Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुक निकालाचा धागा

श
श्रीगुरुजी
Sun, 05/02/2021 - 05:32
🗣 301 प्रतिसाद
आतापर्यंत हाती आलेले कल बहुसंख्य मतदानोत्तर सर्वेक्षणाच्या अंदाजाशी सुसंगत आहेत. कोरोना निर्बंधामुळे मतमोजणी नेहमीपेक्षा हळू होत आहे. त्यामुळे दुपारी १ वाजल्यानंतरच चित्र नक्की होईल.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 69943 views

🗣 चर्चा (301)
श
श्रीगुरुजी Sun, 05/02/2021 - 16:19 नवीन
कॉंग्रेसने तृणमूल कॉंग्रेस आपल्यात विलीन करून ममताला पक्षाध्यक्ष केले, तर कॉंग्रेसला राष्ट्रीय पातळीवर एक विजयी चेहरा व मोदींना पर्याय देता येईल. जगनमोहन रेड्डींंना सुद्धा पुन्हा पक्षात आणले पाहिजे.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 05/04/2021 - 02:42 नवीन
अशा परिस्थितीत काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष कमजोर होऊन प्रादेशिक पक्षांची खिचडी करून मोदींना २०२४ मध्ये आव्हान देता येणे कठीण आहे. हे जरी खरे असले तरी गुरुजी मनात एक धास्ती आहे ती म्हणजे भारतीय समाज कधी कोणाला डोकयावर घेईल आणि कधी कोणाला पायाखाली हे सांगता येत नाही ! आणीबाणी संपली .. परत इंदिराजींना राक्षसी मतदान इंदिराजी गेलया लगेच राजीव ना राक्षसी बहुमत मोदी म्हून माझे मत पक्षाला.. पक्षाची धोरणे काय ? काही बघायचे नाही ! उद्या मोदी नसले तर पक्षाला खाली आपटणार ! हि कसली परिपकव लोकशाही .. भावनात्मक मतदान नुसतं आणि त्यात मग बाकीचे रंग तर आहेतच एकीकडे म्हण्याचे "जगातील सर्वात मोठ्ठी लोकशाही " आणि साधे २ तुल्यबळ राष्ट्रीय पक्ष पण होऊ द्यायचे नाहीत मी प्राथर्ना करतो कि हि स्थानिक बुजगावणी बंद पडून काँग्रेस परत सबळ होऊ दे
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Tue, 05/04/2021 - 05:43 नवीन
सम्पुर्णपणे सहमत.
  • Log in or register to post comments
प
पिनाक Tue, 05/04/2021 - 05:46 नवीन
+1 काँग्रेस पार्टी (वजा गांधी घराणे) हा पर्याय पेपर वर तरी इतका वाईट नाही. ममता, उद्धव आणि तत्सम entities यांना संपूर्ण भारताचा विचार करण्याचा पोच पण नाही आणि तेवढी कुवत ही नाही. पण दुर्दैवाने जेव्हा काँग्रेस चे सध्याचे नेते तोंड उघडतात, तेव्हा त्यांच्या मानसिक आणि बौद्धिक संपदे बाबतीत प्रश्न निर्माण होतो (उदाहरणार्थ, नाना पटोले कालच म्हणाले की केंद्र सरकारने पुनावाला यांना Y security त्यांची रेकी करण्यासाठी दिली आहे).
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 05/04/2021 - 06:16 नवीन
मुळात जनता पक्ष हीच ५ पक्षांची खिचडी होती व ते स्वकर्तुत्वाने सत्तेत न येता इंदिरा गांधींवरील जनतेच्या रागामुळे सत्तेत आले होते. जनता पक्ष सत्तेत आल्यानंतर काही महिन्यातच मोरारजी, चरणसिंग व जगजीवन राम या वरीष्ठ नेत्यांमध्ये पंतप्रधान पदावरून धुसफूस सुरू होती. आपल्या अडीच वर्षांच्या काळात महागाई नियंत्रण हे एकमेव चांगले काम त्या सरकारने केले होते. त्यांनी इतर सर्व वेळ इंदिरा गांधीना तुरूंगात डांबणे, सूड उगविणे यात वाया घालविला. आपण या सरकारचे बळी आहोत ही प्रतिमा इंदिरा गांधींनी कौशल्याने उभी करून सहानुभूती मिळविली होती. साधारणपणे अशीच प्रतिमा मोदींनी २००४-२००१४ या काळात व या निवडणुकीत ममतांनी उभी करून फायदा मिळविला होता. जनतेची सहानुभूती, आपापसातील भांडणे व शेवटी पक्षविभाजन यामुळे इंदिरा गांधी १९८० मध्ये प्रचंड बहुमताने सत्तेत परतल्या होत्या. एखाद्या अनुभवी कामगारावर राग म्हणून त्याला काढून त्याचे काम अननुभवी कामगाराला द्यावे व ते त्याला न जमल्याने अनुभवी कामगाराला पगारवाढ देऊन परत बोलवावे असे या बाबतीत झाले होते. राजीव गांधींना फक्त सहानुभूतीचाच प्रचंड फायदा झाला होता. त्या काळात समाजमाध्यमे, आंतरजाल वगैरे नव्हते हे अजून एक महत्त्वाचे कारण. भाजप फक्त एका व्यक्तीवर अवलंबून नाही व पक्षात तशी भांडणे नाहीत. तसेच समाजमाध्यमे, आंतरजाल यामुळे मिळालेल्या माहितीतून जनता योग्य पर्याय निवडू शकते. त्यामुळे मोदींनंतर जनता लगेच कॉंग्रेसला परत आणेल असे नाही व भाजपलाही सत्तेत कायम ठेवेल असेही नाही.
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Sun, 05/02/2021 - 15:08 नवीन
छान विश्लेषण! धन्यवाद! आता मार्च २०२२ ला उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर, तसेच नंतर गुजरात, हिमाचल आणि २०२३ ला कर्नाटक, तेलंगण, मध्य प्रदेश, राजस्थान आणि कांही लहान राज्ये- इतक्या निवडणुका पुढच्या लोकसभेआधी आहेत. आपण म्हणल्याप्रमाणे या विधानसभा निवडणुकांत कसेही लागले तरी राष्ट्रीय पातळीवर सक्षम विरोधक सध्या तरी दिसत नाही.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Sun, 05/02/2021 - 16:01 नवीन
अगदी दोनच दिवसांपूर्वी तुमचं विश्लेषण वेगळं होतं. भाजपाच्या विजयाची खात्री असल्याने इलेक्शन कमिशनबाबत इतर पक्ष थयथयाट करत आहेत असं तुमचं मत दिसलं. यातही भाजपाचं काय चुकलं याच्या आत्मपरिक्षणापेक्षा मरणासन्न कॉँग्रेस कसा आडवा झालाय वगैरे आपटाआपटी चालू आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 05/02/2021 - 13:56 नवीन
मतदारांनी विद्यमान आदरणीय पंतप्रधान, आदरणीय गृहमंत्री, केंद्रीय मंत्रीमंडळ, समस्त भाजपा आमदार, खासदार, समस्त कलाकार, प्रशासनातील सर्व व्यवस्था, निवडणूक आयोग यांची काही तरी इज्जत म्हणून, एवढ्याशा जागांसाठी ज्यांनी संपूर्ण देश आणि शिष्टीम करोना काळात वेठीस धरलेली होती, म्हणून आपण बंगालवासियांनी ज्या शीटंस निवडून दिल्या. जवळपास तीनाच्या सत्तावीस पटीने अधिक संख्या आहे, त्याचं समाधान आहे. आभार. तुर्तास इतकेच. बाकी चालु द्या. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Sun, 05/02/2021 - 16:03 नवीन
माझे मत भाजपा निवडून यावा असे होते. किमान त्यानंतर तरी रंगा-बिल्ला आपले निवडणुकीचे राजकारण बाजूला ठेवून करोनाचा मुकाबला करण्याकडे गांभीर्याने लक्ष देतील अशी अपेक्षा होती. असो.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 05/02/2021 - 17:13 नवीन
माझे मत भाजपा निवडून यावा असे होते.
काय करणार, हे बंगाली लोक जादुगार निघाले. बंगाली जादू तशी प्रसिद्धच आहे. बंगालसाठी सेठ लोकांनी काय नै केलं. अच्छे दिनाचे निमंत्रण दिलं, बंगाल सोडून सर्व देश कसा सुजलाम सुफलाम आहे ते सांगितलं. बंगालसाठी गुरुदेव रविंद्रनाथ टागोर बनले, बांग्लादेशाच्या स्वातंत्र्य रणसंग्रामात सत्याग्रह केल्याची आठवण जनतेला करुन दिली. बांग्लादेशाला लशी पुरवल्या. चोवीस बाय सात, देशाची अहोरात्र सेवा चालू असतांना ते सोडून करोना काळात आंतरराष्ट्रीय बदनामी झाली तरी त्याला फाट्यावर मारुन प्रचार केला. टीव्हीवर येऊन दोनशेपेक्षा जास्त शीट्स निवडून येऊन आम्ही सरकार स्थापन करु अशा गप्पा मारल्या. एवढं खोटं बोलायची ताकद येते कोठून येते तेच कळत नाही. टाइम्स नाऊच्या मुलाखतीत तर आदरणीय गृहमंत्र्यांचा आव तर असा होता की २९२ पैकी ३०० जागा निवडून येतील, असे ते अविर्भाव होते. कसं जमतं इतकं बाता मारायला देव जाणे. पण योग्यवेळी जनतेने नीट धडा दिला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 05/04/2021 - 02:04 नवीन
सकाळ मधील ब्रिटिश नंदी... तो निदान विनोदी तरी लिहितो यांना सगळंच काळ बेर दिसंत एक प्राध्यापक आणि विचारवंत नागरिक म्हणून हे तरी कबुल करा कि ज्या पक्षाची निशाणी सुद्धा नवहती त्या पक्षाने ३ चे ७७ केले ! आणि ते सुद्धा बंगाल मध्ये .. एकवेळ पंजाब मध्ये शिखानची मने जिकून भाजप न सत्ता मिळवली तर आशचर्य वाटणार नाही पण बंगाल , गोवा आणि केरळ मध्ये पुढे कदाचित हे भाजपने करून दाखवले तर त्यांची दखल (कुठले हि रडगाणे न गाता ) दाखवण्याचा तरी मनाचा मोठेपणं दाखवा ! तो दिन कधी येईल असे वाटत नाही ( म्हणजे प्राध्यापकांनी भाजपने काही तरी "बरे केले" हे म्हणण्याचा दिवस!) एक विनंती बाकी सकारात्मक टीका चालू असदुद्दे .. आणीबाणी नाहीये त्यामुळे बोलण्यास मुभा आहे
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 05/04/2021 - 05:38 नवीन
तुमची टीका जास्त वैयक्तिक आणि विखारी वाटते. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 05/04/2021 - 06:15 नवीन
नंदीवरील नाही तर प्राध्यापकांवरील टिकेबाबत म्हणतोय. असो.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 05/04/2021 - 07:49 नवीन
हो कळलं .. मी त्यांच्या लिखाणाला आणि लिखाणातील कोडगेपणा ला ब्रिटिश नंदीचीच उपमा देतोय पण निदान ब्रिटिश नंदी चे लिखाण मनोरंजक तरी असते एकांगी असले तरी .. येथे तर फक्त थाळी कुचेष्टा आणि सगळी कडे एकाच एक द्वेष
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Tue, 05/04/2021 - 08:57 नवीन
तुमची टीका जास्त वैयक्तिक आणि विखारी वाटते. मी तुमच्या अत्यंत सहमत आहे. त्यपेक्शा चौकसजींनी हाच निशाणा मोदींवर साधायला पाहिजे होता म्हणजे त्याला माझ्या नजरेत तरी विचारधन समजले गेले असते.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 05/04/2021 - 10:18 नवीन
मी मोदींचा समर्थक आहे हे गृहीत धरताय कि काय ! निशाणा मोदींवर साधायला पाहिजे होता .. घ्या -मोदींचा चमको पनाचा कंटाळा येतोच कि,,, - त्यांना हिंदू कंपू मधील काही अति टोकाची विधाने करणाऱ्या व्यक्तींना काबूत ठेवले पाहिजे - भाजपात आयाराम गायराम फार होत आहेत - "राष्ट्रीयत्व " या मुद्य्याचा दर वेळी वापर करणे हे त्यांचे आणि पक्षाचे चुकत आहे असे वाटतेय - कुंभ मेला तो सुद्धा या प्रमाणात होऊ दिला हे चुकलेच .. एक पक्ष म्हणून आणि एक निर्णय घेणारा त्या पक्षाचा नेता म्हणून आपलं पाठिंबा आहे पण तो नक्कीच आंधळा नाही आणि मोदीच कशाला तो पक्ष दुसरे हि लोक पुढे आणील... हाय काय आणि नै काय ! "काका हलवाई ची बाकरवडी खाणाऱ्याला चितळेची बाकरवडी" वर्ज असू नये .. दोन्ही ठिकाणची खा जेव्हा जिथे जी चांगली असेल तेव्हा एकाची आवडते म्हणून दांभिक पानाने दुसऱ्याला फक्त नावे ठेऊ नका येवढेच .. पण जेव्हा लोक अशी चापलुसी करतात तेव्हा आपण रोख ठोक प्रशन विचारतो त्याला "विखारी" वगैरे म्हणणार असाल तर म्हणा...
  • Log in or register to post comments
ट
टीपीके Tue, 05/04/2021 - 11:42 नवीन
चौकस राव, मराठी कच्चं की हो तुमचं. माझ्या मते focus word was विचारधन ;) तुम्हाला नव्हता, शालजोडितला होता तो. निदान मी तरी तसचं वाचलं.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Tue, 05/04/2021 - 13:23 नवीन
.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 05/05/2021 - 00:21 नवीन
टीपीके मराठी कच्चं की हो तुमचं हो क्षमस्व मला वाटले कि आपला रोख माझ्यावर होता
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 05/04/2021 - 06:24 नवीन
आपण पहिला येणार म्हणून नाचणारा मुलगा पहिला आला नाही, परंतु बऱ्यापैकी पण अपेक्षेपेक्षा बरेच कमी गुण मिळवून उत्तीर्ण झालाय. पण तो पहिला न आल्याने शून्य गुण मिळवून अनुत्तीर्ण झालेले काही विद्यार्थी भान विसरून नाचत बसलेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, काँग्रेस यांच्या समर्थकांची अवस्था IPL मधल्या चिअरगर्ल्स सारखी झालीय. चौकार षटकार कोणीही मारले तरी त्या उठून नाचत बसतात, तसंच यांचं झालंय.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Tue, 05/04/2021 - 08:17 नवीन
मागे एकदा मोदीच म्हणाले होते की " माणूस तापात जसा बडबडत असतो तसा नेता निवडणुकीच्या रिंगणात आला की असेच वर्तन करतो ." भारतीय नागरिक आज देखील एखाद्या मुद्यावर अडून मतदान करताना दिसतात .अगदी कांद्याच्या भावाचा फटका देखील निवडणुकीत बसल्याचे उदाहरण इथले अभ्यासक सांगतीलच ! " पेशवाई " हा शब्द वापरला की निवडणुकीत एका विशिष्ट जातीची मते भरकन इकडून तिकडे जातात अशीही थियरी वापरली जाते ! अर्थकारण , नियोजन ,विकास याचा परिपूर्ण अभ्यास आपला मतदार करतो का ? दुसरे ते की जो फ्लोटिंग मतदार असतो त्याला आपल्याकडे खेचण्यासाठी एक " विजयाचे " वातावरण उभे करावे लागते भारत देशात . त्यामुळे मोठ्या विजयाचे दावे करावेच लागतात कारण माणसाला हरणाऱ्या ला पाठिंबा द्यायला आवडत नाही ! प्रादेशिक अस्मिता आपल्या घटनेला अपेक्षित आहे का ... ? या शब्दाचा घटनेत उल्लेख आहे ? आपले संघराज्य आहे याचा अर्थ घटनेला वेगळा अभिप्रेत आहे ! तो मोडून तोडून आज राजकरणात वापरला जातो . भाजपा हा पक्ष हळू हळू सर्व भारत देशात आपले पाय येन केन प्रकारेण पसरत आहे . राष्ट्रवादी काँग्रेसचे नाही का दोनच आमदार केरळ मध्ये निवडून आले ? मग तिथे शरद पवारांना मतदारांनी धडा दिला असे म्हणायचे का ... ? लोकशाहीत घटनेच्या चौकटीत सर्व पक्षांना आपला आवाज बुलंद करायचा अधिकार आहे म्हणून तर एका मतासाठी बाजपेयी यांचे सरकार पाडण्यात आले ना ..... ?
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Tue, 05/04/2021 - 10:15 नवीन
माझ्या मते भारतीय लोकशाही व मतदार प्रगल्भ होत आहेत. आपले आयुष्य छोटे असल्याने ही प्रगल्भता आपल्याला जाणवत नाही. मात्र देशाच्या दृष्टिने मात्र निश्चीतच घडत आहे. जर एखाद्या मतदारसंघातील २०-२५ वर्षांचा मतदान टक्केवारीचा अभ्यास केल्यास हे जाणवू शकते. आत्ताच्या पंढरपूर विधानसभा निवडणूकींचाही असा अभ्यास केल्यास त्यातून एखादी सुसुत्रता लक्षात येऊ शकते. मात्र अगदी तटस्थपणे अभ्यास करता आला पाहिजे. असो.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 05/04/2021 - 10:20 नवीन
प्रगल्भ? मला तरी वाटत नाही कारण मुरलेल्या इतर लोकशाही मध्ये एवढा एकदा इकडे एकदा तिकडे असे कमी दिसते ( काही अपवाद सोडता )
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Tue, 05/04/2021 - 10:56 नवीन
भारतातली लोकशाहीचे वय अवघे ७५ आहे. मुरलेल्या लोकशाहीची वये काय आहेत? हेही पहावयास हवे ना.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 05/05/2021 - 00:25 नवीन
मुरलेल्या लोकशाहीची वये काय आहेत? हो हे हि खरे म्हणा...
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sun, 05/02/2021 - 14:11 नवीन
३ खासदारावरून भाजपा ची ३०० चे वर लोकसभेच्या जागा मिळविण्याची गोष्ट आता सर्वाना ठाउक आहे ! केरळ व बंगाल हे भा ज प ची राज्यच नव्हेत तरीही तिथे प्रवेश झाला आहे ! अर्थात भा ज पा च्या यशाला कारण इतर प्रभावहीन भाजपेतर नेते आहेत . महाराष्ट्रात मतदार खूपच जातीय वादी आहे त्यामुले केरळ व बंगाल सारखे इथे क्रान्तीकारी मतदान काही होणार नाही की भा ज पा २०२४ मधे सत्तेवर यावा ! केरळ तामीळनाड व आंध्र ई भागातील आपल्या मर्यादा भा ज पा ला माहीत आहेत त्यामुळे बिहार ,बंगाल व पूर्वानचलातील राज्ये इथे जम बसवायचा याची भा ज पा ची धडपड चालू आहे ती यशस्वी होताना दिसते आहे. बन्गालमधे भाजपाचा सुपडा साफ वगैरे मथळा उद्याच्या सामन्यात आला तरी त्याची फार दखल घेण्याचे कारण मला दिसत नाही ! कारण बंगाल मधे भा ज पा चा पायाच मजबूत नाही जसा पन्जाब मधेही नाही !
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Sun, 05/02/2021 - 14:19 नवीन
महाराष्ट्रात मतदार खूपच जातीय वादी आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत फडणवीस मुख्यमंत्री पदाचा चेहरा असताना सुद्धा 105 आमदार निवडून आले, आज 106 झाले. तरी पण महाराष्ट्राचा मतदार जातीवादी? भाजपला जर स्वबळावर महाराष्ट्र जिंकता येत नसेल तर हा भाजपाचा दोष आहे राज्याचा नाही.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sun, 05/02/2021 - 14:57 नवीन
२०२४ ला १०५ आले तर अँटी इंकम्बांसीने येतील एरवी मराठा मुख्यमंत्री जाहीर केला तरी १०५ मिळणार नाहीत ! शिवसेनेचे पण हाल होण्याची शक्यता नाकारता येणार नाही ! फक्त आताच्या सरकारवर राग असेल तरच भाजपा आता महाराष्ट्रात सत्तेवर येईल !
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 05/02/2021 - 16:14 नवीन
पूर्ण सहमत
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 05/02/2021 - 14:26 नवीन
पवार, उद्धव, राज अशा अनेकांनी ममतावर अभिनंदनाचा वर्षाव केलाय. आपण परीक्षेत पहिला येऊ असे तावतावाने सांगणारा विद्यार्थी पहिला न येता दुसरा आल्याने शून्य गुण मिळविलेले सर्वजण आनंदाने बेभान होऊन नाचताहेत.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 05/02/2021 - 15:11 नवीन
पुढची निवडणूक, महाराष्ट्र राज्यात, भाजपला कठीण आहे... शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून, MIM राज्य करणार....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 05/02/2021 - 16:02 नवीन
"Bengal Elections 2021 Sanjay Raut is like begani shadi me abdulla diwana says BJP leader | Bengal Elections 2021 : “संजय राऊत म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना” | Loksatta" https://www.loksatta.com/elections-news/bengal-elections-2021-sanjay-raut-is-like-begani-shadi-me-abdulla-diwana-says-bjp-leader-scsg-91-2459996/
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 05/02/2021 - 16:10 नवीन
पहिल्या वाक्याशी पूर्ण सहमत. पुढील निवडणुक भाजप विरूद्ध शिवसेना विरूद्ध कॉंग्रेस-राष्ट्रवादी युती अशी होईल व त्यात भाजप व शिवसेना या दोघांची धूळधाण उडून कॉंग्रेस-राष्ट्रवादी युती सत्तेत येईल व राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असेल. हे टाळण्यासाठी भाजप व सेना पुन्हा एकत्र यायचा प्रयत्न करतील. सेनेशी पुन्हा एकदा युती करण्याची गंभीर घोडचूक भाजपने पुन्हा केली तर, महाराष्ट्रात पुढील अनेक वर्षे भाजपचे अस्तित्व राहणार नाही. त्याऐवजी भाजपने एकट्याने लढून २०२९ च्या निवडणुकीची तयारी करावी. एम आय एम ला महाराष्ट्रात अत्यल्प स्थान आहे व पुढेही ते अत्यल्पच राहील. आता महाराष्ट्रात त्यांचा १ खासदार व २ आमदार आहेत. त्यातील १ आमदार व १ आमदार भाजपच्या कारस्थानांमुळे निवडून आले आहेत.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 05/02/2021 - 17:08 नवीन
यांच्या बरोबरच जावे लागेल ... अशीच गत मनसेची झाली होती .... कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस, आपापल्या जागा शिवसेनेला देणार नाहीत... उरलेल्या जागांसाठी, भाजप आणि शिवसेना यांच्यात लढत लावतील आणि ऐनवेळी शिवसेनेला धोबीपछाड देतील, कारण 50 पेक्षा शिवसेनेचे जास्त आमदार निवडून न आणणे, हीच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस, यांची रणनीति असेल... भाजप विरोधी पक्षांतच राहणार मुख्यमंत्री आणि इतर महत्वाची पदे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस, वाटून घेणार... ह्यापुढे शिवसेना ही शेकाप आणि मनसे, यांच्या पावलावर पाऊल ठेवणार.... ह्याचा फायदा, MIM घेत आहेच आणि हळूहळू आपले आमदार, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस, यांच्या पक्षांत घुसवणार.... नवाब मलिक, अब्दुल सत्तार, ही यादी वाढतच जाणार ....
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Sun, 05/02/2021 - 14:39 नवीन
जुमलासुरमर्दीनी,बंगाल ची दुर्गा,वाघीण.............. मानल बुवा दीदींना.
  • Log in or register to post comments
य
यश राज Sun, 05/02/2021 - 14:51 नवीन
ममता बॅनर्जी नंदीग्राम मधून पराभूत..
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sun, 05/02/2021 - 14:52 नवीन
गड आला पण सिंह गेला!
  • Log in or register to post comments
य
यश राज Sun, 05/02/2021 - 14:54 नवीन
नंदीग्राम मध्ये EVM चा विजय .
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sun, 05/02/2021 - 17:02 नवीन
दीदी आणि तिचे हिंसक कम्युनिस्टांची कॉपी असलेले बगलबच्चे निवडून आले यात आश्चर्य काय? उलट दीदींना घाम फोडणार्‍या भाजपचं कौतुक करायला हवं.
  • Log in or register to post comments
य
यश राज Sun, 05/02/2021 - 17:48 नवीन
दीदी जिंकल्यानंतर तिच्या हिंसक बगलबच्चे यांनी अपेक्षेप्रमाणे "खेला " सुरू केला आहे.. बंगालात बऱ्याच ठिकाणी भाजपा कार्यालयवर हल्ले व जाळपोळ सुरू केली आहे.. आणि रस्त्यावर मोठ्या संख्येनं उतरून जल्लोष ही केला आहे पण छे दीदी चे समर्थक आणि कोरोना.. काहीही काय?
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Sun, 05/02/2021 - 14:49 नवीन
बेळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या मंगला अंगडी २९०१ मतांनी विजयी झाल्या आहेत.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 05/02/2021 - 15:04 नवीन
अत्यंत धक्कादायक निकाल. शेवटच्या क्षणी ममता १,९५७ मतांनी पराभूत गड आला पण सिंंहीण गेली!
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sun, 05/02/2021 - 15:19 नवीन
गंमत ! मजा आ गया. केक वरची चेरी ऐन वेळेस गायब.
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Sun, 05/02/2021 - 15:27 नवीन
केक सलामत तो चेरी पचास! :-)
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sun, 05/02/2021 - 15:23 नवीन
दोन जागी निवडणूक लढविली का काय त्यांनी ... ?
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Sun, 05/02/2021 - 15:55 नवीन
अजून निकाल लागलेला नाही. 19:16 IST - ममता 820 मतांनी आघाडीवर
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Sun, 05/02/2021 - 16:10 नवीन
https://www.lokmat.com/politics/west-bengal-election-2021-nawab-malik-slams-amit-shah-and-narendra-modi-a681/
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 05/02/2021 - 16:13 नवीन
याला आधी स्वच्छ स्नान करायला सांगा.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sun, 05/02/2021 - 17:22 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sun, 05/02/2021 - 16:22 नवीन
एक निवडणुकीपुरता देखील पूजापाठ न करणारा " तो" साहेबाना मुख्यमन्त्रीपदी नको होता .कारण नम्बर नव्हते .आता निवडणुकीतील एक चाल म्हणून गोत्र सांगणारी , पूजापाठ करणारी ती" साहेबाना पन्तप्रधान झाली तरी मान्य आहे !! याला म्हणतात कुटील राजकारणी !!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 48 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा