Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ७)

व
वामन देशमुख
Sat, 04/24/2021 - 08:04
🗣 276 प्रतिसाद
नाईलाजाने हा नवीन धागा काढतोय. होळी-धुळी संपून महिना होत आला पण मिपावरचे राजकीय धुळवंड संपता संपत नाहीय. हे चालू घडामोडींचे धागे आहेत. त्यातून वाचकांना, सहसा चटकन लक्ष न जाणाऱ्या महत्वाच्या बातम्या कळतील, मुख्य प्रवाहातील इतर बातम्यांवर मतप्रदर्शन आणि माफक, अर्थपूर्ण चर्चा करता येईल, थोडीफार खेचाखेची करता येईल, (त्याशिवाय मिपा हे मिपा राहणार नाही!) अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. पण मागच्या सहा धाग्यांवर, (आणि आधीच्या धाग्यांवरही) अगदीच गोंधळ सुरु आहे असे दिसतेय. अर्थात त्यात कोणी एकच जण सामील आहे असे नाही. सगळेच (मीही) सामील आहेत. हरकत नाही, या सातव्या धाग्यापासून धुळवंड थोडी मर्यादित ठेवूयात. पुन्हा पुढच्या महिन्यात पाच विधानसभा आणि इतर निवडणुकांचे निकाल आहेतच. तेंव्हा चर्चा अधिक परीपक्व होईल अशी अपेक्षा आहे. कोरोना, आरोग्य, लॉकडाउन, निवडणुकांचे उर्वरित टप्पे, आंतरराष्ट्रीय घडामोडी, आर्थिक आघाडी, साहित्य, कला, संस्कृती इ वर ताज्या बातम्या आणि सुयोग्य चर्चा होईल अशी आशा बाळगतो आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 68446 views

🗣 चर्चा (276)
म
मुक्त विहारि Tue, 04/27/2021 - 07:08 नवीन
केरळ मध्ये जाण्याचे टाळतात....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 04/26/2021 - 10:04 नवीन
केरळ मधले कुणीही, आखाती देशांत, उच्च पदावर पण जात नाहीत ...असेही काही टक्के जनता म्हणणारच की....
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Mon, 04/26/2021 - 09:15 नवीन
उजव्या आणी डाव्या विचारसरणीमधल्या लोकान्चे सत्तेसाठीचे.. आता सरळ सरळ युद्ध करता येत नाही म्हणुन जैविक युद्ध शेतकरि आन्दोलन चालु असताना डाव्या विचारसरणिच्या लोकाना जराही वाटले नाही की अजुन कोरोना गेला नाही तरी असे लोक मोठ्या प्रमाणात आन्दोलना करता एकत्र कसे येतात? याना लोकान्च्या जीवाची काळजी नाही तर फक्त मोदी तोन्ड्घशी पडण्याची गरज आहे. शेतकर्याना जीव धोक्यात घालायला न लावता यानी शेतमाल फक्त दलालाना विका खासगी उद्योगाना नको असे आवाहन केले असत. यान्च्याकडे सर्व यन्त्रणा होती जी त्यानी शेतकर्यान्चे जीव धोक्यात घालायला वापरली.. कुम्भ्मेळा ही चुक आहेच.. तसेच इतर सर्व धार्मिक कार्यक्रमासाठी जमणेपण... आता असा प्रश्न पडतो की निवडणुका नन्तर अचानक कोरोना परिस्थीती कशी सुधारली अमेरिकेतली? जेव्हा सुरुवातीला अमेरिका सैर्भैर होते तेव्हा भारत कसा काय कोरोना नियन्त्रणात ठेउ शकला? भारतातल्या पुढल्या निवडणुका होइपर्यन्त असे हल्ले चालुच रहाणार. एका पक्शाच्या बाजुला भान्डवलदारी व्यवस्था आहे तर दुसर्या पक्शासाठी जागतिक स्तरावरुन डावी विचार्सरणी... गेल्या वर्शी विषाणु ला वुहान विषाणु किवा चीनी विषाणु म्हणायला खुप विरोध झाला तर आत्ता मात्र या विषाणुला अमेरिकी माध्यम सरळ सरळ इन्डिया विषाणु असे सम्बोधतात... हे युद्ध असेच सुरु रहाणार ... आत्ता केन्द्रात असलेल्या सरकारने कायम्स्वरुपी युद्ध्जन्य परिस्थिती असल्यासारखा हा आजार हाताळला पाहीजे..दल उभारुन कायम स्वरुपी परिस्थिती नियन्त्रणात ठेवली पाहीजे... २०२४ पर्यन्त कोरोना परत परत डोक वर काढणारच आहे... तर औषध साठा, प्रतिबन्धक उपाय इत्यादी बाबतीत सतर्क राहीले पाहिजे...
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Mon, 04/26/2021 - 09:21 नवीन
आय पि एल बंद करा - अख्तरचे मत! https://www.lokmat.com/cricket/ipl-and-psl-should-be-postponed-amidst-covid-19-pandemic-says-shoaib-akhtar-a681/ चालू रहाणार. बि सि सि आय https://timesofindia.indiatimes.com/sports/cricket/ipl/top-stories/ipl-2021-players-withdraw-as-covid-19-rages-in-india-bcci-says-league-will-go-on/articleshow/82254572.cms
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Mon, 04/26/2021 - 09:57 नवीन
बंगालमध्ये १९७७ ते २०११ पर्यंत मंदिरे, पुतळे न बांधणार्‍या तर आरोग्यसेवेवर १००% लक्ष केंद्रीत करणार्‍या पक्षाचे सरकार होते ना? मग तिथली आरोग्यसेवा अगदी उच्च दर्जाची असेल ना? सहजच सुचला म्हणून प्रश्न विचारला.
  • Log in or register to post comments
य
यश राज Mon, 04/26/2021 - 10:03 नवीन
असले अडचणीत आणणारे प्रश्न विचारयचे नसतात... आजच्या घडीला बंगालची अवस्था काय आहे आणि कोणी केली हे शेंबडे पोरगं ही सांगु शकतं.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 04/26/2021 - 10:50 नवीन
केरळची आर्थिक गणिते, आखाती देशांत काम करणार्या माणसांवर आधारित आहेत....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 04/26/2021 - 10:53 नवीन
“देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत लस मिळाली पाहीजे”; राहुल गांधींचं केंद्र सरकारवर टीकास्त्र https://www.loksatta.com/desh-videsh-news/congress-leader-rahul-gandhi-criticism-on-central-government-every-indian-should-get-free-vaccines-rmt-84-2454185/ ---------- पण महाराष्ट्र राज्यात मात्र ..... “हे आम्हाला आवडलं नाही,” मोफत लसीकरणावरुन बाळासाहेब थोरांताची राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका https://www.loksatta.com/maharashtra-news/congress-balasaheb-thorat-on-ncp-nawab-malik-maharashtra-vaccination-sgy-87-2454138/ ------------- डब्बल ढोलकी .....
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Mon, 04/26/2021 - 10:59 नवीन
तिपाईवर फक्त "माठ" ठेवता येतो :-)
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Tue, 04/27/2021 - 11:38 नवीन
अवांतर नावात काहीही असू शकतं आणि ते कधीही आठवू शकते. "माठ" या शब्दावरून मला ही मराठी शॉर्ट फिल्म आठवली. खर तर या शॉर्टफिल्मचा राजकारणाशी थोडासा सुध्दा संबंध नाहीये. 😀
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब Tue, 04/27/2021 - 13:46 नवीन
हाच प्रतिसाद / उदाहरण कित्येक दिवस झाले डोक्यात फिरत होतें.. तीपाई वर फक्तं "माठ" च ठेवता येतो. BTW, लॉकडाऊन संपायला अवघे ३-४ दिवस राहिलेत. इथे कोनाला १५०० रुपये मिळाले का?? ते तीन किलो तांदूळ तीन किलो गहू कोणाला मिळाले का?? लॉकडाऊन जाहीर करण्याआधी आपले आदरणीय कुटुंबप्रमुख मामु यांनी १५०० रुपये आणि अन्नधान्य देणार अस वचन दिलं होत.. कोणाला हेसर्व मिळाले असल्यास सांगा.. त्या व्यक्तीचा शनिवार वाड्यात सत्कार करावा म्हणतो.. !! आगाऊ warning - १५०० रुपयाचे नाव ऐकल कि काही लोकांना पुन्हा एकदा १५ लाखाचा पोटशूळ उठेल. कित्येकदा त्यांना समजवून सांगितलेलं आहे तरीही फरक पडत नाही.. या निमित्ताने पुन्हा सांगतो की मोदींचा व्हिडीओ पुन्हा पाहा,. Bjp cha manifesto परत वाचा आणि मग आपली ( नसलेली) अक्कल पाजळा.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Tue, 04/27/2021 - 14:23 नवीन
गरिबांना मिळणार होते. धान्य मिळावं असे तुम्ही गरजू आहात का ? शक्यता कमी वाटते.
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब Tue, 04/27/2021 - 14:30 नवीन
माझ्या माहितीत जे कोणी गरीब आहेत त्यांना कोणालाही मिळालेले नाहीयेत. काही नातेवाईक आहेत जे रिक्षा चालवतात त्यापैकी कोणालाही १५०० काय १५ रुपये पण मिळाले नाहीयेत. एक नातेवाईक टेम्पो चालवतात त्यांनाही काहीच मदत मिळाली नाही. त्यामुळेच म्हणालो की कोणाला मिळाले असतील तर सांगा.. !!!
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Tue, 04/27/2021 - 14:40 नवीन
माझा एक मित्र आहे जो रिक्षा चालवतोय, त्याला अजून मिळाले नाहीत.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Tue, 04/27/2021 - 14:58 नवीन
नसेल मिळाले तर साथ आटोक्यात आल्यावर करतील खुलासा. " कोविड जुमला " ऐकायची तयारी ठेवा.
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब Tue, 04/27/2021 - 15:10 नवीन
नसेल मिळाले तर साथ आटोक्यात आल्यावर करतील खुलासा. " कोविड जुमला " ऐकायची तयारी ठेवा.
किती तो चाटुपणा?? केंद्राच्या एक एक रुपयाचा हिशोब पाहिजे.. पण इथे जाहीर टिव्हीवर येऊन प्रवचन आणि आणि मदत करण्याचे वचन देऊनदेखील आम्हीं त्याचे पुढे नेमके काय झाले ते विचारायचे नाही.. फक्तं बापाला दिलेलं वचन लक्षात राहत का?? जनतेला दिलेल्या वचनाचे काय??
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Tue, 04/27/2021 - 15:17 नवीन
खुलासा होईपर्यंत थांबा की, किती तो थयथयाट? थोडी ऊर्जा ठेवा की, नौटंकी करायला.
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब Tue, 04/27/2021 - 15:20 नवीन
कसला खुलासा करणार हे?? लॉक डाऊन संपत आले तरी जाहीर केलेली मदत मिळाली नाही.. गरीब जनता मेल्यावर त्यांच्या श्रद्धामध्ये तो खुलासा शिजवा आणि प्रसाद म्हणून वाटा.. कारण १५०० रुपये आणि अन्न धान्य तर मिळणार नाहीये. वेळ निघून गेल्यावर तो खुलासा काय कामाचा???
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Tue, 04/27/2021 - 15:38 नवीन
.कारण १५०० रुपये आणि अन्न धान्य तर मिळणार नाहीये. अन्न धान्य कदाचित मिळेल कारण ते केंद्रा कडून मिळणार आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या योजनेबाबतही काही वेगळे नाही. त्यांनी जाहीर केलेल्या अन्नसुरक्षा योजनेतील धान्य केंद्राकडून येणार आणि निराधार/ वृद्ध/ विधवा साहाय्यदेखील केंद्राच्या योजनेतून मिळवले जाणार. नोंदणीकृत रिक्षावाले, बांधकाम आणि आदिवासींसाठीचा मदत खर्च काय तो राज्य सरकारचा. हे लोकसत्ता च्या अग्रलेखात छापून आलेलं आहे.
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब Tue, 04/27/2021 - 15:47 नवीन
अन्न धान्य कदाचित मिळेल कारण ते केंद्रा कडून मिळणार आहे.
छगन भुजबळ सारखी व्यक्ती अन्न धान्य पुरवठा करणार असेल तर केंद्रानेच काय प्रत्यक्ष देवाने जरी अन्न धान्य पाठवले तरी ते सामान्य गरजु व्यक्तीपर्यंत पोहचेल असे वाटत नाही. भ्रष्टाचार केल्यामुळे इतके वर्ष तुरंगवास भोगुन परत आलेल्या व्यक्तीस पुन्हा तीच जबाबदारी देणे म्हणजे दरोडेखोर व्यक्तीला बँकेचा सुरक्षारक्षक म्हणून नेमल्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 04/27/2021 - 15:54 नवीन
त्या खात्याचे मंत्री कोण आहेत?
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 04/28/2021 - 00:23 नवीन
भ्रष्टाचार केल्यामुळे इतके वर्ष तुरंगवास भोगुन मि भुजबळांचा किंवा राष्ट्रवादी चा पाठीराखा नाही पण भुजबळ हे खरंच न्यायालयात दोषी सिद्ध होऊन तुरंगात गेलं होते कि नुसते न्यायालयीन कोठडीत होते? कोणी खुलासा करेल काय ? कारण जर फक्त न्यायालयीन कोठडीत असतील तर आरोप सिद्ध होतो असे नाही ? तसेच डीएस के सारख्यांचे त्यांच्यावर आर्थिक फसवणूक/ घोटाळा केल्याचा आरोप सिद्ध होऊन त्यांना शिक्षा झाली आहे कि सरकार फिर्याद दाखल करे पर्यंत न्यायालयीन कोठडी? पोलिसांनी ताब्यात घेतले म्हणजे आरोपी लगेच दोषी असलाच पाहिजे असे लोक आणि प्रचार माध्यमे का गृहीत धरतात ? "गुन्हा सिद्ध होई पर्यंत आरोपीला निर्दोष समजले जाते ना? कि भारतीय न्याय व्यवस्थेत वेगळे नियम आहेत?
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 04/28/2021 - 08:08 नवीन
जर आरोपी भाजपचा असेल तर तो आरोपी असतो पण ईतर पक्शाचा असेल तर तो (भाजपेयींच्या मते) गुन्हेगार असतो. तोच आरोपी जर भाजपात प्रवेश करनार असेल तर तो सन्माननीय होतो आणी विविध पदेही मिळवतो.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/28/2021 - 09:18 नवीन
सांगणार होतात ना...
  • Log in or register to post comments
स
सुक्या Tue, 04/27/2021 - 19:56 नवीन
थोडी कळ काढा. केंद्राने मदत केली नाही म्हाणुन राज्य सरकार काही करु शकले नाही अशी बातमी येईल. केंद्राला "खडे बोल" किंवा "सणसणीत चपराक" वगेरे असलेला एक अ/(ह)ग्रलेख येईल.
  • Log in or register to post comments
प
पिनाक Tue, 04/27/2021 - 20:27 नवीन
"शिवसेनेचा केंद्रावर जोरदार हल्ला" "सामनातून केंद्राला टोला" "महाराष्ट्राचा अपमान" "मेलेल्या आईचे दूध" "अफझलखान" "कोथळा" "किंबहुना" इत्यादी..
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा