आतापर्यंत हाती आलेले कल बहुसंख्य मतदानोत्तर सर्वेक्षणाच्या अंदाजाशी सुसंगत आहेत. कोरोना निर्बंधामुळे मतमोजणी नेहमीपेक्षा हळू होत आहे. त्यामुळे दुपारी १ वाजल्यानंतरच चित्र नक्की होईल.
पवार आदिना जेंव्हा असा अन्दाज आला की काँग्रेसची दिवसेंदिवस पिछेहाट होते आहे त्यामुळे केन्द्रात तरी मिलीजुली सरकारे स्थापन होण्याचा काळ सुरू होत आहे ! अशावेळी चोर जसे लुटलेली संपत्ती वाटून घेतात तसे सत्तेची वाटणी ही करता येईल या फार्म्युल्याचा उपयोग राज ठाकरे ,रामदास आठवले पासून सर्व करू पाहात आहेत ! सबब सेना- मनसे ,आठवले-आंबेडकर , दि एम के ,एएआयडीएमके ,काँग्रेस -टीएमसी हे एकत्र येत नाहीत येणारही नाहीत ! या सर्वांचा अंदाज मोदी यांनी चुकविला .मोदींचा प्रभाव कमी होत असला तरी आता भाजपाने देशात पकके पाय रोवले आहेत . एकमेव आमदार रामभाऊ म्हाळगी ते १०५ आमदार अशी भाजपाची प्रगती महाराष्ट्रात झाली आहे जिथे कमालीचा ब्राहमण द्वेष होत आलेला आहे !त्या अर्थाने भाजपा सर्वसमावेशक झाला आहे गुंडगिरी सह !
पवार १९९८ मध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेता होते. १९९९ मध्ये वाजपेयी सरकार विश्वासदर्शक ठराव हरल्यानंतर, आपण विरोधी पक्षनेता असल्याने आपल्याच नेतृत्वाखाली पर्यायी सरकार स्थापन होईल असे त्यांना वाटत होते. परंतु सरकार स्थापनेसाठी नेता म्हणून सोनिया गांधी राष्ट्रपतींंकडे गेल्या व 'वी हॅव थू सेवंती थू' असा प्रसिद्ध दावा त्यांनी केला होता. जेव्हा भविष्यात कॉंग्रेसचे सरकार स्थापन होईल तेव्हा सोनियाच पंतप्रधान होतील व आफली एखाद्या मंत्रीपदावर बोळवण होईल हे पवारांच्या लक्षात आल्याने संतापून ते बाहेर पडले होते.
विरोधी पक्षनेता व मुख्यमंत्री/पंतप्रधान वेगळ्या व्यक्ती असण्याची कॉंग्रेसची परंपरा आहे. महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, परंतु विरोधात बसल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेता होते. परत सत्ता मिळाली असती तर विखे पाटील मुख्यमंत्री न होता पृथ्वीराज चव्हाण किंवा अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले असते. हिमालय प्रदेशात सत्ता मिळाली की वीरभद्र सिंह मुख्यमंत्री होतात, परंतु विरोधात असताना विद्या स्टोक्स विरोधी पक्षनेता असायच्या. ही कॉंग्रेसी परंपरा पवार कसे विसरले याची कल्पना नाही.
तात्पर्य - पवार कॉंग्रेस सोडण्यामागे फक्त स्वार्थ होता.
ममता सुरूवातीपासून डाव्यांच्या विरोधात होत्या. १९८४ मध्ये डाव्यांविरोधात त्यांनी काढलेल्या एका मोर्चावर पोलिसांनी गोळीबार केल्याने ११ कॉंग्रेस कार्यै मरण पावले होते. त्यामुळे ममतांचा संताप पराकोटीला पोहोचला होता. त्यांनी डाव्यांना सत्तेतून घालविण्याचा पण केला होता. या ११ कार्यकर्त्यांचा स्मृतिदिन ममता अजूनही पाळतात.
१९८७ मध्ये वि. प्र. सिंह कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राजीव गांधींनी डाव्यांशी जमवून घ्यायला सुरूवात केली होती. त्यांनी ज्योती बसूंना पाठिंब्याची विनंती केली होती. नंतर आलेले नरसिंह राव सरकार डाव्यांच्या पाठिंब्यावर १९९३ पर्यंत तरले होते. १९९६ मध्ये देवेगौडा सरकारमध्ये इंंद्रजित गुप्ता व चतुरानन मिश्रा हे भाकपचे मंत्री होते व या सरकारला डावे व कॉंग्रेसचा पाठिंबा होता.
डावे व कॉंग्रेसचे एकमेकांना होणारे सहकार्य ममतांना मान्य नव्हते. परीणामी त्या कॉंग्रेसमधून बाहेर पडल्या.
तात्पर्य - ममता कॉंग्रेस सोडण्यामागे निव्वळ स्वार्थ नव्हता.
नंतर आलेले नरसिंह राव सरकार डाव्यांच्या पाठिंब्यावर १९९३ पर्यंत तरले होते.
हे कशावरून? उलट १९९१ मध्ये मनमोहनसिंगांनी देश विकायला काढला आहे, ते आय.एम.एफ चे एजंट आहेत वगैरे गोष्टी बोलण्यात डावे आणि समाजवादी सगळ्यात पुढे होते. किंबहुना अयोध्या प्रकरण तापायला लागण्यापूर्वी भाजप तोंडदेखल्या सरकारला विरोध करत असला तरी विशेषतः आर्थिक धोरणांवर भाजपचे नरसिंहराव सरकारला सहकार्य होते. पण डाव्यांचा नरसिंह राव सरकारला विरोध होता.
डाव्यांचा आर्थिक सुधारणांना विरोध होता तरी विरोधामुळे त्यांनी नरसिंह राव सरकार तुटेपर्यंत ताणले नव्हते, कारण भाजप त्यांचा प्रथम क्रमांकाचा शत्रू होता व राव सरकार पडल्याचा सर्वाधिक फायदा भाजपला होईल हे त्यांना समजत होते.
१९९२ मध्ये कॉंग्रेसच्या शंकर दयाळ शर्मांना त्यांनी राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा दिला होता. १९९२ मधील बाबरी प्रकरण, १९९२ मधील हर्षद मेहता प्रकरण इ. प्रकरणात त्यांनी नरसिंह राव सरकारवर खूप टीका केली होती परंतु त्यांनी सरकार पडून दिले नव्हते. सरकारला धारेवर धरणे परंतु भाजपला फायदा होऊ नये यासाठी सरकार पडू न देणे अशी त्यांची जुलै १९९३ पर्यंत भूमिका होती. शेवटी जुलै १९९३ मध्ये त्यांनी नरसिंह राव सरकार विरूद्धच्या अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. परंतु जनता दल व झारखंड मुक्ती मोर्चा हे पक्ष फोडून नरसिंह रावांनी सरकार वाचविले होते.
साधारणपणे २००४ ते २००८ या काळात त्यांची अशीच भूमिका होती. शेवटी २००८ मध्ये त्यांनी विश्वासदर्शक ठरावावर सरकार विरोधात मतदान केले. परंतु समाजवादी पक्षाचा पाठिंबा मिळवून मनमोहन सिंगांनी सरकार वाचविले होते.
तांत्रिकदृष्ट्या त्यांना काढले होते. परंतु काढले नसते तरी त्यांना व त्यांच्या समर्थकांंना राष्ट्रीय पातळीवर व राज्यातही अडगळीत फेकून दिले असते व त्यामुळे त्यांना समर्थकांना बरोबर घेऊन बाहेर पडावेच लागले असते.
परीणामी १९९८ मध्ये ममतांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडून तृणमूल कॉंग्रेसची स्थापना केली व १९९८ ची लोकसभा निवडणुक भाजपशी युती करून लढविली होती. त्यात तृणमूलचे ७ व भाजपचा १ खासदार निवडून आला होता.
>>>>> म्हणजे टी एम सी आणि भा ज पा चे होतं तर
“निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये सुरू झाला हिंसाचार; २४ तासांत ९ जणांचा मृत्यू”
https://www.loksatta.com/desh-videsh-news/violence-erupted-in-west-bengal-after-elections-9-killed-in-24-hours-msr-87-2460952/
ये तो होना ही था
थोडक्यात दीदी वर्सेस मोदी असा सरळ सामना बंगालमधे झाला आणि कॉंग्रेसने मानच टाकल्याने भाजपा मतांच्या विभाजनाची इतर राज्यात वापरलेली हुकमी किमया साधु शकला नाही आणि ही बाबा दीदींच्या पथ्यावर पडली.
३ वरुन ८०+ झाले म्हणुन खुष व्हायचं की २०० म्हणता म्हणता शंभरीही गाठता आली नाही ही बाब दुख्खः समजायचं याचा निर्णय ग्लास आर्धा भरलेला समजावा की रिकामा याइतकाच कठीण असला तरी लांबपल्याचा विचार केल्यास निराशादायक नक्किच नाही.
लांबपल्याचा विचार केल्यास निराशादायक नक्किच नाही.
सहमत... लांब रेस चा घोडा ... २०० च्या वर हे जरा भीत भीतच म्हणले असतील... गड आधी आला नाही .. आता कुठे वेसण बसली आहे ...
पण अंधविरोधी आता "दीदी फॉर दिल्ली" वैगरे बर्ळतीलच
बाकी अजूनही बंगाली बाबुंचे काही कळत नाही.... इतर भारतातात एखादा मतदार काँग्रेस -भाजप / आणि स्थानिक असा बदल करेल तर त्यात आश्चर्य नाही .. पण बंगाली बाबू खरंच तिथे कम्युनिस्ट आणि एकदम भाजप अशी कोलांटी कशी मारतो ? दोन टोके
दीदींच्या शांतताप्रिय समर्थकांनी जिंकण्याच्या उन्मादात अपेक्षेप्रमाणे हल्ले आणि जाळ पोळ सुरू केली आहे.
त्यात 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
www.indiatvnews.com/elections/news-bengal-post-poll-violence-tmc-bjp-mamata-banerjee-centre-seeks-report-latest
रात्रंदिवस मोदिंच्या नावाने रडणारे इथले महाभाग ज्यांना दिदीचे खूप कौतुक होते ते सोइस्कररीत्या मौन धारण करतील.
कोरोनासाठी मोदींना जबाबदार ठरवणारे आता या tmc च्या उन्मादी समर्थकांच्या नाकावर मास्क आहे का हे चेक करतील का.
असा कॉंग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांचा अलिखित नियम आहे ...
निवृत्त नौसैनिकाला मारहाण केली आणि सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली आणि हिंदू माणसाला घरी जाऊन जीवे मारण्याची धमकी, अब्दुल सत्तार यांनी दिली, तरी अशावेळी हे पक्ष गप्पच बसतात ....
अगदीच काही वाटले तर, थोडा फार निषेध व्यक्त करतात ....
अनंत करमुसे मारहाण
https://www.dainikprabhat.com/anant-karamuse-assault-case-when-was-jitendra-awhad-arrested/
.....
https://www.esakal.com/mumbai/jitendra-awhad-3-bodyguard-policemen-arrested-anant-karmuse-assault-case-355219
------------
निवृत्त नौसैनिकाला मारहाण
https://www.google.com/amp/s/www.sarkarnama.in/top-news-mobile-mumbai/bjp-will-go-high-court-madan-sharma-assault-case-61893%3famp
-----------
अब्दुल सत्तार यांनी दिलेली धमकी
https://m.lokmat.com/politics/shiv-sena-minister-abdul-sattar-video-viralinsulting-after-asking-question-maratha-reservation-a629/
--------
थोडं गुगलला विचारलेत तर, ह्या प्रकरणांच्या बाबतीत, बरेच काही मिळेल.....
बंगाल मध्ये फार पूर्वीपासून कम्युनिस्ट सरकारे आणि विचारसरणीचा प्रभाव होता. कम्युनिस्ट विचारसरणी ( रक्तरंजित क्रांती इ इ) सरळ सरळ हिंसाचाराचे समर्थन करते. त्यामुळे तृणमूल काँग्रेसने सुद्धा कम्युनिस्टांना विरोध करताना हिंसाचाराचा मार्ग सर्रास चोखाळला होता. त्याचीच फळे इथे दिसत आहेत. हीच स्थिती केरळ मध्ये आहे. तेथे भाजप किंवा रा स्व संघाच्या कार्यकर्त्यांची हत्या होताना दिसते.
भाजपाला या स्थितीतूनच पुढे जायचे आहे.
याच कम्युनिस्ट विचारसरणी मुळे बंगालमध्ये उद्योगधंद्याची अपरिमित हानी झाली आणि बंगालची आर्थिक स्थिती खालावत गेली इतकी कि १९६० मध्ये डॉ बिधान चंद्र रॉय असताना तिसऱ्या क्रमांकावर असणारे हे राज्य आता १७ व्या स्थानावर पोचले आहे. मा माटी आणि मानुष चा उदो उदो करताना दीदी नि उद्योगांचे उच्चाटन केले आहे. त्यामुळे जर आपले आर्थिक धोरण सुधारले नाही तर ( अमित मित्र सारखा फिक्की चा अध्यक्ष घेऊनही काही फरक झाला नाही) येणार काळ तेथील जनतेला अजूनच वाईट असणारे
आणि महाराष्ट्रात साधारण तसाच विचार करणारे शिवसेनेचे सरकार सत्तेत आहे. पुनावालाला शिवसेनेने धमकी दिल्यानंतर (आणि राष्ट्रवादीने महाराष्ट्राला प्राधान्याने लस मिळावी अशी भूमिका ठेवल्यानंतर) आता सिरम ने आपला पुढचा प्रकल्प गुजरात, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक वगैरे ठिकाणी हलवला तर नवल वाटणार नाही. मग हे बोंबलतीलच प्रकल्प पळवला म्हणून. नतद्रष्ट अडाणी आणि झोपडपट्टी सरकार आहे हे.
ती बिचारी गरीब माणसे असतात. मिळाल्या पैशाला जागणारी. त्यानी पैशासाठी फक्त काम केलेले असते.. त्यान्ची झोपडपट्टिमधुन बाहेर पडायची इछ्चा असते.
ही राजकिया माणसे नतद्र्ष्ट आहेत. याना समाधान नसते. कोणत्याही थराला जातात. याना झोपडपट्या टिकायला किवा वाढायला हव्या असतात.
कुठलीही गोष्ट मोफत मिळणे ही जी मानसिकता आहे ती कितपत चांगली आहे? तुम्ही म्हणता तसे लोकही असतील, पण शहरातली prime land गिळंकृत करणे, त्यावर पक्की घरे बनवणे, शासन दुसरीकडे जागा देत असतानाही झोपड्या न सोडणे इत्यादी प्रकारच बहुसंख्येने असतात. गुन्हेगारी जास्त असते. स्वच्छतेचा बोर्या वाजलेला असतो. पक्ष यांना निवडणुकीपूरते वापरतात. शहरांना काही सौंदर्य वगैरे हवे की नको? सतत कुठून तरी लोक शहरात येत राहतात आणि झोपडपट्ट्या वाढत जातात. जे कर भरतात आणि जागा खरेदी करून रहातात त्या नागरिकांना शहरात झोपडपट्टी नको, गुन्हेगारी नको वगैरे म्हणण्याचा अधिकारच ठेवला गेला नाहीये. तुम्ही आयुष्यभर कष्ट करून फ्लॅट विकत घेणे हे जेव्हा नागरिक करत असतात तेव्हा दुसरे कुणी तरी शहरातली prime land बळकावून रहाणे हेही होत असते. त्या मानसिकतेला दुसरा काय शब्द आहे मला माहित नाही.
आणि महाराष्ट्रात साधारण तसाच विचार करणारे शिवसेनेचे सरकार सत्तेत आहे.
शिवसेना नोव्हेंबर २०१९ पासून अशी आहे का आधीपासूनच अशी आहे? आधीपासूनच असेल तर साधारणपणे केव्हापासून अशी आहे?
पूर्वी पासूनच शिवसेनेची प्रतिमा तशीच आहे. फक्त त्यांचे पहिले सरकार असताना निदान सुशिक्षित लोक तरी त्यांच्याकडे होते. मनोहर जोशी, नवलकर इत्यादी. आता आहेत संजय राऊत, अनिल परब, रामदास कदम आणि तत्सम.
संपादित
हा प्रतिसाद मीच sarcastically लिहिला होता . ममता बानूच्यां पार्टीचा इतर ठिकाणी दणाणून विजय झाला तो पक्षाच्या मेहनतीने पण नंदीग्राम मध्ये ममता हरली तो केवळ EVM मुळे असे मला म्हणायचे होते.
या माणसाचा खरंच आय क्यू तपासून पहिला पाहिजे ! पूर्वी असे म्हणत की लतादीदींच्या स्वरयंत्राचा शास्त्रोक्त अभ्यास होणार आहे तसाच राहुल गांधी यांच्या मेंदूचा झाला पाहिजे !
निवडणूक आणि निकाल follow केले नाही.
थोडेफार न्यूज माहिती आहे पण जास्त नाही..
तरी वरील बऱ्याच ठिकाणी ३ चे ७७ केले कळाले..
पण हे सगळे भाजपाचे लोक आहेत कि फोडून आपल्या पक्षात ओढलेले निवडून येणारे इतर पक्षातील तेथील नेते आहेत?
आणि ५०% जरी ते असे लोक असतील तर भाजपा ने हि पाठ बडवून घेण्यात अर्थ आहे का?
असो..
हिंदू हा प्रश्नच नाहीये..
तुमच्या असल्या निरर्थक उत्तरांमुळेच आजकाल मला येथे रिप्लाय देवूसा वाटत नाही..
हिंदू एकत्र येत आहेत, तर काँग्रेस आणि इतर काय भारताबाहेरील दहशत वादी लोकांनी बनला आहे का?
आणि हो असे उत्तर असेल तर तेच लोक भाजपात घेतल्यास फक्त जात धर्म हाच महत्वाचा मुद्दा असतो का?
सर्व राजकारणी आणि विशेष करून त्यांचे पुरस्करते जोपर्यंत जात धर्म यातून बाहेर येणार नाहीत तोपर्यंत देशाचे भले होईल असे वाटत नाही..
बाकी ३ चे ७७ झाल्याबद्दल अभिनंदन.. भले त्यातील लोक कसेही.. कुठलेही असले तरी ते हिंदू आहे हेच महत्वाचे आहे हे ऐकून छान वाटले..
यावर उपप्रतिसाद देण्याचा मानस नाही... चालुद्या..
मग काहीच बोलण्यात अर्थ नाही .....
राम मंदिराला विरोध करणारी कॉंग्रेस, आमच्या सारख्या हिंदूंना तरी पसंत नाही....
बाय द वे,
तृणमुल कॉंग्रेसने भाजपच्या लोकांवर हल्ला केला, त्याबद्दल आपले मत काय आहे?
हल्ला हा तृनमूल च्या लोकांनी केला असेल तर त्यांचा निषेध आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाही झालीच पाहिजे..
माझे मत हे पक्ष बदलून नक्कीच बदलत नाही..
आणि राजकारणी म्हणजे आपले बाप नाहीत कि त्यांचा पाठपुरवठा करायला..
जेल मध्ये टाकून बडवले पाहिजे जे हिंसा पसरावतात, बलात्कार करणार्यांना सोडवतात.. आणि बरेच..
-
बाकी
या देशाचे सगळे जाती धर्मीय भारतीय आहेत.. यात हिंदू मुस्लिम.. ब्राह्मण.. ब्राम्हानेतर.. मराठा -माळी असले जात, पात धर्म उराशी बाळागून त्याप्रमाणे वागणाऱ्यांची मला किव येते..
असो..
पाकिस्तान आणि बांगलादेश यांची फाळणी का झाली? हे वाचले आहे का?
टिपू सुलतान, हैदर अली, मलिक अंबर, रझाकार याबद्दल काहीही वाचलेले नाही, हे नक्की ....
अगदीच काही नाही जमले तरी कुराण नक्की वाचा.
त्यात काफिरांच्या बाबतीत काय केले पाहिजे? हे सांगीतले आहे.
आणि तेही नाही जमले तर, रोहिंग्या मुसलमानांना देश का सोडावा लागला?
पाकिस्तान आणि बांगलादेश मधले हिंदू अचानक कमी कसे होत आहेत? हे पण वाचा
आसाम मध्ये हिंदू लोकांना काय भोगावे लागत आहे, हे पण वाचा
काश्मिरी पंडितांच्या बद्दल, एका मिपाकराने लिहिले आहे, तो पण लेख जरूर वाचा .....
जग तिकडे कसे हि नाचत असले तरी मानवतावाद हा मी आदर्श मानतो..
एखादा हिंदू डॉक्टर मुस्लिम वा इतर कोणावर शस्त्रक्रिया करण्यास नक्कीच नकार देणार नाही.. तसेच उलटे हि असणार..
मानवता, समाजिक भावना ह्या माणसाच्या माणुसकीच्या खुणा आहेत..
राजकीय पक्ष आणि त्यांचे पाठीराखे नेमके ह्या विरुद्ध वागतात.. कारण त्यांना फुट पाडून राज्य करायचे असते..
अरे असेल हिम्मत तर विकास आणि उन्नती वर राज्य करावे मग हिंदू तितुका फलाना न म्हणता.. भारतीय समाज म्हणणे योग्य होईल.. आणि सगळे बरोबर येतील..
आणि काही वाचायची गरज काय?
मी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्यात राहतोय.. आणि त्यांचा इतिहास मला नक्कीच माहिती आहे..
असो..
स्वराज्य आणि सुराज्य ह्या दोन्हीची सांगड फक्त तेथे..
बाकी फोडा आणि राज्य करा हि नीती म्हणजे हिंदू एकत्रिकरण म्हणणे म्हणजे जाती पाती धर्म यांचा अवडंबर मानणे होय..
आणि मग किती हि वाचन करा ह्या भेदाच्या भिंती कधीच मिटत नाही...
फाळणीच्या सुमारास, पाकिस्तान आणि बांगलादेश मधील हिंदूंचे होते...
असेच विचार, इराण मधील, पारशी लोकांचे होते ...
इतिहासातून कधीच काहीही धडा न घेणे, हे हिंदू लोकांनाच जमते ...
फाळणीला काय झाले, यावरून bjp हिंदू चा आहे म्हणुन त्याला मत द्यायचे?
फाळनीच्या वेळेस माझ्या सारख्या विचार असणाऱ्यांनी इतर धर्मीय लोकांना काही नसेल केले..
पण तुमच्या सारख्या धर्मात बुडालेल्यानी कत्तली केल्या असतील...
आणि अखंड हिंदुस्थान च्या घोषणा तुम्हाला प्रिय आहेत? अखंड हिंदुस्थान म्हणजे फक्त जमीन का त्यावर राहणारी लोक सुद्धा?
अवघड आहे..एक तर जात, धर्म असले माणून तसे वागणे चूक आणि त्यात तुम्ही त्याचा सरळ पाठपुरवठा करून हे वाचले का.. हे माहिती का विचारता..
मग पाकिस्तान मधील धर्माच्या नावा खाली तयार केले जाणारे दहशतवादी आणि तुमच्या विचारात असा काय फरक आहे..?
आणि काय काय वाचायचे पुढचा भाग आहे..
वाचन माणसाच्या विचाराला सुधरवत असते... जर वाचनविचार सुधारवण्या पेक्षा फक्त ते बदलवत असेल तर त्या वाचनाला तरी काय अर्थ आहे?
मी पण काही वर्षांपूर्वी तुमच्यासारखाच विचार करत होतो.
माझ्या अनुभवांनी मला बदलले.
माझ्यासारखे अनेक हिंदू असतील जे proactively नव्हे तर reactively भाजपच्या बाजूला मत टाकत आहेत.
असे का बरे झाले असेल नेमके? तुमचे काय मत आहे याबाबत?
आनंदा,
हा रिप्लाय तुम्हाला देतोय पण नंतरचे प्रश्न सर्वांसाठी आहे..
अनुभव तुमचे...विचार तुमचे बदलले.. आणि तुम्ही असे का झाले असेल?
हा प्रश्न मला विचारता आहात..
कोणी bjp ला किंवा काँग्रेस ला वोट दिल्याने तो वाईट किंवा मूर्ख ठरत नाही..
त्याला जे योग्य वाटते ते चांगलेच असेल..तुम्ही मी काही वाईट नाही..
पण जेंव्हा बोलण्यात मोदी, bjp येते तेंव्हा हिंदू आणि मुस्लिम यावरच गाडी येऊन थांबते..
मी जर मोदींना मत देत असतो आणि त्यांचा पुरस्कार करत असतो, तर मी जाहीर म्हणालो असतो की हिंदू ना बळ मिळावे म्हणुन मोदींना मी वोट देतो.. बाकी party with differance.., पर्याय नाही.. अच्छे दिन.. देशाची अवस्था हे सगळे मी बघत नाही..
पण मोदी आणि bjp म्हणजे यांव त्यांव पण करायचे.. आणि हिंदू एकीकरण पण म्हणायचे.. अवघड आहे..
जे आहे ते तरी स्पष्टच असावे...
आणि महाराष्ट्रात साधारण तसाच विचार करणारे शिवसेनेचे सरकार सत्तेत आहे.शिवसेना नोव्हेंबर २०१९ पासून अशी आहे का आधीपासूनच अशी आहे? आधीपासूनच असेल तर साधारणपणे केव्हापासून अशी आहे?