाकडून त्याला हरकत घेतली गेली नाहीये. चीन, पाकिस्तान यांना काहीही करता आलेले नाहीये.
तीन तलाख विरूध्द कायदा पास होऊ शकतोय.
सर्वात महत्वाचे म्हणजे असे असूनही मुस्लीम व्होटबँकचे महत्व असलेल्या बंगालमध्ये भाजपाची मतदान टक्केवारी खूपच वाढलीय.
थोडक्यात जोरदार धृवीकरण घडतंय.
समान नागरी कायदा भारतात कधीच होऊ शकणार नाही असे वाटणारी माणसे एका बाजूला आहेत
तर
भाजपाकडून हा कायदा अस्तित्वात येऊ शकतो असे वाटणारी माणसे दुसर्या बाजूला गोळा होताहेत. आणि हे प्रमाण वाढतच चालले आहे.
राज्यसभेत बहुमत मिळाल्यावर होईल ही कदाचित. पण हे झालं तर भाजपकडूनच होईल. बाकी कोणाकडून नाही.
बरोबर, हे झाले तर भाजप कडून होईल असे मला हि वाटते.. काँग्रेस ला हे जमणार नाही...
(तो जाहीरनामा आठवायचे कारण, तो वाचुन मी त्यावेळी भाजपाला वोट दिलेले होते..)
आणि मला समान नागरी कायदा आवडतो.. तो सर्व लोक समान आहे हि माझी भावना आहे..
त्याचे कोणाला काय फायदा.. वगैरे त्यामागे काही माझी भावना नाही..
माझ्या म्हणण्याने..
ब्राह्मण.. मराठा.. माळी.. सुतार..महार.. मुसलमान .. हिंदू.. बौद्ध
असे सगळे एक समान नागरी कायद्यात असावेत...
कोणी खालचे नाही कोणी वरचे नाही...यात समानता असावी..
झाले गेले वाईट होते पण प्लिज माणुस म्हणुन एक राहू असे माझे म्हणणे आहे...
औरंगजेबाने आणि मुघलांनी आक्रमण केले.. अनेक दुष्कर्म केले ते चुकीचेच.. पण म्हणुन आता अजूनही इतर धर्मीय सर्व सरसकट लोकांना जर आपण गुन्हेगार म्हणुन पाहत असेल तर अवघड आहे..
मग आपण कसली समान नागरी कायड्याची पाठराखन करतोय..?
आधी आपल्या मनात समानता आहे काय?
येथे कुठेही मी गुन्हेगार लोकांचे समर्थन करत नाही..
समजा उद्या मुस्लिम गुन्हेगार म्हणुन भारता बाहेर लावले.. किंवा हिटलर नीती वापरून मारून टाकले..
मग पुढे काय?
मग दलित विरुद्ध उच्च जातीय दरी आखून युद्ध करायची आहेत काय?
म्हणजे धर्म झाले कि जाती वर यायचे काय?
आणि याला उत्तर एकच आहे.. सर्व जण माणसे आहेत.. त्यात जातीय आणि धार्मिक फुट नको..
असो
धृवीकरण
ध्रुवीकारण झाले तर हरकत नाही.. पण काय चांगले काय वाईट यावर व्हावे.. विचार सारखे नसतात सगळ्यांचे..
पण धर्मा वरून जातीवरून ते होत असेल तर अवघड आहे..
बरं उद्या फक्त समान नागरी कायदा पहिला आणला आणि त्याच वेळेस आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य विषयक सगळ्यात भारताचे पार कंबरडे मोडणार असेल तर priority wise सगळे नीट करू पाहणाऱ्या बद्दल मत चांगले असणे कधी हि चांगले..
कधी काही गोष्टी करण्यास वेळ लागतो.. ते मी मान्य करतो...
एक समान नागरी कायदा आणू शकले नाहीत म्हणुन अटल जी असो वा मोदी त्यामुळे त्यांचा विरोध नाहीच..
पण ज्या पद्धतीने आता राजकारण चालू आहे, ते वयक्तिक मला चुकीचे वाटते..
अर्थ विभागात तर सपशेल fail आहे bjp..
मग कोणाला या अश्या कारणा साठी काँग्रेस योग्य वाटत असेल तर ह्या साठी तसे माणनारा माणुस म्हणजे लगेच व्यक्तिपूजा.. घराणेशाही माननारा.. आणि हिंदू विरोधी होत नाही..आणि असे ज्याला वाटते तो माणुस महामूर्ख असावा..
पण हे सांगण्यात तासन तास घालावावे लागत आहे, किती वाईट आहे हे..
जातीय ध्रुवीकरण नेहमी वाईटच...
सरकार जो खर्च करते त्यातील गळती कमीत कमी होऊन, जास्तीत जास्त भाग लाभ कर्त्यांपर्यंत पोहोचावा असे मला वाटते. हे ज्याच्या कार्यकाळात होईल असे मला वाटते, त्याला मी माझे मत देतो.
या अर्थाने मला मोदींंची व महाराष्ट्रात फडणवीसांची राजवट आवडलेली आहे व त्यांना मी मते देतो. कोणत्या प्रकारचे राजकारण करून ते सत्तेत येतात याबद्दल मी जास्त खोलात शिरत नाही कारण त्यातील खर्या बाबी सर्वसामान्यांना कधीच कळत नाहीत. जातीभेद नष्ट करणार्या पक्षाला मतदान करण्याची अपेक्षा बाळगणे, हे मला दिवास्वप्न वाटते.
सरकार जो खर्च करते त्यातील गळती कमीत कमी होऊन, जास्तीत जास्त भाग लाभ कर्त्यांपर्यंत पोहोचावा असे मला वाटते. हे ज्याच्या कार्यकाळात होईल असे मला वाटते, त्याला मी माझे मत देतो.
या अर्थाने मला मोदींंची व महाराष्ट्रात फडणवीसांची राजवट आवडलेली आहे व त्यांना मी मते देतो.
तुमच्या मताचा आदर आहेच..
प्रत्येकाचे मत आणि विचार सारखे नसतात..
वयक्तिक सांगायचे झाले तर मोदी यांचे सरकार मला अपेक्षाभंग वाटते..अनेक गोष्टीत ते अत्यंत fail वाटतात मला..
आता इतरांनी लगेच वाढवू नये कि पर्याय काय आणि काय काय fail आहेत.. ते कसे successfull आहे..
आहेत तर असुद्या.. तुम्ही असेच वोट द्या आणि बहुमताने ते निवडून येऊद्या..
जातीभेद नष्ट करणार्या पक्षाला मतदान करण्याची अपेक्षा बाळगणे, हे मला दिवास्वप्न वाटते.
हो.. पण म्हणुन त्याची पाठराखण करणे चूक आहे हेच माझे म्हणणे आहे...
आणि india deserves this only .. कारण लोकांना त्यांच्याच लायकी प्रमाणे सरकार मिळते...
वयक्तिक सांगायचे झाले तर मोदी यांचे सरकार मला अपेक्षाभंग वाटते..अनेक गोष्टीत ते अत्यंत fail वाटतात मला..
लाभार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त लाभ पोहोचण्याचे प्रयत्न करण्यासाठी, मोदींचे जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांना भरपूर वेळ देऊन झालेला आहे. त्यामानाने मोदींनी गेल्या पाच वर्षात चांगले प्रयत्न केलेले आहेत. असे माझे वैयक्तिक मत आहे. काँग्रेसच्या नंदन निलकेणींना ही असं वाटतं हा हव तर तुम्ही अपवाद समजू शकता. कारण तुमच्याही मतांचा आदर आहे.
कारण लोकांना त्यांच्याच लायकी प्रमाणे सरकार मिळते...
हो म्हणूनच कमी भ्रष्टाचार करणारे सरकार मिळावे यासाठी प्रयत्न करतोय. तसेच अगोदरचे सरकार परत येऊ नये यासाठी प्रयत्न करतोय.
कसला टोला?
ते काय म्हणाले आणि मी काय म्हणालो. ते त्यांना आणि मला माहित.
त्यांच्या वयक्तिक मताला माझा आक्षेप नाहीच..
तुमच्या सारखे मध्ये येऊन जे असे आगीत तेल ओतणारे असतात ना म्हणूनच सोशल मिडीया आणि विशेष करून मिपा पार राजकीय धुराळ्यात गुरुफ़ुटून गेले आहे..
मी उत्तर देणे टाळले होते.. कारण त्यांना तसे वाटत होते कि bjp कमी भ्रष्टाचार करते.. असुद्या प्रत्येकाला सारखे वाटत नसतेच..
खाली लिहितोय...
हिंदू हा प्रश्नच नाहीये..
तुमच्या असल्या निरर्थक उत्तरांमुळेच आजकाल मला येथे रिप्लाय देवूसा वाटत नाही..
हिंदू एकत्र येत आहेत, तर काँग्रेस आणि इतर काय भारताबाहेरील दहशत वादी लोकांनी बनला आहे का?
आणि हो असे उत्तर असेल तर तेच लोक भाजपात घेतल्यास फक्त जात धर्म हाच महत्वाचा मुद्दा असतो का?
सर्व राजकारणी आणि विशेष करून त्यांचे पुरस्करते जोपर्यंत जात धर्म यातून बाहेर येणार नाहीत तोपर्यंत देशाचे भले होईल असे वाटत नाही..
बाकी ३ चे ७७ झाल्याबद्दल अभिनंदन.. भले त्यातील लोक कसेही.. कुठलेही असले तरी ते हिंदू आहे हेच महत्वाचे आहे हे ऐकून छान वाटले..
यावर उपप्रतिसाद देण्याचा मानस नाही... चालुद्या..
हा माझा हे संभाषण चालू झाले तेंव्हाचा पहिला प्रतिसाद..
तरीही विषय हिंदू.. कुराण.. काँग्रेस.. मुस्लिम असले सगळे वाढवून इतके सगळे लिहून भरकटत न्ह्यायाचा आणि शेवटी bjp कसे भ्रस्टाचार मुक्त हे दाखवायचे...
आणि याला शेवटी टोला म्हणायचे?
Bjp भ्रष्टाचार कमी करणारी पार्टी आहे असे म्हणणेच मला चूक वाटते..
उलट आधी काँग्रेस ला शिव्या घालत होतो.. आता ह्यांच्या राजकारणा मुळे आधीचेच जास्त योग्य असे मला वाटते...
असो थांबतो..
ब्राह्मण.. मराठा.. माळी.. सुतार..महार.. मुसलमान .. हिंदू.. बौद्ध
असे सगळे एक समान नागरी कायद्यात असावेत...
कोणी खालचे नाही कोणी वरचे नाही...यात समानता असावी..
मराठा आरक्षणाबाबत आपले काय मत आहे?
आणि सरसकट सर्व जातींना क्रिमी लेयर लावण्याबाबत आपले काय मत आहे?
मविआने मुसलमानांना ५% आरक्षण देण्याबाबत मागणी केली आहे त्याबद्दल आपले काय म्हणणे आहे?
Prithviraj Chavan says the Marathas and Muslims have been given reservation without affecting existing reservation for the SCs, STs and OBCs
https://www.livemint.com/Politics/1RomndWQy1wh8iH0dsBMiI/Maharashtra-govt-approves-proposal-to-give-reservation-to-Ma.html
Maharashtra to provide 5% quota to Muslims in education: Nawab Malik
Read more at:
https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/maharashtra-to-provide-5-quota-to-muslims-in-education-malik/articleshow/74384431.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst
माझ्या मते सगळे भारतीय एक आहेत, आणि सर्वांना सारखे नियम असावेत..
जे गरीब आर्थिक दुर्बल असतील मग ते दलित असो, ब्राम्हण असो वा मराठा त्यांच्या शिक्षनासाठी, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पर्यत्न झाले पाहिजेत..
डॉ. माझी मते ठाम आणि पक्की असतात..
त्यात कोणाचा तिरस्कार नसतो कि कोणाच्या चुकीची पाठराखन नसते...
मुसलमान, हिंदू असे जे तुम्ही बोलत असता, तरीही एक डॉ म्हणुन तुमच्या कडे येणार्या पेशंट मध्ये तुम्ही भेदभाव करत नसताल असे मला वयक्तिक वाटते..
कारण माणुस परखड असला तरी तो वाईटच असतो असे नाही.. असे मला वाटते..
पण तुम्ही नेहमी मला असले प्रश्न करता.. मी केला कधी तुम्हाला, मुसलमान बाई सोनोग्राफीला आली तर तुम्ही काय करता..
कारण मला अजूनही खात्री आहे.. डॉ हे माणसातले देव असतात..
आणि जर तुम्ही कर्म करताना जे भाव मनात ठेवता ते मी येथे समाजात वावारताना ठेवतो..
याला तुम्ही गुळमुळीत म्हणा हरकत नाही.. पण ते आहे तसे...
तशीच माझी मते आहेत,
मला माणुस म्हटल्यावर धर्म जात दिसत नाही..
तसे मी बोललो तर तुम्हाला गूळमुळीत वाटत असेल, पण वयक्तिक रित्या मी तसा नाही..मी जहाल आहे.. अगदी खुप भांडणारा..
उरुळी कांचनला मी गेलो तरी शफिक पण माझ्या गळ्यात हात टाकून बोलतो... आणि राम पण..
त्यात काय एव्हडे..
असो थांबतो..
आता आणखिन नको...
आणि सरसकट सर्व जातींना क्रिमी लेयर लावण्याबाबत आपले काय मत आहे?
मविआने मुसलमानांना ५% आरक्षण देण्याबाबत मागणी केली आहे त्याबद्दल आपले काय म्हणणे आहे?
याला आपण उत्तर दिलेले नाही.
आणि
मी सुरुवातीलाच म्हटले आहे कि मुसलमान व्यक्ती आणि गट म्हणून वागणे संपूर्णपणे वेगळे असते.
त्यामुळे मुसलमान व्यक्तीला मी माणूस म्हणूनच वागवतो. माझे रुग्ण, आंबेवाला किंवा ए सी चा मेकॅनिक मुसलमान आहेत यामुळे मला फरक पडत नाही.
हे मला दुर्दैवाने येथे लिहावे लागते आहे कारण तुम्ही माझ्या वैयक्तिक व्यवसाय निष्ठेवर घसरला आहात.( अनवधानाने आहे असे समजून मी हा विषय पुढे वाढवत नाही)
कितीही पुन्हा लिहिणार नाही म्हणालोय तरी लिहावे लागतेय..पण संपवतोय..
कृपया आपण येथे थांबू..निदान हा शेवटचा रिप्लाय असावा आपल्यात येथे अशी माझी request आहे..
हे मला दुर्दैवाने येथे लिहावे लागते आहे कारण तुम्ही माझ्या वैयक्तिक व्यवसाय निष्ठेवर घसरला आहात.( अनवधानाने आहे असे समजून मी हा विषय पुढे वाढवत नाही)
धन्यवाद.. प्लिज वाढवू नका..
पण मी कुठे तुमच्या वयक्तिक निष्ठेवर घसरलोय.. तुम्ही गैरसमज करताय.. उलट मला तुमच्या निष्ठेवर शंका नाही असेच मी म्हणालोय..
जर तुम्हाला तसे वाटले असेल तर मला दाखवून द्या..
तसे असेल तर नैतिकता म्हणुन मी मिपा सदस्य पणाचा त्याग करेल...
उलट आपले विचार किती हि जुळले नाही तर तुमचा वयक्तिक व्यवसाय आणि डॉ म्हणजे माणसांतले देव असेच मी म्हणालोय..
आणि नक्कीच टाळ्या थाळ्या वाजवून कृतज्ञता दाखवण्या पेक्षा मनातून असे खरे वाटणे मला जास्त योग्य वाटते.
आणि ते तसेच आहे..
उलट मला खात्री आहे तुम्ही निष्ठेने उपचार करत असताल हेच म्हणालोय.
मग तुम्ही जे मला वर पासून परखड जहाल बोलताय वगैरे म्हणताय ते का?
मी कधी कुठल्या हिंसक लोकांचे समर्थन करतोय..हिंसक गट हे मुसलमान असु शकतात, हिंदू असु शकतात आणि कोणीही..
त्यामुळे माणुस म्हणुन समाजात वावरताना मला वयक्तिक सर्व धर्म समभाव पणे इतरांशी वागणे मला समाजा प्रती निष्ठा वाटते .. मग तुम्ही माझ्या वयक्तिक निष्ठेला गुळमुळीत कसे म्हणू शकता..
तुम्हाला तुमच्या व्यवसायाबद्दल बोलल्याने निदान हे तरी समजले असेल कि मी काय म्हणतोय..म्हणजे तुम्ही वयक्तिक व्यवसायात भेदभाव करणार नाही पण मी वयक्तिक वागताना तसे करू नये म्हणताना यात असे काय वेगळे आहे कि मी चूक ठरतो?
मी कुठल्याही गटाबद्दल थोडेच बोलतोय...आणि कोणत्या गुन्हेगारांना थोडेच पाठराखण करा म्हणतोय..
दुसरे डॉ म्हणजे तुमचा व्यवसाय आहे, आणि शेती हा माझ्या बापाचा व्यवसाय आहे तर त्यावेळेस तुम्ही जे सरसकट बोलता तेही चूकच असते.. तुम्ही जेंव्हा सरसकट बोलता ना त्यावेळेस जे त्यातील चांगले आहेत त्यांना हि तुम्ही त्यांच्या कार्यावर प्रश्नच उपस्तिथ करत असता..
असो तो विषय येथे घेत नाही..
दुसरी गोष्टी क्रिमि्लेअर म्हणजे काय हे मला माहित नाही.. Obc साठी असते असले शाळेत ऐकल्याचे जाणवते.. मला ते माहिती नाही.. नसू शकते माहिती.. एका माणसाला सगळ्या गोष्टीं माहित असाव्यात असे काही नाही.. म्हणुन त्यावर मी बोलू शकलो नाही..
मला मात्र कधी क्रिमी लेअर लावावे लागले नाही त्यामुळे मला माहिती नाही त्याबद्दल
(कृपया यांनंतर काहीही रिप्लाय आला तरी राजकीय या धाग्यावर मी बोलणार नाही..
प्रश्न किंवा वयक्तिक बोललो असे वाटल्यास आणि काही बोलायचे असल्यास ९९८७६७३३३२ वर बोला बिनधास्त.. येथे नाही..)
समाप्त..
बर तेंव्हा एकहाती सत्त्ता नव्हती आता आहे ना? मग काय झालेय?उलट माझ्या सारख्या व्यक्तीने समान नागरी कायदा मागितला तर योग्य आहे कारण मी सर्वांना समान मानतो..
आणी आणि बाकीचे काय हातात त्रिशूल घेऊन दिसला मुस्लिम कि भोसक करत सुटलेत... काय च्या काय सेल्फ सर्टिफिकेट देताय तुम्ही
अहो साधे ३७० हटवले तर केवढा गदारोळ घातलात .. धर्म सोडा ,पक्ष सोडा देशाच्या एकत्रीकरणाच्या दृष्टीने तरी त्यावर तुमच्या सारखया विचारच्या लोकांनी हरकत ना घेता मनमोकळे पनाणे साथ नाही दिली... आणि बोलताय समान नागरी कायद्याचे !
एक एक करीत करत आहेत .. ते अजेंडयावर येण्याची शक्यता आहे
जरा याचा विचार करा दुटप्पी कोण ते एकीकडे समानता म्हणायचे , भाजप एकांगी म्हणून बोलायचे आणि समान नागरी कायदा ६० वर्शे सत्तेत असून सुद्धा त्यादृष्टीटीने काह्ही पावले उचलायची नाहीत आणि पहिली ५-७ वर्षात ते करून का नाही दाखवले म्हणून भाजपच्या नावाने ओरडायचे
६० वर्षे भिजत घोंगडे जे काँग्रेस ने ठवलेय त्याच्यावर किती रोड रोलर चालवावा लागेल/// सगळी फिल्डिंग लावावी लागेल
उद्या आला कायदा तर नुसते भारतातील विरोधी नाही जगभरातील "उम्मा " काय गदारोळ घालेल याची कल्पना आहे का? तेवहा अतिशय काळजी पूर्वक ते पाऊल उचलावे लागणार आहे त्याला फारुख अब्दुल्ला पासून ओवेसी पर्यंत विरोध आणि खोटा प्रचार करतील ( सीए ए च्या वेळी सारखा ) पण त्याहून हि दुखद म्हणजे बारामती पासून बंगाल ची वाघिणी पण गप्प बसून फुसकुल्या सोडतील ...
जोवर आपण २० टक्के असून एकगठ्ठा मतांवर वाटेल ते घडवून आणू शकतो हि दर्पोक्ती करणे मुसलमान नेते बंद करत नाहीत तोवर भाजपसारख्या पक्षाला हिंदूंनी एकगठ्ठा मते देऊन निवडून आणणे हाच एक उपाय आपल्याला दिसतो. - सुबोध खरे.
---=
तुम्ही जे bold करून लिहिले आहे ते वरील डॉ सुबोध यांच्या प्रतिदाला रिप्लाय होता..
आणि यापुढे ते समान नागरी कायद्या बद्दल बोलतात..
आणी आणि बाकीचे काय हातात त्रिशूल घेऊन दिसला मुस्लिम कि भोसक करत सुटलेत.
नाही, असे मी म्हणालोय काय?
तुम्ही जे bold केले आहे, ते या साठी लिहिलेले कि
जात पात धर्म यावर बोलायचे.. हिंदू एकीकरण फलाना बोलायचे.. दुसरे म्हणजे गुन्हेगार असे म्हणायचे..
आणि वरतून समान नागरी कायदा मागायचा...
ह्या पेक्षा मी समान नागरी कायदा मागितला तर त्याचा उद्देश सर्व धर्म समभाव असा तरी अर्थ होईल..
उगाच धार्मिक भेद माणायचे आणि सर्व समान असावेत हे म्हणायचे हे ढोंगी मत आहे माझ्या मते
१९५१ साली मुस्लिम ९.९ टक्के होते जे २०११ मध्ये १४.२ टक्के झाले आहेत.
आणि अजुन माहिती येथे मिळेल
https://en.wikipedia.org/wiki/Islam_in_India#Population_growth_rate
राजकारणी स्वताचा स्वार्थ साधायला समाजाचे दुरगामी भले कशात आहे हे बघत नाहीत. नुसते सात पिढ्यान्साठी सम्पत्ती जमवतात. पण त्या पुढच्या पिढ्याना सुखाने जगण्यासाठी निकोप समाज व्यवस्था असेल का याचा विचार करत नाहीत. आज आम्ही हिन्दु स्त्रियाना मोकळा श्वास देतो आहोत पण भविष्यात त्या बुरख्यात जायची शक्यता तर निर्माण करत नाही ना? याना परत वैदिक सन्स्क्रुती रुपी पारतन्त्र्य यायची भीती वाटते पण नजिक असलेला धोका दिसत नाही. कम्युनिझम मध्ये पण स्त्रियाना हुकुम्शाहीच सहन करावी लागते..
कम्युनिझम मध्ये पण स्त्रियाना हुकुम्शाहीच सहन करावी लागते..
१९८७ च्या केरळ विधानसभा निवडणुकांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने के.आर.गौरीअम्मांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जरी जाहीर केले होते. केराच्या (नारळाच्या झाडांच्या) भूमीत के.आर.गौरीअम्मांना राज्य करू द्या असे मल्याळम भाषेत यमक होणारी पक्षाची निवडणुकीसाठी घोषणा होती. निवडणुका डाव्या आघाडीने जिंकल्याही. पण निवडणुक झाल्यावर मात्र गौरीअम्मांना मुख्यमंत्री न करता मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत त्यावेळेपर्यंत कधीच नसलेल्या ई.के.नयनार यांना मुख्यमंत्री केले. इतकेच नाही तर १९९४ मध्ये त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली. आपण नक्की काय चूक केली म्हणून पक्षातून काढले हा प्रश्न त्यांनी विचारला होता.
https://www.newindianexpress.com/states/kerala/2021/may/11/kr-gouri-amma-the-best-chief-minister-kerala-never-had-2301342.html
१९९६ च्या केरळ विधानसभा निवडणुकांमध्ये डावी आघाडी जिंकली तरी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार व्ही.एस.अच्युतानंदन यांचा धक्कादायक पराभव झाला. त्यानंतर परत एकदा कोणाला मुख्यमंत्री करायचे हा प्रश्न उभा राहिला. तेव्हाही सुशीला गोपालन यांना मुख्यमंत्री न करता ई.के. नयनार यांना परत एकदा मुख्यमंत्री केले गेले. ए.के.गोपालन या ज्येष्ठ नेत्याची पत्नी असलेल्या सुशीला गोपालन यांनाही तीच वागणूक मिळाली. मग कोणतीही मुळातली राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या गौरीअम्मांना वेगळी वागणूक मिळेल ही अपेक्षा करणेही चुकीचेच. वृंदा करात यांना पक्षाच्या सरचिटणिस केले गेले नाही. आणि हेच लोक भाजप-संघात स्त्री कधी सर्वोच्च स्थानावर जाणार हा प्रश्न विचारत असतात. आहे की नाही मज्जा?
अन्यथा ही चर्चा ज्या दिशेने जात आहे त्यामुळे मला फार रस राहिला नव्हता पण कम्युनिस्टांचा उल्लेख आला म्हटल्यावर झोडपायला मी आलोच.
परवाच के.आर.गौरीअम्मांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्याविषयी ताज्या घडामोडींच्या धाग्यात लिहायचा विचार करत आहे.
फक्त एक प्रश्न विचारला.. तो हि ३ चे ७७ मध्ये भाजपाचे मुळ लोक किती.. तर माझा जवळ जवळ खुप वेळ त्यावरील प्रतिसादाला उत्तर देण्यात गेले..कारण त्यावर हिंदू.. Bjp फलाना चालू करण्यात आले..
हिंदू हा शब्द आला तेंव्हाच हा मुद्दा नाहीच आहे असे स्पष्ट लिहिले तरी तेच तेच हिंदू मुस्लिम यावरच चर्चा आणली गेली..
अरे जो माणुस पहिल्यांदा म्हणतोय येथे काय संबंध धर्म आणायचा.. त्यावर शाब्दिक बोलुन.. हे असे न हे तसे..
मग लगेच काँग्रेस आणि फलाना..
अरे काय आहे हे..
तुमच्या विचारां सारखे विचार नसले कि पुढचे काय फक्त काँग्रेसी चमचे किंवा मूर्खच असतात काय?
स्वतः धर्म जात मानायची आणी इतर कोणी सर्व धर्म समभाव म्हणाले कि त्याच्यावर पुर्ण लिहिलेल्या आणि कोणाला तरी उत्तर द्यायला लिहिलेल्या प्रतिसादातुन ४ लाईन्स bold करून हे असेन ते तसे लिहायचे..
मला अत्यंत खेदाने म्हणावे लागतेय..
तुमचेच खरे..
तुमच्याशी बोलण्यात मी माझा वेळ वाया घालवला याचे दुःख होतेय..
बस..
मते वेगळी असावीत.. पण आपलेच ते सत्य आणि आपणच तो काय बरोबर आणि इतर म्हणजे मूर्ख हे साधे येथे १० माणसात तुम्हाला वाटते यातच मी समजुन जायला हवे होते कि अर्थ नाही...
येथे बोलायचे म्हणजे.. मिपा म्हणजे जणू bjp चे मुखपत्र आहे.. ते लगेच तुमच्यावर ह्याव त्यांव हल्ला करणारच..
अरे तुम्ही bjp माना नाही तर काँग्रेस... हिंदू माना नाही तर मुस्लिम..
अरे पण माणुस म्हणुन पुढच्याला मते असतात..तुम्ही माणुस म्हणुन वावरा ना फक्त..
बस आता... झक मारली आणि राजकीय धाग्यावर पुन्हा बोलायला आलो..
मुद्दा भरकटत ठेवून आपल्याला काय अपेक्षित आहे ते सर्व मिळून जे येथे मिपावर चालले आहे.. ते पुर्ण पणे चुकीचेच आहे..
आणि मिपा चा एक जुना सदस्य या नात्याने मला खेदाने म्हनावे लागतेय वातावरण पार गढूळ झालेय २०१४ नंतर...
चालू द्या..
एक नंबर.
मिपावरचे काही Bjp समर्थक लैच insecure बुवा. जरा खुट्ट वाजलं कि धावत येतात. टीका करणारा काँग्रेसचा आहे ठरवून टाकतात, आणि स्वतःच्या पक्षावरील टिकेकडे दुर्लक्ष करून whataboutry करतात. सेक्युलर, फुरोगामी वैगेरे शब्द फेकतात, आणि काय आर्ग्युमेन्ट केलं म्हणून स्वतःची पाठ थोपटतात.
तो हि ३ चे ७७ मध्ये भाजपाचे मुळ लोक किती..
शुन्य असोत त्याने फरक काय पडतो? उलट मुळ भाजपेयी नसलेले ही तेथे दाखल झाले असतील तर इतर पक्षांच्या प्रमुख नेत्रुत्वावर गाढ शंका आणी भाजपाच्या नेत्रुत्वावर प्रगाढ विश्वास निर्माण होतोय...
मिपा चा एक जुना सदस्य या नात्याने मला खेदाने म्हनावे लागतेय वातावरण पार गढूळ झालेय २०१४ नंतर...
आता पुरातन कार्डच खेळणार असाल तर विषयच मिटला. कारण विधाने करुन त्यामागील स्पश्टीकरण आपण पार लपवत आहात गणेशाजी. २०१४ नंतर पुर्वीचे सदस्य बिघडले की २०१४ नंतरचे सदस्य हे तुम्ही स्पश्टच केलं नाहीयें फक्त मिपा गढुळ झालयं इतकच. क्मॉन तुमच्या सारख्या व्यक्तीने विधाने न्हवे अॅनॅलसीस दिले पाहिजे.
बस आता... झक मारली आणि राजकीय धाग्यावर पुन्हा बोलायला आलो..
मुद्दा भरकटत ठेवून आपल्याला काय अपेक्षित आहे ते सर्व मिळून जे येथे मिपावर चालले आहे.. ते पुर्ण पणे चुकीचेच आहे..
मुद्दा राजकीय असेल तर राजकीय धुरळा उडणारच ना हो.
.वातावरण पार गढूळ झालेय २०१४ नंतर...
गणेशा, कदाचित तुम्हाला देशातील वातावरण 2014 नंतर गढूळ झालंय आस म्हणायचं असेल. 2014 नंतर भरपूर बदल आपल्या देशात झालेत.
1) 2014 पूर्वी MIM सारख्या धर्मांध पक्षाचा खुलेआम पाठिंबा घेऊन सुद्दा स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवता येत होतं
2) 2014 पूर्वी देशाच्या साधनसंपत्ती वरती अल्पसंख्याकाचा ( मुस्लिमांचा) पहिला हक्क आहे असे धर्मांध विधान देशाचा पंतप्रधानाला करता येत असे.
3) 2014 पूर्वी हिंदू दहशतवादाची प्रकरणे नसताना सुध्दा हिंदू दहशतवादी म्हणून हिंदूंना बदनाम करता येत असे त्याच वेळी अतिरेकी शांतताप्रिय समाजाचे असतील तर मात्र दहशतवाद्यांना कोणताही धर्म नसतो असे म्हणायची सोय होती आणि ह्यात आघाडीवर हिंदूच असत.
4) 2014 पूर्वी एखाद्या चकमकित शांतताप्रिय समाजाचे अतिरेकी मेले असतील तर त्यावेळच्या सर्वांत मोठ्या पक्ष्याच्या प्रमुखाला रात्रभर झोप येत नसे आणि महत्वाचे म्हणजे झोप न येण्याची गोष्ट आपल्या समर्थकाकारवी शांतताप्रिय समाजाला काळावलीही जात असे.
5) 2014 पूर्वी सरकारी खर्चातून दर्ग्यावर्ती चादरी चढवल्या जात असत परंतु श्री राम मात्र काल्पनिक आहे अस म्हणणाची सोय होती.
6) 2014 पूर्वी संरक्षण दृष्टीने एखादा मोठा व्यवहार झाला आस माझ्यातरी वाचण्यात नाही आलं, 2014 नंतर मात्र असे भरपूर व्यवहार पूर्ण झाले.
कितीही समजावलं तरी ही मुळमुळीत लोक सुधारणार नाहित. सर्व धर्म सम भाव या फालतुगिरी च्या मोहजालात हे अडकले आहेत. जेव्हा १९४७ किंवा १९७० सारखा तडाखा यांना व्यक्तिशः बसेल तेव्हाच हे सुधारतील. पण तेव्हा देखिल सुधारायला ते या भूतलावर नसतील.!! कारण ते कोणत्या तरी भाई चा "चारा" बनलेले असतील.
सर्व मुस्लिम लोकांनीं देश सोडून जावे किंवा त्यांच्यावर बहिष्कार टाकावा किंवा त्यांच्यावर आपण हिंसात्मक कारवाई करावी असं माझं म्हणणं नाही पण वेळीच पावले उचलून अखंड भारताचा अजुन एक तुकडा पडण्यापासून भारताला वाचवावे असं वाटते. इतिहासातून धडा घेतला पाहिजे. एखाद्या व्यक्तीने आपल्याला १ , २ नव्हे तर ५०-६० वेळेला चुना लावला असेल तर अश्या लोकांशी डील करताना सावध राहावे इतकी देखिल अपेक्षा करणे चूक कसे काय?? २०१४ पर्यंत सेकुलारिजम आणि अल्पसंख्यक अश्या गोंडस नावाखाली एका विशिष्ठ समाजाला नेहमीच झुकते माप देउन व बहुसंख्य समाजाचा नेहमीच अपमान आणि बदनामी करून याआधीच्या सरकारांनी नेमके काय मिळवले??? तर स्वतः च्याच देशात ९ राज्यामध्ये हिंदू अल्पसंख्यक झाले आणि तसे होऊन सुध्दा इतर अल्पसंख्यक लोकांनां हिंदूंनी दिलेल्या सुविधा ते स्वतः साठी वापरू शकत नाहीत..
एक नाही अश्या शेकडो हजारो गोष्टी आहेत. एक अखलाख मेला तर UN मध्ये जायची भाषा करणारे तूम्ही फुटोगमी लोकं, लाखो हिंदूंची भरदिवसा त्यांच्या घरात हत्या झाली.. त्यांनी आपल्याच देशात निर्वासित म्हणून जगावे लागले.. त्यांच्यासाठी साधा एक शब्द पण बोलला नाही.. इथेच तूम्ही फुटोगामी लोक उघडे पडलात.. अश्या एक नव्हे.. शेकडो हजारो घटना झाल्यात आणि त्या बोलून दाखवल्या की लगेच वातावरण गढूळ झाले का ??
१०० कोटी लोकांच्या श्रद्धास्थान असलेल्या श्रीराम यांना काल्पनिक व्यक्ती म्हणणे आणि त्याचवेळी ५-६ वेळेला भोंगा वाजवून अल्लाह हाच एकमेव देव आहे असे सांगणे म्हणजे तुमचे सेकुलारिजम असेल तर खड्ड्यात गेले तुमचे सेकुलारिजम.
पाणी तेव्हाच गढूळ होते जेव्हा पाण्याच्या बुडाशी भरपूर "चिखल" जमा झालेला असतो..
तुम्हाला आज पाणी गढूळ झालेले दिसते पण शेकडो वर्षे जमा होणारा चिखल दिसला नाही का ???
हो आहेत ना.
१) समान नागरी कायदा आणणे.
२) मदरसे , मिशिनारिज ई हिंदूंच्या व्यतिरिक्त कोणतेही धार्मिक शिक्षण देणारे सर्व दुकाने बंद. !!!
३) सरकारी जमीन बळकावून उभ्या केलेल्या मशिदी जमीनदोस्त करणे.
४) अल्पसंख्यक आयोग, अनुदान, आणि त्यांच्यबरोबर त्यांच्या सर्व सुविधा बंद करणे.
५) मंदिराप्रामाने इतर सर्व प्रार्थनास्थळे सरकारी नियंत्रणात आणणे.
६) पाकिस्तानच्या नागरिकत्व मिळवण्याच्या प्रोसेस चा अभ्यास करून ज्या व्यक्तींना पाकिस्तान मधे जायचे आहे अश्या लोकांना मदत आणि आर्थिक सहाय्य पुरवणे.
७) घटनाबाह्य पद्धतीने घुसवलेले सोशलिस्ट आणि सेकुलर हे दोन्ही शब्द राज्यघटने मधुन काढून टाकने.
८) काश्मिरी हिंदूचे पुनर्वसन करणे. त्यांना सरकारी मदत करणे. नोकरी देणे.
९) इतिहासातील हिंदूंच्या मंदिरांचे पुनर्निर्माण करणे ( सोमनाथ मंदिर सारखे )
१०) वाफ्फ बोर्ड सारख्या धार्मिक संस्थांना दिलेले अधिकार आणि खैरती प्रमाणे वाटलेल्या जमिनी परत घेणे.
११) सार्वजनिक ठिकाणी बुरखा, हिजाब घालणं बेकायदेशीर करावे.
१२) आतंकवादी संघटना किंवा आतंकवादी कृत्य करणारे किंवा त्यांना मदत करणारे ( आर्थिक सामाजिक राजकीय कायदेशीर) सर्वांना जन्मठेप किंवा फाशी दोनच शिक्षा असाव्यात.
१३) शिक्षण हक्क कायदा रद्द करावा.
१४) सर्व पर्सनल बोर्ड रद्द
१५) हिंदुव्यातिरिक्त भारतात कोणत्याही धर्मप्रसार कार्यक्रमास बंदी. केल्यास आजन्म कारावास..
१६)
१७)
अजुन बरेच आहेत
आता तुम्ही म्हणणार के हे सर्व शक्य नाही वगैरे वगैरे... पण अजुन ५००-६०० वर्षांनी हिंदू हा शब्द ऐकण्याईतपत जरी जिवंत ठेवायचा असेल तर हे सर्व आज ना उद्या करणे आवश्यक आहे... !!
नाहीतर ज्याप्रकारे पर्शिया चा इराण झाला त्याप्रमाणे भारताचा दुसरा पाकिस्तान होणारं हे नक्की.
बाकी हॉस्पिटल, शाळा, रस्ते, पाणी, व्यवसाय, प्रगती, विकास वगैरे हे होतच राहील...!!!!
डावखुरे लोक इंटलेक्चुअल्स ना बेमालुमपणे गळास लावतात कारण हेच लोक सर्वप्रथम असतात ज्यांच्याकडे शिक्षण, आत्मविश्वास, (चालु)राजकारणाबद्दल चिड, इतिहासातील चुकांबद्दल द्वेश, अंधश्रध्दांबद्दल तिरस्कार या गोष्टी मुबलक प्रमाणात असतात( व अजुन बरीच कारणे ज्यामुळे अस्वस्थता वाटत असते).
आता अशा गोश्टी असुनही जेंव्हा ते चालु स्माजात बदल घडवु शकत नाहीत तेंव्हा ते नैसर्गीकपणेच आतुन क्षुब्ध असतात, तुंबलेले असतात व आतिल भावनांना वाट मोकळी करायचा मार्ग हुडकत असताना अचानक एखादी व्यक्ती/संघटना त्यांच्या उपरोक्त गुणांचे पध्दतशीर कौतुक करुन त्यांना डोक्यावर घेते तेंव्हा हे नैसर्गीकपणेच त्याविचारसरणीकडे आकर्षीत न झाले तरच नवल...
कारण डावखुरेपणा कितीही स्वप्नाळु असला/ भासमान असला तरी ती आधुनीक काळाची देणगी आहे म्हणून हे प्रकरण नया है वो, भुल पाडणारे आहे हे सत्यच, यांना कुठल्या पुस्तकातील देवाचे राज्य पृथ्वीवर पसरावयाचे नसुन यांचा उहापोह सामान्य माणसांच्य प्रश्नाशी जास्त असतो म्हणून कोणालाही त्याचे आकर्षण नेमकं पडु शकतं अॅज लोंग अॅज ते नवखे आहेत.... सुशीक्षीत आहेत, सेंटर ऑफ अटेंशन आहेत.
"हिंदू सोडून कुठलाही धर्म भारतात चालणार नाही" हे थेट न म्हणता इतर सगळया प्रयत्नांनी तोच संदेश द्यायचा तर.
बऱ्याचश्या गोष्टी मान्य नाहीत, आणि तीव्र विरोध आहे. यादीतल्या एखाददुसऱ्या गोष्टी कधीच अमान्य नव्हत्या, फक्त प्रयोरिटी वाईज फार फार खाली.
असो, तुमचे मत समजले, आभार.
बाकी हॉस्पिटल, शाळा, रस्ते, पाणी, व्यवसाय, प्रगती, विकास वगैरे हे होतच राहील...!!!!
अच्छा, असं आहे तर.
बऱ्याचश्या गँमतीशिर बाबी पण वाटल्या. उदा-
सेक्युलर आणि सोशलिस्ट शब्द असून काय फरक पडतोय ? कायदे आणि इतर संविधान आहेच सेक्युलर. बाबासाहेब तर सेक्युलर हा शब्द पुन्हा घातला तर redundant होईल असे म्हणायचे. पण नुसत्या सेक्युलर शब्द असण्याने किंवा नसण्याने काय फरक पडतो ? संविधानाचे कोअर तत्व आहे सेक्युलॅरिझम. प्रिअम्बल मधून शब्द काढा अथवा घाला, काही फरक पडत नाही.
Secularism was inherent to the Constitution’s structure and he felt that mentioning it in the preamble would be redundant
त्यामुळे फक्त सेक्युलर शब्द काढून तुमच्या २,६,११,१५ या इच्छा पूर्ण होणार नाहीत.
सोशलिस्ट पण तेच. शब्द ठेवा अथवा काढा, हु केअर्स. लोकोपयोगी कामे करत राव्हा म्हणजे बस.
गोंधळ किंवा गदारोळ याबाबत २०१४ च्या ऐवजी मी २०१२ म्हणेन.
२०१२ च्या अगोदर प्रिंड मिडिया व टीव्ही चॅनेल्स यांचे वर्चस्व होते. ते जे दाखवतील किंवा जे काही छापले जाईल त्यावर लोकांवर विश्वास असायचा. मोदींविरूध्द इतकं काही चालू असताना ते बहुमताने कसे काय निवडून येत असत याचे मला नेहमीच आश्चर्य वाटत असे.
२०१० च्या आसपास इन्टरनेट सर्वसामान्यांच्या आवाक्यात यायला लागले. मनोगत, मायबोली वगैरे ब्लॉग्स सुरू झालेले होतेच ते सर्वसामान्यांच्या आवाक्यात यायला लागले. त्या अगोदर हा सगळा प्रकार आयटी मधील श्रीमंत वर्गात प्रचलित होता.
२०१२ च्या अगोदर मला प्रथमच मानुषी या डाव्या विचारवंतीणीचा ब्लॉग वाचायला मिळाला व मी चक्रावून गेलो. मोदी विरोधक ते मोदी प्रशंसक हा त्यांचा प्रवास मला थक्क करणारा वाटला.
प्रिंट मिडिया व चॅनेल्स जे दाखवत नाहीत ते वाचायला मिळायला लागले. पुराव्यानिशी अनेक गोष्टी पुढे यायला लागल्या.
२०१४ नंतरचा बदल मात्र जास्त झपाट्याने व्हायला लागला. प्रस्थापीतांनी मांडलेले विचार निमूटपणे मान्य करणे व त्यावर विश्वास ठेवणे ह्या प्रथेला तडे जायला लागले. विरोधी मते मांडली जायला लागली. प्रश्न विचारले जायला लागले. खळबळ उडायला लागली.
जीओ च्या यशानंतर फारच बदलून गेलंय. जगात सर्वात स्वस्त अशी आंतरजालीय जोडणी भारतात उपलब्ध झालीय.
काहींना गोंधळ वाढलाय असं वाटतंय.
काहींना बोलायचे स्वातंत्र्य प्राप्त झाल्याचा आनंद होतोय.
तर काहींना आपण बोलायचे व इतरांनी निमूटपणे मान डोलवायची याची झालेली सवय नडतीय.
थोडक्यात २०१४ नंतर गोधळ किंवा वैचारिक प्रदूषण खूपच वाढले आहे. व्यक्ति तितक्या प्रकृती.
आपले मत मांडताना दुसर्यांचा अपमान होईल अशी भाषा न वापरणे हा एकमेव मार्ग यावर आहे.
मग मात्र मतभेद राहतील पण इथला वावर सुसह्य असेल.
त्यामुळे या गदारोळापासून लांब राहणारेही इथे यायला लागतील.
भागही घ्यायला लागतील.
इकडचे ४-५ व तिकडचे ४-५ अशी सध्याची विचारमंथनाची पध्दत बदलून जाईल.
मग मात्र अभ्यासपूर्वक लिखाण वाढायला लागेल.
तोपर्यंत काय?
वेळ काढत राहायचा.
वाट पहात राहावयाचे.
तरी वरील बऱ्याच ठिकाणी ३ चे ७७ केले कळाले. पण हे सगळे भाजपाचे लोक आहेत कि फोडून आपल्या पक्षात ओढलेले निवडून येणारे इतर पक्षातील तेथील नेते आहेत?भाजपने तृणमूलमधून आलेल्या एकूण १४८ जणांना उमेदवारी दिली होती (त्यात १२ विद्यमान आमदारांचा समावेश होता). त्यातील फक्त ६ जिंकले व उर्वरीत पडले. म्हणजे ७७ आमदारांमध्ये ६ आमदार आयाराम आहेत. https://www.google.com/amp/s/theprint.in/politics/trinamool-turncoats-fail-bjp-in-bengal-polls-suvendu-mukul-roy-the-few-face-savers/650790/%3fampतुम्ही सडेतोड बोलता कायम, त्यात दुमत नाही.. पण आता मला पर्वा नाही हि patti कशाला? तुम्ही कायम पर्वा करत नाहीच.. हे चुकीचे आहे मला म्हणायचे नाही..आता मला पर्वा नाही हे वाक्य फार फार महत्वाचे आहे यातुन त्यांची हतबलता ठळक होते आहे. आणी हे घडणे चुकीचे आहे मग सडेतोड बोलणे हा त्यांचा स्वभाव असो की नसो. महत्वाच्या बाबी अशा दुर्लक्षुन तुम्ही तर विपर्यास करत आहात. तुम्हाला ज्या कारणांसाठी बिजेपी आवडत नाही ती सोडुन इतर अनेक कारणे आहेत ज्यामुळे बी जे पी आज सत्तेत आहे. आणी ती कारणे आत्मसात करायचे सोडून इतर पक्ष वा त्यांचे समर्थक बि जे पी वर आवडत नसणार्या कारणासाठी चिखलफेक करुन जर तुम्ही भाजपाचा निषेध करत असाल तर तुम्ही स्वतः त्या निषेधाला तितकेच पात्र बनता.एक साधा प्रश्न ७७ मध्ये किती भाजपा चे मुळ लोक आहेत..वर उत्तर दिलंय.जोवर आपण २० टक्के असून एकगठ्ठा मतांवर वाटेल ते घडवून आणू शकतो हि दर्पोक्ती करणे मुसलमान नेते बंद करत नाहीत तोवर भाजपसारख्या पक्षाला हिंदूंनी एकगठ्ठा मते देऊन निवडून आणणे हाच एक उपाय आपल्याला दिसतो.- सुबोध खरे. ---= तुम्ही जे bold करून लिहिले आहे ते वरील डॉ सुबोध यांच्या प्रतिदाला रिप्लाय होता.. आणि यापुढे ते समान नागरी कायद्या बद्दल बोलतात.. नाही, असे मी म्हणालोय काय? तुम्ही जे bold केले आहे, ते या साठी लिहिलेले कि जात पात धर्म यावर बोलायचे.. हिंदू एकीकरण फलाना बोलायचे.. दुसरे म्हणजे गुन्हेगार असे म्हणायचे.. आणि वरतून समान नागरी कायदा मागायचा... ह्या पेक्षा मी समान नागरी कायदा मागितला तर त्याचा उद्देश सर्व धर्म समभाव असा तरी अर्थ होईल.. उगाच धार्मिक भेद माणायचे आणि सर्व समान असावेत हे म्हणायचे हे ढोंगी मत आहे माझ्या मते