चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ७)
नाईलाजाने हा नवीन धागा काढतोय. होळी-धुळी संपून महिना होत आला पण मिपावरचे राजकीय धुळवंड संपता संपत नाहीय.
हे चालू घडामोडींचे धागे आहेत. त्यातून वाचकांना, सहसा चटकन लक्ष न जाणाऱ्या महत्वाच्या बातम्या कळतील, मुख्य प्रवाहातील इतर बातम्यांवर मतप्रदर्शन आणि माफक, अर्थपूर्ण चर्चा करता येईल, थोडीफार खेचाखेची करता येईल, (त्याशिवाय मिपा हे मिपा राहणार नाही!) अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. पण मागच्या सहा धाग्यांवर, (आणि आधीच्या धाग्यांवरही) अगदीच गोंधळ सुरु आहे असे दिसतेय. अर्थात त्यात कोणी एकच जण सामील आहे असे नाही. सगळेच (मीही) सामील आहेत.
हरकत नाही, या सातव्या धाग्यापासून धुळवंड थोडी मर्यादित ठेवूयात. पुन्हा पुढच्या महिन्यात पाच विधानसभा आणि इतर निवडणुकांचे निकाल आहेतच. तेंव्हा चर्चा अधिक परीपक्व होईल अशी अपेक्षा आहे.
कोरोना, आरोग्य, लॉकडाउन, निवडणुकांचे उर्वरित टप्पे, आंतरराष्ट्रीय घडामोडी, आर्थिक आघाडी, साहित्य, कला, संस्कृती इ वर ताज्या बातम्या आणि सुयोग्य चर्चा होईल अशी आशा बाळगतो आहे.
आणि त्यांत केंद्राची गाफिली आहेच त्याचबरोबर राज्य सरकारे व माझ्या मते, जनतेचीही तेव्हढीच आहे. ह्याविषयी सविस्तर चर्चा व्हावी पुढेमागे.+ १ आज फक्त मोदींना लक्ष्य केले जात आहे. विशेषतः काही परदेशी माध्यमे काही दिवसांपासून अचानक मोदींविरूद्ध सक्रीय झालेली दिसत आहेत, हे रोचक आहे. समजा मोदी पूर्ण नालायक आहेत असे क्षणभर गृहीत धरू या. पण मग या काळात राज्य सरकारे काय करीत होती? आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी त्यांनी काय केले? आणि जनतेची काहीच जबाबदारी नव्हती का? बंदी असूनही हिंजवडी येथे हजारोंच्या उपस्थितीत बगाड यात्रा आयोजित करणे, बैलगाडा शर्यती, जालीकट्टू, संजय राठोडने लाखभर माणसे जमवूनआयोजित केलेली पोहरादेवीची यात्रा इ. साठी मोदीच दोषी आहेत का? प्रचारसभा जशा मोदींनी आयोजित केल्या तशाच ममता, राहुल, साम्यवादी, महाराष्ट्रात अजित पवार वगैरेंनीही आयोजित केल्या. पण फक्त मोदींवरच दोषारोप का? कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी जितके दोषी केंद्र सरकार आहे तितकेच दोषी सर्व राज्य सरकारे व जनता आहे.बाडीस