चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ७)
नाईलाजाने हा नवीन धागा काढतोय. होळी-धुळी संपून महिना होत आला पण मिपावरचे राजकीय धुळवंड संपता संपत नाहीय.
हे चालू घडामोडींचे धागे आहेत. त्यातून वाचकांना, सहसा चटकन लक्ष न जाणाऱ्या महत्वाच्या बातम्या कळतील, मुख्य प्रवाहातील इतर बातम्यांवर मतप्रदर्शन आणि माफक, अर्थपूर्ण चर्चा करता येईल, थोडीफार खेचाखेची करता येईल, (त्याशिवाय मिपा हे मिपा राहणार नाही!) अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. पण मागच्या सहा धाग्यांवर, (आणि आधीच्या धाग्यांवरही) अगदीच गोंधळ सुरु आहे असे दिसतेय. अर्थात त्यात कोणी एकच जण सामील आहे असे नाही. सगळेच (मीही) सामील आहेत.
हरकत नाही, या सातव्या धाग्यापासून धुळवंड थोडी मर्यादित ठेवूयात. पुन्हा पुढच्या महिन्यात पाच विधानसभा आणि इतर निवडणुकांचे निकाल आहेतच. तेंव्हा चर्चा अधिक परीपक्व होईल अशी अपेक्षा आहे.
कोरोना, आरोग्य, लॉकडाउन, निवडणुकांचे उर्वरित टप्पे, आंतरराष्ट्रीय घडामोडी, आर्थिक आघाडी, साहित्य, कला, संस्कृती इ वर ताज्या बातम्या आणि सुयोग्य चर्चा होईल अशी आशा बाळगतो आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- #BoycottRadheलादेन ने वेळीच "राष्ट्रीय पक्षात" पक्ष प्रवेश केला असता तर त्यालाही "क्लीन चिट" मिळाली असती :)बरोबर..!!! अमेरिकेने खूपच लवकर मारले लादेन ला. नाहीतरी ओसामाजी आणि हाफिज साहेब म्हणणारी टोळीचे प्रयत्न वाया गेले. इमेज क्लीन करण्याची सुरवात केलीच होती तेवढ्यात अमेरिकेने लादेन ला जन्नतवासी केले. तीच बाब झाकीर नाईक या देवमाणसाबाबत.. झाकीर नाईक जी एक्तत्मेचा आणि मानवतेचा संदेश घेऊन कामं करतायेत असे भर सभेत बोलणे, मिठ्या मारणे, त्यांच्या संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करणे अशी कामे देखील एक पक्ष अगदीआत्ताआत्तापर्यंत करतच होता.. त्याला फक्तं पक्षात घेणच बाकी राहिले होते.. !!! अशी जातीय "घाण" हुंगत हुंगत जाणे आणि तिला पक्षात घेणे किंवा छुपे समर्थन देणे , दाढी कुरवळणे इ बाबतीत एकच पक्ष १९४७ पासून ( तस तरं त्याआधी पासून) भरीवकार्य करत आलेला आहे.असे मॅसेज २०१४ पर्यंत चालायचे. आता पब्लिक हुशार झालीय. :)बरोबर बोललात. हो ना. पब्लिक आता हुशार झालिये.. कारण पाहिले फक्तं मेसेजेस चालायचे पण आता बहुतांश लोकं बोलतात , लिहितात, आवाज उठवतात आणि आज त्याचाच परिणाम आहे की ३०० पार झालेत. असो तुम्ही मुळ मुद्द्याला बगल दिऊन गाडी तिसरीकडे नेलीत.. अश्या घाणेरड्या धार्मिक प्रवृत्तीना प्रोत्साहन देणे, मदत करने , कायदेशीर मदत करणे, आणि इमेज क्लीन करणे ही कामं करणार्या पक्षाच नावं मी घेणार नाही.. कारण तुम्ही ते ओळखले असेल. !!!